मी केलेली आणखी काही पेन्सिल शेडिंग्ज

बबन ताम्बे's picture
बबन ताम्बे in जनातलं, मनातलं
2 Jul 2014 - 12:22 pm

thakre

बाळासाहेब ठाकरे

shammi

शम्मी कपूर

pran

प्राण

dev

देव आनंद

rajesh

राजेश खन्ना

कलाविरंगुळा

प्रतिक्रिया

एस's picture

2 Jul 2014 - 12:24 pm | एस

प्राणसाहेब आणि शम्मी कपूर यांची रेखाटने आवडली. राजेश खन्ना व देव आनंद यांची थोडी अजून चांगली करता आली असती.

बबन ताम्बे's picture

2 Jul 2014 - 12:31 pm | बबन ताम्बे

राजेश खन्ना आणि देव आनंद ही माझी स्टार्टींग फेज होती. त्यामुळे तितकीशी सफाई नाही आली.

तुमचा अभिषेक's picture

5 Jul 2014 - 8:01 pm | तुमचा अभिषेक

प्राण आणि शम्मी ... मस्तच जमलेत
त्या पार्श्वभूमीवर देवानंद आणि काका मग आणखी फिके वाटले.
आव्हान म्हणून त्या दोघांना पुन्हा रेखाटू शकता, हवे असल्यास वेगळे फोटो घ्या ..

संपादक मंडळांस विनंती.

क्रुपया कलादालन या विभागात हा धागा हलवणे.

सध्या कलादालन या विभागात नवीन काही टाकताना एरर येत आहेत. प्रॉब्लेम असेल तर क्रुपया दुरुस्त करणे.

-बबन तांबे

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Jul 2014 - 12:37 pm | ज्ञानोबाचे पैजार

प्राण चे चित्र हुबेहुब जमले आहे. पहिल्या भागातली मधुबालाही दिलके तार छेड गयी थी.

बाळासाहेबांचे पण चित्र बरेच चांगले झाले आहे पण बाळासाहेबांच्या डोळ्यातच खरी मजा आहे आणि ते डोळेच या चित्रात निट जमलेले दिसत नाहीत.

पैजारबुवा,

नेटवर फोटोच तसा होता :-(

बॅटमॅन's picture

2 Jul 2014 - 12:54 pm | बॅटमॅन

अगदी असेच म्हणतो. शम्मी अन प्राण लैच जबर्‍या जमलेत. बाळासाहेबही मस्तच, फक्त डोळ्यांना तितका वाव मिळालेला नाही दिसत.

पैसा's picture

2 Jul 2014 - 12:56 pm | पैसा

बाळासाहेबांच्या चित्रातले बाकी तपशील चांगलेच जमले आहेत पण डोळ्यांमुळे जरा रसभंग होतो आहे. मूळ फोटो अस्पष्ट असल्याने तसं झालं असेल पण डोळ्यांमुळे प्रचंड फरक पडतो. मधुबालाच्या चित्रात डोळ्यांपुढे इतर बारीक उणीवेकडे लक्षही जात नाही.

बबन ताम्बे's picture

2 Jul 2014 - 1:04 pm | बबन ताम्बे

सुधारणेस नक्की वाव आहे. पुढील रेखाटनात सुचना अवश्य लक्षात ठेवीन.

सूड's picture

2 Jul 2014 - 12:44 pm | सूड

ह्म्म्म !! जमलंय

राजेंद्र मेहेंदळे's picture

2 Jul 2014 - 12:52 pm | राजेंद्र मेहेंदळे

विशेषतः शम्मी, प्राण आवडले

प्रभाकर पेठकर's picture

2 Jul 2014 - 1:00 pm | प्रभाकर पेठकर

मधुबाला जास्त चांगली जमली होती असे म्हणावे लागत आहे.

मधुबालासाठी "एक्स्ट्रा " मेहनत घेतली होती, विशेषतः डोळ्यांवर.:-)

प्रभाकर पेठकर's picture

2 Jul 2014 - 1:09 pm | प्रभाकर पेठकर

हं...! तुमच्या हाती कला आहेच, त्या बद्दल मनापासून अभिनंदन. थोडाफार सराव गरजेचा आहे असे वाटते आहे. चित्रगुप्त साहेबांचे मार्गदर्शन लाभेलच.

दिपक.कुवेत's picture

2 Jul 2014 - 1:19 pm | दिपक.कुवेत

सगळिच आवडली. आम्हाला एक साधी रेषाहि सरळ मारता येत नाहि (लाईन तो दुर कि बात है..... *lol*

राजेंद्र मेहेंदळे's picture

2 Jul 2014 - 3:45 pm | राजेंद्र मेहेंदळे

काय हो? कोणालाही मारता येईल...वाकड्या रेषा मारायलाच कसब लागते :)

कानडाऊ योगेशु's picture

2 Jul 2014 - 3:50 pm | कानडाऊ योगेशु

पहीली तीन चित्रे सुरेख जमली आहेत. देवसाहेबांचे चित्र त्यांच्या उतारवयातील फोटोवरुन काढले आहे असे वाटते.(चित्राबद्दल आक्षेप नाही पण देवानंदला पाहावे ते त्याच्या उमेदीच्या काळातल्या चित्रपटातच.)

सगळी रेखचित्रे मस्तच पण प्राणमध्ये खरचं प्राण घातले आहेत असं दिसतंय.

प्रचेतस's picture

2 Jul 2014 - 4:16 pm | प्रचेतस

छान आहेत.
प्राणसाहेबांचे सर्वात जास्त आवडले.

बबन ताम्बे's picture

2 Jul 2014 - 6:54 pm | बबन ताम्बे

मधुबाला आणि प्राण या रेखाटनांसाठी खुप वेळ लागला.

पिलीयन रायडर's picture

2 Jul 2014 - 4:50 pm | पिलीयन रायडर

आता उगाच काही तरी सांगायचं म्हणुन मी पण सांगितलं असतं की ते तेवढे बाळासाहेबांचे डोळे...
पण तेवढ्यात स्वत:ची चित्रकला आठवली..!! ते ही एक असोच..

पण तुमच्या हातात उत्तम कला आहेत हे मात्र खरं..

जलरंगात काम करायला हे उपयोगी ठरेल - http://www.maayboli.com/node/47426

बबन ताम्बे's picture

2 Jul 2014 - 6:44 pm | बबन ताम्बे

तुम्ही दिलेला जलरंग माहीतीचा धागा अतिशय सुंदर आणि माहीतीपुर्ण आहे. त्याबद्द्ल आभारी आहे.

एस's picture

2 Jul 2014 - 7:31 pm | एस

खूपच छान धागा. धन्यवाद!

प्यारे१'s picture

2 Jul 2014 - 6:15 pm | प्यारे१

एक काम करा, मा. बाळासाहेब गॉगल घालायचे बर्‍याचदा.
चष्म्याची फ्रेम थोडी मोठी करुन काचा काळ्या करा. झाला गॉगल. गेट अप भारी येईल. :)

राजेश खन्ना सोडून इतर चित्रे आवडली.

गुस्ताखी मुआफ तांबे साहेब..

आपली सगळीच चित्र आवडली.
व्यक्ती ओळखता आली की ते माझ्या लेखी उत्तम चित्रं.

प्यारे१'s picture

2 Jul 2014 - 6:42 pm | प्यारे१

ये हुई ना बात!

बबन ताम्बे's picture

2 Jul 2014 - 6:48 pm | बबन ताम्बे

तुम्ही तर कमालच केलीत . :-) एकदम बाळासाहेबांचा गेट अपच बदलून टाकलात ! आता परफेक्ट बाळासाहेब वाटतात.
व्हेरी गुड.

बॅटमॅन's picture

2 Jul 2014 - 6:54 pm | बॅटमॅन

जे ब्बात गणपाशेठ!!!!

नादच खुळा.

सखी's picture

2 Jul 2014 - 10:58 pm | सखी

कहर आहे गणपा!!
मलाही प्राण आणि शम्मीचे जास्त आवडले, बाळासाहेबांच्या करड्या नजरेची सगळ्यांनाच अपेक्षा असेल.

सस्नेह's picture

3 Jul 2014 - 10:50 pm | सस्नेह

गणपाभौंचे जंगी स्वागत !

बबन ताम्बे's picture

2 Jul 2014 - 6:50 pm | बबन ताम्बे

तुमच्या सुचनेप्रमाणे खाली अंमलबजावणी झाली आहे.
सुंदर बदल.

बबन ताम्बे's picture

2 Jul 2014 - 6:56 pm | बबन ताम्बे

सर्व चित्र रसिकांना धन्यवाद. उत्क्रुष्ट रसग्रहण.

चित्रगुप्त's picture

2 Jul 2014 - 7:52 pm | चित्रगुप्त

बुरा ना मानो बबनजी...
चित्रकलेत यापुढली वाटचाल करायची असेल, तर फोटो बघून चित्रे काढणे बंद करणे आवश्यक.
१९६८ साली मी जेंव्हा आर्ट्स्कूलला प्रवेश घेण्यासाठी गेलो, तेंव्हा साधना, मुमताज वगैरेंची मी काढलेली (तेंव्हा माझ्यामते अप्रतिम कलाकृती होत्या त्या) चित्रे घेऊन गेलो होतो, आणि आपल्याला उत्तम चित्रे काढता येतात, काय थोडेबहुत आर्ट्स्कुलात शिकवत असतील, तेही बघून येऊ, असे समजून गेलो होतो.
पहिल्याच दिवशी प्रिन्सिपाल किरकिरे सर यांनी आता यापुढे चित्रे वा फोटो बघून चित्रे काढणे बंद करा, असे सांगितले, आणि मी ते त्याच दिवसापासून पाळले.
त्यानंतर अनेक वर्षे चित्रकलेतले एकाहून एक अद्भुत असे अनुभव गाठीशी जोडत गेलो....
.... तुमची इछा असेल, तर मी मार्गदर्शन करू शकेन.

प्रभाकर पेठकर's picture

2 Jul 2014 - 8:48 pm | प्रभाकर पेठकर

>>>>तुमची इछा असेल, तर मी मार्गदर्शन करू शकेन.

गंडा बांधून घ्या बबन ताम्बे साहेब. फायद्यात राहाल.

बबन ताम्बे's picture

3 Jul 2014 - 11:25 am | बबन ताम्बे

चित्रगुप्तजी,
तुमच्या बहुमोल सल्ल्याबद्द्ल आभारी आहे. वाईट बिलकुल वाटले नाही. उलट तुमचे मार्गदर्शन मिळाले तर मला हवेच आहे.
मी केलेल्या पेन्सिल स्केचेस बद्द्ल -
आमच्या ऑफीसमधे मला सहका-यांनी एक छानसे स्केच बूक भेट दिले होते. त्यावर काय काढावे असा विचार करत होतो. त्याचवेळी सुपरस्टार राजेश खन्ना यांचे निधन झाले होते. माझे ते आवडते कलाकार होते. त्यांना श्रद्धांजली म्हणून मी त्यांचे महाराष्ट्र टाईम्समधील फोटोवरून पेन्सिल शेडींग केले.

त्यानंतर देव आनंद, प्राण, शम्मी कपूर , बाळासाहेब ठाकरे यांचे पण निधन झाले. मग मी विचार केला की आपल्या आवडत्या व्यक्तीमत्वांना श्रद्धांजली म्हणून त्यांची चित्रे या स्केच बूक मधे काढू या. अशा रीतीने ही सिरीज सुरू झाली.
केवळ आनंदासाठी मी फोटोवरून कॉपी करून शेडींग चित्रे काढतो.

पण तुमचा मुद्दा बरोबर आहे. कॉपी करणे म्हणजे कलाकारी नव्हे. स्वत:चे काहीतरी असावे म्हणून मी दुस-या एका स्केच बुक मधे काळ्या जेल पेनने काही निसर्ग चित्रे काढली आहेत. आमच्याजवळ लोहगावजवळ अजून थोडाफार निसर्ग टिकून आहे. तिकडे बसून मी ग्रामिण घरे, झाडे, डोंगर चित्रबद्ध केली आहेत. मिपावर कधीतरी टाकीनच.

जलरंगाच्या क्लासला देखील मी जात होतो. पण त्यात मला अजून मार्गदर्शनाची गरज आहे. अजुन एव्ह्ढे काही जमत नाही.

ऑइल पेन्टींग, अ‍ॅक्रॅलिक पेंटींग पण शिकायची इच्छा आहे.

तुम्हाला मी भेटु इच्छीतो. मी पुण्यात असतो. आपला फोन नंबर मिळेल काय ?

- बबन तांबे

चित्रगुप्त's picture

3 Jul 2014 - 1:56 pm | चित्रगुप्त

तुम्हाला मी भेटु इच्छीतो. मी पुण्यात असतो. आपला फोन नंबर मिळेल काय ?

अवश्य. परंतु सध्या मी अमेरिकेत आहे, नोव्हेंबरमधे भारतात परतेन. मी दिल्ली आणि इन्दौर मधे रहातो. सध्या सर्व फोन बंद करून ठेवलेले आहेत.
बाकी मिपाच्या मार्फत चित्रकलेचे कसे करता येईल हे बघतो.
या दरम्यान तुम्ही तुमची लोहगाव वगैरेंची चित्रे टाका.
माझे यापूर्वीचे चित्रकलेवरील लेख वाचले आहेत का?
माझे मिपावरील लेखनः
http://www.misalpav.com/user/9160/authored

हुकुमीएक्का's picture

2 Jul 2014 - 10:01 pm | हुकुमीएक्का

सर्व पेन्सिल शेडिग्स अतिशय सुंदर आहेत.

खटपट्या's picture

2 Jul 2014 - 10:13 pm | खटपट्या

सर्व पेन्सील शेडीन्ग्स अप्रतिम !!

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jul 2014 - 12:31 am | अत्रुप्त आत्मा

मस्स्स्त....!

इन्दुसुता's picture

3 Jul 2014 - 6:38 am | इन्दुसुता

चित्रे आवडली.

अवांतर : चित्रगुप्त खरेच गंडा बांधणार असतिल तर आम्हीही दोन्ही पायांवर तयार आहोत !!

सुबोध खरे's picture

4 Jul 2014 - 9:47 am | सुबोध खरे

चित्रगुप्त साहेब आणि बबन तांबे साहेबाना एक विनंती
चित्र कसे बघावे आणि समजावे( आस्वाद आणि आनंद कसा घ्यावा) याचे धडे दिलेत तर उपकृत होऊ. ( या जन्मी तरी चित्रकला जमण्यातली नाही -उजवा मेंदू अधू असल्याने).
जसे वृक्ष पाने फुले कशी पहावी याचे प्राथमिक धडे नूलकर साहेबांनी दिले तसे

प्रभाकर पेठकर's picture

4 Jul 2014 - 10:04 am | प्रभाकर पेठकर

सुबोध खरे साहेब,

अज्ञानात सुख असते.

आज मी चित्रे पाहतो आणि वाखाणतो कारण मी चोखंदळ अभ्यासक नाही. एकदा ते ज्ञान आले तर किती कलाकृतींमधून मी आनंद मिळवू शकेन शंकाच वाटते.

ह्या साठी अजून एक उदाहरण देईन ते असे की 'मला कांही सांगायचे आहे' नाटकात नायिकेला रक्ताचा कर्करोग होतो. आई डॉक्टर असल्याकारणाने तिला ते समजतं शिवाय आपली मुलगी हळू हळू मृत्यूसमीप जाते आहे हेही जाणवतं. त्या मानाने कुटुंबातील बाकीच्या माणसांना वैद्यकिय ज्ञान नसल्याकारणाने ते नॉर्मल असतात, आई सर्वात जास्त दु:खी असते. तेंव्हा आईच्या तोंडी एक वाक्य आहे. 'ज्ञानाने माणूस कमकुवत होतो.' असो.

तुम्ही व्यक्त केलेली इच्छा आणि वरील प्रसंगाचा कांही संबंध नसेलही. नुसतेच प्रत्येक चित्राला वाहवा करण्यापेक्षा त्यातील खाचाखोचा माहिती असतील तर कदाचित उत्तम कलाकृती, जाणकाराला, जास्त आनंद देऊन जाईल.

तरीपण, रसिकापेक्षा परिक्षकाला मान जास्त आणि आनंद कमी मिळत असावा.

बबन ताम्बे's picture

4 Jul 2014 - 11:24 am | बबन ताम्बे

श्री. सुबोध खरे साहेब,
याबाबतीत श्री. चित्रगुप्त साहेब आपल्याला चांगले मार्गदर्शन करू शकतील.
मी अजुन या क्षेत्रात अ‍ॅप्रेंटीस आहे. :-)

-बबन तांबे
(क्रु. मला साहेब संबोधू नये ही विनंती. :-) )

सुधीर's picture

3 Jul 2014 - 9:45 am | सुधीर

सुरेख! कला आहे हो तुमच्या बोटात!

सुरेख आहेत तुम्ही काढलेली चित्र.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Jul 2014 - 11:15 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर रेखाचित्रे !

मैत्र's picture

3 Jul 2014 - 12:05 pm | मैत्र

फार छान काढली आहेत चित्रे..
त्यातही प्राण आणि बाळासाहेबांचे जास्त आवडले. या चित्रांमध्ये मधुबालाच्या चित्रापेक्षा जास्त सफाई आहे.
आणि मला अवघड वाटणारा एक भाग - डोळ्यांपेक्षाही केस अतिशय क्लिष्ट आणि किचकट असतात पेन्सिल शेडिंग मध्ये ते तुम्ही अतिशय अप्रतिम काढले आहेत. त्यांचा पोत, रंगछटा, वळणे, विरळपणा फार छान जमला आहे. उदा बाळासाहेबांचे केस आणि दाढी, राजेश खन्नाचे केस, मधुबालेचेही छानच आले आहेत.
एके काळी हा छंद होता आणि केवळ माधुरीचेच चित्र काढत होतो :) त्यामुळे तुमच्या कष्टांची कल्पना आहे.

बबन ताम्बे's picture

3 Jul 2014 - 3:20 pm | बबन ताम्बे

हो, केशरचनेत स्किल्ड झालोय.

अजुनही तुम्ही माधुरीचे चित्र काढु शकता. की त्या नेने झाल्यानंतर तुमचा इंटरेस्ट संपला ? *lol*

एस's picture

3 Jul 2014 - 7:39 pm | एस

माधुरीची चित्रे आम्हीही काढली होती हो! पळवली लोकांनी! :-)

मैत्र's picture

4 Jul 2014 - 9:10 am | मैत्र

दोन दोन फुटांची काढलेली माधुरीची तीन चित्रे लोकांनी पळवल्यावर परत काढली नाहीत..
एकदा कॉलेजच्या प्रदर्शनातून चोरले गेले. एकदा एक मित्र घरी दाखवायला घेऊन गेला तिथे गायबले.
शेवटी एका जवळच्या मित्राला उत्तम यशाबद्दल भेट दिले तर त्याने ढगळपणा करून हरवले.
मग काही परत मूड झाला नाही.

नेनेंमुळे काय दु:ख.. सॉलिड देखणा माणूस आहे आणि अजूनही लय भारी दिसतात दोघंही.. हे पहा.
या अवांतराबद्दल क्षमस्व..
maadhuri aani dr nene

प्रभाकर पेठकर's picture

4 Jul 2014 - 9:23 am | प्रभाकर पेठकर

हम्म्म! माझ्यापेक्षा डिझर्व्हिंग दिसतोय खरा!

चिगो's picture

1 Aug 2014 - 11:01 pm | चिगो

हम्म्म! माझ्यापेक्षा डिझर्व्हिंग दिसतोय खरा!

ठॉऽऽ ठॉऽऽ ठॉऽऽ.. जबरदस्त काका. =)) अज्ञानात सुख असतं हो, काका.. तिला तुमच्याबद्दल कळलं तर तिची पण "सुझेन" व्हायची.. ;-)

बॅटमॅन's picture

4 Jul 2014 - 11:03 am | बॅटमॅन

मस्त जोडा ओ.

बाकी नेने युरोपियन वाटतोय एकदम. माधुरीबद्दल काय बोलणे????????? सोडाच....

बबन ताम्बे's picture

4 Jul 2014 - 11:27 am | बबन ताम्बे

श्री. मैत्र,
अतिशय सुंदर फोटो. सुंदर माणसांचे फोट देखील सुंदरच येणार. आपल्या मराठीत याला लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणतात.

बबन ताम्बे's picture

3 Jul 2014 - 7:29 pm | बबन ताम्बे

हुकुमीएक्का, खटपट्या ,अत्रुप्त आत्मा , इन्दुसुता,सुधीर,अधिराज,इस्पीकचा एक्का ,मैत्र ,

सर्वांना धन्यवाद.

पेन्सिल शेडिंग हा प्रकार शिकायची मला फार इच्छा होती पण अजून जिथे बेसिक शेप काढायचीच मारामार तिथे शेडिंग का कप्पाळ करणार. आम्ही म्हणजे हंस काढायला सुरूवात करून शेवटी बदक म्हणून खपवणार्‍या वर्गातले. कधी कधी तुमच्यासारख्यांची कला पाहून आपणही काहीतरी काढावं म्हणून पेन्सिल हाती घेतो, पण मनासारखं न जमल्यामुळे पुन्हा उत्साह मावळतो.

बबन ताम्बे's picture

3 Jul 2014 - 7:56 pm | बबन ताम्बे

मी देखील शुन्यातून सुर्वात केली. आपण नाउमेद न होता प्रयत्न करत रहा. निश्चित जमेल.

प्रभाकर पेठकर's picture

3 Jul 2014 - 8:21 pm | प्रभाकर पेठकर

पुलं स्वतःच्या चित्रकलेविषयी म्हणाले होते, 'शाळेत असताना आम्हाला आमच्या चित्रकलेच्या शिक्षकांनी आंब्याचे चित्र काढायला सांगितले होते. मी पानाच्या मध्यावर एक ठिपका वाटावा असे चित्र काढले. नंतर त्याकडे पाहता मला ते बरेच लहान वाटल्यामुळे मी त्या खाली लिहीले 'बाल्यावस्थेतील आम्रफळ''

ह्या निमित्ताने बबनराव, 'पुलं'चं एक छानसं चित्र काढा अशी विनंती करतो.

बॅटमॅन's picture

4 Jul 2014 - 12:47 am | बॅटमॅन

क्या बात. पेठकरकाकांच्या विनंतीला आपलाही दुजोरा! तांबेसाहेब, येऊद्या पुलंचं एक फर्मास चित्र!!

बबन ताम्बे's picture

4 Jul 2014 - 11:30 am | बबन ताम्बे

पु. लं चं चित्र काढणारच आहे.सद्ध्या स्मिता पाटीलचे पोर्ट्रेट काढत आहे. ते झाले की पुल च !

आयुर्हित's picture

3 Jul 2014 - 8:59 pm | आयुर्हित

सर्वच फोटो चांगली आलीत पण शम्मी कपूर १नं जमलाय.
मेहेनतीला सलाम व पुढिल कार्यास शुभेच्छा!

प्राण अगदी अव्वल आला आहे... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ऐका दाजिबा... :- वैशाली सामंत

शैलेन्द्र's picture

4 Jul 2014 - 10:42 am | शैलेन्द्र

भन्नाट

आयुर्हित,मदनबाण,शैलेन्द्र ,

आपला आभारी आहे.

भिकापाटील's picture

4 Jul 2014 - 2:21 pm | भिकापाटील

सर्वच चित्रं भन्नाट आहेत.
मला मधुबाला दिसत नाही...

मधुबाला खालील धाग्यामधे दिसेल.

http://www.misalpav.com/node/28207

चौथा कोनाडा's picture

4 Jul 2014 - 8:39 pm | चौथा कोनाडा

ताम्बेसाहेब झक्कास चित्रे ! सर्व शेडींग हुबेहुब आलेली आहेत. मलातर शम्मीकपुरचे खुपच आवडले. गणपाभाऊनी पण बाळासाहेब ठाकरे एकदम सहीच टचप केलेत ! तुमाला लेखणी बरोबर कुंचलाही वश झालेला दिसतोय !

आमचीपण फर्माइश आहे. पुजा बेदीचे शेडींग काढा. आम्ही फॅन आहोत पुजाचे !

बबन ताम्बे's picture

10 Jul 2014 - 1:46 pm | बबन ताम्बे

पूजा बेदीचे पण चित्र काढू.
पूजा भटचे ? :-)

मुक्त विहारि's picture

10 Jul 2014 - 2:55 pm | मुक्त विहारि

आवडली...

चित्रगुप्त's picture

10 Jul 2014 - 3:02 pm | चित्रगुप्त

कॉपी करण्यासाठी चित्राची निवड करताना ते कुणाचे आहे, यापेक्षा ते कसे आहे, हे बघितले पाहिजे. उदाहरणार्थ खालील फोटो बघा:
..,

m
असे फोटो निवडण्यातून कॉपी करताना आपले कौशल्य पणाला लावावे लागते, आणि त्यातून जास्त प्रगती होत जाते.

बबन ताम्बे's picture

10 Jul 2014 - 3:38 pm | बबन ताम्बे

जरूर प्रयत्न करेन.

खुपच चॅलेंजींग वाटताहेत.

ऋषिकेश's picture

10 Jul 2014 - 3:09 pm | ऋषिकेश

चांगली रेखाटने.

मृत्युन्जय's picture

10 Jul 2014 - 3:37 pm | मृत्युन्जय

उत्तम रेखाटने. आपल्याला चित्रकला अज्याबात जमत नाय. त्यामुळे तुमची चित्रे सुंदरच आहेत असेही म्हणेन. पण तरीही देव आनंदचे चित्र एवढे नीट नाही जमलेले. प्राण बेस्ट.

चौथा कोनाडा's picture

13 Jul 2014 - 5:46 pm | चौथा कोनाडा

ताम्बेसाहेब, चित्रगुप्त यांनी दिलेले दुसरे चित्र, ओठांत सिगरेट धरलेला वयस्क ( ब्ल्याकअ‍ॅण्ड्व्हाईट मधले) जबरदस्त आहे. घ्या काढायला, तुम्हाला भन्नाट जमेल.

बरं, आपलं पुजा बेदीचं घेतलं की नाही काढायला ?

बबन ताम्बे's picture

14 Jul 2014 - 11:37 am | बबन ताम्बे

चौ.को. साहेब,
नक्की तुम्ही सुचविलेली चित्रे काढणार.

चौथा कोनाडा's picture

17 Aug 2024 - 11:57 am | चौथा कोनाडा

बबन तांबे साहेब,

बऱ्याच दिवसात तुमच्या कलाकृती बघण्याचा योग आलेला नाही.
नवीन स्केचस असतील तर नक्की पोस्ट करा.