संजय क्षीरसागर आणि प्रशांत आवले यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे मी काढलेल्या चित्रावर स्वतंत्र धागा काढत आहे. -
---------------------------------------------------------------------------------
बरेच दिवसापासून आमच्या हिचे म्हणणे होते कि आपण हॉल मधील या दर्शनी भिंतीवर काहीतरी चांगले चित्र लावले पाहिजे. बाजारात बरेच फिरलो पण चित्र काही पसंत पडेना. देवाचा/गणपतीचा मोठा फोटो लावावा तर त्या भिंतीपलीकडे नेमके बाथरूम आणि शौचालय येत होते. याच भिंतीवर चित्र लावण्याचे कारण हे कि पलीकडच्या बाथरूम ची ओल सदैव भिंतीच्या पायथ्याशी दिसते व कोणी आले कि तिकडे लक्ष जाते. ते लक्ष विचलित करण्यासाठी छानसे चित्र काढावे/लावावे जेणेकरून घरात आलेला पाहुणा चित्राकडे बघेल व पायथ्याशी असलेल्या ओलाव्याकडे त्याचे लक्ष जाणार नाही.
आंतरजालावर शोध घेत असता या वाघोबांनी माझे लक्ष वेधून घेतले. आणि हेच वाघोबा भिंतीवर विराजमान करण्याचे ठरवले. भिंतीवर बिल्डर ने मारलेला डिस्टम्पर कलर होताच त्यावर ओईल पेंट चा पृष्ठभाग तयार करून त्यावर चित्र काढायचे ठरवले. ओइल पेंट चा वापर यासाठी कि पाण्याने चित्र पुसता येईल. बाजारात सहजासहजी उपलब्ध होणारा एशियन अप्कोलाइट चा १०० ग्राम चा डबा घेवून आलो. दोन इंच रुंद ब्रश ने सफेद रंगाचा पहिला हात मारला. (रंग थोडा घट्ट असतो तो पातळ करण्यासाठी त्यात डायरेक्ट केरोसीन/टर्पेण्टाइन ओतू नका. केरोसीन जास्त पडल्यास रंग पातळ होतो जो परत घट्ट करण्याचा काहीच उपाय नाही. यासाठी ब्रश केरोसीन मध्ये ओला करून रंगात बुडवावा.)सुकल्यावर आतील भगवा कलर डोकावत होता म्हणून अजून एक कोट चढवला. रंग ओला आहे कि सुकला आहे हे बघण्यासाठी आमच्या दोन्ही कन्या त्यावर आपल्या बोटांचे ठसे उमटवू लागल्या. असे करता करता चांगले चार ते पाच कोट चढवून दोन ते अडीच दिवसात पृष्ठभाग तयार झाला.
स्केच करण्यासाठी ग्लास मार्किंग पेन्सिल वापरली (बाजारात ग्लास मार्किंग पेन्सिल लाल व सफेद रंगात उपलब्ध आहेत) साधी पेन्सिल ओईल पेंट च्या पृष्ठभागावर तितकीशी चालत नाही. ग्लास मार्किंग पेन्सिल नसल्यास मुलांचे क्रेयोन चे खडू सुद्धा चालतात. ग्लास मार्किंग ने स्केच केल्यावर जर ते मनासारखे नाही झाले तर कपडा केरोसीन मध्ये ओला करून आपण स्केच पुसू शकतो.
एकदा मनासारखे स्केच झाल्यावर काळ्या रंगाने स्केच भरून टाकले. बाकीचे प्रतिबिंबाचा भाग राखाडी रंगाच्या वेगवेगळ्या छटांनी रंगवला.
झाले घरच्या घरी चित्र तयार. पाच वर्षे झाली अजूनही काल परवा काढल्या सारखे वाटतेय. हेच तंत्र वापरून मुलांची खोली रंगवण्याचा विचार आहे. बघू कधी योग येतोय.
प्रतिक्रिया
26 Jun 2014 - 12:25 pm | अक्शु
वा फारच सुरेख काढलंय चित्र.मला सुरुवातीला वाचताना(scroll down न केल्याने)वाटत होत की रंगीत चित्र असेल.पण हे तर रंगीत पेक्षाही भारी वाटतंय.वेगळा प्रयत्न आवडला.
26 Jun 2014 - 12:35 pm | प्रभाकर पेठकर
अतिशय सुरेख चित्र. अभिनंदन.
फक्त प्रतिबिंबात स्वतःलाच पाहताना वाघोबांच्या अंगावर 'डर के मारे रोंगटे खडे' झालेले दिसताहेत.
26 Jun 2014 - 12:38 pm | डॉ सुहास म्हात्रे
मागे लिहील्याप्रमाणे, सुंदर चित्र !
एकावर थांबू नका. तुमच्या हातात कला आहे. अजून चित्रे काढा आणि इथेपण टाका.
26 Jun 2014 - 1:40 pm | एस
मस्तच. अजून येऊद्या. आणि छायाचित्र घेताना लेन्सचा कोन चित्राच्या पृष्ठभागाला लंबरूप ठेवा म्हणजे अजून छान फोटो येईल.
26 Jun 2014 - 1:45 pm | यशोधरा
सुर्रेख! अजून चित्रं येउदेत.
26 Jun 2014 - 1:53 pm | संजय क्षीरसागर
या स्वतंत्र पोस्टबद्दल अभिनंदन. तुम्ही अजून चित्रं अपलोड करायचा वादा केलायं. चित्रकलेसाठी जरुर वेळ काढा.
26 Jun 2014 - 1:59 pm | कवितानागेश
मस्त काढलय चित्र. छान युक्ती आहे. :)
26 Jun 2014 - 2:07 pm | प्यारे१
आता कसं....!
26 Jun 2014 - 2:22 pm | राजेंद्र मेहेंदळे
आयडिया झकास
26 Jun 2014 - 2:47 pm | सस्नेह
भारीच आहेत तुमच्या खटपटी !
26 Jun 2014 - 3:47 pm | प्रचेतस
खूप छान चित्र.
26 Jun 2014 - 4:51 pm | म्हैस
मस्त . फक्त सावली वाघोबाची न वाटत dragon ची वाटतीये
26 Jun 2014 - 7:33 pm | बबन ताम्बे
अप्रतिम !
१. चित्राची साईझ काय आहे?
२. भिंतीवर डायरेक्ट ऑइल पेंट लावला की आधी थोडे घासून प्रायमर लावला?
26 Jun 2014 - 11:59 pm | खटपट्या
भिंत घासून प्रायमर लावला पाहिजे खर तर. पण आळसामुळे नाही केले. मागील भिंत मैट फिनिश ची होती म्हणून मग डायरेक्ट कलर चढवला.
चित्राची साइज चार फुट X दोन फुट आहे
26 Jun 2014 - 8:22 pm | वपाडाव
ब्येश्ट...
26 Jun 2014 - 8:31 pm | मराठे
चित्र सुरेख आलंय, पाण्यावरील तरंगांमुळे सावली वेगळी दिसणं बरोबर आहे पण सावली तरंगाशी मॅच होत नसल्यामुळे थोडी विचित्र वाटतेय. (आगाऊ सुचना: फोटो जर समोरून काढलात आणि पुरेसा प्रकाश असेल (जास्त नको) तर कदाचीत नीट दिसेल)
26 Jun 2014 - 9:01 pm | किसन शिंदे
झक्कास काढलंय राव हे चित्र.
26 Jun 2014 - 11:53 pm | खटपट्या
सर्वांचे भरपूर आभार, वेळ काढून नवीन चित्रे काढून अपलोड करण्याचा नक्की प्रयत्न करेन.
27 Jun 2014 - 12:48 am | शिद
खुपच सुंदर चित्र रेखाटले आहे आणि अगोदर दिलेल्या प्रतिसादाप्रमाणेच पुन्हा म्हणतोय "जबराट". *good*
27 Jun 2014 - 7:14 am | मदनबाण
वाह्ह... आयडियाची कप्लना आवडली ! :)
{कला प्रेमी}
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेघा रे मेघा रे... :- प्यासा सावन
27 Jun 2014 - 7:26 am | मुक्त विहारि
झक्कास...
27 Jun 2014 - 9:36 am | खटपट्या
पुन्हा एकदा सर्वांचे आभार
27 Jun 2014 - 11:21 am | तुषार काळभोर
भारीच 'खटपट्या' माणूस आहे हा!
27 Jun 2014 - 12:52 pm | पैसा
आणि चित्रही आवडले! झक्कास!
27 Jun 2014 - 1:48 pm | माणिकमोति
खुप छान..! कल्पना आवडली.. फक्त चित्र न देता ते कसे काढले ते सांगितल्यामुळे प्रयत्न करुन बघेन.. :)
27 Jun 2014 - 2:51 pm | अत्रुप्त आत्मा
क्रिएटिव्ह!!!
27 Jun 2014 - 7:12 pm | नि३सोलपुरकर
अतिशय सुरेख चित्र. अभिनंदन!!
27 Jun 2014 - 8:14 pm | किसन शिंदे
ओ भौ, तुम्हाला एक व्यनि धाडलाय. अजून पाह्यला नसावा असं वाटतंय.
उत्तराची प्रतिक्षा आहे.
27 Jun 2014 - 10:59 pm | खटपट्या
उत्तर दिलंय,
उशीर झाल्याबद्दल क्षमस्व
28 Jun 2014 - 3:52 pm | निखळानंद
फक्त 'हे मी काढलेले चित्र !' अश्या प्रकारे इथे न 'फेकता' त्याच्या निर्मिती चे तपशीलवार वर्णन दिल्यामुळे इतरांनाही त्यातून स्फूर्ती मिळू शकेल..
चित्र फार छान ! कल्पना भन्नाट ! पुढील प्रयोगांसाठी शुभेछा ..
28 Jun 2014 - 5:27 pm | चौथा कोनाडा
एक नंबर ! लिहिलेही छान आहे.
आता पुढची खटपट कोणती ?
28 Jun 2014 - 5:36 pm | आतिवास
चित्र आणि तुमची 'खटपट' आवडली!
28 Jun 2014 - 8:44 pm | रेवती
मस्त आलेय चित्र. वाघाचे जे प्रतिबिंब काढले आहे, पाण्याजवळ तोंडाचे त्याला जरा चांगले रूप दिल्यास कसे दिसेल?
28 Jun 2014 - 9:26 pm | खटपट्या
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
@ रेवतीतै -पाण्यात पडलेल्या प्रतीबिम्बाबद्दल बर्याच लोकांचे तेच मत आहे. सुधारणा करायला हवी
29 Jun 2014 - 8:37 pm | प्यारे१
पाण्यात वाघ पाणी प्यायला लागलेला आहे, जीभ लावली पाण्याला तिथं पाण्याची वर्तुळं निर्माण होणारच की.... इतर भाग सुद्धा त्या अनुषंगानं बदलणार... प्रतिबिंब काय घंटा दिसणारे हलत्या पाण्यात?
चित्रात बदल नको असं वैयक्तिक मत आहे.
29 Jun 2014 - 8:40 pm | प्यारे१
आणखी एकः त्या वर्तुळाच्या रेघा तेवढ्या वाघाचं तोंड पाण्याला लागतंय ती जागा केंद्रस्थानाशी धरुन पर्स्पेक्टीव्ह धरुन वाढवाव्या लागतील. ती जी ड्रॅगन ची मान वाटतेय तिथं.
30 Jun 2014 - 2:56 am | खटपट्या
परफेक्ट निरीक्षण आवळे साहेब !!!
धन्यवाद
30 Jun 2014 - 3:06 am | प्यारे१
>>> आव'ळे'
कमळ ळ नसून ते लसूण ल आहे साहेब. कृपया नोंद घ्यावी.
(जल्ला मराठीचा लई लोचा हाय पब्लिकचा)
30 Jun 2014 - 4:51 am | खटपट्या
ओक साहेब आय माय सॉरी.
29 Jul 2014 - 1:19 pm | डॉ सुहास म्हात्रे
अहो ते "ओक" नाहीत आवले आहेत :) =))
30 Jul 2014 - 11:11 am | खटपट्या
एक्का साहेब ओके च्या ऐवजी ओक झाले
30 Jun 2014 - 12:55 pm | सुधीर
सुरेख, चित्र काढण्यामागच्या हेतूमुळे मलाही प्रेरणा मिळाली. :)
30 Jun 2014 - 7:21 pm | शुचि
वा! फारच सुंदर आहे चित्रं.
11 Jul 2014 - 11:41 am | सविता००१
अप्रतिम आहे चित्र
12 Jul 2014 - 9:25 pm | vrushali n
किती मस्तं!!!!
12 Jul 2014 - 10:29 pm | खटपट्या
सुधीर, शुचि, सविता००१, वृषाली एन.
मनापासून धन्यवाद
29 Jul 2014 - 12:35 pm | वटवट
अररररर… कसलं भारीये हे…. व्वा… अ फा ट
29 Jul 2014 - 12:37 pm | कविता१९७८
मस्त
29 Jul 2014 - 12:56 pm | आशु जोग
चित्र अगदी जिवंत वाटते आहे
30 Jul 2014 - 11:10 am | खटपट्या
वटवट, कविता, आशु जोग
धन्यवाद
1 Jan 2017 - 6:12 am | खटपट्या
चित्र दीसत नसल्यामुळे पुन्हा इथे देत आहे.
1 Jan 2017 - 7:22 am | कैवल्यसिंह
मस्त... सुरेख चित्र....
22 Jul 2017 - 9:34 am | मी कोण
प्रतिक्रिया छान वाटल्या.
10 Aug 2017 - 10:12 am | खटपट्या
फेस्बुक ला लोगिन करून पहा एकदा
10 Aug 2017 - 10:50 am | किसन शिंदे
चित्र दिसत नाही.
10 Aug 2017 - 12:24 pm | नितिन५८८
चित्र दिसत नाही..नाही.....नाही.
10 Aug 2017 - 5:24 pm | सरल मान
चित्र दिसत नाही......
22 Aug 2017 - 11:35 pm | माम्लेदारचा पन्खा
काय करू ?
28 Aug 2017 - 6:43 pm | चौथा कोनाडा
चित्र दिसत नाहीय.
14 Sep 2017 - 6:48 pm | जेडी
चित्र दिसत नाहीय.
9 Oct 2017 - 1:00 pm | खटपट्या
नमस्कार बरेच दिवस मिपावर येणे झाले नव्हते म्हणून उत्तर देता आले नाही. ज्यांना चित्र दिसत नाही त्यांच्यासाठी चित्र परत देत आहे. क्रुपया एका टॅबमधे फेसबुक लॉगइन चालू ठेवा आणि दुसर्या टॅबमधे मिपा उघडा. बघा दिसते का...
17 Oct 2017 - 7:12 pm | चौथा कोनाडा
लै भारी !
चित्र दिसलं ! चित्र दिसलं ! चित्र दिसलं !
माझी दिवाळी सत्कारणी लागली !
17 Oct 2017 - 7:12 pm | चौथा कोनाडा
लै भारी !
चित्र दिसलं ! चित्र दिसलं ! चित्र दिसलं !
माझी दिवाळी सत्कारणी लागली !
17 Oct 2017 - 7:13 pm | चौथा कोनाडा
लै भारी !
चित्र दिसलं ! चित्र दिसलं ! चित्र दिसलं !
माझी दिवाळी सत्कारणी लागली !