बिघडलीये काच!

नीधप's picture
नीधप in जे न देखे रवी...
15 Oct 2008 - 10:36 pm

खिडकीची काच बिघडलीये.
दोन प्रतिबिंबं दिसतात हल्ली.
एक साधंच
एक डोळे वटारणारं.
चोरून आणलेल्या
चांदीच्या देवाच्या डोळ्यांसारखे
माझेच डोळे
काचेत बसून रहातात.

मी आक्रसत रहाते स्वतःला.
त्याचा फोन..
एखादी धुंद आठवण..
एक गम्मतनाच..
जुनेपाने कपडे घालून वावर..
देहामनाची तगमग...
सगळं सगळं
त्या डोळ्यात टिपलं जातं.
मी आक्रसत रहाते..
चांदीचे डोळे तसेच मोठ्ठे दिसत असतात

खरंच
बिघडलीये ही काच
बदलली पाहिजे!
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

कविताअनुभव

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

15 Oct 2008 - 10:41 pm | बेसनलाडू

'प्रतिबिंब' ऐवजी 'प्रतिमा' हवे का?
(वाचक)बेसनलाडू

नीधप's picture

15 Oct 2008 - 10:54 pm | नीधप

मला नाही वाटत. प्रतिबिंब हा पण चुकीचा शब्द नाहीये.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

बेसनलाडू's picture

15 Oct 2008 - 10:58 pm | बेसनलाडू

आरशातली ती प्रतिमा आणि पाण्यातले, तळ्यातले इ. ते प्रतिबिंब असे (माझे) भाबडे शास्त्रीय सामान्यज्ञान; त्यामुळे प्रतिबिंब हे मिस्नोमर् वाटले. असो. तुम्हांला काय पटते त्यानुसार होणारे लेखनच महत्त्वाचे.
(सुस्पष्ट)बेसनलाडू

प्रभाकर पेठकर's picture

16 Oct 2008 - 2:57 pm | प्रभाकर पेठकर

'बिंब' आणि 'प्रतिबिंब' म्हणजे 'मुळ रुप' आणि त्याचे, तस्सेच, 'भ्रामक रुप'.
त्यामुळे 'बिंबाच्या' कुठल्याही (पाण्यातील किंवा आरशातील) 'भ्रामक रूपाला' प्रतिबिंब म्हणता येईल.

जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

मुक्तसुनीत's picture

15 Oct 2008 - 10:56 pm | मुक्तसुनीत

कविता आवडली. तुमच्या आधीच्या वाचलेल्या कवितेसारखीच , मनस्वी. "चोरून आणलेल्या चांदीच्या देवाच्या डोळ्यांसारखे" ही शब्दयोजना विलक्षण वाटली - अनेक अर्थांच्या शक्यता असणारी. "काच बदलली पाहिजे" या अनुभवाची जातकुळी एका जुन्या वाचलेल्या कवितेसारखी वाटली - "आताशा मी नसतेच इकडे , माझी ये जा असते तरी". दोन्हीतील शब्द साधे - अगदी म्याटर ऑफ फॅक्ट - आहेत , पण त्यात तीव्रतेने वाटलेला अनुभव साठवला आहे.

धनंजय's picture

16 Oct 2008 - 12:57 am | धनंजय

पहिल्या दर्जाची कविता.

चतुरंग's picture

15 Oct 2008 - 11:12 pm | चतुरंग

चोरून आणलेल्या
चांदीच्या देवाच्या डोळ्यांसारखे

ही एकदमच वेगळी कल्पना!

टोकदार अनुभव शब्दबद्ध करण्याची हातोटी आवडली.

चतुरंग

नीधप's picture

16 Oct 2008 - 12:20 am | नीधप

एक कविता आहे ज्यात देवळातल्या देवाआडच्या कारभारांच्या संदर्भात वर्णन होतं. त्यात चांदिचे देवाचे डोळे चोरण्याचं रूपक संपूर्ण वापरलं होतं.
इथे मला माझेच डोळे ते वटारून बघणारे थंड चांदीचे आणि दयामाया नसलेले वाटायला लागले.. म्हणून ते तसं आलंय.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

प्राजु's picture

16 Oct 2008 - 12:27 am | प्राजु

एकदम वेगळी आहे कविता..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

16 Oct 2008 - 1:10 am | विसोबा खेचर

अज्जुका,

एक वेगळीच कविता केली आहेस..

काहितरी गूढ भरून राहिल्यासारखी..!

तात्या.

मुक्तसुनीत's picture

16 Oct 2008 - 1:37 am | मुक्तसुनीत

The Window pane is damaged.
Lately there appear to be two reflections.
One is the normal one
the other, with eyes protruding.
Like the stolen eyes
of a silver idol.
My own eyes sit
in the glass.

I keep diminishing myself.
His phone call ..
An intoxicated memory
A fun jig
Wandering in old rags
The anxiety of the mind-body
Those eyes absorb everything.

I keep diminishing
The silvery eyes keep protruding

Really
The Window pane is damaged.
Should replace it !

विसोबा खेचर's picture

16 Oct 2008 - 9:15 am | विसोबा खेचर

सुरेख...!

मला मूळ कवितेपेक्षा तिचा हा अनुवाद अधिक आवडला...

तात्या.

नीधप's picture

16 Oct 2008 - 3:17 pm | नीधप

चांगलंय पण काही शब्द खटकले. म्हणजे जे मी लिहिलंय तोच अर्थ भाषांतरात येत नाहीये म्हणून हं.
सिल्व्हर आयडॉल म्हणजे चांदीची मूर्ती नाही तर दगडाच्या मूर्तीवर बसवलेले चांदीचे डोळे.
वॉन्डरींग इन ओल्ड रॅग्ज.. वॉन्डर जमत नाहीये अस वाटतं. घरात एकटे असताना आपण कसेही नी कुठलेही कपडे घालून मोकळेपणाने वावरतो.. तो हा वावर आहे.
असो.. जे तुम्हाला पटलं ते तुम्ही लिहिलंत. आणि त्याबद्दल मी काही म्हणू शकत नाही. तेव्हा पटलं नाही तर सोडून द्या.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

मुक्तसुनीत's picture

16 Oct 2008 - 7:20 pm | मुक्तसुनीत

अलिकडेच मिपावर गाजलेल्या जिब्रानच्या कवितेच्या भाषेत बोलायचे तर "तुमची कविता ही तुमची नसते" :-) प्रत्येक वाचकाच्या मनात ती त्याचे/तिचे संदर्भ लेऊन नवा जन्म घेते ... तुमची कविता मला अमुक एका रीतीने "दिसली". कुणाला ती अजूनही कशी दिसेल. त्यामुळे पटणे- न पटणे हा भाग थोडा गैरलागू होतो.

बाकी मी भाषांतर करत असतानाच हा एक "प्रमाद" आहे याची जाणीव ठेवून केले आहे. काहीही झाले तरी मूळ कवीचे इंटरप्रिटेशन सर्वाधिक महत्त्वाचे ; याची मला जाणीव आहे.

नीधप's picture

16 Oct 2008 - 7:40 pm | नीधप

प्रमाद मुळीच नाही.. सन्मान आहे.
शक्यता अनेक आहेत. मी माझ्या डोक्यातले अर्थ सांगितले. तुम्हाला ते कसे दिसले हे वेगळंच ना..
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

मला ही कविता फार काही कळली नाही. त्यामुळे लगेच ती पहिल्या दर्जाची असल्यावर शिक्कामोर्तब झाले. पण शब्दांचा आणि प्रतिमांचा हा गंमतनाच उच्च आहे. आपण काही तरी भारी वाचतो आहोत असे सारखे वाटत असल्यामुळे ही कविता केवळ पहिल्या दर्जाची न राहता अगदी महत्त्वाची झाली.

एकंदर काय जी कविता मला कळत नाही तरी भारी वाटते ती पहिल्या दर्जाची आणि महत्त्वाची!

धम्मकलाडू

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

विनायक प्रभू's picture

16 Oct 2008 - 5:09 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
आप्ल्याला पण चांगले वाटले.

मुक्तसुनीत's picture

16 Oct 2008 - 7:24 pm | मुक्तसुनीत

>>> मला ही कविता फार काही कळली नाही. त्यामुळे लगेच ती पहिल्या दर्जाची असल्यावर शिक्कामोर्तब झाले. पण शब्दांचा आणि प्रतिमांचा हा गंमतनाच उच्च आहे. आपण काही तरी भारी वाचतो आहोत असे सारखे वाटत असल्यामुळे ही कविता केवळ पहिल्या दर्जाची न राहता अगदी महत्त्वाची झाली.

>>>एकंदर काय जी कविता मला कळत नाही तरी भारी वाटते ती पहिल्या दर्जाची आणि महत्त्वाची!

>>>"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
>>>"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

चला , या निमित्ताने कुठेतरी कवितेचा ओनामा घडायला सुरवात तर झाली :-) हेही नसे थोडके. मिसळपाववर थोडे रमायला झाले तर कुणास ठावे, कविता-बिविता (आणि इतरही काही गोष्टींच्या बाबतीत) काहीतरी पदरात पडून जाईल ! आणि कुणी सांगावे , मूळचा कडवटपणा आणि उपहासही कमी होईल.

धम्मकलाडू's picture

16 Oct 2008 - 7:34 pm | धम्मकलाडू

चला , या निमित्ताने कुठेतरी कवितेचा ओनामा घडायला सुरवात तर झाली Smile हेही नसे थोडके. मिसळपाववर थोडे रमायला झाले तर कुणास ठावे, कविता-बिविता (आणि इतरही काही गोष्टींच्या बाबतीत) काहीतरी पदरात पडून जाईल ! आणि कुणी सांगावे , मूळचा कडवटपणा आणि उपहासही कमी होईल.

हाहाहाहा.. तुमच्यासारखी विचक्षण व्यासंगाचे भारूड टाकणारी मंडळी इथे असल्यावर अशी अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाही.Smile

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मुक्तसुनीत's picture

16 Oct 2008 - 7:35 pm | मुक्तसुनीत

अजून तिरकीच चाल वाटते.... वेळ लागायचाच. असो.

धम्मकलाडू's picture

16 Oct 2008 - 7:43 pm | धम्मकलाडू

चालायचेच. तो शतकी प्रतिसाद तेवढा बदलून टाकायला सांग. आमचा तुमच्याविषयीचा आदर तसूभरही कमी झालेला नाही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मुक्तसुनीत's picture

16 Oct 2008 - 7:45 pm | मुक्तसुनीत

आदरणीय धम्मकलाडू :-)

तुम्हाला कुठला प्रतिसाद इतका बोचतो तर तुम्हीच सांगा की उडवायला! आपण पाहतोच आहोत कुणाचे प्रतिसाद उडताहेत इथून ते :-) कसे म्हणता ?

धम्मकलाडू's picture

16 Oct 2008 - 7:53 pm | धम्मकलाडू

आम्हाला कशाला बोचणार! आमचे तर मनोरंजन होते आहे तो वाचून. अहो पडतो कधी कधी व्यासंग कमी. होतात चुका. पण त्या वेळीच झाकायला निस्तरायला नकोत का? म्हणून आम्ही तो शतकी प्रतिसाद उडवायला नाही बदलायला सांगितले. नव्हे सुचवले.

चला टाटा!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मुक्तसुनीत's picture

16 Oct 2008 - 7:59 pm | मुक्तसुनीत

.

रामदास's picture

16 Oct 2008 - 1:57 pm | रामदास

मूळ कविता आणि इंग्रजी प्रतिबिंब दोन्ही जोरदार.

श्रावण मोडक's picture

16 Oct 2008 - 3:44 pm | श्रावण मोडक

आवडली. साधी, सरळ येणारी.

लिखाळ's picture

16 Oct 2008 - 4:42 pm | लिखाळ

कविता आवडली.
देवाचे चांदिचे डोळे तर फार मस्त !
--लिखाळ.

नीधप's picture

16 Oct 2008 - 6:45 pm | नीधप

प्रतिक्रिया देणार्‍यांचे,
भाषांतर वा विडंबन करणार्‍यांचे सगळ्यांचेच आभार.
:)
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

कोलबेर's picture

16 Oct 2008 - 9:04 pm | कोलबेर

वेगळी कविता आवडली.

चांदीच्या देवाच्या डोळ्यांसारखेहेच देवाच्या चांदीच्या डोळ्यांसारखे असं लिहीलं असतं तर बरचसं कन्फ्युजन टळलं असतं असं वाटतं. मला देखिल पहिल्यांदा वाचताना (फक्त डोळे नसुन) संपूर्ण देवच चांदीचा आहे असं वाटलं.