घेई छन्द मकरंद - होमिओपॅथीचा भाग २ रा

डॉ. दत्ता फाटक's picture
डॉ. दत्ता फाटक in जनातलं, मनातलं
18 Jun 2014 - 7:30 pm

. काली फॉस उर्वरीत भाग.आणखी काही औषधे मस्तिष्का संबंधीची याचं संदर्भातील विशेष +++++
४ ) Aethusea-------- Fool”s Parsley या औषधाविषयी थोडंस डॉ. क्लार्क यांनी “डिक्शनरी ओफ़ प्रेकटीकल मटीरि-यल मेडीका मध्ये म्हटलं आहे, या औषधाचे दुसरे नाव एवढे सार्थ आहे की “”हे औषध मुर्खाचे”च आहे, परमेश्वराने मेंदूत अक्कल भरली तेंव्हा हा पाल्य गैरहजर असावा, कारण काहीं म्हणता कांहीही आकलन करण्याची, समजून धेण्याची पात्रताच या मुर्खाकडे नसते. शरीर नि मन दोन्ही अशक्त, ना याचे लक्ष केंद्रित ( Concentrate ) होऊ शकत किंवा सुसंगत विचार करू शकत”” वर्गात शिक्षक शिकवीत असले तरी त्याचे लक्ष लागत नाही, वाचनाचा मनस्वी कंटाळा, डोकंच दुखू लागतं, डोक्यात गोंधळच फार,अभ्यासात लक्षच नसतं, पण इतर उठाठेवी फार. पालक थंड मिजाजीचा असेल तर काहीतरी करायला हवे म्हणून खटपटीला लागेल, सणकू असेल तर पाल्याच्या पाठीचं धिरडे होऊल. डॉ. क्लार्क यांनी वारंवार नापास होणा-या पदवीधराला दिले; व तो विध्यार्थी पदवीधर झाला, प्रत्येक परीक्षेच्या वेळी तो विध्यार्थी डॉ. क्लार्क यांचे कडून औषध घेवून जाई.
५ ) Argentnum Nitricum ------ नावाचे दुसरे एक औषध आहे, त्या बद्धल म्हटलं आहे “” Does Foolish Things” त्यांच्या मस्तकात फार मोठा गडबड – घोटाळा झालेला असतो, समर्पक नि तर्कबुद्धीला धरून त्याचे विचार चाललेले नसतात, स्वतःला विचार करणं जमत नाही, फारकाय मन म्हणजे “what is maind,? its nathing but Bunch of Tho-ughtes “ असो, तर त्यात तर्क विसंगतीच जास्त असते, मनाचा कमकुवत, कितीही समजावलं, वाचलं, ऐकलं तरी त्यांच्या बुद्धीवर उमटत नाही, त्याचा कसलाही परिणाम होत नाही. बोलताना त्याला योग्य शब्द आठवत नाहीत त्यामुळे भांबावलेला, त्याला जेकाही वाटत असत ते बोलून दाखवणेही जमत नाही. धंदेवाईक रुग्ण असला तर त्याला धंद्यानिमित्त भेटण्याचे झालं तर दिव्य वाटत, भेटण्याची वेळ साधायची हीबाब सुद्धा भयभीत करते, माझ्या पाह्ण्यात असे आसामी आले आहे की अगदी बाहेर निघण्यावेळी सगळा जामानिमा उतरून शौचगृह गाठावं लागतं. शंकाच जास्त, विध्यार्थ्याबाबतीत असंच घडतं, यशाची खात्री नसते, आत्मविश्वासच नव्हे तर कसलीच महत्वाकांक्षा उरत नाही, हेटाळणी होण्याची खंत वाटते, त्याचा परिणाम दुस-याना फसविण्याच्या प्रवृत्तीत होतो, त्यात आपलीच फसगत आहे हे समजण्यापलीकडे ही वृत्ती गेलेली आढळते. आतून अभ्यासाच्या नावे शून्य, पण बाहेर मात्र फुशारक्या हवेत इमले बांधण्या सारख्या.
६ ) काली फॉसची आणखी मानसिक लक्षणे आपल्या संसारी जीवनात पदोपदी जाणवणारी, अल्पशा मानसिक तणावाचा शरीरावर होणारा परिणाम, मामुली कामं ओझं वाटू लागतं, बोलताना लिहताना शब्द गाळतो किंवा सामगायचं असत एक पण बरळून जातो भलतंच परिणामी प्रमाद घडतात, नुकसानीचा भयगंड झोप लागत नाही, पैशाबध्दल अकारण भीती हेही एक कल्के फ्लुओर सारखे लक्षणं या क्षाराच आहे, या व्यवहारातील वागण्याच्या प्रमादामुळे सगेसोयरे, नातेवाईक, जोडलेली माणसं दुरावत आहेत, एकाकी पडल्याची भावना त्यामुळे भवितव्याची चिंता, त्यामुळे येणारा स्वभावातील चिरचीरेपणा, तापटपणा वाढीस लागतो झोप स्वस्थ न लागल्याने ( काली फॉस ३०—फेरम फॉस ३० किंवा २०० ) हा सकाळी उठतो तोच करवादलेला, कांहीही मनास भावत नाही, डोकं चढलेल स्त्रीयांच्या बाबतीत हे खूपच त्रासदायक असतं, अनेक कारणानी आलेला थकवा, चिडकी मनस्थिती, उघड बोलताही येत नाही, कामाचा रेटा सांभाळावा लागतो, त्यामुळे कुणाशी बोलणं नको की कुणी बोलायला आलेले चालत नाही, नको नकोसं वाटतं, मन एवढे हळूवार होतं की मुक्तपणे रडावंसं वाटतं, दुखीः जीवनात सुख-समाधान आनंदापेक्षा वैफल्यच जास्त आहे अशी भावना जोर धरते, नको जीव असं अंतरी वाटत पण धीर होत नाही, आपली कहाणी सांगताना घळाघळा अश्रू गाळते, वर्णन कधी राई पर्वता सारखं करून सांगते, संशयी वृत्ती याचा परिपाक भूतोन्माद ( HYSTERIA ) होण्यात होतो, अशी अवस्था कुण्या घरात थोडयाफार फरकाने असेल तर वेळीच आपल्या वृध्द मातेची आणि गृहिणीची काळजी घ्या, तिच्या भावनांची कदर करा सन्मान द्या तसं न केल तर विचार करा. साधी औषधे अमाप गुण देतील, सल्ला अवश्य घ्या काली फोस १२ ++ कल्के फ्लुओर १२ आणि फेरम फोस १२ असो.
मला एखाद्याला एखाद्या विषयावर बोलण्याचा अधिकार तेंव्हाच असतो जेंव्हा त्याचा त्या संबंधी अभ्यास नव्हे तर व्यासंग असेल तेंव्हा, काहीतरी ऐकून आपलं मत बनवणं हया औषधीच्या लक्षणात बसत नाही. आपल्या भारतभूमीत कणाद नावाचे मुनिवर्य होऊन गेले, त्यांनी पदार्थांच्या अणु विच्छेदना संबंधी सांगताना असं सांगितलं आहे की अणु विच्छेदनातून अंतिम छेदनातून अनर्थ ओढवेल, प्लेटीनम किंवा अन्य धातूच्या विभाजनातून अणु बॉम्ब सारखं विध्वंसक अस्त्र आपण वाचतोच, फारकाय थोड्याफार फरकाने रोजच्या भोजनात आपण जे अन्नाचं चर्वण करतो ते त्या पदार्थांच अण्विकरणच करत असतो, तेव्हा ते पचते, अण्विकरणाने पदार्थाची ताकद वाढते, आणि ते लिलया रसधातूत विलीन होते, जेवढे ते सूक्ष्म तेवढे पचन सुलभ होते, काली फॉसची खासियत हीच की त्याला एक शहाणा व्यासंगी भावतो किंवा ठारवेडा कारण त्या वेड्यावर उपचार करून सुधारता येतं पण मधले जे त्रिशंकु असतात त्यांची अवस्था केविलवाणी असते, “Empty Vessel Makes Noise” तसं, ते धड ना इसपार ना उसपार, शहाणा जो ज्याला समजतं पण समजल्याचा आव आणत नाही, समजून नव्हे उमजून घेतो, हाच ह्या औषधाचा स्थायी भाव आहे, अशा महान असामीना ख-या अर्थाने सुजाण बनवणं. प्रज्ञा - विशेष ज्ञान, प्रतिभा – विशेष आभा – ओज, तेज या ईश्वरदत्त किंवा जन्मजात देन असलेल्या, ज्ञान, विद्वत्ता, पांडित्य हे सर्व आगोम आहे. दुसरी कडून सशक्त विचारधन, चांगले वाईट याचा चिंतन मनन करून ते पचनीय मधुकण आपल्या विचारांची भर घालून सोप्प करून सांगण्यात आपल्याला त्यात आपले विचार धालावेच लागतात, पण हे सारं ते समजून घेणा-यासाठी वायफळासाठी खास नव्हे,
याशिवाय काली फॉसचे इतर औषधी गुण आहेतच पण मानसिकतेवर, बुद्धीमांद्यावर, मेंदू, ग्रे मेंटर, संवेदक मज्जातंतू, ज्ञानतंतू, कर्मतंतू,--( नाड्या ) आपल्या ऐच्छिक, – इच्छेनुरूप चालना-या, अनैच्छिक स्वयंसंवेद्य क्रिया, जसं श्वसन, र्हुदयाचं पंपिंग, अन्नपचन, पतंजली – पापण्यांची उघडझाप, या आणि अशाच सुप्त प्रक्रियां घडवून आणणा-या शरीरस्थ संगणकाला सुव्यवस्थित ठेवणारा हा बहुमोली क्षार. इति आलम !!!

औषधोपचारलेख

प्रतिक्रिया

मागच्या लेखात अशीच चारपाच औषधे दिली होती आणि रोगांचे विवेचन होते परंतू चर्चा झाली यापध्दतीच्या कार्यक्षमतेवर आणि सत्यतेवर.

एक रुग्ण म्हणून मला होमिओपथीचा खूप चांगला अनुभव आला आहे .शरीरातील गाठी ,टॉन्सिलस यावर अलोपथी आणि आयुर्वेदिक उपचार म्हणजे डोळ्यातले कुसळ काढायला युध्दनौका आणण्यासारखे आहेत .पायातल्या भोवरीचेही तेच आहे .यावर होमिओपथीमधले उपचार फारच सोपे आणि गुणकारी आहेत .पायाच्या चिखल्या ,सोरायसिस सारख्या बुरशिजन्य रोगांवरही परिणामकारक औषधे आहेत .

जे कोणी स्वत: शिकू इच्छितात त्यांना या लेखातील माहितीचा नक्कीच उपयोग होईल .पूर्वी अ .ल . भागवत आणि देशपांडे यांची पुस्तके फार वाचली जात असत.

पोटाच्या रोगांसाठी आयुर्वेदिक आणि ज्या रोगांसाठी अॅँटिबायोटिक्स लागतात त्यासाठी अलोपथीकडे वळावे लागते असे माझे मत आहे .

आयुर्हित's picture

19 Jun 2014 - 2:00 pm | आयुर्हित

सोरायसिस हा बुरशिजन्य नाही!

मुक्त विहारि's picture

18 Jun 2014 - 10:00 pm | मुक्त विहारि

आवडला...

प्रसाद१९७१'s picture

19 Jun 2014 - 1:47 pm | प्रसाद१९७१

Aethusea, Argentnum Nitricum, काली फॉस : ह्या गोष्टी शरीरात गेल्यावर कसे काम करतात आणि रोग्/दुखणे बरे कसे होते हे दत्त फाटक ( त्यांना डॉक्टर म्हणता येणार नाही ) सांगु शकतील का?

मृत्युन्जय's picture

19 Jun 2014 - 2:28 pm | मृत्युन्जय

दत्त फाटक ( त्यांना डॉक्टर म्हणता येणार नाही )

या उघड उघड अपमानजनक विधानाचे नेमके कारण समजु शकले नाही. कोणाला डॉक्टर म्हणता येइल आणि कोणाला नाही याचे निकष खुप सरळ आहेत. पीएचडी झाली तर डॉक्टर म्हणवुन घेता येते. त्याच लेव्हलचे वैद्यकीय क्षेत्रातले ज्ञान घेउनसुद्धा हॉमिओपॅथिक पदवीधारकांना डॉक्टर नाही असे म्हणुन हिणवणे हे खुपच असंमजसपणाचे लक्षण आहे. शिवाय सरकारमान्य शिक्षणपद्धतीनुसार शिक्षण घेउन त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातली पदवी घेतली आहे. चोरी करुन,लांड्या लबाड्या करुन, बोगस विद्यापीठातुन नाही. आमच्या एका मास्तरचा वाणिज्य पदवीला आक्षेप होता. त्याच्या मते जगात इतरत्र कुठेही अशी पदवीच नाही. पण त्याच्या नाकावर टिच्चुन आम्ही सगळे वाणिज्य वाले आमचे (नसलेले) ज्ञान पाजळतो आहोत. तर मग होमिओपॅथी वर कसा काय आक्षेप घेता येतो. याच मुद्द्यावर आयुर्वेद सुद्धा बाद करता येइल कारण जगात इतरत्र कुठे अशी पदवी नसेलच.

वैद्यकीय पेशाचे शिक्षण घेताना केवळ औषध देणे घेणे एवढेच अंतर्भुत असत नाही तर शरीरशास्त्राचा, रोगनिदानपद्धतीचा, शस्त्रक्रियेचा, रोगाच्या लक्षणांचा आणि त्यामागील कारणीमीमांसांचा अभ्यास देखील अंतर्भुत असतो. यापैकी तुम्हाला स्वतःला फक्त औषधाच्या उपयुक्ततेबद्दल शंका असली तरीही एक डॉकटर म्हणून डॉ दत्ता फाटक होमिओपॅथीच्या अनुषंगाने बर्‍याच गोष्टी शिकले असतील. त्यामुळे त्यांना डॉक्टर न म्हणण्याचा अट्टाहास खुपतो.

होमिओपॅथी ने रोग बरे झालेले लोक मला माहिती आहेत. ते केवळ श्रद्धेने अजिबात बरे झालेले नाहित. कारण त्यापैकी बरेच असल्या नसत्या अंधश्रद्धा ठेवतच नाहित. हे लोक कसे बरे झाले याबद्दल कोणी काही प्रकाश टाकु शकेल काय?

मुख्य म्हणजे या जाहीर फोरम मधुन असे अपमानकारक वक्तव्य करण्याचे तुम्हाला काहिच कारण नव्हते. असो.

प्रसाद१९७१'s picture

19 Jun 2014 - 3:15 pm | प्रसाद१९७१

चुक झाली, मी दुरुस्ती करतो. ( मी ) त्यांना ( वैद्यकीय ) डॉकटर म्हणणार नाही. असे वाचावे.

हे दत्ता फाटक धाग्यावरच्या चर्चेत भाग घेत नाहीत असं दिसतंय. असं असेल तर नुस्ता लेख पाडून पळून जाण्यात काय अर्थ आहे?

कवितानागेश's picture

19 Jun 2014 - 5:08 pm | कवितानागेश

मी काय म्हणते, तुम्ही प्रत्यक्ष का भेटत नाही त्यांना? कित्ती मज्जा येइल. ;)

प्रसाद१९७१'s picture

19 Jun 2014 - 5:13 pm | प्रसाद१९७१

कोणाला मजा येइल? फाटक साहेबांना, बॅट्याला की तुम्हाला?

कवितानागेश's picture

19 Jun 2014 - 5:23 pm | कवितानागेश

तुम्हाला काय वाटतं? :)

प्रतिक्रिया १ ) उत्तर === नमस्कार देवा, आभारी आहे, कारण धन्यवादात पुन्हा वाद आहे, खूप बरं वाटलं, काहीं विकृत असंमजस प्रतिक्रीयांवर फारसं लक्ष न देणं संमंजसपणाच असो. पोटाच्या रोगासंबंधी ==== . माझा एक या संबंधीचा लेख आहे,त्यात मी निवेदन केले आहे, ते थोडंस उदृत करतो. दैवी म्हणजे जन्मजात अपंगत्व, विकृती या काही प्रमाणात आणि भौतिक संसर्गिक जंतू जन्य व्याधी, अपधात ( काही आपल्याच तिरेकीं वागण्याने उद्भवलेल्या ) नैसर्गिक आपत्ती सोडल्या तर जगात दुखणं नाही.( न पटणार आहे थोडसं ) आपल्याच बेबंद, बेधुंद वागण्यान ते ओढवून घेतो, यम . यम- धर्म-कर्तव्ये, नियम, आहार, विहार, निद्रा आणि मैथुन यातील अतिरेकामुळे, कारणवशात निसर्ग नियमांविरुद्ध वा-गण्यामुळे विसंगतीने विकार होतात, साधं बघा, प्राणी जगतात ती भरपूर अन्न, पाणी आणि निवारा मिळाला की सुखी असतात, फारसे आजारी पडत नाहीत, फारकाय वाघ, सिंह हिंस्र प्राणी एखाद्या रेड्यावर यथेच्छ ताव मारून स्वस्थ बसलेले आहेत, आणि सभोवती हरणें तत्सम इतर श्वापदे आरामात चरत आहेत, पण त्यावर ती हल्ला करत नाहीत. कारण ती त्याची गरज नसते, पण आपलं माणसांच तुम्हीच विचार करा, केव्हढी हाव असते अंतरी, वर म्हटल्या प्रमाणे यम,नियम,आहार, विहार, निद्रा मैथुन काहीवेळा कारणपरत्वे निसर्ग नियमां विरुद्ध घडतातही पण त्यात इतर मार्ग आहेतही, असो. . आपल्याकडे एक दुधारी शस्त्र आहे, सगळ्यात भयानक माणसाची जीभ !! नको ते, नको तेवढे खाते, ती नामानिराळी पण त्रास पोटाला सहन करावा लागतो, दुसरी धार नको ते, नको तेंव्हा, नको त्यावेळी, नको तंसं बोलते त्रास मेंदूला, खंरं की नाहीं !!.
समजा आपलं शौच बिघडलं धावाधाव चालू झाली, आपण काय करतो, एलो – उलटया, विरुद्ध, पेंथीच्या पध्दतीच्या गोळ्या घेतो, का, कसं घडलं, खाण्यात काय अपचनीय आलं या लक्षणांचा मागोवा घेत नाही, बस, ते एनकेन प्रकारान एलो पेथिक गोळ्या घेवून बंद करणे, व पुन्हा हवं तसं खाणे, गोळीच्या प्रतिक्रिया त्यावर पुन्हा औषध असं पुष्कळशा रोगांबाबत घडतं आणि त्याचं कौतिक करत घेणारी माणसं काही थोडी थोडकी नाहीत, सांगायचा मुद्दा असा की होमिओपॅथीत पोटाच्या विकारावर लक्षणा- नुरूप अनंत औषधे आहेत, ती उंदीर, मांजरे,कुत्र्यावर सिध्द केलेली नसून माणसावर सिद्ध केलेली असतात, असं होत खूप लिखाण होतं वेळ जातो. पण देवा तुमच्यासाठी काय पण !! पुनःश्च आभार !!..
प्रतिक्रिया ४थी ) प्रसाद यांची लघु( लहान याअर्थी )शंका !! यावर मृत्युंजयानी दिलेले उत्तर हे सुसंस्कारीतानी हाणलेलं शालजोडीतलं आहे, ही औषधे कसं काम करतात हे उत्तर प्रसादांच्या वरच्या पोकळीत हीन विचार येतात कसे या प्रश्नाएवढे क्षुद्र आहे, मला स्व्तःला असं लेखन भावत नाही, पण काही वेळा समोरच्याला त्याची जागा दाखवावी लागते, कितीतरी चागले विषय आहेत, माझ्या वृत्तीत असं लेखन बसत नाही पण म्हातारी मेल्याच दुःख नाही काळ सोकावता नये. वाचकानो क्षमस्व !
बाबा पाटलांचा धागा नव्हे तंतू पकडून एवढेच म्हणेंन की मी तंतू धरून लिहणे म्हणजे नक्की काय, लिहताना मला वाटत विषय त्याचं आकलन, योग्य शब्दात मांडणी, त्यावर चिंतन मनन करावं लागतं, नुसती बेंटिंग करून चालत नाही नाहीतर तुमच्या सा-रखं ११व्या नंबरावर खेळावं लागेल कारण खेळण्याची संधी क्वचितच येते, नुसती कोमेंट्री नको, सराव करा, येणा-या चेन्डूकडे नीट लक्ष द्या, त्रिफळा केव्हा उडेल सांगता यत नाही, समजून घ्या चेंडू कसा येतो ते. सराव करा तो स्वाध्याय असेल. कारण आणि कार्यभाव यातलं अंतर समजून घ्या, सुज्ञास अधिक सांगणे न लगे. गैसमज टाळावा मी आपला सुर्हूद मित्रच आहे. इति आलम ! प्रतिक्रिया २री ) यस, सोरायसिस हा बुरशीजन्य नाही, खरं आहे थोडक्यात समजवण कठीण आहे प्रयत्न करतो,. AUTOIMMUNE सर्वसामान्य काम करणा-या पेशीं विरुध्द काम करणारा एखादा विकृत पेशींचा गट तयार होतो ( जसा मिसळपा- पावात आढळतो तसा!!) तो अवयवांतील सामान्य रूटीन काम करणा-या पेशीवर आघात करतो, आणि सर्व व्यवस्था कोलमडते, समजा सांध्यावर त्याचा प्रभाव पडला तर र्हुमेटीझम संधीदाह, थायराईडवर पडला तर हायपो थायराईड या सारखी दुखणी उद्भवतात, जास्त सविस्तर लिहता येत नाही, जास्त माहितीसाठी CHRONIC MIASMS J. H. ALLEN याचे पुस्तक रिफर करावे. आपला आभारी आहे, या प्रश्नामुळे पुन्हा चाळण मारावी लागली. केवळ आपलाच !! स्वच्छन्द मकरंद , . , प्रतिक्रिया ३री) कौतुकाबद्धल आभारी आहे, कारण ते नातवंडानी केलेलं आहे!! धन्यवादात वाद आहेच तो नको वाद आपली मराठी खासियत !!
(संपादित)

अनुप ढेरे's picture

19 Jun 2014 - 11:25 pm | अनुप ढेरे

मजा आली प्रतिसाद वाचून. अजुन येऊ दे.. और आन दो...

राजेश घासकडवी's picture

20 Jun 2014 - 1:52 am | राजेश घासकडवी

AUTOIMMUNE सर्वसामान्य काम करणा-या पेशीं विरुध्द काम करणारा एखादा विकृत पेशींचा गट तयार होतो ( जसा मिसळपा- पावात आढळतो तसा!!) तो अवयवांतील सामान्य रूटीन काम करणा-या पेशीवर आघात करतो, आणि सर्व व्यवस्था कोलमडते,

मिसळपाववर विकृत आयडींचा गट आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? सामान्य आयडींवर तो हल्ला करतो आणि त्यातून सर्व व्यवस्था कोलमडेल?

डॉ. दत्ता फाटक's picture

20 Jun 2014 - 8:59 am | डॉ. दत्ता फाटक

मित्रा गैरसमज होतोय,
येथे आयडीया (बरोबर ना ? ) संदर्भात नव्हे तर विकृत मनोधारणे विषयी मी बोलतो आहे, काही गणंग असे आहे की केवळ गंमत म्हणून, काही घटम भिंद्यात पटम छीनद्यात एनकेन प्रसिद्धीसाठी म्हणून आक्रस्तळ लिखाण करतात अभ्यास काही नसतो, काही विरोधासाठी, काही जेलसी कां ते समजत नाही पण असं वाटतं, प्रश्न विचारावेत पण ते अर्थपूर्ण असावेत, उगाच आबैल मुझे मार असे अंगावर ओढून घेणारे नसावेत ती सुध्दा एक प्रकारची मानसिक विकृती आहे. तेंव्हा मनाला फारसं लावून घेवू नका, हा मंच स्वच्छंन्द मकरन्दानचा आहे, मध गोळा करणा-या मधुमक्षिकांचा आहे गांधील मा- शां चा नव्हे, पण काही महाभाग एवढेच फक्त विसरतात, आपण सुजाण आहात समजून घ्या, अरे !! माणूस आहे चुकतो कधी कधी अर्थात ते मानण्यावर आहे? जीवन गाणे सुरात गावं, ते सुश्राव्य असावं, अर्थपूर्ण असावं असं नाही वाटत मित्रा मी डोळे उघडे ठेवून जगलो आहे अनन्तवित कष्टातूनवर आलोय, थोडे आयुष्य उरलं आहे, वेळ कमी आहे सत्कारणी लागावं ही इच्छा तू मला साह्यभूत हो, सहजीवन हाच सुखाचा आधार आहे. एवढे पुरेना !! केवळ तुझाच स्वच्छन्द मकरंद .

प्रसाद१९७१'s picture

20 Jun 2014 - 11:00 am | प्रसाद१९७१

फाटक - तुम्हाला साधा प्रश्न विचारला होता की तुम्ही जी औषधे लिहीली आहेत ती शरीरात आणि रोगा वर कशी काम करतात? ते उत्तर काही तुम्हाला लिहीता येत नाही. मी जेलसी करावी असे तुमच्या कडे काही नाही. खरे तर मी दुर्लक्ष करायला पाहीजे होते ( जसे आपण बंगाली बाबांकडे करतो ).

तुम्ही तुमच्या कंद मकरंदा सहीत मजेत रहा.

अनन्तवित कष्टातूनवर आलोय, थोडे आयुष्य उरलं आहे,

असं वाटण्याची शक्यता नाही. प्रवासात हाती लागलेल्या माधुर्याचीच आठवण राहाते.

राजेश घासकडवी's picture

20 Jun 2014 - 6:11 pm | राजेश घासकडवी

प्रश्न विचारावेत पण ते अर्थपूर्ण असावेत, उगाच आबैल मुझे मार असे अंगावर ओढून घेणारे नसावेत ती सुध्दा एक प्रकारची मानसिक विकृती आहे

ठीक आहे. मी खाली विचारलेला (आणि इतर अनेकांनी विचारलेला) प्रश्न अर्थपूर्ण आहे की विकृत मानसिकतेतून आला आहे ते सांगा.

'विरलीकरणामुळे होमिओपथीची औषधं पोटातच जात नाही, तर गुण कसा येईल? कारणच अस्तित्वात नसेल तर कार्य कसं होईल?'

हा जर अर्थपूर्ण प्रश्न असेल तर त्याला उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. पण अशा प्रयत्नाऐवजी 'प्रश्न विचारणाऱ्यांची मानसिकता विकृत आहे' असा ओरडा करत राहिलात तो कांगावा ठरेल. असा कांगावा मिसळपाववरच्या विकृतच काय, पण सुजाण लोकांनाही आवडत नाही.

विरलीकरणामुळे होमिओपथीची औषधं पोटातच जात नाही, तर गुण कसा येईल?

यापूर्वीच्या भागात मी लिहिल्याप्रमाणे औषध निर्माते/ एजंट/ विक्रेते यांच्या कृपेने मुळातच औषध नसण्याचीही बरीच शक्यता असते, त्यामुळे खरेतर व्याधि आपोआप बरी होण्याची जी प्रक्रिया असते, तिला थोडासा हातभार 'आपण औषध घेत आहोत' या भावनेने मिळणे, हाच होमियोपाथीचा कार्यकारण भाव असावा, असे मला वाटते. बाकी फक्त औषधानेच व्याधि बरी होते, असे नाही. उदाहरणार्थ पथ्यापथ्य, व्यायाम, अ‍ॅक्युप्रेशर, विपश्यना यांनीही व्याधि बरी झाल्याचा माझा स्वानुभव आहे, एवढेच नव्ह्ते, तर अमूक इतक्या काळानंतर रोग बरा होईल, असे ज्योतिषाने सांगितलेलेही (सर्व उपाय करून काहीही गुण आलेला नसता) तंतोतंत खरे ठरल्याचे माझ्या बघण्यात आलेले आहे.

प्रभाकर पेठकर's picture

22 Jun 2014 - 1:46 am | प्रभाकर पेठकर

>>>>औषध निर्माते/ एजंट/ विक्रेते यांच्या कृपेने मुळातच औषध नसण्याचीही बरीच शक्यता असते

बरीच शक्यता असते की औषध नसतेच? जर कांही कांही औषधांमध्ये औषध नसते असे मानले तर ज्यात असते ते गुणकारी असते का?
जर एखादी वस्तू कोणी (निर्माता, वितरक किंवा किरकोळ विक्रेता) औषध नसताना 'औषध' म्हणून विकत असेल तर कायद्याने तो (फसवणूकीचा) गुन्हा आहे की नाही? असल्यास आजतागायत कोणी त्या विरुद्ध (विशेषतः दुसर्‍या पॅथीच्या डॉक्टरांनी) आवाज का उठविला नाही. कायद्याच्या चौकटीत ह्या 'रिकाम्या' औषधांना कोणी आव्हान का दिले नाही. ज्या डॉक्टरांना सरकार शिक्षण देऊन डॉक्टर बनविते ते डॉक्टरीच्या व्यवसायाच्या नांवाखाली फसवणूक करीत असतील (जसे वरील सर्व चर्चेवरून वाटते आहे) तर त्यांच्या व्यवसायाला सरकार कुलूप का लावीत नाहीत? होमिओपॅथीचे सगळेच रुग्ण 'आपण औषध घेत आहोत' ह्या भावनेने बरे होतात की कांही तसे होतात आणि कांहीच्या पोटात औषध गेल्याने होतात?
अ‍ॅलोपॅथीतही 'टेट्रासायक्लिन'च्या कॅप्सूल्स मध्ये औषधाऐवजी 'हळद' भरून विकण्याचा प्रकार, सत्तरच्या दशकात, समोर आला होता. त्यावर कायदेशीर कारवाईही झाली होती. तशी कारवाई होमिओपॅथीच्या औषधांवर, निर्मात्यांवर, डो़क्टरांवर होताना का दिसत नाही?

हाडक्या's picture

22 Jun 2014 - 3:10 am | हाडक्या

आम्ही पण असाच प्रश्न विचारला होता मागच्या लेखावरच्या या प्रतिसादामध्ये ..

वोके.. मी या वादाला तार्किकदृष्ट्या पहायचा प्रयत्न करतोय..

म्हणजे, तुम्हाला होमिओपथीच्या औषधांबद्दल (महिती नाही म्हणून असेल) आक्षेप नाही.
ते योग्य (कमीत कमी डिटेक्टेबल तरी) मात्रेमध्ये असेल तर गुणकारी असेल (असू शकेल) असे तुम्ही गृहित धरले आहे.

आता इतरांसाठी (विरोधी आणि समर्थक) हाच प्रश्न -
पुरेश्या मात्रेमध्ये औषध शरीरात जात असेल तर ते गुणकारी असेल की नाही ?
जर असेल तर विरोध करणार्‍यांची कारणे अजून स्प्ष्ट होतील का ? (आपण गविंचा आक्षेप मान्य केला आहे तो क्षणभर बाजूला ठेवूयात)
जर औषधे कार्य करतात तर या पॅथीला 'भंपक' म्हणता येईल का ?
जर औषधे कार्य करत नसतील तर पॅथीचे तज्ञ तसेच विरोधी तज्ञ यांच्या लक्षात ही बाब नाही आलीय का अजून ? मग तर पॅथीच रदबादल व्हायला हवी. लोकांना कायदेशीर पदवी (अथवा पदविका ) कशी दिली जाते जगभर ?

तसेच या उपचार-प्रणालीच्या अनुशंगाने (बाजूने) जर काही संशोधन होत असेल तर समर्थकांनी अजून का मांडले नाहीये ? की इथल्या समर्थकांना माहिती नाहीये ?

(अजून बरेच प्रश्न उभे राहतील परंतु आतापुरते इतकेच..)

उत्तरांच्या प्रतिक्षेत.

चित्रगुप्त's picture

22 Jun 2014 - 11:32 am | चित्रगुप्त

कायद्याचे वगैरे मला काहीही ठाऊक नाही, मात्र मी औषधांबद्दलचे माझे अनुभव सांगू शकतो.
चाळीसेक वर्षांपूर्वी आमच्या शहरातील एक नावाजलेले अ‍ॅलोपाथिक डॉक्टर लहान मुलांना मात्र बायोकेमिक औषधेच देत असत, आणि लोक आवर्जून त्यांचाकडे लहान मुलांना नेत, आणि ती बरी होत. या डॉक्टरना मोठ्या प्रमाणावर औषधे लागत, आणि तेवढी त्यांना वेळचे वेळी पुरवणे तात्कालीन परिस्थितीत आम्हाला शक्य नसायचे ( औषधे कलक्त्त्याहून येत, आणि बंगाली बाबूंचे हडताळ वगैरेंमुळे बरेचदा कारखाना बंद ठेवावा लागत असल्याने किंवा आणखीही कारणे असतील) डॉक्टर साहेबही आधीपासून न सांगता अचानक रात्री दवाखाना बंद झाल्यावर येत आणि उद्या अगदी सकाळी एकेक पौंडाच्या बाटल्या हव्यात म्हणत.
त्याकाळी आमचे दुकान जेमतेमच चालायचे आणि एकंदरित परिस्थिती वाईट होती, जगण्या-मरण्याचाच प्रश्न होता. याचे कारण म्हणजे बर्‍याच गिर्हाईकांना हवी असलेली औषधे आमच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे त्यांना हात हलवत परत जावे लागायचे आणि शहरातल्या दुसर्‍या (एकमेव) दुकानात मात्र सर्व औषधे उपलब्ध असल्याने हळूहळू आमचे गिर्‍हाईक कमी कमी होत जाऊन त्या दुसर्‍या दुकानात जाऊ लागले असल्याने त्याचे दुकान चांगले चालायचे. .
असे काही वर्ष चालले. शेवटी एकदा एका एजंटाने यातले रहस्य सांगितले, की गिर्‍हाइकाने परत जाऊ नये म्हणून साधी मिल्क शुगर्/अल्कोहोल देणे.
तेंव्हापासून वर उल्लेख केलेल्या डॉक्टराना आम्ही रातोरात साधी मिल्क्शुगर (ही तेंव्हा युरोप मधून येत असे. मोठा ड्रम मागवला की वर्षभर पुरत असे) संगमरवरी घोट्यात बराच वेळ घोटून (त्यामुळे त्यातले डल्ले मोडून अगदी बारीक, मऊ होते) पौंडाच्या बाटल्यात भरून देऊ लागलो. (ते आमच्यावर फार खुष असायचे, कारण त्यांना सायकलने रात्री यायला आमचे दुकान जवळ पडायचे, आणि अगदी सकाळी त्यांना औषधे घरपोच मिळत. त्याकाळी फोन, स्कूटरी, नव्हते). होमियोपाथिची जी द्रव औषधे संपलेली असत, त्या बाटल्यात साधे अल्कोहोल घालून ठेवायचो.
या धाग्याच्या निमित्ताने हे सर्व आठवते आहे. ही गोष्ट १९६७-७७ या काळातील आहे. आता काय परिस्थिती आहे, हे मला ठाऊक नाही.
मात्र मला आणि पत्नीला आलोपाथीचे वाईट अनुभव असल्याने आम्ही शक्यतो कोणतेच औषध घेत नाही, तशी गरजही सहसा पडत नाही. घ्यायचेच झाले, तर होमियोपाथी डोक्टराकडे जातो. कुणास ठाउक, असेलही त्याच्याकडले औषध शुद्ध, आणि असतीलही होमियोपाथीचे सिद्धांत खरे. आपल्याला बरे वाटण्याशी मतलब.

प्रभाकर पेठकर's picture

22 Jun 2014 - 1:28 pm | प्रभाकर पेठकर

चित्रगुप्तसाहेब,

>>>>कायद्याचे वगैरे मला काहीही ठाऊक नाही.

कायद्याचे ज्ञान मलाही नाही. पण औषध नसलेली एखादी गोष्ट निर्मात्याने, विक्रेत्याने आणि डॉक्टरने, जाणतेपणी, दुसर्‍याच्या अज्ञानाचा फायदा घेऊन, औषध म्हणून देणे हे अनैतिक आणि बेकायदेशीर आहे एवढे तर आपल्या सगळ्यांनाच समजते. त्यासाठी कायद्याचे फार मोठे ज्ञान असावे लागत नाही.

चित्रगुप्त's picture

22 Jun 2014 - 6:18 pm | चित्रगुप्त

पेठकर साहेब, आपण म्हणता ते अगदी योग्यच आहे...
असो जाले ते जाले -- नेणतेपणे होवोन गेले -- आतातरी ब्राह्मणी आपणाला -- शहाणे करावे....
असे म्हणोन आम्ही ते दुकान, ते शहर सोडून, स्वतःचे आयुष्य स्वतःच्या मनासारखे घडवायला, चित्रकार म्हणून जगायला ७७ साली जे बाहेर पडलो, ते आजतागायत... आता कश्याचा ना खेद ना खंत, न अभिमान ना आकांक्षा...
या धाग्यामुळे आठवणी जागृत झाला, एवढेच.

संजय क्षीरसागर's picture

22 Jun 2014 - 6:44 pm | संजय क्षीरसागर

मान गये.

प्रभाकर पेठकर's picture

23 Jun 2014 - 11:05 am | प्रभाकर पेठकर

चित्रगुप्त साहेब,
हा तुमच्यावर वैयक्तिक आरोप नाही कारण कुठल्या परिस्थितीत (जगण्या-मरण्याचा प्रश्न..) तुम्हाला तसे करावे लागले हे तुमच्या प्रतिसादात तुम्ही सांगितले आहेच. माझा आक्षेप हा व्यवस्थेवर आहे. सरकारी यंत्रणेवर आहे. होमिओपॅथीत औषधाचा लवलेश नसतो, नुसताच प्लासिबो इफेक्ट असतो ह्या टोकाच्या मतांना आहे.
ज्या निकषांवर अ‍ॅलोपॅथीतील औषधे 'औषध' म्हणून मान्यता पावतात ते निकष जसे होमिओपॅथीत वापरले जात नाहित तसेच 'आजीच्या बटव्यातही' वापरले जायचे नाहित. म्हणून सर्व निरर्थक होते/आहे का? कपाळाला वेखंड लावणे, लहान बाळांना पोटात गॅस झाल्यावर एरंडाचे पान लावणे, वेगवेगळ्या गुट्या उगाळून देणे, उन्हाचे समयी डोक्यावर एरंडाचे पान ठेवणे, पित्तावर कोकमाचा रस घेणे, अपचनावर आलं चावणे, जखमेवर हळद लावणे, वात झाल्यास ओवा-मिठ खाणे वगैरे वगैरे अनेक घरगुती उपचार आज अनेक वर्षांच्या अनुभवातून मान्यता पावले आहेत. तेही ह्या अ‍ॅलोपॅथीच्या निकषांच्या चौकटीत बसत नाहीत म्हणून फक्त 'प्लासिबो इफेक्ट' मानावा का?

नितिन थत्ते's picture

23 Jun 2014 - 3:22 pm | नितिन थत्ते

>>कपाळाला वेखंड लावणे, लहान बाळांना पोटात गॅस झाल्यावर एरंडाचे पान लावणे, वेगवेगळ्या गुट्या उगाळून देणे, उन्हाचे समयी डोक्यावर एरंडाचे पान ठेवणे, पित्तावर कोकमाचा रस घेणे, अपचनावर आलं चावणे, जखमेवर हळद लावणे, वात झाल्यास ओवा-मिठ खाणे वगैरे वगैरे अनेक घरगुती उपचार आज अनेक वर्षांच्या अनुभवातून मान्यता पावले आहेत.

तसं नाही. त्यात निदान एरंडाचा रस किंवा जेकाय औषध आहे ते पोटात जाण्याची शक्यता शून्यापेक्षा खूप जास्त दिसते. म्हणून ते टाकाऊ नाही. त्याच्या टेस्ट घेतल्या जाऊ शकतात आणि अमूक औषधाने अमूक रोग (खरे तर लक्षणे) बरा होतो असे सिद्ध होऊ शकते.

आयुर्वेदावरचा आक्षेप हा वात-कफ-पित्त या संकल्पनांविषयी असू शकतो. अमूक एक आजार वात वाढल्याने होतो असे म्हटल्यावर वात वाढला आहे हे तपासायचे काही निकष हवेत. त्यानंतर अमुक औषध दिल्यावर तो वाढलेला वात कमी झाला हे सुद्धा तपासता आले पाहिजे. ते तपासता आले नाही तर कदाचित अमुक औषधाने अमुक विकार बरा होतो हे सिद्ध होईल पण मधली 'वात वाढण्याची घटना' केवळ एक प्लेस होल्डर बनेल.

अर्थात जरी कफ-वात-पित्त या संकल्पना बाद झाल्या तरी अमूक विकार- अमुक औषध या जोड्या प्रयोगाने सिद्ध करता येतीलच. फक्त मागे कार्यकारणभाव न सापडल्याने एखाद्या रोगावरचे नवे औषध शोधणे अवघड होऊन बसेल. पण ठीक आहे. आधुनिक पद्धत अवलंबल्यास पुढे केव्हातरी कफ-वात या संकल्पनांचे खरे स्वरूप समोर येऊ शकेल. आधुनिक पद्धतींचे नियम लावलेच नाहीत तर .......

धन्या's picture

23 Jun 2014 - 3:36 pm | धन्या

प्रतिसाद आवडला.

प्रभाकर पेठकर's picture

23 Jun 2014 - 4:27 pm | प्रभाकर पेठकर

ज्यांना तपासणी सिद्ध आधुनिक औषध वापरायचे असेल त्यांनी जरूर ते वापरावे. होमिओपॅथी वापरणार्‍यांनाही आधुनिक औषधांचे सोवळेओवळे नसते. पण आधुनिक औषधे वापरणार्‍यांनी होमिओपॅथी भंपक आहे. आणि त्यांची औषधे म्हणजे निव्वळ फसवणूक आहे अशी विधाने करणे अयोग्य आहे असे माझे मत आहे.
कोणीही होमिओपॅथी आणि आयुर्वेदामागेही कांही अभ्यास आहे. हजारो वर्षांची परंपरा आहे. यशस्वी डॉक्टर्स आणि समाधानी रुग्णांचा अनुभव आहे. असो.
ह्या विषयावर याहून जास्त चर्चा करण्याइतका माझा अभ्यास नसल्याने इथेच पूर्णविराम.

प्रसाद१९७१'s picture

23 Jun 2014 - 4:30 pm | प्रसाद१९७१

सूर्य पृथ्वी भोवती फीरतो ह्याला पण हजारो वर्षांची परंपरा होती. मोडलीच ना ती परंपरा.
तुम्हाला चुकीच्या गोष्टी मागे टाकुन पुढे जायचेच नाही का?

प्रभाकर पेठकर's picture

23 Jun 2014 - 4:48 pm | प्रभाकर पेठकर

माझं ज्ञान तोकडं असल्याकारणाने मी आधीच पूर्णविराम दिला आहे. क्षमा असावी.

चित्रगुप्त's picture

23 Jun 2014 - 7:00 pm | चित्रगुप्त

वात वाढला आहे हे तपासायचे काही निकष हवेत. त्यानंतर अमुक औषध दिल्यावर तो वाढलेला वात कमी झाला हे सुद्धा तपासता आले पाहिजे.

हे निष्णात वैद्य नाडिपरिक्षेने बरोबर ओळखतो.

चैतन्य ईन्या's picture

23 Jun 2014 - 8:09 pm | चैतन्य ईन्या

पण मुख्य प्रश्न असा आहे की निष्णात वैद्य सापडायचा कसा. सगळे कोणाच्या ना कोणाच्या अनुभवाने आपण डॉक्टरकडे जातो, मग तो कोणीही असो. मला स्वतःला सतत सर्दी पडसे होते, सगळे ट्राय करून झाले. काहीही फरक नाही. एका फार जवळच्या मित्राने सुचवले आता होमेपदी वापरून बघ. त्यांचा खर्च च्यामारी अलोप्याथीवाल्या इतकाच. वर मार्केटिंग असे आह्मी मुळापासून रोग बारा करतो. चांगले ३-४ वर्ष डॉकला श्रीमंत करून रामराम ठोकला. माझी बायको कुठलेही औषध घेत नाही जेंव्हा सर्दी आणि ताप येतो. फक्त २-३ दिवस झोपून राहते. तिचा ताप पण आपोआप उतरतो. काहीही न घेता. तेंव्हा पासून लक्षात आले की आपण फार काही केले नाही तरी चालते. फक्त भरपूर विश्रांती घ्या नाही घेतली तरी २-३ दिवसांऐवजी ५-६ दिवस लागतील.

आता हल्ली अनेक होमेपदी वाले कयानसर वगैरे बरे करतो म्हणून लुबाडतात. चक्क फसवणूक आहे. पण काय आहे माणसाला आशा असते आणि एकदा डोक्यात बसले की होमेपाथी ने आपण बरे होतो की होतोच. त्यामुळे ह्याच्या किती आहारी जायचे ते ज्याचे त्याने ठरवावे.

सुबोध खरे's picture

23 Jun 2014 - 11:22 pm | सुबोध खरे

पेठकर साहेब
प्लासिबो इफेक्ट हा जेंव्हा देणाऱ्या गोळीत मुळीच औषध नसेल ( गोळी दिसायला मात्र सारखीच असली पाहिजे) तरीही जर रुग्णाला बरे वाटले तर होणार्या परिणामाला म्हणतात. आपण उधृत केलेल्या सर्व उपायात औषधी वनस्पती आहेत आणि ते बर्यापैकी अंशात असतात. आपण आल्याच्या रसाचा एक थेंब अब्ज खर्व निखर्व पटीने विरळ केलात तर त्यात औषधी गुण राहील असे कोणताही वैद्य म्हणत नाही. किंवा कोकमाच्या रसाचा एक खर्वांश भाग घेतला तर पित्त नाहीसे होते असे आयुर्वेद म्हणत नाही. व्यक्तीच्या प्रकृती प्रमाणे त्याला त्या त्या औषधाची किती मात्रा घ्यावी लागते हे अनुभवी वैद्य ठरवीत असत.
पदार्थ विरळ केला तर तो जास्त प्रभावी ठरतो हे "तत्वज्ञान" विज्ञानाच्या एकदम उलट आहे.
मी काही प्रश्न होमियोपाथिच्या महाविद्यालयातील बर्याच प्राध्यापकांना विचारले असता त्यांना त्याचे समाधानकारक उत्तर देत आले नाही. ते अशाप्रमाणे
१) जर एखाद्या शहरात इन्फ़्ल्युएन्झा ची साथ आली तर त्या शहराच्या जलशुद्धीकरण प्रकल्पा च्या जलकुंभातच तुम्ही अर्निका ब्रायोनिया किंवा तत्सम औषधे अशा प्रमाणात मिसळली कि त्याचे १०० C किंवा २०० X इ प्रमाण आले तर त्या शहराला इन्फ़्ल्युएन्झाच्या साठी पासून वाचवता आले पाहिजे
२) एखाद्याला जर अर्सेनिक्ची विषबाधा झाली असेल तर त्याला सूक्ष्म प्रमाणात अर्सेनिक दिले तर ते त्यावर उपाय ठरेल काय?
३) आपण म्हणता कि होमियोपथिक औषधे तुमची प्रतिकारशक्ती इतकी वाढवतात कि तुम्हाला लसीकरणाची गरज नाही तर आपण आपल्या मुलांना घटसर्प दंग्याखोकला धनुर्वात इ च्या लसी टोचण्यास का जाता? जर आपल्याला स्वतःला आपल्या तत्वज्ञानावर पूर्ण विश्वास नाही तर आपण इतक्या खात्रीशीरपणे विद्यार्थ्यांना असे का शिकवता कि आधुनिक वैद्यकशास्त्र फक्त रोगाला तिथल्यातिथे दाबून ठेवते.
४) जर आपले असे म्हणणे आहे कि प्रतीजैविके हि अतिशय हानिकारक आहेत तर तीन शतके असणारी होमियोपथी प्लेग, कॉलरा, घटसर्प, विषमज्वर(टायफोईड) अशा रोगांना काबूत आणू शकली नाही पण प्रतिजैविके आल्यापासून तीस वर्षात वरील सर्व रोग मोठ्या प्रमाणावर आटोक्यात आले. असे का
असो यातील एकही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मला मिळाले नाही.
एम, बी बी एस करीत असताना मी पुण्यातील धोंडूमामा साठे या होमियोपथी आणि ताराचंद या आयुर्वेदिक महाविद्यालयात त्या शास्त्रांच्या मूलभूत तत्वांचा एक वर्ष पर्यंत अभ्यास केला. मला आयुर्वेद जसा भावला तशी होमियोपथी भावली नाही.
होमियोपथीच्या तत्वांची मुलभूत विज्ञानाशीच फारकत असल्यामुळे त्याबद्दल माझे काहीच म्हणणे नाही. ज्याचा त्यावर विश्वास आहे त्याने ते घ्यावे. फक्त मी त्याला आजतरी तत्वज्ञान( philosophy) मानतो विज्ञान(science) नाही.
आयुर्वेदाचा सखोल अभ्यास करून त्यातील सर्व चांगली तत्वे आधुनिक वैद्यकात अंतर्भाव केला पाहिजे आणि त्यातील फोलपटे टाकून दिली पाहिजेत असे माझे वैयक्तिक मत आहे.खरं तर आयुर्वेदीक किंवा होमेओपथि हे विषय एम बी बी एस नंतर विशेषज्ञ विषय(specialization) म्हणून एम डी ला शिकवले गेले पाहिजेत. पण हा एक मोठ्या वादाचा विषय होऊ शकतो.म्हणून मी येथेच थांबतो

प्रभाकर पेठकर's picture

24 Jun 2014 - 1:58 am | प्रभाकर पेठकर

खरे साहेब,
वादासाठी तुमचे सर्व मुद्दे मान्य केले तरी ही पॅथी इतकीवर्षे टिकून कशी? सरकारी पातळीवर ह्याचे शिक्षण, डॉक्टर ह्या पदव्या, शिवाय एम डी पातळीच्या पदव्याही दिल्या जातात. दुकानांना, डॉक्टरांना व्यवसाय परवाने दिले जातात. लाखो करोडो रुग्ण होमिओपॅथीवर विश्वास ठेवतात, अनुभव घेतात, इतरांना सल्ले देतात हे कसे? 'प्लासिबो इफेक्ट' एव्हढ्या प्रचंड प्रमाणात जगभर असेल ह्यावर विश्वास बसत नाही.
होमिओपॅथीत सर्व रोगांवर औषध आहे असे, ज्ञाना अभावी, मी तरी म्हणणार नाही. पण जी औषधे आहेत, ज्या व्याधीत रुग्णांना चांगले अनुभव येत आहेत त्यावरून होमिओपॅथीतही कांही तथ्य आहे हे स्विकारण्यास अ‍ॅलोपॅथी समर्थकांना एव्हढा कमीपणा का वाटतो? अ‍ॅलोपॅथीच्या संघटना आहेत त्या होमिओपॅथी विरोधात देशव्यापी चळवळ उभारून ह्या भंपक पॅथीचे संपूर्ण उच्चाटन का करीत नाहीत. 'जी औषधे दिली जात आहेत त्यात औषध नसतेच' ह्या मुद्द्यावर 'फसवेगिरीचे' गुन्हे दाखल करून होमिओपॅथीवर देशभर बंदी का आणली जात नाही? हा माझा मुद्दा आहे.

खरेपाहता, ह्या चर्चेत खुद्द धागाकर्त्याने सहभाग घेऊन सर्व आरोपांचे निराकरण करणे गरजेचे आहे. कारण ते स्वतः डॉक्टर आहेत (तसे ते नांवापुढे लिहीतातही) त्यामुळे इथे होणारे त्यांच्या व्यवसायावरील आरोपांचे खंडन करणे त्यांचे कर्तव्यच आहे. आपले कर्तव्य जर डॉक्टरसाहेब पार पाडणार नसतील तर आम्ही, ज्यांनी ह्या विषयाचा कांहीच अभ्यास केलेला नाही त्यांनी, उगा आपला वेळ आणि उर्जा खर्ची घालण्यात कांहीच हशील नाही.

सुबोध खरे's picture

24 Jun 2014 - 10:10 am | सुबोध खरे

पेठकर साहेब
होमियोपथी निरुपयोगी आहे असे मी केंव्हाही म्हटलेले नाही. किंवा होमियोपाथी हि प्लासिबो इफेक्ट वर चालते असेही म्हटलेले नाही. मी फक्त प्लासिबो इफेक्ट काय आहे तो येथे विशद केला. फक्त माझे म्हणणे एवढेच आहे कि आज उपलब्ध असलेल्या शास्त्रीय कसोट्यांवर ते शास्त्र आहे असे म्हणता येणार नाही. "ज्याचा त्यावर विश्वास आहे त्याने ते घ्यावे. फक्त मी त्याला आजतरी तत्वज्ञान( philosophy) मानतो विज्ञान(science) नाही."
दुर्दैवाने १००० पैकी ९९९ होमियोपथ आधुनिक औषधाना छुपेपणे किंवा राजरोसपणे शिव्या घालताना आढळतात. मी दुसर्या धाग्यावर लिहिलेले आहे कि "आपली रेषा मोठी करण्यसाठी दुसरी रेष लहान करणे आवश्यक नाही". तुम्ही तुमचे काम करा ज्याचा विश्वास आहे तो येईल ज्याचा नाही तो येणार नाही
याच न्यायाने मी म्हणतो आधुनिक वैद्यक संघटनांनी आपले घर स्वच्छ ठेवले तरी पुरे.आधुनिक वैद्यकात चालू झालेल्या वाईट प्रथा प्रथांबंद करू द्या. उगाच दुसर्याच्या घराच्या उठाठेवी कशाला कराव्या
होमिओपॅथीतही कांही तथ्य आहे हे स्विकारण्यास अ‍ॅलोपॅथी समर्थकांना एव्हढा कमीपणा का वाटतो? यात कमीपणा वाटण्याचे कारण नाहीच. होमियोपाथीत तथ्य असावे फक्त ते सिद्ध करता येत नाही. तसे सिद्ध झाले तर मी(वैयक्तिक रित्या) नक्की त्याचा पुरस्कार करेन.
आणि होमियोपाथ तिन्ही त्रिकाळ आधुनिक वैद्यक शास्त्राला शिव्या देत असतात म्हणजे माझं चांगलं सिद्ध करता येत नाही म्हणून दुसर्याचे वाईट हि बोंब मारीत राहण्याचा प्रकार आहे.

प्रभाकर पेठकर's picture

24 Jun 2014 - 2:29 pm | प्रभाकर पेठकर

खरे साहेब,

>>>>होमियोपथी निरुपयोगी आहे असे मी केंव्हाही म्हटलेले नाही. किंवा होमियोपाथी हि प्लासिबो इफेक्ट वर चालते असेही म्हटलेले नाही.

वैयक्तिकरित्या तुमच्यावर किंवा कुठल्याही सदस्यावर माझे काही आक्षेप नाहीत किंवा तुम्ही 'असे-असे' म्हंटले आहे असाही माझा रोख नाही. तसा अर्थ ध्वनीत झाला असेल तर मनापासून क्षमा मागतो.

मिसळपाववरच नाही तर, माझ्या मित्रांच्या घोळक्यातही जे-जे अ‍ॅलोपॅथीचे डॉक्टर्स आहेत आणि केमिस्ट आहेत त्यांच्या तोंडी होमिओपॅथीची चेष्टाच ऐकण्यास मिळते. त्यामुळे माझ्या सारख्या अज्ञानी माणसास चक्रावल्यासारखे होते. अनेक प्रश्न मनांत उद्भवतात. त्यांचे निराकरण होईल म्हणून मी कांही मुद्दे उभे केलेत. मिपावर आणि माझ्या वैयक्तिक मित्रपरिवारातही, होमिओपॅथीवर सरकार बंदी का आणत नाहीत?, फसवेगिरीचे आरोप का ठेवले जात नाहीत?, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांच्या संघटना ह्या विरुद्ध यशस्वी चळवळ का उभी करीत नाहीत? ह्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊ शकत नाहीत.

>>>>दुर्दैवाने १००० पैकी ९९९ होमियोपथ आधुनिक औषधाना छुपेपणे किंवा राजरोसपणे शिव्या घालताना आढळतात.

माझ्या ओळखितल्या मर्यादित क्षेत्रामध्ये ३-४ होमिओपॅथिक डॉक्टर्स आहेत. त्यांच्या तोंडी मी कधी अ‍ॅलोपॅथीला दुषणे दिलेली ऐकली नाहित. पण तुमचे वैद्यकिय क्षेत्रच असल्याने अनेक होमिओपॅथिक डॉक्टरांशी तुमच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध येत असणारच. तेंव्हा तुमचे मत ग्राह्य धरून मी एव्हढेच म्हणेन 'होमिओपॅथीक डॉक्टर्स आणि त्या क्षेत्रातील संबंधीत हे अत्यंत चुकीचे वागत आहेत.'

>>>> आधुनिक वैद्यक संघटनांनी आपले घर स्वच्छ ठेवले तरी पुरे.आधुनिक वैद्यकात चालू झालेल्या वाईट प्रथा प्रथांबंद करू द्या. उगाच दुसर्याच्या घराच्या उठाठेवी कशाला कराव्या.

ह्यात 'आधुनिक' हा शब्द काढून टाकून हे विधान सर्वच पॅथींसाठी मार्गदर्शक ठरावे.

"शहरातल्या दुसर्‍या (एकमेव) दुकानात मात्र सर्व औषधे उपलब्ध असल्याने"

औषधे कलक्त्त्याहून येत, आणि बंगाली बाबूंचे हडताळ वगैरेंमुळे बरेचदा कारखाना बंद ठेवावा लागत असल्याने किंवा आणखीही कारणे असतील)
हि कारणे त्यानाही लागू नव्हती का? का त्यांची सुद्धा औषधे मिल्क शुगर चीच बनवून दिलेली असत? आणि तरीही परिणामकारक होती?

चित्रगुप्त's picture

24 Jun 2014 - 1:29 am | चित्रगुप्त

त्यांची सुद्धा औषधे मिल्क शुगर चीच बनवून दिलेली असत?

याबद्दल खात्रीलायक माहिती नाही, आणि आता ती मिळणेही शक्य नाही. आमच्यापूर्वी बर्‍याच काळापासून एजंटने त्यांना ही युक्ती सांगितलेली असण्याची शक्यता वाटते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Jun 2014 - 3:00 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

तू मला साह्यभूत हो, सहजीवन हाच सुखाचा आधार आहे. एवढे पुरेना !! केवळ तुझाच स्वच्छन्द मकरंद .

हे तुम्ही घासूगुर्जींना लिहीलं आहेत का?

चित्रगुप्त's picture

24 Jun 2014 - 3:14 am | चित्रगुप्त

हे तुम्ही घासूगुर्जींना लिहीलं आहेत का?

:))

काही विकृत असमंजस प्रतिक्रिया बाजूला ठेवू.. पण योग्य आक्षेपांचे काय..
विरलीकरणाच्या प्रक्रियेवर तुमचा प्रतिसाद अपेक्षित आहे.. अनेक उपयुक्त औषधे आहेत पण ती पोटातच जात नाहित असे का??

धन्यवाद .सोरायसिस पुन्हा पुन्हा उद्भवतो म्हणजे बुरशिजन्य असावा वाटले .पोटासाठी आयुर्वेदिक हे माझं वैयक्तीक मत .

प्रसाद गोडबोले's picture

20 Jun 2014 - 3:22 pm | प्रसाद गोडबोले

बाप दाखव नाहीतर श्राध्द घाल हा विज्ञानातला साधा सोपा नियम आहे ...
तुम्ही होमिऑपॅथी गोळ्या आणि आजारातुन बरे होणे ह्यातील कॉजॅलिटी सिध्द करा तरच होमिओपॅथीला विधान मानता येईल ...
तसे सिध्द करता येत नाही तोवर तुम्ही "ही होमिओपॅथी केवळ आमची श्रध्दा आहे " असे म्हणा ... त्याला नक्कीच कोणीच हरकत घेणार नाही

लोकल मध्ये तुमच्या जाहिराती लावायला आम्ही मदतही करु ... हा घ्या फॉरमॅट =))

a

बॅटमॅन's picture

20 Jun 2014 - 3:51 pm | बॅटमॅन

सहमत.

कॉजॅलिटी नै दाखवता आली तर आवरा चंबूगबाळे म्हणावं. इतकीही अपेक्षा करता येत नसेल तर काय फायदा?

अन यावर गुळणी धरून बसणार्‍या डॉक्टर लोकांचे मत काय आहे?

"वैद्यक न शिकता बडबड" वगैरे मुक्ताफळे उधळण्याअगोदर काय म्हणणे आहे ते समजून घ्या. कुठल्याही शास्त्राला तार्किकतेच्या २ चौकटी असतात. एक जनरल चौकट की जी नॉनस्पेशलिस्ट लोकांनाही समजू शकते. आणि एक असते स्पेसिफिक चौकट की जी स्पेशलिस्ट लोकांनाच समजू शकते. उदा. न्यूटनचे नियम पाळून रॉकेट आकाशात उडते इ. सांगणे म्हणजे झाली जनरल चौकट, तर रॉकेटमध्ये एखादा पार्ट खराब झाल्यावर काय करायचे हे सांगणे म्ह. स्पेसिफिक चौकटीचा भाग आहे.

इथे या केसमध्ये जनरल चौकटीबद्दल डिबेट सुरूये की बाबांनो, तुमची जी काही औषधे म्हणताहात त्यांची पोटात जाणारी क्वांटिटीच जर डिटेक्टेबल नसेल तर त्या तथाकथित औषधांचा फायदा तरी काय? पण हा प्रश्न टाळून सगळे समर्थक "तुम्ही डॉक्टर नाही, सबब बोलू नका" चा धोशा लावताहेत.

एखाद्या गोष्टीचा अभ्यास नसेल तर जनरल चौकटीचे निकष लावूनही विरोधी बोलूच नये का? सरसकट समर्थनच करावं का? असं कुठलं शास्त्र आहे जे जनरल चौकटीत बसत नाही? स्पेसिफिक चौकट वेगळी असली म्हणून जनरल चौकटीतही लोकांना फसवी उत्तरे देऊन गप्प करणे किंवा उत्तरच न देणे हे अशास्त्रीय, खोटारडेपणा आणि पळपुटेपणा दर्शवणारे आहे.

आता होमिओपॅथीचे समर्थक म्हणतील, की मग आम्ही बरे झालो ते काय चमत्काराने?

त्यावर म्हणणे इतकेच आहे की तुम्ही झाला असाल की बरे. पण आम्ही औषधाची मात्रा आणि बरे होणे या दोहोंतील कार्यकारणभावाबद्दल एक साधा प्रश्न काय विचारला तर हिरवेपिवळे होऊन अंगावर कशाला धावून येता? आमचा एक साधा प्रश्न आहे, तेवढं त्याला उत्तर देता येत असेल तर बघा. नैतर ज्याची त्याची समज वगैरे आहेच. काही झालं तरी व्यक्तिगत अनुभव जो आहे तो आमच्या प्रश्नाने खोटा ठरत नाही, तसेच कुणाला अनुभव आला असला म्हणून आमचा प्रश्नही रद्दबातल ठरत नाही. त्यामुळे 'मला अमुक अमुक अनुभव आला, सबब हा प्रश्न रद्द आहे' वगैरे मुक्ताफळेही उधळू नका. बास झालं, अख्ख्या धागाभर तेच चाल्लंय.

त्यामुळे होमिओपॅथीची प्रॅक्टिस करणार्‍यांनी हे शंकानिरसन कृपया करावे अशी विनंती. जमल्यास हं- आग्रह नाही. शेवटी ज्याला त्याला आपली पॅथी प्यारीच असते. हे डॉक्टरांइतकेच रुग्णांनाही लागू आहे. त्यामुळे इथल्या उत्तराने काय कोणी आपली आवडती पॅथी सोडेल असे नाही, पण प्रश्नाच्या उत्तरासाठी एक विनंती आहे इतकंच. नैतर काय परत भांडाभांडी आहेच. एकदातरी कुणा होमिओपॅथकडून याबद्दल वाचायला मिळाले तर बरे होईल. इत्यलम्.

प्रसाद१९७१'s picture

20 Jun 2014 - 6:53 pm | प्रसाद१९७१

बरेसचे रोग असे असतात की ते औषधाविना बरे होतात. उदा : छोटी/मोठी इन्फेकशन, अपचन, सर्दी, खोकला. त्यासाठी जास्तीत जास्त विश्रांती घेणे, खाण्याचे पथ्य पाळणे पुरेसे असते.

हे असे आहे म्हणुन च क्लिनिकल ट्रायलची गरज पडते त्यात औषध घेणार्‍या गटाला पण माहीत नसते की मी खरेच औषध घेतो आहे की साधी गोळी आहे. इतकेच काय ट्रायल करुन घेणार्‍या डॉक्टरांच्या गटाला पण माहीती नसते की कोणाला खरेच औषध दिले आहे ते. (Double Blind पद्धत ).

ज्ञानकोशकार केतकर एकदा आपल्या बंगल्याच्या आवारात कोवळ्या उन्हात न्याहारी करत बसलेले होते. तेंव्हा एक नवकवी आला आणि त्याने विचारले कि मी आपणास माझा काही कविता वाचून दाखवू का? त्यांनी हो म्हटल्यावर कवीने कविता वाचून दाखवल्या आणि कशा वाटल्या हे विचारले. त्यावर ज्ञा. केतकर म्हणाले एकदम भिकार. यावर तो कवी संतापून म्हणाला तुम्हा ज्ञान कोशच लिहावेत कविता म्हणजे काय ते तुम्हाला नाहीच कळणार. यावर केतकरानी टेबलावरील एक उकडलेले अंडे हातात घेऊन त्यांना दाखवले आणि हसत म्हणाले कि हे अंडे काही मी दिलेले नाही पण हे चवीला कसे लागते ते मी कोम्बडीपेक्षा जास्त चांगले सांगू शकतो. यावर ते कवी आपला गाशा गुंडाळून पसार झाले.

आपली वरची प्रतिक्रिया आता तशी जुनी झाली. मी केव्हाच बघितली होती, पण मी प्रवासात असल्याने आधी प्रतिवाद करू शकलो नाही.

आपण स्वतः कुणावर तरी भयंकर चिडल्यासारखे हा प्रतिसाद दिलेला दिसत आहे. चिडायला काय कारण हे कळत नाही. आपल्याला कुणी हात धरून ओढत होमिओपॅथकडे घेऊन गेले आहे का?

आप्ल्या वरच्या प्रतिसादातील भाग १ या प्रकारच्या अलंकारांनी भरलेला आहे- "आता बास झाले", "आवरा चंबुगबाळे", " गुळणी धरून बसणे", "खोटारडेपणा", "पळपुटेपणा", "हिरवे पिवळे होऊन अंगावर धावून यायला काय झालं" , "मुक्ताफळे उधळू नका", "बास झाले, अख्खा धागाभर तेच चाललंय"-( -काही काही गोष्टी मी दोन वेळा लिहिल्या आहेत याचे साधे कारण आपणही ते दोन वेळा लिहिले आहेत); आणि भाग २ मध्ये हे सगळे बोलून झाल्यावर अशी कडी केली आहे- "जम्ल्यास हं, आग्रह नाही" "एक विनंती आहे, इतकंच"! गॅंगस्टर लोक अशीच विनंती करत अस्तील नाही?

सारासार विवेक न सोडता, आम्हाला जर औषधाने गुण येतो असे आम्ही म्हणू इच्छितो, तर आम्ही बोलू नये अशी आपली इच्छा का आहे? विज्ञानाला अनेक प्रश्नांची उत्तरे अजून सापडलेली नाहियेत. माझी अत्यंत त्रासदायक दुखणी, ज्यांच्यापैकी एक MRI वगैरे करूनही निदान न होऊन, बरी होऊ शकली नाहित, ती या औषधांनी बरी झाली असे मी म्हणतो, तर मी तसं का नाही म्हणायचं? आधीच्या भागात मी म्हणालो, की भुंग्याच्या उडण्याचे गणित मांड्ले गेले आहे का? उत्तर आले की ते फार किचकट आहे त्यामुळे अजून नाही. (वर एका साहेबांनी अशीही पूस्ती जोड्ली की, उद्या भुते खेते असतील असेही सिद्ध होइल? खवचटपणा अन काय!) जाऊ द्या. पण असे अनेक प्रश्न असतील, ज्यांची उत्तरे अजून सापडलेली नाहियेत.

आणि आपल्याला फक्त होमिओपॅथीबद्दलच्या न सुटलेल्या प्रश्नांमध्ये एवढा रस का आहे? तुम्ही ज्या मुद्द्यांवर उत्तर मागत आहात, त्यावर कुणाकडेही उत्तर नाही, हे आपणास माहित नाही का? ते माहित असूनही जर आपण वरच्या भाषेत प्रश्न विचारू शकता तर याचा अर्थ आपण विनाकारण त्रागा आणि आक्रस्ताळेपणा करत आहात असं म्हणावं लागेल. एक सॉफ्ट टारगेट शोधायचे आणि धोपट धोपट धोपटायचे?

लोकसत्तामध्ये काही काळापूर्वी एक चांगला अग्रलेख आला होता. जल्पकांचा उच्छाद! जल्पक म्हणजे स्वतः काही करायचे नाही. दुसरा कुठे चुकतो, ते बारीक नजरेने शोधत राहायचे, आणि एवढीशीही चूक सापडली, की तिचे भांडवल करायचे! आपण त्यांच्यापैकी नाहीत अशी आपली स्वतःची खात्री आहे ना?

बॅटमॅन's picture

23 Jun 2014 - 11:07 am | बॅटमॅन

अरे अरे अरे...भावना दुखावल्याबद्दल सॉरी हां अकौंटंट साहेब..तुमच्या अकौंटिंगमध्ये चूक आहे पण तसं म्हणायचं तर नाही..सहीये!

असंका's picture

23 Jun 2014 - 11:22 am | असंका

सॉरी हां अकौंटंट साहेब..तुमच्या अकौंटिंगमध्ये चूक आहे

माझा ID ही माझी वैयक्तिक बाब असून, चर्चेचा विषय नाही. तो चर्चेसाठी उपलब्धही नाही. हा वैयक्तिक हल्ला अस्थानी असून पहिलीच वेळ अस्ल्याने दुर्लक्ष करत आहे.

पहिलीच वेळ अस्ल्याने दुर्लक्ष करत आहे.

ऐला स्वारी हां, घाबरलो बरंका!

घाबरणे घाबरवणे ह्या कल्पनाही माझ्या मनात नव्ह्त्या. आपल्याला घाबरवण्यात मला काय रस असणार?

कृपया वैयक्तिक टिप्पणी करू नका ही परत एकदा नम्र विनंती...

आनंदी गोपाळ's picture

24 Jun 2014 - 6:57 am | आनंदी गोपाळ

माझी अत्यंत त्रासदायक दुखणी, ज्यांच्यापैकी एक MRI वगैरे करूनही निदान न होऊन, बरी होऊ शकली नाहित, ती या औषधांनी बरी झाली असे मी म्हणतो, तर मी तसं का नाही म्हणायचं?
<<
याचा अर्थ तुमची दुखणी संपूर्णपणे मानसिक होती. :)

असंका's picture

24 Jun 2014 - 1:54 pm | असंका

हे जे आपल्याला कळलं ते माॅडर्न मेडिसीनवाल्या डाॅ.ला कळलं असतं तर माझे किती पैसे वाचले असते!

आनंदी गोपाळ's picture

27 Jun 2014 - 11:57 pm | आनंदी गोपाळ

मी मॉडर्न मेडिसिनवाला डॉक्टर आहे, म्हणूनच मला कळलंय.
हे तुम्हाला कळलं का?

आपण मॉडर्न मेडिसिनवाले डॉक्टर आहात हे मला कळलंय का असं जर आपण म्हणत असाल, तर उत्तर आहे "हो". पूर्वी कुठ्ल्या तरी धाग्यावर मी आपला एखादा प्रतिसाद वाचलेला आहे. बहुतेक "कुठली तरी माहिती नक्की द्या, त्या डॉ.चे रेजिस्ट्रेशन रद्द करवतो" असं आपण म्हणाला होतात असं वाटतं....जर माझा गैरसमज होत असेल तर क्षमस्व.

पण मुळात माझं दुखणं मानसिक असल्याचं आपल्याला कळलंय हे मात्र माझ्या डोक्यावरून जातंय! तुम्ही म्हणालात तर मी विश्वास ठेवू का?

बाळ सप्रे's picture

23 Jun 2014 - 11:11 am | बाळ सप्रे

विज्ञानाला अनेक प्रश्नांची उत्तरे अजून सापडलेली नाहियेत

हे विधान येथे अस्थानी आहे. नैसर्गिक घटनांची उकल करण्याच्या संदर्भात ते ठीक आहे पण होमियोपाथीने याचा आधार घेणे अयोग्य वाटते. होमियोपाथी ही मानवाने शोधलेली औषध्व्यवस्था आहे, तेव्हा त्यात पूर्ण अभ्यासाअन्ती सर्वांना समजेल असे स्पष्टीकरण अपेक्षित आहे.

एक सॉफ्ट टारगेट शोधायचे आणि धोपट धोपट धोपटायचे?

सर्व आक्षेपात विरलीकरण हे सहाजिकच सॉफ्ट टारगेट आहे. मग इतर सर्व ते धोपटताना दिसत असताना एकही होमियोपाथी तज्ञ (?) / समर्थक त्यावर भाष्य का करत नाही?? बाकीचे दुय्यम मुद्दे का धोपटत आहेत..

अ. तुमची अपेक्षा तशी योग्य आहे. पण असे काही सर्वमान्य स्पष्टीकरण नाहिये. होमिओपॅथीने प्रयोग करून रोगी बरा होत अस्ल्याचा अनुभव घेतला, आणि मग त्या अनुभवावरून त्याचा प्रसार झाला. त्या दृष्टीने बघितले, तर ती एक नैसर्गिक घटनाच आहे.

ब. सर्व आक्षेपात? साहेब मूळ दोन आक्षेप आहेत-

१. डबल ब्लाइंड रँडमाइज्ड प्लासिबो कंट्रोल्ड टेस्ट निर्णायक नसणे

२. विरलीकरणानंतर मूळ औषधाची थोडीही मात्रा न सापडणे.

हे आक्षेप गेली कित्येक वर्षे काढले गेले आहेत. दोन्ही आक्षेपांना जगात कुठेही पुरेसे उत्तर दिले गेलेले नाहिये. वर हे प्रश्न उपस्थित करणार्‍या सर्वांनाही ते मुळात माहित आहे, हे उघड आहे. उत्तराची खरोखर अपेक्षा नसताना, पुन्हा पुन्हा तेच तेच प्रश्न विचारून काय मिळवणे अपेक्षित आहे? आम्हाला होमिओपॅथिक औषधांचा गुण आलेला आहे, जे आमच्या दृष्टीने या आक्षेपांचे निराकारण होण्यापेक्षा जास्त महत्वाचे आहे. आणि आपल्याला दुय्यम वाटले तरी अनेक डॉक्टर सहमत होतील की दुखणेकर्‍याचे दुखणे बरे होणे हे सर्वाधिक महत्वाचे.

होमिओपॅथिक औषधांच्या मर्यादा आहेत हे मलाही जाणवतं. कुणाला अपघात झालेला असताना होमिओपॅथीक डॉ.कडे जा असं मी तरी सुचवणार नाही. पण कुठलेतरी शास्त्रीय तर्क देऊन आमच्या अनुभवालाच खोटे पाडले जात असेल, तर आम्ही काय म्हणणार? चुलीत गेले ते शास्त्रीय तर्क अन काय? आपली आमच्याकडनं हीच अपेक्षा आहे ना?

बाळ सप्रे's picture

23 Jun 2014 - 12:37 pm | बाळ सप्रे

चुलीत गेले ते शास्त्रीय तर्क अन काय?

_/\_

(वर एका साहेबांनी अशीही पूस्ती जोड्ली की, उद्या भुते खेते असतील असेही सिद्ध होइल? खवचटपणा अन काय!)

वर म्हणजे इथे नव्हेच, पण धागा क्र. १ (प्रथम अध्यायात) मीच हे लिहिले असल्याने उत्तर देणे आवश्यक वाटते.

"उद्या भुते खेते असतील असेही सिद्ध होईल" हे विधान मी खवचटपणे केलं आहे? मुळात ते विधान या शब्दात आणि टोनमधे आहे?

पूर्ण प्रतिसाद इथे संदर्भासाठी पेस्ट करतो. तो कोणीही वाचला तर काय ते समजेलच. तरीही..

माझं मूळ वाक्य असं आहे:

त्याउपर पुढे कधीतरी काहीतरी शोध लागेल, गृहीतकं बदलतील आणि भूत आत्मा या गोष्टीही सत्य आहेत हे सिद्ध होईल म्हणून आजच त्या खर्‍या मानणे हा प्रकार माझ्या समजुतीबाहेरचा आहे.

आज अज्ञात असलेल्या गोष्टींची आपण त्या अस्तित्वातच नाहीत असं म्हणून वासलात लावू शकत नाही असा काहीसा मुद्दा जो आधी उपस्थित झाला होता त्याला उत्तर देताना अनेक संदर्भांना जोडून भूत, आत्मा अशा आज अनाकलनीय असलेल्या गोष्टीचं उदाहरण दिलं आहे. विज्ञानाची गृहीतकंही बदलतात, उद्या ती बदलून या गोष्टीही आपल्या आकलनाच्या कक्षेत येतील आणि तेव्हा त्यांचा उलगडा होईलही. त्याच चालीवर भविष्यात होमिओपथीचे तत्व कध्धी कध्धी सिद्ध होणार नाहीच मुळी असं मी म्हणू शकत नाही. असा उल्लेख तिथे आहे. हा भाग दिसला नाही का?

आरोग्यासारख्या बाबतीत पूर्ण माहीत नसलेल्या पद्धतीपेक्षा पारदर्शी माहिती आणि कार्यकारणभाव सांगणारी पद्धती अनुसरावी असा सल्ला दिला. त्याच्याही वर स्वतःला वैयक्तिक अनुभव आलेल्यांनी जरुर ही औषधे घ्यावी, आणि त्यांच्यापुरते हे प्रश्न मागे घेत आहे असंही म्हटलं. कारण एकेका अनुभवावर आधारित मतांचे जनरलायझेशन करता येत नाही.

त्या प्रतिसादात अगदी विज्ञानातही बरेच काही अज्ञात आहे हे कबूल करुनच मताची मांडणी केली आहे. तरीही त्यात खवचटपणाच दिसत असल्यास खेद व्यक्त करुन थांबणे योग्य समजतो.

केवळ संदर्भासाठी तिथला मूळ प्रतिसाद इथे आणतो आहे.

"औषधी" द्रव्य टप्प्याटप्प्याने विरळ करताना ते जोराजोराने हलवण्याच्या प्रक्रियेमुळे त्या औषधातले गुण स्पिरिट लाईक इफेक्टने द्रावकात (पाणी / अल्कोहोल इ) उतरतात आणि मूळ पदार्थ नाहीसा झाला तरी टिकून राहतात, अशी स्पेसिफिक थिअरी होमिओपथीच्या प्रवर्तकाने मांडली आहे.

भौतिकशास्त्र / रसायनशास्त्र या सध्या जास्तीतजास्त परिपूर्ण कारणे देऊ शकणार्‍या शास्त्रांच्या नियमानुसार पाण्यात / अल्कोहोलमधे मूळ पदार्थ शिल्लक न राहिल्यावर असा कोणताही "गुणधर्म" अथवा "छाप", अथवा "आत्मिक तत्व" तरंगत अथवा विरघळून राहात नसते.

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यांचेही नियम /गृहीतके बदलतात, ते कदाचित पूर्ण बदलतील किंवा नष्ट होतील. पण आजरोजी मूळ पदार्थ अस्तित्वातच नसताना त्याचे गुण जणू चैतन्याच्या किंवा आत्म्याच्या रुपात पाण्यात टिकून राहतात हे मानणे म्हणजे मानवी कक्षेपलीकडले काही मानून स्वतःवर उपचार करणे असे आहे.

एखादी गोष्ट सिद्ध होईपर्यंत ती नाहीच असं म्हणता येत नाही..अगदी कबूल.. हवा दिसत नाही पण असते.. पण आपण रोजच्या जगण्यात रस्त्यात धोंडा दिसत नसतानाही तो असेलच असं म्हणून मिनिटामिनिटाला वळसे घालत जात नाही.

तदनुसार आपल्या आरोग्याशी संबंधित निर्णय घेताना बेनिफिट ऑफ डाउटवर आधारित शास्त्रांकडे न वळता खणखणीत वाजवून सिद्ध होणार्‍या शास्त्राकडे जाणं हिताचं आहे.

त्याउपर पुढे कधीतरी काहीतरी शोध लागेल, गृहीतकं बदलतील आणि भूत आत्मा या गोष्टीही सत्य आहेत हे सिद्ध होईल म्हणून आजच त्या खर्‍या मानणे हा प्रकार माझ्या समजुतीबाहेरचा आहे.

तत्वतः उद्या काय सिद्ध होईल ते सांगता येत नसल्याने होमिओपथी ही कध्धी कध्धी सिद्ध होणारच नाही असं आचरट प्रतिपादन मी करु इच्छित नाही.

पण आजरोजी ते जी थियरी ढळढळीतपणे मानताहेत ती म्हणजे : क्वांटिटी नसलेलं "औषध" घेऊन "स्पिरिट लाईक" गुणधर्म पाण्यात उतरलेले असणं- या थिअरीवर विश्वास ठेवून मग होमिओपथी जरुर घ्यावी. फक्त इन दॅट केस, त्यात पुरेसा जादूवाद आहे याची जाणीव असावी इतकंच अधोरेखित करतो.

अंगारा, नजर सुरक्षा कवच इ इ हे अशा तर्कापलीकडल्या गोष्टीवर विश्वास ठेवून स्वीकारले जातात. शरीराला रोगापासून मुक्त करणारी औषधोपचार पद्धती स्वीकारताना आपण नेमके काय स्वीकारतो आहोत याची जाणीव ठेवून स्वीकारले तर कोणाचीच काहीच हरकत नसावी.

माझा इनफॅक्ट अंधश्रद्धेलाही विरोध नाही. नजर सुरक्षा पेंडंट योग्य वाटल्यास जरुर घालावे पण माझी इच्छा इतकीच असते की आपण काय घालतोय ते किमान तर्कदृष्ट्या माहीत असावं. न कळलेलं बरंच काही आहे म्हणून काहीही खरं मानणं योग्य आहे का?

अधिक स्पष्ट करायचं तर नजर सुरक्षा कवचाच्या मटेरियलमधे असलेल्या गुणामुळे वाईट नजरेतली "निगेटिव्ह" एनर्जी दूर लोटली जाते (रिफ्लेक्शन किंवा तत्सम प्रक्रियेने..) किंवा समोरच्या वाईट नजरवाल्यावरच उलट रोखली जाते अशी जी काही थियरी असेल ती तुम्हाला माहीत असेल आणि पटली तर जरुर वापरा. पण पेंडंटचा प्रवर्तक काय तर्काने असा दावा करतोय ते तुम्हाला माहीत पाहिजे. उगीच अमुक पेंडंट देणारे गुरुजी फार थोर आहेत किंवा तमुकला पेंडंटचा चांगला अनुभव आला.. मग त्यामागच्या थियरीला मारो गोली असं नसावं असं माझं मत आहे.

होमिओपथीचं मूळ तत्व काय आहे ते ती घेणार्‍या बर्‍याच जणांना माहीत नसतं. ते नीट माहीत असेल आणि तरी घेत असतील त्यांच्याबाबतीत काही म्हणणं नाहीच.

तरी, तुम्हाला होमिओपथी लागू पडते अशी तुमची खात्री आहे ना? मग तुम्ही जरुर घेत चला. माझी सर्व विधाने आणि प्रश्न तुमच्यापुरते रद्दबातल समजा (जशी होमिओपथी तुमच्यापुरती काम करतेय तसं..)

हा प्रतिसाद राघांच्या प्रतिसादाच्या निमित्ताने मूळ प्रश्नाला आहे. राघांना नाही.

तेव्हा वाचताना १००% खात्री होती की आपण खवचटपणे बोलत आहात. आता एवढ्या दीर्घ प्रतिसादावर म्हणवत नाही की आपण खवचटपणे बोलत होतात. माझा गैरसमज झाला असे कबूल करून- जाहिर माफी.

(पण माझा गैरसमज विनाकारण नव्हता. वर काही लोक अनेक अंधश्रद्धांना जोडूनच होमिओपॅथिचे नाव घेत होते. त्यासोबतच आपलाही प्रतिसाद आल्याने, माझी ती प्रतिक्रिया तशी नैसर्गिकच म्हणावी लागेल.)

मनीषा's picture

20 Jun 2014 - 5:21 pm | मनीषा

तुमच्या़कडून अशा उत्तराची अपेक्षा नाही
तुम्ही तज्ञं म्हणून इथे लिहीता आहात तर त्या लेखा बद्दल विचारलेल्या शंकांचे समाधान करणे जरूरी आहे ना?
माझा अनुभव , ज्ञान मी तुम्हाला देतो आहे त्या बद्दल स्वताला नशीबवान न समजता शंका विचारणारे ते पाखंडी अशा अभिनिवेषात वावरणारे इथे काही आहेत
आपण त्यात सामील होउ नये .
होमिओपॅथी मधे पथ्यं खूप काटेकोर पणे सांभाळावे लागते .औषधाचा गुण आला नाही तर कुपथ्यं केले म्हणुन ... असे सांगीतले जाते त्यात किती तथ्यं आहे ?

आदूबाळ's picture

20 Jun 2014 - 7:49 pm | आदूबाळ

बाकी जाऊ दे

हे "स्वच्छन्द मकरंद" हे काय प्रकरण आहे? टोपणनाव का?

अत्रन्गि पाउस's picture

21 Jun 2014 - 7:42 am | अत्रन्गि पाउस

बाकी चर्चेच्या घनघोर अरण्यात शिरायची लय भीती वाटून रह्याली माले ...

संजय क्षीरसागर's picture

21 Jun 2014 - 1:59 pm | संजय क्षीरसागर

हे "स्वच्छन्द मकरंद" हे काय प्रकरण आहे? टोपणनाव का?

१) `घेई छन्द मकरंद - होमिओपॅथीचा' असं टायटल आहे.... थोडक्यात कोणताही मकरंद होमिओपॅथीचा छंद करु शकतो.
२) (पुढचा) स्वच्छंद अजून जमलेला (दिसत) नाही.
३) डॉ. हे नांवाच्या अलिकडचं टोपण आहे. पण ते नक्की कसलंय ते गुलदस्तात आहे!

श्रीगुरुजी's picture

23 Jun 2014 - 10:58 pm | श्रीगुरुजी

माझा एक प्रश्न होमिओपॅथी डॉक्टरांसाठी आहे.

नुकत्याच एका नेत्रविशारदांच्या भेटीसाठी गेलो होतो. सध्या मी मुलीच्या त्वचेवरील रॅशसाठी तिला होमिओपॅथी औषध देत आहे. हे ऐकल्यावर त्या अ‍ॅलोपॅथी नेत्रविशारदांनी ताबडतोब औषध थांबविण्याचा सल्ला दिला. त्यांच्या सांगण्यानुसार होमिओपॅथी औषधांमध्ये स्टेरॉईड्स असतात. यावर माझा विश्वास बसला नाही. परंतु येथील एखाद्या होमिओपॅथी डॉक्टरांनी याविषयी योग्य तो खुलासा करावा.

साती's picture

24 Jun 2014 - 9:00 am | साती

उत्तर कळवले आहे.

'स्टिरॉईड' म्हणजे काय, वगैरेंवर माहिती द्यावी. डॉ. ने लिहून दिलेले एकादे औषध आपण बाजारातून घेतो, त्यावेळी त्यात स्टिरॉईड असल्याचे आपल्याला माहीत करून घेता येते का? (त्यावर तसे लिहिलेले असते का)?

साती's picture

24 Jun 2014 - 10:20 am | साती

उत्तर कळवले आहे.

चित्रगुप्त's picture

24 Jun 2014 - 10:23 am | चित्रगुप्त

अनेकदा होमियोपाथी डॉक्टर 'मदर टिंक्चर' देतात, यात मूळ औषध आणि कमी प्रमाणात अल्कोहोल असते. औषधाचा रंग त्या त्या मूळ वस्तू प्रमाणे कमी-अधिक गडद असतो. या औषधांच्या शुद्धतेबद्दल खात्रीलायकपणे तपासणी केली जाऊ शकते.
.

वनस्पती वा जीव-जंतुंपासून काढलेला (यात अत्यंत विषारी कीटकही असतात) अगदी शुद्ध अर्क हा बहुतेकदा विषारी असल्याने तो खूप सौम्य (डायल्यूट) करणे गरजेचे असते.

पेशंटास औषधाची खरोखर कितपत गरज आहे, (आणि प्लासिबोची कितपत आहे), हे विविध प्रश्न विचारून स्पष्ट झाले, की होमियोपाथ योग्य ते मदर टिंक्चर, आणि अन्य पोटन्सीवाली (३०, २०० वगैरे) औषधे देतात. उदाहरणार्थ एक थेंब मदर टिंक्चर तीन दिवसासाठी पुरेसे असेल, तर ते सौम्य करून दिवसातून चारदा, वा दोन-दोन तासांनी असे विभागून तीन दिवस दिले जाऊ शकते.

होमियोपाथी औषध कसे बनते, याबद्दल एक आकृती:
.

आता ही आकृती चर्चेत आलीच आहे तर मूळ विरलीकरणाविषयीच्या प्रश्नांखेरीज अजून एक प्रश्न विचारुन पाहतो.

माझे गृहीतक असे आहे की एका टप्प्यात थेट हवे ते विरलीकरण (एक भाग औषध थेट अमुक लाख लीटर अल्कोहोलमधे मिसळणे असे अपेक्षित / योग्य नसून जितकी पोटेन्सी तितके टप्पे (उदा. ३०, १००, २०० इ) होणे आवश्यक आहे.

मला व्यावसायिक तत्वावर फक्त एक लीटर फायनल औषध (२००C) बनवायचे असल्यास माझे द्रावण प्रत्येक स्टेपला १०० पट विरल करणे आवश्यक असून ही प्रक्रिया २०० वेळा केली पाहिजे. करेक्ट मी इफ राँग.

म्हणजे शेवटच्या २००व्या आवर्तनाचा आउटपुट १ लीटर असला पाहिजे. म्हणजे मधल्या सर्व २०० स्टेप्स १ लीटरच्या प्रमाणातच केल्या पाहिजेत.

१० मिली औषध + ९९० मिली. अल्कोहोल = टप्पा क्र. १ द्रावण =१ C
१० मिली टप्पा क्र. १ द्रावण + ९९० मिली अल्कोहोल = टप्पा क्र. २ द्रावण = २ C
१० मिली टप्पा क्र. २ द्रावण + ९९० मिली अल्कोहोल = टप्पा क्र. ३ द्रावण = ३ C
...
...
...
१० मिली टप्पा क्र. १९९ द्रावण + ९९० मिली अल्कोहोल = टप्पा क्र. २०० द्रावण = २०० C

आता यात प्रत्येक टप्प्याला जादाचे ९९० मिली अल्कोहोल औषधाने युक्त झाले.

२०० व्या टप्प्याला आपल्याला १ लीटर पोटंट द्रावण मिळाले.

आता प्रत्येक टप्प्याला औषधाने ग्रस्त झालेले ९९० मिली अल्कोहोल पुन्हा दुसर्‍या किंवा त्याच औषधाच्या निर्मितीत वापरण्यायोग्य राहिले नाही (कारण त्यात कमीजास्त प्रमाणात औषधाचे मिश्रण झाले)

९९० गुणिले २०० टप्पे म्हटल्यास किमान १,९७,००० (अंदाजे एक लाख सत्त्याण्णव हजार मिलीलीटर = १९७ लीटर) अल्कोहोल एक लीटर फायनल औषधासाठी वापरले गेले.

हे एक लीटर द्रावण काही ठराविक क्वांटिटीमधे गोळ्यावर टाकून मिसळून पेशंटना दिले जाईल.

प्रश्नः

१. उपरिनिर्दिष्ट एक लाख सत्त्याण्णव हजार मिलीलीटर औषधमिश्रित निरुपयोगी अल्कोहोलचे काय केले जाते? फेकून दिले जाते का? कारण त्याच्या अलीकडल्या टप्प्यात त्यात बदकाचे लिव्हर, किंवा कीटकजन्य पदार्थ किंवा तत्सम काही मिसळले गेले असल्याने ते अन्य मेडिकल यूजसाठीही अयोग्यच ठरावे.

२. हे एक लीटर २००C द्रावणाचे झाले. अशा अनेक औषधांसाठी लागणारी (३०C ते १M पर्यंत पोटेन्सीज धरुन) हजारो - लाखो लीटर अल्कोहोल ही क्वांटिटी साठवण्यासाठी प्रचंड स्टोरेज क्षमता लागत असणार. अशा फॅक्टरीत / प्रयोगशाळेत अशी अनेक औषधे मोठ्या प्रमाणात बनत असणार. तेव्हा इतके अल्कोहोल / पाणी / साखर यांचा साठा करण्यासाठी तितके प्रचंड आकाराचे कारखाने असतात का?

३. एक लीटर औषधामागे जवळजवळ दोनशे लीटर शुद्ध अल्कोहोल लागत असेल तर अल्कोहोलच्या बाजारभावाने त्या एक लीटर औषधाची किंमत किती होत असावी ?

४. म्हणजे अल्कोहोलऐवजी पाण्यातच औषध बनवणे परवडणेबल असावे का?

५. इतक्या सूक्ष्मातिसूक्ष्म द्रव्याच्या क्वांटिटीने पोटेन्सीत फरक पडत असल्याने पाण्यात धूळ, जंतू, मिनरल्स, किंवा इतर कोणत्याही द्रव्याचा एकही रेणू आधीपासून असता कामा नये. अन्यथा त्या प्रदूषिताची मात्रा जास्त होईल. इतके शुद्ध पाणी इतके हजार्/लाख लीटर बनवणे आणि ते सतत तितकेच शुद्ध राहील अशा रितीने स्टोअर करुन ठेवणे यासाठी कोणत्या प्रकारचे टँक / बॅरल इ वापरतात.

प्रत्यक्ष औषध बनवणार्‍यांसाठी हे प्रश्न आहेत.

(टीपः आधी नजरचुकीने मिलीलीटर ऐवजी लीटर लिहिले गेलेले सुधारले आहे)

बाळ सप्रे's picture

24 Jun 2014 - 2:13 pm | बाळ सप्रे

ही सगळी होमिओपॅथीची थिअरी इतकी किचकट असल्याने औषधनिर्माते चक्क मूळ औषध देत असावेत .. म्हणूनच काही ठीकाणी गुण येत असावा..
जिथे औषधापेक्षा अल्कोहोल स्वस्त असेल तिथे फक्त अल्कोहोल दिल्याने गुण येत नसावा..
अशी माझी श्रद्धा आहे :-)

राजेश घासकडवी's picture

24 Jun 2014 - 9:38 pm | राजेश घासकडवी

१ लीटरसाठी १९७ लीटर हे थोडं चुकीचं गणित वाटतं. १०० पट डायल्यूशन करायचं असेल तर दर वेळी शंभर मिलिलीटर वापरून त्यातला एक मिलिलीटर काढला तर 'फुकट' जाणारं अल्कोहोल १९.७ लीटर व्हावं. शेवटून दुसऱ्या टप्प्याला जे शंभर मिलिलीटर येतात, त्यापासून दहा लीटर द्राव तयार होऊ शकतो. त्यामुळे एका लीटरसाठी दोन लीटर फुकट घालवणं, असा हिशोब होतो. आणि त्यासाठी प्रचंड जागा, खर्च वगैरे येत नाही. बरं, या एका लीटरमध्ये अक्षरशः लाखो गोळ्या बुडवून ठेवता येतात. आणि त्या गोळ्या दिवसाला अमुक इतक्या दिल्या जातात.

डायरेक्ट डायल्यूशन चालत नाही ना.

प्रत्येक स्टेप वेगळी होणे आवश्यक असते. नपेक्षा थेट कॅल्क्युलेशन करुन एकदाच द्रावण करता आले असते.

राजेश घासकडवी's picture

25 Jun 2014 - 4:03 am | राजेश घासकडवी

डायरेक्ट डायल्युशन म्हणत नाहीये. फक्त दर वेळी शतांशाचं डायल्युशन करण्यासाठी एक लीटरमध्ये दहा मिली घालण्याऐवजी शंभर मिलीमध्ये एक मिली घातलं तर दहापट कमी वेस्ट होईल. शेवटचे शंभर मिली दहा लिटरमध्ये घालायचे.

लुक्स गुड.. असेच करत असतील बहुतेक मग.

चित्रगुप्त's picture

25 Jun 2014 - 10:09 am | चित्रगुप्त

हुश्श.. चला, वाचलो एकदाचे त्या निरुपयोगी अल्कोहोल च्या महापुरापासून. :)

सुनील's picture

25 Jun 2014 - 10:37 am | सुनील

अल्कोहोल कधीच निरुपयोगी होत नसतं! ;)

असो, बाकी चर्चेत (वाचनमात्र) सहभागी आहेच!

ऋषिकेश's picture

24 Jun 2014 - 10:27 am | ऋषिकेश

हे कोण डॉक्टर आहेत? एकाही तर्कशुद्ध प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिलेले दिसले नाही.

मंडळी, उगाच वेळ नी टंकन करून उर्जा का दवडताय?

प्रसाद गोडबोले's picture

24 Jun 2014 - 1:20 pm | प्रसाद गोडबोले

एकुणच काय तर होमिऑपॅथी डॉक्टरांचा अ‍ॅटीट्युड हा ज्योतिषविशारदांसारखाच आहे असे परत एकदा जाणवले आहे !

बॅटमॅन's picture

24 Jun 2014 - 1:22 pm | बॅटमॅन

आणि होमिपदीसमर्थकांचा अ‍ॅटिट्यूड ज्योतिषसमर्थकांसारखाच =))

जगद्विख्यात जादूगार आनि स्केप्टीक (मराठी शब्द ???) जेम्स रँडी यांनी होमिओपाथी संदर्भात एक मिलियन डॉलरचे आव्हान दिले आहे.

In his message, Randi issued a one-million-dollar challenge to the manufacturers of homeopathic products to prove their claims, and challenged major drug retailers like CVS, Rite-Aid, and Walgreens to stop tricking consumers into paying real money for fake medicine.

चित्रगुप्त's picture

24 Jun 2014 - 8:09 pm | चित्रगुप्त

गवि यांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. अगदी सुरुवातीला समजा एक थेंब (म्हणजे किती मि.ली. असावे?) मूळ अर्क आणी नव्याण्णो थेंब अल्कोहोल अशी सुरुवात केली, तरी ३० वा २०० पोटन्सी पर्यंत हजारो लीटर निरुपयोगी अल्कोहोल (खरेतर होमियोपाथी औषध) शिल्लक राहील. त्याचे काय करतात?
मला तेंव्हाही प्रश्न पडायचा, की फक्त ३०, २०० आणि १००० पोटन्सीच का वापरतात? २७, ४२, १३८ वगैरे का नाही? हे कश्यावरून ठरवले जाते ? धागाकर्त्याने या सर्व गोष्टींवर प्रकाश पाडावा. बाकी अमूक औषधाचा अमूक उपयोग वगैरे मटेरिया मेडिका वा अन्य लहान पुस्तकात दिलेले असतेच.

आदूबाळ's picture

24 Jun 2014 - 8:25 pm | आदूबाळ

मागणी तितकी तगडी असेल, तर शिल्लक रहायला नको.

भारतातलं दरसाल अल्कोहोलचं मेडिकल कंझम्प्शन किती लिटर होतं हे कळलं, तर या पोटेन्स्या खर्‍या असतात की दुकानदार टोप्या लावतात हे कळेल.

सदर लेखमालेत असलेले वर्णन वाचून ही बारा क्षार वापरुन केली जाणारी योजना आहे असे वाटले. (मला वाटते हा होमिओपथीचा एक व्हेरियंट आहे.)

धागाकर्त्याच्या लिखाणावरुन हे क्षार ब-यापैकी क्वांटिटीत दिले जातात असे वाटून त्या भागापुरते शंकासमाधान झाले. माझा पहिला प्रतिसाद हेच व्यक्त करणारा होता ( वा वा. औषध पोटात जातेय.. पण मग ही ही होमिओपथीच ना ?)

,,, पण त्यातही विरलीकरण आहेच हे रा.घा. यानी tithechस्पष्ट केल्याने पुढील रास्त शंका आल्या.

संजय क्षीरसागर's picture

27 Jun 2014 - 12:44 am | संजय क्षीरसागर

उर्फ MRI वाले डॉक्टर, पदार्पणानंतर फिरकलेच नाहीत. आणि आता हे दुसरे व्यासंगी, स्वच्छंद मकरंद! पीच सोडून भलतीकडेच बॅटींग करतायंत.

श्रीगुरुजी's picture

27 Jun 2014 - 1:02 pm | श्रीगुरुजी

मी असं कोठेतरी वाचलं होतं की केजरीवाल हे अ‍ॅलोपॅथी पेक्षा होमिओपॅथी, आयुर्वेदिक उपचार, निसर्गोपचार इ. वर जास्त भर देतात. तुम्हाला याची कल्पना आहे का?

कवितानागेश's picture

28 Jun 2014 - 11:00 am | कवितानागेश

ह्हाय र्राम्मा य्ये क्क्या हुवा...
त्तुम क्कैस्से हम्मे सत्ताने लग्गे....
=))