नमस्कार मंडळी. दोनहजार दहामधे मिपावर विश्वचषकाचा थरार आपण सर्वांनी अनुभवला होता. फुटबॉल हाच धर्म देव समजणा-या ब्राझीलमधे फुटबॉलच्या विश्वचषकला सुरुवात होत आहे. ब्राझील आणि क्रोएशिया यांच्यात सलामीचा सामना आज भाप्रवे रात्री १:३० ला रंगणार आहे. एकुण आठ गृप मधे बत्तीस संघ एकमेकांशी भिडणार आहेत. फिफाच्या अधिकृत संकेतस्थळावर सामन्यांचे वेळापत्रक आणि फुटबॉल संघ, खेळाडुंची माहिती, आणि असे बरेच उपलब्ध आहे. आपण मिपा रसिक फुटबॉलच्या विविध घटना, खेळाडु, संभाव्य विजेते, रंगतदार होणारे सामने. आत बाहेरच्या संघाच्या गोष्टी, संघांचे डावपेच आणि आपल्या आवडतील त्या गोष्टींचे आदानप्रदान या धाग्यावर करु.
आजच्या सामन्यात सरळ सरळ ब्राझील जिंकेल असे वाटते. ज्युलियो सेसर हा ब्राझीलचा गोलकिपर ज्याच्यामुळे ब्राझील उपांत्यफेरीत पराभूत झाले तो याहीवेळीही गोलकिपर आहेच. ब्राझीलचा स्ट्रायकर नेयमार, हुल्क, फ्रेड यांच्यावर ब्राझीलची खरी भिस्त आहे. सामना किती रंगतदार होतो ते आज पहिल्या सामन्यात पाहुच.
मिपाकरांनी फुटबॉलच्या संदर्भात जालावर असलेले किंवा कोणी मिपाकर थेट सामने पाहणारे असतील तर सामन्यांचे, रसिकांचे लक्षणीय फोटो इथे टाकावेत. आणि आपण जमेल तसे सामन्यांचा आनंद घेऊ या. तेव्हा आजचा पहिला सामना आपण बघायला विसरायचं नाही. मी तरी पहिला सामन्याचा आज आनंद घेणार आहे. आपणही आपापल्या संघाचे झेंडे घेऊन तयार व्हावे, आम्ही ब्राझीलचा झेंडा हाती घेतलाय, आपण कोणत्या संघाचा झेंडा हाती घेतलाय, घेणार आहात तेव्हा देखेंगे आगे आगे होता है क्या....!
प्रतिक्रिया
12 Jun 2014 - 10:22 pm | प्रचेतस
आमचा पाठींबा जर्मनीला. क्लोज, ओझील, पोडोल्स्की असे एकापेक्षा एक सरस खेळाडू.
आक्रमक्र खेळामुळे जर्मनीचे सामने पाहणे अजिबात कंटाळवाणे होत नाही.
14 Jun 2014 - 4:37 am | निनाद मुक्काम प...
12 Jun 2014 - 10:23 pm | पैसा
आपली टीम काही तिकडे पोचत नाही. इतरांच्या खेळाचाच आनंद घेऊया! माझ्या मुलाचे अजून ३ पेपर्स शिल्लक आहेत. एक उद्या आहे आणि तो रात्री मॅचेस बघणार आहे. तेव्हा मी पण लाथा मारायचा खेळ बघेन म्हणते!
12 Jun 2014 - 10:26 pm | प्रचेतस
ब्राझील मध्ये सामने असल्याने लै गोची झालीय. बरेचसे सामने आता अवेळी जागरण करुन पाहावे लागणार. :(
12 Jun 2014 - 10:58 pm | खटपट्या
मी ब्राझिलचा झेन्डा घेतलाय !
12 Jun 2014 - 11:17 pm | मुक्त विहारि
आमचा पाठिंबा जर्मनीला.
12 Jun 2014 - 11:22 pm | विनायक प्रभू
कॉलेज ला बुट्टी?
13 Jun 2014 - 10:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर प्रवेश प्रक्रिया चालु आहे, आमच्या प्रवेश समितीचे कामकाज बारा ते पाच आहे.
सर्व वर्गास (कला वाणिज्य व विज्ञान) 11 वी ते पदवी पर्यन्त प्रवेश देणे चालू आहे. तज्ञ प्राध्यापक, भव्य इमारत, भव्य ग्रंथालय...भव्य.. :)
-दिलीप बिरुटे
12 Jun 2014 - 11:53 pm | खटपट्या
कोणाकडे ऑनलाइन बघण्यासाठी लिंक आहे का ?
13 Jun 2014 - 8:36 am | मंदार कात्रे
http://www.en.beinsports.net/connect
13 Jun 2014 - 1:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सामना सुरु होतोय. स्टेडियम गच्च भरलय !
13 Jun 2014 - 1:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क्रोएशियान चांगलं आक्रमन केलंय आणि अकराव्या मिनिटाला पहिला गोलही केला अतिशय सुरेख असा खेळ क्रोएशिया करतंय. आमचं ब्राझिल चाचपड़तय सालं.
13 Jun 2014 - 8:39 am | प्रचेतस
माताय, स्पर्धेतला पहिलाच गोल स्वयंंगोल झाला ब्राझीलच्या मार्सेलोकडून.
13 Jun 2014 - 10:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
या मार्सोलोला काल झोप आली नसती जर पुढचे दोन गोल झाले नसते तर..काल ब्राझीलच्या खेळाडूना उपान्त्य फेरीच्या पराभवाची आठवण झाली असेल.
बाकी या मार्सलोला बघितल्यावर सत्यसाईंबाबाची आठवण झाली. चेहरापट्टी सेम आहे :)
-दिलीप बिरुटे
13 Jun 2014 - 10:18 am | प्रचेतस
अगदी अगदी. :)
13 Jun 2014 - 2:01 am | खटपट्या
ब्रझिल ने मारला !!!
ब्रझिल ब्राझिल
13 Jun 2014 - 2:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नेयमारने पहिला गोल 29 व्या मिनिटाला वतीने नोंदवला... सुरेख.
13 Jun 2014 - 2:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सेकंड हाफची 20 मिनिटे संपलीत क्रोएशियाच्या उत्तम बचावापुढे ब्राझीलचे मार्कोलो,फ्रेड आणि नेयमार हुल्क ढीले पडले आहेत...ब्राझीलला जिंकायचे असेल तर आक्रमण करावेच लागेल नस्ता क्रोएशिया गोल नोंदवून कधी पुढे जाईल हे ब्राझीलला कळणारही नाही.
13 Jun 2014 - 3:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खेळाच्या ६८ व्या मिनिटाला फ्री किक मिळाली नेयमार ने दुसरा गोल नोंदवला 2-1 शाब्बास लेकहो. :)
13 Jun 2014 - 3:26 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ब्राझील जिंकले पण मनं जिंकली ती क्रोएशियानं. शेवटच्या काही सेकंदात क्रोएशियाला संधी मिळाली होती ती गेली आणि शेवटच्या त्या काही सेकंदात ब्राझिलच्या ओस्करने तीसरा गोल नोंदवला. शेवटच्या वाढीव् मिनिटातला खेळ संपला.
शुभ प्रभात :)
-दिलीप बिरुटे
13 Jun 2014 - 4:53 am | प्रचेतस
हुर्रे....ब्राझिल जिंकले तर......:)
13 Jun 2014 - 10:21 am | टवाळ कार्टा
अर्जेंटिना.... माझी पसंती :)
13 Jun 2014 - 10:31 am | आयुर्हित
सह्मत
13 Jun 2014 - 3:22 pm | वेल्लाभट
डोक्याला वाटतंय की स्पेन चं पारडं जड आहे... पण मनाने अर्जेंटिना ला सपोर्ट आहे. मेसी, अग्वेरो, तेवेज, यांचे चमत्कार बघायची इच्छा आहे... ब्राझील ला होम क्राउड चं अॅड्व्हान्टेज वगैरे असलं तरी शक्यता कमी वाटतेय का कोणास ठाउक. पोर्तुगाल मात्र सरप्राईझ ठरू शकते. काल मॅच बघितली नाही. झोपलो. आज स्पेन ची बघेन.
13 Jun 2014 - 3:24 pm | अनुप ढेरे
तेवेझ नाहिये मित्रा स्क्वाडमध्ये.
13 Jun 2014 - 3:25 pm | वेल्लाभट
तेवेज नाहीये... पण हिग्वेन, गागो, रोमेरो आहेत.
13 Jun 2014 - 5:44 pm | अँग्री बर्ड
जर्मनी जर्मनी फक्त जर्मनीच. :)
13 Jun 2014 - 8:13 pm | श्रीगुरुजी
ब्राझील व जर्मनी यांच्यात अंतिम सामना व्हावा अशी इच्छा आहे. नेदरलँड्स विजेते ठरले तरी आवडेल. कॅमेरूनने १९९० चा चमत्कार पुन्हा एकदा दाखवावा अशी मनोमन इच्छा आहे.
13 Jun 2014 - 9:49 pm | लॉरी टांगटूंगकर
:) :ड प्रतिसाद वाचून दोनदा डोळे चोळावे लागले. नंतर नेमकं काय म्हणायचं आहे ते लक्षात आलं.
13 Jun 2014 - 9:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मेक्सिको आणि केमेरून यांच्यात सामना सुरु आहे, खेळाची पाच मिनिटे झाली आहेत, मेक्सिको आक्रमण करतोय पण गोल मधे रूपान्तर करणे दोघांनाही अजुन जमले नाही.
-दिलीप बिरुटे
13 Jun 2014 - 10:12 pm | प्रचेतस
पूर्वार्धाची ४० मिनिटं.अजूनही एकही गोल नाही. भर पावसातही खेळ चालू आहे.
13 Jun 2014 - 10:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पूर्वार्धातला खेळ संपलाय. गोल करण्याची संधी मेक्सिकोलाच जास्त मिळाली पण गोल होऊ शकला नाही. सामना म्हणावं तसा अजूनही रंगेना.
-दिलीप बिरुटे
13 Jun 2014 - 10:34 pm | प्रचेतस
मेक्सिकन कोच लैच वैतागला होता. रेफरीशी पण वाद घातला मेल्यानं.
13 Jun 2014 - 10:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मेक्सिकोच्या पेरोल्टाने केला बा गोल. १-० अजूनही गोल झाला तर मेक्सिकोच करेल असे वाटते.
क्यामेरुन मधे काय दम दिसेना. अर्थात खेळ उत्तम करेल तो जिंकेल म्हणा.
-दिलीप बिरुटे
13 Jun 2014 - 10:42 pm | पैसा
०-०.
हे असले बारके देश पण फायनल्समधे खेळतात आणि आमच्या लोकांना जमत नाय? शरम वाटण्यासारखी गोष्ट आहे.
13 Jun 2014 - 11:19 pm | मुक्त विहारि
लवकरच
एफ. पी. एल. आपले ते "फूटबॉल प्रीमीयर लीग" चालू होईल.
13 Jun 2014 - 10:54 pm | प्रचेतस
मेक्सिकोच्या पेराल्टाने पहिला गोल चढविला
13 Jun 2014 - 11:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मेक्सिको चांगले खेळले आणि जिंकले :)
शुरा :)
14 Jun 2014 - 1:03 am | कुसुमावती
स्पेनचा पहिला गोल.
14 Jun 2014 - 1:30 am | कुसुमावती
हॉलंडकडुन सुरेख गोल.
14 Jun 2014 - 2:07 am | कुसुमावती
हॉलंडकडुन एकापाठोपाठ ४ गोल. मस्त खेळ्त आहे हॉलंड
14 Jun 2014 - 2:27 am | कुसुमावती
हॉलंड मस्ताड खेळले आणि जिंकले. *yahoo*
14 Jun 2014 - 3:05 am | भृशुंडी
वॅन पर्सीच हेडर खतरनाक.
आणि रॉबेनचा गोल तर निव्वळ भिश्क्याव....
४था गोल कॅसियासने फुकटचा दान केला.
पण एकंदरीत flying Dutchmen! *biggrin*
स्पेन २०१० मध्ये पण पहिला गेम हरलेले- पण इतका भीषण नाही!
14 Jun 2014 - 1:38 pm | शिद
+१११ स्पेनचा गोलकिपर सुद्धा आ वासुन फक्त बॉलकडे बघतच राहीला.
पण एकंदरीत कालचा स्पेन वि. नेदरलँड(हॉलंड) चा सामना रोमहर्षक झाला. मज्जा आली.
14 Jun 2014 - 4:42 am | निनाद मुक्काम प...
युरोपियन देशाची भिशी लावल्याप्रमाणे आपापसात विश्वविजेते पद वाटून घेतात , ह्यावेळी मला हॉलंड ला संधी असल्याचे वाटते.
आम्ही नेहमीच सेमी फायनल पर्यंत येतो , त्यामुळे काय होणार ह्याची आधीच माहिती असल्याने डोक्याला नाही तर घशाला त्राण देत घश्याखाली बियर रिचवली जाते.
अंतिम सामन्यात आपण नसल्याने बेफिकारीने सामना पाहण्याची मज काही औरच
14 Jun 2014 - 7:01 am | कंजूस
हेडरचे गोल बंद करायला हवेत .कॉर्नरमधून एकाने चेंडू अगदी जाळीपाशी मारायचा आणि डोक्याने दुसऱ्याने आत घुसडायचा की झाला गोल काही मजा नाही . फक्त डोक्याने चेंडू अडवायची परवानगी हवी .
दोन प्रतिस्पर्धी आणि एक गोलाडव्याला चकवत एखादा खेळाडू चेंडू जाळीत हळूच सोडतो ते फार मजेशिर वाटते .आणखी दोन तीन कसबी प्रकारही खेळाची मजा वाढवतात .रेकॉर्डीँग केलेला खेळही बघायला मजा येते .कधीकधी एवढे गूंग होतो की समोर ठेवलेला गरम चहा गारढोण होतो .
बॉल सतत दुसऱ्याकडे तटवायचा योग्य वेळ येईपर्यँत चे मर्म जाणणारे तीन चार खेळाडूच(मेसि वगैरे) जिंकून देतात .मीच गोल करीन या विचाराचे असले की पराभव निश्चित .अशांनी टेनिस खेळावे मध्यभागी आडवी जाळी लावलेल्या 'कोर्टात'.
14 Jun 2014 - 3:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गोलाडवा शब्द आवडला. :)
-दिलीप बिरुटे
14 Jun 2014 - 10:01 am | सुधीर
इंग्लंड वि. इटली सामना पहायचा आहे. बघू योग येतो का? लॅटीन अमेरिका आणि युरोप व्यतिरिक्त एकतरी संघ फायनल मध्ये असावा असं वाटतं. (जपान कडे डोळे लावून आहे).
14 Jun 2014 - 1:46 pm | शिद
आजचे सामने:
कोलंबिया वि. ग्रिस
उरुग्वे वि. कोस्टा रिका
इंग्लंड वि. इटली
कोत द'ईवोआर(आयव्हरी कोस्ट) वि. जपान
14 Jun 2014 - 9:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कोलंबिया वि. ग्रीस सामना सुरु होतोय. काय अंदाज नै कोण जिंकेल. पाहात राहु. उत्तम चाली, उत्तम पासेस, असं काहीसं दिसावं.
-दिलीप बिरुटॅ
14 Jun 2014 - 9:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुंदर चाल रचुन झालेला पहिला कोलंबियाचा गोल आठव्या मिनिटाला.
-दिलीप बिरुटे
14 Jun 2014 - 11:16 pm | प्रचेतस
मला आठवते ते ग्रीस ९८ का २००० सालचे युरो कप विजेते होते. पण सध्या बरीच अधोगती झालेली दिसतेय.
14 Jun 2014 - 11:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कोलंबियाचा खेळ ग्रीस पेक्षा कितीतरी पटीने उत्तम होता. कोलंबियाने 3-0 ने ग्रीसला धूळ चारली.
16 Jun 2014 - 9:43 am | अनुप ढेरे
२००४ चं युरो.. पण तोही तुक्काच होता.
15 Jun 2014 - 11:48 pm | शिद
शेवटच्या ३ र्या मी. (एक्स्ट्रा टाईम) स्विट्झर्लंड्च्या Haris Seferović जबरा गोलमुळे स्विट्झर्लंड्चा इक्वॅडोर वर २-१ ने विजय.
16 Jun 2014 - 6:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्वीतझर्लन्डचे उत्तम पासेस आणि आणि सतत गोल्पोष्टवर धड़कणे यामुळे विजयी ते विजयी ठरले असे वाटते. पण चांगला सामना बघायला मिळाला !
दिलीप बिरुटे
16 Jun 2014 - 11:06 am | कंजूस
दोनवेळा गोल झालेला पंचाने दिला नाही मेक्सिको वि० कमेरून खेळात.आउटसाईडचे नाटक काही कळले नाही .रेकॉड केलेले दोन तीन वेळा पाहूनसुध्दा .तो हिरवा पट्टा दाखवायचे .
16 Jun 2014 - 8:03 pm | रंगोजी
*ऑफसाईड
पंचाच्या मदतनीसाने चूक केली. पास होताना पास घेणारा आणि जाळे यामध्ये किमान एक बचावपटू असावा लागतो (कीपर सोडून). तसे नसेल तर ऑफसाईड दिला जातो. याला अपवाद असतो जेव्हा पास घेणारा देणार्याच्या मागे असतो (pullback). त्यामुळे कॉर्नरला डायरेक्ट कधी ऑफसाईड होउ शकत नाही. येथे मदतनीसाने वाटेत चेंडूला दुसर्या॑ खेळाडूचा स्पर्श झाल्याने नवीन पास सुरु झाला वाटून ऑफसाईड ट्रिगर केला. पण प्रत्यक्षात स्पर्श कॅमेरूनियन खेळाडूचा होता. चुकीचा निर्णय. जरी मेक्सिकोला ३ गुण मिळाले असले तरी गोल फरक किती महत्त्वाचा ठरणार हे शेवटीच कळेल.
16 Jun 2014 - 8:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मलाही ऑफसाईडची भानगड कळत नाही. कशाला हवा एक मधे बचावपटू.
गोलपोष्टमधे चेंडु किती सराईतपणे 'गोल' म्हणुन डकवला हे महत्वाचे. :)
-दिलीप बिरुटे
18 Jun 2014 - 5:58 am | खटपट्या
असं नसेल तर आक्रमण करणारा एक खेळाडू (रोनाल्डो सारखा) नेहमीच गोल पोस्ट जवळ घुटमळत राहील. आणि योग्य पास मिळाल्यावर गोल करेल. गोलची संख्या दुप्पट तिप्पट होईल. आणि खेळातील चुरस कमी होईल.
16 Jun 2014 - 8:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जर्मनी आणि पोर्तुगल आता थोड्याच वेळात भिडणार आहेत.
एक चांगला सामना बघायला मिळावं असं वाटतं.
-दिलीप बिरुटे
16 Jun 2014 - 8:58 pm | प्रचेतस
ही म्याच भलतीच रंगतदार व्हावी अशी अपेक्षा आहे.
शिवाय ९:३० पासून असल्याने झोपेचे खोबरे पण होणार नाही.
16 Jun 2014 - 9:43 pm | प्रचेतस
जर्मनीच्या खेळाडूला पुर्तुगेजांनी गोलक्षेत्रात अवैधारित्या पाडल्याने मिळालेल्या फ्री किकवर मुल्लरने जर्मनीला पहिला गोल करून दिला.
16 Jun 2014 - 10:18 pm | मधुरा देशपांडे
जर्मनीचा सलग तिसरा गोल *drinks*
16 Jun 2014 - 10:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जर्मनीचा खेळ छान. जबरदस्त आक्रमण त्याच मुळे तीन गोल झालेत सुरुवातीला जे हल्ले पोर्तुगिल चढ़वले नंतर मात्र त्यांना जमत नैये.
पाहू या सेकंड हाफ
17 Jun 2014 - 11:18 am | वेल्लाभट
अपेक्षेपेक्षा खूपच एकतर्फी. पोर्तुगाल ची हाराकीरी चालू होती. पेपे पिवळ्या तिकिटावर वाचू शकला असता जर पुन्हा त्याच्याजवळ जाऊन डोकं नसतं `चालवलं'. रोनाल्डोही निष्प्रभ वाटला.
मजेची बाबः आज ऑफिसात दोन मुलींचं संभाषण कानावर पडलं. `अरे वो गोल कर ही नही रहा था यार... पता नही क्या हुवा उसे? (चिंतेचा सूर)' एक क्षण मला वाटलं कुठल्याश्या सिरियल मधल्या पात्राविषयी चर्चा चालली आहे की काय... म्हणजे... तिने ऐकूनच घेतलं नाही ग त्याचं... इत्यादी. लोल!
असो. ब्राझील मेक्सिको मजा येईल वाटते. उद्या पुन्हा डचांची खेळी बघायचीय... वाह! मझा आहे.
17 Jun 2014 - 3:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डोकं नसतं लावलं तर पेपे पिवल्या कार्डावर वाचला असता आणि रोनाल्डोची जी हवा होती ती तर कुठेच दिसली नाही.
दिलीप बिरुटे
18 Jun 2014 - 3:29 pm | रंगोजी
कदाचित पिवळेही मिळाले नसते. मूळ फाऊल पंचाने दिलाच नव्हता. निव्वळ मूर्खपणा पेपेचा.
रोनाल्डोबाबत सहमत. अजून पूर्णपणे तंदुरुस्त नाही असेच वाटते. पुढचे सामने सोपे आहेत. फॉर्मात येईल आशा आहे. तसेही पोर्तुगाल नेहमी अडखळत सुरुवात करतात. विश्वचषक पात्रतेच्या सामन्यातही करो या मरो परिस्थिती आली होती.
17 Jun 2014 - 1:49 pm | असंका
मिरोस्लाव क्लोजा काल खेळला नाही का?
18 Jun 2014 - 3:20 pm | रंगोजी
टॅक्टिकल निर्णय. १ स्ट्रायकर खेळवण्याऐवजी त्याना ३ रोटेटिंग आक्रमक हवे होते.
17 Jun 2014 - 1:50 pm | मित्रहो
कालचा खेळ बघता जर्मनीच जिंकायला हवी यावर्षी.
17 Jun 2014 - 3:29 pm | हाडक्या
काय राव .. सगळे फक्त सेलेब्रिटी संघांबद्दल बोलतेत तुमी लोकं. कालची ईराणची मॅचपण भारी झाली बरं का.
काय फाईट दिली ईराणने त्या नायजेरियाला, डिफेन्स तर मस्तच. आता अर्जेंटिना बरोबर आहे त्यांची पुढची मॅच.. :)
18 Jun 2014 - 4:11 am | कंजूस
नेमा कंपनी मेक्सिकोच्या गोलाडव्यापुढे बापुडवाणी ठरली .टाळ्या वाजवून ब्राझिलकर थकले नी हात चोळत गेले शेवटी .०-० बरोबरी .
18 Jun 2014 - 3:37 pm | शिद
कालची ब्राझिल वि. मेक्सिको ची मॅच थरारक झाली.
मेक्सिकोचा गोलकिपर ओचोआ हा एखाद्या अभेद्य भिंतीसारखा गोलपोस्ट समोर उभा राहून गोल अडवत होता. दुसरीकडे ब्राझीलचा गोलकीपर ज्युलियो सीझरनेही भक्कम कामगिरी करत संघावर गोल होऊ दिला नाही.
कालच्या सामन्यातील खरे स्टार होते दोन्ही संघांचे गोलकीपर...
18 Jun 2014 - 5:37 pm | असंका
रशिया आणि कोरीया...रटाळ मॅच: १:१
गोल्कीपरच्या हातात मारलेल्या बॉलवर गोल? आणि उत्तरादाखल रशियन आक्रमकांपैकी एकाच्या हाताला लागून अडलेल्या चेंडूवर दुसर्याने केलेला बरोबरीचा गोल्...
नगण्य आव्हाने. एक सेकंदात बॉल या बाजूच्या गोल्जवळ तर दुसर्या सेकंदाला दुसर्या बाजूच्या! मध्ये कुणी कुणाला आव्हान देऊन अडवायचा प्रयत्नही नाही!
18 Jun 2014 - 5:46 pm | कंजूस
यापेक्षाही वाइट मोहन बागान आणि डेंपो इत्यादी भारतीय टीमांच्या खेळाडूंचा खेळ होतो का ?
18 Jun 2014 - 9:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ऑष्ट्रोलिया आणि नेदरल्यांडचा रंगतदार सामना सुरु आहे
18 Jun 2014 - 9:59 pm | प्रचेतस
रोबेननं आपल्या वेगाचं प्रदर्शन करत डचांना आघाडीवर नेलं पण दोनच मिनिटात कांगारूंनी गोल डागून बरोबरी साधली.
19 Jun 2014 - 3:22 am | कंजूस
धडाकेबाज कांगारूपेक्षा डच नाविक सरस .
19 Jun 2014 - 3:17 am | कंजूस
स्पेनला मिळाले रिटन तिकीट .
आता फक्त बीचवर लोळायचे आणि परत जायचे .
ब्राझीलच्या मैनेजरने अगोदरच सांगितले होते युअरोपिअन टीम परवडली ,चिलीशी खेळ नको रे बाबा ,फारच तिखट .
19 Jun 2014 - 9:32 am | पैसा
चिली म्हणजे 'तिखट मिरची' जणू काय!
19 Jun 2014 - 12:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चिलीने स्पेनचे विजेतापदाचे स्वप्न धुळीस मिळवले. स्पेन आक्रमक होते पण त्यांना जमलेच नाही. फुटबोल तज्ञ स्पेनच जिंकेल म्हणायचे आणि असंख्य क्रीडा रसिक स्पेनचे नाव घेत असायचे आता जर्मनी आणि ब्राझिल कडून अपेक्षा धरावी असे वाटते.
दिलीप बिरुटे
19 Jun 2014 - 12:51 pm | प्रचेतस
नारिंगी सेना पण जोरात आहे.
19 Jun 2014 - 2:27 pm | इरसाल
कोनता झेंडा घेवु हाती ?
19 Jun 2014 - 2:58 pm | विअर्ड विक्स
australia आणि holland अत्यंत चुरशीचा झाला… दोन्ही बाजूंनी आक्रमक खेळ केला… tim cahil ची volley अप्रतिम…. Long pass सुद्धा सुरेख होता.
19 Jun 2014 - 3:38 pm | कंजूस
मला रॉबेनचा खेळ आवडला .
संपूर्ण दोन तासभर रात्रीचा खेळ आणि तीन मैच पाहणे कठीणच त्यामुळे BBC SPORTS news हळूच मोबाईलच्या दोन इंची चौकोनात वाचतो .वाचनीय आहे .अपडेटस टाकतात मैदानातून .दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ ते दहा एक तासात तीनही मैचेज जे ठळक सोनी सिक्सवर टिव्हीवर पाहतो .ताकाची तहान ताकावर .असा पूर्ण खेळ नाही तरी कुठे समजतोय ?कुणाचा तरी झेंडा आपला म्हणायचा .पांढरा टी शट बरा ,नंतरही घालता येतो .
क्रिकेटपेक्षा मजा लय भारी .नाचणाऱ्या पोरींची गरजच नाही ,प्रेक्षकांतही सांपल असतात .आख्खा देश नाचतो अथवा टिपे गाळतो एकेका जबरदस्त लाथेवर .नव्वद मिनिटांत पंधरा किमी तरी पळत असतील बिचारे खेळाडू आपल्या देशासाठी .
20 Jun 2014 - 9:55 am | प्रचेतस
स्पेन पाठोपाठ इंग्लंडने पण गाशा गुंडाळला. उरुग्वेकडून २-१ ने हार.
इंग्लंडचे खेळाडू म्हणजे नाव मोठं अन् लक्षण खोटं अशातली गत.
20 Jun 2014 - 9:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इटली चा म्याच सुरु आहे पाहताय ना ?
20 Jun 2014 - 10:10 pm | प्रचेतस
पाहतोय.
खूप संथ आणि रटाळ खेळ चालला आहे.
20 Jun 2014 - 10:22 pm | प्रचेतस
रटाळ सामना चालू असतानाच कोस्टारिकन खेळाडूने दिलेल्या सुरेख पासवर स्ट्रायकर रुईझने हेडरद्वारे अफलातून गोल करून इटलीला १-० ने पिछाडीवर ढकललं.
20 Jun 2014 - 10:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कोश्तारिका च्या खेळाडू चा मस्त हेडर इटली विरुद्ध एका गोलची आघाडी.
वल्ली शेठ सेकंड हाप तुम्ही पाहा मी झोपतो ...GN :)
20 Jun 2014 - 10:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कोश्तारिका च्या खेळाडू चा मस्त हेडर इटली विरुद्ध एका गोलची आघाडी.
वल्ली शेठ सेकंड हाप तुम्ही पाहा मी झोपतो ...GN :)
20 Jun 2014 - 10:23 pm | प्रचेतस
बघतो आहेच. :)
20 Jun 2014 - 11:26 pm | प्रचेतस
नीरस सामन्यात कोस्टारिका १-० ने विजयी. बाद फेरीत प्रवेश. आता उरुग्वे - इटली सामन्याला करो वा मरो महत्त्व येणार.
21 Jun 2014 - 6:33 am | कंजूस
फ्रान्स वि स्विटज दोन तीन वेळा हाइलाइटस पाहावे लागणार .बन्जिमाचा गोल शिटीने खाल्ला .फारच मजेदार मैच झाली .
सेट टॉप बॉक्स रेकॉर्डिँगवाला असल्याने बरं पडतं .नंतर फारवर्ड करून बघता येतं .
21 Jun 2014 - 10:05 pm | प्रचेतस
मेस्सी जोरदार आक्रमणं करतोय पण इराणचा बचाव भेदण्यात अजून यश नाहिये.
एका मेस्सीला ३/४ इराणी बचावपटू घेरून उभे आहेत.
21 Jun 2014 - 10:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अर्जेंटीना इतके दमेल असं वाटलं नव्हतं :) सेकंड हाफ मधे पाहू मेस्सी काही चमत्कार करतो का ! बाकी इराणच्या बचावाला मार्क दिले पाहिजेत.
21 Jun 2014 - 10:39 pm | प्रचेतस
इराणचं आक्रमण मात्र लैच फ़िक्कं पडतंय. अर्जेंटीनाचा चेंडूवरील ताबा ७५% पेक्षाही जास्त आहे.
21 Jun 2014 - 10:54 pm | खटपट्या
असे वाटतंय इरान फक्त मेसिला थोपवण्यात धन्यता मानतंय
21 Jun 2014 - 11:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सालं काय अफलातून किक मारली मेस्स्सिने केवळ ग्रेट.1-0
21 Jun 2014 - 10:54 pm | असंका
अर्जेंटिनाला काय सूधरेना इराण्यांसमोर....
60 मिनटं होउन गेली...0:0
21 Jun 2014 - 11:12 pm | खटपट्या
इराण च्या गोल कीपर ला मानला पाहिजे
21 Jun 2014 - 11:20 pm | खटपट्या
मॆऎस्स्स्सीईईइ !!!!!
22 Jun 2014 - 1:41 am | खटपट्या
जर्मनी १
22 Jun 2014 - 1:44 am | खटपट्या
धक्कादायक रित्या घाना ची बरोबरी
22 Jun 2014 - 1:54 am | खटपट्या
धक्कादायक रित्या घाना चा दुसरा गोल
22 Jun 2014 - 1:51 am | मधुरा देशपांडे
उत्तरार्धात सामना रंगतोय. आणि घाना २.
22 Jun 2014 - 2:25 am | खटपट्या
माझ्या मते घाना विजेता आहे
22 Jun 2014 - 3:45 am | कंजूस
जर्मनी
आला आला क्लोस
क्लोस आला धावून .
अर्जेँटिना
केला एकदाचा गोल मेस्सीने .
इंग्लंड
कधी उजाडायचा तो मंगळवार ?मला जाऊ द्या की घरी आता वाजले की बारा .
22 Jun 2014 - 10:34 am | निनाद मुक्काम प...
हाहाहा
कंजूस काका मस्तच
घानाच खरा विजेता वैगैरे बोलायची कधी , बोलाचा भात अशी आहे. अजून एक धक्कादायक निकाल लागून अजून एका युरोपियन संघांना परतीचे वेध लागणार ह्या कु शंकेला पूर्ण विराम मिळाला.
बचेंगे तो और भी लढेंगे
आमचा गरुड ह्यावेळी विश्वचषक आपल्या पंखाखाली घेणार हे नक्की
22 Jun 2014 - 10:48 pm | खटपट्या
बेल्जीअम आणि रशिया अतिशय रटाळ खेळतायत
22 Jun 2014 - 10:57 pm | प्रचेतस
मूळात ह्या दोन्ही संघांचे सामने पाहणे म्हणजे बांग्लादेश विरुद्ध झिंबाब्वे क्रिकेट म्याच पाहण्यासारखं आहे.
23 Jun 2014 - 11:00 am | असंका
रशियन लोक भलतेच जंटल्मन आहेत्....त्यांची कोरीयाबरोबरची मॅचही रटाळ झाली होती. रशियाला अगोदर एकही यलो कार्ड नव्हते. आज मिळाले. आणि उगीचच मिळाले असं मला तरी वाटलं. कुणाला तरी यलो कार्ड दिल्याशिवाय आपण काम करतो आहोत हे लोकांना पटणारच नाही असे वाटून त्या रेफेरीने अगदी फालतू टॅकलींगसाठी कार्ड दिले.
23 Jun 2014 - 9:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कुणाला तरी यलो कार्ड दिल्याशिवाय आपण काम करतो आहोत हे लोकांना पटणारच नाही असे वाटून त्या रेफेरीने अगदी फालतू टॅकलींगसाठी कार्ड दिले.
=))
-दिलीप बिरुटे
22 Jun 2014 - 10:51 pm | खटपट्या
मला आठवतंय लहानपणी जो खेळून दमला कि त्याला थोडा वेळ गोलकीपर म्हणून ठेवायचे :)
22 Jun 2014 - 11:17 pm | खटपट्या
मारला एकदाचा गोल बेल्जीअंम ने
23 Jun 2014 - 8:26 am | कंजूस
जर्मनीच्या गटात नुसती धडपड आहे .
जर्मनीचा संघ जेव्हा खेळतो तेव्हा आपण हरणार तर नाही ना अशा मानसिकतेतून खेळाडू खेळतात .आणि चुकून गोल झाल्यासारखा आनंद दाखवतात .असं का होतं ही चर्चा नेहमी होते .पण निनाद तुझा संघ मात्र चांगला खेळ करतो .उगाच पाडापाडी करणे या गोष्टी करत नाही .प्रतिस्पर्ध्याकडून चेंडू काढायचा आगावूपणाही करत नाहीत .अगदी पांढऱ्या टीशर्टातले जेँटलमेन .
23 Jun 2014 - 10:44 am | खटपट्या
हो पण तो म्युलर खूप नाटक करतो. ऑस्कर द्यायला पाहिजे त्याला
27 Jun 2014 - 4:45 am | निनाद मुक्काम प...
अगदी चपखल विश्लेषण
ह्यामागील कारण माझ्यामते असे असावे की
मागच्या दोन स्पर्धांच्या मध्ये सुरवातीला आमची गरुडभरारी
दणक्यात व जोशात असायची मात्र महत्वाच्या सामन्यात समोरून अवचित आक्रमण झाले कि जोशात होश हरून पराभव मिळायचा म्हणून अब कि बार जर्मन सरकार अशी घोषणा देऊन ताक फुंकून फुंकून पीत आहोत ,मोदी ह्यांनी प्रचार सभांच्या मध्ये जसे जाणीव पूर्वक आक्रमक हिंदुत्व कटाक्षाने टाळले तसे आम्ही कटाक्षाने आक्रमण करणे सुरवातीपासून टाळत आहोत.
आक्रमण करण्यापेक्षा बचाव करत अचानक मुसंडी मारायची मग वेळ काढायचा असे धोरण दिसत आहे ,
सध्या तरी आम्हाला डोईजड होईल असा संघ दृष्टीक्षेपात नाही आहे
23 Jun 2014 - 9:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ब्राझील आणि क्यामेरुन या लढतीत ब्राझीलने ड्रॉवर भर दिला तरी पुष्कळ आहे, पराभव झाला तर लटकून जावू असे वाटते. आमचा ब्राझीलचा झेंडा असल्यामुळे नेयमार गोल करेल असे वाटते.
-दिलीप बिरुटे
23 Jun 2014 - 10:01 pm | प्रचेतस
स्पेन विरुद्ध कांगारूंचा सामना लै जोरदार चाललाय. आज स्पेननं टोरेस आणि व्हिला हे दोन स्ट्रायकर उतरवलेत. त्यांचे तूफानी आक्रमण चालू आहे. अजून तरी गोल नाही पण झाला तरी हे स्पेनचं वरातीमागून घोडं असेल.
आणि हो, हां सामना सोनी पिक्सवर चालू आहे. सिक्सवर डच विरुद्ध चिली.
23 Jun 2014 - 10:08 pm | प्रचेतस
आणि इनिएस्टाच्या अप्रतिम पासवर डेविड व्हिलाचा सुरेख गोल.
24 Jun 2014 - 9:55 pm | प्रचेतस
उरूग्वे इटली हा महत्वाचा सामना सुरु.
सामन्यातला विजेता बाद फेरीत पोहोचणार. इटलीला बरोबरी तर उरुग्वेला विजय आवश्यकच.
दूसरा सामना कोस्टारिका विरुद्ध इंग्लंड म्हणजे डेड रबर.
24 Jun 2014 - 11:50 pm | असंका
इटली बाहेर....
:-(
25 Jun 2014 - 11:29 am | रघुनाथ.केरकर
सुआरेझ चावला..... आता त्याच्यावर बन्दी टाकणार का?
मागल्या वल्ड कप ला पण बॉल हयांडल केला होता घाना च्या वीरुद्ध
25 Jun 2014 - 4:39 pm | असंका
आणि यडा स्वतःच मैदानात दात धरून बसला होता झायरात करत...
26 Jun 2014 - 9:20 am | कंजूस
तोंडाला जाळी लावणार ?
26 Jun 2014 - 8:21 pm | प्रचेतस
आज गटसाखळीतले शेवटचे चार सामने. परवापासून बाद फेरी सुरु.
26 Jun 2014 - 9:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
झुंज चालू आहे,बघताय ना ?
26 Jun 2014 - 10:09 pm | प्रचेतस
दोन्ही सामने आलटून पालटून बघतोय.
पुर्तुगेजांनी घानावर एक गोल चढवलाय.
26 Jun 2014 - 10:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला सोनी सिक्सवर एकच म्याच दिसतोय दुसरा म्याच कोणत्या च्यानलवर बघताय ?
26 Jun 2014 - 10:36 pm | प्रचेतस
दूसरी म्याच सोनी पिक्सवर आहे.
26 Jun 2014 - 10:48 pm | प्रचेतस
जर्मनीच्या मुल्लरने उसगावावर एक गोल मारलाच.
मुल्लरचे आता मेस्सीसह ४ गोल.
26 Jun 2014 - 11:13 pm | प्रचेतस
क्रिस्टियानो रोनाल्डोने शेवटी एकदाचाएक गोल मारला ब्वा.
पुर्तुगेज - घाना २-१
जर्मनी - उस १-०
27 Jun 2014 - 4:55 am | निनाद मुक्काम प...
आता मस्त किस्सा झाला
मला भुयारी रेल्वे मध्ये हवेत तरंगणाऱ्या काही जर्मन यक्ष व याक्षिनींचा थवा दिसला ,
आपल्या देशाच्या नावे जयजयकार करत असतांना त्यांच्या डब्यात मी एकटाच मिपा वाचत बसलो होतो
तेव्हा एका यक्षाने मजला ,तू का नाही आनंद साजरा करत आहेस , तू कोणत्या देशाचा आहे असे विचारले , साहेब फुल फॉर्मात होते , त्याच्या खेळीमेळीच्या प्रश्नावर मी गंभीरपणे उत्तर दिले ,
मी अफगाणी आहे आणि अमेरिका हरल्याचा आनंद तुमच्या इतका मला सुद्धा झाला आहे , आम्ही नि तुम्ही त्यांना हरवले आहेत फक्त मैदाने वेगवेगळी आहेत ,
यक्षाचे इमान धाडकन खाली आले नि बिचारा गोरामोरा झाला.
27 Jun 2014 - 7:34 am | यशोधरा
नशीब की तरंगिणी अवस्थेत त्याने काही हातापायी केली नाही - पर्टिक्युलरली तुम्ही अफगाणी म्हटल्यावर.
27 Jun 2014 - 4:17 pm | निनाद मुक्काम प...
आमच्या शहरात अश्या महत्त्वाचा दिवशी पोलिसांचे जथ्थे मोक्याच्या जागी तैनात असतात विडीयो केमेरे सर्वत्र कार्यरत असतात त्यामुळे हजारोंच्या संख्यने पुरुष महिला . युवक ,युवती व कुमार कुमारी रस्यावर आंनद साजरा करत असतांना सुद्धा बेशिस्त वर्तन होत नाहीत ,
त्यात तालिबान , अलकायदा ह्यांच्या संबंधी येथील जनतेला चीड येण्यापेक्ष्या भीती जास्त वाटते ,
माझ्याशी संवाद साधलेल्या अनेकांनी त्यांना जर्मन सैन्य अफगाण मध्ये काय करत आहे ह्याची कल्पना असल्याचे सांगून त्यांना तेथे राहण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले आहे कारण ह्यामुळे अफगाण निर्वासित त्यांच्या देशात येतात फुकट सारे सुख सुविधा जर्मन सरकार कडून मिळवून परत येथील समाज व्यवस्थेला नावे ठेवतात , म्हणूनच ह्यांच्याशी संबंध नको अशी बहुसंख्य लोकांची धारणा आहे ,
माझ्याशी हातापायी करण्याची शक्यता मा कमी वाटली कारण माझ्या कडील बेगेत नक्की काय आहे ह्याची त्याला खात्री नव्हती
एखादे शस्त्र , किंवा अजून काही
सगळ्यात महत्त्वाचे मी थंड नजरेने त्याच्या डोळ्यात डोळे घालून हे वाक्य बोललो ,
माझी शरीरयष्टी किरकोळ असली तरी जिव्हा चांगलीच कडक आहे , तेव्हा अनेकदा बोल बच्चन वर काम निभावून जाते.
आणि मुळात २० एक वर्षाचा मुलगा , सोनेरी केसाची मधाळ चेहऱ्याची मैत्रीण बाजूला ह्याच्या कवेत असतांना ह्याला माझ्याशी संवाद साधण्याची दुर्बुद्धी कशी झाली ह्याचे मला नवल वजा राग आला.
अपने काम से काम रखो भाई
27 Jun 2014 - 9:48 am | कंजूस
शेवटी पोतृगालचा एकखांबी तंबू आला खाली
बैंडमास्तर चालले घरी .
रोना रोना ना रोनाल्डो .
अर्जेँटिना
मेस्सीने चौघांच्या डोक्यावरून उडवलेल्या अफलातून चेंडूने चकवले . फाडू गोल .
इकडे हॉटेलात नवीन डिश
"मेस्सी मेस्सी "आली आहे .
आपले कुवेतमधले शेफ वल्ड कपसाठी काय आंब्याची करामत करतात ते बघू .