Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 06/12/2014 - 22:02
नमस्कार मंडळी. दोनहजार दहामधे मिपावर विश्वचषकाचा थरार आपण सर्वांनी अनुभवला होता. फुटबॉल हाच धर्म देव समजणा-या ब्राझीलमधे फुटबॉलच्या विश्वचषकला सुरुवात होत आहे.
ब्राझील आणि क्रोएशिया यांच्यात सलामीचा सामना आज भाप्रवे रात्री १:३० ला रंगणार आहे. एकुण आठ गृप मधे बत्तीस संघ एकमेकांशी भिडणार आहेत. फिफाच्या अधिकृत संकेतस्थळावर सामन्यांचे वेळापत्रक आणि फुटबॉल संघ, खेळाडुंची माहिती, आणि असे बरेच उपलब्ध आहे. आपण मिपा रसिक फुटबॉलच्या विविध घटना, खेळाडु, संभाव्य विजेते, रंगतदार होणारे सामने. आत बाहेरच्या संघाच्या गोष्टी, संघांचे डावपेच आणि आपल्या आवडतील त्या गोष्टींचे आदानप्रदान या धाग्यावर करु. आजच्या सामन्यात सरळ सरळ ब्राझील जिंकेल असे वाटते. ज्युलियो सेसर हा ब्राझीलचा गोलकिपर ज्याच्यामुळे ब्राझील उपांत्यफेरीत पराभूत झाले तो याहीवेळीही गोलकिपर आहेच. ब्राझीलचा स्ट्रायकर नेयमार, हुल्क, फ्रेड यांच्यावर ब्राझीलची खरी भिस्त आहे. सामना किती रंगतदार होतो ते आज पहिल्या सामन्यात पाहुच. मिपाकरांनी फुटबॉलच्या संदर्भात जालावर असलेले किंवा कोणी मिपाकर थेट सामने पाहणारे असतील तर सामन्यांचे, रसिकांचे लक्षणीय फोटो इथे टाकावेत. आणि आपण जमेल तसे सामन्यांचा आनंद घेऊ या. तेव्हा आजचा पहिला सामना आपण बघायला विसरायचं नाही. मी तरी पहिला सामन्याचा आज आनंद घेणार आहे. आपणही आपापल्या संघाचे झेंडे घेऊन तयार व्हावे, आम्ही ब्राझीलचा झेंडा हाती घेतलाय, आपण कोणत्या संघाचा झेंडा हाती घेतलाय, घेणार आहात तेव्हा देखेंगे आगे आगे होता है क्या....!
  • Log in or register to post comments
  • 42914 views

प्रतिक्रिया

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 06/12/2014 - 22:22

Permalink

आमचा पाठींबा जर्मनीला. क्लोज,

आमचा पाठींबा जर्मनीला. क्लोज, ओझील, पोडोल्स्की असे एकापेक्षा एक सरस खेळाडू. आक्रमक्र खेळामुळे जर्मनीचे सामने पाहणे अजिबात कंटाळवाणे होत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Sat, 06/14/2014 - 04:37

In reply to आमचा पाठींबा जर्मनीला. क्लोज, by प्रचेतस

Permalink

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 06/12/2014 - 22:23

Permalink

शुभेच्छा!

आपली टीम काही तिकडे पोचत नाही. इतरांच्या खेळाचाच आनंद घेऊया! माझ्या मुलाचे अजून ३ पेपर्स शिल्लक आहेत. एक उद्या आहे आणि तो रात्री मॅचेस बघणार आहे. तेव्हा मी पण लाथा मारायचा खेळ बघेन म्हणते!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 06/12/2014 - 22:26

Permalink

ब्राझील मध्ये सामने असल्याने

ब्राझील मध्ये सामने असल्याने लै गोची झालीय. बरेचसे सामने आता अवेळी जागरण करुन पाहावे लागणार. :(
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on गुरुवार, 06/12/2014 - 22:58

Permalink

मी ब्राझिलचा झेन्डा घेतलाय !

मी ब्राझिलचा झेन्डा घेतलाय !
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 06/12/2014 - 23:17

Permalink

फूटबॉल साठी...

आमचा पाठिंबा जर्मनीला.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 06/12/2014 - 23:22

Permalink

कॉलेज

कॉलेज ला बुट्टी?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 06/13/2014 - 10:14

In reply to कॉलेज by विनायक प्रभू

Permalink

सर नो बुट्टी

सर प्रवेश प्रक्रिया चालु आहे, आमच्या प्रवेश समितीचे कामकाज बारा ते पाच आहे. सर्व वर्गास (कला वाणिज्य व विज्ञान) 11 वी ते पदवी पर्यन्त प्रवेश देणे चालू आहे. तज्ञ प्राध्यापक, भव्य इमारत, भव्य ग्रंथालय...भव्य.. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on गुरुवार, 06/12/2014 - 23:53

Permalink

कोणाकडे ऑनलाइन बघण्यासाठी

कोणाकडे ऑनलाइन बघण्यासाठी लिंक आहे का ?
  • Log in or register to post comments

Submitted by मंदार कात्रे on Fri, 06/13/2014 - 08:36

In reply to कोणाकडे ऑनलाइन बघण्यासाठी by खटपट्या

Permalink

चकटफू

http://www.en.beinsports.net/connect
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 06/13/2014 - 01:34

Permalink

चला मंडली

सामना सुरु होतोय. स्टेडियम गच्च भरलय !
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 06/13/2014 - 01:47

Permalink

क्रोएशियान चांगलं आक्रमन

क्रोएशियान चांगलं आक्रमन केलंय आणि अकराव्या मिनिटाला पहिला गोलही केला अतिशय सुरेख असा खेळ क्रोएशिया करतंय. आमचं ब्राझिल चाचपड़तय सालं.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 06/13/2014 - 08:39

In reply to क्रोएशियान चांगलं आक्रमन by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

माताय, स्पर्धेतला पहिलाच गोल

माताय, स्पर्धेतला पहिलाच गोल स्वयंंगोल झाला ब्राझीलच्या मार्सेलोकडून.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 06/13/2014 - 10:09

In reply to माताय, स्पर्धेतला पहिलाच गोल by प्रचेतस

Permalink

हो ना राव...

या मार्सोलोला काल झोप आली नसती जर पुढचे दोन गोल झाले नसते तर..काल ब्राझीलच्या खेळाडूना उपान्त्य फेरीच्या पराभवाची आठवण झाली असेल. बाकी या मार्सलोला बघितल्यावर सत्यसाईंबाबाची आठवण झाली. चेहरापट्टी सेम आहे :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 06/13/2014 - 10:18

In reply to हो ना राव... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

अगदी अगदी.

अगदी अगदी. :)
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Fri, 06/13/2014 - 02:01

Permalink

ब्रझिल ने मारला !!!

ब्रझिल ने मारला !!! ब्रझिल ब्राझिल
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 06/13/2014 - 02:03

Permalink

येस्स

नेयमारने पहिला गोल 29 व्या मिनिटाला वतीने नोंदवला... सुरेख.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 06/13/2014 - 02:55

Permalink

सेकंड हाफ

सेकंड हाफची 20 मिनिटे संपलीत क्रोएशियाच्या उत्तम बचावापुढे ब्राझीलचे मार्कोलो,फ्रेड आणि नेयमार हुल्क ढीले पडले आहेत...ब्राझीलला जिंकायचे असेल तर आक्रमण करावेच लागेल नस्ता क्रोएशिया गोल नोंदवून कधी पुढे जाईल हे ब्राझीलला कळणारही नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 06/13/2014 - 03:01

Permalink

खेळाच्या ६८ व्या पेनल्टी किक

खेळाच्या ६८ व्या मिनिटाला फ्री किक मिळाली नेयमार ने दुसरा गोल नोंदवला 2-1 शाब्बास लेकहो. :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 06/13/2014 - 03:26

Permalink

ब्राझील जिंकले पण मनं जिंकली

ब्राझील जिंकले पण मनं जिंकली ती क्रोएशियानं. शेवटच्या काही सेकंदात क्रोएशियाला संधी मिळाली होती ती गेली आणि शेवटच्या त्या काही सेकंदात ब्राझिलच्या ओस्करने तीसरा गोल नोंदवला. शेवटच्या वाढीव् मिनिटातला खेळ संपला. शुभ प्रभात :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 06/13/2014 - 04:53

Permalink

हुर्रे....ब्राझिल जिंकले तर..

हुर्रे....ब्राझिल जिंकले तर......:)
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 06/13/2014 - 10:21

Permalink

अर्जेंटिना.... माझी पसंती

अर्जेंटिना.... माझी पसंती :)
  • Log in or register to post comments

Submitted by आयुर्हित on Fri, 06/13/2014 - 10:31

In reply to अर्जेंटिना.... माझी पसंती by टवाळ कार्टा

Permalink

+१

सह्मत
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Fri, 06/13/2014 - 15:22

Permalink

अर्जेंटिना

डोक्याला वाटतंय की स्पेन चं पारडं जड आहे... पण मनाने अर्जेंटिना ला सपोर्ट आहे. मेसी, अग्वेरो, तेवेज, यांचे चमत्कार बघायची इच्छा आहे... ब्राझील ला होम क्राउड चं अ‍ॅड्व्हान्टेज वगैरे असलं तरी शक्यता कमी वाटतेय का कोणास ठाउक. पोर्तुगाल मात्र सरप्राईझ ठरू शकते. काल मॅच बघितली नाही. झोपलो. आज स्पेन ची बघेन.
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Fri, 06/13/2014 - 15:24

In reply to अर्जेंटिना by वेल्लाभट

Permalink

तेवेझ नाहिये मित्रा

तेवेझ नाहिये मित्रा स्क्वाडमध्ये.
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Fri, 06/13/2014 - 15:25

In reply to अर्जेंटिना by वेल्लाभट

Permalink

तेवेज नाहीये... पण हिग्वेन,

तेवेज नाहीये... पण हिग्वेन, गागो, रोमेरो आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by अँग्री बर्ड on Fri, 06/13/2014 - 17:44

Permalink

जर्मनी

जर्मनी जर्मनी फक्त जर्मनीच. :)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Fri, 06/13/2014 - 20:13

Permalink

ब्राझील व जर्मनी यांच्यात

ब्राझील व जर्मनी यांच्यात अंतिम सामना व्हावा अशी इच्छा आहे. नेदरलँड्स विजेते ठरले तरी आवडेल. कॅमेरूनने १९९० चा चमत्कार पुन्हा एकदा दाखवावा अशी मनोमन इच्छा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by लॉरी टांगटूंगकर on Fri, 06/13/2014 - 21:49

In reply to ब्राझील व जर्मनी यांच्यात by श्रीगुरुजी

Permalink

:ड प्रतिसाद वाचून दोनदा डोळे

:) :ड प्रतिसाद वाचून दोनदा डोळे चोळावे लागले. नंतर नेमकं काय म्हणायचं आहे ते लक्षात आलं.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 06/13/2014 - 21:38

Permalink

चला दोस्त हो !!!

मेक्सिको आणि केमेरून यांच्यात सामना सुरु आहे, खेळाची पाच मिनिटे झाली आहेत, मेक्सिको आक्रमण करतोय पण गोल मधे रूपान्तर करणे दोघांनाही अजुन जमले नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 06/13/2014 - 22:12

In reply to चला दोस्त हो !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

पूर्वार्धाची ४० मिनिटं.अजूनही

पूर्वार्धाची ४० मिनिटं.अजूनही एकही गोल नाही. भर पावसातही खेळ चालू आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 06/13/2014 - 22:21

In reply to पूर्वार्धाची ४० मिनिटं.अजूनही by प्रचेतस

Permalink

मजाय पण.

पूर्वार्धातला खेळ संपलाय. गोल करण्याची संधी मेक्सिकोलाच जास्त मिळाली पण गोल होऊ शकला नाही. सामना म्हणावं तसा अजूनही रंगेना. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 06/13/2014 - 22:34

In reply to मजाय पण. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

मेक्सिकन कोच लैच वैतागला होता

मेक्सिकन कोच लैच वैतागला होता. रेफरीशी पण वाद घातला मेल्यानं.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 06/13/2014 - 22:57

In reply to मेक्सिकन कोच लैच वैतागला होता by प्रचेतस

Permalink

अखेर

मेक्सिकोच्या पेरोल्टाने केला बा गोल. १-० अजूनही गोल झाला तर मेक्सिकोच करेल असे वाटते. क्यामेरुन मधे काय दम दिसेना. अर्थात खेळ उत्तम करेल तो जिंकेल म्हणा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 06/13/2014 - 22:42

Permalink

०-०

०-०. हे असले बारके देश पण फायनल्समधे खेळतात आणि आमच्या लोकांना जमत नाय? शरम वाटण्यासारखी गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 06/13/2014 - 23:19

In reply to ०-० by पैसा

Permalink

थांबा थोडे दिवस...

लवकरच एफ. पी. एल. आपले ते "फूटबॉल प्रीमीयर लीग" चालू होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 06/13/2014 - 22:54

Permalink

मेक्सिकोच्या पेराल्टाने पहिला

मेक्सिकोच्या पेराल्टाने पहिला गोल चढविला
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 06/13/2014 - 23:28

Permalink

मेक्सिको 1-0

मेक्सिको चांगले खेळले आणि जिंकले :) शुरा :)
  • Log in or register to post comments

Submitted by कुसुमावती on Sat, 06/14/2014 - 01:03

Permalink

स्पेन विरुद्ध हॉलंड १-०

स्पेनचा पहिला गोल.
  • Log in or register to post comments

Submitted by कुसुमावती on Sat, 06/14/2014 - 01:30

Permalink

स्पेन विरुद्ध हॉलंड १-१

हॉलंडकडुन सुरेख गोल.
  • Log in or register to post comments

Submitted by कुसुमावती on Sat, 06/14/2014 - 02:07

Permalink

स्पेन विरुद्ध होलंड १-५

हॉलंडकडुन एकापाठोपाठ ४ गोल. मस्त खेळ्त आहे हॉलंड
  • Log in or register to post comments

Submitted by कुसुमावती on Sat, 06/14/2014 - 02:27

Permalink

हॉलंड जिंकले

हॉलंड मस्ताड खेळले आणि जिंकले. *yahoo*
  • Log in or register to post comments

Submitted by भृशुंडी on Sat, 06/14/2014 - 03:05

Permalink

वॅन पर्सीच हेडर खतरनाक.

वॅन पर्सीच हेडर खतरनाक. आणि रॉबेनचा गोल तर निव्वळ भिश्क्याव.... ४था गोल कॅसियासने फुकटचा दान केला. पण एकंदरीत flying Dutchmen! *biggrin* स्पेन २०१० मध्ये पण पहिला गेम हरलेले- पण इतका भीषण नाही!
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on Sat, 06/14/2014 - 13:38

In reply to वॅन पर्सीच हेडर खतरनाक. by भृशुंडी

Permalink

वॅन पर्सीच हेडर खतरनाक.

वॅन पर्सीच हेडर खतरनाक.
+१११ स्पेनचा गोलकिपर सुद्धा आ वासुन फक्त बॉलकडे बघतच राहीला. पण एकंदरीत कालचा स्पेन वि. नेदरलँड(हॉलंड) चा सामना रोमहर्षक झाला. मज्जा आली.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Sat, 06/14/2014 - 04:42

Permalink

युरोपियन देशाची भिशी

युरोपियन देशाची भिशी लावल्याप्रमाणे आपापसात विश्वविजेते पद वाटून घेतात , ह्यावेळी मला हॉलंड ला संधी असल्याचे वाटते. आम्ही नेहमीच सेमी फायनल पर्यंत येतो , त्यामुळे काय होणार ह्याची आधीच माहिती असल्याने डोक्याला नाही तर घशाला त्राण देत घश्याखाली बियर रिचवली जाते. अंतिम सामन्यात आपण नसल्याने बेफिकारीने सामना पाहण्याची मज काही औरच
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sat, 06/14/2014 - 07:01

Permalink

हेडरचे गोल बंद करायला हवेत

हेडरचे गोल बंद करायला हवेत .कॉर्नरमधून एकाने चेंडू अगदी जाळीपाशी मारायचा आणि डोक्याने दुसऱ्याने आत घुसडायचा की झाला गोल काही मजा नाही . फक्त डोक्याने चेंडू अडवायची परवानगी हवी . दोन प्रतिस्पर्धी आणि एक गोलाडव्याला चकवत एखादा खेळाडू चेंडू जाळीत हळूच सोडतो ते फार मजेशिर वाटते .आणखी दोन तीन कसबी प्रकारही खेळाची मजा वाढवतात .रेकॉर्डीँग केलेला खेळही बघायला मजा येते .कधीकधी एवढे गूंग होतो की समोर ठेवलेला गरम चहा गारढोण होतो . बॉल सतत दुसऱ्याकडे तटवायचा योग्य वेळ येईपर्यँत चे मर्म जाणणारे तीन चार खेळाडूच(मेसि वगैरे) जिंकून देतात .मीच गोल करीन या विचाराचे असले की पराभव निश्चित .अशांनी टेनिस खेळावे मध्यभागी आडवी जाळी लावलेल्या 'कोर्टात'.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 06/14/2014 - 15:28

In reply to हेडरचे गोल बंद करायला हवेत by कंजूस

Permalink

गोलाडवा.

गोलाडवा शब्द आवडला. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर on Sat, 06/14/2014 - 10:01

Permalink

इंग्लंड वि. इटली

इंग्लंड वि. इटली सामना पहायचा आहे. बघू योग येतो का? लॅटीन अमेरिका आणि युरोप व्यतिरिक्त एकतरी संघ फायनल मध्ये असावा असं वाटतं. (जपान कडे डोळे लावून आहे).
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on Sat, 06/14/2014 - 13:46

Permalink

आजचे सामने:

आजचे सामने: कोलंबिया वि. ग्रिस उरुग्वे वि. कोस्टा रिका इंग्लंड वि. इटली कोत द'ईवोआर(आयव्हरी कोस्ट) वि. जपान
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 06/14/2014 - 21:31

Permalink

मंडळी झालात का तयार. :)

कोलंबिया वि. ग्रीस सामना सुरु होतोय. काय अंदाज नै कोण जिंकेल. पाहात राहु. उत्तम चाली, उत्तम पासेस, असं काहीसं दिसावं. -दिलीप बिरुटॅ
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com