सुमारे सहा हजार वर्षापुर्वि एक मत भारतात उदयास आले होते..ज्याचे नाव "
तांत्रिक मत"
ह्या मताचा उदय बंगाल मधे झाला व त्याचा विस्तार बर्मा.तिबेट चिन पर्यंत होत गेला..
पुढे या विचाराचे अनेक ग्रुप्स झाली..व मतमतांतरे वाढत गेली
समाज सुधारकानी पण या तान्त्रिंक मतावर तुफान हल्ले चढवले व आज हे मत.. साधना कालाच्या उदरात लुप्त पावले.
तांत्रिक मत" मानणा~या व अभ्यासणा~या लोकानी एका मोठ्या महा विद्यालयाची स्थापना मध्य प्रदेशातिल मुरेना या गावि स्थापना केली होति..
पण आज ते महाविद्यालय भग्नावस्थेत उभे आहे..
हे विशाल महाविद्यालय एका डोंगरावर वसलेले असुन त्याला "६४ योगीनी मंदीर" असेहि नाव आहे..
महाविद्यालय गोलाकार असुन १७० मिटर त्रीज्या असलेले आहे व त्याला ६४ खोल्या आहेत
महा विद्यालय गोलाकार असुन मध्यभागी विश्वाचा महान तांत्रीक भगवान शंकराची मुर्ति आहे..
असे म्हटले जाते कि आज संसदेची जी इमारत आहे ति या विद्यालयाची कॉपी आहे
तांत्रिक व तंत्र विद्येस समाजात मान्यता नव्हति..मकार साधना..शव साधना ..नरबळी..मैथुन असे प्रकार असल्याने सभ्य समाज त्या पासुन दुर होता.
जस जसा समाज सभ्य बनु लागला तस तसा ह्या प्रकावर प्रखर टिका होवु लागली व ब्रिटिश आल्यावर ह्या साधनावर बंदी पण आली कारण त्यात बळी आदी अघोरी प्रकार होते..
आज हि विद्या शेवटचे श्वास घेत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाहि..
प्रतिक्रिया
20 Jun 2014 - 9:50 pm | कानडाऊ योगेशु
ब्रिटीश व त्याआधी मोगल येण्याआधी भारतात तंत्रसाधनेला मानणारा व करणारा मोठा वर्ग असावा.पण काळाच्या ओघात व वेगवेग्ळ्या संस्कृत्यांचे आक्रमण झाल्याने तो लोप पावला असावा. बाकी लेखात उल्लेख केलेल्या त्या गोलाकार इमारतीचा फोटो मि.पा वरच कुणाच्यातरी धाग्यात पाहीला होता.तांत्रिक साधनेसाठी इतक्या मोठ्या व वैशिष्ट्यपूर्ण वास्तुची निर्मिती ज्याकाळात झाली त्याकाळात तरी ह्या विद्येला समाजमान्यता असु शकावी असे वाटते.तो इतिहास जाणुन घेणे खरेच रोचक ठरावे.
त.टी :- अमिश त्रिपाठी च्या शिवाट्रायलोजीला पण अश्याच ऐकिव/वाचीव किश्श्यांचा आधार आहे.
20 Jun 2014 - 10:00 pm | अविनाशकुलकर्णी
फोटो चढवण्यास जमत नाहि..क्षमस्व
21 Jun 2014 - 8:03 am | रमेश आठवले
मलाही फोटो चढवता येत नाही. पण मला http://www.misalpav.com/node/26033
या धाग्यात याच मंदिराचे बरेच फोटो अमेय यांनी दिले असल्याचे लक्षात आले.
20 Jun 2014 - 10:10 pm | प्रचेतस
सहा हजार वर्षांपूर्वी बंगालात कुठली संस्कृती होती ओ?
20 Jun 2014 - 11:52 pm | लॉरी टांगटूंगकर
इन्का आणि माया असाव्यात. बंगल्यांच्या महाभयानक भाषेतून आणि अतिसुंदर मिठायातून हे सांस्कृतिक धागे मागे कुठे जातात याचा अभ्यास करायला हवा.
सातवाहन नसावेत ते असते तर तुला माहिती असले असते.
21 Jun 2014 - 6:51 am | धन्या
उत्तराची :D
21 Jun 2014 - 8:44 am | धन्या
अकुकाका, तांत्रिक मत आणि नाथ संप्रदायाचा खुप जवळचा संबंध आहे हे तुम्हाला माहिती असेलच. त्यावरही थोडा प्रकाश टाका. (किंवा जिथून कुठून या ओळी कॉपी केल्यात तिथे काही लिहिलं आहे का ते पाहा. ;) )
21 Jun 2014 - 9:05 am | अविनाशकुलकर्णी
21 Jun 2014 - 9:09 am | अविनाशकुलकर्णी
23 Jun 2014 - 5:24 pm | बॅटमॅन
हे एम्पीमधील पडावली इथले ६४ योगिनी मंदिर आहे भौतेक.
21 Jun 2014 - 10:12 am | चित्रगुप्त
ओशोंनी या विषयावर बरेच काही सांगितले आहे, जाणकारांनी त्याबद्दल माहिती द्यावी, अशी विनंती करतो.
21 Jun 2014 - 10:55 am | संजय क्षीरसागर
ओशोंचं The Book of Secrets हा त्या साधनांच्या जतनीकरणाचा एक स्तुत्य प्रयत्न आहे. ओशोंचं कौतुक म्हणजे त्यांनी सर्व साधना प्रणालीतल्या गलिच्छ भागाला (जो साधकांच्या अज्ञानामुळे नंतरच्या काळात निर्माण झाला) फाटा देत नेमकं प्रयोजन प्रस्तुत केलंय.
शिवानं सखी पार्वतीला सूत्ररुपानं सांगितलेली सत्यप्राप्तीची गुह्य असं त्या प्रणालींचं स्वरुप आहे. सिद्ध पती आणि सत्योन्मुख पत्नीतला तो हृद्य संवाद आहे. महावीरानं साक्षात्काराला The ultimate unfoldment of Self म्हटलंय (Osho on Mahavir). तर अशी स्वतःला सर्वतोपरी अन्फोल्ड करायला तयार असलेली सखी आणि तिच्याशी अनिर्बंध संवाद साधू शकणारा शिवासारखा सिद्ध यांनी तंत्रसाधनेची सर्वांग खुली केलीयेत. संकेतस्थळाचं धोरणं लक्षात घेता त्यावर इथे चर्चा करता येणार नाही.
21 Jun 2014 - 10:28 pm | राजेश घासकडवी
१३० मीटर त्रिज्या? म्हणजे पाव किलोमीटरहून अधिक व्यास... तुमच्या फोटोतून तो तेवढा वाटत नाहीये हो. तुम्हाला १३० फूट व्यास म्हणायचं आहे का? कारण व्यासाला त्रिज्या म्हटलं, आणि फुटांचे मीटर केले की क्षेत्रफळ दाणकन ४० पटीने वाढतं.
23 Jun 2014 - 4:38 pm | म्हैस
आधी मला वाटलं होतं तांत्रिक म्हणजे technical काहीतरी असेल .
आजही ३/४ th बंगाल , मध्यप्रदेश , कोंकण , आसाम ह्या ठिकाणी हि विद्या सर्रास चालते . जिथे जिथे शक्तिपीठे आहेत tithe तर मोठ्या प्रमाणात .तंत्र साधनेत २ प्रकार असतात . त्यापेकी वाममार्ग भोग घेण्यासाठी वापरला जातो. दुष्ट शक्तींना तंत्र मार्गाने वश करून घेवून , त्यांच्याकडून सिधी मिळवून मनसोक्त भोग घेता येतात . पण कर्माचा सिद्धांत इथे पण लागू होतो महाराजा. ह्या लोकांच्या आयुष्याचा उर्वरित काळ कल्पनेपेक्षाही वाईट जातो . आयुष्य संपल्यावरही कित्येक वर्ष त्यांना त्याची शिक्षा भोगावी लागते .
23 Jun 2014 - 5:17 pm | टवाळ कार्टा
याचा उपयोग दाउद, अतिरेकी यांच्या विरोधात वापरता येइल का??
23 Jun 2014 - 6:57 pm | धन्या
पण वापरणार्यांना कर्माचा सिद्धांत सोडणार नाही त्याचं काय?
23 Jun 2014 - 5:31 pm | ऋषिकेश
सहा हजार वर्षे!!
हे कितपत खरे असावे?
23 Jun 2014 - 5:35 pm | बॅटमॅन
त्यात काय झालं?
कशाआधी सहा हजार वर्षे हे सांगितलंय थोडंच ;)
23 Jun 2014 - 5:40 pm | ऋषिकेश
:)
शिरीयेसली:
मोहेंजोदरो हरप्पा आजपासून साडेपाच हजार वर्षांपूर्वी झाले मानले तर तंत्रविद्येसारखी एखादी क्लीष्ट विद्या (तीही संस्कृतात?!" रचणारे लोक भारतीय उपखंडात होते हे कितपत सत्य असु शकेल याची खरोखरच उत्सुकता आहे.
23 Jun 2014 - 5:44 pm | बॅटमॅन
संस्कृतचं काय कौतुक आहे ओ? ते एक सोडाच...
बाकी या किंवा बहुतेक विद्यांचं असं आहे की फॉर्मलायझेशन संस्कृतात नंतर झालं, प्रॅक्टिस या ना त्या रूपात अगोदर होतीच. ते मला ठीक वाटतं.
24 Jun 2014 - 10:13 am | ऋषिकेश
लेट मी गेट इट क्लीअरः
तांत्रिक प्रॅक्टिस इथे मोहंजोदरो काळाच्याही आधी चालु होती हे ठिक वाटकाय? मुळात असं पद्धतशीर तंत्र व/वा प्रॅक्टिस सुरू असायला इथे एखादी "संस्कृती" नको का? का मोहंजोदारोच्या आधीही एखादी सुसंबद्ध संस्कृती होती?
प्रश्न खोचक नाहियेत. हे उत्तर तुमच्याकडून अनपेक्षित होते त्यामुळे जरा भंजाळलोय नी गोंधळलोय
24 Jun 2014 - 11:21 am | बॅटमॅन
तांत्रिक प्रॅक्टिस करण्यासाठी अगदी मोहेंजोदडोच्या लेव्हलची संस्कृती लागते असे मला वाटत नाही. त्यामुळे तो प्रकार काहीएक रूपात अगोदरही चालू असणे मला अतर्क्य वाटत नाही.
मोहेंजोदडोचा काळ इ.स.पू.२०००-२५००, फार तर ओढून ३००० म्हणू. त्याच्या आधीच्या संस्कृतीचे पुरावे कोट दिजी, रहमान ढेरी, मेहेरगढ, इ. ठिकाणी सापडले आहेत. आहर-बनास कल्चर इ.इ. प्रकार हडप्पापूर्वकालीन आहेत. यद्यपि हडप्पा इतके सोफिस्टिकेटेड नसले तरी संस्कृती काहीएक होती इतके तरी नक्कीच कळते. त्यामुळे ते ठीक वाटते.
अन परंपरेने योगमार्गाबद्दलही सांगतात, की योगसूत्रे लिहिणार्या पतंजलीचे मुख्य कार्य हे की व्हॉटेव्हर इज़ गोईंग इन द फील्ड त्याचा त्याने सारांश काढला, एक सैद्धांतिक बैठक दिली. पण तितकीशी काटेकोर नसलेली काहीएक अॅमॉर्फस बैठक त्याच्याही आधी होतीच. फरक इथे डिग्रीचा आहे, गुणात्मक नाही.
त्यामुळे तंत्रमार्ग तेव्हा या ना त्या स्वरूपात अस्तित्वात असणे टेक्निकली अशक्य नाही, यद्यपि त्याचा इतिहास पाहिला पाहिजे. मी फक्त असे असू शकायला आधार आहे इतकेच म्हणतोय. कन्फ्यूजन क्लीअर झाले असेलशी आशा! :)
24 Jun 2014 - 11:43 am | ऋषिकेश
ओके.
आभार. यात नवी माहिती समजली तर नक्की दे.
तुझ्या म्हणण्याचे कन्फ्युजन संपले तरी अजुनही ६००० हा आकडा फार मोठा वाट्टोय. असो.
24 Jun 2014 - 11:20 am | म्हैस
६ हजार वर्ष म्हणजे एवढा आश्चर्य वाटण्यासारखा काय आहे ? प्रत्येक गुगामध्ये माणसाच्या आयुष्यातला १ -१ शुन्य कमी होत गेला. सत्यागुत लाखभर आयुष्यमान , पुढे त्रेता, द्वापार युगात हजार वर्ष आणि आता कलियुगात फक्त १०० वर्ष (ते हि अपवादाने ) माणसं जगात आहेत . त्यामुळे ५-६ हजार वर्ष म्हणलं कि आपल्याला फार मोठा काळ वाटतो . खरा तर हा अगदीच कमी काळ आहे . महाभारत ५ हजार वर्षांपूर्वी घडलं असेल तर मोहेंजोदडो पेक्षा अत्यंत प्रगत अश्या संस्कृती लाखो वर्षांपासून आहेत .
24 Jun 2014 - 11:57 am | आदूबाळ
आयला खरं की काय!
म्हंजे "बेचाळीस पिढ्या" वैगरे कैच्याकै बोल्तात लोकं...
24 Jun 2014 - 1:08 pm | प्रसाद गोडबोले
सुमारे सहा हजार वर्षापुर्वि एक मत भारतात उदयास आले होते..ज्याचे नाव "तांत्रिक मत"
>>> सहा हजार =))
बाकी ह्यालेखावरुन मागे मी एकदा एका तंत्र साधकाच्या साधनेचा व्दिडीयो मिपावर शेयर केला होता ते आठवले ... तो व्हिडीयो लगेच डीलीट झाला होता आणि येथुन पुढे असे व्हिडीयो शेयर करण्यापुर्वी विचार करावा / तारतम्य बाळगावे असा डोस मिळाला होता :(
24 Jun 2014 - 1:39 pm | राजेंद्र मेहेंदळे
म्हणजे ते लोकल मध्ये आणि सकाळ पेपर मध्ये छोट्या जाहीरातींमध्ये असते ते? शंभर टक्के खात्रीशीर...वास्तुदोष,संतान,नोकरीधंदा,बरकत वगैरे???