काही लॅण्डस्केप्स...माझेही

प्रचेतस's picture
प्रचेतस in कलादालन
9 Jun 2014 - 8:49 pm

१. रतनवाडीचा अमृतेश्वर

a

२. सिन्नरचा गोंदेश्वर

a

३. सिन्नरचाच आयेश्वर/ऐश्वर्येश्वर

a

४. अंजनेरीचे भग्न विष्णूमंदिर

a

५. पेडगांवचे मल्लिकार्जुन
a

६. पेडगांवचाच लक्ष्मीनारायण

a

७. पेडगांवचाच बाळेश्वर
a

८. वेरूळचा जानवसा
a

९. पावनखिंडीतून
a

१०. अद्भूतरम्य सांदण दरी
a

११. रोहिड्यावर
a

१२. अंजनेरी नवरा सुळक्याच्या पार्श्वभूमीवर यादवकालीन जैन मंदिर
a

१३. भुलेश्वराच्या पठारावर

a

हे ठिकाण

प्रतिक्रिया

वा: ! सगळेच फोटो मस्त आलेत.

यशोधरा's picture

9 Jun 2014 - 9:09 pm | यशोधरा

भन्नाट! सगळे फोटो मस्त!

सखी's picture

9 Jun 2014 - 9:12 pm | सखी

सुरेख!

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jun 2014 - 9:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

सगळेच फोटो मस्त आहेत. पेडगांवच्या लक्ष्मीनारायण मंदिराचा आणि रोहिड्याचा फोटो खूप सुंदर आहेत.

सान्दन दरीचा अन सायकल वाल्या पोट्ट्याचा फटु मस्त मस्त :)
सगळेच फोटो खूप सुंदर आहेत.

आयुर्हित's picture

9 Jun 2014 - 9:21 pm | आयुर्हित

सिन्नरचा गोंदेश्वर नं १.
बाकि सगळेच लॅण्डस्केप्स सही आहेत.

पेडगांवचा लक्ष्मीनारायणचे मुर्तीकाम ऊत्कॄष्ट आहे!!!
धन्यवाद.

मस्त फोटो ! रोहिड्याचा तर सहीच!

संजय क्षीरसागर's picture

9 Jun 2014 - 9:33 pm | संजय क्षीरसागर

भारी आलेयंत!

तुमचा अभिषेक's picture

9 Jun 2014 - 9:36 pm | तुमचा अभिषेक

छान आहेत फोटो, सांदणदरीवर नुकतेच एक लेख वाचला होता, खरेच अदभुतरम्य आहे ती.

राजेंद्र मेहेंदळे's picture

10 Jun 2014 - 2:21 pm | राजेंद्र मेहेंदळे

कुठे मिळेल?

शैलेन्द्र's picture

11 Jun 2014 - 11:06 pm | शैलेन्द्र

काय माहीती हवीयं?

प्रचेतस's picture

12 Jun 2014 - 8:27 am | प्रचेतस

सांदणदरीवर मी पूर्वी येथेच लिहिले होते.

सांदण दरी-एक निसर्गनवल

तर ५० फक्त ने आमची भटकंती येथे शब्दबद्ध केली होती.

सांदण दरी - एक प्रवास वेगळाच.

तुमचा अभिषेक's picture

14 Jun 2014 - 12:58 am | तुमचा अभिषेक

या लिंकही चाळून घेतो, दिल्याबद्दल धन्यवाद.

वर मी उल्लेखलेले मायबोली वर वाचलेले,
त्याची लिंक हि
http://www.maayboli.com/node/49145

प्यारे१'s picture

9 Jun 2014 - 9:57 pm | प्यारे१

अप्रतिम!

पिवळा डांबिस's picture

9 Jun 2014 - 10:00 pm | पिवळा डांबिस

महाराष्ट्रात अजुन किती काय काय बघायचं राहिलंय, असा विचार मनात आला...

शेवटचा फोटो सोडून सगळे आवडले!
मला व्यक्तिशः लॅन्डस्केप्समध्ये फोरग्राउंडला माणसं आलेली आवडत नाहीत. बॅकग्राऊंडला असली तर ठीक...
पण तो एक पर्सनल प्रेफरन्स...

अनुप ढेरे's picture

9 Jun 2014 - 10:17 pm | अनुप ढेरे

६ नंबरचं मंदिर फोटोतच कसलं भारी दिस्तय! प्रतेक्ष बघितलचं पाहिजे.

सुहास झेले's picture

9 Jun 2014 - 10:26 pm | सुहास झेले

वल्ली रॉक्स :)

हुकुमीएक्का's picture

9 Jun 2014 - 10:41 pm | हुकुमीएक्का

सिन्नरचा गोंदेश्वर, पेडगांवचा लक्ष्मीनारायण, वेरूळचा जानवसा, पावनखिंडीतील सुर्यास्त, रोहिड्यावरील फोटो, हे सर्व फोटो तर अप्रतिम आलेत. बाकीचे देखील सुरेख पण वरील सर्व फोटोज सर्वात बेस्ट होते एव्हडं नक्की.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Jun 2014 - 10:41 pm | अत्रुप्त आत्मा

सर्व फोटू http://www.sherv.net/cm/emoticons/yes/ok-sign-smiley-emoticon.gif
http://www.sherv.net/cm/emoticons/hobbies/camera-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/hands-clapping-applause-smiley-emoticon.gif
============================
अंजनेरीचे भग्न विष्णूमंदिर>>> फोटो अतिशय अंगावर आला http://www.sherv.net/cm/emo/sad/sad.gif

कवितानागेश's picture

9 Jun 2014 - 10:53 pm | कवितानागेश

मस्त आलेत फोटो.

जोशी 'ले''s picture

9 Jun 2014 - 10:59 pm | जोशी 'ले'

खुपच सुंदर..अप्रतिम

खटपट्या's picture

10 Jun 2014 - 5:30 am | खटपट्या

सर्व फोटो अप्रतिम !!!

आतिवास's picture

10 Jun 2014 - 8:46 am | आतिवास

सुंदर - नेहमीप्रमाणेच!

नाखु's picture

10 Jun 2014 - 9:04 am | नाखु

आम्ही (आळशी) ते देखे वल्ली...
सुरेख आणि कलात्मक..

ना.खु.(वेंधळा कच्चा फटुग्राफर)

स्पा's picture

10 Jun 2014 - 9:19 am | स्पा

अर्थ पुर्ण फटु...
सही रे

सर्व फ्रेम्स जबराट. नुसते चांगल्या क्यामेराने फटु कोणीही काढेल. कम्पोझिशन महत्वाचे असते, ते जमलेय

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jun 2014 - 9:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शेवटचा तर स्पेशल वाटला ! वल्लीशेठ महाराष्ट्रात आता पाहण्यासारखं काही शिल्लक राहिलं काय ? :)

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

10 Jun 2014 - 11:58 am | प्रचेतस

अजून बरंच काही उरलंय महाराष्ट्रात. तुमच्या इथल्याच विद्यापीठामागच्या लेणी, पितळखोरे, अण्व मंदिर, गडचिरोलीचे मार्कंडी मंदिर, पवनार, रामटेकची प्राचीन मंदिरे, धर्मपुरी, पानगांव, झोडगे, आंबेजोगाई इथली यादवकालीन मंदिरं लै लै मोठी लिस्ट आहे अजून. :)

सुहास..'s picture

10 Jun 2014 - 8:48 pm | सुहास..

+ ॑११०१०००

वल्लीबाबू तुम्ही फोटो काढता बारा वाजता .थोडे चार साडेचारपर्यँत थांबून पुन्हा एकेक शॉट घ्यायला पाहिजे .पुरातन इमारतींना थोडी सावली हवी असं मला वाटतं .

प्रचेतस's picture

10 Jun 2014 - 11:59 am | प्रचेतस

ते वेळेचंच गणित जमत नाही ना. बरीचशी ठिकाणं ही आडबाजूला असल्याने गोल्डन अवर्समध्ये पोहोचणे किंवा तितका वेळ थांबणे हे अवघडच जाते.

मुक्त विहारि's picture

10 Jun 2014 - 9:50 am | मुक्त विहारि

पण....

पण....

पण.....

भग्न मंदिरे पाहून काळजाची कालवाकालव होते.

चौकटराजा's picture

10 Jun 2014 - 9:52 am | चौकटराजा

हे सगळेच फोटो चांगले आहेत तरीही वल्लीबुवा तुमच्याकडे आता एच डी आर फॉसिलिटी असलेला क्यामेरा आहे .अंजनेरीचे भग्न देऊळ तसेच सांद्ण दरी ही उदाहरणे पहा. यात एच डी आर मोड ची गरज आहे. केंव्हाही पाषाणांचा फटू काढताना एच डी आर ची गरज तुम्हाला भासेलच. कारण सावलीत येणारा भाग पाषाणचित्रात भरपूर असतो व तो बारकावे लपवितो. एच डी आर वापरल्यास फरक आपल्याला जाणवेलच.

इतरांच्या माहितीसाठी - एच डी आर म्हणजे हाय डायनामिक रेंज .आपण ज्यावेळी फटू काढतो त्यावेळेस आपला सेंसर एक प्रकाशमान भागाला तरी महत्व देतो किंवा सावलीतील भागाला. दोन्ही भागातील तपशीलासह बारकावे दिसणे फार महत्वाचे असते. उदा. शिल्पातील दागिने व झाडाच्या बुंध्यातील रेषा, गाठी ई. हाय डायनामिक रेंज मधे हे दोन्ही तपशील दाखवले जातात. अधिक माहितीसाठी www.cambridgeincolour.com हे अत्यंत भन्नाट माहितीपूर्ण संकेतस्थल् पहा.

प्रचेतस's picture

10 Jun 2014 - 12:01 pm | प्रचेतस

माझ्या क्यामेरात इनबिल्ट एचडीआरची सुविधा नाही ना. सर्वसाधारणपणे निकॉनमध्ये हे फिचर मिळते. मला असले फोटो काढण्यासाठी तिकाटणं आणि ब्रॅकेटींग करावं लागेल.

कंजूस's picture

10 Jun 2014 - 1:30 pm | कंजूस

वल्लीबाबू एरवी तुमच्या लिखाणाला फोटोंची जोड असते .नुसतेच फोटो टाकले की 'उघडे' पडतात आणि आम्ही चित्रांत छाया शोधत बसतो .

प्रचेतस's picture

10 Jun 2014 - 1:44 pm | प्रचेतस

:)

मी घरीच एच डी आर चा वापर करून घरातील व खिडकी बाहेरच्या Details कॅच करण्याचा प्रयत्न केला. फोटो खाली पहावा.

Home

चौकटराजा's picture

14 Jun 2014 - 7:22 am | चौकटराजा

आतल्या प्रमाणेच बाहेरचे तपशील अधिक स्पष्ट यावेत. म्ह्णजे खरा १०० टक्के एच डी आर होईल. पुणे येथे ओंकारेशवर व पाताळेश्वर येथे जाउन एच डी आर मोडचा वापर करून पहाता येईल.

सांदण दरी हा जगातभारी प्रकार आहे. कधी जायला मिळेल काय की.

प्रचेतस's picture

10 Jun 2014 - 12:02 pm | प्रचेतस

जायचे असेल तर आताच, आठवड्याभरातच. एकदा का पाऊस सुरु झाला की मग नोव्हेंबरपर्यंत जाता येणार नाही.

हम्म रैट्ट. २२ जूनपर्यंत एकदा जाऊन येईन म्हंटो.

सुंदर . एवढी सुंदर मंदिरं आपण का जपत नाही ?

सुधीर's picture

10 Jun 2014 - 2:03 pm | सुधीर

केवळ सुरेख!

सूड's picture

10 Jun 2014 - 2:48 pm | सूड

मस्त!!

सावत्या's picture

10 Jun 2014 - 4:45 pm | सावत्या

सायकलवाल्या मुलाचा फोटू मस्तच !!!!
*ok*

लॉरी टांगटूंगकर's picture

10 Jun 2014 - 6:01 pm | लॉरी टांगटूंगकर

प्रचंड सुंदर.

२. सिन्नरचा गोंदेश्वर
४. अंजनेरीचे भग्न विष्णूमंदिर

ह्या दोन्ही प्रतिमा छान आल्या आहेत. दुसर्‍या प्रतिमेत आकाशाच्या निळाईच्या पार्श्वभूमीवर दगडातील शिखरे खूपच उठून दिसताहेत. चौथ्या प्रतिमेत पुरातन मंदिराचा भग्नपणा खूपच प्रभावीपणे अधोरेखित झाला आहे.

यातली लॅण्डस्केप फक्त ९. पावनखिंडीतून आणि १०. अद्भूतरम्य सांदण दरी हीच आहेत. बाकी शेवटचे सोडून सर्व स्थापत्य-छायाचित्रे (आर्किटेक्चरल फोटोग्राफी) आहेत. यात पर्स्पेक्टिवला आणि डिस्टॉर्शनफ्री इमेज येण्याला सर्वात जास्त महत्त्व असते. त्यासाठी डिस्टॉर्शन-फ्री लेन्स - शक्यतो फास्ट वाइड अ‍ॅन्गल उदा. १४ मिमी - वापरावी लागते तसेच पोस्टप्रोसेसिंगमध्ये अशा लेन्सचे प्रोफाइल काढून डिस्टॉर्शन दुरुस्त करावे लागते. उदा. गोंदेश्वराच्या प्रतिमेतील शिखरे वर एका काल्पनिक बिंदूत एकत्र येताहेत असा भास होतो. हा पर्स्पेक्टिवचा परिणाम आहे. पण त्याच बरोबर त्यात बॅरल डिस्टॉर्शनही आहे. पर्स्पेक्टीव प्रतिमासंस्करणात दुरूस्त करता येत नाही. केला तर ते विचित्र दिसते. त्यासाठी खास पर्स्पेक्टिव-कंट्रोल PC-E टिल्टशिफ्ट लेन्स वापरावी लागते. म्हणूनच स्थापत्यछायाचित्रण हे तसे महागड्या प्रकारात मोडते.

वर चौराकाका म्हणताहेत तसे सांदणदरीच्या उभ्या कातळांसाठी एचडीआर छायाचित्रणाने जास्त न्याय देता आला असता. पण हेही छायाचित्र चांगले आहे.

प्रचेतस's picture

10 Jun 2014 - 9:05 pm | प्रचेतस

धन्यवाद स्वॅप्स.
मला वाटत होते की लॅण्डस्केप म्हणजे जमिनीच्या किंवा आकाशाच्या पार्श्वभूमीवर केलेले छायाचित्रण.

स्थापत्य छायाचित्रांबद्दल दिलेल्या टिपांबद्दल धन्यवाद.
बॅरल डिस्टॉर्शन म्हणजे काय?

पर्स्पेक्टिवचे एक भारी उदाहरण म्हणजे गोंदेश्वराचेच हे छायचित्र पहा.

a

एस's picture

10 Jun 2014 - 11:27 pm | एस

विपर्यासभ्रंश हा तीन प्रकारचा असतो.

बॅरल डिस्टॉर्शन

पिनकुशन डिस्टॉर्शन

मुस्टाश् डिस्टॉर्शन

वाइड अ‍ॅन्गल लेन्स जर तिच्या सर्वात वाइड फोकल लेन्ग्थ ला ठेवली तर बॅरल डिस्टॉर्शन म्हणजेच प्रतिमा मध्यभागी फुगीर व कोपर्‍यांत दाबल्यासारखे दिसते. उदा. माझ्या ह्या पेन्सिलशेडिंगचे त्या काळात पॉइंट-अ‍ॅण्ड-शूट ने घेतलेले छायाचित्र.

चौकटीचा आयत सरळच आहे. पण बॅरल डिस्टॉर्शनमुळे मध्यभागी पिंपासारखा फुगीरपणा आलाय.

पिनकुशन डिस्टॉर्शन बॅरल डिस्टॉर्शनच्या उलट असते. यात प्रतिमा कडेला ताणल्यासारख्या आणि बाजूंच्या मध्यभागी आकसलेल्या दिसतात. मुस्टाश् डिस्टॉर्शनमध्ये आकडी मिश्यांसारखे मध्यभागी बॅरल डिस्टॉर्शन तर कडांना पिनकुशन डिस्टॉर्शन एकाच प्रतिमेत एकवटल्यामुळे विपर्यासभ्रंश येतो.

(विपर्यासभ्रंशाच्या प्रतिमा विकीमीडिया कॉमन्सवरून साभार.)

प्रचेतस's picture

12 Jun 2014 - 8:22 am | प्रचेतस

धन्यवाद स्वॅप्स.

सौंदर्यबोध कॅमेऱ्याच्यानजरेतून करून देत असताना झालेल्या चर्चेतून विविध माहितीच्या ओघात वाहुन जायला होत आहे. वल्लींचे धन्यवाद.

प्रशांत's picture

3 Sep 2014 - 11:03 am | प्रशांत

@ वल्ली सगळे फोटो मस्त

@ स्वॅप्स माहितिबद्दल आभार्स..!

सस्नेह's picture

10 Jun 2014 - 11:06 pm | सस्नेह

भग्न मंदिरांच्या आकृतीबंधात एक आर्त काव्य उमटले आहे. ही लँड्स्केप्स नव्हेत, हे तर लँड्मार्क्स.

किसन शिंदे's picture

10 Jun 2014 - 11:26 pm | किसन शिंदे

शेवटचा फोटो सोडून बाकी सगळे अप्रतिम आहेत, विशेषतः रतनवाडीचा अमृतेश्वर आणि सांदनदरीचा!

मदनबाण's picture

12 Jun 2014 - 10:07 am | मदनबाण

सर्वच फोटो झकास !
२ रा विशेष आवडला.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अपर्णा तप करिते काननी :- {चित्रपट :-तांबडी माती}

इन्दुसुता's picture

13 Jun 2014 - 8:46 am | इन्दुसुता

फोटो आवडले.

वल्ली,
सादर प्रणाम स्वीकारावा

धन्या's picture

13 Jun 2014 - 7:27 pm | धन्या

झक्कास प्रकाशचित्रे !!!

पैसा's picture

13 Jun 2014 - 10:38 pm | पैसा

या निमित्ताने स्वॅप्सने पण जाता जाता खूप छान माहिती दिली आहे! मस्त!

एस's picture

14 Jun 2014 - 11:55 pm | एस

धन्यवाद, पैसाताई.

अक्शु's picture

13 Jun 2014 - 11:38 pm | अक्शु

सुंदर आली आहेत सर्व छायाचित्रे.
मला प्राचीन मंदिरांच्या बांधकाम शैली खूप आवडतात.

२४ अथवा २८ एम एम प्राइम रुपये किती आणि PS SHIFT चे हौशींना परवडणारे आहे का ?

एस's picture

15 Jun 2014 - 12:07 am | एस

इथे हे खूपच अवांतर होईल. पण पाचदहा वर्षांपर्यंत एसएलआर/डीएसएलआर हौशी छायाचित्रकारांना परवडत नसे. आता परिस्थिती बरीच बदलली आहे. प्राइम लेन्सेस आणि उच्च दर्जाचे फुलफ्रेम कॅमेरे यांबाबतही मी असाच आशावादी आहे. लोकांची क्रयशक्ती (विशेषतः भारतीयांची) वाढत आहे व तंत्रज्ञानही स्वस्त होत चालले आहे. पाहूयात. दोनतीन डी४एस, एखादा हासेलब्लाड, एक एम९, एक ८००मिमी, एक २००-४००मिमी, दोनेक २००मिमी मायक्रो, एक पीसी-ई, एक-दोन ८५ व १३५ डीसी, तीनचार १२-२४, २४-७०, १४मिमी, चारपाच गिंबल्स व कार्बनफायबर्स, सातआठ सिंगरे वगेैरे फिल्टर सेट्स, फोटोशॉप, डीएक्सओऑप्टिक्स वगैरेंची सबस्क्रिप्शन्स, पाचसहा ड्युअलमॉनिटर मशिन्स, सातआठ असिस्टंट्स, एखादा स्टुडिओ, त्यात पाचसहा स्पीडलाइट ग्रुप्स, एक फुलफ्लेज्ड प्रोसेसिंग लॅब, आणि एखादे हेलिकॉप्टर - हे स्वतःचे नसले तरी चालेल. एखाद्या शूटला चार्टर्ड करता येईल.

- बस इतनासा ख्वाब है! ;-)

चौकटराजा's picture

15 Jun 2014 - 9:43 am | चौकटराजा

या यादीत दोनचार मॉडेल्स का नकोत ....?

एस's picture

16 Jun 2014 - 1:33 am | एस

त्यासाठी मिपासुंदरी स्पर्धा भरवण्याचा विचार आहे. पहिल्या तीन सौंदर्यवतींना फूड प्रॉडक्ट्स, ट्रॅवल प्रमोशन, सरीअल अ‍ॅबस्ट्रॅक्ट्स, कार मॉडेल लॉन्चेस, क्लोदिंग लाईन्स, आणि अजून बर्‍याच प्रकारच्या असाइनमेंट्सवर कामे करण्याची संधी मिळेल. फक्त 'आमचा एवढा ताईमाईअक्काघरचेबाहेरचेशेजारचेबिजारचेमित्रमैत्रिणी-वगैरेंबरोबर एक फोटू काढा ना!' असा लाडिक आग्रह करायचा नाही. नाहीतर करार रद्दबातल... ;-)

बादवे 'जज्ज' व्हायला कोणकोण तयार आहे? :-)

पारस's picture

14 Jun 2014 - 3:24 pm | पारस

मस्त फोटो आहेत

जातवेद's picture

14 Jun 2014 - 8:17 pm | जातवेद

एकापेक्षा एक!

चाणक्य's picture

15 Jun 2014 - 5:04 pm | चाणक्य

पेडगावच्या लक्ष्मीनारायण मंदिराचा, रोहिड्याचा, सांदण दरीचा आणि शेवटचा मुलाचा...फारच आवडले.
स्वॅप्स यांची माहिती पण भारीच

दिपक.कुवेत's picture

16 Jun 2014 - 2:28 pm | दिपक.कुवेत

सगळेच फोटो खुप आवडले विशेषतः शेवटचा. पावसाळ्यात अश्या ठिकाणि काय भन्नाट वाटत असेल नाहि??

काव्यान्जलि's picture

17 Jun 2014 - 3:59 pm | काव्यान्जलि

वल्ली…खुप छान छायाचित्रण…. स्वॅप्स-आपण तर महान आहात __/\__

एस's picture

17 Jun 2014 - 6:09 pm | एस

स्वॅप्स-आपण तर महान आहात __/\__

नाही हो, मी तर स्वॅप्स आहे. *pardon* *biggrin*

जसे वारकरी एकमेकांच्या पाया पडतात तसे माझ्याकडूनही आपणाला __/\__.

जयेशसर's picture

23 Jul 2014 - 3:34 pm | जयेशसर

सगळेच फोटो छान आहेत.......

चिगो's picture

19 Aug 2014 - 5:02 pm | चिगो

सुंदर फोटो आणि त्यावर स्वॅप्सचे प्रतिसाद म्हणजे मेजवानी.. :-)

वेल्लाभट's picture

3 Sep 2014 - 10:37 am | वेल्लाभट

सांदण, अंजनेरी, आणि शेवटचा फोटो... कमाल !
सही पर्स्पेक्टिव्ह.... आवडला!
तुमचा भटकंती अनुभव जबरा आहे हे ठाऊकच आहे. त्यामुळे हे इतकेसे फोटो झलकी आहे असं समजून 'अजून येऊद्यात' अशी मागणी करत आहे

बापू नारू's picture

3 Nov 2014 - 9:55 am | बापू नारू

अप्रतिम आलेत फोटो ,कृपया फोटो काढलेल्या ठिकाणाचा पत्ता share करावा

ठिकाणांची नावे दिलेली आहेत की प्रत्येक फोटोवर.

मृत्युन्जय's picture

3 Nov 2014 - 10:23 am | मृत्युन्जय

खुप सुंदर.

मोक्षदा's picture

3 Jan 2015 - 6:34 pm | मोक्षदा

फोटो फारच सुंदर आहेत
हेमांड पंथी वस्तू आहे
संदर दरी
उत्क्रष्ठ घळई चा नमुना आहे
ती पण मह्र्म्हाराष्ट्रात त्या फोटो बदल धन्यवाद भूगोलात शिकवण्यास उपयुक्त

चौथा कोनाडा's picture

23 Mar 2019 - 4:36 pm | चौथा कोनाडा

+१

क्लासिक !