आपलं शरीर हे मुख्यतः पाणी, सेंद्रीय पदार्थ तथा बारा निरींद्रीय क्षार युक्त असंख्य पिंडपेशींनी तयार झालेले आहे, निरींद्रीय क्षारांमुळे या पेशी तयार होत असतात, अन रक्ताभिसरणाने पोसल्या जातात, याशिवाय साखर, चरबी, पांडूर- Albumin, हे कर्बयुक्त सेंद्रीय पदार्थ असून चुना-Calcium, लोह-Iron, potashium, Natrum, Scical, हे ख-निज क्षार निरींद्रीय – कार्बन विरहित असतात.निरींद्रीय क्षारांचे प्रमाण अल्प असलं तरी अचेतन सेंद्रीय पदार्थापासून लक्षावधी विशिष्ठ पिंडपेशीसमुह निर्माण करत असतात. याचं कारणामुळे या बारा क्षारांना अनन्य साधारण महत्व आहे, त्याचाच अभ्यास करणें आहे. त्यात लक्षणं, त्रुटी, आणि रोग याचा धावता आलेख काढायचा आहे.
काली फोस्फोरीकम – Kali Phosphoricum K2 H PO4. सर्वात महत्वाचा क्षार,शरिराच्या सर्व घटकांचे, अवयवांचे, ऐच्छिक, अनैच्छिक संतुलन, संचलन, आणि अनुशासन करणा-या मेंदू, ज्ञानतंतू, कर्मतंतू या सर्वांशी याचा निकटचा संबंध आहे, आपल्याला भौतिक ज्ञान होतं ते शब्द,रस, रूप, स्पर्श, गंध, या संवेदना कां, जिव्हा-जीभ, डोळे, त्वचा, आणि कांन या पांच ज्ञानेंद्रीयामुळेच होते अन त्याचा घनिष्ट संबंध मेंदूशी आहे.सध्याचे गतिमान, बौधिक्तेची कास धरून चाललेलं स्पर्धात्मक विकृत सांस्कृतिक जीवन आणि असंतुलीत समाजव्यवस्था, आवाज, प्रदूषण,शांत- निवांत-पणा याचा अभाव या सर्वांमुळे मेंदूवर आणि शरीरावर प्रमाणाबाहेर ताण पडतो आहे. याचा संबंध मानसिकते शीही आहेच, बघा, असा दिवस आपल्या आयुष्यात कधीतरी उगवतो, जाग आल्यावर काहीं करू नये, स्वस्थ पडून राहवे, थकलाभागला शीण येतो, अनामिक वैताग आलेला असतो, मन उगाचंच प्रक्षुब्ध बेचैन असतं, कपाळा हात लावून जरा चेपलं तर बरं वाटत, मग ध्यानी येत अरे डोकंही जरा जड झालं आहे त्यात बारीकसा ठणका आहे, कालझोपेपर्यंत तर सगळं उत्तम होतं, मग!! कारण अज्ञात आहे. फ्रान्सिस बेकन यांनी तीनशे वर्षापूर्वी लिहून ठेवलं आहे जसं माणसाचे मन तसा तो माणूस, मनानी घेतले मी आजारी आहे की तो आजारी पडतोच, मी तब्बेतीत आहे तर तो तब्बेतीत असतो. माणसाचे माणूसपण त्यांच्या बुध्दिवैभावाचा ओज-प्रकाश पाडणा-या मेंदूत आहे त्यांचं रक्षण, पोषण करणारा हा काली फॉस क्षार महत्वाचा आहे. याचा आणि मेम्दुमध्ये, आणि भोवती असलेल्या करडया पदार्थाचा ( Grey matter ) यांचा फार घनिष्ट संबंध आहे.कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे केसांपेक्षा बारीक पण अत्यंत चिवट असं तंतूमय जाळं असते त्याला इग्रजीत Arachnoid असं नाव आहे. हा क्षार शरीर-घटक-धातू ( Tissues ) निर्माण करणारा आहे याचं संतुलन बिघडलं की शरीर घटकच तयार होणार नाहीत. स्नेहाचे घट्ट रूपांतरण होणे, प्राणवायुचा योग्य उपयोग अडून बसेल. बुद्धी काम करेनाशी होते, त्यांच्या वागण्यात सुसंगती राहत नाही, शरीर-मन खचतात, एक तर्हेची भीती ६ न्युनगंड उत्पन्न होतो, चारचौघात बुजतो त्याला एखादेवेळी समोरच्याचे नांवही आठवत नाही, कसलाही निर्णय घेऊ शकत नाही, भावनाविवश होतो, लहानसं कारण ही रागवा चिडायला पुरते तर्कट स्वभाव हेसर्व या क्षाराच्या अभावाने होतं त्यांच्या जोडीला आणखी एक क्षार नैट्रम मूर या सर्व क्षारांचे कोऑरडीनेशन आणि कोऑ- परेशन चांगलं असतं त्यामुळे एखाद्धया क्षाराच संतुलन बिघडलं की काहीना काही शारीरिक व्याधी सुरू होतेच. काली फॉस अल्ब्युमिन व प्राण वायूशी संमिलीत होऊन ग्रे मेटर निर्माण करतो.
१ ) काली फॉस-६- + कल्के फ्लुऑर-६ + सिलिका-६ तीन तीन गोळ्या एक / दोन वेळा ----- ------------------- वयत्परत्वे शरीराची झीज आणि थकवा झपाट्याने वाढत असतो, मानसिकता बिघडते, मन काळजी-ग्रस्त होतं, झोपेवर परिणाम होउन स्वभाव चिडचिडा होतो, मेंदू काम करीनासा होतो, विस्मरण होतं अशावेळी उप-रोक्त क्षार दिले तर आवश्यक ग्रे मेंटर मेंदू भोवती राहते, शिथील झालेल्या नसा नर्व्हज कल्के फ्लुओरने हव्या तेवढया लवचिक अथवा ताठ राहतात नि सिलिका सर्वाना आवर घालतो.
2 ) काळी फॉस ६, ३० -------------- खास विध्यार्थ्यासाठी हया क्षारासारखा दुजा हितचिंतक नाही, परीक्षार्थी परीक्षा अगदी जवळ आली की रात्रीचा दिवस करून अभ्यासानिमित्त वह्या-पुस्तकात बुडालेला, वाचन चालू असताना वाचनात एकाग्रता हवी, लक्षात राहयाला हवं, परिणामी पोट रिते वाटायला लागते, पोटात गोळा येतो, या क्षाराचे हे महत्वाचे लक्षणं आहे, काली फॉस मेंदुच्या पेशींची तैनात उत्तम राखतो. ग्रे मेटरवर पडणारा ताण वाढला की त्याचा पुरवठा तोकडा पडतो, त्यामुळे गंभीर व्यथा निर्माण होतात, त्यासाठी याक्शाराच्या गोळ्यांची बाटली जवळ बाळगून मधून-मधून घेत गेले की सारी थकावट गायब, एकाग्रता साधते, चांगला अभ्यास होतो जाग्रणे करावी लागत नाहीत, झोप शांत लागते, पोटात गोळा येत नाही, भूक चांगली लागते. वृद्धांसाठी तर हा क्षार जीवनामृत
४) काली फॉस ६ आणि १२ + नैट्रम मूर ३० च्या पाच ग्रेनच्या वडया अर्धा ग्लास पाण्यात टाकून १०—१० मिनिटांनी एकएक चमचा मिश्रण नंतर १५—१५ मिनिटांनी त्सेक चमचा मिश्रण सातत्याने दिले यामुळे र्हुदय विकाराचा रुग्ण हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी आलेली रुग्णवाहिका परत पाठवण्या एवढा स्वस्थ झाला, त्या मुळे काली फोसला प्राण रक्षक म्हणूनही ओळखले जाते. -
४ ) काली फॉस हा अत्यंत महत्वाच्या क्षारा अभावी शरीराची किती दयनीय अवस्था होते ते त्याचं वर्णन त्याच महत्व ध्यानीनी आणून देईल, ही माहिती खूप पडताळे जमवून विचार करून जमविलेली आहे एखादे वेळी मनाला न पटणारीही असू शकेल, पण सत्य आहे, प्रयोग, अनुभव घेण्यास काय हरकत आहे. नुकसान तर अंशात्मकही नाही झालाच तर अमोघ फायदाच होईल काही गोष्टी अनकलनिय, अघटीत असतात त्यावर फक्त विश्वासच ठेवावा लागतो. ५ ) तंतू शूळ न्युरोल्जीया अत्यंत अस्वस्थ करणारी व्याधी, असह्य वेदना, खाणं-पिणं सुचत नाही, ६ ) रूग्णाचं वास्तव वर्णन ---१ )- चेह-याचा वर्ण फिक्कट पिवळा, तर कधी पांढराफटक रक्तक्षीणतेची जाणीव करू देणारा, डोळे दु:खी-कष्टी, ओढलेले, खोल गेलेले, भवती काळी वलयं असलेले, अकाली वृद्धत्व आल्या सारखा काळजी ग्रस्त सुरकुतलेला चेहरा, काहीवेळा चेहरा ओठ तांबूस काळपट निळे, शिरा ताणलेल्या, थकवा, अस्वस्थपणा, २ ) BRAINFAG किंवा CEREBRAL ASTHENOA -- मेंदूची अपरिमित थकान, व्यापारी, उच्चभ्रू लोक, कर्मेंद्रीयापेक्षा ज्ञानेंद्रीयांवर ज्यास्त ताण देणारे सुखवस्तू लोक. यांच्यासाठी या सारखे काली फॉस सारखे औषध नाही.
३ ) स्मृतिभ्रंश – यावर हा क्षार उत्तम कार्य करतोच पण त्याच्याच जोडीला मला आणखी नाव डोळ्यासमोर येतं ते अति गुणी औषध ANACARDIUM ( म्हणजे बिब्बा ) याची खास औषधी लक्षणे म्हणजे आयत्यावेळी आठवणीने दगा देणे, विध्यार्थ्यांच्या बाबतीत सातत्याने घडणारी गोष्ट प्रश्नपत्रिका लिहताना आयत्यावेळी काही आठवत नाही, बरं त्या-ने सडकून अभ्यास केलेला असतो, बुद्धीने तल्लख असतो, घरी आल्यावर सर्व उत्तरे धडाधड देता येतात, फक्त पेपर लिहताना आयत्यावेळी मात्र स्मृतीने दगा दिलेला असतो. या स्थितीला इग्रजीत Examination Funk असे म्हणतात. –
थोडे विषयांतर करून खास विध्यार्थ्यासाठी, Examination Funk, Loss of Concentration,आणि जबाबदारीचे ओझं त्यामुळे मेंदूवर पडणा-या मानसिक ताणामुळे स्मृतिभ्रंश, शारीरिक मानसिक निरुत्साह- Neuras Thenia, Brainfag, or Cerebral Astthenia, Tic Doulou Reux, Agorphobia, वृद्धत्वामुळे आलेले मानसिक कमीपण,किंवा जन्मजात बथ्थड अशांसाठी खास औषधी व उपचार यासाठी हा लेखाचा उपभाग लक्षणासह सादर करतो. लक्षणामुळे हे सदर वस्तृत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विध्यार्थ्यांसाठी व्यवस्थित अभ्यास करूनही ऐन परीक्षेत मनाचा गोंधळ होउन प्रश्नपत्रिका नीट सोडवता आली नाही, असं का होतं एक मनावर दडपण, परीक्षा जवळ आली की विध्यार्थ्या चा Nervous पणा वाढू लागतो, मनाची घब-राहट होते, अभ्यास पुरेसा झाला असं वाटत नाही, रात्रंदिवस जागरणं करून, खेळ, गप्पाष्टक, भटकंती सगळं बंद, काहींच्या मनात वर्षभर अभ्यास न केल्याची खंतसुद्धा असते, खास कृउन १२वी च्या परीक्षेत घवघवीत यशाचा वडिलांकडून तगादा असतो कारण त्यांनी क्लाससाठी, इतर गोष्टींसाठी खूप खर्च केलेला असतो, पुढच्या भविष्याचा विचार सुप्तपणे टोकत असतो, या सगळ्याचा परिपाक मेंदूतील ग्रेमेटरवर व नसां शिथील होतात,अशावेळी अभ्यास चांगला झाला असूनही आत्मविश्वासाच्या अभावामुळे पेपर सोडवताना आठवणीनी, स्मृतीने दगा दिल्यामुळे उत्तरे नीट लिहता येत नाहीत, यालाच एक्झामिनिशन फंक म्हणतात,
औषधे calc. Fluorica fuorica -12 or 30 2) kali phos 30 & ३) silica 30 कल्के फ्लुओर शिथिल नसा-शिरांचा लवचीकपणा टिकवून योग्यतो ताठरपणा आणतो, २ ) काली फॉस आलेला नर्व्हसनेस घालवतो, ३) सिलिका विचा-रातील सैरभैरपणा नाहीसा करून, एकाग्रता वाढवितो,- ग्रहणशक्ती वाढते. उपरोक्त लिखाण हे गाईड लाईन आहे,त्यात अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. परस्पर औषध घेउ नये.
२ ) काली फॉस आणि सिलिका -- वकील, डॉक्टर, मोठेले एक्झीक्यूटिव्ह ऑफिसर्स यांच्यात जबरदस्त आत्मवि-श्वास असतो, एक अत्युच्च वैचारिक पातळी असते, पण कारणवशात एखाद्या कामात नको तेवढया घेतलेल्या बौद्धिक मेहनतीचा परिणाम मेंदू आणि नसा याना थकान येते, शैथ्य येते, मनात येतं एवढी मेहनत घेतली आहे, काय होईल हाविचार मनात येणं हेच मेंदूच्या थकावटीचे लक्षणं आहे, उपरोक्त औषधांनी थकान दूर होउन अशा प्रकांड पंडिताना सहज दिलासा मिळतो.
३ ) लाय्कोपोडियम खास करून अतिशय तल्लख बुद्धीचा, उत्कृष्ट वक्तृत्व, अमोघ वाणी असलेला शरीराने कृश, कुठल्याही विषयात पारंगत, सखोल, पण एकलांडा, त्याच्यावर प्रेम- आदर करणा-यांत बसेल,उठेल, त्याचं बोलणं एकणा-याला ज्ञानाची मेजवानी वाटेल, इतक्या सहजपणे तो अवघड विषयावर बोलेल, त्याच्या विद्वत्तेबध्दल आदर असेल अशाच लोकांच्यात तो रममाण होतो, त्याचा एक समज-गैरसमज आपल्याला समजून घेणारी, आपल्या वि-षयाची गोडी असणारी तर राहोच पण सांगोपांग अभ्यास करू इच्छिणारी व्यासंगी माणसंच नाहीत, अशा लोकांसमोर एखाद्या विषयावर बोलणंच नको, वकील, न्यायाधीश, राजकारणपटू, प्रथितयश अभ्यासक,उद्योजक,डॉक्टर, अशा लोकां-साठीच हे औषध नैराश्य कमी करून मानसिकबल- आत्मविश्वास वाढविणारं चांगल्या वक्त्यासाठींच.
प्रतिक्रिया
12 Jun 2014 - 9:25 pm | चित्रगुप्त
डॉ. हनिमन, डॉ. शुस्लर किंवा जे कोणी होमियोपाथी/बायोकेमिकचे मूळ प्रवर्तक होते, त्यांनी एवढ्या तपशीलात जाऊन शेकडो औषधांचे नेमके परिणाम कसे काय शोधून काढले, याबद्दलही माहिती या धाग्यातून मिळावी, अशी अपेक्षा करतो.
प्राचीन ग्रीक वैद्य (याक्षणी त्याचे नाव आठवत नाहीये) त्या त्या वनस्पतीजवळ शांतपणे ध्यान लावून बसत असे, आणि ती वनस्पतीच त्याला स्वतःचे वैद्यकीय गुण 'सांगत' असे (वा अंतःप्रज्ञेने ते कळत असे म्हणा) आणि ते तो लगेच लिहून घेत असे, असे वाचल्याचे आठवते. मला स्वतःला हे पूर्णपणे शक्य वाटते. अर्थात त्या व्यक्तीची तेवढी क्षमता असायला हवी.
होमियोपाथीच्या बाबतीत असे काही झाले होते का?
12 Jun 2014 - 10:36 pm | नानासाहेब नेफळे
होमिओपॅथी एक धादांत खोटा प्रकार आहे व खुद्द होमिओपॅथीच्या डॉक्टरांनाच आपण 'ठग' आहोत हे ठाऊक असते हे विशेष.
12 Jun 2014 - 11:49 pm | खटपट्या
काय ?????
13 Jun 2014 - 11:56 am | बाबा पाटील
हा नाना तसाही डोक्यावर पडलेला आहे,फार लक्ष देवु नका..
13 Jun 2014 - 12:22 pm | प्रसाद गोडबोले
ह्यावेळी चक्क नेफळे रावांशी सहमत आहे
आजवर होमिओपॅथी हे सुडो सायन्स आहे असेच ऐकत आलोय , ह्या लेखमालेतुन काही प्रभाव झाल्यास एखाद्या होमिऑ पॅथी डॉक्टरला सदिच्छा भेट देवुन काही प्रयोग करवुन (मायनर आजारांच्या वेळेला) घ्यायला हरकत नाही .
अवांतर : बाकी होमिओपॅथी चे दुष्परिणाम नसतात हे मात्र धाधांत असत्य आहे हे अनुभवाने सांगतो ...
आमची मेव्हणी होमिऑपॅथी डॉक्टर आहे तिला एकदा म्हणालो होतो की " होमिऑपॅथी सुडोसायन्स आहे ... माझ्यालेखी ज्योतिषशास्त्र, फेंगशुई , वास्तुशास्त्र , रेकी आणि होमिऑपॅथी हे सारे एकाच माळेतले मणी आहेत "
त्यानंतर बोलायचीच बंद झाली :( ... छ्या केवढा हा साईड इफेक्ट =))))
13 Jun 2014 - 12:46 pm | आयुर्हित
अहो, चुकताय आपण.
काली फॉस आणि सिलिका घ्यायची विसरली असेल ती!
17 Jun 2014 - 7:34 pm | असंका
आपल्या मेहुणीला असं म्हणालात? मग आपली पत्नी चांगलीच कानकोंडी झाली असेल नाही!
16 Jun 2014 - 4:34 pm | सामान्यनागरिक
तुमच्या धैर्याची दाद दिली पाहिजे. बिनधास्त ! तुम्हाला कसली भिती वाटत नाही का हो?
12 Jun 2014 - 11:29 pm | मुक्त विहारि
अजून वाचायला नक्की आवडेल
13 Jun 2014 - 12:16 am | आयुर्हित
ज्ञानाच्या कक्षा रुन्दावण्यास मदत करणारे अनुभवयुक्त लेखन व आपले मिपावर स्वागत असो!
होमिओपॅथीवरील येवु घातलेल्या विस्त्रूत माहितीबद्दल आधिच मनापासुन धन्यवाद.
13 Jun 2014 - 1:21 am | भृशुंडी
होमिओपथी हे स्यूडोविज्ञान आहे असं म्हणतात.
त्या गोळ्या मात्र मस्त गोड असतात, तेव्हा काही साईड इफेक्ट्सची चिंताच नाही
13 Jun 2014 - 1:00 pm | गवि
उत्तम ... पाच ग्रेन म्हणजे ०.३२ ग्रॅम हे बरोबर असेल तर अर्ध्या ग्लासात एक तृतीयांश ग्रॅम द्रव्य विरघळवलेले..(विरघळत असल्यास)
म्हणजे पोटात खरोखर काली फॉस आणि नॅट्रम मूर ही द्रव्ये जाणार..
फायदा होत असेल किंवा नसेल हा अनुभवाचा / केमिस्ट्रीचा / जीवशास्त्राचा भाग झाला.
पण पदार्थाची डिटेक्टेबल क्वांटिटी पोटात जातेय हे पाहून आनंद झाला.
पण.. मग.. ही नक्की होमिओपथीच ना?
धन्यवाद.
13 Jun 2014 - 11:36 pm | राजेश घासकडवी
कैतरीच आपलं तुमचं. होमिओपथीमध्ये असला धोका बिलकुल पत्करला जात नाही. त्या औषधाच्या नावांपुढे ६ आणि १२ लिहिलं आहे ते दिसलं नाही का? ६ म्हणजे ६ वेळा शतांशाचं डायल्युशन. म्हणजे सुमार एक टनाचं एक मायक्रोग्रॅम करायचं.... १२ वेळा डायल्यूशन म्हणजे एक रेणूही नाही. त्या पाच ग्रेनमध्ये काय असतं कोण जाणे.
13 Jun 2014 - 1:35 pm | मृत्युन्जय
होमिओपॅथी म्हटल्यावर मिपाकर एकदम तुटुन पडतात. पुणेकर, मोदीसमर्थक आणि आस्तिक या तिघांइतकीच होमियोपॅथी देखील मिपासाठी टिंगलीच विषय झाली आहे असे दिसते. यापैकी जे कोण डॉक्टर्स असतील त्यांचे किमान मत तरी विचारात घेता येइल. ओकार्या काढणारे इतर मात्र डोक्यात जातात. असो. होमिओपॅथी ने बरे झालेले लोक मला माहिती आहेत. त्यामुळे माझा होमिओपॅथीवर राग नाही. मी स्वतः वेळ आल्यास अॅलॉपॅथी औषधे घेतो ही गोष्ट वेगळी.
13 Jun 2014 - 2:30 pm | आदिजोशी
होमिओपॅथीला शिव्या घालणारे अनेक लोक मिपावर आहेत. त्यातले किती जण स्वतः डॉक्टर आहेत, किती जणांचा होमिओपॅथी आणि अॅलोपथीचा सखोल अभ्यास आहे हे त्यांनाच ठाऊक. उगाच कुठलं तरी काही तरी वाचून मत बनवायचं आणि फुकट देता येतात म्हणून सल्ले देत सुटायचं.
टिका तर इतक्या खालच्या पातळीला जाऊन करतात की मिपाकर असल्याची शरम वाटते.
13 Jun 2014 - 2:45 pm | गवि
:)
13 Jun 2014 - 8:17 pm | श्रीगुरुजी
होमिओपॅथी औषधांचा मला स्वतःला व सर्व कुटुंबियांना गेली अनेक वर्षे अत्यंत चांगला अनुभव आला आहे. होमिओपॅथी थोतांड आहे किंवा ते छद्मविज्ञान आहे असे पूर्वग्रहदूषित मत मांडणार्यांशी मी अजिबात सहमत नाही.
13 Jun 2014 - 10:44 pm | खटपट्या
+१११११११
16 Jun 2014 - 10:07 am | प्रसाद१९७१
एक तर अॅलोपाथी असे काहीही नाही. MBBS ही Modern Medicine ची पदवी आहे. ह्यात जे शास्त्रियरीतीने सिद्ध करता येइल असे कुठलेही औषध चालु शकते. आयुर्वेद, युनानी, चिनी औषधे जर क्लिनिकल ट्रायलच्या मार्गाने सिद्ध केली तर ती पण Modern Medicine मधे दिली/घेतली जातील.
पण बुवाबाजी पद्धतीने कोणी दावे करत असेल तर त्याकडे खरे तर दुर्लक्ष केले पाहीजे.
13 Jun 2014 - 10:01 pm | चित्रगुप्त
होमियोपाथीचा अत्यंत चांगला अनुभव मला आहे, १९८४ साली अगदी भयंकर परिस्थितीत मी असता होमियोपाथीच्या दोन-तीन दिवसाच्या औषधाने मी वाचलो होतो. माझ्या पत्निलाही लहानपणी आलोपाथी डॉक्टरांनी हात टेकल्यावर होमियोपाथीमुळेच मोठ्या संकटातून बाहेर येता आले होते. माहितीतल्या आणखीही लोकांना झालेला लाभ मला ठाऊक आहे.
परंतु त्याचबरोबर होमियोपाथीच्या सैद्धांतिक अंगाविषयी --- म्हणजे अमूक औषध अमूक पोटन्सीचे घेतल्याने अमूक परिणाम होतो वगैरे--- याबद्दल शंका घेण्यासारखे अनुभव पण भरपूर आहेत. पूर्वी माझ्या वडिलांचे स्वतःचे होमियोपाथीचे दुकान असून मी अनेक वर्षे ते चालवण्यात सहभागी होतो--- एक दुकानदार म्हणून जे अनुभव माझ्या गाठीशी आहेत, ते अकल्पनीय आहेत, आणि फारच कमी जणांना ठाऊक असतील, असे आहेत... ते इथे उघड करावेत की नाही, याबद्दल मी अजून ठाम होऊ शकलेलो नाही.
खुद्द होमियोपाथीचे औषध निर्माते यातील अगदी खास गुपीते सांगू शकतील, पण ते तसे कधीच करणार नाहीत...
या अनुभवामुळेच मी माझ्या पहिल्या प्रतिसादात धागाकर्त्यांना काही प्रश्न विचारले आहेत, त्यांची उत्तरे यावर प्रकाश टाकू शकतील.
15 Jun 2014 - 11:34 pm | संजय क्षीरसागर
आणि त्यावर होमिओपॅथीच्या नक्की कोणत्या औषधाचा किती दिवसात परिणाम झाला हे सांगाल काय?
कशामुळे?
पुन्हा उपरोक्त शंका!
लेखक साहित्याचे डॉक्टर असावेत (असं ब्लॉगवरुन वाटतं) त्यामुळे ते बहुदा उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉक्टर सगळं ठीक आहे ना? गायबलेत तिथे यांची काय कथा!
16 Jun 2014 - 3:12 am | चित्रगुप्त
१९८४ साली मला अमेरिकेला तीन महिन्यासाठी जायचे होते. त्याकाळी अशी संधी फार दुर्मिळ होती. परंतु 'अमीबॉयसिस' ने ग्रस्त होऊन मी अगदी दुर्बळ झालेलो होतो. चालणे-फिरणेही कठीण झालेले होते. अमेरिकेचे तिकीट एकदा काही दिवसांसाठी पोस्टपोन केले, मात्र पुन्हा तसे करता आले नसते, आलोपाथीने काहीच लाभ होत नव्हता. कुणीतरी सांगितले, त्या होमियोपाथी डॉ. कडे गेलो, त्यांनी फी न घेता औषध दिले, ते २-३ दिवस घेतल्यावर प्रवास करण्याइतपत बरे वाटले. तरी अशक्त पणा बराच काळ राहिला. तीन महिन्यांनंतर मी परत येईपावेतो ते डॉ. वारले होते. तसेच माझ्या पत्नीला वयाच्या अठरा की विसाव्या वर्षी अचानक चालता येईनासे झाले होते, पायातील शक्ती गेली होती. बरेच दिवस गावातील सर्वात मोठ्या इस्पितळात राहून सर्व प्रकारची परिक्षणे , औषधोपचार करुनही काहीही फरक पडत नव्हता. मात्र होमियोपाथीने ती व्याधी कायमची बरी झाली.
औषधांविषयी अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे सिद्धांत काहीही असो, औषध निर्माते, एजंट आणि विक्रेते, यांच्या माध्यमातून आलेले औषध नेमके काय, कसे असेल, मुळात ते औषध तरी असेल की नुस्तीच मिल्कशुगर/साखरेच्या गोळ्या किंवा साधे अल्कोहोल असेल, हे कोणत्याही टेस्ट द्वारे सांगता येत नाही. याचा फायदा निर्माते, एजंट आणि विक्रेते घेत असतात, आणि बिना औषधाचे औषध विकतात. तरीही बरेचदा गुण येतो (बरेचदा येत सुद्धा नाही) याचे कारण 'प्लासिबो इफेक्ट' असावा, असे वाटते.
एवढे सर्व ठाऊक असूनही अजूनही आम्ही होमियोपाथिक डॉ. कडे जातो, आणि ती घेऊन बहुतेकदा फायदाही होतो.
मटेरिया मेडिका मधील असली वर्णने म्हणजे कल्पनेच्या भरार्या असाव्यात, असे मलातरी वाटते. खरे-खोटे डॉ. हनिमन जाणोत.
अश्याच प्रकारचे उलट-सुलट अनुभव मला भविष्यकथनाबद्दलही आलेले आहेत, त्याविषयी पूर्वी काही धाग्यांमधून लिहिलेही आहे.
16 Jun 2014 - 10:53 am | संजय क्षीरसागर
ते सांगता येणार नाही कारण :
आणि
याचंही डायग्नॉसिस आणि औषध सांगणं शक्य नसावं कारण घटना जुनी आहे. तस्मात गुण आला हे खरं पण औषध कोणतं हे कळायला मार्ग नाही.
पॅथी सिद्ध होण्यासाठी तीन गोष्टी आवश्यक आहेत :
औषधाच्या परिणामांची: १) कन्सिसटंसी २) व्यक्ती निरपेक्षितता आणि ३) स्थल-काल निरपेक्षितता.
16 Jun 2014 - 11:12 am | चित्रगुप्त
पॅथी सिद्ध होणे वा न होणे, याबद्दल काही म्हणणे नाही मात्र 'व्यक्ति तितक्या प्रकृती' या न्यायाने औषधोपचार हा व्यक्तिनिरपेक्ष असू शकत नाही. अॅलोपाथीत सुद्धा अमूक औषधाची वा वस्तूची अॅलर्जी आहे का, ही व्यक्तिसापेक्ष माहिती घेतली जाते.
अवांतरः माझ्या ओळखीचे एक वैद्य केवळ नाडिपरिक्षा करून जे सांगतात, ते मी बघून थक्क झालेलो आहे. शारीरिक व्याधीच नव्हे, तर मानसिक स्थिती सुद्धा त्यांना नाडिवरून कळते. नाडिपरिक्षा ही एक कठीण विद्या असून ती सर्वांनाच साध्य होत नसते, असे ते सांगतात.
16 Jun 2014 - 5:49 pm | llपुण्याचे पेशवेll
असे एक वैद्य अशोक भट पुण्यात पूर्वी मुंजाबाच्या बोळापाशी होते. खुन्या मुरलीधराच्या मंदीरातले खरे वैद्य कावीळवाले देखील नाडीपरिक्षेवरून उपचार करत.
16 Jun 2014 - 7:57 pm | कवितानागेश
नाडीपरीक्षेबद्दल माझाही अनुभव अतिशय चाम्गला आहे.
पण नाडिपरिक्षा ही एक कठीण विद्या असून ती सर्वांनाच साध्य होत नसते, हे जरा जास्त झालं.
ज्याची निरिक्षणशक्ती आणि चिकित्सक्बुद्धे उत्तम असेल असा कुणीही माणूस नाडीपरीक्षा व्यवस्थित करु शकेल. आणि मूळातच डॉक्टर होण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेतच.
माझ्या ओळखीचे एक वैद्य अत्ता केवल ३२ वर्षाचे आहेत. त्यांची नाडीपरीक्षा देखिल अशीच उत्तम आहे. अगदी मानसिक स्थितीचेदेखिल तंतोतंत वर्णन करतात. आणि औषधाचा परीणामदेखिल ताबडतोब होतो.
...पण होमिओपॅथीबद्दल धागा असताना नेहमी तिथे आयुर्वेद का येतो बरं?
लोकांना खरोखरच होमिओपॅथीबद्दल काहीही माहित नाहीये हेच खरं.
16 Jun 2014 - 10:03 am | प्रसाद१९७१
होमिओपाथी ला बुवाबाजी म्हणुन जाहिर करुन, अंधश्रद्धा निर्मुलन विधेयका नुसार कारवाई केली पाहिजे.
16 Jun 2014 - 10:11 am | प्रसाद गोडबोले
संपुर्ण सहमत !
16 Jun 2014 - 12:31 pm | श्रीगुरुजी
>>> होमिओपाथी ला बुवाबाजी म्हणुन जाहिर करुन, अंधश्रद्धा निर्मुलन विधेयका नुसार कारवाई केली पाहिजे.
करा. गो अहेड.
16 Jun 2014 - 10:16 am | चित्रगुप्त
होमियोपाथीने कधीच, कुणालाच फायदा झाला नसता, तर ती केंव्हाच आपोआपच नामशेष झाली असती. फायदा तर होतो, पण त्याबद्दल जो सिद्धांत सांगितला जातो, तो कितपत खरा आहे, हा प्रश्न असू शकतो.
अंधश्रद्धा निर्मुलन विधेयक हे सुद्धा विवेकाने वापरले गेले पाहिजे. एकदम टोकाची भूमिका घेणे योग्य नव्हे.
आम्हाला तर आलोपाथीने जेवढे नुकसान झाले, तेवढे आयुर्वेदिक वा होमियोपाथीने कधीच झालेले नाही.
एकदा आरोग्य बिघडले, की तो विषय फार गुंतागुंतीचा आणि जटिल झालेला असतो. कुणाला कश्याने बरे वाटेल हे सांगणे कठीणच. आलोपाथीमुळे एक व्याधि बरी होते, तर दुसरी उद्भवते, असे बरेचदा घडत असते.
16 Jun 2014 - 10:38 am | प्रसाद१९७१
होमियोपाथीने कधीच, कुणालाच फायदा झाला नसता, तर ती केंव्हाच आपोआपच नामशेष झाली असती.>>>>>>>>>> अहो गंडेदोरे, काळी जादू, वेगवेगळे ग्रहांचे खडे, वास्तुशास्त्र ह्यांनी पण कोणाचा कधी फायदा झाला नाही, तरी पण शतकानुशतके चालू च आहे ना.
पुन्हा एक दुरुस्ती, अॅलोपाथी अशी कुठलीही पॅथी नाही.
16 Jun 2014 - 11:29 am | चित्रगुप्त
मग कोणता शब्द वपरावा म्हणता?
गंडेदोरे, काळी जादू, वेगवेगळे ग्रहांचे खडे, वास्तुशास्त्र वगैरेंच्या वाटेला मी स्वतः कधी गेलेलो नाही, परंतु यांचा कधीच कुणालाच फायदा झालेला नाही, याचा कोणताही विदा वा पुरावा माझ्याकडे नाही. हा माझा एक वैयक्तिक तर्क असू शकतो, त्या आधारावर टोकाचे विधान करण्याचा, या गोष्टींना 'अंधश्रद्धा' या प्रकारात मोडण्याचा अधिकार मला नाही, एवढे मला कळते.
समर्थांनी सांगितलेल्या 'सावधपण सर्वविषयी' आणि 'विवेक' यांचा उपयोग केला, तर अनेक अनिष्ट व्याधि-उपाधिं पासून आपण स्वतःला वाचवू शकतो.
होमियोपाथी औषधांचा व्याधिनिवारणासाठी उपयोग होतो, याचा भरपूर अनुभव मला आहे, आणि असे अन्य अनेक लोक माझ्या परिचयात आहेत.
16 Jun 2014 - 12:09 pm | प्रसाद१९७१
Modern Medicine हा सध्याचा प्रचलित शब्द आहे. ह्याला कुठलेही बंधन नाही, जे जे शास्त्रिय कसोट्या लावुन सिद्ध होउ शकते ते सर्व उपचार ह्यात चालतात.
16 Jun 2014 - 9:03 pm | चौकटराजा
या प्रतिसादासारखेच माझे काहीसे मत आहे. होमिओपाथी हे शास्त्र नसेल पण ते उपयुक्तच नाही असे म्हणणे खरे नाही.
गंडे दोरे शास्त्र नाही पण ते उपयुक्तच नाही हे खरे नाही. श्रद्धा हे शास्त्र नाही पण ती उपयुक्तच नाही हे खरे नाही. शास्त्र हे नेहमीच अपुरे असते. पण त्यातील काही कसोट्यामुळे त्याबद्द्लची खात्री ही नक्कीच जास्त असते.
16 Jun 2014 - 11:56 am | आदिजोशी
ज्यांना होमिओपॅथीच्या उपयुक्ततेविषयी शंका आहे ते स्वतः औषधे घेऊन पडताळणी का करत नाहीत?
संजय क्षीरसागरांच्या मुद्द्यांतले २ आणि ३ तर अत्यंत भंपक मुद्दे आहेत. व्यक्ती निरपेक्षितता आणि स्थल-काल निरपेक्षितता नसणे म्हणजे ढोबळ जनरलायझेशन आहे. दुकानात शर्टाच्यासुद्धा कैक साईझ सापडतात, हिमालयात घालायचे कपडे मुंबईत घालून फिरता येत नाही म्हणून ते ते कपडे हे कपडे म्हणण्यायोग्य नाहीत का?
तसंच प्रत्येक होमिओपॅथीक डॉक्टरला औषधांचं केमिकल कंपोझेशन कसं माहिती असेल. ते प्रश्न शास्त्रज्ञांना विचारायचे.
अकलेचे तारे तोडायचे ठरवली की त्याला मर्यादा नसते. अॅलोपथीचा कैवार घेणार्यांना १० मिली ग्लायकोडीन मधे किती मायक्रोमिली खरे औषध असते ही माहीती आहे का?
अँटीबायोटीक घ्या त्यातून निर्माण होणारी हीट कमी करायला रँटॅक घ्या आणि मोशन पातळ होतील म्हणून आहार कंट्रोल करा, हे असले आचरट प्रकार होमिओपॅथी मधे होत नाहीत.
इथे होमिओपॅथीक शास्त्रज्ञ नाहीत म्हणून शंकानिरसन होणार नाही हे लक्षात ठेवा.
उद्या मी अणूउर्जेवर प्रश्न विचारीन आणि उत्तरं नाही मिळाली की अणूउर्जा हे थोतांड आहे असं म्हणेन, असले प्रकार चाललेत.
16 Jun 2014 - 12:49 pm | संजय क्षीरसागर
मी लिहीलेले तीन नियम हे वैज्ञानिक सत्यतेचे जगनमान्य निकष आहेत. अर्थात याची तुम्हाला कल्पना नाही हे तुमच्या प्रतिसादातल्या भोंगळपणावरुन कळतं. शर्टाचे साइज आणि हिमालयातले कपडे यांचा वैज्ञानिक सत्याशी (इथल्या संदर्भात औषधाला मान्यताप्राप्त होण्याशी) काडीमात्र संबंध नाही.
मी चित्रगुप्तना आजार आणि औषध यांची माहिती विचारली होती. इथे मी कैवार वगैरे घेण्याचा (तुम्हाला होमिओपॅथीचा असला तरी) प्रश्नच नाही. ते बहुदा त्तुमच्या अगाध बुद्धीमत्तेचं आकलन असावं!
अर्थात तुमच्या या वाक्यानं :
कमालीची हाईट गाठली आहे! म्हणजे डॉक्टरला तो काय औषध देतोयं याचीच माहिती नाही. शाब्बास!
16 Jun 2014 - 8:02 pm | प्रसाद गोडबोले
ते तीन नियम तुम्ही लिहिल्यामुळे जगन्मान्य झालेत की त्यांचा कोणीच प्रतिवाद करु न शकल्याने जगन्मान्य झालेत =))
16 Jun 2014 - 8:22 pm | संजय क्षीरसागर
उदा. गुरुत्वाकर्षणाचा नियम. पृथ्वीवर कुठेही (स्थल निरपेक्षितता), कुणीही टाकली तरी (व्यक्ती निरपेक्षितता), केव्हाही (काल निरपेक्षितता) आणि नेहमी (वारंवारिता) वस्तु खालीच पडेल.
हाच निकष मेडिकल सायन्समधे औषध प्रमाणित होण्यासाठी लावला जातो.
16 Jun 2014 - 2:00 pm | सुबोध खरे
अॅलोपथीचा कैवार घेणार्यांना १० मिली ग्लायकोडीन मधे किती मायक्रोमिली खरे औषध असते ही माहीती आहे का?
जोशी साहेब
आपण ग्लायकोडीनचे नाव घेतलेत म्हणून त्यात असलेली औषधे काय आहेत (ती बाटलीवर लिहिलेली असतात) पण आपल्या माहितीसाठी खाली देत आहे. अशी माहिती सर्व आधुनिक वैद्यकशास्त्राच्या औषधांबद्दल उपलब्ध
http://www.alembic-india.com/cough-cold.php
Glycodin Cough Syrup
Each 5 ml contains Terpin Hydrate USP 10 mg, Dextromethorphan Hydrobromide IP 10 mg, Menthol IP 3.75 mg, Syrup Glycerin Base q.s. Bottle 100 ml 50 ml
यातील प्रत्येक औषध काय शुद्धतेचे आहे ते USP united states pharmacoepial convention आणि IP म्हणजे indian pharmacoepia यात प्रमाणित केलेली असतात त्याप्रमाणे असतात तसे नसेल तर एफ डी ए त्यांच्यावर खटला भरते
आपण USP मध्ये terpin hydrate शोध म्हणजे त्याची शुद्धता काय आहे आपल्याला कळेल.
आधुनिक वैद्यकात प्रत्येक औषधाचे घटक कोणते आहेत हे त्या बाटलीवर किंवा पैक वर लिहिणे कायद्याने अनिवार्य आहे.त्यमुळे जर संशय असेल तर डॉक्टर सरळ ती बाटली पाहून खात्री करू शकतात. इतके काटेकोर नियम इतर कोणत्या पाथीला आहेत काय ते मला माहित नाही.
बर्याच वेळेला होमियोपथी शास्त्रीय कसोटीवर उतरत नाही हि वस्तुस्थिति आहे.
तरीही बर्याच लोकांना गुण येतो असा त्यांचा अनुभव आहे.माझे म्हणणे एवढेच आहे कि ते शास्त्र आहे असे न म्हणता ते एक तत्वज्ञान आहे. ज्याने त्याने आपल्या श्रुती स्मृती आणि बुद्धीप्रमाणे ठरवावे कि आपण काय करावे
शेवटी आपण ज्या पाथीवर विश्वास आहे त्याचे औषध त्याने घ्यावे असे मला वाटते.
कुणाच्या का कोम्बड्याने, उजाडल्याशी कारण
16 Jun 2014 - 2:03 pm | अनुप ढेरे
काही आयुर्वेदिय औषधांवर यात कुठल्या कुठल्या वनस्तपी आहेत हे त्यांच्या मराठी आणि शास्त्रीय नावासकट लिहिलेले पाहिलेले आहे. आता हा नियम आहे का फक्त त्या मन्युअफॅक्चररनी केलं होतं ते नाही माहित.
16 Jun 2014 - 2:08 pm | प्रसाद१९७१
वनस्पती कुठल्या आहेत हे लिहुन काय उपयोग? ते मिश्रण गरम केल्यावर, गाळल्यावर, दुसर्या कशाशी मिक्स केल्यावर आत काय शिल्लक रहाते आणि कीती रहाते ते महत्वाचे आहे.
आणि वनस्पती म्हणजे काय? मुळ, खोड, साल, फुल , फळ नक्की काय? इतकेच काय फुल, फळ कीती पिकले आहे त्याप्रमाणे केमिकल बदलतात. तेंव्हा वनस्पती म्हणजे नक्की काय?
16 Jun 2014 - 2:13 pm | अनुप ढेरे
सहमत.
त्या झाडाचं जे काही नाव असेल ते. त्याचा नक्की कुठला भाग वापरला आहे त्याचा उल्लेख शास्त्रीय नावात होता का नाही ते नाही आठवत. पण मराठीमध्ये लिहिलेल्या भागात तरी नक्की मूळ का फळ ते लिहिले होते.
16 Jun 2014 - 3:27 pm | सुबोध खरे
ढेरे साहेब,
अडुळसाचा काढा/ रस/ कफ सिरप घेतात तेंव्हा त्यात अडुळसा अर्क असे लिहिलेले असते पण मुळ अडुळसा पानात किती टक्के रस आहे आणि आणि त्याचा अर्क कशा पद्धतीने काढलेला आहे याचे अचूक परिमाण कोणत्याही आयुर्वेदिक औषधात लिहिलेले नसते.तो भैषज रत्नावली,भाव प्रकाश किंवा रत्नाकर आयुर्वेद नीघंटू अशा मान्यता प्राप्त ग्रंथात दिल्याप्रमाणे काढलेला असतो. पण थोड्या फार प्रमाणात फरक असतोच.
दुर्दैवाने आयुर्वेदिक औषधांचे मानकीकरण आणि संशोधन आधुनिक विज्ञानाच्या काटेकोर पद्धतीप्रमाणे होताना सहसा आढळत नाही त्यामुळे त्या औषधांचे परिणाम वैद्याच्या अनुभवावर जास्त अवलंबून राहतात.
याच विरुद्ध अडुळसा वनस्पतीतून व्हासिसीन नावाचे द्रव्य वेगळे केले कि किती मिलीग्राम आहे ते स्पष्ट पणे मोजून तेवढाच डोस रुग्णाला नवीन डॉक्टर सुद्धा काटेकोर पणे देऊ शकतो.
आमच्या सदाफुलीमध्ये कर्करोगावर परिणामकारक औषध आहे म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात काहीच हशील नाही. त्यातून व्हिनब्लास्टीन नावाचे औषध् विलग करून Vinblastine 6 mg/m2 IV on days 1 and 15 अशा काटेकोर पणे देत येत नाही
असे मानकीकरण आणि संशोधन आधुनिक विज्ञानाच्या काटेकोर पद्धतीप्रमाणे आयुर्वेदिक औषधांवर होणे आवश्यक आहे तरच हे प्राचीन ज्ञान आधुनिक जगात मानवाच्या कल्याणासाठी वापरता येईल.
16 Jun 2014 - 9:04 pm | हाडक्या
+१ डॉक..!
अगदी अगदी..
हळदीच्या गोंधळानंतर खरेतर या संदर्भात आपल्याकडे काही सुरुवात देखील झाली होती सरकारी पातळीवर. ती टी के डी एल च्या या संकेत-स्थळावर पाहता येईल.
पण पुढे काय झाले हे नेहमीच्या सरकारी पद्धतीने ठाऊक नाही. ही तरी वेब-साईट तरी तीन चार वर्षे अद्ययावत केलेली नाहीये.
पुढे काही झाले तर पाहुयात.
16 Jun 2014 - 10:26 pm | अनुप ढेरे
निर्मिती प्रक्रियेचं हे होणं जरूरी आहे असं वाटतं म्हणजे एखाद्याला गुण आला नाही तरी चालेल पण औषधाचा त्रास होउ नाही
16 Jun 2014 - 2:11 pm | संजय क्षीरसागर
(किंवा प्रतिसाद देत असावेत) कारण ही गोष्ट:
अगदी उघड आहे!
16 Jun 2014 - 4:45 pm | आदिजोशी
औषधाचं नाव तर होमिओपॅथीच्या बाटल्यांवरही असतं. पण अमुक औषध घेतल्याने सर्दी बरी होते, पण ती कशी होते कुणाला ठाऊक आहे? त्या औषधाची शरीरात गेल्यावर काय केमिकल रिअॅक्शन होते हे किती जणं सांगू शकतात? अशा अर्थाने ते वाक्य होतं. उदा. काली फॉस ह्या औषधाच्या नावातच त्यातल्या क्षाराचं / औषधाचं वर्णन आहेच की.
16 Jun 2014 - 5:07 pm | संजय क्षीरसागर
मग मेडिकल सायन्स काय आहे? तिथे काय खोक्यावर छापलेली लक्षणं बघून मेडिसिन प्रिस्काइब करायला शिकवलं जातं का? डॉक्टरला औषधाचा शरीरावर नक्की काय परिणाम होईल हे माहिती नसतांना तो औषधं लिहून देतो आणि इंजेक्शनं ठोकतो का?
हे तुमचंच वाक्य आता तुम्हाला कसं वाटतं?
16 Jun 2014 - 5:14 pm | आदिजोशी
उगाच बोंबाबोंब नका करू. इथे किती जणं ह्याचा अर्थ आपल्यापैकी किती जणं असा आहे. किती डॉक्टरांना असा नाही. तसं वाटण्याइतपत मी बाळबोध नाही. इथे चर्चा करणार्यालोकांपैकी किती असा अर्थ आहे.
16 Jun 2014 - 5:24 pm | संजय क्षीरसागर
वॉट अ ज्योक! मग पेशंट आणि डॉक्टरमधे फरक काय राहिला? उगीच भंकस करण्यापेक्षा पहिल्यांदाच संयमित प्रतिसाद दिला असता तर ही वेळ आली नसती.
16 Jun 2014 - 12:01 pm | प्रसाद१९७१
मला शंका नाही तर खात्री आहे की होमिओपाथी म्हणजे भंपकपणा आहे. त्यासाठी मी कशाला खात्री करत बसु.
मी माझ्या कुठल्याही आजारावर होमिओपाथी चे औषध घेणार नाही, इतकी मला त्याच्या भंपकपणाबद्दल खात्री आहे.
तुम्हाला जर होमिओपाथी ची इतकी खात्री आहे तर तुम्ही modern medicine चे एक ही औषध घेउ नका ( कधीही )
16 Jun 2014 - 12:05 pm | आदिजोशी
ह. ह. पु. वा.
16 Jun 2014 - 12:21 pm | आदिजोशी
तुमच्या होमिओपाथी म्हणजे भंपकपणा आहे ह्या विधानाला काही शास्त्रीय आधार आहे का? काही विदा आहे का? तुम्ही ह्या कंक्ल्युझनला पोचण्याआधी काही चाचण्या केल्या आहेत का? केल्या असतील तर त्यांचे परिणाम काय आलेत? चाचण्यांचे आधार शासनमान्य होते का? असतील तर कोणते, नसतील तर कोणाच्या अधिकारात चाचण्या झाल्या? ज्या औषधांवर चाचण्या घेतल्या ती प्रमाणित होती का? जी काही उत्तरं मिळाली ती शासनमान्य संस्थेकडून प्रमाणित करून घेतली का?
16 Jun 2014 - 12:27 pm | प्रसाद१९७१
अहो होमिओपाथी भंपकपणा नाहीये हे सिद्ध करण्याचे Burden of Proof माझ्यावर नाहीये.
मला Modern Medicine ची औषधे शास्त्रिय कसोट्या घेउन प्रमाणित केली अशी वाटतात, त्यामुळे ती मी घेतो.
16 Jun 2014 - 12:33 pm | अनुप ढेरे
छान.
16 Jun 2014 - 12:42 pm | आदिजोशी
उद्या मी म्हणालो की न्यूटनचे नियम भंपक आहेत तर ते सिद्ध करायची जबाबदारी माझीच आहे.
तुम्हाला पर्यायी काय घ्यायचंय ते तुम्ही घ्या. उद्या सर्दी घालवण्यासाठी कोंबट पाण्यात रम घालून प्यायलात किंवा गोमुत्राने गुळण्या केल्यात तरी माझ्या बा चे काही जात नाही.
मला बस आवडत नाही म्हणून मी ट्रेन वापरणे ठीक आहे. पण शेकडो लोकांनी अनुभव घेतल्यावरही 'बस माझ्या गंतव्य स्थानी जातच नाही आणि बस नावाची कोणती वस्तू अस्तीत्वातच नाही' असं मी म्हणाल्यावर ती तशी नाही हे मलाच सिद्ध करायला हवे.
एखादी गोष्ट खोटी आहे असे ठासून सांगण्यासाठी ती तशी असल्याचे पुरावे सादर करायलाच हवेत. नाही तर तो नुसताच हवेतला गोळीबार ठरतो. जो आत्ता तुमचा आणि अनेकांचा चाललाय.
आणि होमीओपॅथी हा भंपकपणा असून ती बुवाबाजी, काळी जादू इत्यादिंच्या रांगेत बसवण्यायोग्य आहे असे आपले ठासून मत असल्यास सरकार ह्या शाखेचे शिक्षण देऊन त्याच्या पदव्या का देते हे सुद्धा सांगा. माझ्या माहितीत तरी कुणाला बुवाबाजीची अथवा काळ्या जादूची पदवी मिळाल्याचे माहिती नाही.
16 Jun 2014 - 12:48 pm | प्रसाद गोडबोले
मुंबईच्या लोकल मधे फिरुन पहा एकदा ... किमान १० 'गोल्डमेडॅलिस्ट' बाबांची जाहिरात सापडेल ... वशीकरण स्पेशालिस्ट .... हॅशटॅग "मेरे किये काम को काटनेवाले को नगद इनाम" =))
16 Jun 2014 - 12:40 pm | प्रसाद गोडबोले
चुकीचे लॉजिक !
आमच्य अंदाजा नुसार : " होमिओपॅथी भंपक आहे " हे सिध्द करण्याची गरज नाही तर "होमिओपॅथी भंपक नाही " हे सिध्द करण्याची गरज आहे
येथ H0 : होमिऑपॅथी भंपक नाही व्हर्सेस H1: होमिओपॅथी भंपक आहे. असे असले पाहिजे ...
( होमिऑपथी भंपक आहे हे म्हणण्याने आपण कोणाच्या आयुष्याशी खेळ करत नाहीये जे की होमिओपॅथी भंपक नाही असे म्हणण्याने होवु शकते जी की टाईप १ एर्रर आहे ! )
16 Jun 2014 - 12:47 pm | आदिजोशी
जर एखादी गोष्ट अनेक वर्ष अनेक लोकांना परिणाम देत आहे, तर ती तशी नाही व भंपक आहे असं म्हणणार्याने ती तशी सिद्ध करायला नको का?
पॄथ्वी सपाट नाही गोल आहे असं म्हणणार्यावर ती गोल असल्याचे पुरावे द्यायची जबाबदारी नाही का?
मिपावर शास्त्रज्ञ नसल्याने विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाणार नाहीत म्हणून होमिओपॅथी भंपक ठरत नाही. इथे किती जण क्रोसिन कसं काम करते हे शेवटच्या डिटेलपर्यंत सांगू शकतात?
16 Jun 2014 - 12:54 pm | प्रसाद गोडबोले
बरेच दिवस हायपॉथेसिस टेस्टींगचा अभ्यास केलेला नाहीये सो खात्रीने सांगु शकत नाही ...
पण "नल हायपॉथेसिस हे साधारणता नल अर्थात होमिऑपॅथीचा परिणाम = शुन्य ० व्हर्सेस अल्तरनेट : होमिऑपॅथीचा परिणाम शुन्य नाही "
असाच ठेवावे लागेल .
(सध्या खात्रीने सांगु नाही , बी.एस्सी ३ आणि एमे.स्सी १ ला अभ्यास केलाय आता ६ -७ वर्ष झाली )
16 Jun 2014 - 1:13 pm | बॅटमॅन
कन्फर्म आहे ओ प्रसादराव. नल हायपोथेसिस मांडलेला योग्यच आहे.
16 Jun 2014 - 1:06 pm | सुबोध खरे
http://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC1375230/
जोशी साहेब
लान्सेट नावाचे जगविख्यात नियतकालिक यांनी होमियोपथिच्या असंख्य संशोधनपर कागदांचे विश्लेषण करून ते साबुदाण्याच्या गोळ्यांपेक्षा जास्त प्रभावी नाही असे सिद्ध केले आहे त्यातील एक विदा मी वर दिली आहे. आपण होमियोपथी आणि लान्सेट गुगल करून पहा.
बाकी थोडे सावकाशीने.
16 Jun 2014 - 1:14 pm | गवि
लॅन्सेटपर्यंत कशाला जायचे..
अहो त्यात साखरेखेरीज द्रव्य असेल तर ना परिणामकारक ठरणार. हां आता साखरेतच अनेक औषधी गुण असतील तर मग म्हणणे काही नाही.
लॅन्सेट ही वैद्यकशास्त्रातली फार पुढची गोष्ट झाली. त्याने यात लक्ष घालण्याच्याही आधी निव्वळ भौतिकशास्त्राच्या आधारे क्वांटिटीविषयी केलेले साधे प्रश्न होमिओपथीला उत्तरु देत. असे प्रश्न इथे पूर्वी उपस्थित केलेले आहेत. त्यात टीका, आक्रस्ताळेपणा इ इ अजिबात नव्हता. तरीही तेवढ्या बेसिक प्रश्नांची उत्तरे अद्यापही समाधानकारक .. अगदी असमाधानकारकही... मिळालेली नाहीत.
बेसिक प्रश्नही न विचारता काही स्वीकारायचे म्हणजे कठीणच. होमिओपथीच्या गोळीत औषधाचा अंश असतो इतके जरी सिद्ध झाले तरी मी ते घेऊन त्याचा उपाय होईल हे मानायला तयार आहे. पण द्रव्यच नाही तरी उपाय होईल असे मानणे म्हणजे यातुवादाचा स्पर्श होतो.
असो.
सदरील लेखात प्रत्यक्ष द्रव्य पोटात जातेय असे उल्लेखावरुन वाटल्याने आनंद झाला. पण लगेच ते घासकडवी आले आणि त्यांनी फाईव्ह ग्रेनचा खडा टाकला.
16 Jun 2014 - 1:23 pm | आदिजोशी
गुगल केल्यावर होमिओपॅथीला विरोध करणारे आणि समर्थन देणारे असे दोन्ही रिझल्ट्स मिळाले.
होमिओपॅथीचा उपयोग होतो हे अनुभवसिद्ध असल्याने नाकारायचे कोणत्या आधारावर? आणि हे एखाद दोन वेळा आलेले अनुभव नाहीत (उदा. गंडा ओवाळणे, विष उतरवणे, इ.) कैक वर्षांचे, वेगवेगळ्या आजारांबाबतचे अनुभव आहेत.
16 Jun 2014 - 2:13 pm | स्पा
सुबोध खरे यांचे प्रतिसाद मस्तच
माझ्याबाबतीत होमिओपॅथी आणि आयुर्वेद दोन्हीचे बरीच वर्ष अनुभव घेऊनही गुण शून्य आला, तेच allopathy मुळे गुण भराभर आला , आणि रिक्वरी सॉलिड झाली.
त्यामुळे वरील दोन्ही प्याथ्यांवरचा विश्वास कायमचा उडालेला आहे , कारण आयुष्याची बरीच वर्षे आणि पैसे या उपचारांवर घालवली, वर आयुर्वेदिक औषधे इतकी भयंकर महाग असतात कि बस रे बस
इतर लोकांची जी काय लेवल ला जाऊन गरळ ओकणे आणि निंदा करणे सुरुये, धन्य वाटले :)
16 Jun 2014 - 5:05 pm | आदूबाळ
धागाकर्ते कुठायत?
16 Jun 2014 - 5:31 pm | संजय क्षीरसागर
मनःशांतीसाठी आता नक्की कोणतं औषध घ्यावं या विवंचनेत असतील! *smile*
16 Jun 2014 - 5:37 pm | प्रभाकर पेठकर
मला स्वतःला वयाच्या बाराव्या वर्षी टॉन्सिल्सचे 'ऑपरेशन करून घ्या' असा सल्ला मिळाला असताना होमिओपॅथीच्या औषधाने गुण आला. त्रास दूर झाला. आजतागायत त्रास नाही.
बाकी आमचे डॉक्टर आयुर्वेदीक औषधेच द्यायचे त्यानेच नेहमी आमच्या आख्या कुटुंबाला स्वास्थ प्राप्त झाले आहे.
काविळीच्या बाबतीत अनुभव जरा जास्त भयानक होता. माझा एक मित्र काविळ अंगावर काढल्याने आणि उशिरा हॉस्पिटलात दाखल केल्यामुळे ऐन तारुण्यात दगावला. त्या नंतर आठवड्याभरात मलाही काविळ झाली. अगदी मल निस्सारण खडूच्या रंगासारखे पांढरे फटक व्हायला लागले. पण अॅलोपॅथीबदल आठवड्याभरापूर्वीचा मित्राचा मृत्यू (अर्थात त्याने काविळ अंगावर काढून दवाखान्यात जायला उशिर केला होता त्यामुळे पॅथीला दोष देता येत नाही) अनुभवला असल्याने, मी कोणाच्या सांगण्यावरून एका वैद्याचे घरगुती औषध दोन आठवडे घेतले आणि तात्काळ गुण आला.
माझ्या एका मित्राला डोक्यात 'चाई' नांवाचा कांही त्वचारोग होऊन केस जात होते. डोक्यात टकलाचा पॅच तयार व्हायचा. तो डोक्यावर सर्वत्र फिरायचा. अॅलोपॅथीचा कांही उपयोग झाला नाही. त्याने बोरिवलीच्या वझिरा नाका येथील एका वैद्याचे औषध केले. तो कसलासा झाडपाल्याचा लेप लावायचा. आग व्हायची. कांही प्रमाणात तिथे फोडही यायचे पण महिन्याभरात 'चाई' पूर्ण पण अदृष्य झाली. आजतागायत काही त्रास नाही.
ह्यांना योगायोग म्हणा, प्लासिबो इफेक्ट म्हणा, शास्त्र म्हणा किंवा वैद्यकाचे ज्ञान म्हणा ऊपाचार परिणामकारक ठरले आहेत ही वस्तुस्थिती आहे.
16 Jun 2014 - 6:03 pm | llपुण्याचे पेशवेll
काविळीचे घरगुती औषध पुण्यात खुन्यामुरलीधर मंदिरातले खरे वैद्य द्यायचे. मला स्वतःला ५ वर्षाचा असताना झालेली कावीळ, भावाला १२ वर्षाचा असताना झालेली कावीळ वडीलाना ४२ वर्षी झालेली कावीळ केवळ खरे वैद्यांचे औषध घेऊन बरी झाली. पुण्यातले एक मान्यताप्राप्त अॅलोपथी डॉक्टरांनी औषधे दिली होती पण खरे वैद्यांचे औषध चालू ठेवा असेच सांगितले होते.
माझ्या मित्राच्या डोक्यावरील चाई शनिवार पेठेतल्या खडीकर वैद्यांनी आयुर्वेदीक औषधांनी बरी केली. ते आयुर्वेदीक औषधाचे इंजेक्षन देखील देत असत डोक्याच्या कातडीमधे. :-)
16 Jun 2014 - 5:52 pm | धन्या
होमिओपथी थोतांड आहे की नाही हे माहिती नाही. मात्र काही या अनुषंगाने काही प्रश्न मला नेहमी पडतात.
१. होमिओपथीला जर वैद्यकीय जगतात मान्यता नाही तर सरकारचे आरोग्यविज्ञान विद्यापीठ या विषयातील पदवी कसे काय देते? या विषयातील पदवीधरांना आपल्या व्यवसायाच्या बोर्डवर नावापुढे डॉ. कसे काय लिहू देते?
२. मी माझ्या आजवरच्या आयुष्यात जेव्हा जेव्हा मी आजारी पडलोय तेव्हा तेव्हा मी होमिओपथी डॉक्टरांकडेच गेलो आहे. त्यांच्या औषधाने मी बराही झालोय. ते कसे काय?
३. इथे होमिओपथीच्या नावाने शंख करणार्या किती जणांनी मटेरीया मेडिका वाचले आहे किंवा किमान चाळले आहे?
४. केवळ आपल्याला "गुण आला नाही" म्हणून तर विरोधी बाजू हिरीरीने मांडली जात नाही ना? व्यक्ती तितक्या प्रकृती* या न्यायाने "गुण आला नाही" हा प्रकार अॅलोपथी औषधांच्या बाबतीतही होऊ शकतो.
* इथे प्रकृती हा शब्द शरीरप्रकृती अशा अर्थी वापरला आहे, स्वभावधर्म अशा अर्थी नाही.
16 Jun 2014 - 6:19 pm | चित्रगुप्त
बायोकेमिक औषधांच्या नावाने निव्वळ मिल्क शुगर, आणि होमियोपाथिक औषधांच्या नावाने फक्त साख्रेच्या गोळ्यांमधे साधे आल्कोहोल घालून मी स्वतः अनेकदा दिलेले आहे (त्याचे तात्कालीन कारणही होते, ते म्हणजे मूळ औषधांची अनुलब्धता) गंमत म्हणजे त्या औषधांचाही परिणाम झालेला आहे. आमच्या दुकानावर संध्याकळच्या वेळी होमियोपॅथ मडळींची मैफल जमायची, त्यात मी अमूक रोग्याला अमूक औषधाच्या एकाच डोसाने ठीक केले, वगैरे गप्पा असत. ते ऐकून करमणूक होई.
17 Jun 2014 - 3:50 pm | गवि
चित्रगुप्तकाका.. अगदी राहावत नाही म्हणून या धाग्यावरची तुमची काही विधानं एकत्र करतो आहे. ती संदर्भ सोडून काढल्यासारखी वाटली तरी इथे याच पानावर ती विखुरलेली असल्याने कोणालाही ती मूळ विधानं पाहता येतील. विधानं खाली क्वोट करण्यापूर्वी मला मुख्यतः पडलेला प्रश्न असा की तुम्हाला होमिओपथीबद्दल नेमका कोणता मुद्दा किंवा बाजू मांडायचीय? तुम्ही कधी रुग्णाच्या, कधी विक्रेत्याच्या भूमिकेतून लिहिलेय. एकीकडे तुम्ही स्वतः अशी औषधे दिली आहेत असंही लिहिलंय. कधी तुम्ही तिला उपयोगी म्हणता, कधी प्लासेबो म्हणता, कधी त्यात काहीही औषध नसते हे मान्य करता, तरीही लक्षणे डीटेलवार विचारण्याचं/नोंदवण्याचं आणि तदनुसार औषध निवडण्याचं महत्व अधोरेखित करता, मधेच जादुई हद्दीत प्रवेश करता, मधेच अज्ञेयवाद स्वीकारता.
होमिओपथीविषयी तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय ?
>>>
गूढता, चमत्कार ?
काही संशयास्पद ? काळेबेरे ?
नाही ना सांगता येत टेस्टद्वारे? म्हणजे मूळ औषधाचा एक रेणूही त्या गोळ्या / द्रावणात नसतो हे स्पष्ट आहे ना?
मान्य.. प्लासेबोमुळे गुण येऊ शकतो. म्हणून मॉडर्न मेडिसिनमधे टेस्ट करताना औषध विरुद्ध प्लासेबो अशी करुन त्याचे निकाल प्लासेबो गुणांपेक्षा किती अधिक आले ते नोंदवलं जातं. होमिओपथीमधे प्लासेबो हा एक इफेक्ट असू शकतोच. आणि अन्यत्र सगळीकडे घेतला जाणारा आक्षेप असा की लहान बाळं, प्राणी यांना प्लासेबो हा मानसिक इफेक्ट कसा होईल.. तर तसं म्हणणं नाहीच आहे. प्रौढ मनुष्यव्यक्तीबाबत अनेक केसेसमधे प्लासेबो आणि प्राणी, लहान मुले आणि उर्वरित प्रौढांमधे काकतालीय न्याय, शरीराकडून आपोआप कालानुसार रोगनिवारण होणे अशी कारणं असू शकतात. लहान मुलांची व्हायरल सर्दी कोणत्याच औषधाने बरी होत नाही. ती व्हायरसचा कोर्स पूर्ण झाल्यावर बरी होते. मधल्या काळात साखरगोळी किंवा अॅलोपथी किंवा कारल्याचा रस किंवा अन्य काही घेतले किंवा न घेतले तरी मूळ रोगात फरक पडत नाही. सात दिवसांनी सर्दी आपापतः बरी झाल्यावर श्रेय कारल्याच्या रसाला किंवा अन्य कशालाही देता येते.
????!!!
पण सर्वत्र तोच सिद्धांत प्रचलित आहे. त्याला कोणी आल्टर्नेट सुचवलेला नाही.
ओके.. आणि मग..
आँ? नुसत्या साखरगोळ्याच द्यायच्या तर लक्षणांचा तपशील विचारुन नोंदवण्याचे प्रयोजन काय? पेशंटला आपली चौकशी झाली असा आनंद मिळण्यासाठी चार जुजबी प्रश्न बास असतात. किंवा नाडी पकडून बसावं घटकाभर. शेवटी रिकामी साखरगोळी देऊनही उपाय होत असेल तर मग आधीची डीटेलवारी कशाला?
का करमणूक होई ? त्यात बढाई असे का? की नुसत्या गोळ्यांनी प्लासेबो इफेक्ट होण्याइतके मर्यादित उपचार देताना डॉक्टर्स उगीच मी अमुक दिले, तमुक डोस दिला असे म्हणत असल्याने करमणूक व्हायची?
गोंधळात पाडणारी विधाने दिसली म्हणून केवळ विचारले. जर होमिओपथीमधे काही गूढरम्य नसून त्यामागे औषधाची दाखवून देता येणारी क्वांटिटी असते इतकी साधी खात्री किंवा खुलासा जरी केला तरी औषधांच्या प्रत्यक्ष गुणांविषयी माझ्याकडून काहीही भाष्य नसेल आणि मी होमिओपथीची उपयुक्तता तत्वतः मान्य करीन. पण हे असे साधे शंकासमाधान होण्याऐवजी आजपर्यंत व्यक्तीसापेक्ष अनुभवांच्या अधिकाधिक नोंदीच सांगितल्या जातात.
असो.
17 Jun 2014 - 4:24 pm | प्रसाद१९७१
मला पण हेच सर्व प्रश्न पडले होते, पण टंकायचा कंटाळा आला.
17 Jun 2014 - 5:50 pm | चित्रगुप्त
मला काय काय म्हणायचं आहे, ते मी वेगवेगळ्या प्रतिसादातून लिहिलेलं आहेच, परंतु बुद्धीमान वाचकांना त्यातून जी एक तार्किक सुसंगती अपेक्षित असते, तिच्या अभावी मला नेमकं काय म्हणायचं आहे, असा प्रश्न पडलेला असावा.
माझ्या मते जीवनातील प्रत्येक गोष्टच बरीच गुंतागुंतीची असते. जसजसा आपला अनुभव वाढत जातो, तसतसे परस्पर-विरुद्ध गोष्टींच्या ताण्या-बाण्यातून ती आकार घेत असल्याचे जाणवू लागते, आणि मग अमूकच एक बाजू खरी असायला हवी, हा आग्रह क्षीण होत जातो.
आपल्या मनो-शरीर रचनेत - (वाटल्यास यात 'आत्मिक' हा शब्द पण घालावा) रोगांना बळी पडण्याची, आणि त्याचबरोबर त्या रोगांवर मात करून त्यातून सुटका करून घेण्याचीही क्षमता वा यंत्रणा असतेच. या यंत्रणेला कश्यानेतरी चालना मिळाली, तर ती जोमाने कार्य करते. सकारात्मक वा नकारात्मक विचारांमुळे, उपयोगी वा हानिकारक औषधांच्या प्रभावामुळे, श्रद्धा वा ठाम समजुतीमुळे, भितीमुळे, प्रेमामुळे, प्रोत्साहन वा खच्चीकरणामुळे, संगीत वा गोंगाटामुळे, सुवास वा दुर्गंध, सुंदर स्वच्छ वातावरण वा घाणेरडे वातावरण अश्या अनेक प्रभावांमुळे आपली मनस्थिती, स्वास्थ्य, उत्साह, शक्ती घडत वा बिघडत असते.
या नैसर्गिक यंत्रणेला चालना मिळण्यासाठी 'स्वयंसूचना' मिळणे हे महत्वाचे असते. ती कश्यातूनही मिळू शकेल. त्यामुळे 'औषध' नसलेले औषध, कुण्या स्वामींनी दिलेला प्रसाद वा आशिर्वाद, नुस्ते पाणी पिणे, आपण बरे होत आहोत -- वा रुग्ण होत आहोत अशी निव्वळ कल्पना, कोणत्यातरी पॅथीचे औषध, हवापालट, मित्रांचा वा प्रिय व्यक्तीचा सहवास वा विरह, अश्या अनेक गोष्टींमधून मिळणार्या स्वयंसूचनांमुळे ही यंत्रणा कामाला लागते.
एका अर्थी ही यंत्रणा शिडीसारखी वा जिन्यासारखी असते, असे म्हणता येईल. त्या शिडीने वरही जाता येते, आणि खालीही उतरता येते. फक्त आपण कोणत्या दिशेने जात आहोत, यावर ते अवलंबून असते.
समजा, डॉक्टर देत असलेले एकादे होमियोपाथी औषध हे निव्वळ साखर्/अल्कोहोल आहे. परंतु ते दिवसातून चारदा घेतले, तर तितक्यांदा यंत्रणेला स्वयंसूचना मिळते. त्यातून डॉक्टर नावाजलेला असणे, त्याच्याकडील गर्दी व लोकांचा त्याच्यावर असलेला विश्वास, डॉक्टराने "तुम्ही आता अगदी योग्य जागी आलेले आहात, आता तुम्ही बरे होणारच" असा दिलेला दिलासा, अनेक प्रश्न बारकाईने विचारून, त्यानंतर औषध दिल्याने पेशंटची पटणारी खात्री, डॉक्टराचे गोड बोलणे, तो पेशंटास देत असलेला आदर-सन्मान, अश्या अनेक गोष्टींमधून ती स्वयंसूचना अधिकाधिक प्रबळ होत जाते, आणि परिणामकारक ठरते.
समजा मी ठणठणीत असताना अमूक-पाथीची खिल्ली उडवणारापैकी असलो, तरी आजारी पडल्यावर कसेही करून मला लवकरात लवकर बरे व्हायचे असते, या गरजेतून माझी मनस्थिती वा भूमिका बदलेली असते, त्यामुळे माझ्यावर वरील सर्व गोष्टींचा प्रभाव पडतो. अगदी नास्तिक असणारे सुद्धा अन्य सर्व उपाय निरुपयोगी ठरल्यावर गंडे-दोरे, मंत्र-तंत्र इ. कडे सुद्धा वळतात, असे बघण्यात येते, कारण तेंव्हा या गोष्टी खर्या की खोट्या, यापेक्षा संकटातून मुक्त होणे, हे महत्वाचे वाटत असते.
17 Jun 2014 - 6:43 pm | असंका
आपण स्वतःच वर लिहिल्याप्रमाणे आपण फार जवळून हे सर्व बघितले आहे. काही काही गैरप्रकारही आपल्याला परीचित आहेत. पण आपण असे तर म्हणत नाही ना, की होमिओपॅथिक औषध असे कुठेच मिळत नाही? एखादवेळी औषध उपलब्ध नसणे आणि त्यामुळे वेळ मारून नेणे वेगळे.
वरच्या भडीमाराने आपण गोंधळून जाऊन मनाविरूद्ध असे लिहिले आहेत का? कारण आपण सरळ सरळ सर्व मानसिक असल्याचे मान्य केले आहे. त्याहून कहर म्हणजे आपण होमिओपॅथीला पार गंडे दोर्याच्या बरोबरीला आणून बसवले आहे. ४ ते ५ वर्षे अभ्यास करून जी डॉ.ची पदवी होमिओपॅथ मिळवतात त्यांचा आपण अशा पद्धतीने सन्मान करताय का?
आपण स्वतः याचा जवळून अभ्यास केलेला आहे असं वाटतं. मग मला सांगा, हे सर्व जर स्वयंसूचनेवरच अवलंबून असेल, तर
१. कधी पहिल्याच उपाययोजनेने गुण येतो, तर कधी औषध बदलून दिल्यावर हे कसे?
२. एकदा तर एका डॉक्टरनी मला जास्तीत जास्त दोन प्रश्न विचारून औषध दिले होते. मग दिलासा देण्याचा प्रश्नच कुठे येतो?
३. एकदा तर लक्षणे अधिक तीव्र झाली होती. (प्रूव्हिंग). मला 'ही' सूचना कधी मिळाली नव्हती. मग औषध बदलल्यावर तत्काळ आराम मिळाला.
आता 'औषधाची मात्रा पोटात जाते' असे कुठ्ल्या टेस्टमध्ये दिसत नाही, म्हणून काय मला जे बरे वाटत आहे तेच मानसिक आहे असे म्हणायचे का?
17 Jun 2014 - 7:17 pm | चित्रगुप्त
वर म्हटल्यप्रमाणे हे सर्व प्रकरण फार जटिल आहे, आणि अमूकच खरे, असे सांगणे कठीण आहे. मनो-शारीरिक यंत्रणेला चालना मिळणे गरजेचे असते. ती औषधाच्या प्रभावाने वा अन्य प्रभावांमुळेही मिळू शकते. औषध कंपनीकडून माल पाठवण्यात होणारी दिरंगाई व त्याकाळी कलकत्त्याहून सामान पोचण्यास लागणारा वेळ इ. मुळे खुद्द एजंट आम्हाला साधी मिल्कशुगर वगैरे देण्यास सांगत. यावरून मला अशी शंका यायची की मुळात कंपनी तरी खरेखुरे औषध बनवते की नाही ? ४-५ वर्षे अभ्यास करून डिग्री मिळवली, पण मुळात औषधेच जर बोगस असली, तर कोण काय करणार? अश्या औषधांचाही परिणाम जर होत असेल, तर तो स्वयंसूचनेचाच प्रभाव म्हणावा लागेल. अर्थात औषध कंपनीत काम करणारेच यावर प्रकाश टाकू शकतील. त्याबद्दल माझ्याकडे खात्रीची माहिती नाही. दुसरे म्हणजे होमियोपाथीच्या दुकानाचा माझा संबंध तुटून आता चाळीस वर्षे झालेली आहेत. त्यामुळे मला अलिकडचे काही ठाऊक नाही.
मुळात एकादी व्याधि होते म्हणजे नेमके काय घडते, आणि ती बरी होणे म्हणजे काय, याबद्दलही वेगवेगळी मते/सिद्धांत आहेत. आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून बघता कफ वात पित्त यातील असंतुलनाला व्याधि म्हटले जाते, वगैरे.
माझ्यापुरते बोलायचे झाले, तर मला अॅलोपाथीचा बहुतेकदा वाईटच अनुभव आलेला आहे.
17 Jun 2014 - 7:54 pm | असंका
अहो साहेब जे काय जटील आहे, ते वैज्ञानिक लोक बघून घेतील. आपण सांगा,की आपण ज्या गोष्टींबद्द्ल इथे लिहित आहात, ते अपवादात्मक होते की अगदी दर १० मध्ये ३, ४ वेळा इतके सर्रास चालते...!
माझ्या अनुभवाने औषध घेतल्याने योग्य/अयोग्य औषधानुसार लक्षणे कमी जास्त अशी दोन्ही होतात. सर्व मानसिक असते, तर लक्षणे वाढली कशी असती, आणि मग कमी कशी झाली असती? तेही कुणीही सुचना न देता!
आता अजून पर्यंत समजल्या नाहित अशा काही गोष्टी असतील, म्हणून काय आम्हाला आलेला गुणच खोटा म्हणायचा?
17 Jun 2014 - 7:58 pm | चित्रगुप्त
....अपवादात्मक होते..
बाकी मी स्वतः अजून होमियोपाथीचीच औषधे घेतो, हे लिहिले आहेच.
17 Jun 2014 - 8:00 pm | असंका
यस्स्स्स! मग झालं तर. मॅजिकल वॉटर झिंदाबाद..
17 Jun 2014 - 9:04 pm | असंका
असं म्हणतात की विमानचालन शास्त्रानुसार (law of aviation) भुंगा उडू शकत नाही. अनेक वर्षे अनेक लोक हे सत्यच समजून चालले होते. सर्वसामान्य पद्धतीने ही गोष्ट मी पूर्वीच ऐकली होती, आणि ती खरी नाही हेही मला जाणवले होते. गणितात गृहितके चुकली की चुकीचे निष्कर्ष मिळतात तसं. ज्या शास्त्रानुसार लोक भुंग्याच्या उडण्याचा अभ्यास करत होते, ते तिथे लागू नव्हते. विमानचालन शास्त्र विमानांच्या स्थिर, गुळगुळीत आणि मोठ्या पंखांसाठी आहे. भुंग्यांचे पंख वेगळे असतात. ते खडबडीत, लवचिक, आणि सतत हलणारे असतात. पण मग त्याचे गणित तर मांडता यायला हवेच. हवे तर गृहितके बदला. साहेब मला सांगा हे गणित आता शेवटी सोडवले गेले आहे का? आणि जोपर्यंत ते सोडवले गेले नव्हते तोपर्यंत भुंगे जादूने उडत होते का?( त्या विषयातला आपला अभ्यास आणि अधिकार असावा असे आपल्या आधीच्या एका लेखावरनं माझे मत आहे. वैयक्तिक होत असल्यास क्षमस्व.)
एखादी गोष्ट अगदी सर्वत्र होते तर आहे, पण का होते हे कळत नाही! फक्त का होते ते कळत नाही म्हणून "असं काही होतंच नाही आहे, फक्त आपल्याला असं वाटतंय की असं होत आहे" असं म्हणायचे झाल्यास अगदी कालपर्यंत "भुंगे उडत नाहीचेत...फक्त आपल्याला असं वाटतंय की भुंगे उडत आहेत" असं म्हणावं लागलं असतं.
17 Jun 2014 - 9:51 pm | राजेश घासकडवी
तुम्ही एक गहन महत्त्वाचा प्रश्न मांडला आहे, ज्याला उत्तर देणं आवश्यक आहे.
प्रथम विमानशास्त्राबद्दल जी विधानं आहेत ती बघू. भुंगा विमानशास्त्रानुसार 'उडू शकत नाही' असं कोणीही वैज्ञानिकाने गमतीखेरीज म्हटलं नसावं.
तुम्हाला काय म्हणायचं आहे हे समजतं आहे, पण 'शास्त्र लागू नाही' हे टोकाचं, म्हणून चुकीचं विधान ठरतं. 'इतका जटील प्रश्न सोडवण्यासाठी लागणारी यंत्रणा, मॉडेल्स अजून विकसित झाली नाहीत' हे विधान जास्त बरोबर आहे. उदाहरणार्थ, तीन तारे एकमेकांच्या गुरुत्वीय बलांमुळे कसे फिरतील हा सर्वसाधारण प्रश्न सुटलेला नाही. कारण त्याचं गणित खूप किचकट आहे. दोन तारे आणि एक छोटासा ग्रह, किंवा ताऱ्याभोवती फिरणारा ग्रह, आणि त्याला असलेला उपग्रह अशा काही विशिष्ट बाबतीत समाधानकारक उत्तरं सापडतात. पण म्हणून तीन ताऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी 'न्यूटनचे नियम असलेलं शास्त्रच चुकीचं आहे' किंवा 'ते उत्तर सापडेपर्यंत कुठचे तीन तारे एकमेकांभोवती फिरतच नव्हते काय?' असा प्रश्न विचारणं बरोबर नाही. अर्थात हा थोडा तांत्रिक मुद्दा झाला.
तुमचा रोख साधारण असा दिसतो की 'भुंग्याच्या उडण्याचं गणित आपल्याला नीट मांडता येत नाही, म्हणजे भुंगा उडतच नाही असं म्हणणं चुकीचं आहे.' हा मुद्दा स्वीकारार्ह आहे आहे. मात्र या बाबतीत त्याचं समांतर विधान असं होतं
'होमिओपथीचा फायदा होतो तो कसा होतो ते कळत नाही, म्हणून होमिओपथीमध्ये तथ्यच नाही असं म्हणणं चुकीचं आहे.' हे विधान मात्र अपुरं पडतं. कारण 'भुंग्याचं उडणं' जितकं उघड आहे तितकं 'होमिओपथीचं कार्य' सिद्ध नाही. कारण इथे कार्य होणं म्हणजे काय? असा प्रश्न येतो. आणि औषधांच्या बाबतीत - 'प्लासिबोपेक्षा अधिक परिणामकारक ते औषध' अशी व्याख्या आहे. अशी परिणामकारकतेची चाचणी जोवर एखादं द्रव्य पास करत नाही, तोपर्यंत त्याला औषध म्हणणं योग्य नाही. भुंग्यांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर उडणं आणि उडण्याचा भास यामध्ये फरक करायला हवा. पारदर्शक प्लास्टिकच्या दोऱ्याने टांगलेला भुंगा वाऱ्यामुळे उडल्याचा भास निर्माण करतोच. असा भास निर्माण करणारे खोटे कीटक आणि खरोखर उडणारे भुंगे यांत फरक करायला हवा. त्यासाठी काही परिणामकारक चाचण्या आहेत. त्या जर होमिओपथीच्या औषधांनी पास केल्या तर कोणीच तक्रार करणार नाही. मात्र ही औषधं बनवणारे लोक अशा परीक्षांना उतरण्याची तयारी दाखवत नाहीत. वर त्यांच्या डायल्यूशनमुळे औषधाचा एकही रेणू शिल्लक नाही, अशी द्रावणं विकतात. म्हणून तक्रार असते.
17 Jun 2014 - 10:01 pm | चैतन्य ईन्या
जगात सगळीकडचे भुंगे उडतात, पण सगळ्याच होमेपदी लाभते असे नाही. अर्थात हेच तत्व मोडर्ण मेडिसिन बाबत पण आहे पण निदान ते असा म्हणतात की अह्म्ला अजून अभ्यास करायचा आहे. होमेपदी लोकांचे तसे नसते. बाकी बरेच आजार औषध नाही घेतले तरी लवकर बरे होतात पण काहीतरी घेतल्यामुळे बरे होतो असा आपला समाज असतो.
17 Jun 2014 - 11:29 pm | चित्रगुप्त
अगदी खरे. खरेतर पुष्कळसे आजार आपोआपच बरे होत असतात. उपायाला श्रेय मिळते एवढेच.
18 Jun 2014 - 12:51 pm | असंका
मी जे बोली भाषेत म्हणालो ते तांत्रिक भाषेत आपण मलाच परत सांगितलेत. पण एव्ढी तांत्रिक भाषा मला झेपत नाही. मी पार हरवून गेलो आप्ल्या भडीमारात. तेव्हा आधी थोडी सुसंगती लावू-(इतर उदाहरणे बाजूला ठेवू. मी काही वैज्ञानिक नाही.)
भुंग्याच्या उदाहरणाबाबतीत मॉडेल विकसित नसणे हे आप्ल्याला पुरेसे वाटते, पण होमिओपॅथीत मात्र बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर-
हे असं का बरं? कदाचित त्या चाचण्यापण तेव्ढ्या विकसित नसतील.
मी जे जे औषध घेतले ते योग्य आणि अयोग्य अशा दोन्ही पद्धतींनी माझ्यावर प्रूव्ह झाले. माझ्या शरीराने, जसं कुणी तरी खूप आधी लिहून ठेवलं होतं तसे परीणाम (त्याआधी कुणी न सांगता-) अनुभवलें, जरी इतर अनेक जणांना ते अपूरं वाटलं तरी हे भास नव्हेत. माझ्यापुरतं आणि माझ्या अनुभवातल्या अनेकांच्या बाबतीतही, ते कार्य सिद्ध झाले आहे. अगदी दोन्ही पद्धतींनी. दुष्परीणाम आणि अपेक्षित परीणाम, दोन्ही.
19 Jun 2014 - 12:23 am | राजेश घासकडवी
चाचण्या म्हणजे काही रासायनिक चाचण्या नसतात. एका व्यक्तीच्या अनुभवापेक्षा अनेकांचा अनुभव मोजण्याची प्रस्थापित पद्धत असते. डबल ब्लाइंड टेस्ट विषयी वाचून पहा.
होमिओपथीच्या गोळ्यांमध्ये 'औषध' किती असतं हे इथे वाचून पहा.
30C Dilution - advocated by Hahnemann for most purposes: on average, this would require giving two billion doses per second to six billion people for 4 billion years to deliver a single molecule of the original material to any patient.
19 Jun 2014 - 12:23 pm | गवि
"औषधी" द्रव्य टप्प्याटप्प्याने विरळ करताना ते जोराजोराने हलवण्याच्या प्रक्रियेमुळे त्या औषधातले गुण स्पिरिट लाईक इफेक्टने द्रावकात (पाणी / अल्कोहोल इ) उतरतात आणि मूळ पदार्थ नाहीसा झाला तरी टिकून राहतात, अशी स्पेसिफिक थिअरी होमिओपथीच्या प्रवर्तकाने मांडली आहे.
भौतिकशास्त्र / रसायनशास्त्र या सध्या जास्तीतजास्त परिपूर्ण कारणे देऊ शकणार्या शास्त्रांच्या नियमानुसार पाण्यात / अल्कोहोलमधे मूळ पदार्थ शिल्लक न राहिल्यावर असा कोणताही "गुणधर्म" अथवा "छाप", अथवा "आत्मिक तत्व" तरंगत अथवा विरघळून राहात नसते.
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यांचेही नियम /गृहीतके बदलतात, ते कदाचित पूर्ण बदलतील किंवा नष्ट होतील. पण आजरोजी मूळ पदार्थ अस्तित्वातच नसताना त्याचे गुण जणू चैतन्याच्या किंवा आत्म्याच्या रुपात पाण्यात टिकून राहतात हे मानणे म्हणजे मानवी कक्षेपलीकडले काही मानून स्वतःवर उपचार करणे असे आहे.
एखादी गोष्ट सिद्ध होईपर्यंत ती नाहीच असं म्हणता येत नाही..अगदी कबूल.. हवा दिसत नाही पण असते.. पण आपण रोजच्या जगण्यात रस्त्यात धोंडा दिसत नसतानाही तो असेलच असं म्हणून मिनिटामिनिटाला वळसे घालत जात नाही.
तदनुसार आपल्या आरोग्याशी संबंधित निर्णय घेताना बेनिफिट ऑफ डाउटवर आधारित शास्त्रांकडे न वळता खणखणीत वाजवून सिद्ध होणार्या शास्त्राकडे जाणं हिताचं आहे.
त्याउपर पुढे कधीतरी काहीतरी शोध लागेल, गृहीतकं बदलतील आणि भूत आत्मा या गोष्टीही सत्य आहेत हे सिद्ध होईल म्हणून आजच त्या खर्या मानणे हा प्रकार माझ्या समजुतीबाहेरचा आहे.
तत्वतः उद्या काय सिद्ध होईल ते सांगता येत नसल्याने होमिओपथी ही कध्धी कध्धी सिद्ध होणारच नाही असं आचरट प्रतिपादन मी करु इच्छित नाही.
पण आजरोजी ते जी थियरी ढळढळीतपणे मानताहेत ती म्हणजे : क्वांटिटी नसलेलं "औषध" घेऊन "स्पिरिट लाईक" गुणधर्म पाण्यात उतरलेले असणं- या थिअरीवर विश्वास ठेवून मग होमिओपथी जरुर घ्यावी. फक्त इन दॅट केस, त्यात पुरेसा जादूवाद आहे याची जाणीव असावी इतकंच अधोरेखित करतो.
अंगारा, नजर सुरक्षा कवच इ इ हे अशा तर्कापलीकडल्या गोष्टीवर विश्वास ठेवून स्वीकारले जातात. शरीराला रोगापासून मुक्त करणारी औषधोपचार पद्धती स्वीकारताना आपण नेमके काय स्वीकारतो आहोत याची जाणीव ठेवून स्वीकारले तर कोणाचीच काहीच हरकत नसावी.
माझा इनफॅक्ट अंधश्रद्धेलाही विरोध नाही. नजर सुरक्षा पेंडंट योग्य वाटल्यास जरुर घालावे पण माझी इच्छा इतकीच असते की आपण काय घालतोय ते किमान तर्कदृष्ट्या माहीत असावं. न कळलेलं बरंच काही आहे म्हणून काहीही खरं मानणं योग्य आहे का?
अधिक स्पष्ट करायचं तर नजर सुरक्षा कवचाच्या मटेरियलमधे असलेल्या गुणामुळे वाईट नजरेतली "निगेटिव्ह" एनर्जी दूर लोटली जाते (रिफ्लेक्शन किंवा तत्सम प्रक्रियेने..) किंवा समोरच्या वाईट नजरवाल्यावरच उलट रोखली जाते अशी जी काही थियरी असेल ती तुम्हाला माहीत असेल आणि पटली तर जरुर वापरा. पण पेंडंटचा प्रवर्तक काय तर्काने असा दावा करतोय ते तुम्हाला माहीत पाहिजे. उगीच अमुक पेंडंट देणारे गुरुजी फार थोर आहेत किंवा तमुकला पेंडंटचा चांगला अनुभव आला.. मग त्यामागच्या थियरीला मारो गोली असं नसावं असं माझं मत आहे.
होमिओपथीचं मूळ तत्व काय आहे ते ती घेणार्या बर्याच जणांना माहीत नसतं. ते नीट माहीत असेल आणि तरी घेत असतील त्यांच्याबाबतीत काही म्हणणं नाहीच.
तरी, तुम्हाला होमिओपथी लागू पडते अशी तुमची खात्री आहे ना? मग तुम्ही जरुर घेत चला. माझी सर्व विधाने आणि प्रश्न तुमच्यापुरते रद्दबातल समजा (जशी होमिओपथी तुमच्यापुरती काम करतेय तसं..) :)
हा प्रतिसाद राघांच्या प्रतिसादाच्या निमित्ताने मूळ प्रश्नाला आहे. राघांना नाही.
19 Jun 2014 - 1:41 pm | प्रसाद१९७१
मस्त च गवि साहेब
19 Jun 2014 - 2:14 pm | बॅटमॅन
गविंचा प्रतिसाद उत्तम आहेच.
पण धागाकर्ते डॉक्टरमहाशय का बरे गायब आहेत? त्यांची मतं काय आहेत? की फक्त मजा पाहण्यातच इंट्रेस आहे?
19 Jun 2014 - 4:50 pm | हाडक्या
( ता. क. : काहीही माहिती नसल्याने आम्ही या चर्चेमध्ये कोणत्याही बाजूस नाही)
गवि साहेब एक शंका..
इथे
हा आक्षेप आहे का ?
नाही म्हणजे माझा प्रश्न असा आहे की, जर औषधाची मात्रा वाढवली आणि असे समजू की रुग्णाच्या शरिरात हे औषध पुरेश्या प्रमाणात (हे प्रमाण किती हे बाजूला ठेवू) पोचले तर परिणाम होतो का ? अथवा परिणाम होतो हे तुम्हाला इथे मान्य आहे का ?
19 Jun 2014 - 5:21 pm | गवि
चोक्कस.
हो.
द्रव्य डिटेक्टेबल प्रमाणात शरीरात जात असेल तर परिणाम होतो की नाही हे पाहण्याची पात्रता त्यात ऑपॉप येऊन ते औषध मी जरुर घेईन. उपयोग होतो का हा नंतरचा प्रश्न झाला. त्याविषयी भाष्य करण्याचा मला अधिकार नाही म्हणून मी तो उपयोग आगोदरच मान्य केला आहे. इतरत्रही तुम्हाला हे लिहिलेलं आढळेल की औषध गुणकारी असेल हे मी गृहीतच धरतो. पण ते शरीरात जातच नाही हाच आक्षेप आहे.