"त्याचं" येणं मला फारसं रुचलं नव्हतं ...काळ्या रंगाचा ,उंचापुरा , कुरळे केस, इनशर्ट... आणि त्यातून अडचणीचं म्हणजे तो चक्क बूट घालून घरात आला होता...
कोण गं तो? ...मी संगीताला विचारलं . संगीता ही म्हात्रेकाकांची एकुलती एक मुलगी .तसा मधूनमधून मुंबईला गेल्यावर मी म्हात्रेकाकांकडे उतरत असे. "तो" आला की म्हात्रेकाकांची वृद्ध आई त्याला शिव्या घालत असे . नशीब त्याला मराठी अजिबात कळत नव्हतं.... म्हात्रे आणि त्यांची मिसेस घरात असले की सतत "त्या"च्याविशयीच चर्चा सुरू असे.
तो मित्र आहे माझा...संगीता म्हणाली.अगं पण मित्र झाला म्हणून असा वेळी अवेळी घरी?...मी विचारलं... तर म्हणाली, अरे बाबा तो मला चांगली नोकरी लावून देणार आहे. म्हणूण मोठ्या साहेबाला भेटायला गेलो होतो आम्ही ... तिकदून येताना उशीर झाला......दुसर्या दिवशी संगीता संध्याकाळी ६ वाजता बाहेर पडली ,ती परतली रात्री १२ वाजता... असे प्रकार सुरू होते.
मी अधूनमधून मुंबईला जायचो तेव्हा म्हात्रेकाका भेटायचे .संगीताची विचारपूस केली तर "आता सगळे देवाच्या हातात आहे बाबा "असे म्हणायचे . खरं सांगायचं तर संगीता त्या नायजेरियन युवकाच्या प्रेमाच्या जाळ्यात पूर्ण फसली होती. आणि परिस्थिती म्हात्रेंच्या पूर्ण हाताबाहेर गेलेली होती.
अन एके दिवशी दुपारी म्हात्रेकाकांचा फोन आला . ते अक्षरशः रडत होते. " अरे गेली रे..शेवटी त्या बदमाशाने फितवली तिला...४ दिवस झाले ,पत्ता नाही पोरीचा"...म्हणून हंबरडा फोडला...
मी कशीबशी त्यांची समजूत काढली आणि फोन ठेवला... आणि लगेच संध्याकाळची मुंबईची गाडी पकडली. सकाळी म्हात्रेकाकांकडे हजर झालो. माझा एक शाळासोबती सचिन इन्स्पेक्टर होता मुंबई पोलिसमध्ये! काकाना घेवून तडक सचिनकडे गेलो आणि संगीताचा फोटो आणि माहिती सचिनला दिली आणि "त्या" नायजेरियन युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला . नशिबाने त्याचा एक फोटो संगीताच्या बॅगमध्ये सापडला होता...
सचिनने लगेच आपले काँटॅक्ट्स वापरून एअरपोर्ट आणि इतर मोक्याच्या जागेवर फिल्डिंग लावली. खबरे साथीला होतेच! दोनच दिवसात संगीताचा ठावठिकाणा सापडला. "त्या"लाही अटक झाली. चौकशी झाली तेव्हा वेगळेच सत्य समोर आले.
तो युसुफ अशा अनेक भोळ्याभाबड्या मुलीना लग्नाचे आश्वासन देऊन परदेशात नेत असे ,आणि तिकडे गेल्यावर मुलीना एजंटना विकून फरार होई. आजपर्यंत अशा कित्येक निष्पाप मुली या जाळ्यात अलगद फसल्या होत्या. संगीताचे नशीब बलवत्तर म्हणून ती वाचली होती...
घरातून पळवून नेल्यावर युसुफने तिला धर्म बदलायला लावला. निकाह केला , आणि नवीन नावाने पासपोर्ट देखील बनवायला टाकला होता. महिन्याभरात पासपोर्ट मिळताच तो तिला घेउन पळणार होता. ..
संगीता घरी तर आली ,पण पुढे काय? अशा वाह्यात पोरीला कोण पदरात घेईल? या चिंतेने काका बेजार होते...
पण इथेही पुन्हा सचिनच उपयोगी पडला. त्याच्या ओळखीने एका चांगल्या कंपनीत सेक्रेटरी ची नोकरी मिळाली. आणि आश्चर्य म्हणजे तिचा बॉस तिच्यावर भाळला, रीतसर लग्नाची मागणी घातली ...
पण म्हात्रेनी बॉसला एकांतात गाठून सर्व पूर्वेतिहास सांगितला. तरीही तिला स्वीकारायला तो मोठया मनाने तयार झाला. आणि लगेचच त्यांचे शुभमंगल झाले!
एक "लव्ह-जिहाद" रोखल्याचे समाधान मात्र मला मिळाले!
(१९९० च्या दशकातील सत्यघटनेवर आधारित. पात्रे काल्पनिक)
प्रतिक्रिया
15 Jun 2014 - 12:47 am | आयुर्हित
चांगली नोकरीचे आमिष व लग्नाचे आश्वासन या दोन गोष्टींमुळे भलेभले फसतात.
जी व्यक्ती अशा जाळ्यांत अडकते, तीला तर काहिच भान नसते.व हे वयच असे असते की आई बाबांचे नेमके ऐकले जात नाही.अशावेळेला इतर जवळ्च्या मैत्रिणींनी तीला समजूत घातलीच पाहिजे,जी नेमकी न मिळाल्यामुळे फसगत होत असते.
केवळ आपल्यामूळे एक फसवणु़क आपल्यामूळे टळली व फसवणाराही गजाआड झाला, हे फार बरे झाले.
धन्यवाद.
15 Jun 2014 - 7:43 am | खटपट्या
आवडला !! संगीता त्या काळ्या माणसाच्या प्रेमात पडली हे आश्चर्य आहे !!