वेळ आली वेळ झाली
मनुजा सांगून गेली
काळ आहे बदलला
झटपट कामाला लागा
संप आणिक दगडफेक
झाले ते रोजचेच
बॉम्बस्फोटही पचवण्याची
आम्हास आता सवय झाली
नेते आमुचे बसले नुसते
मस्ती त्यांना खुर्चीची
सामान्यांना असते चिंता
इथे रोजच्या खर्चाची
सगळे असती इथे सारखे
मरणा-यांचे नशीब सारखे
किती गेले, किती राहीले,
अतिरेक्यांनी काय साधले
निष्क्रीयतेने बघतो आपण
चला करुया आज एक पण
वेळ आता आली क्रुतीची
एकजुटीने लढण्याची
बघू नका जात-पात
गुंफून हातात हात
एकदिलाने सारे लढू
शत्रुस त्या दूर पळवू
छत्रपतींचे आम्ही सैनिक
राष्ट्राचे ही आम्ही पाईक
राष्ट्र आमचे, देश आमचा
अभिमान आम्हां तिरंग्याचा
वेळ आली, सांगून गेली
ऊठ आता होई जागा
शत्रू आला दाराशी
लढण्याची बघ वेळ झाली.
प्रतिक्रिया
15 Oct 2008 - 11:08 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
आता काही (अगोचर) प्रतिक्रिया:
अदिती
15 Oct 2008 - 11:15 am | अवलिया
शत्रू आला दाराशी
लढण्याची बघ वेळ झाली.
दुर्देवाने यावेळेस शत्रु घरातच आहे. व तो घरालाच आग लावत आहे.
बाकी छान.
15 Oct 2008 - 11:17 am | अनिरुध्द
शत्रू कोण याची व्याख्याही आली असती तर बरं झालं असतं.
भारतात सध्या ज्या अतिरेक्यांनी धुडगूस घातलाय तो आपला शत्रूच.
कृतीचं स्पेलिंग: kRutI / kRutee छोट्याऐवजी मोठा R वापरला की रु ऐवजी ऋ येतो
धन्यवाद. पुढील कृती करताना असंच स्पेलिंग करीन
15 Oct 2008 - 5:16 pm | विसोबा खेचर
कविता खूप छान आणि स्फूर्तीदायक आहे!
तात्या.
15 Oct 2008 - 6:54 pm | रामदास
दोन कडवी वाचताना सायंशाखेत गेल्यासारखं वाटलं.
15 Oct 2008 - 8:26 pm | प्राजु
आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/