आईला नेहमी काळजी वाटायची की पंगत बसल्यावर तिसर्या भातावर काय वाढायचं?ताक,कढी की सार?त्याचं असं झालं की रोज जेवताना भाजी,लिंबाची फोड, थोडं मीठ,भात,वरण आणि त्यावर तूप असायचं. त्यानंतर दुसरया भातावर आमटी आणि तीसर्या भातावर कधी ताक तर कधी ताकाची कढी तर कधी सार (सोलाची कढी)असायची,
"आई ताक वाढ"
असं दाजीने म्हटल्यावर,
"आज मी ताकाची कढी केली आहे,तुला आज ताकच हवं असणार"
असं आई वैतागून म्हणायची.परत दुसर्या दिवशी असाच वाद असायचा आणि ह्या वेळीही हवा अ़सलेल्या मेनू ऐवजी आईने दुसराच मेनू केलेला असायचा.आणि असं हे रोजच चालायचं.
दह्यात पाणी घालून चिनी मातीच्या बरणीत आई रवीने ताक घुसळत असताना,
"आई तूं कसला विचार करतेस?"
असं मी विचारल्यावर म्हणायची,
"अरे, मी आज ताक केल्यावर तुझा दाजी आज सोलाची कढी जेवतान मागणार बघ"
आईचा जीव तो आपण आवडीने केलेले पदार्थ मुलानी आवडीने खाल्यावर कोणत्या आईला आनंद होणार नाही?आणि मग तसंच व्हायचं दाजी नक्की नसेल तेच मागायचा आणि आई त्याला हवं ते केलं नाही म्हणून कष्ठी हौऊन सांगायची.मी तिच्या कडे बघीतल्यावर मिस्कील हंसायची आणी त्याला हवं ते देता येत नाही म्हणून दुःखी होऊन डोळ्यात आलेली दोन टिपं पदराने पुसायची.मी मनांत म्हणायचो,
"बिचारी आई!"
आणि मग पुढे तोच प्रकार चालायचा.
आनंद असो वा दुःख असो,आईचे डोळे सदैव पणावळलेले असतातच.प्रेमाच्या पाण्याने ओथंबलेलं तीचं ह्रुदय- दुःख किंवा आनंदाच्या- हाताने पिरगळल्यावर ते प्रेमाचे पाणी डोळ्या वाटे वाहू लगलं नाही तर नवलच म्हणावं लागेल.
आईच्या अशा प्रेमळ वागण्यावर मी एक कविता पण लिहीली आहे ती तुम्ही कुठेतरी वाचालच.
अण्णा आमचे, वाद जास्त न वाढता कसा मिटवावा यात मोठे वाकबगार.त्यानी उपाय सुचवला.उद्या पासून आपण सर्वानी तीसरया भाताच्या वेळी असं म्हणायचं,
"आई,कढी,सार,ताक असात तां."
त्यापासून आई असेल तेच वाढायची आणि दाजी असेल तेच जेवायचा
नंतर आम्ही गमंतीत म्हणत असूं.
"कढी,सार, ताक असात तां!"
श्रीक्रुष्ण सामंत
प्रतिक्रिया
13 Oct 2008 - 8:42 pm | रेवती
व्हायचं मी लहान असताना. पदार्थ वेगळे असतील, पण संवाद हाच असायचा.
काल केलेली श्रावणघेवड्याची भाजी त्यावेळी नको पण दुसर्या दिवशी नेमकी हवी असायची.
मुलांना भाजी आवडलेली दिसते असे वाटून आईने पुन्हा केली की नको.
आता माझा मुलगा हाच प्रकार करतो.
रेवती
14 Oct 2008 - 6:01 am | श्रीकृष्ण सामंत
रेवती,
आपलाही अनुभव तसाच वाचून गम्मत वाटली.
प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
13 Oct 2008 - 8:49 pm | प्राजु
छोट्या छोट्या गोष्टी आपलं आयुष्य इतकं व्यापून असतात.. आपल्याला याची कल्पनाच नसते. लेख आवड्ला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
14 Oct 2008 - 6:11 am | श्रीकृष्ण सामंत
प्राजु,
तुला लेख आवडल्या बद्दल वाचून बरं वाटलं.
खरंच छोट्या छोट्या गोष्टीच जास्त महत्वाच्या असतात्.आणि बरेच वेळा त्या छोट्यांकडून होतात्.म्हणूनच मला वाटतं देवाने "आई" निर्माण केली असावी.इतकी सहनशील्,इतकी
हळ्वी अश्या ह्या "आईला" पर्यायच नसावा
तुझ्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
13 Oct 2008 - 10:19 pm | टारझन
मालक असलं काही लिहीलं की आम्हाला आमच्या घरची लय आठवण येती ब्वॉ ..
आम्ही पण घरी आईला असाच त्रास द्यायचो ... आई मला कध्धीच वैतागली नाही पण..
अजुन लिवा ... चियर्स
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
14 Oct 2008 - 6:15 am | श्रीकृष्ण सामंत
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
"आई तुझी आ-ठ्-व-ण येते" असं म्हणायला किती बरं वाटत असेल नाही?
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
14 Oct 2008 - 10:08 pm | नारायणी
काका,
माझीही अवस्था टारझनसारखीचं झाली.
आणि खरं सांगु का काका, "आई तुझी आ-ठ्-व-ण येते" असं म्हणायची खरं तर भीतीचं वाटते. न जाणो आपण आपल्या भावना श्ब्दात म्हणुन दाखवल्या आणि खळकन डोळ्यात पाणि आलं तर?
बर्याच वेळा भावना लपवल्याने दु:ख सहन करणं सोपं होतं. निदान मला तरी.
असेचं लिहित राहा.:)
14 Oct 2008 - 10:34 pm | श्रीकृष्ण सामंत
नारायणी,
आपलं म्हणणं खरंही असेल.पण खळकन डोळ्यात पाणी येणं आणि भावना जागृत होणं हा निसर्गाचा स्ट्रेस कमी करण्याचा उपाय आहे असं जाणकार म्हणतात.
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
14 Oct 2008 - 12:13 am | लवंगी
आईला किती छाळ्ल ते आई बनले तेव्हाच कळल!
14 Oct 2008 - 6:21 am | श्रीकृष्ण सामंत
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
आई होणं हे खरंच भाग्याचं आहे. निसर्गाने दिलेलं ते एक सौभाग्य आहे असं मला वाटतं
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
14 Oct 2008 - 9:21 am | ऋचा
खुप छान लेख
मला आईची आठवण आली.....
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
14 Oct 2008 - 10:47 am | श्रीकृष्ण सामंत
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
14 Oct 2008 - 11:20 am | अभिरत भिरभि-या
श्रीकृष्ण जी ,
कोकणी जेवणात भात मुख्य असल्याने भाताची आवर्तने होतात असे दिसते.
पण हा पहिला , दुसरा, तिसरा भात म्हणजे नक्की काय असते ??
माका ही गजाल कधी बी कल्ली नाय
( घाटावरचा) अभिरत
14 Oct 2008 - 10:00 pm | श्रीकृष्ण सामंत
मी तुमका समजावून सांगतय,
आपला प्रश्न चांगला आहे.आपलं म्हणणं बरोबर आहे
"कोकणी जेवणात भात मुख्य असल्याने भाताची आवर्तने होतात."हे अगदी खरं आहे.
तसच दुसरी वस्तू म्हणजे नारळ,नारळाचं खोबरं-त्याला चून ही म्हणता-आणि नारळाचा रस-त्याला नारळाचं दुध ही म्हणतात.
तांदूळ,आणि नारळ ह्याचा कोकणात मुबलक उपयोग होतो.
जेवण्याच्या पद्धतीत पंगत बसल्यावर ताटात चिमुटभर मीठ,नारळाच्या चूनाची मिरची घालून चटणी,लिंबाची फोड,कसली तरी भाजी आणि वाटीभर भात-ह्याला मुदभर भात म्हणतात,त्यावर वरण आणि एक चमचा तूपाची धार,
जेवायला बसल्यावर प्रथम वरण भात आणि तोंडी लावायला भाजी जेवली जाते.
भात संपल्यावर पुन्हा भात नक्कीच वाढला जातो.त्या भातावर डाळीची किंवा दुसरी कसली ही आमटी वाढली जाते,भाजी खावून संपल्यास भाजी परत वाढली जाते.
डाळ भात खाऊन संपल्यावर पुन्हा हवा तेव्हडा बहूदा थोडासाच तिसरा भात वाढला जातो.तो ताकाची कढी,किंवा सोलाचे सार,किवा नुसते ताक घेऊन जेवला जातो.
तिसर्या भाताबरोबरचे सार वगैरे पाचक-ऍपीटायझर- म्हणून जेवतात.आठवड्यात एकाद्दा दिवशी ताक,तर एकाद्दा दिवशी सार,आणि कधीतरी ताकाची कढी असते.
म्हणूनच आमच्या दाजीला आज तिसर्या भाताबरोबर काय हे माहित नसल्याने वाद व्हायचे.
त्यावर उपाय,
कढी,सार, ताक असात तां! (असेल ते.)
माका वाटतां तिसरो भात म्हणजे काय तां मी तुमका समजाऊन सांगलंय.
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
15 Oct 2008 - 9:07 am | अभिरत भिरभि-या
सगले कल्ले माकां .. :)
हांगा बंगळुरात शेम येकावर येक भात खातात.
पहिला भात .. मेतकुट-तुप-भात
नंतर वरण/सांबर भात
मग रसम भात
आणि शेवटी दहीभात
दही भाता शिवाय जेवण पूर्ण झाले असे मानत नाहीत. आमच्या एका कचेरी-मित्राने आईला जेवायला कौतुकाने पंच-तारांकित हॉटेलात नेले. पण तेथे दहीभात न मिळाल्याने या मातोश्रींनी घरी येऊन दहीभात खाल्ला :)
15 Oct 2008 - 3:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आमच्या मातोश्री / पिताश्रींनी आम्ही थोडे मोठे झाल्यावर या प्रश्नावर सोप्पा उपाय शोधला होता. आदल्या दिवशी सकाळच्या जेवणाचा आणि संध्याकाळी रात्रीच्या जेवणाचा मेन्यू आमच्याकडून (मी आणि भाऊ) "मान्य" करून घेण्याचा! बाबातर बाजारात जायच्या आधीच आम्हाला "कोणत्या भाज्या आणू?" असं विचारुन मगच बाहेर पडायचे.
आणि जेवण कमी पडलं, किंवा उरलं वगैरेही भानगडी नाहीत, आधीच किती जेवणार त्याचा अंदाज देऊन ठेवायचा, म्हणजे शिळं उरलं तर फक्त आई किंवा बाबाच खाणार हाही त्रास नाही!
16 Oct 2008 - 10:21 am | श्रीकृष्ण सामंत
अदिती,
उपाय छान होता.
तुझ्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
15 Oct 2008 - 5:13 pm | विसोबा खेचर
त्यापासून आई असेल तेच वाढायची आणि दाजी असेल तेच जेवायचा
नंतर आम्ही गमंतीत म्हणत असूं.
"कढी,सार, ताक असात तां!"
वा! सामंतसाहेब, कढी-सार-ताकाचे घरगुती स्फूट आवडले! :)
आपला,
(ताकप्रेमी) तात्या.
16 Oct 2008 - 10:23 am | श्रीकृष्ण सामंत
तात्याराव,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com