गोपिनाथ मुंडे

विकास's picture
विकास in जनातलं, मनातलं
3 Jun 2014 - 9:12 am

Munde

भाजपाचे महाराष्ट्रातले वरीष्ठ नेते गोपिनाथ मुंडे यांचे अचानक अपघाती निधन झाले.

स्वतःच्या मतदारसंघात विजय साजरा करायला ते दिल्लीहून जाणार होते. स्वतः मंत्री असले तरी ही खासदार म्हणून भेट असल्याने त्यांनी मंत्रीपदासाठी असलेला संरक्षणाचा ताफा बरोबर घेतला नव्हता. त्याच वेळेस हा अपघात घडला आहे. अर्थात यासंदर्भात चौकशीनंतरच कोणी बोलणे उचीत होईल...

त्यांच्या आत्म्यास शांती लाभोत तसेच हा धक्का सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटूंबियांना लाभोत ही देवाकडे प्रार्थना...

राजकारणप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

गंगाधर मुटे's picture

4 Jun 2014 - 2:49 pm | गंगाधर मुटे

भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचं अपघाती निधन....!

अत्यंत धक्कादायक आणि दु:खद बातमी.
प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर भाजपला आणखी एक हादरा. भाजप, महाराष्ट्रराज्य आणि देशाची न भरून येणारी हानी.
श्री मुंढे यांना भावपुर्ण श्रद्धांजली आणि विनम्र अभिवादन!

शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने अनेकदा त्यांच्यासोबत संंबंध आलेत. कधी ते आंदोलकांच्या बाजूने असायचे तर कधी महाराष्ट्र शासनाचे उपमुख्यमंत्री म्हणू्न आंदोलकांशी चर्चा अथवा वाटाघाटी करायला आंदोलकांसमोर यायचे.
एक खंबीर आणि धडाडीचा नेता म्हणून त्यांचे व्यक्तिमत्व विलोभनिय होते.

त्रिवेणी's picture

4 Jun 2014 - 3:17 pm | त्रिवेणी

मुंडे साहेबांना विनम्र श्रध्दांजली!

श्रीरंग_जोशी's picture

4 Jun 2014 - 5:19 pm | श्रीरंग_जोशी

अत्यंत दु:खद घटना.

जनसामान्यांशी नाळ जुळलेलं एक धडाडीचं नेतृत्व आज आपल्यात नाही हे स्वीकारणं फारच क्लेशदायक आहे.

या दुर्दैवी अपघाताबाबत माहिती पोलिसांनी जाहीर केली आहे. मागच्या सीटवर बसून गोपीनाथरावांनी सीटबेल्ट लावला असता तर... झालेलं बदललं जाऊ शकत नाही पण रस्त्यांवरून चालणार्‍यांनी (पायी, वाहनावरून वा वाहनातून) स्वयंशिस्त बाळगणे ही गोपीनाथरावांना योग्य श्रद्धांजली ठरेल.

विकास's picture

4 Jun 2014 - 6:50 pm | विकास

रस्त्यांवरून चालणार्‍यांनी (पायी, वाहनावरून वा वाहनातून) स्वयंशिस्त बाळगणे ही गोपीनाथरावांना योग्य श्रद्धांजली ठरेल.

सहमत.

विकास's picture

4 Jun 2014 - 8:07 pm | विकास

लोकसत्तेचा आजचा अग्रलेख वाचनीय आहे.

आईकाना.. !

सखी's picture

4 Jun 2014 - 8:38 pm | सखी

धन्यवाद विकास इथे दुवा आणि अजुनही माहिती दिल्याबद्द्ल, मुंडे यांच्या पत्नी काय परिस्थितीतुन जात असतील याची कल्पना करवत नाही. फुले कुटुंब काळाच्या पुढे होते हे अनेक गोष्टींवरुन माहिती होते पण सावित्रीबाईंनी ज्योतिबांचे अंत्यसंस्कार केल्याचे माहिती नव्हते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 Jun 2014 - 6:30 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रामाणिक मराठी माणसाला खरचं दिल्ली लाभत नाही की काय? दत्ताजी शिंदे, पेशवे ह्यांना सुद्धा दिल्ली आणि आसपासच्या मातीनी टिकु दिलंं नाही. प्रमोद महाजनांच्या धक्क्यातुन भा.ज.प. सावरतोय नाही सावरतोय तोच मुंडे ह्यांच्या सारखे मातब्बर नेते मृत्युमुखी पडावेत ही दुर्दैवाची गोष्ट आहे. :(

बाकी मुंडेना झालेला अपघात आणि त्याच दिवशी सरसंघचालकांच्या (मोहन भागवत...परत मराठीच) गाडीला दिल्लीतच अपघात व्हावा ह्यात योगायोग आहे असं वाटत नाही.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

5 Jun 2014 - 6:31 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

भाजपा वा ईतर कुठल्या पक्षाची अमराठी लॉबी ह्यामागे आहे असा तुला म्हणायचे आहे का?
ह्यांनाही असाच संशय आहे.

प्रतापराव's picture

5 Jun 2014 - 5:33 pm | प्रतापराव

मुंडेसाहेब हे बहुजनांचे मोठे नेते होते. मराठवाडा विद्यापीठाला आंबेडकरांचे नाव देण्या साठी दिलेल्या लढ्यात त्यांचा सहभाग होता तसेच ते तळागाळातील समाज ह्यांच्या बाजूने उभे राहत. भाजप सारख्या पार्टीत राहूनही ते कधी कडवे नव्हते तर त्यांनी मध्यममार्ग स्वीकारला होता. दलित,ओबीसी जनतेचा महाराष्ट्रातील हितचिंतक गेला. मुंडे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली..

विकास's picture

5 Jun 2014 - 5:42 pm | विकास

गदीमांच्या चेपूपानावर सौमित्र माडगुळकरांनी लिहीलेला मेसेज येथे चिकटवत आहे...

काही मृत्यू मनाला चटला लावून जातात,मा.मीनाताई ठाकरे,शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे,विलासरावजी देशमूख,प्रमोदजी महाजन व आता गोपीनाथजी मुंडे...

१९६७ साली उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदार संघातून स.गो.बर्वे विजयी झाले,केंद्र सरकारमध्ये त्यांचा अर्थमंत्री म्हणून प्रवेश निश्चित होता पण दुर्दैवाने त्याच रात्री त्यांचे ह्रदयक्रिया बंद पडून निधन झाले,गदिमांचा व त्यांचा स्नेह होता,एका पत्रकाराने फोन वर त्यांना प्रतिक्रिया विचारली व गदिमा उत्तरले.....आज गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाने त्याच ओळी परत आठवतात...

अजुनी कुंकुमतिलक कपाळी| सत्काराच्या गळ्यात माळा|
राजमान्यता स्वीकाराच्या भरात आहे अजुनी सोहळा|
तोच काय हे घडे अचानक| चैतन्याचे होय कलेवर|
लक्ष मुखातील जपनादाचा होय हुंदका एक अनावर|
....ग.दि.माडगूळकर

शैलेन्द्र's picture

5 Jun 2014 - 7:21 pm | शैलेन्द्र

+१११११