एका इन्टर्प्रीटेशन चा बेस डेटा...

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
25 May 2014 - 1:01 pm

खरं तर हा डेटा बनवणं हे काही फार मोठे काम नव्हते. न्यू जोईनीज साठी एक इन्टर्नल प्रोजेक्ट असावा ज्यामुळे त्यांच्या अ‍ॅबीलीटीज एन्हान्स करता येतील या विचाराने हा प्रोजेक्ट घेतला होता. तो इन्टर्नल होताच पण त्याचबरोबर जमले तर कोणत्यातरी क्लायन्टच्या गळ्यात मारायला उपयोगी येणार होता. हे नेहमीचेच. न्यू जॉईनीज कडून विदाउट बिलींग प्रोजेक्ट करुन घ्यायचा आणि तो सेल करताना ऑप्टीमम रीसोर्सिंगच्या नावाखाली मोठे प्रॉफिट दाखवायचे आणि बी यू चा कागदी प्रॉफिट ग्राफ वर न्यायचा.
ही पॉलीसी खरे तर अब्राहमची. नवी पोरे कामाला वाघ असतात. डाटा एन्ट्रीचे कंटाळवाणे रटाळ ते सुरवातीला अगदी आनंदाने करतात. शिवाय त्यांच्या कडून चुका देखील कमी होतात. हा त्याचा अनुभव होता.
दगडावर छिन्नीने आकडे कोरणे हे काही फार स्कील चे काम नाही. मात्र ते करताना सतत डोके खाली घालून छिन्नीने टकटकट करत बसावे लागते.. एखादी देखील चूक झाली तर सगळा पूर्ण डेटा शीट चा दगड तोडून फेकून द्यावा लागतो.
नवी पोरे काम मिळतय म्हणून आनंदाने काम करतात.
स्पेलिंग मिश्टेक झाली तर सगळे डिफीकल्टच असते. गेल्या वेळेस ट्रू गॉड ने " फ्री दोज टेन डिरेक्षन्स " चा कोड लिहीला होता. तो डीबग करता करता सगळ्यांच्या छिन्न्या तुटल्या होत्या. लोक पुन्हा पुन्हा त्याचा रेफरन्स घेवून छिन्न्या तोडत होते. प्रोक्यरमेंट डीपार्टमेन्ट वर केवढा लोड आला होता. शिवाय टीम इलॅप्स झाला ते वेगळेच. गॉड सर्व्हन्ट अंकल नी तर तो डेटाशीटचा दगड त्याम्च्या केबीनमधेच डिस्प्लेला ठेवला होता. कितीही गाडायचा म्हंटला तरी तो कोणीनाकोणी समोर आणतोच. समोर आला की पुन्हा छिन्नी तोड सुरू होतेच. नेक्ष्ट टाईम बहुतेक " फ्री दीज टेन डिरेक्षन" डेटाशीटचा दगड कम्पनीच्या प्रोफाईल च्या कमानीवरच लावून घेवुयात. निदान कोणाच्या हेड वर पडला तर तेवढाच उपयोगी ठरेल. "फ्री दीज टेन डिरेक्षन" चा प्रोजेक्ट कायम प्रॉफीत देतो . पण डीकोडिंगमधे इतक्या छिन्न्या तुटल्या की त्या भीतीने ट्रू गॉड गो अ‍ॅब्स्काँड झाला तो कंपनी कडे रेलीव्हिंग लेटर सुद्धा मागायला आला नाही. असा प्रोजेक्ट कधीतरी थाउजंड मधे वन असाच येतो.
या फनी बॉय चा डेटाशीट कायम कॉफी ने कामय बरबटलेला असतो. क्लीन डेस्क पॉलीसी पुन्हा रीव्ह्यू करायला हवी.
यलो नॉटी तर कायम कुठे सूत्तलात उलथलेला असतो अधूनमधून कधीतरी प्रोजेक्ट च्या नव्या पोराना दम देवून जातो तो एकदम प्रोजेक्ट कम्प्लीट झाल्यावरच दिसतो. बहुतेक त्याने पलीकडच्या जम्बू द्वीप बी यू मधली नवी ती प्रोजेक्ट मॅनेजर गटवलेली दिसतेय. चौकशी करायला हवी.भरीत भर फनी बॉय ने सुद्धा सुत्तलात काम करायला तयारी दाखवलीय. तिकडे कसला प्रोजेक्ट आहे कोण जाणे. जाउ देत त्याला ऑनसाईटचा अनुभव. निदान इथले डेटाशीट तरी स्वच्छ रहातील. मागच्या वेळेस तो तिकडे होता तेंव्हा तेंव्हा ऑफीस स्वच्छ होते. क्लीन डेस्क टॉप. त्याशिवाय नव्या पोराना घेवून उगाच गप्पा टप्पा सुद्धा होत नव्हते. प्रोजेक्ट वेळेत व्हायचे. पण काहीतरी मिस सुद्धा होत होते. हापिसात सगळे एकदम कामापुरतेच बोलायचे.
फनी बॉय नाही म्हणून लिटील डॉन मॉनीटर असूनसुद्धा फ्लोअरवर कमीच यायचा. नाही म्हणायला अधूनमधून सिनीयर लोकांपैकी क्युपीड अ‍ॅरो वगैरे लोक येवून काही भित्तीचित्रे रंगवून जायचे.
मनी पेनी मॅडम समूद्रकाठी गोव्यात आरम करत बसलीय्ये. पण ती फ्लोअवर डोकावून जाते. नव्या पोराना गाईड करते. हे एका अर्थाने बरे आहे. त्यामुळे निदान कंपनीतली एन्व्हायरमेंट आटोक्यात रहाते. गॉड सर्व्हन्ट अंकल इन्शुअरन्स च्या कामात इतके व्यस्त आहेत त्यांचे खूप प्रोजेक्ट अर्धेच रहातात. पण एक आहे ते जेंव्हा जेंव्हा येतात तेंव्हा फ्लोअर वर जान आणतात.
"लाईफ लाइक " चे प्रोजेक्ट सुद्धा चांगले असतात . कंटेंट थोडा असला तरी क्लायन्ट चा रीस्पॉन्स चांगला असतो.
आपल्याला काय ... कोडींग मधल्या नंबर ऑफ लाईन्स पेक्षा डिलीव्हरी महत्वाची. बग्ज फाइन्ड करणे हाच एक प्रोजेक्ट होतो. त्यामुळे पैसे भरपूर मिळाले तरी प्रॉफिटेबलीटी मेन्टेन करताना नाकी नाईन येतात
असो तर काय म्हणत होतो. परवा त्या कॅलेंडर प्रोजेक्ट मधल्या एका पोराने भन्नाट आयडीया लढवलीये. मदरस्वेअर त्याचे लॉजीक अनबिलीव्हेबल आहे. म्हणतो. एव्हरी ईयर ला नवे कॅलेन्डर करण्यापेक्षा टेम्प्लेट केले तर त्यांचे ब्लॉक्स थोडेसे इकडचे तिकडे करुन दरवर्षी नवे कॅलेंडर बनवता येईल. आपल्याला सुरवातीला पटले नाही पण त्याने जेंव्हा ब्लॉक डायग्राम दाखवून आणि गेल्या तीस वर्षांचे डेटाशीट चे दगड फील्ड अवर नेवून दाखवले तेंव्हा आपल्या डोक्यात एकदम फायर पेटली. सालं काय स्कल आहे. असलं स्कल असते तर आपण कधीच नवी कंपनी टाकली असती. कशाला उगाच या ओव्हरसिव्हीलाइज्ड लोकांच्यात कोडींग करत दगड फोडत राहिलो असतो.
त्या पोराची आयडीया थेट मॅनेजमेंट पुढे मांडली. इन्टरनल प्रोजेक्ट म्हणून घ्यायचा. पेटंट घ्यायचे. निदान पुढची एक दोन अडीच हजार वर्षे कंपनीला काहिही न करता प्रॉफिट मिळत राहील. याला म्हणायचे रेसीद्यूअल इन्कम. "वाह रे....स्टुडन्ट " लै नाईस. त्या डीटेल मधे प्रेझेन्टेशन करायला सांगितले. खुळ्याने मातीत , धुळीत वर्ड वापरून ड्राफ्ट प्रोफाईल केले. त्याला पक्की टेराकोट्टा प्रोफाईल कसे करायचे ते माहीतच नाही. बरे झाले त्याखाली मी झे ना टाकले. बाभळीच्या काडीने थोडे अ‍ॅस्थेटीक्स चेन्ज केले त्या मातीवर थोडे पाणी मारले. आणि बेक केले. माझ्या नावाने टेराकोट्टा फॉर्मॅट मधे प्रेझेंटेशन केले. आणि मॅनेजमेंट ला शो केले.
मॅनेजमेंट खूष. दोन हजार वर्षाची असाइनमेंट मिळाली म्हणून मला थेट डिलीव्हरी हेड केला.
या पोराला कायतरी दिले पायजे. संध्याकाळी रॉक बार मधे पाम ची फर्स्ट बॅचमधली फ्रेश एकदम हार्ड डोमेस्टीक पाजूया. अ‍ॅप्रेजल मधे चांगले रेटींग देवूया , तुझ्या प्रोजेक्ट मधे त्या नव्या आलेल्या " फेरी ऑफ रेन" तुझ्याच प्रोजेक्ट टीम मधे घेईन सांगुयात. पोरगं खूष.
चला प्रोजेक्ट सुरू झालाय....... मॅनेजमेंट ने एकदम फ्री हॅंड दिलाय.
काम खूप आहे. पोरं खुश आहेत. ........
-------------------------
अजून हवं तसं टेम्प्लेत मिळत नाहिय्ये. शिवाय ग्रेगोरीयन अन ज्यूलीयन ने रीक्वायरेमेंट चेन्ज केल्यात. सालं हे खरं तर प्रोजेक्ट स्कोप मधे नाहिय्ये. पण काय करणार इन्टर्नल प्रोजेक्ट मधे अस सांगता येत नाही.
मॅनेजमेंट ला रीझल्ट हवे आहेत. ते म्हणतात कॅलेम्डर टूल क्लायन्ट कसे वापरेल त्याच पद्धतीन आपण ते टेस्ट केले पाहिजे. क्लायन्ट ने चेंज मॅनेजमेंंट करायला नको का? स्टॅन्डर्ड प्रोसेसेस फॉलो करायला काय जातं यांचं?
असो . आपल्याला काय. पण डाटाशीटचे दगड कन्झ्यूम होतात त्याचं काय?
-----------------------------
ज्युलीयन ने केलेल्या बदलांमुळे सगळं कोडिंग परत करावं लागलं. यांच्या रीक्वायरमेंट्स चं लॉजीक लावणं म्हंणजे हेड एकक आहे. एका महिन्यात काय तर थर्टी दिवस तर एका महिन्यात थर्टी वन. एका महिन्यात तर काय फक्त ट्वेन्टी एट.
सगळ्यात कहर म्हणजे त्या महिन्यात काही वेगळ्या इयर मधे ट्वेन्टी नाईन दिवस. लॉजीक लावायचं तरी किती लेव्हल वर.
---------------------------------
डेटाशीटचे सगळे दगड कन्झ्युं झाले.....
----------------------------------
कॉस्ट कटींग च्या नावाखाली कंपनीने वल्कले द्यायचे बंद केलय.
----------------------------------
फर्दर कॉस्ट कटींग....... एक डेटाशीट चा दगड दोन्ही बाजूनी वापरायचा.
------------------------------------
कुणीतरी डेटाशीटचा दगड पर्सनल कामासठी वापरलेत.
-----------------------------------
छिन्न्न्या सम्पल्या....... जुन्या छिन्न्याना पुन्हा धार लावून वापरतोय.
-------------------------------
हाश.......... एकदाचा दोन हजार वर्षांची कॅलेंडर टीम्प्लेट्स रेडी झाली. मॅनेजमेंटला प्रेझेंट करायला हवं. एक मोठ्ठा माईल स्टोन अचीव्ह झाला.
--------------------------
टेम्प्लेट्स ची आयडीया सुचवणारा तो पोरगा हल्ली काहितरी वेगळेच बघतोय.... जरा वेगळा रंग वाटतोय. लक्ष्य ठेवायला हवं.
---------------------
दोनहजार शंभर कॅलेंडर टेम्प्लेट्स रेडी झालीत.
दोनहजार दहा पर्यन्त तयार आहेत. दोनहजार अकरा चाललय.
तो पोरगा प्रोजेक्ट ला रीपीट कोडिंग ला वैतागलाय. म्हणतो. कोडिंग करायचे ऑटोमेशन करुयात.
ही पोरं ना.... मॉर्निंग रुटीनचे सुद्धा ऑटोमेशन करुया म्हणतील. ...हरकत नाही. आजच प्रेझेन्टेशन बनवूयात. आयडीया मॅनेजमेंटला पटवता आली तर नवे फन्ड्स मिळतील. शिवाय एक इनोव्हेटीव्ह प्रोजेक्ट. टचिंग एव्हरीडे लाईफ........ झकास आयडीया.
-----------------------
कॅलेम्डर प्रोजेक्ट दोन हजार ट्वेल्व्ह टेन्थ मन्थ पर्यन्त आलाय.
---------------------------
मॉर्निंग रुटीन ऑटोमेशन प्रोजेक्ट मॅनेजमेंटला पटलाय. कंडीशन टाकलीये मला व्हीपी केले आणि दम्डकारण्यात अख्ख्या फॅमिली साठी विथ फुल्ल एक्स्पेन्डिचर देत असाल तर एक्झीक्यूट करतो.
----------------------------------
कॅळ्लेम्डर प्रोजेक्ट "दोनहजार ट्वेल्व्ह ट्वेन्टी डेज" कम्प्लीट झालं
-------------------------------
मॅनेजमेंट म्हणतय व्हीपी बनवतो पण फक्त सात बायका आणि त्यांची प्रत्येकी तीन पोरे यानाच स्पॉन्सर करणार.
हा अन्याय आहे. प्रत्येक बायकोला आठ मुले हवीतच असा रूल असताना मेनेजमेंट असे वागतेय हे इन्ह्यूमन आहे.
बाकी पोरांचे करायचे काय
------------------------------
प्रोजेक्ट कॅलेंडर दोनहजार ट्वेल्थ मन्थ. ट्वेन्टी वन डेज कम्प्लीट.
------------------------------------------------------------------
खड्ड्यात जाउ देत कम्पनी........ खड्ड्यात जाऊ देत प्रोजेक्ट. मी चाललो.
नव्या कम्पनीत " टचिंग एव्हरी डे लाईफ" प्रोजेक्ट एकदम आवडलाय. ऑफर चांगली मिळाली. एकदम फोर्टी पर्सेंट हाईक. शिवाय नवी कोरी ऑक्स कार. विथ दोन दोन फुल्ल व्हाईट ऑक्स.
त्या प्रोजेक्ट कॅलेंड करणार्‍या पोराला आणि " फेरी ऑफ रेन" ला इकडेच जॉईन करुन घेतलं. बरं झालं त्याला या प्रोजेक्ट एक्झ्युकेशन ची रीस्पोन्सिबिलीटी देता येईल
----------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------
जुनी कम्पनी :- " प्रोजेक्ट कॅलेंडर " फायनाशियली डिझास्टरस. बरे झाले प्रोजेक्ट स्क्रॅप झाला. अगोदरच डोमेस्टिक मार्केट बरे नाही. शिवाय दंडकारण्यात, जम्बु द्वीपात ते लोक त्यांचे वेगळेच कॅलेंडर वापरतात. असे कळाले.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
एकोणीसशे वर्शानंतर : मायन ही एक प्रगत संस्क्रुती होती. त्यानी कॅलेंडर नकाशे प्रर्थना मंदीरे अशा अनेक गोष्टी मागे सोडल्या आहेत. या अवशेषांवरून समजते की मायन संस्कृती किती पुढारलेली होती. त्याना अनेक गोष्टींचे ज्ञान होते. सूर्यमाला, ग्रह तारे यांचे त्याना उत्तम ज्ञान होते. मायन ससंक्रुती च्या सापडलेल्या अवशेषांवरुन त्यांच्या संस्कृतीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न चालू आहे.
याच मायन संस्क्रुती च्या अवाशेषांत आपल्या नव्या कॅलेंडरशी जुळणारे एक दगडी कॅलेम्डर देखील सापडले आहे.
मात्र हे कॅलेंडर मात्र एकवीस डिसेंबर बारा पर्यंतच ची तारीख दाखवते.
बहुतेक एकवीस डिसेंबर दोनहजार बारा ही जगातील शेवटची तारीख असणार आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
तारीख :१८ डिसेंबर दोनहजार बारा: आयबीन लोकमत:-
निखील बगळे : तुमचं काय म्हणणं आहे आव्हाड साहेब. जावडेकर म्हणताहेत की मायन कॅलेंडर मधे एकवीस डिसेंबर दोनहजार बारा तारीख असण्यामागे घड्याळाचा मोठा हात आहे.....एक मिनीत एक मिनीट शेट्टी साहेब मी तुमच्या कडे थोड्यावेळाने येतोय. उसाचा भाव वढविता येणार नाही म्हणून मायन कॅलेंडरमध्ये अशी मुद्दामच तरतूद केली असावी या आरोपाबद्दल आपण बोलुयातच पण त्या अगोदर एक छोटासा ब्रेक. पहात रहा आयबीन......
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
एकवीस डिसेंबर दोनहजार बारा : आजच्या ठळक बातम्या:
दिलीत पुन्हा एकदा अत्याचार / पुणे महापालीकेत सेना आणि राष्ट्रवादी बी आर टी एस बद्दल पुन्हा एकदा जोरदार चर्चा / रजनीकांतचा नवा चित्रपटाने चारशे कोटींचा गल्ला जमवला , मेळघाटातील कुपोषीत मुलांचा प्रश्न विधानसभेत ऐरणीवर./ बी एड होऊनही नोकरी नाही म्हणून तरुणाची आत्महत्या.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संस्कृतीआस्वाद

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

25 May 2014 - 3:01 pm | प्रचेतस

मस्त लिहिलंत विजुभाऊ.

आत्मशून्य's picture

25 May 2014 - 3:16 pm | आत्मशून्य

जग बुडिवर वेगळा द्रुश्टिकोनातुन लिखाण.

मस्त लेख. आवडला.
-धन्यवाद

तुमचा अभिषेक's picture

28 May 2014 - 3:04 pm | तुमचा अभिषेक

थोड्या कंटाळवाण्या या शब्दासह असेच म्हणतो. खास करून पुर्वार्ध आणि त्यामुळे काल ऑफिसातून वाचताना अर्धवटच सोडली होती. कथाकल्पना मात्र छानच विजूभाऊ, आज नेटाने पुर्ण वाचल्याचे सार्थक :)

मुक्त विहारि's picture

25 May 2014 - 3:24 pm | मुक्त विहारि

विजूभाउ रॉक्स...

दगड आणि छिन्नीचे उदाहरण आवडले.

आत्मशून्य's picture

27 May 2014 - 11:06 pm | आत्मशून्य

तुम्हला गहन गोश्टी कळत नाहीत म्हणता म्हणता इज्युभौ रॉक्स ? की जस्ट अनादर प्रतिसाद ऑफ लिचींग इंटेलिचन्स ?

प्रतिसाद आवडला.
- धन्यवाद

सस्नेह's picture

25 May 2014 - 3:29 pm | सस्नेह

लेख छान आहे
पण ती इंग्लिश्-विंग्लिश भेळ जरा आंबट लागली !

जयराज's picture

26 May 2014 - 6:24 am | जयराज

जबरदस्त.

कथा समजल्यासारखी वाटतेय, पण खात्री नाही!

ब़जरबट्टू's picture

26 May 2014 - 9:03 am | ब़जरबट्टू

...

हम्म , काही नीटसे कळले नाही

प्रभाकर पेठकर's picture

26 May 2014 - 2:18 pm | प्रभाकर पेठकर

समजतय समजतय म्हणे पर्यंत जोरदार लाट डोक्यावरून जाते आणि नाकातोंडात पाणी जाऊन गटांगळ्या खाऊ लागलो.
जाऊ दे, आपल्या बुद्धीमत्तेला (?) झेपणारे नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 May 2014 - 2:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मोठ्या आवडीने वाचुन पाहिलं अन बळजबरी ''अजून हवं तसं टेम्प्लेत मिळत नाहिय्ये'' इथपर्यंत एकेक कडू घास पचवला पण मग लक्षात आलं हे लेखन आपल्यासाठी नै. कोडिंग फीडिंग आपल्याला झेपणार नाही, सोडून दिलं ! :)

विजुभौ मी नाराज आहे तुमच्यावर....!!! :)

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

26 May 2014 - 3:08 pm | पैसा

बरीच कोडी घातलीत विजुभौ! मायन संस्कृतीत पण धमाल मुलगा, पिवळा डँबिस, छोटा डॉन, पैसा बाय, मदनबाण, रामदास होते, मिपा होते आणि मोकलाया दाही दिशा पण होते हे वाचून जाम मजा आली!

तसंच मायन क्यालेंडर त्या तारखेला का संपलं याचंही स्पष्टीकरण मिळालं! भन्नाट आहे!

प्रा.डॉ. बिरुटे सर आणि पेठकर काका, कथा आता परत एकदा वाचा आणि हे सगळे संदर्भ शोधा!

दिनेश सायगल's picture

27 May 2014 - 11:36 pm | दिनेश सायगल

मात्र मायन्सवर हल्ला करणारे कोण होते ते नाही बोललात!

विजुभाऊ's picture

28 May 2014 - 9:19 am | विजुभाऊ

बिरुटे सरः
संदर्भसह स्पष्टीकरण : मायन कॅलेंडर मधे २१ डिसेंबर २०१२ या तारखेनंतर पुढच्या तारखा लिहीलेल्या नाहिय्येत. लोकानी त्याचा अर्थ २१ डिसेंबर हा जगाचा अंतीम दिवस असणार आहे असा घेतला होता. त्यावर एक चित्रपटसुद्धा निघाला होता. लोकानी टिव्ही वर त्यावर भरपूर चर्चा चर्वण केले.
शुद्ध लेखनात थोड्या चुका झालेल्या आहेत.मात्र भाषा मुद्दामच इंग्लीश मिश्र मराठी वापरलेली आहे. ती देखेले मायन कालापुरती.
@पेठकरकाका: एखादी आय टी कम्पनी कोणताही प्रोजेक्ट घेते त्यावेळेस काही प्रोजेक्ट प्रॉडक्ट डेव्हलपमेंट म्हणूनही असतात. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट वातावरण कसे असते ते चित्रीत करण्याचा एक क्षीण प्रयत्न माना. काही प्रोजेक्ट अपूर्ण रहातात. हल्ली आपण डॉक्युमेंटेशन साठी कागद / लॅपटॉप वगैरे वापरतो. मायन कालात ते लोक दगड वापरत होते असे मानून सॉफ्टवेअर कंपनीतले वातावरण त्याकाळी कसे असेल ते कल्पिले आहे.
बिरुटे सरः अशा रितीने लेखकाला जेंव्हा वाचकाला गूढगर्भाचा प्रवास घडवायचा असतो त्यावेळ्स उपमा, उत्प्रेक्षा या पेक्षाही उत्कंठा घटकाचा वापर करून लेखक त्याच्या भावना प्रकट करतो. मात्र हा गूढगर्भाचा प्रवास वाचकाने देखील लेखकासोबत करावयाचा असतो याचा मात्र लेखकाला बहुधा विसर झालेला असावा. ही चूक लेखचाच्या उजव्या मेंदूची आहे त्यावर लेखक उपाय शोधण्याच्या बेतात आहे. मात्र हे प्रस्तूत लेखनात कुठेही दिसून येत नाही. त्या व्यतीरीक्त लेखकाने भविष्यकालीन भाषा शैलीचा वापर भूतकालातील वातावरण निर्मीतीसाठी केलेला आहे. लेखकाने खरेतर भूतकालीन कालावधीसाठी " अनुभवेन मेधावि, थोकम थोकम, खणै खणै, खम्मरो रजत्सेवा मलमत्तनो " ऐशी सूध पाली किंवा " हण्ण कण्ण किमपि कित्ते सुत्ताले करवियले " ऐशी किंवा "तेयांते बुधीचे तेज सांडिले. बुधीचे तेज ते एके परीसले. परीसले तो म्हणे बुधी मुसळेयांसारीखी, डेटा शीट इजे टकटकुनी टंकीजले." अशी भाषा वापरायला हवी होते. इथेच लेखक वातावरण निर्मितीत उणा पडला आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 May 2014 - 9:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखनाचा गुढगर्भाचा प्रवास उकलून दाखवल्याबद्दल मंडळ आभारी आहे.

-दिलीप बिरुटे

प्रभाकर पेठकर's picture

28 May 2014 - 1:02 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद विजुभाऊ,

कुठल्याही आय टी कंपनीच्या कामकाजाचा त्यातील व्यावसायिक शब्दसमुहांचा (जार्गन्सचा) परिचय नसल्याने मनात गोंधळावस्था निर्माण झाली होती. आता, पैसा ह्यांच्या आणि तुमच्या प्रतिसादाने बरीचशी गैरसमजाची जळमटं दूर झाली आहेत. असो.

>>>>इथेच लेखक वातावरण निर्मितीत उणा पडला आहे.

का कोण जाणे इथे मी 'लेखक उताणा पडला आहे' असे वाचले.

बॅटमॅन's picture

28 May 2014 - 1:17 pm | बॅटमॅन

गूढगर्भाचा प्रवास आवडला. सांगड मस्तंच घातली आहे!

स्पा's picture

28 May 2014 - 3:56 pm | स्पा

सोरी विजभाय

मुळात IT हा विषयच एवढा डोक्यात जातो, कि त्यावर काही वाचणे म्हणजे..
असो

खर बोल्तो, काय बी समजला नाय. संमद डोस्क्याच्या 4 फुट वरन गेल. कदाचीत माजा आन IT काय सबंध नाय त्यामुळ नसल.

पिवळा डांबिस's picture

3 Jun 2014 - 1:27 am | पिवळा डांबिस

विजुभाऊ, चांगलं प्रतिकात्मक लिखाण आहे.
मायन संस्कृती ही काही बाबतीत पुढारलेली होती हे खरं आहे. पण हेच लोकं फ्रान्सिस्को पिझारोच्या घोडेस्वारांकडून (पूर्वी घोडा हा प्राणी न पाहिलेला असल्याने) आश्चर्यचकित अवस्थेतच मारले गेले!! :(

यलो नॉटी तर कायम कुठे सूत्तलात उलथलेला असतो अधूनमधून कधीतरी प्रोजेक्ट च्या नव्या पोराना दम देवून जातो तो एकदम प्रोजेक्ट कम्प्लीट झाल्यावरच दिसतो. बहुतेक त्याने पलीकडच्या जम्बू द्वीप बी यू मधली नवी ती प्रोजेक्ट मॅनेजर गटवलेली दिसतेय. चौकशी करायला हवी.

हा हा हा!!! त्या यलो नॉटीचा, साल्याचा, काय भरवंसा नाय हां!!!!
:)

कंजूस's picture

3 Jun 2014 - 4:19 am | कंजूस

मिपाच्या व्यक्तीरेखा ,राजकारणी नेते ,आइटी वाल्यांची भाषा ,जुने लेख यांचे संदर्भ उमजल्यावीना अगम्य आहे .

विजुभाऊ's picture

26 Aug 2014 - 3:13 pm | विजुभाऊ

कन्जूस भाय
ऐसा एकदम अगम्य बोलके छोडके नै देनेका.