प्रिय कोकिळा

शर्मीला's picture
शर्मीला in जे न देखे रवी...
14 Oct 2008 - 8:39 pm

प्रिय कोकिळा
:SS
रंग नाही , रुप नाही
नाही पक्षाची राणी

तरी अमुल्य ठेवा आहे तुझियाकडे
ज्याने तु प्रसिध्द आहे ठायी-ठायी

तुझिया गाणे ऐकताना
थोरा-मोठ्या सर्वाचं भान हरपून जायी
रंग रुप यांवर मिरवणे
अशी आहे रित जगाची

पण गुण-हुशारी यावर जग आधारित
तु आहेस आदर्श याचा

एक सामान्य असली
तरी नाव कमावलसं

मला व्हायचयं तुझ्यासारखं
रंग नसला - रुप नसले
तरी नाव कमावलसं

मला व्हायचयं तुझ्यासारखं..........

कविताअनुभव

प्रतिक्रिया

पक्या's picture

14 Oct 2008 - 10:15 pm | पक्या

कोकीळ गातो ..कोकीळा नव्हे.

अरुण मनोहर's picture

15 Oct 2008 - 9:37 am | अरुण मनोहर

चांगले लीहीलेय. अजून लीहीत रहा.
>>>तुझिया गाणे ऐकताना पेक्षा,
तुझे गाणे ऐकताना
>>> थोरा-मोठ्या सर्वाचं भान हरपून जायी पेक्षा,
----> थोरा-मोठ्यांचं भान हरपून जायी