माझ्या प्रिय बंधू आणि 'मैत्रिणींनो' मी तसा मिपावर नवीन आहे त पहिल्यांदाच लिहीतोय तेव्हा सांभाळुन घ्या.
तर सांगायचा मुद्दा असा कि माझ्याकडे वसंतरावांची एक अप्रतिम चित्रफित आहे पण भानगड अशी कि ती मला कोणत्याही संकेतस्थळावर टाकता येत नाहीए तेव्हा जर कोण मला आपला पत्ता देण्यास तयार असेल तर मी ध्वनिचित्रतबकडी पाठवू शकेनं.
[एक विनंती- उत्तरे देताना शक्यतो मला अहो जाहो करू नका.] पुरवणी सुचना-ध्वनिचित्रतबकडी मोफत दिली जाईल. अगदी टपालखर्चही माफ.
प्रतिक्रिया
14 Oct 2008 - 10:24 am | llपुण्याचे पेशवेll
एक प्रश्न कोणती चित्रफित आहे? रंगीत आहे का, कॅलिडोस्कोप ने प्रकाशित केलेली?
का ७७ च्या सवाईमधली आहे? का याहून इतरही आहे?
महत्वाचा प्रश्न: तिच्या अशा ओपन वितरणाने कोणाच्या कॉपीराईटचा भंग तर नाही ना होणार?
(जिज्ञासू वसंतवेडा)
पुण्याचे पेशवे
14 Oct 2008 - 10:42 am | नाम्या झंगाट
" पण भानगड अशी कि ती मला कोणत्याही संकेतस्थळावर टाकता येत नाहीए ...."
का?
आपण आपली ध्वनिचित्रतबकडी यु ट्युब किंवा डेली मोशन वर अपलोड करु शकता (१०-१५ मिनिटे च्या क्लिप)... एकदा अपलोड झाल्यानंतर मिपावर दुवा देऊ शकता म्हणजे
सर्वांना बघता येईल.
नाम्या झंगाट
14 Oct 2008 - 10:46 am | व्यंकु
ही क्लिप तासाभराची आहे
14 Oct 2008 - 7:56 pm | अन्वय
santshali@gmail.com
पाठवा.
14 Oct 2008 - 11:34 am | धमाल मुलगा
व्यंकू, (हे संबोधन चालेल का? अहो-जाहो नको असं लिहिलंय म्हणुन मोकळेपणानं विचारतोय)
नेकी और पुछ पुछ?
फक्त एकच विनंती- वर पेशव्यांनी म्हणल्याप्रमाणे त्या तबकडीत नक्की काय काय आहे आणि कॉपीराईटच्या कायद्याचा भंग तर नाही होत ना, हे इथं स्पष्ट केलं तर फार बरं होईल!
च्छ्या:! त्यात काय? हजार मागा, दोन हजार मागा, पाच हजारसुध्दा देऊ की! हमारे वसंतखाँ के वास्ते कुछभी!!!!
14 Oct 2008 - 11:54 am | व्यंकु
(व्यंकू चालेल नव्हे धावेल)
मला राग वगैरे काही कळत नाही
पणा त्यात वेड्या मना तळमळसी, रवि मी इ गाणी आहेत. साथीला नाना मुळ्ये आणि गोविंदराव आहेत
14 Oct 2008 - 8:32 pm | आगाऊ कार्टा
मला खालील पत्त्यावर पाठवा
phadke1984@gmail.com
I have very high speed Internet connection...
I can also upload it for others..
14 Oct 2008 - 8:45 pm | मानस
मला असं वाटतं इथे बर्याच जणांचा गैरसमज होतो आहे. व्यंकटेश म्हणत आहे
"जर कोण मला आपला पत्ता देण्यास तयार असेल तर मी ध्वनिचित्रतबकडी पाठवू शकेनं.
[एक विनंती- उत्तरे देताना शक्यतो मला अहो जाहो करू नका.] पुरवणी सुचना-ध्वनिचित्रतबकडी मोफत दिली जाईल. अगदी टपालखर्चही माफ. "
ह्याचा अर्थ असा की त्यांच्याकडे ही चित्रफीत तबकडी (व्हीसीडी/डीव्हीडी) स्वरूपात आहे व ते तुमच्या पोस्टल पत्त्यावर पाठवू शकतील.