कट्टा: दादर पूर्व ऋषी हॅाटेल

सूड's picture
सूड in जनातलं, मनातलं
25 May 2014 - 10:59 pm

व्हाट्सअ‍ॅपवर मिपाकरांचे असे चार ग्रूप आहेत. कोणते ते विचारु नका, अभ्यास वाढवा असं उत्तर मिळेल. त्यातल्या एका ग्रूपवर मेसेज आला शन्वारी सांच्याला कोण कोण भेटू शकतं. मेसेज अर्थातच विमेंचा होता. शन्वार संध्याकाळ असल्यामुळे तसाही उंडारायला वाव असतो, मग मी तर मेसेज आल्याआल्या हो म्हणून सांगितलं. त्यातही दादरसारख्या ठिकाणी कट्टा होणार होता. आता हल्लीच्या फ्याशनीनुसार मध्यवर्ती समजली जाणारी ठिकाणे न निवडता आल्याची खंत होतीच म्हणा, पण असो. कट्टा ठरला, पण बा़कीचे डिटेल्स विमे बैजवार देणार असल्याचं म्हणून तिथेच विषय संपला. आणि शुक्रवारी मिपावर लॉगिन करतो तर "बेसनलाडू समवेत मुंबई कट्टा" हा धागा पाह्यला.

मग शन्वारी बदलापूर मुक्कामी येऊन किसनराव यांसि फोन करुन ते कधी निघणार असल्याचा अंदाज घेतला आणि त्याप्रमाणे निघालो. दादर स्टेशनावर भेटून दोघांनीही कट्ट्याच्या ठिकाणी कूच केले. प्रास व योगी९०० आलेले होतेच. मग चौघे जमलो आहोतच म्हणताना हाटेलात आसनस्थ होण्याचे सर्वानुमते ठरले. काही अपरिहार्य कामात गुंतल्यामुळे विमेंचे येणे साधारण अर्धा तास उशिराने होणार होते. मग गप्पांना सुरुवात झाली. गप्पा जरा थांबवून काहीतरी मागवावे असे ठरले. तेव्हा मागवलेली ही व्हेज प्लॅटर. नंतर गप्पांच्या ओघात एकाही खाद्यपदार्थाचा फोटो घेण्याचे लक्षात आले नाही.

व्हेज प्लॅटर येतेय तोवर बेसनलाडू यांचे आगमन झाले. नंतर त्यांच्याशी गप्पा रंगल्या. मिपाचे जुने सदस्य असल्याने 'तेव्हाचं मिपा आणि आताचं मिपा' ही नेहमीचीच चर्चा पुन्हा नव्याने झाली. योगी९०० यांनी हॉटेलसमोर कट्टेकर्‍यांची वाट बघताना झालेल्या काही गमती सांगितल्या.

गप्पांत गुंग प्रास, योगी९०० व बेसनलाडू (डावीकडून उजवीकडे)

थोड्याच वेळात विमेकाकांचे आगमन झाले. त्यांचे आगमन झाल्यानंतर पुर्वीचं ऋषी आताचं ऋषी यावर थोडी चर्चा झाली. दादरमध्ये हिंदीत बोलणार्‍या वेटरशी लोक मराठीत न बिचकता बोलतात याचं अपार कौतुक अर्थातच मला वाटलं मग इथे मराठीतच बोलतो, बोलत नाही काथ्याकूट होऊ पाहत होता पण तो काही फार काळ तग धरु शकला नाही.

प्रास, योगी९००, बेसनलाडू, विमे व किसन शिंदे (डावीकडून उजवीकडे)

'असारे खलु संसारे नास्ति श्वशुरमंदिरसमसुखम्' या उक्तीचा प्रत्यय यावा की काय अशा ढंगात किसन शिंदे यांनी काही अपरिहार्य कारणास्तव कट्टेकर्‍यांचा जरा लवकर निरोप घेतला.

त्यानंतर मेन कोर्स आला. त्यात मग रोटी/ पोळी/ फुलके डावीकडे आणि भाजी उजवीकडे अशी का वाढतात यावर सुरु झालेली चर्चा डावं-उजवं पान कसं आणि का वाढतात इथवर पोचून थोडी थांबली. लोक मन लावून जेवू लागले, पण काहीच काळ!! पुन्हा काही ना काही गप्पा सुरु होत्याच. आयपीएल, मोदी, राजकारण असे विषय निघत होते. मध्येच कोणीतरी मिपावर जगप्रसिद्ध असलेल्या रानडे रोडची आठवण काढली.

प्रास, योगी९००, बेसनलाडू, विमे व सूड (डावीकडून उजवीकडे)

जेवण उरकून बाहेर आईस्क्रीमचा एकेक स्कूप हादडला गेला. आमच्या गप्पा चालूच होत्या, तेवढ्यात योगी९०० यांनी निरोप घेतला. शेवटी मी, विमे आणि प्रास यांनी दादरच्या रस्त्यांवर शतपावली करत करत शेवटी माटुंगा स्थानकापाशी एकमेकांचा निरोप घेऊन मार्गस्थ झालो.

तळटीपः कट्टेकर्‍यांनी आपले चार शब्द लिहून धाग्याची शोभा वाढवावी ही विनंती.

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

जेपी's picture

25 May 2014 - 11:12 pm | जेपी

मी

मी

मी

ला

फोटु उद्या बगतो.

मुक्त विहारि's picture

25 May 2014 - 11:44 pm | मुक्त विहारि

ये साल्ला पेट बहूत पापी हय....

इसकी वजह से बहुत अच्छे अच्छे पल निकल गये....

जाने दो....

२६ जून के बाद हम हय और कट्टे हय....

सुहास झेले's picture

25 May 2014 - 11:57 pm | सुहास झेले

व्वा व्वा... मज्जा करा :)

अवांतर - प्राथमिकदृष्ट्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुपबद्दल अभ्यास वाढवावा लागणार असे दिसतेच आहे... ४ ग्रुप म्हणजे लैच रे बाबा ;-)

llपुण्याचे पेशवेll's picture

28 May 2014 - 1:42 pm | llपुण्याचे पेशवेll

झेलेआण्णा आपल्याला तर एकच माहीत आहे. :-) आणि तो या चार मधे नसावा असे वाटते.

ह्या चार मधल्या एका ग्रूपात तुम्ही पण आहात हो पुपे !!

llपुण्याचे पेशवेll's picture

29 May 2014 - 12:51 pm | llपुण्याचे पेशवेll

:) हा मंग ठीक आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

26 May 2014 - 1:36 am | अत्रुप्त आत्मा

हम्म्म्म्म!!!!!!

मदनबाण's picture

26 May 2014 - 6:44 am | मदनबाण

अरे योगी बाबा कसे आहात ? आपल्याला भेटुन तर जमाना झाला आता नाही ? यावेळी चक्क कट्ट्याला ? चांगली गोष्ट आहे... आता जरा टंकन कष्ट घ्या इथे ! ;)

योगी९००'s picture

26 May 2014 - 9:26 am | योगी९००

म.बा.... एकाच ऑफिसला असून तुम्हीच भेटत नाही...!!

थोडे टंकनकष्ट घेतले आहेत..

मदनबाण's picture

26 May 2014 - 12:27 pm | मदनबाण

म.बा.... एकाच ऑफिसला असून तुम्हीच भेटत नाही...!!
अवं योगी बाबा... आमची कधीच दुसरीकडे बदली झाली हाय ! तेव्हा तिकडे आलात तर भेट होइलच.

थोडे टंकनकष्ट घेतले आहेत..
वा... पण इतर लेखन सुद्धा करावे अशी विनंती हाय बघा ! :)

योगी९००'s picture

26 May 2014 - 8:48 am | योगी९००

कट्टा एकदम झकास...सर्वांना भेटून खुप आनंद झाला.. बेसनलाडूंना भेटण्याची तमन्ना पुरी झाली. विमेंचे श्पेशल आभार..

कट्यापुर्वी वाट बघणे म्हणजे काय याची एक वेगळीच प्रचिती (की प्रतिची ??..... पहिलेच बरोबर वाटतंय) आली. वेगळ्याच प्रतिची प्रचिती म्हणणे योग्य ठरावे.

६ वाजताचा कट्टा म्हणून बरोबर ५.५८ ला ऋषीसमोर होतो. वाटले की लोकं येऊन खादाडी सुरू पण असेल. AC / non-AC भागात दोनदा चकरा झाल्या. दोन ग्रुपच्या बाजूला १ -१ मिनीट उभे राऊन काही मिपाशब्द ऐकू येतात का ते पाहिले पण ते भलतेच लोक निघाले. एका रामदासकाकांसारखी दाढी असलेल्या माणसासमोर उगीच दोनदा डोकावलो. (त्याच्या ताटात पण डोकावले). पण काही उपयोग झाला नाही. कोठल्याही मिपाकराचा नंबर नसल्याने वाट पहात राहीलो.

अशीच खुप वेळ (म्हणजे ४-५ मिनीटे ) हॉटेलबाहेर वाट पाहिल्याने लक्षात आले की एक वयस्कर सद्गॄहस्थ माझ्यासारखीच कोणाची वाट पहात आहे. थोडे हायसे वाटले आणि त्यांच्याकडे गेलो अणि डायरेक्ट "मिसळपाव?". असे विचारले. ते दचकून मागे सरकत म्हणाले " नको नको मला नको...". त्यांना बहूतेक मी हॉटेलचा माणूस बाहेरच ऑर्डर घेतोय असे वाटले असावे. तो गॄहस्थ मिपाकर नाही यामुळे माझा हिरेमोड झाल्याने माझा सॉलीड पोपट झाल्याचे लक्षातच आले नाही.

मग तेथून निघालो आणि उगाचच एक जवळपासचा फेरा मारला. परत हॉटेलपाशी आल्यावर लांबूनच प्रास दिसले आणि जीव भांड्यात पडतो म्हणजे काय ते कळले. प्रास सुद्धा माझ्यासारखेच येणार्‍या-जाणार्‍यांकडे निरखून पहात होते. त्यांना भेटल्यावर पहिले काम काय केले असेल ते म्हणजे त्यांचा मोबाईल नंबर घेणे आणि माझे नाव एका whatsapp group लावून घेणे. हळूहळू सुड, किसनदेव आले. प्रास यांच्याकडून विमेंना उशिर होणर हे कळले. आणि कट्टा सुरू झाला.

बेसनलाडू आणि विमे आल्यावर जुन्या मिपा आणि जुने मिपाकर यांच्याही आठवणी निघाल्या. सुड यांनी सांगितल्याप्रमाणे काही विषयांवर उद्बोधक चर्चाही झाल्या.

पण गप्पाच्या ओघात परत जायची वेळ झाली आणि सर्वांचा निरोप घेतला. सर्वांना भेटून खुप बरे वाटले. बेसनलाडू यांनी मिपावर लिखाण करायला परत सुरुवात करणार हे सांगितले तेव्हा हा कट्टा सफल झाला असे वाटले. यामुळे यापुढे प्रत्येक कट्टयाचा भेटीगाठीशिवाय काहीतरी हेतू ठरवावा असेही वाटले.

आता पुढील कट्याच्या प्रतिक्षेत ...

स्पा's picture

26 May 2014 - 9:50 am | स्पा

एक वयस्कर सद्गॄहस्थ माझ्यासारखीच कोणाची वाट पहात आहे. थोडे हायसे वाटले आणि त्यांच्याकडे गेलो अणि डायरेक्ट "मिसळपाव?". असे विचारले. ते दचकून मागे सरकत म्हणाले " नको नको मला नको...".

=)) =))
कहर झाला

बाकी वृतान्तही झकास , धमाल केलीत मस्त

आमचाही असाच पॅरट हॅप्पन्ड अ‍ॅट फर्स्ट कट्टा इन सरोवर हाटेलात, डेक्कन जिमखाना. च्यामारी अजूनही त्या दोन सद्गृहस्थांचे विचित्र चेहरे लक्षात आहेत ('इथे मिसळपाव मागणारा हा कोण आहे?' अशा अर्थाचे...) *lol* *ROFL*

अत्रुप्त आत्मा's picture

26 May 2014 - 9:54 am | अत्रुप्त आत्मा

@त्यांच्याकडे गेलो अणि डायरेक्ट "मिसळपाव?". असे विचारले. ते दचकून मागे सरकत म्हणाले " नको नको मला नको...">>> =))
.
.
.
.
.
योगी९००>>धाग्यात 'जान' आली...तुमच्या प्रतिसादानी! ;)

लॉरी टांगटूंगकर's picture

26 May 2014 - 10:26 am | लॉरी टांगटूंगकर

=)) झक्कास लिहीताय!

राजेश घासकडवी's picture

26 May 2014 - 12:12 pm | राजेश घासकडवी

कट्ट्यासाठीच काय पण कुठल्याही भेटीसाठी वेळेअगोदर जाणं ही चूकच असते. तुम्हाला इंडियन स्टॅंडर्ड टाइमची काही माहिती आहे की नाही? असो. पण कट्टा म्हणजे खरोखरच ब्लाइंड डेटला जाण्यासारखंच असतं. मी एकदा एका ब्लाइंड डेटसाठी गेलो होतो तेव्हा ती काळा ड्रेस घालून येणार आणि मी निळा शर्ट आणि जीनची पॅंट घालून येणार इतकंच ठऱलं होतं. (त्या काळी एकमेकांचे फोटो दणादण पाठवून देण्यासाठी इंटरनेट नव्हतं.... काय करणार. तर मी पठ्ठ्या पंधरा मिनिटं आधी पोचलो. मग सगळ्या पोरींकडे घूरघूर के देखू लागलो. कोणीही काहीतरी काळं घातलेली दिसली की माझ्या आशा पल्लवित व्हायच्या. मग मी तिच्यासमोर जाऊन निळा शर्ट तिच्या नजरेत भरावा म्हणून कॉलर वगैरे हलवत, उगाच शर्ट झटकल्यासारखं करत होतो. आणि मग तिला माझी ओळख पटतेय का बघायचो. बहुतेक वेळा डोळ्यात 'हाय!' असे भाव येण्याऐवजी 'काय हा यडपटासारखा करतोय?' असे भाव यायचे. असा पाउण तास आणि बावीस पोरी गेल्यावर मी कंटाळून घरी परत गेलो. नंतर सांगोवांगीने कळलं की ती समोरच्या कोपऱ्यावर उभी राहून माझी वाट बघत होती. आणि मी काय करतोय हे पाह्यल्यावर मी तिची वाट पाहताना मल्टिटास्किंग करून आणखीन इतरही पोरी पटवायचा प्रयत्न करतोय असं वाटलं. आणि ती चिडून निघून गेली. तेव्हापासून ब्लाइंड डेटला जाताना पंधरा मिनिटं आधी जायला लागलो. आणि समोरच्या कोपऱ्यावर उभा राहून त्यांचीच गंमत बघायला लागलो. का कोण जाणे, मग दुर्दैवाने ब्लाइंड डेट्स मिळेनाशा झाल्या. आणि मी फक्त डोळस डेट्सवर जाऊ लागलो.

असो, कट्टा छान झाला हे वाचून बरं वाटलं. बेलाने बेला हे नाव कसं घेतलं? याबद्दल बोलणं झालं की नाही? (किंबहुना योगी९०० हे नाव कसं घेतलं याबद्दलही उत्सुकता आहे...)

योगी९००'s picture

26 May 2014 - 1:36 pm | योगी९००

कट्ट्यासाठीच काय पण कुठल्याही भेटीसाठी वेळेअगोदर जाणं ही चूकच असते.
नोंद करण्यात आली आहे. यावेळी कोणाचाच नंबर नसल्याने बरोबर वेळेत पोचलो. पण बाकीच्याना उशिरा येण्यामागे काही कारणे होती, त्यामुळे काही वाटले नाही. तसेही मला जास्त वाट पहावी लागली नाही कारण ६.१५ पासून प्रास, सुड आणि किसनदेव आलेच. पण ही १०-१५ मिनिटे खुपच जास्त वाटली.

माझे पुर्वी खादाडमाऊ हे मिपानाव होते. त्यामुळे माऊ आहे असे वाटून बरेचसे बोकोबा व्यनी करायचे आणि मी एक ढाणा वाघ आहे हे समजल्यावर शिव्या घालायचे. म्हणून नाव बदलले. त्यावेळी माझ्याकडे नोकिया N900 हा भ्रमण्ध्वनी होता. हा भ्रमण्ध्वनी माझा जीव की प्राण असा होता. म्ह्णून योगी९०० हे नाव घेतले.

>>माझे पुर्वी खादाडमाऊ हे मिपानाव होते. त्यामुळे माऊ आहे असे वाटून बरेचसे बोकोबा व्यनी करायचे

हा किस्सा मी लिहीणार होतो, म्हटलं लिहावं की नाही म्हणून वगळलं पुन्हा लेखातून. :)

त्यामुळे माऊ आहे असे वाटून बरेचसे बोकोबा व्यनी करायचे आणि मी एक ढाणा वाघ आहे हे समजल्यावर शिव्या घालायचे.

हा हा हा... *biggrin*

बाकी वृत्तांत मस्तच.

राजेश घासकडवी's picture

29 May 2014 - 7:30 am | राजेश घासकडवी

माझे पुर्वी खादाडमाऊ हे मिपानाव होते. त्यामुळे माऊ आहे असे वाटून बरेचसे बोकोबा व्यनी करायचे आणि मी एक ढाणा वाघ आहे हे समजल्यावर शिव्या घालायचे.

हा हा हा... या बोकोबांचे किस्से येऊ द्यात थोडे. त्यांनी कशा मिशांना ताव देऊन नजरेत मार्दव आणून पाहिलं.... त्यांच्यावर डरकाळी फोडल्यावर कसे शेपटी घालून पळून गेले वगैरे वगैरे जरा मसाल्यासकट टाका की.

योगी९००'s picture

29 May 2014 - 3:02 pm | योगी९००

या बोकोबांचे किस्से येऊ द्यात थोडे
नाव बदलून दोन वर्षे झाली त्यामुळे इतके काही आठवत नाहीत. सगळे व्यनी/खरडी चेक करावे लागतील. पहिल्यांदा जेव्हा व्यनी आला तेव्हा चला कोणीतरी मिपाकर आपल्याशी contact करू इत्छीत आहे म्हणून सुखावलो होतो पण त्यातील मजकूराने निराशा केली. माऊऐवजी वाघोबा आहे हे कळल्यावरच बर्‍याचजणांनी काढता पाय घेतला आणि मला डरकाळी फोडावी लागली नाही.

बाकी खरोखरच्या स्त्री आयडी वाल्यांना काय सहन करावे लागत असेल त्याची थोडीफार कल्पना पण आली.

बेसनलाडू's picture

27 May 2014 - 11:35 pm | बेसनलाडू

<< बेलाने बेला हे नाव कसं घेतलं? याबद्दल बोलणं झालं की नाही? >>

मिसळपावचे संस्थापक तात्या अभ्यंकर मनोगतावर सक्रीय असताना, तुमच्या आवडीचा लाडू कोणता, यावरून तुमचे स्वभावविशेष सांगणारा धागा काढून गेले. बेसनलाडू हा माझा सगळ्यात आवडता लाडू; आणि त्यावरून तात्यारावांनी सांगितलेले स्वभावविशेष माझ्या स्वभावविशेषांशी जुळत असल्याने, तात्यांनी स्थापन केलेल्या या संकेतस्थळावर मला 'बेसनलाडू' सोडून इतर सयुक्तिक नाव सापडले नाही. तर, तात्यांनी सांगितलेले बेसनलाडवाचे हे स्वभावविशेष -

लई डेंजर जमात. एकदम तल्लख बुद्धीची, आणि चाणाक्ष. किंचित माथेफिरू. वाटेला कुणी जाऊ नये. आवडीनिवडी अगदी ठराविक आणि टिपीकल असतात. अत्तर आहे म्हणून लावलं आपलं कुठलंही अत्तर, असं नाही. आवडीचं असेल तरच लावतील. राहणीमानदेखील एकदम टिपीकल. एकंदरीतच बावळटपणा सहन होत नाही. जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते सगळं लागतं!स्वभावाने अत्यंत तऱ्हेवाईक. मनासारखं नाही झालं तर आरडाओरडा आणि आदळाआपट. एक मात्र खरं, जर एखाद्यावर मर्जी झाली तर त्याच्यासाठी मात्र काय वाट्टेल ते. कुठल्याही गोष्टीचा सखोल आणि दांडगा अभ्यास. एखाद्या गोष्टीतली नेमकी मेख पटकन कळते. १० माणसांना डोकं खाजवून जर एखाद्या गोष्टीचं उत्तर माहीत नसेल तर क्षणांत उत्तर मिळेल! पण वरती "हे काय, एवढंही माहीत नाही?" असं ऐकूनही घ्यावं लागेल Smile एक मात्र नक्की, की चार युक्तीच्या गोष्टी जर हव्या असतील तर अगदी हमखास! बेसनाच्या लाडवांचंपण असंच आहे! हा लाडू दिसतो कसा पहा! खमंग रंगाचा! चवीलाही खमंग!! अगदी पाकातला! एकदम पेशल!! नीट जमला नाही तर खाताना टाळूला चिकटतो! पाक कच्चा असेल तर ढापकन् तोंडातल्या तोंडात फुटतो!! Smile पण जर जमला तर बेसनाचा लाडू तो बेसनाचाच लाडू हो! मग याच्यासारखा दुसरा कोण नाही!!

नाखु's picture

26 May 2014 - 8:55 am | नाखु

"ओर्वोकलर" चित्रपटासरखी असल्याने जाम आवडली..
सूड्-किसनदेवाला आम्ही ओळखतो (बाकी लेखातून्-प्रतीसादातूनच दिसले होते)

बेलाला भेटायचे राहून गेले.

पैसा's picture

26 May 2014 - 12:51 pm | पैसा

चांगलं लिहिलंस.

वॉत्स अ‍ॅपवर ४/४ ग्रुप करणारे प्रत्यक्षात लेख आणि प्रतिक्रिया द्यायच्या वेळी कुठे जातात याबद्दल मात्र कोडं आहे.

प्यारे१'s picture

26 May 2014 - 1:17 pm | प्यारे१

प्रत्येक फोटोमध्ये दिलेला क्रम 'डावीकडून उजवीकडे' आवडलं. (शेवटच्या २ फोटोतल्या 'सेट'मध्ये आधीचे सगळे 'सबसेट' आले की! पण सूड तसं करेल तर तो 'सूड' कसला? ;) )
असो!

बाकी कट्टा वृत्तांत बरा!

भाते's picture

26 May 2014 - 3:52 pm | भाते

हाहाहा, दिड महिन्यापुर्वीच निनादच्या डोंबिवली कट्टयाला मी हा अनुभव घेतला आहे. पण माझ्या सुदैवाने समोर मिपाकर कंजूसकाका असल्यामुळे पुढचा गोंधळ झाला नाही.

त्रिवेणी's picture

27 May 2014 - 5:35 pm | त्रिवेणी

*i-m_so_happy* मिसळ्पाव *lol*

विवेकपटाईत's picture

27 May 2014 - 9:14 pm | विवेकपटाईत

मस्त फोटो (खाद्य पदार्थाने भरलेल्या प्लेट चा) बाकी हे ही आवडलं मी फक्त डोळस डेट्सवर जाऊ लागलो. *man_in_love* *give_rose*

दिनेश सायगल's picture

27 May 2014 - 11:39 pm | दिनेश सायगल

यापुढे मध्यवर्ती ठिकाणी कट्टे घ्या. म्हणजे आम्हीही हजेरी लावू.

मुक्त विहारि's picture

29 May 2014 - 3:22 pm | मुक्त विहारि

या कधीही "डोंबोलीला"...

घर आपलेच आहे....

प्रास's picture

30 May 2014 - 12:42 am | प्रास

खरं तर धाग्याचा दिवस नि वेळ ठरल्याचं माहितीच नव्हतं पण कट्टा होणारच याची विमेंच्या स्वभाववैशिष्ठ्याच्या ज्ञानानुसार फुल्टू खात्री होती. मग आदल्या दिवशी धागा दर्शनानंतर विमेंनाही माझ्यावर तसलाच कॉन्फिडन्स (प्रास हादडायला नक्की येणार हा) बघून दिल बाग बाग झाला.

शनवारी हापिसातून लौकर कल्टी मारून 'ऋषी'समोर येणारी जाणारी माणसं बघत बसलेलो तो योगीराव भेटले. मिपाधर्म वाढवण्यासाठी बोलावलेल्या दाराज् धाब्यावरील कट्ट्याच्या वेळी ओळख झालेली असल्याने उभ्या उभ्याच गप्पा सुरू झाल्या. तोवर विमेंना होऊ घातलेल्या उशीराची माहिती मिळालेली नि किसनद्येव आणि सूड्रावांचं आगमन झालं. मग सरळ ऋषीत शिरून मोठसं (छोटं मला कसलं पुरतंय?) टेबल पकडलं आणि दणदणीत गप्पा मारायला सुरूवात झाली. थोड्याच वेळात बेसनलाडूरावांचं आगमन झालं आणि कट्ट्याला सिस्टिमॅटिकली सुरूवात झाली.

अस्मादिक बाटगे आयटीयन असल्याने योगीराव आणि बेसनलाडूरावांना मी एम्बेडेड सिस्टीममधील बिझनेस मॉडेल आणि ऑपॉर्च्युनिटीज् बद्दल स्टार्टर्स खात खात, चाव चाव चावले. पण एक मात्र खरं, दोघांनीही माझ्या उणे क दर्ज्याच्या अतिबाळबोध प्रश्नांना मनापासून उत्तरं दिली. धन्यवाद दोस्तहो!

तोवर विमे पोहोचले आणि गप्पांच्या कक्षा विस्तारत गेल्या. यातल्या काही कक्षा किसनद्येवांच्या सौजन्यशीलतेची परिसीमा बघत होत्या पण किसनद्येवांनी संपादकाचा बाणा जराही न सोडता आपला तराजू अगदी स्थिर ठेवला. हॅट्सॉफ शक्तिमान!

कट्ट्यातल्या कक्षा अति रुंदावण्यापूर्वी अधिक मोठ्ठं कौतुक करवून घेण्यासाठी किसनद्येवांनी आमचा निरोप घेतला आणि ते मार्गस्थ झाले. पुढे आणिक् तासभर हादाडी करून, मोठ्ठसं बील भरून बाहेर पडलोच तर योगीरावांनी आईसक्रीम खाऊ घालून शेवट गोड केला आणि ते ही मार्गस्थ झाले.

मग आम्ही शतपावली करत करत माटुंगा स्टेशन गाठलं आणि सूड्रावांना निरोप दिला. विमेंच्या आवडत्या जागी, रुईया कट्ट्याला थोडा वेळ अंमळ टेकून उत्तमप्रकारे पार पडलेल्या बे.ला. भेट कट्ट्याच्या आनंदात भरल्या पोटाने घराकडे रवाना झालो.

इति कट्टा-पुराणं समाप्तम्।

शुभं भवतु!

योगी९००'s picture

30 May 2014 - 8:34 am | योगी९००

खरं, दोघांनीही माझ्या उणे क दर्ज्याच्या अतिबाळबोध प्रश्नांना मनापासून उत्तरं दिली.
मला तरी प्रश्न अतिबाळबोध वाटले नाहीत...कदाचित तुमच्या नजरेत ते बाळबोध असतील..

बाकी आपला संवाद, म्हणजे कोणी केव्हा शाळेत प्रवेश घेतला हा खुपच मजेशीर झाला...

धन्या's picture

30 May 2014 - 1:02 pm | धन्या

मस्तच झाला की कट्टा.

ते मिसळपाव आणि खादाडमाऊ-बोकोबांचे किस्से भारीच. यात आमच्या ओळखीचा एक बोकोबा नक्की असेल याबद्दल खात्री आहे. ;)

>> यात आमच्या ओळखीचा एक बोकोबा नक्की असेल याबद्दल खात्री आहे.

खात्री तात्काळ पडताळून घेण्यात आली होती आणि शिक्कामोर्तबही झाले. लिहीताना थोडा हात आवरता घेतला इतकंच !! ;)

अत्रुप्त आत्मा's picture

30 May 2014 - 4:45 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/simpsons/mr-burns-evil-laugh-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emo/simpsons/mr-burns-evil-laugh-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emo/simpsons/mr-burns-evil-laugh-smiley-emoticon.gif

विश्वनाथ मेहेंदळे's picture

30 May 2014 - 6:05 pm | विश्वनाथ मेहेंदळे

या निमित्ताने आमच्या मीनाक्षीची आठवण आली आणि भरुन आले. :-D

अत्रुप्त आत्मा's picture

30 May 2014 - 8:34 pm | अत्रुप्त आत्मा

@मीनाक्षीची आठवण आली>>> =)) होय हो होय! =)) ती देवरुख-करांची कन्या शाळा!!! ;) :D