विडंबन - सफ़रचंद
मूळ कविता - सफ़रचंद
कवी - संदीप खरे
संदीप् खरे यांची माफ़ी मागुन...........
प्रोग्रामरने फ़क्त कोडिंग करायची असते,
करायाची नसते काळजी आजुबाजुला सोबती असण्याची नसण्याची
डेडलाईन आली कळतक्षणीच सारा कोड गोळा करुन रिलीज करायचा असतो
प्रोग्रामरने फ़क्त कोडिंग करायची असते
मग तो कोड बघुन पी.एम. ला तुझी स्तुती सुचू देत ना सुचू दे
पी.एम. चे नशिब वेगळे आणि प्रोग्रामरचे नशिब वेगळे असते ,
पी.एम.गत त्याने इन्क्रिमेंट वगैरे मागयचे नसते
प्रोग्रामरने फ़क्त कोडिंग करायची असते
करायचा नसतो विचार की इन्टिजर चे फ़्लोट मध्ये कसे रुपांतर होते ,
किंवा कोड मधे बग्स् ही अंगभूत असतात ,
आपल्याला नियम माहित असोत वा नसोत संगणक माञ नियमानुसारच चालतो
जर प्रोग्रामर असेल तर त्याने कोडिंग करायाचे असते,
संगणक असेल तर त्याने ते रन करयाचे असते
प्रोग्रामरने फ़क्त कोडिंग करायची असते
प्रोग्रामरलाही असतिल कि स्वप्ने की आपण सुद्धा पी. एम. बनावे ,
आणि झेलावे प्रोग्रामरने आपल्याला सतत,
पण एकेक असे पिकले स्वप्न अशे वेळीच डेठाशी खुरडायचे असते
अन् कामकाज असो वा सुटी , दिवस असो वा राञ ,
डेडलाईनच्या आधीच कोडिंग पुर्ण करयचे असते
प्रोग्रामरने फ़क्त कोडिंग करायची असते
प्रतिक्रिया
14 Oct 2008 - 11:11 am | alkeshb22
हे वचुन मला खुप मस्त वातले
26 Sep 2019 - 6:43 pm | मी असाकसा वेगळा...
धन्यवाद
27 Sep 2019 - 8:38 am | ज्ञानोबाचे पैजार
२००८ मधे प्रतिसाद आणि २०१९ मधे धन्यवाद
पण मस्त आयडीया आहे ही.
मी पण माझी जुनेरी काढुन इकडे परत वाळत घालतो.
पैजारबुवा,
24 Oct 2008 - 7:40 pm | स्वानन्द
मित्रा, अगदी सन्गणक अभियन्त्याला शोभेल असेच झाले आहे विडम्बन :)
26 Sep 2019 - 7:29 pm | मी असाकसा वेगळा...
धन्यवाद
24 Oct 2008 - 8:06 pm | रामदास
कोडिंग करायची काळजी
सोबती नसण्याची
डेडलाईन आली
कोड गोळा करुन रिलीज करायचा असतो
बग्स् ही अंगभूत असतात
इन्टिजर चे फ़्लोट मध्ये कसे रुपांतर होते ,
असेल तर त्याने ते रन करयाचे असते
पिकले स्वप्न अशे वेळीच डेठाशी खुरडायचे असते
कामकाज असो वा सुटी , दिवस असो वा राञ ,
डेडलाईनच्या आधीच कोडिंग पुर्ण करयचे असते
26 Sep 2019 - 8:49 pm | जॉनविक्क