नमस्कार मिपाकरांनो, गेल्या महिन्याच्या १३ तारखेला सज्जनगड येथे गेलो होतो. तेथील काही माहिती व प्रकाशचित्रे इथे टाकत आहे.
सातार्यापासून साधारण १८-२० किमी अंतरावर सज्जनगड आहे. सज्जनगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरकरांकडून जिंकला. श्रीसमर्थ रामदास स्वामी यांनी या गडावर वास्तव्याला आल्यानंतर 'सज्जनगड' हे नाव दिले. समर्थांनी समाधी घेतल्यानंतर छत्रपती संभाजीराजेंनी त्या ठिकाणी समाधी मंदीर व त्यावर श्रीराम मंदीर बांधले. श्रीराम मंदीरातील श्रीराम, लक्ष्मण, सीता व मारुतींच्या मूर्ती या पंचधातूच्या असून त्या तंजावर (तमिळनाडू) येथुन आणल्या आहेत. या मुर्तींची पूजा समर्थांनी स्वहस्ते देह ठेवण्याच्या पाच दिवस आधी केली. गडावर आणखी समर्थ प्रस्थापित धाब्याचा मारुती आणि अंगाई (अंगलाई) देवी यांची मंदीरे आहेत.
उरमोडी नदी - या नदीचे समर्थांचे परमशिष्य कल्याणस्वामी दोन प्रचंड आकाराचे हंडे भरून पिण्याचे पाणी नेत असत.
गडावर जाताना रस्त्याच्या बाजूने ठिकठिकाणी समर्थविचार लिहिलेले आहेत त्यापैकी
पायर्यांच्या सुरूवातीला शिव-समर्थांचे चित्र असलेली आणि मला आवडलेली एक जाहिरात :)
छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार
श्रीसमर्थ महाद्वार
श्रीसमर्थ महाद्वारातून आत गेल्यावरचा एक शिलालेख व खाली त्याचा अर्थ. या लेखाच्या अस्तित्वामुळे हा गड काही काळ मोगलांच्या ताब्यात असल्याचे कळते.
पायर्या चढून गेल्यावर सर्वप्रथम दिसते ती हि कमान आणि त्यावर फडकणारा भगवा.
डाव्या बाजूला पाण्याचे तळे
समाधी व श्रीराम मंदीराच्या सुरुवातीचा गणपती
श्रीराम मंदीर. या मंदीराच्या तळघरात श्रीसमर्थांची समाधी आहे.
समर्थांचा मठ, शेजघर आणिबाजूच्या खोल्या . शेजघरात समर्थांच्या नित्य वापरातील वस्तू ठेवल्या आहेत.
महाप्रसादगृह. येथे रोज दुपारी व संध्याकाळी आरतीनंतर भक्तांसाठी महाप्रसादाची सोय आहे.
गडाच्या पश्चिम कड्याकडची काही चित्रे.
समर्थ प्रस्थापित धाब्याचा मारुती. शिव-समर्थांच्या गुप्त गाठीभेटी येथे होत असल्याचे सांगितले जाते.
अंगाई (अंगलाई) देवीचे मंदीर. या मूर्ती समर्थांना अंगापूरच्या डोहात सापडल्याचे सांगतात.
अंगाई (अंगलाई) देवीच्या मंदीराकडे जाताना हा भगवा लागतो. उनसावल्यांतून कसा डौलाने फडकतोय.
मंदीराच्या बाजूला असलेला वापरायच्या पाण्याचा तलाव.
पिण्याच्या पाण्याचा तलाव.
गोशाळा.
वरील सर्व प्रकाशचित्रे सोनी इरिक्सनच्या K790i मोबाईलच्या कॅमेर्यातून काढलेली आहेत.
प्रतिक्रिया
12 Oct 2008 - 10:30 pm | प्राजु
खास करून गडाच्या पश्चिमकड्याजवळची चित्रे..
धन्यवाद.
आवांतर : शिवथर घळ सज्जन गडाजवळच आहे का?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
13 Oct 2008 - 2:52 am | घाटावरचे भट
>>शिवथर घळ सज्जन गडाजवळच आहे का?
नाय बॉ...शिवथर घळ पडती कॉकनात, वरंधा घाटाच्या पायथ्याशी...आन् सज्जनगड घाटावं सातार्यापाशी हाय...
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
13 Oct 2008 - 1:25 am | शितल
फोटो छान आले आहेत.
सज्जनगडाची सचित्र सफर आवडली. :)
13 Oct 2008 - 1:58 am | टारझन
शब्बास रे डेंगळ्या ..
मला सज्जनगडावर जायची लै लै विच्छा झालीये आता ... रोडमॅप जरा नीट धिला आसताना लेका !!! कावळ्याच्या अँगलने डोंगरकडावरचे फोटू च्यात मधेच ढगांतुन प्रकाशाने वाट काढली आहे .. हे बेष्ट ...
आणि फोटू किलेर येक मैन्यानी टाकणार असं ठरीवलं व्हतं का ?
( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
13 Oct 2008 - 12:01 pm | डोमकावळा
आणि फोटू किलेर येक मैन्यानी टाकणार असं ठरीवलं व्हतं का ?
अरे तस नाही रे टार्या..
पण काय आहे ना आजकाल आपलं आणि वेळेचं गणित ठीकसं जुळेनासं झालयं...
ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.
13 Oct 2008 - 7:22 am | झकासराव
आवडले रे फोटो.
खास करुन गडाच्या पश्चिम कड्याचे फोटु. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
13 Oct 2008 - 7:47 am | सहज
सज्जनगडाची फेरी आवडली.
13 Oct 2008 - 7:57 am | विसोबा खेचर
डोमकावळ्या,
सज्जनगडाची सुंदर यात्रा घडवलीस रे! फोटूही सुंदर..! :)
तात्या.
13 Oct 2008 - 8:24 am | यशोधरा
छान फोटू. सज्जनगडाच्या सफरीबद्दल धन्यवाद.
13 Oct 2008 - 9:28 am | विजुभाऊ
सज्जन गडाकडे जुन्या पायर्यांच्या वाटेकडुन जाताना एक शिवालय आहे. तेथे मिथुन शिल्पे आहेत.
पाम्डवकालीन शिव मन्दीर खरेच एक सुंदर मन्दीर आहे.
नेक्स्ट टाईम ते पहायला विसरु नकोस. परळी गावातुन आत जावे लागते
13 Oct 2008 - 12:10 pm | डोमकावळा
पुढच्या खेपेस तिकडे नक्की जाईन :)
ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.
13 Oct 2008 - 9:58 am | अनिरुध्द
'डोमकावळ्याच्या नजरेतून' काढलेले फोटो मस्तच आले आहेत.
13 Oct 2008 - 11:33 am | अभिरत भिरभि-या
डो.का. भाऊ,
सुरेख फोटु
इथुन जवळ पवनचक्क्या आणि एक धबधबा आहे तो पाहिलात का ?
13 Oct 2008 - 11:38 am | आनंदयात्री
फोटोग्राफ .. उत्तम सहल घडली .. पुढल्या वेळेस ते विजुभाउ काय म्हणतात त्या शिल्पांची सहल घडव !!
13 Oct 2008 - 12:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्त फोटो रे!
अवांतरः सोनी मोबाईलच्या कॅमेर्यातून काढलेले फोटो कंप्यूटरवर हलवता येतात या माहितीबद्दल अनेक आभार.
अदिती
13 Oct 2008 - 12:35 pm | डोमकावळा
>> अवांतरः सोनी मोबाईलच्या कॅमेर्यातून काढलेले फोटो कंप्यूटरवर हलवता येतात या माहितीबद्दल अनेक आभार.
अरे वा... छान निरीक्षण... :) कृ.ह.घ्या.
ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.
13 Oct 2008 - 2:10 pm | डोमकावळा
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
मिपाकरांसाठी ही छोटीशी भेट. सज्जनगडला जाताना खेड शिवापूर जवळ एका हाटेलात खाल्लेली मिसळ. (नाव बहूतेक गिरीजा असावं :?)
ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.
13 Oct 2008 - 3:24 pm | अनिल हटेला
डोमभाउ !!!
मस्त सफर घडवलीत सज्जनगडाची !!
आणी सोबत च्या मिसळी च्या फोटोबद्दल ही धन्यवाद !!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
13 Oct 2008 - 4:14 pm | लिखाळ
वा ! बरेच दिवसांनी सज्जनगडावर फिरायला मिळाले. आनंद झाला. मी अनेकवेळा गडावर गेलो आहे आणि मनसोक्त राहिलो-फिरलो आहे. त्या आठवणी ताज्या झाल्या ! फोटो छान आहेत.
रामाची आणि अंग्लाईदेवीची मूर्ती फारच छान आहेत. पण त्यांचा फोटो काढता आला नसावा.
--(आनंदित) लिखाळ.
13 Oct 2008 - 4:46 pm | नंदन
आहेत सगळेच फोटोज. त्यातही पश्चिम कड्याची दोन आणि फडकणार्या भगव्याचे छायाचित्र विशेष आवडले. तर्रीदार मिसळीचा फोटूही बेष्ट.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
13 Oct 2008 - 4:50 pm | नाखु
मा.टारझन राव..
सातार्यापासुन अगदि जवळ आहे.. शिवाय गडावरिल भोजन प्रसाद चुकवु नका.. (साधाच पण स्वादिश्ट)
समर्थ भक्त "नाद खुळा"
13 Oct 2008 - 4:59 pm | टारझन
श्रीमान नादखुळा राव .. पुण्यापासनं कसं निघावं ? सातारा हायवे ? (बँगलोर एक्प्रेस वे) ?
आणि मला महाबळेश्वर प्रतापगडाचा रस्ता माहित आहे .. त्याला रेफरंसने काही सांगितलं तर उपकार होतील :)
शाळेतील महाबळेश्वर सहलीची आठवण दाटून आलेला )
-- ( टारुबाळ)
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
13 Oct 2008 - 5:01 pm | चतुरंग
वा रे वा डोमकावळ्या मस्त सफर! कित्येक वर्षांनी सज्जन्गडावर गेलो निदान चित्रातून तरी. प्रत्यक्षात एकदाच बघितलाय.
(पश्चिमकडा म्हणजे 'कल्याणा, अरे छाटी उडाली बघ!' म्हणून समर्थ म्हणतात आणि कल्याणस्वामी उडी मारतात अशी कथा आहे तोच असावा) फोटू मस्तच.
दिमाखात डोलणारा भगवा छातीत एक नवा श्वास देऊन जातो! चित्रमय सफरीबद्दल धन्यवाद!!
चतुरंग
13 Oct 2008 - 5:04 pm | प्रमोद देव
डो(म)का(वळे)शेठ मानलं तुमच्या नजरेला आणि हस्तकौशल्याला!
13 Oct 2008 - 5:17 pm | विजुभाऊ
टारु बाळा . तुला महाबळेश्वर आठवलेच कसे
पुन्याहुन सरळ सातारा गाठायचा. आणि सातारा गावातुन पलीकडे ८ किमी जायचे
समर्थांच्या सच्च्या आणि कडक मारुतीच्या भक्ताच्या वाटेत महाबळेश्वर अज्याबात येत नाय.
13 Oct 2008 - 6:26 pm | अभिरत भिरभि-या
यॉर्कर !!
13 Oct 2008 - 5:24 pm | विजुभाऊ
समर्थ हे मराठवड्यातले एक सन्त . बोहोल्यावरुन सावधान ही गर्जना ऐकुन लग्न न करता त्यानी लोकाना प्रपंच करावा नेटका सांगितले
"लेकुरे उदंड झाले तो ते लक्ष्मी निघोनी गेली " हे सांगितले .
मराठवाड्यातले समर्थ ... त्यानी कर्मभूमी म्हणून सातारा निवडले. सातार्यात आल्यानन्तर त्यानी ११ मारुतींची स्थापना करुन लोकाना बलोपासनेचे महत्व जाणवून दिले.
शिवाजी महाराजांची त्यांची भेट केंव्हा झाली हे इतिहासात नमुद नाही. पण त्याने संभाजी महाराजाना मार्गदर्शन देण्यासाठे एक पत्र लिहिल्याचा दाखला आहे
13 Oct 2008 - 8:04 pm | गणा मास्तर
मस्त फोटो आहेत रे मित्रा
जवळच ठोसेघरचा अप्रतिम धबधबे आहेत . ते नाही का पाहिलेस?
आणि चाळकेवाडीच्या पवनचक्क्या.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
13 Oct 2008 - 10:07 pm | इनोबा म्हणे
फोटूतली सहल झकास झाली.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर