विवाहांतर्गत बलात्कारांचा प्रश्न

arunjoshi123's picture
arunjoshi123 in काथ्याकूट
30 Apr 2014 - 3:54 pm
गाभा: 

या संदंर्भात सद्य भारतात ही माहिती उपयुक्त ठरावी.
http://timesofindia.indiatimes.com/india/Treat-marital-sexual-abuse-as-r...
नि
http://www.indialawjournal.com/volume2/issue_2/article_by_priyanka.html
नि
http://timesofindia.indiatimes.com/india/Govt-justifies-exclusion-of-mar...

अन्यायाचे स्वरुप -
१. According to the UN Population Fund, more than two-thirds of married women in India, aged between 15 to 49, (पतींकडून) have been beaten, raped or forced to provide sex.

आजच्या कायद्यांचे स्वरुप -
१. Section 375, the provision of rape in the Indian Penal Code (IPC), has echoing very archaic sentiments, mentioned as its exception clause- “Sexual intercourse by man with his own wife, the wife not being under 15 years of age, is not rape.” Section 376 of IPC provides punishment for rape.
२. Even after the Nirbhaya assault, when laws dealing with crimes against women were made stricter, marital rape was not made a criminal offence. The law offers some protection to minor victims of marital rape but rape of a wife above 15 (हे १८ असायला पाहिजे ना?) years of age is not punishable.
३. Marital rape is illegal in countries such as New Zealand, Canada, Israel, France, Sweden, Denmark, Norway, Russia and Poland. It is also an offense in 18 states in the US. (बाकी ५०-१८ राज्यांत का नसावा? ही कोणकोणेती राज्ये आहेत नि त्यांची काही कारणे असावित का?)
३. इथे काही मार्ग उपलब्ध आहे परंतु त्यात पतीकडून क्रौय असा शब्द आहे नि बलात्कार हा शब्द अपेक्षित नाही. A survivor of marital rape in the country can get some relief by filing a case against her husband under 498A IPC (husband subjecting his wife to cruelty). However, the section doesn't clearly define the term cruelty and carries a maximum punishment of three years and fine.
४. दिल्लीच्या एका न्यायालयाने अजून एका कलमाखाली, (चक्क त्या फेमस समलैंगिकता वाल्या कलमाचा वापर करून) वैवाहिक बलात्कार करणारास सजा सुनावली आहे. A victim of marital sexual abuse should be treated as a rape survivor, a trial court has held while denying bail to a man accused of sodomizing his pregnant wife. Pushing the envelope to apply section 377 of IPC, which deals with 'unnatural sex', to relations within marriage, additional sessions judge Kamini Lau said sexually abused wives had every right to getting help and protection from the state.
५. इथे या कायद्याखाली क्रिमिनल पनिशमेंटच होत नाही. The much awaited Domestic Violence Act, 2005 (DVA) has also been a disappointment. It condones sexual abuse in a domestic relationship of marriage or a live-in, only if it is life threatening or grievously hurtful. It is not about the freedom of decision of a woman’s wants.

एक प्रशासनिक लोचा-
संसद नीट कायदे पास करत नाहीय नि म्हणून आम्हाला या लोकांना सजा द्यायला अवघड जातेय अशी तक्रार कोर्टाने चालवली आहे. हे अवांतर आहे पण अशा अशा स्वरुपाचे कायदे करा वा नाहीत म्हणून कोर्टाला झालेले दु:ख ते उघड व्यक्त करत असते हे विचित्र नाही का?
१. The court lamented that there were no laws to protect survivors of marital rape but said such a victim cannot be discriminated against just because she is the wife of the sexual aggressor. ....Legislatures are yet to take serious note of rampant marital sexual abuse which women suffer silently ...

अन्यायकर्ते राजरोसपणे सुटतही आहेत-
१. yet again in a case where a Delhi court acquitted a man of charges of raping his wife on the premise that having sexual relations with a spouse, even if forcibly, did not amount to 'marital rape'.

लॉ कमिशनचे म्हणणे-
या मुद्द्यावर काय बदल करायचे आहेत याबद्दल जागृती नाही असे म्हणता येत नाही. The 172nd Law Commission report had made the following recommendations for substantial change in the law with regard to rape.

१. ‘Rape’ should be replaced by the term ‘sexual assault’. ‘Sexual intercourse as contained in section 375 of IPC should include all forms of penetration such as penile/vaginal, penile/oral, finger/vaginal, finger/anal and object/vaginal. In the light of Sakshi v. Union of India and Others [2004 (5) SCC 518], ‘sexual assault on any part of the body should be construed as rape. Rape laws should be made gender neutral as custodial rape of young boys has been neglected by law. A new offence, namely section 376E with the title ‘unlawful sexual conduct’ should be created. Section 509 of the IPC was also sought to be amended, providing higher punishment where the offence set out in the said section is committed with sexual intent. Under the Indian Evidence Act (IEA), when alleged that a victim consented to the sexual act and it is denied, the court shall presume it to be so.
२. Marital rape: explanation (2) of section 375 of IPC should be deleted. Forced sexual intercourse by a husband with his wife should be treated equally as an offence just as any physical violence by a husband against the wife is treated as an offence. On the same reasoning, section 376 A was to be deleted.

वर्मा कमिटीने योग्य सल्ला दिला -
१. लग्नास संमती म्हणजे लैगिंक संबंधास सदैव अप्रतिग्रहणीय संमती नव्हे. The IPC differentiates between rape within marriage and outside marriage. Under the IPC sexual intercourse without consent is prohibited. However, an exception to the offence of rape exists in relation to un-consented sexual intercourse by a husband upon a wife. The Committee recommended that the exception to marital rape should be removed. Marriage should not be considered as an irrevocable consent to sexual acts. Therefore, with regard to an inquiry about whether the complainant consented to the sexual activity, the relationship between the victim and the accused should not be relevant.

पण शेवटी सरकारने पाणी फिरवले -
१. सरकारच्या मते वैवाहिक बलात्कार विवाहसंस्था दुर्बल करेल. सरकारला नक्की कोणते धोके अपेक्षित आहेत हे कळले नाही. The government on Monday (फेब २०१३ मधे) justified its decision not to include marital rape as a sexual offence in the Criminal Law Amendment Ordinance, 2013, saying that this could weaken the institution of marriage, but admitted that it was still grappling with the tricky issue of failed live-in relationships where an ex-partner is accused of rape committed under the false promise of marriage.
२. संसदेत केवळ स्त्री खासदारांनीच या निर्णयाला विरोध केला. हे ही प्रचंड विचित्र आहे. जया बच्चन तर (त्या कोणत्याही चित्रपटात रडल्या असतील त्यापेक्षा) हुम्सून हुमसून ढसाढसा रडल्या होत्या. राज्यसभेत त्यांनी खूप पोडतिडकिने हा मुद्दा मांडला हे पाहिल्याचे आठवते. The government has said that criminalising marital rape would weaken traditional family values in India, and that marriage presumes consent, arguments opposed fiercely by women's activists.
३. सरकारच्या निर्णयाला सर्वपक्षीय पॅनेलने पाठींबा दिला. Speaking to reporters, panel chairman Venkaiah Naidu said, "The committee agrees with the government that we shouldn't disrupt the family system.
He added that government decided against recognizing marital rape as this would go against the traditional family system in India where a marriage is seen as a steadfast institution. The official is said to have articulated the government's apprehensions that accusations of rape might be made in the wake of marital disputes, causing irreparable damage to the institution of marriage.

या सुमारास वा कसे हा विषय डोक्यात घोळत होता. तेव्हा मी अजून एक प्रचंड धक्कादायक गोष्ट पाहिली. ती अशी. 'भारत सरकारची' अधिकृत वाक्यरचना खालिलप्रमाणे होती (कोण्या pib notice मधे असेल): Criminalizing marital rape will endanger our family institutions. इथे मी आपले लक्ष रेप या शब्दाकडे वेधू इच्छितो. मी हे वाचून प्रचंड गोंधळून गेलो.

ऐसीअक्षरे तेव्हा मी कविता महाजन यांच्या एका लेखात माझे प्रश्न विचारले. ती लिंक http://www.aisiakshare.com/node/2039#comment-31499.
नि ते प्रश्न नि कविताजींची उत्तरे पूर्णत्वासाठी इथे देत आहे.
मी -

मानवी समाजात अनेक गुन्हे आहेत. त्यातले काही गुन्हे अतिशय भयंकर मानले जातात. अमानवी, पशूवत, मानवतेला कलंक फासणारे, गुन्हेगारास फाशी द्यावी असे, इतर क्रौयपूर्ण वागणूक द्यावी असे, इ त्यांचे वर्णन केले जाते. असे सर्व गुन्हे एकत्र मांडले तर बलात्कार त्यातील सर्वात घाण अशा पहिल्या काहींमधे मोडेल असे सर्व मानतात. प्रवाहाप्रमाणे मी ही बलात्कार अतिशय घृणास्पद आहे असे मानतो. मित्रांमधे ऑफिसमधील वातावरणाचे वर्णन करताना मी पहिल्यांदा हे वाक्य ऐकले तेव्हा बलात्काराबद्दल माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले - If rape is certain, lie down and enjoy it. मी हे वाक्य ऐकून भयंकर चमकलो होतो. मी ज्या शंका खाली लिहित आहे त्या वाचून कृपया माझ्यावर तुटून पडू नका. त्या शंका केवळ माझे अज्ञान आणि संभ्रम दाखवतात, कोणती विचारसरणी नाही.

बलात्कार प्रोजेक्ट केला जातो तितका गंभीर गुन्हा आहे का असा प्रश्न वरील आंग्लभाषीय वाक्प्रचार ऐकून माझ्या मनात आला. त्या दृष्टीने मी पुढे विचार केला नि खालील शंका जमा झाल्या.

१. आनंददायक संभोग आणि बलात्कार यांच्यात बरेच फरक आहेत. पण इतर गुन्ह्यांना असा आनंददायक equivalent नाहीच. काही केसेस मधे तरी बलात्कार केवळ दॄष्टीकोन तर नव्हे?
२. गर्भ नाही राहिला तर या अपराधाचा केवळ शारीरिक परिणाम कितपत असतो?
३. समाजाची बलात्कृतेची स्वीकृती हा एक मोठा मुद्दा आहे. हा नाही असे मानले तर या अपराधाचा मानसिक परिणाम किती? मानसिक परिणाम कितपत 'समाजाच्या स्वीकृतीशी' निगडित असतो आणि कितपत 'बलप्रयोगाच्या भयाशी'.
४. बलात्काराला मोठा गुन्हा नाही मानले तर काहीही होऊन समाज व्यवस्था बिघडेल म्हणून त्याला मोठा गुन्हा मानले आहे का?
५. स्त्रीयांबद्दल समाजाला सॉफ्ट कॉर्नर आहे म्हणून हा गुन्हा मोठा आहे का?
६. वैवाहिक बलात्कार मानला तर आपला समाजाचा पायाच खचून जाईल हा स्टँड भारतीय संसदेने अगदी अलिकडच्या काळात घेतला आहे. बलात्कार हा इतका मोठा गुन्हा असेल, (पती धरून ) तो कोणीही पुरुष करू शकत असेल तर संसद इतके निर्लज्ज विधान देईलच कसे?
७. पतीने केलेला बलात्कार स्त्रीयांना भयंकर गुन्हा का वाटत नाही? पती या रोलमधे पुरुषाला पाशवी गुन्हा करण्याचे लायसन्स कसे असू शकते? स्त्रीयांचा या बाबतीत शुकशुकाट (बर्‍याच देशात तसे कायदे आहेत, भारतात क्वचित आवाज उठतो) या गुन्ह्याचे कोणते तांत्रिक स्वरुप दर्शवतो?

कविताजी-

१. इतर गुन्हेही गुन्हेगारांसाठी आनंददायकच असतात. गुन्हेगारांचे मानसशास्त्र पाहिले की हे लक्षात येईल. बलात्कार हा दृष्टिकोन नक्कीच नाही, कोणत्याच केसमध्ये.
२. अ. गर्भ राहणं हा परिणाम वाईटच. कारण त्यात दुसरा एक जीवही अकारण बळी जातो. वेळेतच लक्षात आलं तर गर्भपात शक्य होतो; अन्यथा मूल जन्माला घालावं लागतं. ११ वर्षांच्या एका मुलीवर तिच्या वडलांनी बलात्कार केल्याची केस मी हाताळली होती. ती गरोदर राहिली. तिचं गरोदरपण अवघड होतंच; कारण मानसिक त्रासही खूप होते; पण बाळंतपण इतक्या कमी वयानं अत्यंत गुंतागुंतीचं आणि जीवावर बेतणारं होतं. ज्यानं डिलिव्हरी केली त्या डॉक्टरवरही तिनं अविश्वास दाखवला; ज्या मुलीचा वडलांवरचा विश्वास उडतो ती जगातल्या दुसर्‍या कोणत्याही पुरुषावर काय विश्वास दाखवणार? तिचं मूल पुढे दत्तक दिलं गेलं. त्या बाळातही तिची गुंतवणूक अजिबात नव्हती. ( जी इतर कुमारीमातांची असते अनेकदा!) आज सुमारे नऊ वर्षांनी ती बर्‍यापैकी सावरली आहे. कारण सकस जेवण, समुपदेशन, शिक्षण या गोष्टी तिला संस्थेत मिळाल्या. जिथं हे मिळत नाही तिथले प्रश्न कायमची जखम होऊन बसतात.
ब. ज्या मुली अगदीच लहान असतात, त्यांच्या शारीरिक जखमा तुलनेत लवकर बर्‍या होतात आणि काही कळण्याच्या वयाच्या नसल्याने मानसिक संघर्ष नसतो. उदा. सगळ्यात लहान वयाची केस मी ४ महिन्यांच्या मुलीची हाताळली होती. तिच्या मांड्यांवर भाजल्यासारख्या जखमा त्वचा सोलवटल्याने दिसत होत्या. ती तुलनेत लवकर, म्हणजे आठेक महिन्यांत क्युअर झाली.
क. तोंडात लिंग खुपसल्याने एका छोट्या मुलीचा घसा फाटला होता. ( ही घटना मी माझ्या 'भिन्न' या कादंबरीत लिहिली आहे.) ती आजही बोलू शकत नाही. आणि केवळ पातळ आहार घेऊ शकते.
ड. अनैसर्गिक संभोग झालेला असेल तर जखमा बर्‍या होण्यात पुष्कळ काळ जातो.
इ. इतर वस्तूंचा वापर केला गेला असेल, तर जखमा तीव्र असतात. असे गुन्हेगार अधिक हिंसक वृत्तीचे असतात. त्यामुळे ते पूर्ण शरीरावर जखमा करू शकतात. दिल्लीच्या केसमध्ये तर योनीत लोखंडी रॉड खुपसून आतडी बाहेर काढल्याचे आपल्याला माहीत आहेच. असे अनेक प्रकार आहेत.
ई. शरीर आणि मन वेगळं असतं, असं मी मानत नाही. मानसिक विकारांचे परिणाम शरीरावर व शारीरिक विकारांचे मनावर होतच असतात. हे ती व्यक्ती मरेपर्यंत विसरत नाही; हां... काळाने आणि अनुकूल परिस्थिती लाभली तर हे परिणाम काहीसे सौम्य होत जातात.
३. केवळ समाजातच नव्हे, तर त्या व्यक्तीच्या स्वतःच्या नजरेतूनही ती उतरते. हा पगडा अजून किती पिढ्या राहणार आहे माहीत नाही. पुरुषांनाही विपरित अनुभव येतात; पण स्त्रीच्या तुलनेत ते मानसिक त्रासातून लवकर मुक्त होतात. किंवा त्रास देणार्‍या व्यक्तीचा 'बदला' घेण्याची वा काहीवेळा जाहीर नाचक्की-तक्रार करण्याचीही हिंमत दाखवू शकतात. स्त्रियांकडून हे क्वचित घडते. उलट बलात्कारित व्यक्तीशी तिचं लग्न लावून देणे इत्यादी आचरट प्रयोग आपल्याकडे केले जातात. सिनेमांमधून असली चित्रणं दिसतातच.
४. तो मोठा गुन्हा आहे, म्हणूनच त्याला मोठा गुन्हा मानले जाते. केवळ समाजव्यवस्थेचा प्रश्न नाही.
५. स्त्रियांबद्दल समाजाला सॉफ्टकॉर्नर असता, तर असे गुन्हे घडलेच नसते. हा प्रश्नच हास्यास्पद आहे. असं कुणाला सुचू शकतं, हेच मला माणूस म्हणून लाजिरवाणं वाटतं.
६. संसदेचं विधान असं म्हणताना लोकप्रतिनिधी नेमके कोण आहेत, कोणत्या मानसिकतेत वाढलेले आहेत, कसे वर्तन त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात ते करतात इत्यादी अनेक मुद्दे उपस्थित होतात. ते काही सर्वज्ञ नव्हेत आणि सर्वयोग्यही नव्हेत; असते तर आज अनेक सुयोग्य कायदे झाले असते, रखडले नसते.
७. स्त्रियाही याच पुरुषप्रधान संस्कृतीत जन्मलेल्या, वाढलेल्या आहेत; त्यांच्यात बदल होताहेत, पण काळ जावा लागणारच.

मग -
१. या विषयावर संसदेत पुरुष विरुद्ध स्त्री असे विभाजन का झाले? दोन्ही बाजूला थोडे तरी लोक सुज्ञ निघायला हवे. शिवाय २००५ पासून सगळे त्यांच्यामागे लागले आहेत कायदा बदला म्हणून. (If you read all things together) इथे स्त्री वोट बँक कुठे गेली?
२. असा कायदा होण्याचा पुरुषांना संभाव्य धोका काय?
३. किती टक्के विवाहांत असे होते हे सांगणारे आकडे थरकाप आणणारे आहेत. पोलिसांत रजिस्तर होणारे हे बलात्काराचे मामले वास्तविक संख्येच्या तुलनेत ०% च आहेत.
४. मी कविताजींना विचारलेल्या बलात्काराच्या तांत्रिक स्वरुपाबद्दलच्या प्रश्नांत तथ्य आहे का? कुणाचं वेगळं मत आहे का?
५. समजा यामुळे ती कोसलणार आहे तर कुटुंब व्यवस्था फक्त पुरुषांना हवी आहे का? ते का तिच्या बाजूने आहेत?
६. म्हटले जाते तसे सद्य कायदा बदलल्याने 'बलात्काराचा हक्क' काढता येईल. पण इतर सहजीवनसंस्थांचा फोफाव होण्यामागे हे कारण बर्‍यापैकी असावे का?
७. अमेरिकेत गुन्हा मानणारी १८ राज्ये नि न मानणारी ३२ राज्ये यांत स्त्रीयांच्या सौख्यांत प्रचंड फरक असावा काय?

प्रतिक्रिया

पैसा's picture

30 Apr 2014 - 4:40 pm | पैसा

The government on Monday (फेब २०१३ मधे) justified its decision not to include marital rape as a sexual offence in the Criminal Law Amendment Ordinance, 2013, saying that this could weaken the institution of marriage, but admitted that it was still grappling with the tricky issue of failed live-in relationships where an ex-partner is accused of rape committed under the false promise of marriage.

एकीकडे तो बलात्कार आहे हे कबूल करत आहेत आणि वर कुटुंबसंस्था ढासळून पडेल ही भीती? कुछ समझा नहीं! जेव्हा बायको नवर्‍याविरुद्ध बलात्कारासारखा आरोप करायला पुढे येते तेव्हा ते लग्न निश्चितच तिच्यासाठी संपलेलं असतं. मग त्या उदाहरणात कुटुंबसंस्था शिल्लक राहिली कुठे? का फक्त वरून सगळं छान असल्याचं नाटक करत रहावं अशी अपेक्षा आहे? हा कायदा पास केला म्हणून लगेच १००% बायका पुरुषांना कोर्टात खेचतील असं समजणं हा मूर्खपणा झाला. आपल्या नात्यातला विसंवाद जाहीररीत्या कबूल करायचं धाडस फारच थोड्या बायका दाखवतील. समजा कायदा झाला तरी त्याचा उपयोग करणार्‍या फारच थोड्या बायका निघतील.

संसदेत महिला आरक्षाण विधेयक पास होण्यात ज्या प्रचंड अडचणी होत्या ते पाहता या प्रस्तावाच्या बाजूने आणि विरोधी अशी उभी दुफळी पहायला मिळाली यात विशेष नवीन ते काय?

संसदेचं विधान असं म्हणताना लोकप्रतिनिधी नेमके कोण आहेत, कोणत्या मानसिकतेत वाढलेले आहेत, कसे वर्तन त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात ते करतात इत्यादी अनेक मुद्दे उपस्थित होतात. ते काही सर्वज्ञ नव्हेत आणि सर्वयोग्यही नव्हेत; असते तर आज अनेक सुयोग्य कायदे झाले असते, रखडले नसते.
७. स्त्रियाही याच पुरुषप्रधान संस्कृतीत जन्मलेल्या, वाढलेल्या आहेत; त्यांच्यात बदल होताहेत, पण काळ जावा लागणारच.

हे कविताचं म्हणणं पटलं.

मात्र बलात्कार हा गंभीर गुन्हा का आहे हे त्याला "बलात्कार" असं का म्हणतात यावरून पुरेसं स्पष्ट आहे. निव्वळ अनैच्छिक संभोगापेक्षा 'बळाचा अतिरेकी वापर' हा जास्त मोठा गुन्हा आहे. त्यातही आपल्या स्थानाचा, पदाचा गैरवापर केला असेल तर तो अधिकच मोठा गुन्हा आहे. कारण त्यात विश्वासघात, दुसर्‍याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेणे असे आणखीही काही गुन्हे येतात. आणि खरे तर कोणत्याही नवर्‍याला बायको केवळ सर्वकाळ उपलब्ध आहे आणि तिचं काही केलं तरी ती तोंड उघडणार नाही असं समजून तिला गृहीत धरणं हे खरं तर लग्न करताना घेतलेल्या "नातिचरामि" या शपथेचं उल्लंघन आहे.

मृत्युन्जय's picture

30 Apr 2014 - 4:50 pm | मृत्युन्जय

एक प्रॉब्लेम आहे, आजही ४९८अ चा दुरुपयोग होतो. त्याचा दुरुपयोग झाला तर माणूस आत जातो. यात माणूस वरतीच जायचा.

पैसा's picture

30 Apr 2014 - 4:58 pm | पैसा

'क्रौर्य' याची व्याख्या केलेली नसल्याने दोघेही एकमेकांवर तसे आरोप करू शकतात. आणि बलात्काराला फाशीची शिक्षा आपल्याकडे नाही. त्यामुळे वर जायची शक्यता नाही. कोणाचा जीव गेला/गंभीररीत्या जखमी झाले तर खुनाच्या/खुनाचा प्रयत्न या आरोपाखाली फाशी होऊ शकते. (जसे दिल्ली आणि मुंबई केसेसमधे झाले).

arunjoshi123's picture

2 May 2014 - 5:53 pm | arunjoshi123

हेच म्हणतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Apr 2014 - 7:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

एकीकडे तो बलात्कार आहे हे कबूल करत आहेत आणि वर कुटुंबसंस्था ढासळून पडेल ही भीती? कुछ समझा नहीं! जेव्हा बायको नवर्‍याविरुद्ध बलात्कारासारखा आरोप करायला पुढे येते तेव्हा ते लग्न निश्चितच तिच्यासाठी संपलेलं असतं. मग त्या उदाहरणात कुटुंबसंस्था शिल्लक राहिली कुठे?

भाषांतरः

राजकिय भाषा: कुटुंबसंस्था ढासळून पडेल ही भीती आहे.

सामान्य मराठी भाषा: आमच्या मताच्या बँका नाराज होतील ना ? *.
{* त्यांना "ऐकायला" बरा वाटेल असा कायदा बनवला म्हणजे ते खूष (तो निरर्थक असला तरी बेहत्तर) आणि मग आम्हाला पाहिजे ते करायला आम्ही मोकळे ! इथे कोण लेकाचा योग्य आणि समतोल कायदे करायला निवडून आलाय? कायतरीच काय ! }

शुचि's picture

30 Apr 2014 - 7:55 pm | शुचि

=))

जेव्हा बायको नवर्‍याविरुद्ध बलात्कारासारखा आरोप करायला पुढे येते तेव्हा ते लग्न निश्चितच तिच्यासाठी संपलेलं असतं. मग त्या उदाहरणात कुटुंबसंस्था शिल्लक राहिली कुठे?

This is not about that very family. This is about the threat perception on 'getting into family' in the rest of the society.
गावात चार प्रतिष्ठीत केसेस आल्या तर 'संपूर्ण विवाहितांत' इ इ गैरसमजांमुळे वातावरण तापण्याची शक्यता आहे.

पैसा's picture

1 May 2014 - 2:58 pm | पैसा

सगळ्या गोष्टींसाठी कायदे होतील, फक्त त्यात पाणी घालून पाणचट होतील. म्हणजे ठोस परिणाम शून्य. एका कलमाचा अर्थ एक कोर्ट "असा" लावील आणि दुसर्‍या कलमाचा अर्थ वरचं कोर्ट "तसा" लावील. मग सगळी केस "बॅक टू स्क्वेअर वन".

एखाद्या बाईने विवाहांतर्गत बलात्काराचा दावा समजा दाखल केलाच, तर केसचा अंतिम निकाल येईपर्यंत दोघेही बहुधा वर पोचलेले असायचे.

ज्यूडीशियल रिफोर्म्स ही समांतर चालू आहेत.

arunjoshi123's picture

2 May 2014 - 7:18 pm | arunjoshi123

इथे कोण लेकाचा योग्य आणि समतोल कायदे करायला निवडून आलाय?

जे अगदी कंपन्यांचे काटेकोर करार असतात त्यांत देखिल कोणत्या पक्षांचे अधिकार नि कर्तव्ये काय काय आहेत असे सुनिश्चित्पणे सांगता येत नाही. इथे प्रश्न लग्नाचा आहे. म्हणजे संभोग सोडून इतर सर्व बाबींत दोन्ही पक्षांचे काहीही मतभेद नाहीत असे मानू.

आता संभोगासाठी नैसर्गिकतः दोन्ही पक्षांची सतत, मुक्त होकार हवा. एकाचा नसेल तर लोचा आहे. क्रौयाचे प्रकार वगळा (वर लिहिले आहे). फक्त दोनच प्रकारचे नकार पाहू:
१. अगदी काहीही म्हणजे काहीही कारण नसताना घटनादत्त स्वातंत्र्याचा वापर करून दिलेला नकार.
२. ज्यात स्त्री असे कारण सांगते जे तिच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे (से व्रत), पण क्रौय, बलप्रयोग ह्या कायद्यांनी त्या कारणाला अर्थ नाही.

या दोन्ही केसेस मधे रिजनेबल मनधरणीने फरक पडला नाही असे मानू. जर कायद्याने या दोन्ही वेळी झालेला संभोग (ज्यात पुन्हा शारिरीक अत्याचार, क्रौय नाही, मुद्दाम म्हणून तर नाहीच नाही.)बलात्कार मानला तर काय होईल?

१. दोन्ही पक्षांना दोन्ही पक्षांची पूर्ण मर्जी होईल तोपर्यंत वाट पाहावी लागेल.
२. यातून लैंगिक उपासमार होऊ शकते
३. ज्या कारणांचा लैंगिकतेची संबंधच नाही अशी कारणे मधे आणून संमतीच्या अधिकाराचा गैरवापर होइल. तो गैरवापर जाहीर् असेल वा नसेल. पण अगदी जाहिरपणे गैरवापर असेल तरी काही करता येणार नाही.
४. मग 'मला एक तोळे सोने दिले नाही (उदा)' म्हणून माझी बायको माझी लैंगिक कुचंबणा करत आहे हे न्यायालयात न्यायला अजून एक कायदा लागेल.
५. नवरा बायकोचे नाते नाजूक असते. ते लाँग टेर्म मधे खूप मॅच्यूर असले तरी जेव्हा खाचखळगे, दर्‍याखोल्या येतात (ज्या खूप नि खूपदा येतात) तेव्हा हा कायदा एक 'ब्रह्मास्त्र' बनू शकतो.
६. या कायद्याचा मूल उद्देश 'बलात्कार न व्हावेत' असा आहे. त्याचा कुटुंबातल्या इतर बाबींवर परिणाम होऊ नये असा आहे.
७. जे लोक गुन्हे टाळण्यासाठी 'कुटुंबे मोडीत काढायला काय हरकत आहे' असा विचार करत असतील त्यांच्यासाठी हे जाणणे आवश्यक आहे कि 'स्त्री व पुरुषांचे कोणतेही कोहॅबिटेशन' कुटुंबच आहे. त्याचे रुप बदलून फार फरक पडणार नाही. समस्या तिथेच राहतील.

जगात अनेक प्रगत देशांत हा कायदा नाही, जिथे आहे तिथे स्त्रीया जास्त अन्यायमुक्त आहेत असाही प्रकार नाही. तेव्हा भारताचे राजकारणी जेव्हा एक भूमिका घेतात तेव्हा त्याची टर न उडवता उत्तर द्यायचा प्रयत्न करणे इष्ट.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 May 2014 - 10:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

जोशीसाहेब, तुमच्या सद्हेतूबद्दल अजिबात संशय नाही. शिवाय असे धागे सर्वसमावेशक चर्चा करवून आणतात आणि हे पार्टीसिपेटरी लोकशाहीचे लक्षण आहे. म्हणूनच ते स्वागतार्ह आहे.

मात्र कोणताही कायदा (त्यातील पळवाटा बंद करण्यासाठी) मेंदू पुरेपूर वापरून लिहावा, मात्र तो अंमलात आणताना (त्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी) मेंदूबरोबर हृदयाचाही उपयोग करावा हा दंडक आहे.

मेंदू आला की संशयवाद (skepticism) आलाच... तर मग तुम्ही उल्लेखलेले संशयवादी वाक्य का लिहिले गेले त्याबाबत काहीसे...

१. सद्या आपल्याकडचे राजकारण्यांचे वर्तन बघता, कायदा बनण्याअगोदर जे राजकारणी डावपेच आणि जी समीकरणे खेळली जातात याचे खालिल दोन उदाहरणे बोलकी ठरावी:

अ. आम्ही निवडणूकीत निवडून आलो आहोत. आता सिव्हिल सोसायटीला आम्हाला सांगायचा अधिकार नाही. त्यांनी आंदोलन करणे म्हणजे अराजक (केऑस) आणि लोकशाहीविरोधी आहे... हे उद्गार आहेत सर्वोच्च कोर्टाचा गाजलेला वकिल असलेल्या कायदामंत्राचे. पार्टीसिपेटरी लोकशाहीचे (जी लोकशाहीचे सर्वात योग्य व्हर्शन समजले जाते) यापेक्षा किती धज्ज्या उडवायला पाहिजेत?

आ. पूर्व केंद्रिय मंत्री आणि एका मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री असलेला नेता बलात्काराच्या संदर्भात म्हणतो, "बच्चे है । गलतिया करते है ।"

ब्युरोक्रसीने कितीही उत्तम ड्राफ्ट बनवला तरी त्यावर चर्चा करून, त्यात आपल्याला सोईच्या दुरुस्त्या सुचवून, त्यांच्यामुळे कायद्याचा मूळ उद्द्येश पराभूत झाला तरी त्या मान्य करवून घेऊन मगच राजकारणी आपले कायदे पास करणार, मग "राजकारण सोडून इतर कशाला (उदा. लॉजीक, न्याय, संतुलित विचार, इ) जास्त महत्व दिले जाईल का?" हा माझा मुख्य प्रश्न तुम्ही उद्धॄत केलेल्या वाक्याचा खरा अर्थ आहे.

२. आपले बरेचसे कायदे कालबाह्य झालेले आहेत हे त्यांच्या नावांतील इसवीसनांवरून कळते. काही कायदे तर स्वातंत्र्यपूर्व काळातील आहेत. इतक्या वर्षांनंतर, फक्त अमेंडमेंट्सची ठिगळे पुरेशी नाहीत आणि नविन, सुटसुटीत आणि मुख्य म्हणजे "सुलभपणे व्यवहारात वापरण्याजोगा" कायदा बनविणे ही उत्तम शासनव्यवस्थेस अत्यावश्यक आणि मूलभूत गोष्ट आहे हे नेत्यांना अनेक दशके "समजले नाही" की "अशी अव्यवस्था असणे हे जास्त सोईचे आहे?" हाच मुख्य प्रश्न आहे. आणि वास्तवता पहाता याचे उत्तर द्यायलाच पाहिजे का?

३. कायदा:
(अ) कुठलाही कायदा सर्वप्रथम सुगम, न्याय्य आणि संतुलित असणे जरुरीचे असते. राजकीय चढाओढीत न्यायाची काय अवस्था होते हे पाहण्यासाठी शाहबानो केस आणि नुकतीच सर्वोच्च न्यायालयाचा डागाळलेल्या राजकारण्यांसंबद्धीचा निर्णय उलटवण्यासाठी केलेली (पण सुदैवाने निष्फळ झालेली) वटहुकुमाची खेळी, ही दोनच उदाहरणे पुरेशी आहेत.

मात्र केवळ सुगम, न्याय्य आणि संतुलित कायदा पुरेसा नाही...

(आ) उत्तम कायदा हा उत्तम रितीने व्यवहारात आणणे जरूरीचे आहे. कोण्या एका कायद्यात याबाबत पुरेसा विचार आणि तजवीज केली आहे आणि ती व्यवहारात आणली आहे हे प्रत्यक्षात बघायला खूप आवडेल आणि अभिमान वाटेल. नविन कायदा / अमेंडमेंट आली की त्याबाबतीत संबद्धित लोकांचे प्रबोधन (प्रोअ‍ॅक्टीव्ह स्टेकहोल्डर ओरिएंटेशन) होण्याऐवजी मेडियात उलटसुलट मते व गोंधळ आणि मग सरकारचा खुलासा हे नेहमीचे आहे.

(इ) उत्तम कायदा हा उत्तम रितीने व्यवहारात आणल्यावर "त्याच्या पालनावर उत्तम देखरेख आहे आणि त्याचे पालन केल्यास फायद्याचे आहे आणि पालन न केल्यास कारवाई होईल" ही जाणीव जनमानसात तयार करणे जरूरीचे असते. आणि तशी कारवाई कोणताही (पैसा, दडपण, इ मुळे)अपवाद न करता करणे जरूरीचे आहे. सद्या ही अट बहुतांश स्वप्नावस्थेतच आहे.

४. कायदा समतोल व्हायला त्याचा परिणाम होणार्‍या सर्व घटकांचा (स्टेकहोल्डर्स) समतोल विचार अत्यंत जरूर आहे... यालाच साधारणपणे न्याय असे म्हणतात. एका घटकाला झुकते माप देताना दुसर्‍या घटकावर अन्याय होऊ नये याची शक्य ती सर्व खबरदारी घ्यायला हवी. "धर्म, जात, लिंग, इ कारणाने कायदा एका बाजूला झुकलेला असणे" या राजकीय विवशतेचा/प्रवृत्तीचा प्रतिकार करण्याची ताकद राखणारे नेते हा दुर्दैवाने भारताचा विशेष नाही.

५. समतोल कायदा म्हणजे सर्वसामान्य नागरीकाइतकेच शासनही जबाबदार (अकाउंटेबल) असणे जरूरीचे आहे. यात कारवाई आणि कारवाईची वेळ या दोन्ही सारख्याच महत्वाच्या असतात. उदा: सर्वसामान्य नागरीकाला एखाद्या मागणीकरिता अर्ज / गुन्ह्याची तक्रार करायचा हक्क भारतात आहे. हा हक्क ठराविक कालावधित न बजावल्यास नागरिक हक्क गमावतो. इथपर्यंत ठीक आहे. पण...
त्या अर्जावर/तक्रारीवर योग्य वेळेत, योग्य कारवाई न केल्यास, तसे करणार्‍या अधिकार्‍यावर (आणि त्याच्यावर दडपण आणणार्‍यावर) कारवाईबद्दल कायदा बर्‍याचदा मुका असतो.

ही पद्धत वसाहतवादाचा अवशेष आहे... कारण राजेशाहीत राजा प्रजेला दोषी ठरवू शकतो पण राजा नेहमी बरोबर असतो (The king is always right.) प्रजा त्याला जाब विचारू शकत नाही.

हा अवशेष नजरचूकीने राहिला असे म्हणणे म्हणजे नेत्यांच्या हुशारीवर अविश्वास दाखवणे होईल... मी तरी असा धाडसी आरोप करणार नाही !

असो... अजून आशा सोडली नाही. देश बदलतोय. आपण बदलतोय... पण जरा (की फार?) हळूहळू. त्यामुळेच ही आवश्यक अस्वस्थता अणि संशयवाद.

प्रसाद गोडबोले's picture

3 May 2014 - 8:05 am | प्रसाद गोडबोले

मात्र कोणताही कायदा (त्यातील पळवाटा बंद करण्यासाठी) मेंदू पुरेपूर वापरून लिहावा, मात्र तो अंमलात आणताना (त्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी) मेंदूबरोबर हृदयाचाही उपयोग करावा हा दंडक आहे.

>>> हृदयाला काडीची अक्कल नसते ... एकदा नेमुन दिलेले काम ,धडकत रहाणे , हे विचार नकरता करत रहाणे येवढेच मेंदुला जमते ..... त्या अर्थाने ,थोडक्यात कोणताही सारासार विचार न करता , ह्या कायद्याची अंमलबजावणी करावी असे आपल्याला म्हणायचे आहे काय ? :D

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 May 2014 - 10:59 am | डॉ सुहास म्हात्रे

ह्या वाक्याचा वाच्यार्थ उकलून सांगण्याची देण्याची गरज पडणार नाही असा समज होता :) असो.

त्या वाक्याचा सरळ साध्या मराठीत अर्थः "कायदा लिहीताना पळवाटा शोधून चलाखी करून कायद्याचा गैरफायदा घेता येंणार नाही येवढे डोके वापरणे आवश्यक आहे, मात्र तो अंमलात आणताना तारतम्य, पार्श्वभूमी आणि परिस्थितीचे भान राखणे आवश्यक आहे."

अर्थ अजून नीट समजण्यासाठी एक उदाहरणः एका माणसाच्या कृतीने दुसर्‍याचा मृत्यु होणे याचा तारतम्य, पार्श्वभूमी आणि परिस्थितीचे भान राखून; खून (मर्डर), मनुष्यवध (मॅन स्लॉटर), अपघात, इ अनेक प्रकार असू शकतात आणि त्यांच्यासंबद्धात दिलेले निर्णय व शिक्षांत जमीनस्मानाचा फरक असू शकतो.

प्रसाद गोडबोले's picture

3 May 2014 - 11:23 am | प्रसाद गोडबोले

ह्या वाक्याचा वाच्यार्थ उकलून सांगण्याची देण्याची गरज पडणार नाही असा समज होता

>>> :D ह्या स्मायलीचा अर्थ उकलून सांगण्याची देण्याची गरज पडणार नाही असा माझा समज होता :) असो !

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 May 2014 - 11:27 am | डॉ सुहास म्हात्रे

मीही तुमच्यासाठीच्या प्रतिसादात स्मायली टाकली होतीच ;)

विषय गंभीर असल्याने कोणाचा गैरसमज होऊ नये याचीही खबरदारी घेणे जरुरीचे होते, नाय्का ? :)

प्रसाद गोडबोले's picture

3 May 2014 - 11:37 am | प्रसाद गोडबोले

पॉईंट टेकन !

कायदाप्रणालित काय दोष आहेत ते आपण रोचकपणे निदर्शवले आहे. ते महत्त्वाचे आहेच. पण 'शिक्षणसंस्थेत प्रचंड घोळ असताना' 'एक विशिष्ट विषय कसा शिकवायचा' इथपर्यंतच चर्चा सिमित ठेऊ या.
आपण दाखवलेल्या बाबी या विशिष्ट कायद्याच्या बाबतीत काही वेगळे परिणाम दाखवत असतील तर ते आपणाकडून ऐकायला आवडेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 May 2014 - 12:08 am | डॉ सुहास म्हात्रे

सर्वसाधारणपणे लोकमताचा दबावच कोणताही कायदा कसा असेल हे ठरवत असतो आणि हा कायदा त्याला अपवाद नाही.

जोपर्यंत सरळसरळ पाशवी बलात्काराबाबत "बच्चे है । गलतिया करते है।" असले राजकारण उघडपणे होते आणि त्यामुळे मते मिळतात; इतकेच नाही तर त्याबाबत गदारोळ करून इतर पक्ष/मेडीया लोकमत बदलू शकत/इच्छित नाही, तोपर्यंत विवाहबाह्य पाशवी बलात्काराविरुद्ध संतुलित कायदा आणि त्याची अंमलबजावणी होणे कठीण आहे. फार फार तर लोकक्षोभाचे प्रसंग तात्पुरते आवरण्यासाठी निर्भया प्रकरणासारखी मलमपट्टी करून वेळ मारून नेली जाईल, असेच अनुभव सांगतो.

विवाहांतर्गत बलात्काराची व्याख्या करणे आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करणे हे वरच्यापेक्षा अनेक पटींनी किचकट काम आहे. यात (सहाजिकपणे) आपापल्या मतदात्यांवर लक्ष ठेवून असलेल्या राजकारण्यांचे एकमत ही जरा दूरचीच गोष्ट दिसत आहे. त्यामुळे पहिला ड्राफ्ट जरी "जास्तीत जास्त" संतुलीत आणि न्याय्य असा बनवला तरी सद्यस्थितीत तो पास होईपर्यंत होणार्‍या अनेक राजकीय अगतिकतेच्या आणि देवाणघेवाणीच्या अमेंडमेंट्समुळे त्याचा मूळ गाभा हरवण्याचीच जास्त शक्यता आहे असे वाटते.

सुगम, संतुलित आणि न्याय्य कायदे होण्यासाठी खालीलपैकी कमीत कमी एक (दोन्ही असल्यास सोन्याहून पिवळे) गोष्ट असणे जरूरीचे आहे:

१. "अनलेस प्रूव्ह्ड अदरवाईज" लोकशाहीतले नेते हे (सहाजिकपणे) नेहमीच मतांवर लक्ष ठेवून कोणतीही कारवाई करतात. त्यामुळे सुगम, संतुलित आणि न्याय्य कायदे होण्यासाठी जनमताचा रेटा आवश्यक असतो. सद्या भारतात याची खूपच वानवा आहे.

२. "एक्सेप्शनल अदरवाईज" : देशाच्या सुदैवाने असा नेता असावा की जो स्वतःचा आणि त्याच्या पक्षाचा स्वार्थ बाजूला ठेवून आणि सर्व प्रकारचा विरोध झुगारून केवळ देशाचा आणि नागरिकांचा फायदा मध्यवर्ती ठेवून सुगम, संतुलित आणि न्याय्य कायदे करण्याइतके बळ राखून आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणून सिंगापूरचा ली क्वान यू डोळ्यासमोर येतो. भारताचा ली क्वान यू पहाण्याची आस आहे.

मात्र वरीलपैकी काही होईपर्यंत आता चालू असलेल्या चर्चा आणि विचाराच्या देवाणधेवाणीचे मुल्यही अजिबात कमी नाही... तो त्या दिशेने होणार्‍या प्रवासाचा भागही असू शकतो.

arunjoshi123's picture

2 May 2014 - 5:02 pm | arunjoshi123

एकीकडे तो बलात्कार आहे हे कबूल करत आहेत आणि वर कुटुंबसंस्था ढासळून पडेल ही भीती? कुछ समझा नहीं! जेव्हा बायको नवर्‍याविरुद्ध बलात्कारासारखा आरोप करायला पुढे येते तेव्हा ते लग्न निश्चितच तिच्यासाठी संपलेलं असतं. मग त्या उदाहरणात कुटुंबसंस्था शिल्लक राहिली कुठे? का फक्त वरून सगळं छान असल्याचं नाटक करत रहावं अशी अपेक्षा आहे?

हा प्रश्न इतक्या हलक्याने घ्यायच्या स्वरुपाचा नाही. पत्नी आजारी असेल, गर्भार असेल, संभोगक्षम नसेल, वृद्धा असेल, पतीस आजार असेल, रोग असेल, अनैसर्गिक संभोग करायचा असेल, क्रौयपूर्ण संभोग करायचा असेल इ इ तर दखल घेणारे कायदे अगोदर अस्तित्वात आहेत. हा या धाग्याचा विषय नाही.

१. लग्न केले म्हणजे संभोगास दोहोंबाजूंनी 'सर्व सामान्य स्थितींत' कायमची, irrevocable परवानगी आहे असे सध्याला मानले जाते. इथे नकार कोणत्या स्थितीत मिळेल? 'मला तुझ्यासमोर माझे वर्चस्व सिद्ध करायचे आहे, ते मला हेकटपणा करायचा आहे, ते माझा मूड नाही ते माझी क्ष क्ष मागणी पूर्ण झाली नाही ते माझे य य व्रत आहे ते ही काळ वेळ नव्हे, ते माझे हे आप्त गेले, ते माझा हा पेट गेला, ते मला केवळ माझ्या घटनादत्त संमती नाकारण्याच्या अधिकाराचा वापर करायचा आहे, कोणतेही स्पष्टीकरण न देता' पैकी काहीही असू शकते. अशावेळच्या प्रत्येक बलात्कारालात वेगवेगळी गुन्हेगारी आहे.

२. याउपर दिलेला नकार "संपूर्ण शेवटपर्यंत सर्व प्रकारचा कंप्लीट रिजिड नकार व विरोध" ते "शेवटी १००% मावळलेला नकार/ विरोध" या रेंजमधे कुठेही असू शकतो.

३. अशी घटना कधीतरी एकदा असू शकते , नेहमीचीच असू शकते.

यातील काय काय सजापात्र आहे, नि सर्वच सजापात्र असेल तर सजेत किती तीव्रतेप्रमाने किती फरक असावा हे माहित असणे गरजेचे आहे.

गुन्हा सिद्ध कसा करावा हे तज्ञ सांगतील.

समजा कायदा झाला तरी त्याचा उपयोग करणार्‍या फारच थोड्या बायका निघतील.

असे आत्मविश्वासाने म्हणता येणार नाही. अजून ४०-५० वर्षांनी तर नाहीच. नि असे होऊही ही नये. अन्याय असेल, कायदा असेल तर त्याचा योग्य तो वापर व्हावा.

arunjoshi123's picture

2 May 2014 - 5:25 pm | arunjoshi123

संसदेत महिला आरक्षाण विधेयक पास होण्यात ज्या प्रचंड अडचणी होत्या ते पाहता या प्रस्तावाच्या बाजूने आणि विरोधी अशी उभी दुफळी पहायला मिळाली यात विशेष नवीन ते काय?

हे एक दुरगामी बिल आहे. यात घटना दुरुस्ती पण येते. हे बिल देवेगौडानी (तेव्हा स्त्रीयांचा कोई जोर नही था) चालू केले. राज्यसभेत आरामत पास झाले. या बिलाचे परिणाम पाहता याला अल्प काळात पास होणे अपेक्षिणे चूक आहे. समाजवादी पक्ष वगळता सर्व पक्षांनी या बिलाला पाठिंबा दिला. नको नको ते पक्ष एकत्र आले -बिलासाठी. दलित नि स्त्रीया सोडल्या तर ओबीसी नि सर्वण पुरुषांसाठी लोकसभेत ४४% च जागा उरतात. त्यातही दलित नि स्त्रीया निवडून येऊ शकतात. शिवाय या कोट्यात दलितांच्या उपकोट्याची मागणी झाली. म्हणून मामला लांबला आहे. आज प्रत्येक मेनिफेस्टोत हे वचन आहे. त्यामुळे असा आळ घेणे अस्थानी आहे.
मुलतः राज्यकर्ते हे 'त्यांचा' स्वार्थ ठेऊन कायदा करतात असे म्हणणे चूक आहे. याला १-२ अपवाद असतील पण असे नाही. इथे ही लोकांच्या 'बेडरुममधे घुसताना', सरकार, अर्थातच, गोंधळ घालू इच्छित नाही. सरकारच्याच हेतूबद्दल शंका घेणे सिनिकल आहे.

आणि खरे तर कोणत्याही नवर्‍याला बायको केवळ सर्वकाळ उपलब्ध आहे आणि तिचं काही केलं तरी ती तोंड उघडणार नाही असं समजून तिला गृहीत धरणं हे खरं तर लग्न करताना घेतलेल्या "नातिचरामि" या शपथेचं उल्लंघन आहे.

आज प्रत्येकाला 'कायद्याच्या' संरक्षणाची गरज आहे. अशा शपथा घेतल्याचं १% पेक्षा जास्त लोकांना माहितही नसतं नि त्यातल्या अर्ध्यांना त्याच्याशी काही मतलब नस्तो. म्हणून चर्चा अशी हवी -
१. हा गुन्हा आहे कि नाही?
२. कोणकोणत्या परिस्थितीत आहे नि कोणत्या नाही.
३. हा सिद्ध कसा करावा
४. हा कायदा व्हावा कि नाही?
५. त्यात काय असावे नि काय नाही?
६. इतर काहीच कारण नसताना 'शुद्ध संमतीचा अधिकार' असावा कि नसावा? का?
७. इतर कारणांसाठी , म्हणजे व्रत इ, 'अशुद्ध संमतीचा अधिकार' असावा का नसावा? कोठपर्यंत?
८. शिक्षा काय असावी?
९. ते घर मोडावे असे अभिप्रेत असावे का? (

दरवर्षी

६६% जोड्यांमधे असे होते)
१०. घर न मोडता, पतीचे प्रबोधन करावे, हलकिफुलकी शिक्षा करावी का?
११. कॉलेजात हा विषय, एक धडा असावा का?
१२. हे (६ नि ७ दोन्ही?) घटस्फोटाचे कारण असावे का? वारसा नि मुले यांचे काय?
१३. याचा रोमान्सवर परिणाम होईल का? हे नाते सुदुर काळात एका प्रोफेशनल नात्यासारखे होईल का?
१४. पतींवर अन्याय होण्याची संख्या वाढेल. अर्थातच स्त्रीयांवर तुलनेत जास्तच अन्याय कमी झालेला असेल. पण अन्यायित पतींसाठी काय करायला हवे?
१५. याने काही/बरेच लोक लग्नच करेनासे झाले तर त्याचे काय बरे वाईट परिणाम होतील?
१६. संभोगास संमती हे लॉजिक इतर संमतींस एक्सटेंड होईल का? म्हणजे लोक घरी कसे वागतात त्यात एक भय नावाचा प्रकार येईल का?
१७. नजदिकच्या काळात या कायद्याचे कितपत चांगले परिणाम होतील.

आणि
१८. Would people design marital,cohabitations, etc. systems that fall outside purview of such laws?
19. Will sex, such private thing, like marriage, be a nearly government regulated activity in distant future, say 100 years?

पैसा's picture

2 May 2014 - 6:03 pm | पैसा

१. हा गुन्हा आहे कि नाही?
२. कोणकोणत्या परिस्थितीत आहे नि कोणत्या नाही.
३. हा सिद्ध कसा करावा

व्याख्या कठीण आहे.

१२. हे (६ नि ७ दोन्ही?) घटस्फोटाचे कारण असावे का? वारसा नि मुले यांचे काय

हे मानसिक क्रौर्य याच्या अंतर्गत येत असावे,

१३. याचा रोमान्सवर परिणाम होईल का? हे नाते सुदुर काळात एका प्रोफेशनल नात्यासारखे होईल का?
१४. पतींवर अन्याय होण्याची संख्या वाढेल. अर्थातच स्त्रीयांवर तुलनेत जास्तच अन्याय कमी झालेला असेल. पण अन्यायित पतींसाठी काय करायला हवे?
१५. याने काही/बरेच लोक लग्नच करेनासे झाले तर त्याचे काय बरे वाईट परिणाम होतील?
१६. संभोगास संमती हे लॉजिक इतर संमतींस एक्सटेंड होईल का? म्हणजे लोक घरी कसे वागतात त्यात एक भय नावाचा प्रकार येईल का?

जिथे असा कायदा आधीपासून अस्तित्त्वात आहे तिथे काय सामाजिक परिणाम झालेत याचा अभ्यास करावा लागेल.

"बलात्कार" झाला हे सिद्ध कसे करणार? विवाहीत बाई घरातून तशाच अवस्थेत उठून पोलीसांकडे जाणार का? का आरडाओरडा करुन शेजारी गोळा करणार?

नाही, खरच कळलं नाही म्हणून विचारते आहे. की विवाहानर्गत बलात्कार सिद्ध कसा होतो? अवांतर झाले असल्यास क्षमस्व!

तुमचा अभिषेक's picture

30 Apr 2014 - 7:21 pm | तुमचा अभिषेक

कायदे आणि कलमांची खूप गुंतागुंत होईल यात. खास करून विविधतेने नटलेल्या आपल्या भारत देशात जरा जास्तच.

arunjoshi123's picture

30 Apr 2014 - 7:38 pm | arunjoshi123

यात काही अवांतर नाही.

१. भौतिक घटना = सामान्य/ बलप्रयोग/ क्रौय
२. मानसिक घटना = आनंद / यातना
३. कर्ता = पती /साथी/ अन्य
४. स्त्रीची संमती = आहे / नाही (इथे लग्न म्हणजेच संमती असे न मानता प्रासंगिक संमती)
५. गैरसमज = आहे / नाही (पतीने बुद्ध्या बलात्कार केला कि नाही, नि स्त्रीला काय वाटते.)

कायदा विचारात घेण्यापूर्वी अशी बरीच permutations , combinations आहेत.

त्यातही तो माधुरीचा का करिश्माचा बेटा का कोणता पिक्चर आठवा. "तुमने छोड भी दिया?" - अगोदर थोडी आरडाओरड करून मग नायिका हिरोला असे म्हणते. मिपा वर राम नि सीतेच्या अशा एका प्रसंगाची चर्चा झाली होती.

यातल्या क्रौय भागाला शिक्षेचा आहे. बाकी सगळे कंफ्यूजन आहे. म्हणून संमतीच्या हक्काची चळवळ आणि गुन्ह्याविरुद्धची चळवळ यांना वेगवगेळी सहानुभूती मिळणार आहे. आणि चित्र आहे यातल्या प्रत्येकच गोष्टीला (काँबोला) गुन्हा आहे नि नाही असं काळं पांढरं करता येतं का? एकदा गुन्हा काय काय आहे हे ठरलं कि सिद्ध कसा करायचा हा पुढचा प्रश्न आहे.

शुचि's picture

30 Apr 2014 - 7:41 pm | शुचि

एकदा गुन्हा काय काय आहे हे ठरलं कि सिद्ध कसा करायचा हा पुढचा प्रश्न आहे.

+१

इथे लग्न म्हणजेच संमती असे न मानता प्रासंगिक संमती

हो बरोबर.

तुमचा अभिषेक's picture

30 Apr 2014 - 7:16 pm | तुमचा अभिषेक

सरकारच्या मते वैवाहिक बलात्कार विवाहसंस्था दुर्बल करेल. सरकारला नक्की कोणते धोके अपेक्षित आहेत हे कळले नाही.

धोका पुरुषप्रधान संस्कृतीला आहे यात न की विवाहसंस्थेला.
किंवा असे बोलू शकतो की आपल्या सक्षम(?)आणि सुसंस्कृत(??) विवाहसंस्थेचा पाया पुरुषप्रधानसंस्कृती आहे.

सरकारच्या मते वैवाहिक बलात्कार विवाहसंस्था दुर्बल करेल.

या वाक्याचा दुसरा गर्भितार्थ मला तरी हा दिसतो आहे की जर वैवाहीक संभोगसुखाच्या बाबतीत अतिक्लिष्ट अन कडक कायदे होऊ लागले तर पुरुष लग्नच करणार नाहीत.

तुमचा अभिषेक's picture

30 Apr 2014 - 7:24 pm | तुमचा अभिषेक

नाही हो, कायदा होणे आणि त्याचा सर्रास वापर होणे यात फरक आहे. तसे झाले तरच असा विचार कोणी गडी करू शकतो.

अर्थात पुरुष लग्नच करणार नाहीत या अनाठायी भीतीमुळे, बलात्कार सहन करावेत असे माझे म्हणणे मुलीच नाही - हो स्पष्ट केलेले बरे ;)

हाडक्या's picture

30 Apr 2014 - 9:59 pm | हाडक्या

इथे शुचितैशी सहमत. तसेच एक प्रश्न हा देखील आहे की दुरुपयोगापेक्षा जबाबदारीने तक्रार दाखल केली जाण्याची अपेक्षा इथे आहे.. एखाद्या घरगुती भांडणातपण या गोष्टी धमकीच्या हत्यारासारख्या देखील वापरल्या जाऊ शकतील, काही सांगता येत नाही.
[आपल्याकडे ज्यांना या कायद्यांची खरोखर गरज असते अशा लोकांची सहन करण्याची वृत्ती जास्त दिसते तर गैर फायदा घेऊ पाहणारे बर्‍यापैकी तयारीचे लोक दिसतात मग कायदा कोणताही असो.
सबल(?) गटात मोडणे हाच गुन्हा?
]

"सरकारला नक्की कोणते धोके अपेक्षित आहेत हे कळले नाही. धोका पुरुषप्रधान संस्कृतीला आहे यात न की विवाहसंस्थेला."

१. एक क्षण मानू कि (unlike shown is Disclosure) स्त्री बलात्कार करू शकत नाही.
२. असे म्हणणे कि सरकार पुरुष प्रधान समाजाचे रिफ्लेक्शन आहे निराधार आहे.
३. निसर्गतःच जिथे 'फक्त' स्त्रीयांवर अन्यायचा प्रश्न येतो तेव्हा सरकारने त्याची दखल घेतली आहे.
४. फक्त संभोगाला सुद्ध संमती नाही म्हणून बलात्कार अशी व्याख्या असेल तर संमती खरेच होती कि नाही हे (खटल्याच्या वेळी) केवळ स्त्रीच सांगू शकते. अन्यथा संमतीचे डॉक्यूमेंटेशन करावे लागेल.
५. असा वेळ कि जिथे पतीने पत्नीच्या संमतीविना संभोग केला पण क्रौय केले नाही वा गरजेपलिकडे बल वापरले नाही त्याला बलात्कार्‍याच्या क्लबात घालणे चूक असू शकते. कारण सामान्यतः बलात्कार १. दोन व्यक्तिंत संभोग अभिप्रेत नसताना २ प्रचंड मानसिक त्रास ३. सामाजिक दुषणे ४. जीवनातून उठणे ५. शारीरिक पीडा ६. गर्भ राहिला तर होणारी बदनामी ७ कोर्ट कचेर्‍या ८ लग्न करण्यात येणार्‍या अडचणी ९. बलात्कार करणाराचा खरोखरच स्त्रीसाठी, संबंध नसताना, उपभोग वस्तू म्हणून पाहणे, १०. कंडोम, इ न वापरला जाणे
६. संमती नसताना स्त्रीला संमतीसाठी उद्दिपित केले तर तिला कदाचित शारिरीक त्रास होणार नाही. पण संभोग संपल्यानंतर त्याबद्दल पुन्हा अनाकर्षणाची भावना येते. मग ती पुन्हा तक्रार करू शकते जी योग्य नसू शकते.
७. या कायद्याने मूल व्हावे कि नाही (अगदी एकही) केव्हा व्हावे, किती व्हावेत हे अधिकार फक्त स्त्रीकडे आपोआप जातात. हे अपेक्षित आहे का?
८. मूळात अन्याय करण्याची इच्छा असणे नि वासनापूर्ती करण्याची इच्छा यांत फरक आहे. एकातून दुसरे अभिप्रेत असू शकते, होऊ शकते पण तरीही या दोन अगदीच भिन्न इच्छा आहेत.

यामुळे संस्कृती, प्रधानता, सरकार यांना दोष देणे अयोग्य वाटते.

स्त्री वर पती कडुन बलात्कार याची व्याख्या काय असणार यावर बाकी सर्व अवलबुन आहे. यासारखी दुसरी भिती कुठलीच नसणार...(पुरुषासाठी!!!)

वैवाहिक बलात्कार सजापात्र गुन्हा ठरवला तर विवाहसंस्था वा कुटुंबसंस्था कोसळेल, हादरेल म्हणणे मूर्खपणाचे आहे.

याची कारणे अशी -
१. कोणताही कायदा असा बनत नाही कि त्याचा प्रचंड दुरुपयोग व्हावा. न्यायपालिका व्यवस्थित काळजी घेते.
२. या कायद्याचा गैरफायदा घ्यावा अशी वृत्ती स्त्रीयांत नसते. लक्षात घ्या कोणी "स्त्री" म्हणून याचा गैरफायदा घेणार नाही. गैरफायदा "क्रिमिनल" घेतात.
३. "स्त्री लिंगाच्या व्यक्ति क्रिमिनल असतात. त्यांना पुरुषांवर अन्याय करायचा आहे. बदला घ्यायचा आहे" हे वाक्य केवळ जोक म्हणूनच शोभते. म्हणून उगाच बाऊ नको.
४. म्हणजे कायद्याचा झाला तर फायदाच होणार आहे.
५. केवळ चांगला मेकॅनिझम सुचवणे, चांगली अंमलबजावणी करणे हे गरजेचे आहे.

पण आजही पतिने पत्नीवर जबरदस्ती (इछ्चा नसताना समागम) केली तर बलात्काराचा गुन्हा दाखल होउ शकतो, शिक्षा होउ शकते इतका कायदा सक्षम आहे... पण..... धार्मीक बाब म्हणून (पत्नीने पतिची शरीर्सुखाची इछ्चा त्रुप्त करणे कर्तव्य आहे) ही गोष्ट बहुदा गुन्हा ठरवता येत नाही, कारण मग कायद्याकडे पतिने शरीर्सुख कोणाकडे मागायचे या प्रश्नाचे उत्तर नाही.

"स्त्री लिंगाच्या व्यक्ति क्रिमिनल असतात. त्यांना पुरुषांवर अन्याय करायचा आहे. बदला घ्यायचा आहे" हे वाक्य केवळ जोक म्हणूनच शोभते. म्हणून उगाच बाऊ नको.

अज्ञानात सुख असते खरे. असो.

arunjoshi123's picture

30 Apr 2014 - 11:17 pm | arunjoshi123

पण आजही पतिने पत्नीवर जबरदस्ती (इछ्चा नसताना समागम) केली तर बलात्काराचा गुन्हा दाखल होउ शकतो, शिक्षा होउ शकते इतका कायदा सक्षम आहे

कृपया लेख पुन्हा वाचा. क्रौय नसेल तर सजा होत नाही. मी एक केस साईट केली आहे.

स्त्री लिंगाच्या व्यक्ति क्रिमिनल असतात. त्यांना पुरुषांवर अन्याय करायचा आहे. बदला घ्यायचा आहे" हे वाक्य केवळ जोक म्हणूनच शोभते. म्हणून उगाच बाऊ नको

म्हणजे कोणतीही स्त्री गुन्हेगार नसते असे म्हणायचे नाही. कोणी केवळ स्त्री आहे म्हणून गुन्हेगारी वृत्तीने वागेल असे नसते. आहे कायदा तर घ्या वापरून म्हणून स्त्रीया कायद्याचा अव्वाचा सव्वा वापर करतील, अन्याय करतील असे म्हणणे चूक असावे. अर्थातच पुरुषांवरील अन्यायांत नि:संशयपणे पूर्वीपेक्षा वाढ होईल, पण त्या पेक्षा कितीतरी प्रमाणात स्त्रीवरील अन्याय कमी होईल. आशा आहे कि माझ्या अज्ञानाचा विस्तार मी व्यवस्थित मांडू शकलो आहे.

आत्मशून्य's picture

1 May 2014 - 12:42 am | आत्मशून्य

कृपया लेख पुन्हा वाचा. क्रौय नसेल तर सजा होत नाही. मी एक केस साईट केली आहे.

कृपया प्रतिसाद पुन्हा वाचा, सजा का होत नाही यचे कारण मीच साइट केलेले आहे.

म्हणजे कोणतीही स्त्री गुन्हेगार नसते असे म्हणायचे नाही. कोणी केवळ स्त्री आहे म्हणून गुन्हेगारी वृत्तीने वागेल असे नसते. आहे कायदा तर घ्या वापरून म्हणून स्त्रीया कायद्याचा अव्वाचा सव्वा वापर करतील, अन्याय करतील असे म्हणणे चूक असावे.

" ...उगाच बाऊ नको" म्हणानार्‍या व्यक्तीने मुळातच स्त्रिला सिलेक्टीव लिबर्टी दिलेली असते त्यामुळे सखोल परिणामांचा उहापोह संभवत नाही. आपल्या अज्ञानाचा विस्तार माझा प्रांत नाही पण आपण कशाला "जोक" म्हणा॑लात यावरुन आपल्या विनोद बुध्दीला काय म्हणावे ?

Pain's picture

2 May 2014 - 11:32 am | Pain

२. या कायद्याचा गैरफायदा घ्यावा अशी वृत्ती स्त्रीयांत नसते. लक्षात घ्या कोणी "स्त्री" म्हणून याचा गैरफायदा घेणार नाही. गैरफायदा "क्रिमिनल" घेतात.

४९८ अ चा गैरफायदा घेणार्या हजारो स्त्रियांनी तुमचा दावा अगोदरच पोकळ ठरवलेला आहे.
कायदा करायचाच असेल तर तो लिंग, धर्म, जात वगैरे निरपेक्ष असला पाहिजे नाहीतर काही उपयोग नाही.

पैसा's picture

2 May 2014 - 11:34 am | पैसा

गैरफायदा घेणार्‍यांचा बरोबर आकडा सांगा.

Pain's picture

2 May 2014 - 11:47 am | Pain

ही भारताच्या गृहखात्याच्या उच्चपतळीवरील पदासाठी मुलाखत आहे क?

Pain's picture

2 May 2014 - 11:48 am | Pain

*उच्चपातळीवरील

पैसा's picture

2 May 2014 - 12:02 pm | पैसा

मग हजारों हा आकडा कुठून आला? ते लाखों पण असतील नैतर शेकडो पण असतील. बोलताना काहीपण बोलता येतंय.

गैरफायदा घेणार्‍या स्त्रिया अस्तित्वात नाहीत असे तर म्हण्णे नाही ना?

पैसा's picture

2 May 2014 - 1:20 pm | पैसा

जेवढे लिहिले आहे तेवढेच वाचावे.

सर्वसामान्य माणसाला आसपास काय चाललंय एवढं तरी कळतंच ना? माझ्या ओळखीची फक्त अशी २-४ उदाहरणे आहेत. आता भारतातले आकडे द्या म्हटले तर नाही सांगू शकणार पण, तरी तुम्ही म्ह्णताय तसे "बोलताना काहीपण बोलता येतंय" असंच असेल तर नो चोम्मेन्त्स.

आजचा (वात्रट) सुविचार- Statistics are like a bikini. What they reveal is suggestive, but what they conceal is vital.

कपिलमुनी's picture

2 May 2014 - 5:28 pm | कपिलमुनी

According to the UN Population Fund, more than two-thirds of married women in India, aged between 15 to 49, (पतींकडून) have been beaten, raped or forced to provide sex.

उत्तर द्या ..

यसवायजी's picture

2 May 2014 - 6:55 pm | यसवायजी

@ असं काहीतरी उत्तर द्या-
असे आकडे (त्याच सर्वसामान्यातला एक असणार्‍या) माझ्याकडे नाहीत असे आधीच्या प्रतिक्रीयेत म्हटलंय.
तुम्ही दिलेले आकडे बरोबर असु शकतात. पण beaten,raped or forced हे सगळं आलंय त्यात. फक्त forced ची संख्या जास्त असण्याची शक्यता आहे.

जाताजाता- http://www.498a.org/index.htm

व शहाण्याने कोर्टाची पायरी चढु नये म्हणून तत्सम लोकभयस्तव अनेक पुरुष तक्रार करण्यास पुढे जात नाहीत. याचा अर्थ पुरुषांची घुसमट , गळचेपी हित नाहीये असा अजिबात नाही मग विदा मिळवायचा तरी कसा ? इथे पाशवी शक्ती विरोधात प्रतिसाद टंकायची हिम्मत न राखणारे घंटा पोलीस कंप्लेटी करणार ?

इथे पाशवी शक्ती विरोधात प्रतिसाद टंकायची हिम्मत न राखणारे घंटा पोलीस कंप्लेटी करणार ?

शक्यता नाकारता येत नाही... *acute*

Pain's picture

4 May 2014 - 8:29 am | Pain

"बोलताना काहीपण बोलता येतंय."

मग तुम्ही कशावरून "काहीपण" बोलत नाही आहात? हा लेखच कशावरून "काहीपण" नाही?
मुद्दा खोडता आला नाही की असल काहीतरी लिहायच.
फेक आयड्यांकडून दुसरी काय अपेक्षा ठेवणार म्हणा

पैसा's picture

4 May 2014 - 8:32 am | पैसा

http://web.archive.org/web/20080430104935/http://www.csrindia.org/projec... यातल्या आकडेवारीसारखी स्पष्ट आकडेवारी द्या.

फेक आयड्यांकडून दुसरी काय अपेक्षा ठेवणार म्हणा

हे तुम्ही मला म्हणावे हाच एक मोठा जोक आहे! =))

Pain's picture

4 May 2014 - 9:34 am | Pain

का? तुम्ही इथे फार प्रसिद्ध आहात का? मी बरेच दिवस वाचनमात्रच आहे आणि गवि, सुबोध खरे, जयंत कुलकर्णी, स्पार्टाकस, बॅटमॅन इत्यादींचे लेख नेहमी पाहतो पण तुमचे नाव कधी पाहिलेले आठवत नाही. फेक नसाल तर ते वाक्य इग्नोअर करा.

पैसा's picture

4 May 2014 - 10:10 am | पैसा

वैयक्तिक क्षुद्र हल्ले करण्यापेक्षा आकडेवारी द्या.

Pain's picture

6 May 2014 - 10:02 am | Pain

तुम्हाला आकडेवारी कशासाठी असे विचारले तर "बोलताना काहीपण बोलता येतंय" असा बाष्कळ प्रतिसाद मिळाला. सामान्यतः फेक आयड्यांचे असे वर्तन दिसते. अजूनही ना कारण दिलेत ना काही मुद्दे मांडलेत, नुसता आकडेवारी द्या, आकडेवारी द्या असा धोशा लावलेला आहे. गंमत म्हणजे तुम्ही मला विचारत असलेली आकडेवारी तुमच्याच दुव्यावर उपलब्ध आहे. ती पहा, काही मुद्दे असतील तर मांडा नाहीतर जाउ द्या.

पैसा's picture

6 May 2014 - 10:08 am | पैसा

हजारो केसेस ४९८अ च्या गैरवापराच्या आहेत असे तुम्ही म्हणालात. तेव्हा ते सिद्ध करायची जबाबदारी तुमची. तसे नाही हे दाखवणारे अधिकृत अभ्यासाचे दुवे मी आणि डॉ खरे यांनी दिले आहेत. त्याच्या विरुद्ध आकडेवारी तुम्ही द्या, आम्ही ते मान्य करतो. तुमच्यासारखी हिणकस भाषा वापरणे मला जमत नाही. अजून आपल्या विधानाला आधारभूत अशी आकडेवारी द्या.

Pain's picture

6 May 2014 - 10:59 am | Pain

माझा या कायद्याच्या सध्याच्या स्वरूपास विरोध असून दुसर्या बाजूवर होत असलेल्या अन्यायाची दखल घेतली जावी, ४९८ अ सारखा तो बाय डीफॉल्ट पक्षपाती बनवू नये असा आक्षेप आहे.

डॉ. खरे आणि गोडबोले यांनी मांडलेल्या प्रश्नांना तुम्ही किंवा या कायद्याच्या इतर कुठ्ल्याच समर्थकाने उत्तर दिलेले नाही. तसेच या कायद्याव्यतिरिक्त पुरुषांवर होणार्‍या अन्यायाची दखलही तुम्ही समर्थक लोक घेउ इच्छित नाही. असो.

हिणकस(?) भाषा तुमच्या बाष्कळ प्रतिसादाचा परिणाम आहे. इतर आयड्यांशी झालेल्या संवादात तुम्हाला ती आढळून येणार नाही.

आता आकडेवारीबद्दल-

तुम्ही मागत असेलेली आकडेवारी तुमच्याच दुव्यावर उपलब्ध असताना पुन्हा पुन्हा मला का विचारत आहात हे अजूनही कोडेच आहे.
तुमच्या दुव्यावर ५ कोटी स्त्रिया बळी असल्याचे नमूद केलेले आहे. त्यापैकी हजारात १ असे नोंदणी होण्याचे प्रमाण आहे (म्हणजे ५०,०००). यांची तपासणी करता ६.५% केसेस कायद्याचा दुरुपयोग घेण्याच्या हेतूने दाखल केलेल्या आढळून आल्या. ५०,००० चे ६.५% = ३२५०.

पैसा's picture

6 May 2014 - 11:25 am | पैसा

तुम्ही अजूनही वैयक्तिकरीत्या अपमानास्पद शब्द वापरत आहात.

तसेच या कायद्याव्यतिरिक्त पुरुषांवर होणार्‍या अन्यायाची दखलही तुम्ही समर्थक लोक घेउ इच्छित नाही.

याच्याशी माझा काही संबंध नाही. मी सुरुवातीपासून फक्त "४९८ अ च्या गैरवापराच्या हजारो केसेस" या विधानाबद्दल बोलत आहे.

आकडेवारीबद्दलः ३२५० हा आकडा १२० कोटीच्या देशात कितीसा मोठा आहे आणि कायदा अमलात आल्यापासूनचा आहे हे लक्षात घ्यावे लागेल. म्हणजे दर वर्षी सरासरी किती केसेस गैरवापराच्या होतात याचे गणित तुम्हाला करता येत असेल असे समजते. त्याचवेळी खर्‍या हुंडाबळींना या कलमामुळे किती प्रमाणात न्याय मिळाला याचीही गैरवापराच्या केसेसबरोबर तुलना करावी ही विनंती.

आता तुमच्या "हजारों केसेस" या विधानाला सपोर्ट देणारी आकडेवारी तुम्ही द्या. मी तुमचे विधान बरोबर आहे हे मान्य करेन.

Pain's picture

19 May 2014 - 10:23 am | Pain

"आकडेवारीबद्दलः ३२५० हा आकडा १२० कोटीच्या देशात कितीसा मोठा आहे आणि कायदा अमलात आल्यापासूनचा आहे हे लक्षात घ्यावे लागेल. म्हणजे दर वर्षी सरासरी किती केसेस गैरवापराच्या होतात याचे गणित तुम्हाला करता येत असेल असे समजते. त्याचवेळी खर्‍या हुंडाबळींना या कलमामुळे किती प्रमाणात न्याय मिळाला याचीही गैरवापराच्या केसेसबरोबर तुलना करावी ही विनंती.

"

३२५० हा आकडा १२० कोटींमध्ये नाही तर ५,००,००० मधला आहे. त्याचा अर्थ ५ कोटी स्त्रियांमध्ये ३,२५,००० स्त्रियांनी कायद्याचा गैरवापर केला आहे असा होतो. १२० कोटी ही देशाची लोकसंख्या झाली. तिला मध्ये आणण्याचे काय प्रयोजन?

संपादित

पैसा's picture

19 May 2014 - 1:50 pm | पैसा

अभ्यास वाढवा.

कवितानागेश's picture

6 May 2014 - 1:08 pm | कवितानागेश

अहो दु:खदबुवा,
प्रश्न समजल्यावर क्रुपया 'सामान्यतः फेक आयड्यांचे असे वर्तन दिसते.' या विधानाची सुद्धा आकडेवारी द्या. आम्हाला पुढची कामं करायला बरे पडेल. :)

माझ्या भुवया वर वर जाउन गायब झाल्या.

पिशी अबोली's picture

5 May 2014 - 12:38 pm | पिशी अबोली

फेक आयड्यांकडून

=))
रहावलं नाही... कसला भारी जोक आहे... =))

त्रिवेणी's picture

6 May 2014 - 2:47 pm | त्रिवेणी

नया हे वह

भावना कल्लोळ's picture

6 May 2014 - 5:12 pm | भावना कल्लोळ

दुखदबुवाचे वाचन कच्चे दिसतंय जणु … कि फक्त काही निवडक लोकांच्या लेखाचाच दांडगा अभ्यास आहे. नाही तसे हि काही असेल तर आमची काही हरकत नाही. होते कधी कधी असे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

2 May 2014 - 3:58 pm | विश्वनाथ मेहेंदळे

आज घासुगुर्जींची आठवण येउन भरुन आले. धन्यवाद पैसाताई ;-)

पैसा's picture

2 May 2014 - 5:56 pm | पैसा

अरे म्हणजे काय, दर वर्षी अमूक इतके बलात्कार होतात, त्यातल्या अमूक इतक्या केसेस नोंदल्या जातात असे आकडे नेहमी प्रसिद्ध होतात त्यावरून काहीतरी निष्कर्ष काढता येतो, की किती जणी बळी पडल्या आहेत. आता ४९८अ च्या बाबतीत पुढील अभ्यास प्रातिनिधिक आहे. http://web.archive.org/web/20080430104935/http://www.csrindia.org/projec...
ज्यांना हे कलम रद्द व्हायला हवं आहे त्यांनी असा अभ्यास करून तसे निष्कर्ष पुढे ठेवावेत. शिंपल!

सुबोध खरे's picture

2 May 2014 - 8:25 pm | सुबोध खरे

दुवा -- ४९८ अ गैरफायदा हा २००७ चा आहे.(सात वर्षात स्थिती सुधारली असावी असे म्हणण्याला आधार नसावा.) पण एक प्रातिनिधिक म्हणून देत आहे. गैरवापर कमी आहे पण नगण्य नाही.
http://www.498a.org.in/rsrcs_RTI_DA498AInd.html
ज्यांना या विषयात रस आहे त्यांनी विधी आयोगाचा अहवाल मुळातून वाचावा (८५ पाने आहेत)
http://lawcommissionofindia.nic.in/reports/report243.pdf

सुबोध खरे's picture

2 May 2014 - 8:27 pm | सुबोध खरे

विधी आयोगा चा अहवाल सरकार वर उठसूट टीका करणार्यांनी अवश्य वाचावा.

४९८ अ चा गैरफायदा घेणार्या हजारो स्त्रियांनी तुमचा दावा अगोदरच पोकळ ठरवलेला आहे.

१.तुम्हाला ज्या अर्थाने अभिप्रेत आहे त्या अर्थाने अर्थातच मान्य. पण मला मांडायचा मुद्दा वेगळा आहे.
२. समजा ३५० लोकांचा समाज आहे. त्यात १०० जोडपी आहेत. त्यातली ४० सुखाने राहतात. ६० मधे ४९८ अ ची गरज आहे. म्हणजे नवरे क्रूर आहेत. वर त्याचे त्यांना काही वाटत नाही. आता ही सुविधा आल्यानंतर या ६० पैकी ४५ जणींचे नवरे माहौल (इतरांच्या सजा)पाहून सुधारतील. इतर १० जणींना अजूनही दाबले जाईल. अजून ५ जणीचे नवरे सुधरतील पण बायका बिघडतील. खून का बदला खून से म्हणत आता अन्याय उरला नसला तरी 'गैरफायदा' घेतील. आता सुखी राहणार्‍या पूर्वीच्या त्या ४० जोडप्यांत पुन्हा ५ बायका खुरापती निघतील. कायदा संरक्षण देतोच आहे म्हणून त्या गैरफायदा घेतील.

कायद्यापूर्वीची स्थिती
पुरुषांचे स्त्रीयांवर अन्याय - ६०
स्त्रीयांचे पुरुषांवर अन्याय -०

कायद्यानंतरची स्थिती -
पुरुषांचे स्त्रीयांवर अन्याय - १०
स्त्रीयांचे पुरुषांवर अन्याय -१०

इथे एका लिंगावरचा अधिकचा अन्याय तर कमी होतोच आहे, शिवाय समाजातला एकूण अन्यायही कमी होत आहे, परंतु एक दुसर्‍या प्रकारचा (म्हणजे पुरुषावर)अन्याय सुरु झाला आहे हे मान्य. पण परिस्थिती -२ चांगली वाटते.

कायदा करायचाच असेल तर तो लिंग, धर्म, जात वगैरे निरपेक्ष असला पाहिजे नाहीतर काही उपयोग नाही.

अर्थातच बलात्काराचा कायदा धर्म नि जात निरपेक्ष असतो. दोन्ही लिंगे एक्मेकांवर बलात्कार करू शकत नाहीत, असली तरी त्यात गुणात्मक फरक आहे म्हणून तो लिंगनिरपेक्ष करता येणार नाही.

Pain's picture

4 May 2014 - 9:27 am | Pain

सांख्यिकीच विचारात घ्यायची झाली तर थोडी आधीपासून घेउ.
वर दिल्याप्रमाणे बहुतांश ( कर्वेंच्या काळापासून ते प्रमाण कमी झालेले आहे पण बहुमत गृहित धरायला हरकत नसावी. नोकरी करणार्या स्त्रिया या प्रतिसादात अभिप्रेत नाहीत.) (हा किंवा इतर प्रतिसाद हे माझे मत नसून धागा + प्रतिक्रिया वचून आलेले विचार आहेत, संपूर्ण विचार झालेला नाही) स्त्रिया चरितार्थासाठी विवाह करतात. पती त्याची कर्तव्ये करण्यास २४ * ७ जबाबदार असतो (उदा. अन्न, वस्त्र, निवारा पुरविणे इ.) त्याने संमतीचा अधिकार वापरला तर स्त्रियांची प्रतिक्रिया काय असेल? कल्पना करा, आठवड्याचे २च दिवस घरी राहू देणे, २१ मधील ५च जेवणे देणे? विचित्र वाटते ना? पुरुषांची कर्तव्ये कायम गृहित धरलेली असतात. फक्त विवाहित असतानाच नव्हे तर घटस्फोटानंतरही (पोटगी). संमतीचा अधिकार द्यायचा झाला तर दोघांनाही द्यावा.
सध्या असा कायदा नसतानाही सर्व जबाबदर्‍या पार पाडणार्‍या आणि तरिही "उपास" पडत असणार्‍या, आणि सुसंस्कृत असल्याने बलात्कार न करणार्या पुरुषांची संख्या तुमच्या आकडेवारीत अंतर्भूत नाही. जसे आजही (खरा) बलात्कार नोंदवायला बर्‍याच स्त्रिया पुढे येत नाहीत तसेच "माझी पत्नी मला "उपाशी" ठेवते, अशी तक्रार उघडपणे पुरुष दाखल करत नाहीत (कुठे करणार म्हणा). जर हा कायदा आला तर माकडाच्या हातात कोलीत दिल्यासारखे होण्याची भीती वाटते. सध्या फक्त उपास घडवून आणतात, पुढे या कायद्यानुसार ब्लॅकमेलही करण्याची सुविधा उपलब्ध होइल. ती टाळण्यासाठी प्रत्येकवेळा स्टॅम्पपेपरवर सही घ्यायची का साक्षीदार बसवायचे?

मुळात बलात्कार* होण्यापर्यंत उपासमार का घडवून आणावी? ते क्रूर नाही का? प्रेम आटले असेल तर संबंध संपवावेत. नाहीतर नुसते विवाहीत असण्याचे फायदे उपटणार्‍या या बायका आणि पगार घेउन काम न करणारे सरकारी बाबू यात फरक काय राहिला?

@पैसा- मुद्देसूद आणि तार्किक प्रतिसादाच्या उदाहरणासाठी arunjoshi123 यांचा हा प्रतिसाद पहा. मी सामान्यत: किमान एवढ्या दर्जाची अपेक्षा ठेवतो.

पैसा's picture

5 May 2014 - 8:11 am | पैसा

४९८अ बद्दलच्या तुमच्या मूळ प्रतिसादासाठी आवश्यक ती आकडेवारी तुम्ही दिलेली नाही. मला सुद्धा एका किमान दर्जाचे प्रतिसाद अपेक्षित आहेत.

arunjoshi123's picture

6 May 2014 - 2:40 pm | arunjoshi123

पेनजी,
हा प्रतिसाद उत्तर देण्यासाठी माझ्याकरिता सर्वात अवघड निघाला आहे. कोणी आंधळा स्त्रीवादी असता तर आपल्या भाषेवर व हेतूवर शंका घेऊन विषय इतरत्र नेला असता. पण मला आपल्या विचारसरणीच्या लोकांना जर मी माझे म्हणणे मांडून देऊ शकलो तरच या चर्चेची उपयुक्तता आहे असे जाणवले. आता खालिल लेखनप्रपंच.

१. पुरुष स्त्रीयांवर या प्रकरणामधे क्ष अन्याय करतात.
२. स्त्रीया पुरुषांवर याच प्रकारणामधे ज्ञ अन्याय करतात.

इथे माझे आता पावेतोची समजूत होती कि आपण १ बद्दल चर्चा करत आहोत, त्याचे निवारण झाले पाहिले. त्यात "एकूणातच सर्व बाबतीत स्त्रीया व पुरुषांचे एकमेकांवर अन्याय करण्याचे प्रमाण काय आहे" हे मधे आणण्याचे कारण नाही. हे आपल्याला मान्य असावे. पण १ हे २ चे फंक्शन असेल तर मात्र मुद्दा किचकट होतो हे मान्य आहे.

नॉट टू काँम्प्लिकेट द मॅटर, आपण खालिल गोष्टी बाजूला ठेऊ-
१. स्त्रीया बलात्कार करू शकतात.
२. पुरुषही आपण म्हणता तसे बायकांना उपाशी ठेवतात.

इथे स्त्रीया पाच प्रकारे नकार देऊ शकतात (म्हणजे उपाशी, वै ठेऊ शकतात.)-
१. समर्थनीय कारण - पतीस रोग आहे, पाळी आहे, पत्नी आजारी आहे, मूल नको, आता नको, वय, इ इ
२. असमर्थनीय कारण - मालमत्ता, सोनेनाणे, इतर काही फेवर याकरिता
३. विचित्र कारण - कोणतीही दुर्भावना नाही पण अंधश्रद्धा, समजूती, गंमत, इ इ
४. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे कारण - अकारण, दुर्भावनेने नाही वा चांगल्या भावनेने नाही, पण केवळ आपले स्वातंत्र्य वठवण्यासाठी नकार. हा प्रकार शहरांत जास्त निघावा.
५. जैविक कारण - म्हणजे हार्मोन्स वै चा प्रॉब्लेम असल्याने नकार.

पैकी प्रत्येक वेळी पुरुष खालिल प्रकारे वागू शकतात-
१. निदान - समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करून मग प्रयत्नांती संबंध प्रस्थापित करणे.
२. उपास - आपण वर विषद केलं आहे.
३. काडीमोड - घटस्फोट घेऊन वेगळे मग दुसर्‍या स्त्रीशी विवाह करणे. (पोटगी देऊन वा न देता)
४. बलात्कार - जबरदस्तीने संभोग करणे.

यातल्या बलात्कारातही तीन प्रकारच्या भावना असू शकतात -
१. क्रौय - पत्नीवर राग येऊन क्रौर्यतापूर्ण बलात्कार
२. अन्याय - अन्यायाच्या भावनेने बलात्कार
३. वासनापूर्ती - क्रौय , अन्यायाची भावना/बुद्धी नसणे, पण शुद्ध वासनेसाठी संमतीशिवाय बलात्कार्/संभोग करणे.

स्त्रिया चरितार्थासाठी विवाह करतात. पती त्याची कर्तव्ये करण्यास २४ * ७ जबाबदार असतो (उदा. अन्न, वस्त्र, निवारा पुरविणे इ.)

तुम्हाला जे म्हणायचे आहे त्याचा संदर्भ बाजूला ठेवला तर लैंगिकजीवन, पुनरुत्पादन, चरितार्थ, कामे करणे, इ इ मधे दोन्ही लिंगाचा रोल सारखा असतो. बाय अँड लार्ज त्याची किंमत समान असते. किंमत समान नसली ती व्यवस्थाच टिकत नाही. असो. हे अवांतर आहे.

त्याने संमतीचा अधिकार वापरला तर स्त्रियांची प्रतिक्रिया काय असेल? कल्पना करा, आठवड्याचे २च दिवस घरी राहू देणे, २१ मधील ५च जेवणे देणे? विचित्र वाटते ना? पुरुषांची कर्तव्ये कायम गृहित धरलेली असतात.

देशातल्या सगळ्या संपत्तीचे टायटल पुरुषांचे असते ही एक प्रथा आहे. 'संपत्ती कमावण्यात' दोहोंचे समान योगदान असते. म्हणून लैंगिक व अलैंगिक मालमत्तेचे, मालकिचे हक्क मिसळून संभ्रम करून घेऊ नये. उद्या माझ्या मुलाने 'माझ्यासाठी' १०० कोटी रुपये कमावले तर माझ्या बायकोची, तिच्या कामाची किंमत किती? ती नसती तर या आकड्यातली शून्ये देखिल माझ्याकडे नसती.लैंगिक अधिकार, लैंगिक कर्तव्ये, सांपत्तिक अधिकार, सांपत्तिक कर्तव्ये ही कुटुंबात एकत्र नांदतात. जसे पुरुषाने आठवड्याचे २च दिवस घरी राहू देणे विचित्र वाटते तसेच स्त्रीने दिवसात ४ लोकांसाठी 'फक्त एक घास' पोळी बनवणे सुद्धा विचित्र वाटते. पुरुषांची सांपत्तिक कर्तव्ये हे कुटुंबातले सर्वात जास्त महत्त्व दिले गेलेले प्रकरण आहे. पण त्याचा बोलाबाला केवळ एक प्रथा आहे. चालू आर्थिक वर्षापासून स्त्रीयांची झाडून सारी घरकामे जीडीपीत घातली तर तो किमान पाच पट वाढेल हे मला 'माहित आहे'!!! मी बर्‍यापैकी पुरुषप्रधानतावादी नि परंपरावादी आहे आणि किंमती काढण्याचा विषय टाळणे पुरुषांच्या हिताचे आहे असे माझे मत आहे.
म्हणून वा अन्यथाही चर्चा केवळ लैंगिक बाबतीत सिमित ठेऊ या.

संमतीचा अधिकार द्यायचा झाला तर दोघांनाही द्यावा.

अर्थातच. पण पुरुषाला निसर्गदत्त संमतीचा अधिकार आहे ना! मग द्यायचा उरला तो स्त्रीयांना.देणे ही उरलेले नाही. लोकशाहीत ते अभिप्रेत आहे. पण विवाह हा एक करार मानला नि त्यात अभिप्रेत कर्तव्यांना स्त्रीने नकार दिला तर करार रद्दबातल होतो. घटस्फोट होतो. करारात ज्या नुकसानभरपाईचा अंतर्भाव आहे (जो दोन्ही बाजूंनी, अशा नकाराच्या केसेस मधे शून्य आहे)

सध्या असा कायदा नसतानाही सर्व जबाबदर्‍या पार पाडणार्‍या आणि तरिही "उपास" पडत असणार्‍या, आणि सुसंस्कृत असल्याने बलात्कार न करणार्या पुरुषांची संख्या तुमच्या आकडेवारीत अंतर्भूत नाही. जसे आजही (खरा) बलात्कार नोंदवायला बर्‍याच स्त्रिया पुढे येत नाहीत तसेच "माझी पत्नी मला "उपाशी" ठेवते, अशी तक्रार उघडपणे पुरुष दाखल करत नाहीत (कुठे करणार म्हणा).

हे शंभर टक्के मान्य आहे. यासाठी काय करायला हवे? कळीचा प्रश्न उरतो कि असे वाईट वागणार्‍या काही स्त्रीयांमुळे वैवाहिक बलात्काराचा कायदा नसावा असे म्हणावे का? इथे 'माकडाच्या हातात कोलीत दिल्यासारखे होण्याची भीती वाटते' असे म्हणणे गैर असावे.

समाजात दोन-तीन प्रकारचे लोक असतात असे माझे मत आहे -
१. ज्यांना कायदा काय आहे त्याने काहीच फरक पडत नाही. ते चांगलेच वागतात.
२. ज्यांना कायदा काय आहे त्याने काहीच फरक पडत नाही. ते वाईटच वागतात.
३. ज्यांना कायदा काय आहे त्याने फरक पडतो. कायद्याप्रमाणे आपला बरेवाईटपणा बदलून घेतात.
जास्तीत जास्त समाज, ७०-८०%, प्रकार एकचा असतो. त्यामुळे एकंदर समाजाबद्दल असे म्हणता येणार नाही. स्त्रीया पुरुषांवर अन्याय करण्यासाठी योग्य त्या कायद्यांची वाट पाहत आसुसलेल्या आहेत ही विचारसरणी चुकीची आहे. मग इथून पुढे वरच्या प्रतिसादातले ६०-१० व १०-१० चे लॉजिक कामास येईल.

सध्या फक्त उपास घडवून आणतात, पुढे या कायद्यानुसार ब्लॅकमेलही करण्याची सुविधा उपलब्ध होइल. ती टाळण्यासाठी प्रत्येकवेळा स्टॅम्पपेपरवर सही घ्यायची का साक्षीदार बसवायचे?

मेकॅनिझम इज अ सेपरेट मॅटर. अन्याय आहे, कायदा असावा हे मान्य केल्यावर तो ठरवता येतो. उपास होणार्‍या लोकांनी आपल्या बायका सोडाव्यात हेच बरे. त्यांच्या साठी इतर पिडित स्त्रीयांवर अन्याय का? पण याशी सहमत आहे कि या कायद्याने बर्‍याच पुरुषांच्या बाबतीत अन्याय होईल (१०-१० मधले दुसरे १०). शेवटी संस्कार हेच महत्त्वाचे.

Pain's picture

19 May 2014 - 9:57 am | Pain

पुरुषांची सांपत्तिक कर्तव्ये हे कुटुंबातले सर्वात जास्त महत्त्व दिले गेलेले प्रकरण आहे. पण त्याचा बोलाबाला केवळ एक प्रथा आहे. चालू आर्थिक वर्षापासून स्त्रीयांची झाडून सारी घरकामे जीडीपीत घातली तर तो किमान पाच पट वाढेल हे मला 'माहित आहे'!!

असहमत. जेंडर नुट्रल राहण्यासाठी फक्त घरकाम आणि कार्यालयातले काम, अशी वर्गवारी करू. घरकाम करण्यासाठी, कुठलेही विशेष कौशल्य असण्याची, शिक्षण घेण्याची आणि गरज नसते आणि कार्यालायात येणार्‍या इतर समस्या, नोकरी जाण्याची भीती वगैरे गोष्टी अंतर्भूत नसतात. घरकाम करणार्‍या लोकांचे आणि एखद्या डॉक्टरचे, आर्किटेक्चरचे पगार यांची तुलना केल्यास ते दिसून येइल. त्यातही मुले ८ तास शाळेत, २ तास खेळ आणि ९- १० तास झोप यात व्यस्त असतात. घरकाम, स्वयंपाक करायला माणसे असतात. हे सगळे नवर्याच्या पगारातून होते आणि स्त्रीला फार - फार तर ४-५ तास "ऑन डुटी" राहावे लागते. समजा घरकाम सगळे स्त्रीने केले असे गृहित धरले, तर वाचलेला पगार जीडीपी ४-५ पट वाढेल असे वाटत नाही. पण तुम्ही म्हणता तसे आपल्या चर्चेच्या कक्षेत हा मुद्दा येत नाही, यास्तव इथेच थांबू.

उपास होणार्‍या लोकांनी आपल्या बायका सोडाव्यात हेच बरे. त्यांच्या साठी इतर पिडित स्त्रीयांवर अन्याय का?

कायदा एकतर्फी असू नये, जेंडर बायस्ड असू नये हा माझा आक्षेप आहे. सर्व पीडितांना न्याय मिळावाच पण तसे करताना नवीन पीडित तयार होउ नयेत, हे माझे मत आहे. स्त्रिया अजिबात गुन्हे करत नाही असे तुम्ही म्हणाला आहात. स्त्रिया कायद्याचा गैरवापर करत नाहीत, करणार नाहीत, असेही तुम्ही म्हणाला आहात. तर भारतात असलेले महिला तुरुंग आणि सध्याच्या कायद्याचा गैरवापर केलेल्या स्त्रिया याबद्दल तुमचे काय मत आहे?

पैसा यांनी दिलेल्या साईटवर -
The study also has observed that 6.5 percent of the total cases studied through victims' interviews were found false at the level of investigation. Many of the accused, police, judges and lawyers, categorically said that 'educated and independent minded women' misuse the section.

हे आहे. त्यातही "educated and independent minded women' misuse the section." हे फार महत्त्वाचे आहे. educated and independent minded women ची संख्या वाढत आहे अणि ती तशी वाढत राहावीच पण त्यांना अनिर्बंध, एकतर्फी हत्यार दिले जाउ नये कारण एकदा का होइना पण खोटा गुन्हा दाखल झाला की त्या पुरुषाला कुठेही नोकरी मिळणार नाही, परदेशी जाता येणार नाही आणि कोर्टकचेर्‍यांधे खेटे मारण्यात त्याचे आणि कुटुंबियांचे आयुष्य खर्च होइल.

एकदा विवाह झाला की याबाबतीत अजिबात काहीही म्हणन नसल्याचा जो अविर्भाव आजवर आपल्या विवाह संस्थेत होता तो जरा जरी कमी झाला तरी बर्‍याच व्यक्तींना (मी जाणुन बुजुन व्यक्ती हा शब्द वापरते आहे) न्याय मिळेल.
मी स्त्रीयांवर जसे अत्याचार होतात तसेच काही परिस्थीत पुरुषांवर सुद्धा अत्याचार होतात या मताची आहे.
त्यामुळे कायदा हा फक्त स्त्रीविषयक न होता व्यक्ती विषयक असावा.
बाकी सांसदिय व्यक्तींबद्दल जी काही टिप्पणी आहे ती अतिशय योग्य!

दोन्ही लिंगांना, प्रुरुषांना नि स्त्रीयांना, संमतीचा अधिकार दिला नि या अधिकारांमुळेच काही स्त्रीयांवर व पुरुषांवर, अनुक्रमे लैंगिक अन्याय (म्हणजे भूक न भागवले जाणे) होऊ लागतील असे म्हणणे अवाजवी असावे.

तर मुद्दा हा उरतो की जोदीदारापैकी समजा एकाने जरी व्हेटो वापरला तर दुसर्‍याने त्याच्या कामवासनेचे काय करावे ? लैगीक प्रेरणा ही अशी एक गोष्ट आहे जी तुम्हाला कशाचा काहीही बनवु शकते.

मग हाताशी पर्याय कोणता उरतो ? कामवासनेच्या बाबत सर्वच जण समजुतदार निग्रही वगैरे नसतात, उल्ट बरेच उथळ आणी असंयमशील असतात, मग ते विनाकारण लैंगीक गुन्हेगार ठरले जातील त्याचे काय ? त्यांच्या फ्यामीलीचे काय ? क्रौर्य नसावे, अनैसर्गीकता नसावी वगैरे पर्यंत योग्य आहे, पण त्या पुढे काय ?

शैलेन्द्र's picture

1 May 2014 - 2:28 pm | शैलेन्द्र

मुळात पतीपत्नीतील या सनातन संबंधांना कायद्याच्या चौकटीत बसवायची गरज नाही.

बर्‍याच लोकांना कदाचित पटणार नाही पण माझ्यामते एखाद्या सुदृढ स्त्रीवर, एका पुरुषाने, निव्वळ शारिरीक बलाने, बलात्कार करणे जवळ-जवळ अशक्य आहे. विवाहांतर्गत जे बलात्कार होतात ते धाक दाखवून, मानसिक छळवणूक करून, किंवा अर्धवट संमती(?) घेवून (किंवा गृहीत धरून केले जातात. या सगळ्या गोष्टी वैवाहिक हिंसेच्या चौकटीत बसतात आणि त्या रोखण्यासाठी पुरेसे कायदे आहेत.
गरज आहे ते असलेले कायदे योग्य प्रकारे वापरायची..

तुमचा अभिषेक's picture

1 May 2014 - 2:38 pm | तुमचा अभिषेक

बर्‍याच लोकांना कदाचित पटणार नाही पण माझ्यामते एखाद्या सुदृढ स्त्रीवर, एका पुरुषाने, निव्वळ शारिरीक बलाने, बलात्कार करणे जवळ-जवळ अशक्य आहे.

नाही पटले हे खरेच. आपण म्हणता तसे निव्वळ शारीरीक बलाचा वापर पुर्णवेळ लागतो असे गरजेचे नाही. तो एकदाच करून समोरच्या स्त्री वर पकड मिळवली की ती स्त्री कुठेतरी हार मानणारच. आणि जेवढे ती प्रतिकार करते तेवढ्याच तिला यातना जास्त तेवढी तिला होणारी मारहाण जास्त. कुठेतरी तिला हे समजतेच. कामांध पुरुषालाही यावेळी जरा जास्तच बळ येत असावे.

अर्थात जेव्हा पुरुष पुर्णपणे कामांध झाला नसतो वा संधी मिळालीय तर करूया अश्या हिशोबात असतो तेव्हा स्त्रीच्या प्रतिकाराने दचकून सारासार विचार करून माघार घेऊ शकतो.

शैलेन्द्र's picture

2 May 2014 - 4:11 pm | शैलेन्द्र

नाही पटले हे खरेच. आपण म्हणता तसे निव्वळ शारीरीक बलाचा वापर पुर्णवेळ लागतो असे गरजेचे नाही. तो एकदाच करून समोरच्या स्त्री वर पकड मिळवली की ती स्त्री कुठेतरी हार मानणारच. आणि जेवढे ती प्रतिकार करते तेवढ्याच तिला यातना जास्त तेवढी तिला होणारी मारहाण जास्त. कुठेतरी तिला हे समजतेच.

मान्य,
म्हणूनच मी आधीच म्हटलय की विवाहांतर्गत जे बलात्कार होतात ते धाक दाखवून, मानसिक छळवणूक करून, किंवा अर्धवट संमती(?) घेवून (किंवा गृहीत धरून) केले जातात. या सगळ्या गोष्टी वैवाहिक हिंसेच्या चौकटीत बसतात आणि त्या रोखण्यासाठी पुरेसे कायदे आहेत. अजून वेगळे कायदे करून गोंधळ कशाला वाढवायचा..

"मुळात पतीपत्नीतील या सनातन संबंधांना कायद्याच्या चौकटीत बसवायची गरज नाही. "
एका अर्थाने या वाक्याशी सहमत आहे. मानवी जीवनातले सूक्ष्म घटक, भावभावना कायदे , घटना परिपूर्ण वर्णन करू शकत नाहीत. मागच्या काळातही शास्त्रे निर्माण झाली नि त्यांनी परिस्थितींचे पूर्ण वर्णन करण्याचा व त्यांच्यामते न्याय्य व्यवस्था देण्याचा प्रयत्न केला. तो ही फोल ठरला. एक तर असे असावे समाजाचा एकूण शहाणपणा, गुन्हे न करण्याची वृत्ती एक विशिष्ट प्रमाणात असतच असावी, कायद्याने थोडा पुश पूल होत असावा. किंवा असे होत असावे कि मानवजातीची एकूण सद्वर्तनाची वृत्ती या कायद्या-शास्त्रांनीच कमी जास्त होत असावी. सांगणे कठिण आहे. पण सगळे कायदे करतात, एवढी यंत्रणा राबवतात म्हणजे कायद्यात तथ्य असावे. पण तरीही या वाक्याशी स्वल्प सहानुभूती आहे, मलाही वाटते - बोलण्याचे स्वांतंत्र्य देणारी घटना कोण? ते मला अगोदर पासूनच आहे. असो. हे अवांतर आहे.

प्रसाद गोडबोले's picture

1 May 2014 - 9:09 pm | प्रसाद गोडबोले

ह्यानिमित्ताने काही प्रश्न मनात आले :

१) जर विवाहांतर्गत सक्तीने संभोग हा बलात्कार ठरवला जाणार असेल तर ...समजा एखादी विवाहीत स्त्री पतीला "सामान्य" व "नैसर्गिक" शरीरसुखापासुन वंचीत ठेवत असेल तर तो ही कायद्याने गुन्हा ठरवता येईल काय ?
२) जर शरीरसंबंधच नाकारायचे असतील तर विवाह संस्थेला अर्थ काय ? प्रजोत्पादनासाठी विवाहाची गरज थोडीच असते ?
३) विवाहांतर्गत सक्तीचेसंबध जर कायदाने गुन्हा ठरत असतील तर मग विवाह बाह्य संमतीने संबंध हे कायद्याने मान्य का ठरवु नयेत ? (लॉजिक : p => q then -q=> -p )
४) समजा पुरुषाची इच्छा नसताना त्याच्या पत्नीने त्याचावर सक्ती केली तर तो ही बलात्कार ठरवता येईल का ?
५) समजा ह्या असल्या विवाहांतर्गत बलात्कारात पतीला शिक्षा झाली आणि पत्नीने घटस्फोट मागितला तर नक्की काय करायचे , पतीला तुरुगात टाकायचे की पोटगी देता यावी म्हणुन बाहेर ठेवायचे ? की तुरंगातल्या कमाईतुन पोटगी द्यायला लावायची ?

आणि सर्वात महत्वाचा प्रश्न : ही विवाहसंस्था स्त्रियांनी ह्यानात्या निमित्ताने पुरुषांचा छळ करण्यासाठी तर निर्माण केली नसेल ना ?

स्पंदना's picture

2 May 2014 - 4:06 am | स्पंदना

नाही हो गिरिजा काका. विवाह संस्था ही पुरुषांनी स्वतःचे लहाणपणापासुन नीट संगोपन व्हावे म्हणुन निर्माण केली आही.

आत्मशून्य's picture

2 May 2014 - 6:56 am | आत्मशून्य

विवाह
संस्था ही पुरुषांनी स्वतःचे लहाणपणापासुन नीट
संगोपन व्हावे म्हणुन निर्माण केली आही.

हाण्ना हवेत बार. जणु काही स्त्रियाँ संगोपनाशिवाय आपोआप मोठ्या होतात आणी ज्या खरेच मोठ्या होतात त्या निव्वळ कन्याशालेचा हट्ट जीवनात कधीच धरत नाहित जर जीवन हे एक शिक्षण मानत असाल तर.

असो डार्विञ्चा उत्क्रांती वाद आणि स्त्रिया एक वैज्ञानिक निकोप उहापोह
नोंदवला तर ते एक विलक्षण वैज्ञानिक निरिक्षण ठरते

स्त्रीयांना पण गरज असतेच हो संगोपनाची नाही कुठे म्हंटलय मी,पण जर जशी दुधपिलाई आहे तस काही सुरु केल स्त्रीयांनी तर? मग कस होणार नाही का?
मुद्दा असा आहे की विवाह संस्था ही स्त्रीयांनी निर्माण केली आहे. हा गिरीजाकाकांचा मुद्दा. अन मझ उत्तर हे त्यांना आहे. गिरीजाकाकांना.

आत्मशून्य's picture

3 May 2014 - 2:06 am | आत्मशून्य

बिंगो, नेमक्या याच कारणासाठी डार्विन अभ्यासावा लागतो.

डिस्कवरी सौजन्याने थोडक्यात बोलायचे तर माकडिण अनेक न्रांशी समागम करते आणि पिलु कोणाचे आहे ते फक्त तिलाच माहीत असते पण ती प्रत्येकाला हे तुमचेच पिलु म्हणुन पिलाचे कवतुक सगळ्याकडून करून घेते व त्याला जास्ती जास्त सँवरक्षण व अमेनिटिजि उपलब्ध करूँ द्यायचा प्रयत्न करते, ही निसर्गाची योजना आहे. नर मात्र किती जणिशि समागम करतो याचा विदा नाही पण तो ही एकनिष्ट नसलेल्या माकडीनिशी एकनिष्ट नसावा म्हटले तर बार्याच माकडिनिचि बरीच पिल्लै तो स्वत:ची मानून त्यांची जबाबदारी आपलेच कार्ट या विश्वासाने एकाच वेळी बरेच नर घेतात घेतो म्ह्नण्ने फारच गोन्ध्ळाचे होइल. कारण कोंफ्लिक्ट ऑफ़ इंटरेस्ट.

तर मुद्दा हां आहे की माकडानचे मानावाशी साधर्म्य आहे. माकिडिनिला माहीत आहे बाप कोण पण ती अपत्यप्रेमापायी तिला एका पेक्षा जास्त नर गाठिला असणे आवश्यक वाटते. पण मानव म्हणजे माकड न्हवे... तर सुधारित आवृत्ती आहे.

इथे मादी नराची आवश्यकता मान्यच करत नाही तर स्थैर्य अन सुरक्षेसाठी एकनिष्टतेची अनैसर्गिक अपेक्षा ठेवते, जी मोड्ल्यास त्याची मोठी भरपाई नराला मानसिक, आर्थिक व अनेकदा
शारीरिक स्वास्थ्य घालवून करायला भाग पाडते. नर तर माकाड असल्या पासूनच प्रेमळ आहे स्वत:ची कितीदा फसवणुक सहन करतोय, पण मादिला सगळ्यात मोठी चिंता सरवायावल चीच आहे. याचा पगडा इतका मोठा आहे की तिनेच स्थैर्य व सुरक्शितातेला धक्के लागू नयेत म्हणुन विवाह, एकनिष्टता रूपी संकल्पनाना जन्म देऊन कवटाळ्ले आहे. बरे नर तर तसेही शब्दा बाहर जाणार नाहित तर इतर स्त्रियाच त्यांना फ़ितवुन आपल्याला धोका निर्माण करतील हे धूर्त माद्यान्नी ओलखून त्यांनी उलट माद्यावरच नियम लादले शील सौख्य एकानिष्ट ता फार महत्वाची ते नसेल तर तुमचा सामाजिक दर्जा सन्मान्दायक मानला जाणार नाही. अगदी मनाविरुध्द जरी समागम झाला तरी.

झाले. पिढ्यान पिढ्या पध्दाताशिर ब्रेन वोशिंग मुला मुलींचे करण्यात आले. व हा अजेंडा पुढे रेटायला पुरुषांच्या शारीरिक क्षमतेचा पद्धतशीर गैर वापर करून त्याना फसवण्यात आल आणि हे सगळे पुरुषांनी ठरवले असा पध्दताशिर प्रचार पिढोन पिढ्या सुरु झाला. काही हुशार स्त्रिया याला बळि पडल्या नाहित. त्या माझ्या प्रमाणे निपक्ष पाती विचार अनुसरणार्या होत्या. त्यानी हां कावा लक्षात घेतला व पुरुषाना यापुढे त्रास होउ न देण्याची शपथ घेतली ज्या या अनुमानाला पोचल्या की स्त्रिया स्त्रियांच्या शत्रु आहेतपुरुष न्हवे. व त्यांनी स्त्रियांना भ्रामकस्त्रित्वा पासून मुक्त करायची शपयथ घेतली

त्याना हे उमगले होते बौधिक काम करायला लिंग न्हवे इच्छा शक्ती अनुकूल असावी लागते हे धूर्त स्त्रियांना माहीत आहे पण त्या पध्दाताशिर आम्ही स्त्रिया असुनही पुरुषांच्याबरोबरीने काम करू शकतो असा लिंग भेदी प्रचार व प्रसार सुरु करुन पुरुषांपेक्षा श्रेष्टत्वाचा प्रचार सुरु केला जेणे करून पुरुष हे सर्व बाबतीत नालायक ठरवून फक्त स्त्रियाच लायक आहेत हे बिम्ब्वता येउन पुरुषांच्या पुढील पिढ्या कायमच्या अंकित करायचा पध्दतशिर घाट घातला आहे.
कारण स्त्रियांना पुरुषांची असलेली आवश्यकता नाकारता येत नाही म्हणून.

एक सोपे उदाहरण देतो, बायका कशा मुर्ख आहेत याची मुद्देसुद चर्चा करा शेवटी
मुद्दे सूद चर्चा सोडुन त्या पुढील पैकी दोन शब्द हमखास बोलतील

1) त्या म्हणतील तुला आई बहिण नाही का ? पुन्हा पुरुषांच्या भावनिक प्रेमाचाच उध्दार कारण स्त्रिया शाह्ण्या नाहीतच तर सिध्द करणार
2) अथवा इतरांना मुर्ख म्हणायचे लायसन्स दिली आहे काय ? आता मुर्खाना मुर्ख म्हणायला लास्यसंस कोण बरे देते/मागते ?

स्पंदना's picture

2 May 2014 - 4:10 am | स्पंदना

समजा एखादी विवाहीत स्त्री पतीला "सामान्य" व "नैसर्गिक" शरीरसुखापासुन वंचीत ठेवत असेल तर तो ही कायद्याने गुन्हा ठरवता येईल काय ?

मला आता रेफरन्स देता येत नाही पण मध्यंतरी जर एखादा पुरुष त्याच्या पत्निला शरीर सुखापासून वंचित ठेवत असेल तर तिला घटस्फोट मिळु शकतो असं काहीस न्यायालयीन मत वाचलेलं आठवत आहे. आता यात पुरुष देत नाही तसेच स्त्री सुद्धा वंचित ठेवत असेल तर तोच न्याय मिळाला पाहिजे अस मला वाटत.

इथे चर्चा गुन्हा (क्राईम )याबाबत चालु आहे, घटस्फोट मिळने ही गुन्हेगारी न्हवे.

Pain's picture

2 May 2014 - 11:28 am | Pain

टिपिकल फेमीनाझी लेख लिहिणारा लेखक / लेखिका आणि त्याचे समर्थक, कोणीही याची उत्तरे देण्यास पुढे आलेले नाही, यावरुनच त्यांचा उद्देश स्पष्ट होतो.

लेखक, म्हणजे मी, फेमिनाझी किंवा फेमिनिस्ट नाही. अगदी विरोध आहे असेही नाही पण एकाच संज्ञेतलं सगळं काळंपाढरं अंगावर ओतून घेण्याची इच्छा नाही.

Pain's picture

4 May 2014 - 9:38 am | Pain

तुम्ही वाचकांच्या प्रतिसादास उत्तरे देण्यास उपलब्ध आहात आणि समतोल दृष्टिकोन ठेवून आहात हे पाहून बरे वाटले. माझा वरचा प्रतिसाद रद्द समजा.

१) जर विवाहांतर्गत सक्तीने संभोग हा बलात्कार ठरवला जाणार असेल तर ...समजा एखादी विवाहीत स्त्री पतीला "सामान्य" व "नैसर्गिक" शरीरसुखापासुन वंचीत ठेवत असेल तर तो ही कायद्याने गुन्हा ठरवता येईल काय ?
-----एखाद प्रसंगी नकार नाही. पण वंचित ठेवणे आहे. यात पत्नीला सजा करता येत नाही हे दुर्देव आहे. पण पतीला तिच्यापासून त्याआधारावर घटस्फोट मिळतो.
२) जर शरीरसंबंधच नाकारायचे असतील तर विवाह संस्थेला अर्थ काय ? प्रजोत्पादनासाठी विवाहाची गरज थोडीच असते ?
-----आपण फक्त शुद्ध संमतीचा विचार करू. मर्जी म्हणून स्त्रीचा नकार. इथे स्त्रीच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यअचा प्रश्न विरुद्ध एका कराराचे (लग्नाचे) स्त्रीकडून उल्लंघन विरुद्ध कराराचे उपनियम स्पष्ट नसणे. इथे दोन्ही लिंगासाठी संतुलित कायदा करता असता पण बलात्कार स्त्री करू शकत नाही हा तांत्रिक मुद्दा आडवा येतो.

३) विवाहांतर्गत सक्तीचेसंबध जर कायदाने गुन्हा ठरत असतील तर मग विवाह बाह्य संमतीने संबंध हे कायद्याने मान्य का ठरवु नयेत ? (लॉजिक : p => q then -q=> -p )
Between numbers a and b (विवाहात), p=q then outside a to b , p =/ q असं लॉजिक आपण मांडताय. विवाह बाह्य संबंध मान्य ठरवण्यासाठी वेगळ्याने मागणी करावी लागेल. विवाहात कोणते एक बंधन , कोणत्या एका काळी, कोनत्या एका कारणाने आहे याने 'अमर्याद' विवाह बाह्य संबंध ठेवायचा हक्क तरी मागता येनार नाही.

४) समजा पुरुषाची इच्छा नसताना त्याच्या पत्नीने त्याचावर सक्ती केली तर तो ही बलात्कार ठरवता येईल का ?
५) समजा ह्या असल्या विवाहांतर्गत बलात्कारात पतीला शिक्षा झाली आणि पत्नीने घटस्फोट मागितला तर नक्की काय करायचे , पतीला तुरुगात टाकायचे की पोटगी देता यावी म्हणुन बाहेर ठेवायचे ? की तुरंगातल्या कमाईतुन पोटगी द्यायला लावायची ?

आणि सर्वात महत्वाचा प्रश्न :

ही विवाहसंस्था स्त्रियांनी ह्यानात्या निमित्ताने पुरुषांचा छळ करण्यासाठी तर निर्माण केली नसेल ना ?

४) समजा पुरुषाची इच्छा नसताना त्याच्या पत्नीने त्याचावर सक्ती केली तर तो ही बलात्कार ठरवता येईल का ?
-----ठरवला गेला पाहिजे.
५) समजा ह्या असल्या विवाहांतर्गत बलात्कारात पतीला शिक्षा झाली आणि पत्नीने घटस्फोट मागितला तर नक्की काय करायचे , पतीला तुरुगात टाकायचे की पोटगी देता यावी म्हणुन बाहेर ठेवायचे ? की तुरंगातल्या कमाईतुन पोटगी द्यायला लावायची ?
----बायकोवर बलात्कार न झालेल्या (म्हणजे अन्य) केसेस मधे ही पुरुष जेल मधे जातात. तेव्हा ही पत्नी त्यांच्यावर अवलंबून असते. मग त्या केस मधे तेच होणार.
नि गेला नाही तर पोटगी मिळाली पाहिजे कारण घटस्फोट स्त्रीच्या दोषामुळे झाला नाही.

आत्मशून्य's picture

2 May 2014 - 1:08 am | आत्मशून्य

असे असे एका टीशर्ट वर लिहलेले वाचलेले पाहिल्याचे स्मरते. कायदा काय म्हणतो ? का ही कृती देखील विवाहाँतर्गत बलात्कार ठरू शकते.

प्रसाद गोडबोले's picture

2 May 2014 - 8:01 pm | प्रसाद गोडबोले

"सरप्राईज सेक्स इस नॉट रेप "

>>> करेक्ट !!

नॉन-कन्सेन्शुल सेक्स इस रेप !!

(पण आपला वायझेड कायद्याने काही कन्सेन्शुअल सेक्स ला बलात्काराच्या व्याखेत घालुन घोळ केला बस्स ! )

मिसळपाववर राम सीतेतील एक वर्तन्/समागम बलात्कार म्हटले जाऊ शकते याची एक चर्चा झाली होती. त्याची कोणी लिंक इथे दिली बरे होईल. विवाहांतर्गत बलात्काराची(?) ती ही विक्षिप्त केस आहे.

पण, चर्चा न्हवे निष्कर्ष महत्वाचे असतात.

सुबोध खरे's picture

2 May 2014 - 12:55 pm | सुबोध खरे

हा प्रश्न बराच गहन आहे आणि यात मूळ दोन मुद्द्यांचा विचार केल्याशिवाय केवळ कायदा करून हा प्रश्न सुटणार नाही.
१) जोवर स्त्रिया आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या स्वतंत्र होत नाहीत तोवर नवर्याविरुद्ध पोलिसात तक्रार करून त्यांना होणार्या फायद्यापेक्षा तोटाच जास्त होण्याची शक्यता आहे. कारण एकदा का नवरा एक दिवस जरी पोलिस कोठडी न्यायालयीन कोठडी किंवा तुरुंगात गेला तरी नवरा बायकोच्या नात्याला गेलेला तडा सांधणे कठीण होत जाते. कारण पुरुष प्रधान संस्कृती मध्ये बायको मुळे मला तुरुंगाची हवा खावी लागली हा गुन्हा नवरा सहजासहजी विसरत नाही. घटस्फोटाच्या अशा अनेक केसेस मध्ये जरी कोर्टाने घटस्फोट नाकारला तरी बर्याच स्त्रियांची स्थिती अशा लग्नात हलाखीची झालेली आढळते. मूळ स्त्रीला आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र नसेल तर आई वडील सुद्धा सहजासहजी आधार देत नाहीत. मग अशा स्त्रीची स्थिती दयनीय होते कि न सासरचा आधार न माहेरचा. १९३१ साली र धों कार्वेनी लिहून ठेवले आहे कि बहुतांश स्त्रिया चरितार्थासाठी लग्न करतात.आजही स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या स्त्रियांची संख्या ७-८% च्या वर नाही. यास्तव केवळ कायदा करून स्थिती सुधारणार नाही तर स्त्रीयाची शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती सुधारत नाही तोवर कायदा फक्त कागदोपत्री राहतो.
२) सामाजिक मनस्थिती सुधारणे आवश्यक आहे- स्त्री हि उपभोग्य वस्तू नसून एक व्यक्ती आहे आणि तिच्या भावभावनांचा एक व्यक्ती म्हणून आदर करणे हे मुलांना त्यांच्या शालेय वयापासून शिकवणे आवश्यक आहे. दुर्दैवाने मुलीचे आईवडीलसुद्धा तशा बाबतीत तिची बाजू घेताना आढळत नाहीत. याचे एक कारण गरिबी अफाट लोकसंख्या हे आहे. खायचे एक तोंड वाढले तर काय हा प्रश्न इतका ज्वलंत असतो कि मग ती आपली स्वतःची मुलगी असेल तरी ती सासरी राहिली तर बरी. आणि नवर्याने बलात्कार किंवा मारहाण केली तरी अजून त्याला समाजात अप्रतिष्ठा नाही.( एखाद्या तिसर्या माणसाने बलात्कार केला तर स्त्री आयुष्यातूनच उठते) त्यामुळे विवाहांतर्गत बलात्कार आणि इतर् बलात्कार एकाच पातळीवर आणणे आता तरी कठीण आहे. कोणतीही शारीरिक किंवा लैंगिक अत्याचार हा गुन्हा नक्कीच आहे. पण बहुतांश स्त्रीया तो सहन करत राहतात याचे महत्त्वाचे कारण नाईलाज हे आहे. या नाईलाजाचे कारण आर्थिक( स्वावलंबी नसणे), सामाजिक( आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र असलि समाजात होणारी अप्रतिष्ठा) राजकीय( गुन्हा दाखल केला तरी त्याचा पाठपुरावा करण्यासाठी जितकि मानसिक खम्बिरता लागते तिचा अभाव) आणि वैयक्तिक असते( जवळचे नातेवाईक सुद्धा विरोधात जातात शिवाय मुलांची कुतरओढ होते.)
३) लैंगिक सुख हे एकमेव सुख असे आहे कि ज्यात दोन व्यक्तीनचा सहभाग आवश्यक लागतो. दुर्दैवाने पुरुषांची काम वासना हि स्त्रियांपेक्षा जास्त असते आणि भारतीय ( किंवा हिंदू) विवाह कायद्याने एक पत्नीव्रत लादले गेले आहे. जर नावर बायकोला चरितार्थ साठी पैसे देत नसेल तर ते क्रौर्य आहे पण पत्नी जर शरीरसंबंधाला नकार देत असेल तर त्या बद्दल कायद्यात कोणताही शब्द नाही.( दोन्ही शरीराच्या प्राथमिक गरजा आहेत) मग अशा वेळेस पुरुषाने काय करायचे. जर एखादा पुरुष बाहेरख्याली पण करू लागला तर ते कायद्याला मान्य होईल काय? किंवा बहुपत्नीव्रत ( बहु पतिव्रत) हे कायद्यात मान्य होईल काय? जसे विवाहातील बलात्कार हा एक सामाजिक प्रश्न आहे तसाच शारीरिक सुखातील असमतोल हा एक सामाजिक प्रश्न आहे. पन्नास टक्के तरी स्त्रिया आपल्या नवर्याला शारीरिक सुखासाठी वेठीस धरतात असे वाचल्याचे आठवते. भारतीय पुरुषाची मानसिक जडणघडण अशी घडवलेली असते कि त्याला मर्दपणा 'सिद्ध" करावा लागतो. आणि संवेदनशील राहणे किंवा तसे न करणे म्हणजे नामर्द ठरवले जाण्याची भीती असते.
बाकी क्रमशः

हाडक्या's picture

2 May 2014 - 5:06 pm | हाडक्या

दंडवत..!

संपूर्ण लेखावरती हा जवळपास सर्वच मुद्दे आणि समस्यांना स्पर्श करणारा प्रतिसाद..
धन्यवाद डॉक्टर. :)

प्रसाद१९७१'s picture

2 May 2014 - 6:18 pm | प्रसाद१९७१

ह्याला म्हणतात सम्यक विचार.

प्रसाद गोडबोले's picture

2 May 2014 - 7:57 pm | प्रसाद गोडबोले

ह्याला म्हणतात सम्यक विचार.

>>> येथे "सम्यक" ह्या शब्दावर वाद उद्भवु शकतो :D

रेवती's picture

2 May 2014 - 7:22 pm | रेवती

प्रतिसाद आवडला.

सुबोध खरे's picture

2 May 2014 - 8:44 pm | सुबोध खरे

तिसर्या मुद्द्याबद्दल मी माझ्या एका लेखात चर्चा केली होती http://www.misalpav.com/node/26714 शेवटचा परिच्छेद
बायको सतत शरीर संबंधास नकार देत असेल आणि नवर्याचे संस्कार "बाहेर" जायला प्रतिबंध करत असतील तर येणाऱ्या वैफल्यातून एखादा नवरा जबरदस्ती करीत असेल. ( दुर्दैवाने अशा जोडप्यांची संख्या खुप आहे हे मी माझ्या व्यवसायामुळे पाहत आलो आहे) आणि एखाद्या क्षणी संतापाच्या भरात(IMPULSIVELY) बायको जाऊन प्राथमिक माहिती अहवाल (FIR) लिहून आली तर छोट्याशा चुकीसाठी त्यांचे लग्न नक्की मोडकळीस येईल कारण एकदा हा FIR लिहिला कि तो रद्द करणे हे फक्त न्यायालयाच्या हातात आहे. दुर्दैवाने पोलिस अशा वेळेस स्वतःची चामडी वाचवण्यासाठी पटकन नवर्याला कोठडीत टाकतात (निष्क्रिय राह्ल्याचा ठपका नको म्हणून) यानंतर त्या जोडप्याच्या संसाराची धूळधाण होते. अशा घटना दुर्मिळ आहेत आणि अशा गोष्टीचा त्या विधी अहवालात उहापोह केला आहे. त्यामुळे हा निर्णय स्त्रीमुक्ती वाद्यांना वाटतो तितका सोपा नाही. आणि हा सवंग मतपेटीसाठी तरी नाही असे मला वाटते. बाकी सरकारवर टीका करणे हा आपला मतदानसिध्द हक्क आहेच. .

प्रसाद गोडबोले's picture

2 May 2014 - 10:17 pm | प्रसाद गोडबोले

तिसर्या मुद्द्याबद्दल मी माझ्या एका लेखात चर्चा केली होती http://www.misalpav.com/node/26714 शेवटचा परिच्छेद

लेख वाचला . खुपच बोल्ड आणि सत्यकथन करणारा लेख आहे ...पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की

कोणताच पुरुष कधीच "स्त्री संबंधांना नकार देते " हा कायद्याने गुन्हा ठरवावा अशा प्रकारची मागणी करताना दिसत नाही ! स्त्रीमुक्तीबिक्तीवादी बायका मात्र लगेच कोर्टाकडे धाव घेतात कारण त्यांना माहीत असते की कोर्ट्/कायदा त्यांच्याच बाजुन असतो.....नेहमीच

१. "जोवर स्त्रिया आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या स्वतंत्र होत नाहीत तोवर" हा भाग वेगळा. यातल्या बर्‍याच स्त्रीया संभोगालाच काय संध्याकाळचे जेवण बनवायला नि पाय दाबायलाही नकार देऊ शकत नाहीत. पण जिथे स्त्रीया स्वतंत्र इ आहेत, जसे उच्चवर्गीय, तिथे पतींना शिक्षा तुरुंगवासच असेल/असावी असे नाही. तितक्यानेच संबंध तुटतीलच असे म्हणता येणार नाही. म्हणजे जज सज्जड दम देऊन सोडून देईल, इ.
वरच्या वर्गात जे चालते ते हळूहळू खालच्या वर्गात झिरपते, म्हणून सगळ्या समाजाला याचा फायदा होऊ शकतो. आपला नवरा जेलमधे गेला तर आपली हालत काय होईल याची चांगली कल्पना निम्नस्तरीय, इ स्त्रीस असते म्हणून ती हिशेब करूनच वागेल. पण वरच्या वलयात जी धूळ उठेल, त्याच्याने समाजात प्रबोधन, सर्वच स्तरांसाठी , नक्कीच होईल.
२. बलात्कार हा अन्याय आहे हे मान्य केले कि त्याच्यासाठी न्यायिक प्रावधान असले पाहिजे. स्त्रीयांच्या सशक्तीकरणाचा संबंध आणण्याची गरज नाही. विवाहबाह्य क्रूर बलात्कार - ... - ... - बलात्कार ते वैवाहिक क्रौयपूर्ण बलात्कार - वैवाहिक बलप्रयोगातून बलात्कार - मर्जीविरुद्ध अन्याय करण्याच्या भावनेने बलात्कार - (केवळ) वासनापूर्तीसाठी संमतीविना बलात्कार -वासनापूर्तीसाठी संमतीविना संभोग या प्रत्येकाला एकच सजा नसावी. म्हणून हे कायदे आमूलाग्र बदलले तरी चालेल. सामाजिक बदलाची वाट पाहणे चूक आहे. उद्या स्त्रीयाच कमवू लागल्या नि त्याच श्रेष्ठ आहेत अशी समाजात परिस्थिती आली 'तरच या कायद्याचा फायदा आहे' म्हणणे ही चूक आहे नि 'तर या कायद्याचा फायदा आहेच (म्हणजे परिणाम होईल)' म्हणणेही चूक आहे. समाज सुधाराची शास्वती नाही, ते ३०-४० वर्षांत होतील का माहित नाही. आणि 'आर्थिक दृष्ट्या स्वयंभू असेल तरच आपण इथे टिकता' असा समाज बनवायची सवयही नको. कदाचित प्रत्येक कुटुंबातल्या दोन्ही जणांना (नवरा नि बायकोला) नोकरी वा व्यवसाय मिळणे हे १००% (वा ९५%) लोकसंख्येसाठी अर्थशास्त्रीय दृष्ट्या असंभव असावे. स्त्रीयांना संस्कृतीमुळे घरी बसून आर्थिक गरज भागत असेल तर अन्याय टाळण्यासाठी कमवायला लावणे अतार्किक आहे. या कायद्याचा वापर फुंकून फुंकून व्हावा, त्यांनी सांभाळून करावा असे म्हणता येईल.
३."जसे विवाहातील बलात्कार हा एक सामाजिक प्रश्न आहे तसाच शारीरिक सुखातील असमतोल हा एक सामाजिक प्रश्न आहे." अतिशय रोचक निरीक्षण. दोन अन्याय असतील तर त्यांची तुलना होऊ नये. दोन्हींसाठी उपाय व्हावेत. एक पुरुषांवर आहे नि एक स्त्रीयांवर आहे म्हणून ते तसेच का ठेवायचे? अन्याय म्हटले कि उपाय हवा. पण क्षम लोकांनी ती पूर्ण फ्रेम्वर्क ठरवावी.

वैवाहिक बलात्काराला गुम्हा केल्याने तो असमतोल वाढणार आहे असे आहे का? किंबहुना नसावे. समाजाची मूल्ये ही अनंत घटकांनी बनत असतात. "आपल्या साथीदाराशी अन्याय करणे" हे मानवाचे जेनेटिक मूल्य नाही अशी माझी व्यक्तिगत धारणा आहे. प्रत्येकच गोष्टीचा गैरफायदाच घेतला जाणार आहे. सिविलायझेशन चालू झाल्यापासून माणूस स्वतःचाच शोध घेत आहे. सौख्य, प्रगती, जिज्ञासा भागवणे यासोबतच न्याय्य काय आहे हे पाहून प्रत्येक नव्या शोधाचा मानवतेवर विपरित परिणाम होऊ नये यासाठी नवनवे उपाय योजित आहे.
व्यवस्था फार किचकट नि हताश करणारी आहे हे मान्य पण मानवाची अंतःप्रेरणाच न्यायाची नाही असे एकदा वाटले तर पुढे काही खरे नाही.
(लिहिताना बोलणाराचा टोन कळत नाही. खुलाश्यासाठी - हा प्रतिसाद प्रतिवाद नसून एक मतवाद आहे.)

तो म्हणजे विवाहांतर्गत बलात्कारांला (खरंच) कपडे कारणीभूत आहेत का?

प्रसाद गोडबोले's picture

6 May 2014 - 4:55 pm | प्रसाद गोडबोले

विवाहांतर्गत बलात्कारांला (खरंच) कपडे कारणीभूत आहेत का?

>> =))))

कपिलमुनी's picture

12 May 2014 - 5:42 pm | कपिलमुनी
आत्मशून्य's picture

12 May 2014 - 5:58 pm | आत्मशून्य

जर तुम्ही लिवीन अथवा लग्न केलेले आहे तर असे नाते बाडीस आहे ज्यात एकमेकांच्या लैगीक त्रुष्णा भागवणे बंधन/कर्तव्यकारक आहे. अन्यथा तुम्हाला नातेसंबंध प्रस्थापित करायची गरज काय ?

फेमी नाझी हां नवीन मराठी शब्दप्रयोग क्ळाला. खरे तर यांना नुसते नाझीच म्हणावे पण जर ते लिंगभेद मानतात तर फेमिनाझी योग्य शब्दय