डॉक्टर सगळं ठिक आहे ना?

डॉ. भूषण काळुसकर's picture
डॉ. भूषण काळुसकर in जनातलं, मनातलं
9 May 2014 - 12:37 pm

काय गम्मत आहे पहा, काही गोष्टी नॉर्मल असणं हा सुद्धा काहींसाठी प्रॉब्लेम असू शकतो!!! परवाची गोष्ट- एका पेशंटच ब्लड प्रेशर एकदम नॉर्मल आलं- म्हणजे 120/80. तर पेशंटने चक्क मला शंकेने विचारला-" डॉक्टर सगळं ठिक आहे ना? नाही म्हणजे एवढ नॉर्मल ब्लडप्रेशर माझ कधीच नसत" म्हणजे काहीतरी आजार निघाला, डॉक्टरांनी इंग्रजी मधे उच्चारायला कठीण अस काही नाव सांगितल कि मग आपला जीव भांडयात पडतो."चला एकदाच रोगाच निदान झाल". एकदा एका पेशंटचा MRI रिपोर्ट नॉर्मल आला. तर तो म्हणे- " 5000 रुपये खर्च करुन काय उपयोग, रिपोर्ट मधे काही नाही, सगळ नॉर्मल, काहीही निघाल नाही!!!" कधी कधी अस वाटत की आपल्याला काहीतरी व्हाव याची जणू पेशंट वाटच बघत असतात.
शारिरिक बिघाड किंवा आजार याची ऎकून,वाचून,अनुभवून एवढी सवय होते की त्यात काही वावगं/चूकीच अस वाटत नाही. जस आजूबजूच्या गोंगाटाची इतकी सवय होते की शांतता आपल्याला बेचैन करते. त्यामुळे प्रत्येकाने शांतपणे आपण खरच ’निरोगी’ आहोत का हे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

9 May 2014 - 12:55 pm | प्रचेतस

मिपावर स्वागत.
आपले माहितीपूर्ण आणि जरा विस्तृत लेख येथे अवश्य येऊ द्यात.

डॉ. भूषण काळुसकर's picture

9 May 2014 - 6:11 pm | डॉ. भूषण काळुसकर

धन्यवाद... माझा ही तोच प्रयत्न असेल.

धन्या's picture

9 May 2014 - 1:01 pm | धन्या

लिहीत राहा.

डॉ. भूषण काळुसकर's picture

9 May 2014 - 6:09 pm | डॉ. भूषण काळुसकर

आभारी आहे धन्या... प्रोत्साहनाबद्दल

"एकदा एका पेशंटचा MRI रिपोर्ट नॉर्मल आला. तर तो म्हणे- " 5000 रुपये खर्च करुन काय उपयोग, रिपोर्ट मधे काही नाही, सगळ नॉर्मल, काहीही निघाल नाही!!!" कधी कधी अस वाटत की आपल्याला काहीतरी व्हाव याची जणू पेशंट वाटच बघत असतात."

आपण घटनांची अशी सुसंगती का लावायला बघता? आपल्याला स्वतःला माहित आहे की आपण जे लिहिलं आहे ते खरं नाही. कदाचित पेशंट्ला MRI नॉर्मल येण्याचं महत्त्व कळत नसेल, पण आपल्या दुखण्याचं कारण अजूनही कळत नाहिये हे तरी नक्कीच कळालेलं आहे. म्हणून तो निराश आहे की एव्हढे पैसे घालवून अजून निदान नाही.(अर्थात त्याला काहीतरी दुखत आहे हे मी गृहित धरत आहे....)

मी स्वतः दोनच दिवसांपूर्वी MRI काढलेला आहे. माझाही रीपोर्ट नॉर्मल आला. त्यावेळच्या भावना म्हणजे MRI काढेपर्यंत आणि नंतरच्या अशा एका वाक्यात सांगणे अशक्य आहे! मी खुशच व्हायला पाहिजे हे कळाल्यावर की MRI मध्ये काही नाही, पण तेव्हा कुणाशी बोललो असतो तर काय माहित मी पण असंच म्हणलो असतो-

"रीपोर्टमध्ये काही नाही? मग मला झालंय तरी काय?"

बाळ सप्रे's picture

9 May 2014 - 2:32 pm | बाळ सप्रे

एक्झॅक्टली!! हेच म्हणतो..
एक्स-रे झाला, सोनोग्राफी झाली, इ एम जी झाला, एम आर आय झाला सगळं नॉर्मल मग झालय तरी काय??
विटॅमिन गोळ्या घेतल्या, फिजियोथेरपी करुनही दुखतय तर खरं!!
हे दु:ख असतं..

डॉ. भूषण काळुसकर's picture

9 May 2014 - 7:11 pm | डॉ. भूषण काळुसकर

काही पेशंटच्या अनुभवातूनच अशी सुसंगती लावली आहे.
मग मला झालय तरी काय?या प्रश्नातली अगतिकता समजू शकतो. पण हा प्रश्न पेशंट इतकाच डॉक्टरांना पण(पेशंट बाबत) सतावत असतो.बर्‍याच आजारांच्या बाबतीत (विशेषत: पाठदुखी) अस होत की त्रास तर होत असतो, पण सर्व टेस्ट करुन पण हाती काहीच लागत नाही. पण याचा अर्थ आपले पैसे वाया गेले अथवा काहीच डायग्नोसिस झालं नाही- असा निश्चितच करुन घेऊ नये.

किसन शिंदे's picture

9 May 2014 - 1:06 pm | किसन शिंदे

मिपावर स्वागत आहे. इतर मिपाकर डाॅक्टरांप्रमाणे आपलेही वैद्यकीय अनुभव ऎकायला आवडतील.

सुबोध खरे's picture

9 May 2014 - 1:19 pm | सुबोध खरे

डॉक्टर साहेब
मिपा वर स्वागत. असेच अनुभव कायम येत असतात. एक गमतीदार अनुभव मी एशियन हार्ट इन्स्टीट्यूट मध्ये असताना आला. एका उच्च पदस्थ व्यक्ती ने आपले पूर्ण एक्झीक्युतीव्ह हेल्थ चेक अप (यात स्ट्रेस टेस्ट आणि इको कार्डियो ग्राफी पण येते) करून घेतले. मी लोकांशी मोकळेपणाने बोलतो म्हणून तो जाता जाता माझ्या विभागात आला आणि म्हणाला डॉक्टर मी एवढे पाच हजार रुपयाचे एक्झीक्युतीव्ह हेल्थ चेक अप करून घेतले.पण सगळे रिपोर्ट नॉर्मल आले मग काय फायदा झाला पाच हजार रुपये फुकट गेले.
मी हसत त्यांना म्हटले साहेब तुमचा विमा उतरवला आहे का ? ते म्हणाले हो पन्नास लाखाचा अहे. यावर मी त्यांना परत सांगितले मग साहेब मागच्या वर्षाचा विम्याचा हप्ता फुकट गेला कि.( तुम्ही मेल नाहीत तर विम्याचे पैसे पाण्यातच गेले) यावर ते चमकले आणि एक मिनिटांनी हसत मला म्हणाले डॉक्टर तुमचे बरोबर आहे सर्व काही नॉर्मल आहे हि केवढी दिलासा देणारी गोष्ट आहे.
अर्थात आजारासाठी तपासणी करणे आणि हेल्थ चेक अप करणे यात मुलभूत फरक आहे. तरीही बर्याच वेळेस रुग्ण यात गल्लत करतात. म्हणजे पाठदुखी साठी एम आर आय काढला आणि त्यात काही आले नाही तरी त्यांना पैसे फुकट गेले असे वाटत राहाते. अशा एका रुग्णाला मी विचारले कहो तुम्हाला स्लीप डिस्क निघलिअस्ति तर बरे वाटले असते काय ? त्यावर ते खजील होऊन हसले.
याबद्दलचा अजून एक किस्सा परत केंव्हातरी.

llपुण्याचे पेशवेll's picture

9 May 2014 - 6:27 pm | llपुण्याचे पेशवेll

डॉक्टर हा तुमच्यावर आरोप नाही पण बरेच वेळेला महागड्या तपासण्या उगाच करायला सांगितल्या जातात. त्यात पुढे सगळे कट प्रॅक्टीस वगैरे वगैरे आले. ही खिन्नता त्यामुळे तर नसेल ?

सुबोध खरे's picture

9 May 2014 - 7:20 pm | सुबोध खरे

तुम्ही म्हणता यात बरेच तथ्य आहे. समाजाला कीड लागलेली असताना केवळ एकच व्यवसाय त्यापासून वेगळा राहील काय?
अर्थात याला दुसरा पैलू पण नक्कीच आहे.
एक साधे उदाहरण म्हणून सांगतो माझी पत्नी पण डॉक्टर आहे दोन वर्षापूर्वी मलेरिया होत असे तेंव्हा रुग्णाला तापाबरोबर नुसता कोरडा खोकला होत असे. एक रुग्ण आमच्या पाठीमागे तिची अक्कल काढताना पाहीला कि "अहो खोकला आहे तर मलेरिया चे औषध दिले इतकी पण अक्कल नाही का? सुदैवाने त्याच्या मित्राला तसाच ताप होता आणि तो मलेरियाची औषधे घेऊन बरा झाला होता. त्यामुळे त्याने याला सांगितले कि अहो त्या डॉक्टर बरोबर औषध देतात. अर्थात हाही रुग्ण बरा झाला पण आम्ही यात एक गोष्ट शिकलो. कि तुमचा अनुभव कितीही दांडगा असो. हल्ली रुग्णाचे पैसे वाचविण्याचा प्रयत्न करायचा कि नाही हा विचार प्रथम करावा लागतो. जास्त शहाणे रुग्ण स्वतःच सुचवतात कि अमुक तमुक रक्ततपासणी करूया. आणि हेच लोक नंतर उलटून बोलतात कि एवढ्या तपासण्या केल्या. काहीच निघाले नाही.

डॉ. भूषण काळुसकर's picture

10 May 2014 - 10:58 am | डॉ. भूषण काळुसकर

नक्कीच नाही!!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 May 2014 - 1:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉक्टर साहेब मिपावर स्वागत आहे, आपल्या क्षेत्रातील वेगवेगळे अनुभव वाचायला आवडतील...!!! (आणि फुकट सल्लेही द्यालच अशी अपेक्षाही बाळ गतो) :)

दिलीप बिरुटे

पैसा's picture

9 May 2014 - 1:55 pm | पैसा

बर्‍याच जणांना आपल्याला काहीतरी झालं आहे ही भावना जास्त कम्फर्टेबल वाटत असावी! ;)

दोन्ही डॉक्टर लोकांचे अनुभव मजेशीर आहेत!

तुम्ही मेला नाहीत तर विम्याचे पैसे पाण्यातच गेले

.... ही सुबोधजींची निर्विवाद विचारसरणी! आणि

पण आपल्या दुखण्याचं कारण अजूनही कळत नाहिये हे तरी नक्कीच कळालेलं आहे. म्हणून तो निराश आहे की एव्हढे पैसे घालवून अजून निदान नाही

... ही कन्फ्युज्ड अकौंटंटची क्लॅरिटी!

(अवांतरः) ते टर्म इन्शुरन्स बद्दल बोलत आहेत. त्यांना एण्डावमेंट बद्दल सांगूया का?

मेलं नाही तरी पैसे वाया जात नाहीत अशाही स्कीम आहेत म्हणावं!

बॅटमॅन's picture

9 May 2014 - 3:32 pm | बॅटमॅन

अगदी अगदी.

संजय क्षीरसागर's picture

9 May 2014 - 3:45 pm | संजय क्षीरसागर

क्लेम नाही म्हणून प्रिमीअम बाद ठरत नाही. तद्वत, रिपोर्ट नॉर्मल म्हणून पैसे वाया गेले नाही.

बाकी आपला दृष्टीकोन योग्य आहेच. नाही तर एखादा वैतागलेला पेशंट म्हणायचा, गरज नव्हती तर MRI कशाला (झक मारायला) करायला लावला? तुम्हाला क्लिनीकल डायग्नॉसिसवरनं लक्षात आलं नाही का?

सुबोध खरे's picture

9 May 2014 - 6:14 pm | सुबोध खरे

साहेब ,
एण्डावमेंट स्कीम मध्ये तर "जिवंतपणी आणी मेल्यावर "दोन्ही वेळा पैसे वाया जातात. फायदा फक्त विमा कंपनी आणी एजंतचा होतो
मला एक तरी स्कीम सांगा जी टर्म इन्शुरन्स + सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) पेक्षा जास्त पैसे देते?
आजतागायत मला एकही वित्त सल्लागार किंवा विमा एजंट हे दाखवू शकलेला नाही. आपण दाखवू शकाल तर मी ते मान्य करेन.

वरचा प्रतिसाद लिहून झाल्यावर परत एकदा वाचताना मलाही लक्षात आलं होतं की "पैसा वाया जात नाही" हे मीच लिहिलं तरी ते चुकीचं आहे. (मी स्व्तःच माझी पॉलीसी सरेंडर करायचा विचार करत आहे).

पण तो विनोदी म्हणून दिलेला प्रतिसाद होता, म्हणून राहू दिला. शिवाय माझंच मी किती तुण्तुणं वाजवू म्हणूनही दुर्ल्क्ष केलं. आपलं म्हणणं खरं आहे. टर्म इन्शुरन्स हाच मीही यापुढे चालु ठेवणार आहे.

>> शिवाय माझंच मी किती तुण्तुणं वाजवू म्हणूनही दुर्ल्क्ष केलं.

*mosking*

अमित खोजे's picture

9 May 2014 - 9:28 pm | अमित खोजे

कंफ्युज्ड अकौंटंट

असे म्हणू नका हो. तुम्ही दोन्हीही प्रतिसाद राहून दिलेत हे बरेच केले. बर्याच पैशांबद्दल च्या गोष्टी अजून समजत नाहीत.
आता तुमच्या आणि सुबोध खरेंच्या प्रतिसादातून मलाही जरा माहिती मिळाली कि या इन्शुरंस पॉलिसी मध्ये थोडी मेख असते. माझ्याही पॉलिसी आता मी तपासून पाहणार आहे.

माझ्या एका डॉक्टर मैत्रिणीने सांगितलेले मला आठवते - 'तसं पाहिलं तर' (हे 'तसं पाहिलं तर' महत्वाचे आहे - त्याचा अर्थ पारंपारिक विचारांपेक्षा एक वेगळा विचार असा घेता येईल) इन्शुरंस पॉलिसी किवा मेडिकल पॉलीसी घेण्यात काहीच अर्थ नसतो. तेच हफ्त्याचे पैसे जर तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवले तर त्याचा परतावा योग्य मिळतो जो तुम्हाला तुमच्या अचानक उद्भवणाऱ्या आजारामध्ये / अपघातामध्ये भरपूर मदत करू शकतो. इन्शुरन्स कंपन्यांच्या 'डिस्क्लेमर' (जे दुर्बीण लावून पण वाचता येत नाही) मध्ये अडकण्या पेक्षा स्वतःचा रोख पैसा कधीही उपयोगाचा.

आता या गोष्टीवर माझा स्वतःचा विचार अजून चालू आहे. एम बी अे करत असताना आम्हाला एक संज्ञा होती - 'time value of money ' ती मला पूर्णपणे कळाली आहे असे मी म्हणणार नाही परंतु ती संज्ञा लक्षात घेता करता माझ्या डॉक्टर मैत्रिणीने सांगितलेले अगदीच चुकीचे आहे असे मी म्हणणार नाही.

बाकी डॉक्टर खरेंचे उदाहरण बरोबर आहे. विमा पॉलीसी च्या ऐवजी गाडीचा इन्शुरन्स घेऊन बघा. गाडीला अपघात झाला नाही तर त्या महिन्याच्या हफ्त्याचे पैसे तसे पाण्यात बुडाल्या सारखेच आहेत.

असा जो प्रिमिअम संपत जातो, त्या प्रकारालाच "लाइफ इन्शुरन्स" मध्ये "टर्म इन्शुरन्स" म्हणतात. टर्म संपली (एक वर्ष) की इन्शुरन्स संपला. त्या मुदतीत जर आपल्याला काही क्लेम करता आला तर ते प्रिमिअमचे पैसे वसूल, नाही तर सगळे बुडाले!! खरे साहेब म्हणत होते की पैसे बुडाले, म्हणून खरे साहेब हे टर्म इन्शुरन्स बद्द्ल बोलत आहेत असं मी म्हणालो. ते खरंच बोलत होते.

मी गमतीने (चेष्टेने नाही!) म्हणालो ते त्यांना नाही, संजय क्षीरसागर यांना....तेही अवांतर असल्याचे लेबल लावून! पण खरे साहेबांना पटलं नाही आणि त्यांनी माझं माप मला परत केलं...आणि मीही ठेवून घेतलं!

आपणही अगदी फक्त अर्धा तास हिशेब मांडले तरी खरे साहेब म्हणतात त्याच निष्कर्षाला याल. इन्शुरन्स जर गुंतवणूक म्हणून करू जाल, तर शेवटी फायदा होण्याची शक्यता कमी आहे. इन्शुरन्स हा इन्शुरन्स म्हणूनच घ्यावा. जेवढी रक्कम आपल्याला आपल्यामागे हातात यावीशी वाटते, त्या रकमेसाठीचा प्रिमिअम विचारायचा आणि तेवढे पैसे भरून ते पैसे बुडाले असे समजायचे. त्यावर परताव्याची अपेक्षाच नको!! आपल्यामागे मनाची शांती हेच उद्दीष्ट असेल तर ते या मार्गाने अधिक परीणामकारक पद्धतीने पूर्ण होते.

आत्मशून्य's picture

9 May 2014 - 2:12 pm | आत्मशून्य

5000 रुपये खर्च
करुन काय उपयोग, रिपोर्ट मधे काही नाही,
सगळ नॉर्मल, काहीही निघाल नाही!!!

हां अनुभव माझा स्वताचा आहे. पैसे पाण्यात गेले राव माज्या ब्रेन एम् आर आय चे, विशेषत: डिफ्यूसड़ वेट इमेजिंग शोज नो आय्स्कामिक रिजन वाचल्यावर वाटल होतं , यूरेका यूरेका पण कसलं काय पैसे पाण्यात गेले. मेंदू फिजिकली व्यवस्थित आहे. :(

डॉ. भूषण काळुसकर's picture

9 May 2014 - 6:06 pm | डॉ. भूषण काळुसकर

नशिबवान आहात की काही निघाल नाही

आनंदी गोपाळ's picture

9 May 2014 - 8:30 pm | आनंदी गोपाळ

नशीबवान आहात, की फिजिकली व्यवस्थित का होईना, मेंदू आहे हे तरी सिद्ध झाले.

आत्मशून्य's picture

10 May 2014 - 12:23 am | आत्मशून्य

म्हणून तर काळ्या ढगाला रुपेरी किनार या न्यायाने काहीसा आनंदही वाटला. :) पण पुन्हा फक्त ते समजायसाठी आयएनाआर ५००० वाया म्हणजे ते प्रश्नचिन्ह अजुनही कायमच आहे :)

सुबोध खरे's picture

10 May 2014 - 10:19 am | सुबोध खरे

आत्मशून्य साहेब,
डिफ्युजन वेटेड इमेजिंग हे माणसाला मेंदूला होणारा रक्त पुरवठा बंद झाल्याने येणारा पक्षाघाताचा झटका पहिल्या सहा तासात निदान करू शकतो. या काळात जर रुग्णावर योग्य उपचार झाले तर मेंदूला अजिबात हानी न पोहोचता(no residual damage) रुग्ण पूर्ववत होऊ शकतो. आपला एम आर आय हा नॉर्मल आला हि अतिशय उत्तम गोष्ट आहे. पण एक ( आगाऊ) शंका हा स्कॅन का केला होता? जर आपल्या मेंदूला रक्त पुरवठा मर्यादित काळासाठी (TIA transient ischemic attack (http://en.wikipedia.org/wiki/Transient_ischemic_attack) / RIND) खंडित होऊन चक्कर येणे, बेशुद्ध पडणे किंवा फेफरे येणे अशा काही कारणासाठी केला असेल तर आपण आपल्या डॉक्टरना दाखवून पूर्ण तपासणी करणे आवश्यक आहे. कारण असे लहान लहान झटके हे पुढे येणाऱ्या तीव्र झट्क्यांची आगाऊ सूचना देत असतात. तसे नाही याची खात्री करून घ्या एवढेच आपल्याला नम्रपणे सुचवावेसे वाटते.

डॉक्टरांच्या सल्यानेच जेंव्हा ब्रेन MRI ही केला होता त्याच्याच रिपोर्टमधे फाउंड नो आयस्कॅमीक रिजन वाचल्यावर काहीतरी मिसींग आहे असे वाटले होते. पण डॉक्टरांनी तो डाउटही रक्त न पोचणारा विभाग सापडला नाही असेच काहीसे सांगुन क्लीअर केला होता व सर्व नॉर्मल आहे असे सांगीतले होते.

चक्कर येणे, बेशुद्ध पडणे किंवा फेफरे येणे यासारखा गंभीर नाही पण काहीसा विचीत्र प्रॉब्लेम आहे माझा व कारण अजुनही सापडेले नाहीये. मला मसल्स स्टीफनेसचा त्रास आहे. थोडक्यात माझ्या शरीरातील सर्व स्नायु आपोआप काहीसे घट्ट व्हायची/रहायची प्रवृत्ती राखतात. यावर संमोहन तज्ञ, मानसशास्त्रज्ञ, मनोशारीरीक विकार तज्ञ, पुष्पाउशधी, होम्योपेठी, न्युरोलोगीस्ट, आयुर्वेद वैद्य ते अगदी फिजीओ थेरेफिस्ट वगैरे वगैरे वगैरे सर्व उपचार दिर्घकाळ घेउन पाहिले आहेत कोणालाही अजुन निदान करता आलेले नाही. उम्मीद पे दुनीया कायम है.

आपल्या प्रतिसादासाठी मनःपुर्वक धन्यवाद.

नानासाहेब नेफळे's picture

13 May 2014 - 11:08 am | नानासाहेब नेफळे

याच्यावर एकच उपाय ,फडतरेची डबलतिखट मिसळ खाऊन या व त्यावर लगेचच कडक चहा प्या. स्टीफनेस येण्यासाठी औषधे घ्यावी लागतील.

त्रिवेणी's picture

9 May 2014 - 2:41 pm | त्रिवेणी

*i-m_so_happy*

परवा रात्री शेजारणीचा नवरा छातीत दुखतय म्हणुन रात्री तीन वाजता अ‍ॅम्ब्युल्न्स वगैरे बोलवुन अ‍ॅडमिट झाला होता.
आज त्याला भेटायला गेले. म्हंटल काय ब्वा? तर इतका रिलॅक्स होता. सगळ ठिक आहे. म्हणुन. साहेबाला या आधी दोन हार्ट अ‍ॅटॅक येउन गेलेत. अन त्या अनुभवाने सगळ नॉर्मल या शब्दांवर स्वारी खुष होती. आज पहिल्यांदाच तो बोलत असताना त्याच्या निळ्या निळ्या डोळ्यात एक वेगळी रंग छटा जाणवली. किती निर्मळ आनंद होता त्याच्या डोळ्यात.
झाल होत काय बागकाम करताना जड कुंदी उचल्ल्याने छातीचा मसल दुखावला गेला म्हणे. हात लावला की दुखतय म्हणुन सांगत होता. पठ्ठ्या बिफशिवाय काही खात नाही अस हेलन (त्याची बायको) सांगते. मग मी आज भाज्यांच सूप देउन वर धमकी देउन आले. बघु आता. पण दोन रात्री पुर्वीचा तो अन आजचा तो याची आठवण हा धागा वाचताना आली.

साती's picture

9 May 2014 - 5:53 pm | साती

मिपा डॉक्टर कंपूत स्वागत.
आता जरा तुमची स्पेश्यालिटी कुठली , डिग्री कुठली ते ही लिहा ना.

मी एम डी मेडीसीन आहे. आपल्या मिपावर आयुर्वेदाचार्य, रेडिऑलॉजिस्ट, सर्जन, डेंटल सर्जन अशी अनेक ' आपल्या जातवाली' मंडळी आहेत. ;)

बॅटमॅन's picture

9 May 2014 - 6:03 pm | बॅटमॅन

रेडिऑलॉजिस्ट

वरून खालील फटू आठवला. त्यातले लोक ओळखीचे आहेत का ;)

selfie

डॉ. भूषण काळुसकर's picture

9 May 2014 - 6:03 pm | डॉ. भूषण काळुसकर

नमस्कार आणि धन्यवाद.
मी पुण्यातील एक होमिओपॅथिक डॉक्टर आहे.
सिंहगड रोड, आनंदनगर येथे मागील ६ वर्षे प्रॅक्टिस करत आहे.

तुमी होम्योपदीवाले? आता तुमचं काही खरं नाही इथे!!

पण बघा, खरं सांगतोय विश्वास ठेवा. वर जे केले असं लिहिलं आहे मी, त्याचबरोबर, मी आपल्या गोड गोळ्याही चघळत होतो- ११०/- रुपयाची बेलाडोना २०० ची बाटली- जी खरं म्हणजे १०/१२ रुपयात सहसा मिळते-पण आम्ही जिकडे रहातो, तिकडे दुकानच नाही म्हणून आम्हाला महागात ऑर्डर देऊन आणावी लागते- तर तिच्यातील एका डोसने मला तात्काळ आराम मिळाला. अगदी १५ मिनिटात. (+ग्लोनाइन ३० च्याही एका डोसने, पण हा डोस बहुधा निरुपयोगी असावा, कारण पूर्वीपण घेतला होता- एकट्याने काही उप्योग झाला नाही) . एवढे विस्ताराने अवांतर केले कारण गोष्ट अगदी गेल्या २-३ दिवसातली आहे. तोवर आधीचे ६ दिवस मी कामालाच गेलो नव्हतो इतका कामातून गेलो होतो. अगदी मजबूर मधला अमिताभ झक मारेल असे एक्स्प्रेशन्स देत होतो.

(फार वैयक्तिक झालं का? एस डब्बल ओ आर वाय.... )

होम्योपदी झिंदाबाद...!

बाळ सप्रे's picture

9 May 2014 - 7:24 pm | बाळ सप्रे

डॉक्टरसाहेब,
खास तुमच्यासाठी साखरगोळ्या

यात काही गैरसमज असल्यास दूर करण्याचा प्रयत्न करा.. *scratch_one-s_head*

डॉ. भूषण काळुसकर's picture

12 May 2014 - 7:11 pm | डॉ. भूषण काळुसकर

साखरगोळ्या जरा कडू दिसतायत

बाळ सप्रे's picture

12 May 2014 - 8:12 pm | बाळ सप्रे

अहो आमच्यासारखे लोक कडु आहेत म्हणून सोडुन देउ साखरगोळ्या घेणं..

तुमच्यासाठी पोटापाण्याचा प्रश्न आहे. अशा शंकांचं निरसन होणं जरुरी आहे..
का नुसतच श्रद्धावानांच्या श्रद्धेवर तरुन जायची अपेक्षा ठेवायची.. ज्योतिष्यांप्रमाणे..

डॉ. भूषण काळुसकर's picture

13 May 2014 - 10:30 am | डॉ. भूषण काळुसकर

जरुर, मी माझ्या परीने शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न नक्की करेन..
पण मी एक निश्चित सांगू इछितो, की नुसतच श्रद्धावानांच्या श्रद्धेवर एखादी पॅथी इसवी सन १७९६ पासून आतापर्यंत कशी काय तग धरु शकेल, आणि सर्व जगात नावारुपास येइल?

बाळ सप्रे's picture

14 May 2014 - 9:39 am | बाळ सप्रे

इसवी सन १७९६ पासून आतापर्यंत कशी काय तग धरु शकेल, आणि सर्व जगात नावारुपास येइल?

ही झाली तुमची श्रद्धा.. माझ्यामते केवळ श्रद्धेवर (चिकित्सेअभावी) अनेक निरर्थक गोष्टी हजारो वर्ष चालू शकतात..

आता शंकाच निरसन येउ द्या..

आपल्या मिपावर आयुर्वेदाचार्य, रेडिऑलॉजिस्ट, सर्जन, डेंटल सर्जन अशी अनेक ' आपल्या जातवाली' मंडळी आहेत.

वा. फक्त साबुदाण्याच्या गोळ्या देणारे वैद्यच इकडे नव्हते. ती कसर डॉ. काळूसकरांनी भरुन काढली.

जोक्स अपार्ट, डॉ. काळूसकर होमिओपाथीबद्दल लोकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करतील, "प्लासिबो ईफेक्ट" वर काही लिहितील अशी आशा करण्यात हरकत नाही. :)

वॉव साबुदान्याच्या गोळ्या ! :)
मला खुप खुप आवडतात . माझ्या आईला गुढगे दुखीचा त्रास होत होता तेव्हा एका डॉक्टरने दिल्या होत्या ..
आई म्हणाली नुसत्या गोड गोड लागताय्त .. मी मागितल्या तर द्यायची नाहि ..
म्हणुन मग मी चोरुन चोरुन खायची .. ़काय मस्त लागतात म्हणुन मला साबुदाना गोळ्यावाले डॉक्टर खुप खुप
आवडतात ...

रेवती's picture

10 May 2014 - 1:15 am | रेवती

अजूनही एक आहेत ते आजकाल मिपावर फारसे दिसत नाहीत. डॉ. अमित करकरे मिपासदस्य आहेत.

डॉ. भूषण काळुसकर's picture

12 May 2014 - 11:34 am | डॉ. भूषण काळुसकर

डॉ. अमित करकरे हे माझे सिनीअर आहेत

यशोधरा's picture

9 May 2014 - 8:25 pm | यशोधरा

तिकडे तर होमिओपथीवाल्यांना शत्रू कंपूतले समजता! *biggrin* एक पे रैना! *aggressive*

साती's picture

10 May 2014 - 12:12 am | साती

यशोधरा आज्जी जरा नीट वाचा,
मी विचारेपर्यंत डॉक्टरसाहेबांनी आपली डिग्री, स्पेश्यालिटी काहीच इथे किंवा आपल्या प्रोफाईलमध्ये लिहिले नव्हते हो.
आताच समजले.
बाकी मी इकडे किंवा तिकडे कुठेच होमिपदीवाल्यांना शत्रू म्हटलेले नाही.
;)

संजय क्षीरसागर's picture

10 May 2014 - 12:43 am | संजय क्षीरसागर

हे म्हणजे `सप्तपदी' (मी रोज चालते) म्हंटल्यासारखं वाटलं!

अच्छा, अच्छा! म्हंजे कंपूत निमंत्रणाची घाई केली का? ;)
मी इकडे किंवा तिकडे कुठेच होमिपदीवाल्यांना शत्रू म्हटलेले नाही. > साताक्का, खरंच का? एकदा तिथले तुमचेच प्रतिसाद वाचून या बरं! ;)

साती's picture

11 May 2014 - 12:20 pm | साती

आज्जी तुम्हीच वाचून या.
होमिओपथीला विरोध आहे.
होमिओपॅथ शत्रू असे कुठेच लिहिलेले नाही.
मला तर ते गरीब बिच्चारे वाटत्तात.
शिकतात होमिओपथी आणि मग ९०% हून जास्त लोक अ‍ॅलोपथीची प्रॅक्टीस करतात.
यात त्यांचा काहीच दोष नाही अर्थात. सरकारची पॉलिसीच चुकीची आहे.
हे सुद्धा मी मायबोलीवर वेळोवेळी लिहिल्येय.
अर्थात तुला खोड्याच काढायच्यात तर मी काय बोलणार?

;)

साताक्का, मला खोड्या वगैरे काही काढायच्या नाहीत गं. पण होमिओपथी लेखावर तुझ्या कमेंट्स तिकडे तशाच आहेत. टोन खिल्लीवजा आहे, म्हणून आश्चर्य वाटले होते आणि अजूनही वाटते आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

11 May 2014 - 12:41 pm | प्रकाश घाटपांडे

मुद्दा बरोबर आहे, आयबीएन वर प्रवक्ता म्हणुन बोलावल पाहिजे ब्वॉ! होमिओपॅथी वाल्यांना अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टीस करता येणार या बातमीचे पुढे काय झाले ते कळाले नाही.
नुकतेच माझा प्रवास हे डॉ.शंतनु अभ्यंकर यांचे या विषयावर पुस्तक प्रकाशित झाले आहे.त्यांचा होमिओपॅथी ते अ‍ॅलोपॅथी असा शैक्षणिक प्रवास झाला आहे. लेखक व प्रकाशक डॉ शंतनु अभ्यंकर, मॉडर्न क्लिनिक ब्राह्मणपुरी मु.पो. ता.वाई जि. सातारा फोन नं ९८२२०१०३४९, किंमत- १२० रु. अंनिस वार्तापत्र एप्रिल २०१४ मधे पुस्तकाचा परिचय आला आहे

मी सगळ्या प्याथ्यांवर विश्वास ठेवते (कधीकधी सगळेच निरुपयोगी वाटते पण ते सांगत नाही). तुमचे मिपावर स्वागत आहे डॉक्टर.

सुबोध खरे's picture

9 May 2014 - 8:33 pm | सुबोध खरे

कोणतीही पथी तितकीच चांगली असते.
सर्वात चांगली सिम्पथी
सर्वात वाईट एपथि
(हे इंग्रजीत जास्त चांगले वाटते)
all pathys are good,
the best is sympathy
and the worst is apathy

प्रकाश घाटपांडे's picture

10 May 2014 - 9:02 am | प्रकाश घाटपांडे

मस्तच डॉ साहेब. परवा श्रद्धा धार्मिकांचा प्लासिबो लेख वाचताना तुमची आठवण आली.
स्वगत- चला आमच्यातही बदल होताहेत

जरा आपण इम्पोसिबल क्युअर हे पुस्तक देखील वाचून पहावे. लेखक आठवत नाही.

आज्जेशी सहमत ! डॉक चे स्वागत. :)

{कधी वाटल्यास अल्फाअल्फा टॉनिक घेणारा} ;)

फक्त थंडीताप येतोय आणी पोट आवळुन दुखतय. या दोन लक्षणावर गावातल्या होमीयोपॅथी डागदर न मलेरीया आहे सांगितल. क्लोरोक्विनच्या डोस आणी 20/- फीस मध्ये तिन दिवसात बरा झालो.
(कुठल्याही टेस्टविना)

सुबोध खरे's picture

9 May 2014 - 7:56 pm | सुबोध खरे

माझ्या कडे एक माणूस आला होता. त्याच्या मुलाला पोटात दुखत होते. मी तपासून त्याला सांगितले कि तुमच्या मुलाला जंत झालेले आहेत. त्यावर तो म्हणाला डॉक्टर जन्तांसाठी शौचाची तपासणी करायची का? मी त्याला शांतपणे म्हटले तुम्हाला पैसे(१५० रुपये) खर्च करायची हौस असेल तर करा. मला विचारलं तर ८ रुपयाची बेन्डेक्स( आलबेंडाझोल- जंतांचे औषध)ची गोळी मुलाला द्या आणि थंड बसा.

कपिलमुनी's picture

9 May 2014 - 7:58 pm | कपिलमुनी

मिपाकरांनो ..
टेम्पो मधे बसवू नका डागदरांना..

स्वागत आहे. पुढल्या वेळेस थोडं पाणी टाकून वाढवा !! ;)

अमित खोजे's picture

9 May 2014 - 9:34 pm | अमित खोजे

डॉक्टर!

मिपा वर हार्दिक स्वागत. मिपाच्या डॉक्टर कंपू मध्ये भर पडली हे पाहून आनंद झाला.
असेच तुमचे लेख येत राहूदेत.

डॉक्टर लोकांचे अनुभव वाचण्यासारखे असतात असे आत्ता पर्यंतचा अनुभव आहे. तुमचेही येउद्यात!

आनन्दिता's picture

9 May 2014 - 10:59 pm | आनन्दिता

म्हशीस चालते का हो तुमची होमिओपदी? ;)

हळु घ्या..

डॉ. भूषण काळुसकर's picture

10 May 2014 - 10:53 am | डॉ. भूषण काळुसकर

निश्चितच चालेल कारण माझ्या कडे काही श्वान येतात- पेशंट म्हणून, म्हणजे त्यांचे मालक आणतात त्यांना. त्यांचे आजार होमिओपॅथीने बरे झाले. होमिओपॅथी म्हणजे प्लासिबो असा गैरसमज असणार्‍यांनी हे अवश्य वाचावे

होमिओपथीचा वैयक्तिक अनुभव अतिशय चांगला आहे.

साती's picture

10 May 2014 - 12:08 pm | साती

बरं झालं , पुलंच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं.
;)

साती's picture

10 May 2014 - 12:10 pm | साती

अरे बापरे, हा उपप्रतिसाद डॉक्टरांच्या प्रतिसादाखाली यायला हवा होता.
चुकून तुमच्या प्रतिसादाखाली आला.
वेगळाच अर्थं ध्वनित होत असल्याने 'सॉरी'
सं. मं., वरचा प्रतिसाद डॉक्टरांच्या प्रतिसादाखाली येईल असं कायतरी करा.

यशोधरा's picture

10 May 2014 - 2:16 pm | यशोधरा

होता हय, होता हय. ;)

बॅटमॅन's picture

10 May 2014 - 6:59 pm | बॅटमॅन

अगागागागागागा =))

साती डाक्टर, पाईंटाचा मुद्दा काय्ये तुमचा? ;)

डाक्टर डाक्टरांच्या 'पद्यां'मधे पण लई राडे असतात नै?
आयुर्वेद, युनानी, होमिओपथी आणि ह्यांच्या डोक्यावर अ‍ॅलोपथी...!
अ‍ॅलोपथी वाले डॉक्टर डॉक्टर आणि बाकीचे तसे नाहीत असं काही असतंय तर.
मिपावरच्या 'ब्लिस्ड गुराख्या'चं मत तर असंच आहे बहुतेक ;)

बाकी एएफएमसी वाले डॉ. खरे एम बी बी एस असले तरी ते सैनिकांचे असल्यानं सिव्हीलियन्स ना उपयोगी नसतील नै ;)

(सगळ्यांनी हलकं घ्या)

आनंदी गोपाळ's picture

11 May 2014 - 12:31 pm | आनंदी गोपाळ

नाव घ्यायला लाजायचं कशाला?

साती's picture

11 May 2014 - 1:58 pm | साती

प्यारे, पॉईंटाचा मुद्दा असा आहे की तुम्ही जे शिकलात ती प्रॅक्टीस करा.
मी उगाच कूणाला काढे नी मात्रा नी भस्मं नी नक्स वोमिका देत नाही तर तुम्ही उगाच आमच्या पॅथीची औषधे देऊ नका.
आम्ही एखाद्याला एम आर आय लिहून देतो तेव्हा एम बी बी एस च्या पाच आणि पीजीच्या तीन वर्षांत एम आर आय कसा वाचावा हे शिकलेले असतो.
असंख्य लेक्चर्समध्ये.
उद्या एम आर आयची फक्तं प्लेट आणून दिली तरी त्यात काय आहे हे छापील रिपोर्टशिवाय मला वाचता आले पाहिजे.
ज्यांना हे शिकवलेलेच नाही ते कुठल्या बेसिसवर एम आर आय पेशंटला करायला लावतात?
त्याहूनही जर तुमच्या आयुर्वेदिक फिजिऑलॉजीत प्राणवायू वैगेरे वेगळ्याच सर्कीटमधून फिरतो तर मग तुम्ही एक्स रे आणि आर्टेरीयल डॉप्लर वैगेरे करता तेव्हा तुम्हाला नेमकं काय पहायचं अस्तं?
पींगळा की सुषुम्ना?

आणि आनंदी गोपाळकाकांना काही बोलू नका हं ते माझे मित्रं आहेत.
;)

संजय क्षीरसागर's picture

11 May 2014 - 3:20 pm | संजय क्षीरसागर

लेखक पदार्पणालाच बावरले असतील नै!

त्यांच्याकडं 'साबुदाण्याच्या गोळ्या' असतील की 'बावरण्या'वर. =))
होमिपदीवाले हलकं घ्या हो! ;)

संजय क्षीरसागर's picture

11 May 2014 - 4:10 pm | संजय क्षीरसागर

ज्यांना हे शिकवलेलेच नाही ते कुठल्या बेसिसवर एम आर आय पेशंटला करायला लावतात?

आणि इतकी अगाध चर्चा वाचून, त्यांना स्वतःचा MRI काढायची वेळ नाही आली म्हणजे मिळवली!

आत्मशून्य's picture

12 May 2014 - 3:07 pm | आत्मशून्य
डॉ. भूषण काळुसकर's picture

12 May 2014 - 8:35 pm | डॉ. भूषण काळुसकर

ज्यांना हे शिकवलेलेच नाही ते कुठल्या बेसिसवर एम आर आय पेशंटला करायला लावतात?- हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. MRI अथवा Imaging technique हे वापरण्याचा अधिकार हा फक्त अ‍ॅलोपॅथी वाल्यांनाच आहे, हा फार मोठा गैरसमज आहे. मला वाटतं की कुठली टेस्ट करायला सांगायची हे आलेला पेशंट अथवा त्याचा आजार यावरुन ठरल पाहीजे, पॅथी वरुन नव्हे. कारण पेशंटच हित सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच कोणतही नुकसान होता कामा नये.
ज्या केसेस मधे खरोखर MRI, 2D Echo करणं गरजेच आहे, त्या केस मधे तो केलाच गेला पाहीजे. मी अमुक पॅथीचा डॉ. आहे म्हणून अथवा मला तो वाचता येत नाही म्हणून मी MRI सांगणार नाही हे act of negligence(गुन्ह्यासमान) ठरेल. एकतर हल्ली ९९% पेशंट छापील रिपोर्ट घेउनच येतात. आणि त्यातही रिपोर्ट न घेता कोणी आलाच तर त्याला, जो ही प्लेट पाहून रिपोर्ट बनवेल, त्याच्या एक्सपर्ट कडे पाठवायचे. त्यात काय अहंकार/पॅथी आड येता काम नये.
तसही विविध चाचण्यांच्या काम हे निदान होई पर्यंतच, एकदा रिपोर्ट आल्यावर जे काय निदान होइल त्यावरुन जो तो आपापल्या पॅथीची औषधं द्यायला आहेच की मोकळा.
आपण होमिओपॅथीची औषध एकवेळ देत नसाल, पण माझ्या पाहण्यात अनेक MD/MS आहेत की जे बरीच होमिओपॅथीची औषध सर्रास वापरतात. माझं म्हणणं एवढच आहे की सर्व पॅथींनी उगाच भांडत न बसता, समन्वयाने, रुग्णाचे हीत ज्यात आहे, तेच करावे.

मदनबाण's picture

12 May 2014 - 9:14 pm | मदनबाण

सर्व पॅथींनी उगाच भांडत न बसता, समन्वयाने, रुग्णाचे हीत ज्यात आहे, तेच करावे.
डॉक एकदम सही बोलरेला हय !
{अती सर्दी झाली की युनानी ची छिंकणी वापरणारा}
Chhinakani

सुबोध खरे's picture

13 May 2014 - 12:18 pm | सुबोध खरे

रच्याकने -- माझी पदवी पुणे विद्यापीठाचीच आहे लष्कराची नाही. आणि मी कोणत्याच गोळ्या देत नाही. साबुदाणा नाही कि वटी नाही. मी फक्त फोटो काढतो आणि त्यावर भाष्य करतो. मग पेशंट बरा होवो कि नाही. सानू की ?

सूड's picture

12 May 2014 - 3:36 pm | सूड

लैच !! =))))

मुक्त विहारि's picture

9 May 2014 - 11:41 pm | मुक्त विहारि

आवडला..

डॉ. भूषण काळुसकर's picture

10 May 2014 - 10:56 am | डॉ. भूषण काळुसकर

पहिल्याच लेखाला सर्वांच्या भरभरून प्रतिक्रिया पाहून माझ्या अंगावर मुठभर मांस चढले!!!

चला आणखिन मांस चढवु. ( ह घ्या)

(शतक प्रेमी) जेपी

असंका's picture

10 May 2014 - 12:03 pm | असंका

अहो हे प्रतिसाद आपल्या लेखावरचे आहेत असं दिसतंय का आपल्याला? होम्योपदीवाला मिळाल्याच्या प्रतिक्रिया आहेत हया!

आपल्या लेखातनं आपल्याला नक्की काय म्हणायचंय ते कळतच नाहिये...जे कळतंय त्यावर सुरुवातीला पाच सात प्रतिक्रीया आल्या, त्या आपल्या लेखाच्या समजा. बाकी तुमचा धागा कधीच हायजॅक झालेला आहे. हवं तर त्याला मार्गावर आणा....

हां नाव आपलंच दिसत राहिल कल्पांतापर्यंत धागाकर्ते म्हणून्....तेव्हा अभिनंदन!!

डॉ. भूषण काळुसकर's picture

10 May 2014 - 12:11 pm | डॉ. भूषण काळुसकर

त्या ५/७ प्रतिक्रियां बाबतच म्हणत होतो मी!! बाकी म्हणाल तर होमिओपॅथीला मिळालेल्या प्रतिक्रिया वाचून तर खूपच आनंद झाला

प्रकाश घाटपांडे's picture

10 May 2014 - 12:15 pm | प्रकाश घाटपांडे

http://mr.upakram.org/node/2651 होमिओपॆथी एक थोतांड
http://mr.upakram.org/node/2660 प्लासिबो
http://www.mr.upakram.org/node/820 बाराक्षार पद्धती
http://mr.upakram.org/node/2408 होमिओपॆथी वैयक्तिक अनुभव
http://misalpav.com/node/15374 साखरगोळ्या
http://misalpav.com/node/7514 डॊक्टर
http://www.maayboli.com/node/42681 होमिओपॆथी आणि पेन-किलर्स
एकूण हा विषयच वादग्रस्त आहे

संजय क्षीरसागर's picture

10 May 2014 - 8:44 pm | संजय क्षीरसागर

ते अ‍ॅलोपॅथिक प्रॅक्टीस करायला लागतील!

प्रकाश घाटपांडे's picture

11 May 2014 - 12:48 pm | प्रकाश घाटपांडे
डॉ. भूषण काळुसकर's picture

12 May 2014 - 10:48 am | डॉ. भूषण काळुसकर

आपल्या खात्यातून "अभिनंदन" डेबिट करुन आमच्या खात्यात क्रेडिट केल्याबद्दल धन्यवाद!!!!

डॉक्टर काका मग तुम्ही त्याला साबुदान्याच्या गोळ्या देऊन टाकायच्या ना!
काये कधी कधी पेशंटचं नुसती औषधं घेवुन पण समाधान होतं ..
कायतरी अवघड डिक्श्नरीत नसलेला शब्द बोलुन दाखवायचा पेशंटला ... तो पण खुश न....