चार भिंतींच्या आड
लावून कवाड
मी करतो कविता ..
विद्रोहाच्या...!
खिडकीतून पाउस बघत
आजिबात नाही भिजत
मी करतो कविता..
पावसाच्या...!
टेबल ल्यांम्पचा प्रकाश
पंखा डोक्यावर
मी करतो कविता
लोडशेडिग वर...!
अशी माझी संवेदना
मी परीट घडीत जपतो
अन् संवेदनशील कवि म्हणुन
नावारुपास येतो.....!
प्रतिक्रिया
12 Oct 2008 - 8:46 am | मदनबाण
छान कविता...
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
12 Oct 2008 - 9:00 am | श्रीकृष्ण सामंत
कविता फार सुंदर लिहिली आहे .आवडली
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
12 Oct 2008 - 9:25 am | चन्द्रशेखर गोखले
तुमच्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद!
बर्याच दिसापासुन इचारीन इचारीन म्ह्ण्तो
तुमचो गांव खयचो...?
12 Oct 2008 - 10:36 am | विसोबा खेचर
केवळ क्लास कविता..! :)
तात्या.
12 Oct 2008 - 5:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्तच! तुम्ही एकदम ये.शी.कम्युनिस्ट झालात;
बसायचं एसीत आणि गप्पा मारायच्या मजुरांना महिन्याचे तीन हजारही नाही आणि शास्त्रज्ञांना तीस हजार का असल्या!
12 Oct 2008 - 7:51 pm | वृषाली
कविता चांगली आहे.
मला वाटते की कवि चा वी दुसरा हवा.(कवी)
12 Oct 2008 - 8:03 pm | चन्द्रशेखर गोखले
धन्यवाद! शूद्धलेखनाचा माझा जरा गोंधळच असतो . अशीच मला सुधारत रहा.
12 Oct 2008 - 8:13 pm | वृषाली
धन्यवाद! शूद्धलेखनाचा माझा जरा गोंधळच असतो . अशीच मला सुधारत रहा.
»
सुधारणे न सुधारणे ते सर्वस्वी तुझ्यावर आहे. बाकी माझे नाव जरा नीट लिही बाबा.
vrush
12 Oct 2008 - 10:49 pm | चन्द्रशेखर गोखले
सॉरी.. वृषाली..वृषाली... वृषाली ..करेक्ट..?
12 Oct 2008 - 10:32 pm | बेसनलाडू
आवडली.
(आस्वादक)बेसनलाडू
12 Oct 2008 - 10:35 pm | प्राजु
कोरडे ओढणारी संवेदनशील कविता ;)
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/