येणार आज म्हणूनी, डंका पिटून गेले
ते मेघ पावसाळी चोरून अंग गेले.
चकवे दहा दिशांचे उसने हसून गेले
वेळूत रानवारे फुंकून दंभ गेले.
दिनरात वंचनेचे पेले भरून प्याले
हिरवे पडाव त्यांचे करपून खाक झाले.
कमळात सावल्यांच्या अडकून भृंग झाले
कित्येक रामदासी कुळवंत रंक झाले.
प्रतिक्रिया
11 Oct 2008 - 11:44 am | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
शेवट्चे कडवे - शेअर मार्केट्
पहिले कडवे - घेणेकरी
11 Oct 2008 - 11:54 am | चतुरंग
चतुरंग
11 Oct 2008 - 12:05 pm | चन्द्रशेखर गोखले
समर्थ रामदास! ! !
11 Oct 2008 - 12:18 pm | फटू
पहिल्या दोन ओळी तर अप्रतिम !!!
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
11 Oct 2008 - 2:12 pm | ऋषिकेश
वा! चारही शेर भावले!
सुरेख!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
11 Oct 2008 - 2:48 pm | दत्ता काळे
येणार आज म्हणूनी, डंका पिटून गेले
ते मेघ पावसाळी चोरून अंग गेले.
- हि पहिली ओळ तर फारच सुं द र
11 Oct 2008 - 3:15 pm | श्रावण मोडक
सु रे ख !!!
11 Oct 2008 - 4:37 pm | मनीषा
कविता ..
चकवे दहा दिशांचे उसने हसून गेले
वेळूत रानवारे फुंकून दंभ गेले. -----हे खासच
11 Oct 2008 - 7:25 pm | मीनल
कविता आवडली .
पहिल्या दोन ओळी तर अप्रतिम !!!
सहमत.
मीनल.
12 Oct 2008 - 3:57 am | मदनबाण
व्वा. सुरेख...
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
12 Oct 2008 - 3:58 am | मदनबाण
व्वा. सुरेख...
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
12 Oct 2008 - 8:20 am | विसोबा खेचर
येणार आज म्हणूनी, डंका पिटून गेले
ते मेघ पावसाळी चोरून अंग गेले.
ह्या ओळी तर क्लासच आहेत....!
तात्या.
12 Oct 2008 - 9:02 am | श्रीकृष्ण सामंत
कविता खूप आवडली
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com