त्याच काय झालं माहित आहे का???
एक होता अतृप्त ...लहानपणापासूनच...
नावानिशी,नावाप्रमाणे---अतृप्त
गाणं असो..खाणं असो..की गाडी मागून धावत जाणं असो
अजिब्बात थांबायचं नाही. हीच त्याची खूण!
अरे..अरे..अडवा या पोराला
त्याची आयो..मागे ओरडत यायची
पण..तो कुठला थांबतोय? तो त्याच्याच प्रवासात.......दंग!!!
बाळा...हरवशील रे एकटाच कुठेतरी
आयो ओरडायची...
पण अतृप्ता'ला मुळीच ऐकू जायचं नाही
जणू कानच नव्हते त्याला.
कधि कधि आयो..त्याचा..तोच न'सलेला कान उपटायची
मग मात्र तो काहि क्षण सावध व्हायचा..सावरायचा.
पण पुन्हा वार्याची झुळूक आली..की चालला
आयो व्हायची हताश..
मग, अंगारे..धुपारे..मठ-महाराज..देव-देवळे
सारं काहि यथास्थित चालायचं
पण..मूळस्वभावावर औषध-मात्रा..कुठनं मिळायला???
आयोला कळे ना..काय करावं नक्की???
प्रेम...माया..शिकवण,काय कमी पडलं आपल्याकडनं?
बिचारीला ठाऊकच नव्हतं...
हे सर्व त्यावरचं मलम असतं..औषध नाही!
शेवट आयोला कुणिसं म्हणालं.
अगं..ही अतृप्ती म्हणजे जखम गं बायो..
बीन-खपलीची... तिलाच बरं व्हायची इच्छा नसते!..
मग,ताकद तरी..कुठून यायला???
आयोला पटलं नाही काही..पण..कळलं मात्र नक्की
ह्याला..देवा/दैवावर वैदू/मांत्रिकावर सोडून काsssही जमायच नाही
त्याचा-तोच..सुधारेल......एक दिवस...हेच खरं!
कसं???... ते तिलाही अजून कळलेलं नाही
पण वाट पहातीये ती.... कधि उजाडेल?..
तो 'एक दिवस?' ....याची!
===========================
क्रमशः
===========================
टीपः-
अतृप्ती..या विषयावर,जी माहिती मला मिळालेली आहे.त्यातून या काव्याचा उगम झालेला आहे.
त्याचा माझ्या व्यक्तिगत जीवनाशी..संपूर्ण किंवा थेट..असा संबंध नाही.
=======
अत्रुप्त...
प्रतिक्रिया
30 Apr 2014 - 1:05 am | पाषाणभेद
येवूद्या पुढचे.
30 Apr 2014 - 1:10 am | यसवायजी
चांगलंय. आंदो.
30 Apr 2014 - 1:20 am | आयुर्हित
अतृप्तीची ओढ तृप्तीकडे नेण्याकडेच असते.
एकदाची "तृप्ती" भेटली की संघर्ष समाप्त होईल आपला!
नाही तर सध्यातरी विनोद खन्नांचा सल्ला घेवू शकता.
30 Apr 2014 - 9:11 am | अत्रुप्त आत्मा
आपल्या संपूर्ण प्रति सादास आमचा सा.न.वि.वि.
.
.
.
.
.
कळावे----लोभ असावा..ही विणंती
=============
आपला(च)..
तृप्तीकडे धावणारा---अतृप्त
30 Apr 2014 - 6:28 am | प्रचेतस
सुरेख लिहिलंय आत्मुदा.
30 Apr 2014 - 7:19 am | स्पंदना
ह्म्म्म!
सुरेख!
30 Apr 2014 - 9:29 am | मिसळलेला काव्यप्रेमी
आता पुढे?
5 May 2014 - 2:19 pm | प्यारे१
+१११ पुढे?????
30 Apr 2014 - 11:02 am | नाखु
दर्पण कहलाये या गाण्याची याद आली..
पण अत्रुप्ती ही खर्या कलाकारीची जीवन्-संजीवनी असते .
2 May 2014 - 6:06 pm | चाणक्य
पु.भा.प्र.