सोन्याचे नाणे आणि धर्मराजाचा न्याय

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
25 Apr 2014 - 9:09 pm

भल्या पाहते उगवत्या सूर्याचा सोनेरी प्रकाश अंगावर पडला कि मन कसं प्रसन्न होत. सकाळचे सोनेरी कोवळे ऊन हवे-हवे से वाटते. तसेंच सोनेरी रंगाचे सुवर्ण ही माणसाला प्रिय आहे. सुवर्णाच्या कृपेने माणसाच्या भौतिक इच्छा पूर्ण होतात. कपडे-लत्ते, टीवी, गाडी, बंगला आणि जास्त सुवर्ण असेल तर बंगल्यात राहायला पत्नी रुपात जागतिक सुंदरी ही मिळू शकते.

फार पूर्वीची गोष्ट आहे, एक अडाणी व अज्ञानी माणसाला रस्त्यावर सोन्याचे एक नाणे पडलेले दिसले.नकाही विचार न करता त्याने ते नाणे उचलले आणि आपल्या खिश्यात टाकले. थोड्या वेळाने दुसऱ्या माणसाला ही रस्त्यात सोन्याचे नाणे दिसले. त्याने आजू-बाजूला बघितले. जवळपास कोणी माणूस दिसत नाही याची खात्री केली आणि नाणे उचलून स्वत:च्या खिश्यात टाकले.

आणखीन काही वेळ गेला, एक शिक्षित आणि विचारवंत माणूस तिथे आला, त्याला ही सोन्याचे नाणे दिसले. नाणे दिसतात, त्याच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरु झाले, कुणाच्या खिश्यातून हे सोन्याचे नाणे पडले असावे? त्याने चौफेर नजर टाकली, कुणीच दिसत नाही. आतां काय करावे, नाणे उचलून खिश्यात टाकावे का? लगेच मनात दुसरा विचार आला, हे करणे बरोबर नाही, दुसऱ्याची वस्तू उचलणे म्हणजे चोरी. छे-छे दुसर्यांच्या वस्तूंकडे ढुंकून ही बघितले नाही पाहिजे. पुन्हा विचार आला, आलेल्या लक्ष्मीचा तिरस्कार करणे योग्य नाही. अश्याने लक्ष्मीचा अनादर होतो. लक्ष्मी कुपीत झाली तर दारिद्र्यात खितपत पडावे लागेल. त्याला पूर्वी ऐकलेली कथा आठवली. “एकदा शंकर- पार्वती विमानातून जात असताना, शंकराने पार्वतीस म्हंटले, तो पहा खाली पृथ्वीवर जो माणूस दिसतो आहे, तो माझा प्रिय भक्त आहे. वादळ असो वा पाऊस, थंडी असो व शरीरला भाजणार भयंकर उन्हाळा, हा न चुकता रोज सकाळी गावाच्या मंदिरात माझी पूजा अर्चना करतो आणि मंदिराच्या शंभर प्रदिक्षणा ही घालतो. याने आज पर्यंत मजपाशी स्वत: साठी काहीही मागितले नाही, म्हणूनच मला हा प्रिय आहे. पार्वतीने खाली बघितले, फाटके कपडे घातलेल्या त्या दरिद्री माणसाला पाहून पार्वती म्हणाली, देवाधिदेव, त्याने आपणास काहीच मागितले नाही, हे खरे असले तरी भक्ताची काळजी घेणे आपले कर्तव्य नाही का? विष्णू भगवान तर सतत आपल्या भक्तांचे कल्याण करण्यात मग्न राहतात. त्या वर शंकर म्हणाले, हा भाग दुष्काळी आहे, इथे सर्वच लोक दरिद्री आहे. आपले दारिद्र्य दूर करण्यासाठी हा मला सोडून परदेसी जाणार नाही आणि जो पर्यंत हा या गावात राहील ह्याचे दारिद्र्य दूर होऊ शकत नाही. तरी ही तुझ्या आग्रहास्त मी प्रयत्न करतो. भगवान शंकरांनी प्रदिक्षणेच्या मार्गात काही सोन्याचे नाणे ठेवले, दरिद्री असून ही त्या ब्राह्मणाला सोन्याच्या नाण्यांना उचलण्याचा मोह झाला नाही. असो, शंकर भगवान त्याचे दारिद्र्य दूर करू शकले नाही.” विचारवंत माणसाने निर्णय घेतला. देवाने आपल्या वर कृपा केली आहे, भगवंताचा कृपा प्रसाद समजून सोन्याचे नाणे ग्रहण करायला काहीच हरकत नाही. असा विचार करून त्याने सोन्याचे नाणे उचलून खिश्यात टाकले.

योगायोगाने तिन्ही माणसे एकाच दिवशी मरण पावली. यमदूतांनी त्यांना न्याय निवाड्यासाठी धर्मराजा समोर उभे केले. धर्मराजाने पहिल्या माणसाच्या पाप-पुण्याचा हिशोब केला आणि त्यास म्हंटले, तू एकदा सोन्याचे नाणे चोरले होते, तुला १ वर्ष नरकवासाची शिक्षा. तो म्हणाला, मी नाणे चोरले नव्हते, रस्त्यावर सापडले होते, मी ते उचलले आणि नाणे विकून काही दिवस मौज केली. त्यावर धर्मराज म्हणाले, ते नाणे, दुसऱ्याचे होते. तुझ्या मेहनतीचे नव्हते म्हणून तुला एक वर्षाचा नरकवास.

यमदूतांनी दुसऱ्या माणसाला,धर्मराजा समक्ष उभे केले, त्याला पाहताच धर्मराज म्हणाले, तुला ५ वर्षाचा नरकवासाची शिक्षा. दुसरा माणूस म्हणाला, पहिल्या माणसा सारखे मी ही नाणे उचलले होते, दोघांना सारखी शिक्षा मिळाली पाहिजे. त्याला १ वर्ष आणि मला ५ वर्ष हा तर अन्याय आहे. धर्मराज हसत म्हणाले, मूर्खा, त्याने नाणे उचलले होते आणि तू चोरले होते. नाणे उचलताना चौफेर नजर टाकून तू आधी खात्री केली कि कुणी आपल्याला पाहत तर नाही ना. अश्यारितीने कार्य करणाऱ्याला चोर म्हणतात. आता समजले तुला ५ वर्षांची शिक्षा का दिली ते.

यमदूतांनी आता विचारवंत माणसाला धर्मराजा समक्ष उभे केले, त्याला पाहताच धर्मराजाने त्याला मानवाचे संपूर्ण आयुष्य अर्थात १०० वर्षे नरकवासाची शिक्षा सुनावली आणि त्यास विचारले, तुलाही या वर काही म्हणायचे आहे का? विचारवंत म्हणाला, या दोघांप्रमाणे मी चोरी केलेली नाही. मी तर भगवंताचा कृपाप्रसाद समजून सोन्याचे नाणे ग्रहण केले. मी निर्दोष आहे. तो पुढे म्हणाला, माफी असावी, पण मला वाटते ‘एखाद्या लहरी माणसाप्रमाणे मनात येईल ती शिक्षा सुनावून तुम्ही आपल्या पदाचा दुरुपयोग करत आहात’. मी तुमची तक्रार भगवंतापाशी करेल, न्याय न मिळाल्यास उपोषणावर बसेल. त्याचे बोलणे ऐकून, धर्मराजाला क्रोध आला, ते म्हणाले, हा भारत देश नाही जिथे कुणी ही दीडशहाणा अन्याय-अन्याय ओरडत उपोषणावर बसतो, हे धर्मराजाचे न्यायालय आहे, इथे कुणावर ही अन्याय होत नाही. तू स्वत:ला शिक्षित समजतो, तुला न्याय-अन्याय, उचित-अनुचित काय आहे हे नक्कीच समजत असणार, तरी ही तू चोरी तर केलीच, पण त्याहून घोर गुन्हा म्हणजे त्या चोरीत तू भगवंताला ही गोवले. चोरीला ‘भगवंताचा कृपा प्रसाद म्हणाला’ तुला क्षमा नाही. त्या दोघांपेक्षा तुझा गुन्हा फार मोठा आहे, म्हणून तुला १०० वर्ष नरकवासाची शिक्षा.

अश्यारीतीने धर्मराजाने तिघांचाही न्याय-निवडा केला. तुम्हाला धर्मराजाने दिलेला न्याय पटतो आहे का?

बालकथाविचार

प्रतिक्रिया

अप्रतिम रूपक! सत्ताधिकारी म्हणतील तो गुन्हा, आणि सत्ताधिकारी म्हणतील ती शिक्षा.....आणि तेही अपिलाशिवाय! धरला की टाकला तुरुंगात!

अगदी भविष्यवेधी लेखन!! (आणि किती कमी शब्दात आणि तरीही नेटकेपणे मांडणी केली आहे. )

तुमचा अभिषेक's picture

28 Apr 2014 - 12:30 am | तुमचा अभिषेक

छान सुचलेय, छान लिहिलेय.

सत्ययुगात (धर्मराज्याच्या काळात) मनातल्या विचारांनी पण पाप लागत असे आणि शिक्षा दिली जात असे, कलीयुगात फक्त कृतिमधे काही वाउगे घडले तर गुन्हा थरतो हा फरक आहे म्हणे.

अजुन विचार करतो आहे. न्याय पटला नाही म्हणुन उपोषणाला बसीन म्हणतो.

thinking smiley

धर्मराजाने दिलेला न्याय पटतो
१००% सहमत.
फार छान लेख आणि न्यायनिवाडावरची माहिती व न्यायकौशल्य!
मनापासून धन्यवाद.

आयुर्हित's picture

26 Apr 2014 - 5:53 am | आयुर्हित

ही गोष्ट पानशेतच्या धरणफुटीच्या दिवशीची/वेळेची आहे.
नदीजवळ पेठेत राहणारे(पुण्यातील एका दुचाकी कंपनीतील)एक कामगार
ज्यांच्या घराची एक सामायिक भिंत कोसळली.
बाजूला एका सोन्याचे काम/विक्री करणाऱ्याचे घर असल्याने
सामायिक भिंतीत कपाटात(हंड्यात/डब्यात भरलेली)काही सोन्याची नाणी, जी आधीपासून ठेवलेली असल्याने
ती सामायिक भिंत पड्ल्याने, ह्या कामगार महाशयांच्या घरात पडली.

दोन तीन दिवसांनी पावसाचा जोर ओसरल्याने व पुराचे पाणी कमी झाल्याने
हे कामगार महाशयांनी ती सोन्याची नाणी पहिली व दडवून ठेवली,जी मुळात कामगार महाशयांच्या मालकीची नव्हती.

पण नंतर लक्षात आले जर शेजाऱ्याने आपल्या घराची झडती घेतली तर सोने सापडेल,
या विचाराने रातोरात एक हंडा/डब्बा त्यांच्या एक खास विश्वासातील मित्राकडे ठेवायला दिला
व दुसरा हंडा/डब्बा त्यांच्या एक खास विश्वासातील नातेवाईकाकडे ठेवायला दिला.

सोन्याचे काम/विक्री करणाऱ्या शेजाऱ्याने ह्या कामगार महाशयांना त्यांच्या भिंतीत ठेवलेल्या धनाबद्दल विचारले तेव्हा ह्या कामगार महाशयांनी सोने मिळाले नाही म्हणून(खोटेच)सांगितले. हा विषय येथेच मिटला.

कालांतराने थोडे दिवस/महिने गेल्यानंतर ह्या कामगार महाशयांनी त्यांच्या विश्वासू मित्राकडे व नातेवाईकाकडे,त्यांनी ठेवायला दिलेल्या सोन्याची मागणी केली तर त्यांना दोघांकडून नकार मिळाला व ते धन मिळालेच नाही.
(अर्थात ते मुळात त्यांचे नव्हतेच, त्यामुळे व्यावहारिक दृष्ट्या ना नफा झाला ना तोटा झाला)

पण पुढे काही कालांतराने दुचाकी कंपनितून हे कामगार महाशय निवृत्त झाले.
त्यांनी निवृत्तीचा सारा पैसा सोन्याचे काम/विक्री करणाऱ्या माणसाच्या मुलाजवळ व्याजाच्या आमिषाने दिला.
सोन्याचे काम/विक्री करणाऱ्या माणसाचा मुलगा हा काही पैसे शेअर्समध्ये गुंतवू लागला.
पण नेमके हर्षद मेहता साहेबांच्यावेळी घेतलेल्या शेअर्स च्या भावात एवढे नुकसान झाले की
सोन्याचे काम/विक्री करणाऱ्या माणसाच्या मुलाने(जो कदाचित शेअर ब्रोकर ही असावा)पुलावरून वाहत्या पाण्यात उडी टाकून आत्महत्या केली.

आता ज्याकडे पैसे ठेवले होते, तोच नाही तर पैसे कोणाकडून मागणार?
अशा रीतीने कामगार महाशयांचे निवृत्तीचे सारे पैसे बुडाले!

आत्मशून्य's picture

26 Apr 2014 - 5:56 am | आत्मशून्य

त्यावर धर्मराज म्हणाले, ते नाणे, दुसऱ्याचे होते. तुझ्या मेहनतीचे नव्हते म्हणून तुला एक वर्षाचा नरकवास.

त्या नाण्यावर लिहले होते का ते मेहनतीचे आहे म्हणुन ? मग ? काहीही समज मनाचे कसे करुन घ्यायचे ? यापेक्षा डोळस तर अगदी अंधश्रध्दाळु सुधा असतील.

त्याने नाणे उचलले होते आणि तू चोरले होते. नाणे उचलताना चौफेर नजर टाकून तू आधी खात्री केली कि कुणी आपल्याला पाहत तर नाही ना. अश्यारितीने कार्य करणाऱ्याला चोर म्हणतात. आता समजले तुला ५ वर्षांची शिक्षा का दिली ते.

पुन्हा तेच, नॉनसेंन्स ? चोरी चा नियमच आहे ती घडण्यासाठी कोणत्या ना कोणत्या प्रमाणात घुसेखोरी आवश्यक असते, (मग भलेही सार्वजनीक स्थळी अगदी पाकीट मारायचे असेल). फुकटची गोश्ट घेण्याबाबतच्या योग्यायोग्यतेबाबत मनाचा अपराधी भाव आणी चोरी करणे यात जमीन आसमानचा फरक आहे.

तुला न्याय-अन्याय, उचित-अनुचित काय आहे हे नक्कीच समजत असणार, तरी ही तू चोरी तर केलीच, पण त्याहून घोर गुन्हा म्हणजे त्या चोरीत तू भगवंताला ही गोवले. चोरीला ‘भगवंताचा कृपा प्रसाद म्हणाला’ तुला क्षमा नाही. त्या दोघांपेक्षा तुझा गुन्हा फार मोठा आहे, म्हणून तुला १०० वर्ष नरकवासाची शिक्षा.

आय थिंक हा परिछ्चेद विडंबंन असावे याच धाग्याच्या दुसर्‍या परिछ्चेदाचे. जर एखादी गोष्ट चोरी नाही तर त्या बद्दल शिक्षा कसली ? =)) =)) =))

पोसेस्ड बाय ओदर्स. अक्वायरींग अ थिंग दॅट इस नॉट पोसेस्ड/क्लेमड बाय एनिवन इझंट अ थेफ्ट, अण्णा.

काळा पहाड's picture

27 Apr 2014 - 1:39 am | काळा पहाड

चोरी चा नियमच आहे ती घडण्यासाठी कोणत्या ना कोणत्या प्रमाणात घुसेखोरी आवश्यक असते, (मग भलेही सार्वजनीक स्थळी अगदी पाकीट मारायचे असेल). फुकटची गोश्ट घेण्याबाबतच्या योग्यायोग्यतेबाबत मनाचा अपराधी भाव आणी चोरी करणे यात जमीन आसमानचा फरक आहे.

तुम्ही लीगल पॉईंट बद्दल बोलताय. ती ही इंडियन पिनल कोड बद्दल. मॉरली जी गोष्ट स्वतःची नाही ती घेणे ही चोरीच मानली जाते. म्हणून तर महाभारत घडलं. लीगली कौरव बरोबर होते. मॉरली चूक होते.

आत्मशून्य's picture

27 Apr 2014 - 1:40 am | आत्मशून्य

अ थेफ्ट इस अ‍ॅक्ट ओफ पोसेसिंग स्मथिंग
आत्मशून्य - Sat, 26/04/2014 - 00:31

पोसेस्ड बाय ओदर्स. अक्वायरींग अ थिंग दॅट इस नॉट पोसेस्ड/क्लेमड बाय एनिवन इझंट अ थेफ्ट, अण्णा.

हे सुधा वाचले का ?

आणी वर लिहलेले वाचले असेल. तरीही दुसर्‍याची गोष्ट घेणे आणी कोणाचीच मालकी नसलेली गोष्ट घेणे यात फरक आहेच की ?

तुम्ही ते नाणे म्हणजे कोणाचीच मालकी नसलेली गोष्ट असे मानताय. नाणं म्हणजे कुणाच्या तरी मालकीचं असलंच पाहीजे. भले त्या माणसाकडून ते पडलं असलं तरी. म्हणजे ती चोरीच झाली.

यसवायजी's picture

27 Apr 2014 - 12:09 pm | यसवायजी

नाणं म्हणजे कुणाच्या तरी मालकीचं असलंच पाहीजे.
कुणीतरी म्हटलंय- येशी उघडा जाशी उघडा. क्या लेके आए थे? क्या लेके जाओगे? ;)
काय आणलं होतं की जे तुम्ही हरवलं? आँ?
त्यामुळे मॉरली जी गोष्ट स्वतःची नाही ती घेणे ही चोरीच मानली जाते हे कसे?
(मॉरली)जे आहे ते सर्वांचेच. किंवा मग कुणाचेच काही नाही.

काळा पहाड's picture

27 Apr 2014 - 4:59 pm | काळा पहाड

त्यामुळे मॉरली जी गोष्ट स्वतःची नाही ती घेणे ही चोरीच मानली जाते हे कसे?
(मॉरली)जे आहे ते सर्वांचेच. किंवा मग कुणाचेच काही नाही.

जर मी ते नाणं मेहनतीनं कमावलं असेल तर ते माझं. नसेल तर ते माझं नाही ना? जर मला असं वाटलं की ते मला ते सापडलंय तर मी त्याच्या मालकाचा शोध घेवून त्याला ते परत केलं पाहिजे. मालक सापडला नाही तर मी ते सरकारात/ राज्याकडे जमा करायला हवं कारण मग त्याचा मालक राज्यकर्ता असेल. जर मी दोन्ही करत नसेन व ते ठेवून घेत असेन तर मी अशी गोष्ट करतोय जी कायदेशीर दृष्ट्या कदाचित बरोबर असेल (खरतर हे ही तितकसं बरोबर नाहीयः जर तुम्हाला खोदकाम करताना नाणी सापडली तर ती सरकारात जमा करावी लागतात), पण नैतिक्दृष्ट्या चूकच ना?

समजा उद्या तुम्ही रस्त्यावरुन चलले आहात. तुम्हाला एक पिशवी दिसली, ती उघडल्यावर त्यात १-१ लाखाची १० बंडले दिसली. तुम्ही ती बॅग खांद्याला लावली आणि निघाला. ही एक केस. यात तुम्ही चुकीचे वागताय हे देखील तुम्हाला माहीत नाही. (कोणि सांगितलेच नसेल कधी). हे वागणे चूक आहे, पण तुम्ही स्वतःशी आणि समाजाशी प्रामाणिक आहात.

तुम्ही ती बॅग बघितलीत, मनात चलबिचल झाली, तुम्ही आजूबाजूला पाहिले, कोणि बघत नाही असे बघून पटकन ती बॅग उचलली, ही दुसरी केस, यात तुम्ही जे करत आहात हे चुकीचे आहे हे तुम्हाला माहीत आहे, दुसर्‍या कोणी पाहिले तर तुम्हाला शिक्षा होईल, हे तुम्हाला माहीत आहे. म्हणजे तुम्ही स्वतःशी प्रामाणिक आहात, समाजाला फसवताय.

तिसर्‍या केसमध्ये तुम्ही समाजाला तर फसवत आहातच, पण स्वतःला सुद्धा फसवताय, हा अधिक मोठा गुन्हा आहे.

स्वतःचं काय हे कसं ठरवायचं हो दादा?

१. मी कुणाचे तरी एक काम करतो. त्याचा मोबदला म्हणून पैसे घेतो. समजा आज मला एक लाख रुपये एव्हढा मोबदला मिळाला. आता ही चोरी झाली का?(गृहित धरा, की हे काम करण्यासाठी कोणताही इतर खर्च अपेक्षित नाही)

२. माझ्या पुढ्च्या गल्लीत एक जण तेच काम ५० हजारात करतो. आता मी जे केले त्यात काही भाग चोरीचा झाल का?

३. आणि एक जण जाहिरात करतो, की तो तेच काम फुकट करून देइल, आता मी आणि हा वरचा (क्रमांक २) ह्यांनी चोरी केली का?

४. वरील तीनही उदाहरणांमध्ये कुणी तरी आपले ते काम करून घेतले आहे. माझ्या गिर्‍हाइकाला त्या कामासाठी १ लाख रुपये खर्च आला, दुसर्‍याला ५० हजार आणि तीसर्‍याला शून्य रुपये. मग आता दुसर्‍याच्या गिर्‍हाइकाने ५० हजाराची आणि तिसर्‍याच्या गिर्‍हाइकाने एक लाखाची चोरी केली का?

(कायदा बाजूला ठेवा. नैतिक दृष्टिने (म्हणजे morally ..) चोरी कुणी आणि कशी केली?)

देवाने देताना सगळे सगळ्यांना दिले हो. त्याला कशाला तुमच्या आमच्या व्यापात/ व्यापारात गुंतवता?

आयुर्हित's picture

27 Apr 2014 - 12:46 pm | आयुर्हित

Cost Accounting चे मी बनवलेले तीन नियम:

१)Actual cost = direct cost + indirect cost + life cycle cost - resale value

२)Cost is directly proportional to scope and inversely proportional to time frame and payment schedule.

३)Cost may vary depending on SLA as well as performance.

वरील उदाहरणात आपण फक्त direct cost बद्दल बोलत आहात.
त्यावेळी आपण आपल्या ग्राहकाला ह्या गोष्टी समजावून दिल्या पाहिजेत. त्याआधी आपण स्वत:हून समजून घेतल्या पाहिजेत.

थोडक्यात काय तर ग्राहक हाच देव हे समजून आपण त्याला काय देत आहात व त्याला मोजावी लागणारी खरी किंमत यांची सांगड घातली गेली पाहिजे व व्यवहारात पारदर्शिता असली की ग्राहकाला (जेव्हा बाहेरील स्पर्धकाच्या काही गोष्टी)कळतील तेव्हा वाईट वाटता कामा नये!

असंका's picture

27 Apr 2014 - 2:33 pm | असंका

"Cost Accounting चे मी बनवलेले तीन नियम:

१)Actual cost = direct cost + indirect cost + life cycle cost - resale value

२)Cost is directly proportional to scope and inversely proportional to time frame and payment schedule.

३)Cost may vary depending on SLA as well as performance.

वरील उदाहरणात आपण फक्त direct cost बद्दल बोलत आहात."

उत्तरः इतर खर्च नाहित असे तर गृहित आहे. वर स्पष्ट सांगितले आहे तसे. हे एक सोपे केलेले उदाहरण आहे.

"त्यावेळी आपण आपल्या ग्राहकाला ह्या गोष्टी समजावून दिल्या पाहिजेत. त्याआधी आपण स्वत:हून समजून घेतल्या पाहिजेत."

उत्तरः हे आपण का म्हणत आहात हे कळले नाही. पण अमान्य करण्यासारखे यात काहीच नाही.

"थोडक्यात काय तर ग्राहक हाच देव हे समजून आपण त्याला काय देत आहात व त्याला मोजावी लागणारी खरी किंमत यांची सांगड घातली गेली पाहिजे व व्यवहारात पारदर्शिता असली की ग्राहकाला (जेव्हा बाहेरील स्पर्धकाच्या काही गोष्टी)कळतील तेव्हा वाईट वाटता कामा नये"

उत्तरः हेही आपण का म्हणत आहात हे कळत नाहिये.

मी एक उदाहरण दिले आहे. त्यात चोरी झाली कि नाही? झाली तर कशी झाली, नाही झाली तर कशी नाही झाली, याव्यतिरिक्त इतर प्रतिसाद अवांतर आहेत.

माझ्या या साऱ्या प्रतिसादाचे प्रयोजन आहे आपला लेख आणि आपल्या लेखातील पहिले वाक्य आहे "स्वतःचं काय हे कसं ठरवायचं हो दादा"?

हे पहिले वाक्य आपण नेमके विसरलात!

गजनी च्या आमिरखान(short term memory loss होता त्याला)सारखे नका करू हो!

(नाही. आपल्या या प्रतिसादाचे प्रयोजन आहे, चीड आणणे. आणि सुरुवातीस तरी त्यात आपण यशस्वी झाले आहात. कोणतेही कारण नसताना आपण अशा संतापजनक पद्धतीचे प्रतिसाद देत आहात. पण क्षणभर असे गृहित धरतो, की माझा आपल्याबद्दल गैरसमज झाला असून आपण प्रामाणिकपणे जे प्रतिसाद देत आहात, ते समजून घेण्यात मी कमी पडत आहे. )

तुमचे काय प्रयोजन आहे ते कळाले. त्याप्रमाणे आपली कृतीही झाली असेही पुढे आपले मत असावे, नाहीतर माझ्यावर विसरण्याचा आरोप आपण केला नसतात. पण मला ना आपल्या मूळ प्रतिसादात, ना या प्रस्तूत प्रतिसादात, आपली कृती दिसली. खर्चांचा हिशेब, ग्राहकाशी संबंध, त्याची शिकवणूक, त्याचे अज्ञान, त्याला देव समजणे, व्यवहारात पारदर्शीपणा आणणे, आणि ग्राहकाबद्दलची संवेदनशीलता यातून मालकी हक्क (पक्षी : स्वतःचं काय हे) कसा प्रस्थापित होणार?

आपला वरील प्रतिसाद अवांतर होता असे मी म्हणाल्यावर जर आपले मत असेल की तसे नाही, तर तुम्ही कमीत कमी तेव्ह्ढे तरी स्पष्ट म्हणायला हवे होते. ते न म्हणता, आपण आपले प्रयोजन काय होते हे सांगता.

माझा प्रश्न सरळ आहे. चोरी कुणी केली आणि कशी. ह्यावर बोला. किंवा म्हणा चोरी झालीच नाही.

पण आपली शब्दयोजना बरीच विस्कळीत आहे, आयुर्हीत म्हणतात त्यानुशंगाने त्याचा सांगोपांग ठाव घेणे सुधा अपेक्षित आहे. थोडे रिफ्रेज कराल काय ?

आयुर्हित's picture

27 Apr 2014 - 11:47 pm | आयुर्हित

व्यवहारात पारदर्शिता आहे, ग्राहकाला सद्य परिस्थितीची आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यांचे दर याची कल्पना आहे, हे समजून त्याने आपल्याकडून ठरल्याप्रमाणे काम करून घेतले असेल तर ती चोरी ठरणार नाही.

पण त्याला जर आज (किंवा काही वर्षांनी का असेना)असे वाटले की आपण फसलो गेलो (कारण आपण दिलेली चुकीची माहिती किंवा काम पूर्ण न होणे किंवा कामात त्रुटी आढळणे), तर ती नक्कीच चोरी ठरेल!

असंका's picture

28 Apr 2014 - 12:55 am | असंका

नाही साहेब.

आपण ४ अटी घातल्या- १. पारदर्शीता. २. सद्य परीस्थितीची पूर्ण कल्पना ३. प्रतिस्पर्ध्यांच्या दराबद्द्ल पूर्ण कल्पना ४. ठरल्याप्रमाणे काम होणे. यातील १ आणि ४ उघडपणे साध्य आहेत. २ आणि ३ पूर्ण होणे अशक्य आहे. त्यामुळे बाजारात अनिश्चितता येते. ती राहते. बाजूला करू शकत नाही.

त्यामुळे आपल्या कल्पनेप्रमाणे गेल्यास स्वतःच्या कृतीपेक्षा इतरांच्या कृतीवरून ( फसवले गेल्याची ग्राहकाची भावना) त्याने चोरी केली की नाही हे ठरवले जात आहे. हे कसे योग्य आहे?

शिवाय हा फक्त निम्माच भाग झाला. ज्याला सेवा मिळाली, त्याबद्द्ल कसे? मूळ लेख कुणाला तरी काही तरी मिळाले त्याबद्द्ल आहे. त्या अनुषंगाने माझा प्रतिसाद आहे. सेवा देणार्‍यापेक्षा सेवा घेणार्‍याची भूमिका येथे लागू केली पाहिजे. आता ज्याला सेवा फुकट मिळाली, त्याला जर माहित असेल की ह्या सेवेसाठी काही लोक खर्च करत आहेत, तरीही त्याने ती फुकटात मिळते आहे म्हणून स्विकारली. मग तो चोर आहे की नाही?

आयुर्हित's picture

28 Apr 2014 - 9:15 am | आयुर्हित

जो फुकट घेतो तो चोर नाही, भिकारी आहे.
पण कोणीही असे समजू नये, की एखादी गोष्ट त्याने फुकट मिळवली आहे. तो कोणत्या ना कोणत्या रुपात त्याची किंमत चुकवावी लागणारच आहे. There is no free lunch in the world.
उदाहरण: पुण्यातील सत्य घटना पहा. सोन्याचे नाणे असलेले हंडा/डब्बा फुकट मिळाला होता, पण त्याचा मोबदला त्याला निवृत्तीनंतर आलेले पैसे घालवून चुकता करावा लागला.

एका उद्योजकाने (भले ग्राहक गेला उडत तरी चालेल पण)कोणतीही गोष्ट फुकट देवू नये, ह्या मताचा मी आहे.
एक म्हण आहे: घोडा घास से दोस्ती करेगा तो खायेगा क्या?

कोणीही दान देणाऱ्या माणसानेही कोणाही धडधाकट माणसाला काहीही फुकट दान करू नये.

अवांतर: आजकाल लोकांना फुकट पाणी/वीज/दारू/तांदूळ/laptop घ्यायची सवय लागली आहे. एक तर त्याची किंमत ते ठेवत/करत नाहीत आणि भरपूर संसाधने वाया घालवतात आणि ह्या बदल्यात हीच लोक लाखो रुपये कमवायची संधी/साधने गमावून बसतात!

काळा पहाड's picture

27 Apr 2014 - 5:07 pm | काळा पहाड

जर कामाचा खरा मोबदला १ लाख रुपये असेल तर मी चोरी करत नाहीय. जर खरा मोबदला ५० हजार असेल तर मी करतोय. (म्हणून तर सर्व बिल्डर चोर आहेत असं म्हणतात ते खरंच आहे). आता जर एखादा म्हणत असेल की तो काम फुकट करून देइल, तर तो असं का म्हणतोय हे पहायला नको का? बरेच लोक समाजसेवा म्हणून असं काम करतात. यात कोणी दोषी असेल का? असू ही शकेल. समाजाला (किंवा त्यातल्या एखाद्या घटकाला फुकट घेण्याची सवय लावणे ही नैतिक् दृष्ट्या चुकीची गोष्ट असूही शकेल). म्हणजे खरं तर फुकट काम करणारा दोषी असेल. जर मी हे काम माझं कर्तव्य म्हणून करत असेन (उदाहरणार्थ भूकंपात मदत) तर यात कोणीच दोषी नसेल.

आपल्या ह्या प्रतिसादातून अनेक उप प्रश्न निर्माण होतात साहेब.- विषय कमीत कमी भरकटेल असे खालील प्रश्न विचारतो.

१. माझ्या कामाचा खरा मोबदला कुणी ठरवायचा?

२. तसा तर खरा मोबदला माहित नाही, पण दुसरे कोणी तरी हे काम स्वस्तात करून देत आहे, तर तो खरा मोबदला का? म्हणजे, मी चोर आहे की नाही हे दुसर्‍याच्या कृतीवरून ठरवावे लागत आहे. हे योग्य आहे का?

३.साहेब हे सोपे केलेले उदाहरण आहे. जेवढी माहिती आहे, त्यावरूनच निष्कर्ष काढायचे आहेत. फुकट काम करून देणारा का तसे देत आहे हे सोडा. तो देत आहे हे खरे. आणि समाजसेवा वगैरे काही नाही. त्याला बरे वाटते म्हणून तो करतो. असं समजा की समाजाला त्याच्या कामाचा त्रासच जास्त होतो. ( -अशी कामं असतात, उदा. वाद्न करणे वगैरे).

माझा मुद्दा असा आहे साहेब, की देवाचा काही संबंध नाही इथे. हे माणसांचे जग आहे, आणि माणसांच्या परस्परसंबंधांवर इथले व्यवहार होतात. त्यात देवाला ओढणे अयोग्य आहे. नीति अनीतीच्या कल्पनादेखिल व्यक्तिसापेक्ष आहेत. दामाजीपंतांची गोष्ट आठवा. आता प्रत्येक जण दामाजीपंत होउ पाहिल तर चालेल का?

काळा पहाड's picture

28 Apr 2014 - 1:14 am | काळा पहाड

तुमच्या शेवटच्या पॅरेग्राफ बद्दल उत्तर सुरवातीस देतो. हे माणसांचे जग आहे हे मला मान्य आहे. पण आपण एका स्वर्गीय न्यायाबद्दल चर्चा करत आहोत. आणि तो न्याय बरोबर आहे की चुकीचा हे आपण ठरवायचा प्रयत्न करतो आहोत. ज्या वातावरणात केस चालते, त्या वातावरणावरूनच निवाडा होईल ना? माणसांच्या जगाचे नियम तिथे कसे लागू पडतील? यात देवाचा संबंधच नाही. एखाद्याची कृती धर्माप्रमाणे होती का नव्हती हे ठरवताना दैवी शक्ती "सापेक्षता" का वापरतील? आपल्या व्यवहारात आपण देवू का एखादे नाणे राज्यसरकारला परत? पण जसा प्रश्न एका विशिष्ट मर्यादित सीमेत विचारला गेलाय, तर त्याचे उत्तरही नको का त्याच मर्यादेत द्यायला?

आता तुमच्या पहिल्या दोन प्रश्नांबद्दल. येथे तुमच्या "नीति अनीतीच्या कल्पनादेखिल व्यक्तिसापेक्ष आहेत" या वाक्याचा उपयोग होईल. मी पाप करतोय की नाही हे सापेक्ष आहे. आणि हे ठरवणं तसं फार सोपं आहे. मला माहिती आहे की या कामाला ५० हजारच लागणार आहेत (मोबदला धरून). म्हणजे माझ्या आत्म्याला माहिती आहे की मी जर १ लाख मागितले तर मी माझ्या कामाशिवाय मी जास्त मागतोय. तुम्हाला या गोष्टीबद्द्ल कुणालाही स्पष्टीकरण करण्याची गरजच नाहिये. हा तुमचा तुमच्याबरोबरच संवाद आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चोर आहात. तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही नाही आहात. या जगात तरी तुम्ही गुन्हेगार नाही आहात. दुसरा स्वस्तात काम करून देत आहे की नाही हा त्याचा प्रश्न आहे. त्याच्या पापाचा हिशेब त्याचा आत्मा ठरवेल. हां, तुम्ही जर स्वस्तात काम करून देताय तर त्याचे परिणाम (repercussions) असतील. म्हणजे तुमचे स्वस्तात काम करून देणे एखाद्याच्या हिताचे असेलच असे नाही. त्यामुळे ते करताना तुम्ही त्याचे वाईट परिणाम ध्यानात घेवून ते केलं असेल (उदा: एखाद्या प्रतिस्पर्ध्याला स्पर्धेतून बाहेर करणे) तर तुम्हाला ते न्यायाच्या कुठल्या बाजूला आहे हे माहीत असेलच. शेवटी हे सगळं तुमच्या पुरतंच असतं. कदाचित तुमच्या आत्म्यावर त्याचे ओरखडे पडत ही असतील. म्हणून बुद्धीवादाप्रमाणे तुम्ही व्यवहारी असालही, पण नैतिक दृष्ट्या असालच असे नाही.
बाकी माझा एक मित्र या सर्व बाबतीत काही वर्षांपूर्वी काय म्हणाला होता हे थोडक्यात सांगतो. तो म्हणाला, एखाद्याने एखाद्याचा खून केला तर ते पाप असेलच असं नाही. कदाचित तो एखाद्या वैश्विक न्यायाचा परिपाक असेल. आणि या कृत्याचा जाब कदाचित पुढच्या जन्मात खुन्याला द्यावाही लागेल. तशाच प्रकारे खून केला जावून.

आपल्या दीर्घ आणि मुद्देसूद प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद. आपल्या बहुतेक प्रतिसादाशी मी सहमत आहे. फक्त मी खालील पुस्ती जोडू इच्छितो-

आपण एका स्वर्गीय न्यायाबद्दल बोलत आहोत. प्रश्न एका विशिष्ट मर्यादेत विचारला गेला आहे.

ही मर्यादा कशी आहे पहा: तीन माणसांची समान कृती घडते. बहुतेक पृथ्वीवर. हे असे होणे अगदी सहज शक्य आहे. तिसर्‍या माणसाने जे केले ते पहिल्या दोघांपेक्षा काही वेगळे नाही. फक्त त्याने थोडी पौराणिक पार्श्वभूमी वापरून, ते नाणे त्याने उचलावे अशी देवाचीच इच्छा असल्याचा समज करून घेतला होता. मग त्यांचा निवाडा केला जातो. तोही पौराणिक पात्रांकडून. तिथे मात्र, मुळात पौराणिक पात्रे असणार्‍या या कथेत आधी सांगितलेल्या पौराणिक कथेला अगदी सपशेल खोटे पाडले आहे. ती गोष्ट खोटी पाडायला काय आधार दिला आहे? काहीच नाही. एक तर पूर्ण गोष्ट (निवाड्यापर्यंत) खोटी म्हणा. किंवा तिसर्‍या माणसाचे वर्तन नैतिक असल्याचे मान्य करा. त्या विचारी माणसाला आठवलेली कथा खोटी आणि लेखक सांगतो ती गोष्ट खरी, हे कसे?

खरं तर लेखक आपले म्हणणे देवांच्या तोंडून वदवून घेत आहेत. कारण "धर्मराज निवाडा करतो" असं म्हणाल्यावर जे वजन प्राप्त होते, त्यासाठी ही कथा रचली आहे. निवाड्याच्या वेळी त्या विचारी माणसावर भगवंताला आपल्या व्यापात गुंतवण्याचा अरोप करून त्याच्या कृत्याचा आधारच काढून घेतला आहे. धर्मराजाला या कथेतून काढलं ना, तर या एकूण कथेलाही तेच स्वरूप प्राप्त होइल. या कथेला आधारच रहाणार नाही. तिसर्‍या विचारवंत माणसाने जसे भगवंताला आपल्या कामात गोवले ना, तसेच लेखकानेही आपल्या कामात धर्मराजाला गोवले आहे.

ही या गोष्टीची मर्यादा आहे. गोष्ट म्हणून चांगली आहे. पण ही प्रचारकी कथा आहे.

पोटे's picture

29 Apr 2014 - 12:16 pm | पोटे

तिसर्‍या विचारवंत माणसाने जसे भगवंताला आपल्या कामात गोवले ना, तसेच लेखकानेही आपल्या कामात धर्मराजाला गोवले आहे.

अख्खा हिंदु धर्म, त्यातल्या कथा, या अशाच आहेत. लबाड लोकांनी भोळ्या लोकांची दिशाभूल होण्यासाठी लिहिलेल्या या गोष्टी आहेत.

:)

आयुर्हित's picture

30 Apr 2014 - 3:23 am | आयुर्हित

पूर्वग्रह चुकीचे असतील तर आपल्याला हेच वाटेल.
पण हेच जर जरा मन लावून अभ्यास केला,शास्त्रीय/वेगळा दृष्टीकोन ठेवून जर या साऱ्या कथा वाचल्यात तर आपल्याला खूप मोठ्ठा खजिनाच सापडेल.

इतरांना लबाड म्हणण्याआधी आपण कुठल्या कथा अभ्यासपूर्ण वाचल्यात हे जरा स्पष्ट केलेत तर बरे होईल.
स्वत:ला भोळे समजत असाल, तर इतरांना लबाड बोलायची गरज नसती पडली.

या वरील कथेतील धर्मराज म्हणजे कोण हे तरी सांगता येईल का?

आनन्दा's picture

28 Apr 2014 - 11:35 am | आनन्दा

माझे २ पैसे.
एखाद्याला दिलेल्या सेवेसाठी वाजवीपेक्षा जास्त दर आकारणे ही देखील एक प्रकारे चोरीच ठरते. बाकी वाजवी दर कसा ठरवायचा ते सांगणे कठीन आहे, पण प्रत्येकाला कल्पना असते की आपण जो दर आकारत आहोत तो वजवी आहे की नाही ते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Apr 2014 - 7:37 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

पावसानी झोडलं आणि राजानी नाडलं तर तक्रार कोणाकडे करणार?

पण काही जण मात्र २०१४ मधे पोचायला विषेश वेळ घेतलाय या एकमेव कारणाने मिपाची दिशाभुल करायचा हक्क प्राप्त झालाय या आवेषात लेखन करत आहेत त्याची मज्या वाटते.

यमदूतांनी आता विचारवंत माणसाला धर्मराजा समक्ष उभे केले, त्याला पाहताच धर्मराजाने त्याला मानवाचे संपूर्ण आयुष्य अर्थात १०० वर्षे नरकवासाची शिक्षा सुनावली आणि त्यास विचारले, तुलाही या वर काही म्हणायचे आहे का? विचारवंत म्हणाला, या दोघांप्रमाणे मी चोरी केलेली नाही. मी तर भगवंताचा कृपाप्रसाद समजून सोन्याचे नाणे ग्रहण केले. मी निर्दोष आहे. तो पुढे म्हणाला, माफी असावी, पण मला वाटते ‘एखाद्या लहरी माणसाप्रमाणे मनात येईल ती शिक्षा सुनावून तुम्ही आपल्या पदाचा दुरुपयोग करत आहात’. मी तुमची तक्रार भगवंतापाशी करेल, न्याय न मिळाल्यास उपोषणावर बसेल. त्याचे बोलणे ऐकून, धर्मराजाला क्रोध आला, ते म्हणाले, हा भारत देश नाही जिथे कुणी ही दीडशहाणा अन्याय-अन्याय ओरडत उपोषणावर बसतो, हे धर्मराजाचे न्यायालय आहे, इथे कुणावर ही अन्याय होत नाही. तू स्वत:ला शिक्षित समजतो, तुला न्याय-अन्याय, उचित-अनुचित काय आहे हे नक्कीच समजत असणार, तरी ही तू चोरी तर केलीच, पण त्याहून घोर गुन्हा म्हणजे त्या चोरीत तू भगवंताला ही गोवले. चोरीला ‘भगवंताचा कृपा प्रसाद म्हणाला’ तुला क्षमा नाही. त्या दोघांपेक्षा तुझा गुन्हा फार मोठा आहे, म्हणून तुला १०० वर्ष नरकवासाची शिक्षा.

स्वैर अनुवाद -
The Election Commission brought the Aam Aadami Party to face the electorate. People of India decided not to vote them to power for at least 100 years from now. AAP sought explanation for this. It exhorted that it is not a fraud party like BJP and Congress. It said we have just received donations (source of which is highly suspicious!!!). We do not plead guilty. We think people have voted randomly. We will complain, fast. Fasting is our style. Indian electorate replied we are wise and not unjust. (Sarcastically - This is not India.) You think you are the more educated than Modi and Rahul. You think that only you are correct whatever media may say. You surely understand what is right and what is wrong. Not only that you have acted on behalf of vested interests, you have also tried to fool voters by projecting yourself as the cleanest clan. Hence the punishment!

आनन्दा's picture

28 Apr 2014 - 12:03 pm | आनन्दा

हा हा हा

विवेककाका नेहमी महाभारत, धर्मकारण, शास्त्रे इ इ विषय लिहित आहेत असे वाटते. पण त्यांना मुळात त्याच्याशी काही देणे घेणे नसते. ते सद्य राजकीय स्थिती असली रुपके देऊन सांगतात. त्यांच्या मागच्या पोस्ट्स पाहिल्या तरी हेच जाणवेल.

आत्मशून्य's picture

29 Apr 2014 - 7:04 am | आत्मशून्य

एक मात्र खरे अड्चणित आन्नार्या प्र्तिसादान्बाब्त ते सरांचा आदर्श पाळ्तात.

पोटे's picture

28 Apr 2014 - 1:38 pm | पोटे

धर्मराजाला हिंदु धर्माचे ज्ञान नव्हते हेच सिद्ध होते.

शंकराचार्य आणि मंडनमिश्राच्या धाग्यात दिले होते.... आचार्य म्हणतात - सर्व देवाच्या इच्छेने होते. मिश्रा म्हणाले .... कर्माचे फळ म्हणून ती घटना होते.

शंकराचार्य जिंकले याचा अर्थ सर्व काही परमेशवरी इच्छा म्हनून होते. , कर्माचा संबंध नाही.

म्हणजे नाणे पडण्यापासून ते उचलण्यापर्यंत सर्व भगवंती इच्छेनेच झाले. मग कर्मानुसार शिक्षा का व्हावी?