टग्यामहाराज बारामतीकर

मंदार दिलीप जोशी's picture
मंदार दिलीप जोशी in जे न देखे रवी...
23 Apr 2014 - 11:15 am

धरणात पाण्याचे
अंमळ दुर्भिक्ष्य
नष्ट करु पाहतो
मुतोनिया

विरोध करती
नतद्रष्ट काही
पण टग्यामहाराजांची
दृष्ट काढा

पिऊन 'सोडला'
अवघा समुद्र
ठेविली का नावे
अगस्त्याला?

वाहते करी पाणी
बुच तोच मारी
शिव्या ओव्या मानी
तो सारख्या

अगस्त्याचा अवतार
टग्या बारामतीकर
त्याला वंदावे
पुन्हा पुन्हा

काहीच्या काही कविताहास्यकविता

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

23 Apr 2014 - 12:23 pm | श्रीगुरुजी

मस्त!

ही पंक्ती नीट जमली नाही असे वाटते.

"पण टग्यामहाराजांची
दृष्ट काढा"

मंदार दिलीप जोशी's picture

23 Apr 2014 - 1:04 pm | मंदार दिलीप जोशी

ह्म्म्म मान्य. सुधारणा करतो सुचले की.

सौंदाळा's picture

23 Apr 2014 - 1:34 pm | सौंदाळा

मस्त
अजुन चिमटे काढायला पहिजे होते.
भारनियमन आणि लोक्संख्यावाढीवरुन, परवाच्या मासाळ्वाडीतल्या धमकीवरुन, सिंचन घोटाळ्यावरुन वगैरे.
असो.. महाकाव्यच होऊन जायचे एखादे ;)

असो.. महाकाव्यच होऊन जायचे एखादे Wink

हाहाहा =))

मंदार दिलीप जोशी's picture

24 Apr 2014 - 10:05 am | मंदार दिलीप जोशी

परवाच्या मासाळ्वाडीतल्या धमकीवरुन>>

म्हणून्च लिहीलं ना, "बूच तोच मारी" म्हणजे पाणी अडवतो ;)

ऋषिकेश's picture

23 Apr 2014 - 1:46 pm | ऋषिकेश

खिक्!

प्रत्येक ओळीत सहा शब्द नी शेवटच्या ओळीत चार शब्द असे बंधन पाळून पुन्हा एक हात फिरवा. मग कवितेत अधिक मजा येईल

सॉरी सहा सहा सहा चार अक्षरे! शब्द नव्हे!

मंदार दिलीप जोशी's picture

23 Apr 2014 - 2:40 pm | मंदार दिलीप जोशी

येस सर! प्रयत्न करतो

मंदार दिलीप जोशी's picture

23 Apr 2014 - 3:17 pm | मंदार दिलीप जोशी

धरणात पाण्याचे
अंमळ दुर्भिक्ष्य
अंत करु पाही
मुतोनिया

विरोध करती
नतद्रष्ट काही
टग्या महाराजां
दृष्ट लागे

पिऊन 'सोडला'
अवघा समुद्र
ठेविली का नावे
अगस्त्याला?

वाहतसे पाणी
बुच तोच मारी
शिव्या ओव्या मानी
तो सारख्या

अगस्त्य अवतार
बारामतीचा टग्या
वंदावेच त्याला
पुन्हा पुन्हा

गणपा's picture

25 Apr 2014 - 2:10 pm | गणपा

हे आवाडलं.

मृगनयनी's picture

25 Apr 2014 - 3:09 pm | मृगनयनी

बुच तोच मारी

=)) .. =)) .. =)) .. =)) .. =)) .. =)) .. =)) .. =)) ..

हा शब्दप्रयोग आवडला!!!.. स्व. सतीश तारे'जींची आठवण आली.... :) बूचमारीच्या... त्तुच्च बूचमारीच्या.... मारीच्या तूच बूच!!!! ...

जोशी 'ले''s picture

23 Apr 2014 - 1:49 pm | जोशी 'ले'

हाहाहा मस्तच

अत्रुप्त आत्मा's picture

23 Apr 2014 - 2:57 pm | अत्रुप्त आत्मा

=))

आयुर्हित's picture

23 Apr 2014 - 3:47 pm | आयुर्हित

टग्या मुते जेव्हा
टग्या मुते तेव्हा
पाण्याची गणना कोण करी!

टग्या बोले जेव्हा
टग्या बोले तेव्हा
तयाच्या नादी कोण लागी!

टग्या देई धमकी
टग्या देई दमडी
तयाला मत कोण देई!

टग्या जाळी अँटीचेम्बर
टग्या जाळी मंत्रालय
सिंचनाची फाईल राख होई!

ऋतु हिरवा's picture

23 Apr 2014 - 4:51 pm | ऋतु हिरवा

मस्तच

जिन्क्स's picture

23 Apr 2014 - 5:28 pm | जिन्क्स

कविता चांगली आहे. त्या पाठीमागच्या कवी च्या भावना हि पोचल्या. पण एवढा उपहास करायच्या आधी कवींनी बारामती व परिसरा मध्ये ह्या 'टग्या' नि केलेली विकास कामे जाऊन पाहावीत. उगाच घरात बसून मिडिया नि उहापोह केलेल्या बातम्या ऐकून, खोट्या उन्मादा खाली अशा कविता प्रसवणे फार अवघड काम नाही. गुजरात दंगली मध्ये हजारो लोकांच्या मृत्यूस कारणीभुत असलेला मोदी तुम्हाला पंतप्रधान म्हणून चालतो पण एका प्रचारी भाषणात चुकून एक शब्द निसटला तर त्याच किती गवगवा. दादांनी नि चूक कबूल पण केली आहे. मोदींची sorry यायची अजून लोक वाट बघत आहेत.

टवाळ कार्टा's picture

23 Apr 2014 - 5:39 pm | टवाळ कार्टा

एका प्रचारी भाषणात चुकून एक शब्द निसटला

????

आयुर्हित's picture

23 Apr 2014 - 5:48 pm | आयुर्हित

मोदींची sorry ????
कशाबाबत sorry ????
जी चुक त्यांनी केलीच नाही त्याबद्दल का म्हणावी sorry ????

गुजरात दंगली मध्ये हजारो लोकांच्या मृत्यूस कारणीभुत असलेला कोण आहे ?
आपणच असाल तेथे. मोदीतर नक्कीच नाही!

आपल्या मित्र पक्षांचे सरकार इतके वर्षे सत्तेवर असूनही त्यांच्यावर आरोप सिद्ध करू शकलेले नाहीत.
सर्वोच्च न्यायालय व SIT ने देखील त्यांना Clean chit दिली आहे हे आपण हेतू पुरस्सर विसरत आहात?

यावरून सर्वोच्च न्यायालय व SITवर आपला विश्वास नाही असेच म्हणायचे का?
की आपल्याकडे काही पुरावा आहे याचा?
असला तर तो आपन सर्वोच्च न्यायालय व SIT ला का सादर करत नाही?

ह्या निर्बुद्ध "सकाळ" चं काय करायचं????हा लेख आपलाच आहे ना?

त्यातले सत्य आपणच लिहिले आहे ना?

का फक्त सकाळची जाहीरात करायला लिहिला होता?

काळा पहाड's picture

24 Apr 2014 - 1:00 am | काळा पहाड

पण एवढा उपहास करायच्या आधी कवींनी बारामती व परिसरा मध्ये ह्या 'टग्या' नि केलेली विकास कामे जाऊन पाहावीत.

आम्ही "व परिसरा" मध्ये रहातो. विकासकामांबद्दल तुमचा अर्थ भकासकामे असा होत असेल तर अशी भकास्कामे बरीच झालेली आहेत.

मंदार दिलीप जोशी's picture

24 Apr 2014 - 10:08 am | मंदार दिलीप जोशी

बारामती अशीही.. ३७ वर्षांपासून आश्वासने, पण २२ गावे पाण्याविनाच!

बारामती म्हणजे बागायती. हे अर्धसत्य असून, याच तालुक्यातील निम्म्याहून अधिक गावांना भरवशाचे पाणीसुद्धा नाही. इतकेच नव्हे, तर शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा, १९७८ साली तिथल्या दुष्काळी २२ गावांना पाण्याचे आश्वासन मिळाले, पण लोक याच आश्वासनावर झुलत राहिले अन् गावे मात्र कोरडीच! ही गावे तहानलेली राहण्यामागे भौगोलिक कारणांबरोबरच राजकीय कारणेसुद्धा आहेत.. कारण ही गावे अगदी अलीकडेपर्यंत बारामती विभानसभा मतदारसंघात समाविष्ट नव्हती.
निवडणुकीच्या तोंडावर बारामती तालुक्यात पाण्याचा मुद्दा उपस्थित झाला. मतदानाच्या आदल्या दिवशी मासाळवाडी गावातील बैठकीत एका तरुणाने उपमुख्यमंत्र्यांना पाण्यावरून प्रश्न विचारला. उपमुख्यमंत्र्यांची जीभ घसरली अन् प्रश्न विचारणाऱ्या तरुणावर दबावापोटी 'असे काही घडलेच नाही' असा लेखी खुलासा करण्याची वेळ आली. हे नेमके कसे घडले याची चर्चा परिसरातील गावांमध्ये दबक्या आवाजात सुरूच आहे; त्याचबरोबर पाण्याची प्रतीक्षासुद्धा!
या गावांमध्ये फिरताना बारामतीचे दुसरे चित्र दिसले, अगदी अंगावर आले. बागायती बारामती आणि ही कोरडी बारामती यांतील फरक स्पष्ट दिसतो- उत्पन्न, शिक्षण आणि सामाजिक स्थिती या सर्वच बाबतीत! तो लोकांनाही जाणवू लागला आहे. इतके दिवस आशेवर असलेले लोक आता बोलू लागले आहे, अर्थातच नाव उघड न करण्याच्या अटीवर. 'निम्मी बारामती अशीच आहे बघा.' लोक भरभरून सांगतात. बारामतीत शंभराच्या आसपास गावे. त्यापैकी खुद्द बारामती, माळेगाव, सोमेश्वर, निंबूत परिसरातील अशी सुमारे निम्मी गावे ब्रिटिश काळापासून बागायती आहेत. उरलेली कऱ्हा नदीच्या खोऱ्यातील गावे जिरायती. त्यातही दोन प्रकार पडतात- काही गावांना काही महिन्यांसाठी कसेबसे पाणी मिळते. उरलेली २२ गावे पूर्णपणे पाण्याविना आहेत. शेतीसाठी पावसावर आणि विहिरीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. पिण्याच्या पाण्यासाठी आजही टँकरचीच वाट पाहावी लागते.. मोरगाव, मुर्टी, कऱ्हा वागज, लोणी भापकर, जळगाव या पट्टय़ातील ही गावे.
''पवार साहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, तेव्हा गावात सभा झाली होती. तेव्हा आम्हाला गुंजवणी धरणाचं पाणी देणार, असं बोलले होते. त्याला आता ३५ र्वष उलटून गेली, पण पाणी आलंच नाही..'' मुर्टी गावात चहाच्या टपरीवर जमलेले लोक सांगतात. रस्त्याच्या कडेला जागोजागी टँकरच्या पाण्यासाठी उभे केलेले ड्रम, कॅन परिस्थितीचे वर्णन करतात. इथं पाणी न येण्याची भौगेलिक कारणे आहेतच. एक तर कमी पावसाचा प्रदेश. त्यात हा उंचावरचा पठारी भाग. पण यामागे राजकीय कारणेसुद्धा असल्याचेही ऐकायला मिळाले. ''ही गावे पूर्वी विधानसभेच्या दौंड मतदारसंघाला जोडली होती. त्यामुळे ती कशीही राहिली, तरी बारामतीच्या राजकारणावर थेट परिणाम व्हायचा नाही. लोकसभेलाही त्यांचे उपद्रवमूल्य नव्हतेच. मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यामुळे गेल्या निवडणुकीत ती पहिल्यांदा बारामती विधानसभा मतदारसंघात आली. म्हणून आमच्याकडं लक्ष गेलं.'' लोक स्पष्टपणे सांगतात. काही जण संतापही व्यक्त करतात. ''इथं पाणी आलं तर लोक जमिनी कशा विकतील? मग यांचे कारखाने कसे उभे राहतील?'' गंभीर आरोपही करतात. याशिवाय इतरही कारणं बोलून दाखवतात. याच पट्टय़ात मोरगाव परिसरात एक जण भेटले. ''लोकांमध्ये समृद्धी आली तर ते जुमानत नाही, स्पर्धक तयार होतात. त्यामुळे आमचा भाग असा ठेवलाय..'' इथे असे बरेच काही ऐकायला मिळते.
हा भाग कोरडा राहिल्यामुळे शैक्षणिक, सामाजिकदृष्टय़ासुद्धा मागास राहिला आहे. शिकायची कितीही इच्छा असली, तरी उच्चशिक्षणासाठी पैसे लागतात. इथंच गाडं अडतं. ना शिक्षण, ना नोकऱ्या. ''बाकी कशाला? आमच्या भागात कोणी मुली द्यायला तयार होत नाही. रोज पाण्याची ओरड, रखरखीत भाग. कसं कोण मुली देईल?'' जळगावचे एक शेतकरी सवाल करतात.. मग हा बारामती तालुक्याचाच भाग आहे का, असा प्रश्न पडतो.

यशोधरा's picture

7 May 2014 - 1:10 pm | यशोधरा

कठीण आहे..

नानासाहेब नेफळे's picture

23 Apr 2014 - 6:05 pm | नानासाहेब नेफळे

अतिटुकार !!!
असो , जोशी बर्याच दिवसांनी दिसलात.. प्रचार, मतदान केले कि नाही?

श्रीगुरुजी's picture

23 Apr 2014 - 7:58 pm | श्रीगुरुजी

माईसाहेब,

ही काय भानगड आहे? कधी तुम्ही पुरूष आयडीने वावरता तर कधी महिलेच्या आयडीने. :))

आम्हाला संशय यायला लागलाय. :yahoo:

मंदार दिलीप जोशी's picture

24 Apr 2014 - 10:12 am | मंदार दिलीप जोशी

आधी त्यांचा संशय फिटूदे ;)
मग तुमच्या-आमच्या संशयाचे पाहू :D

बारामतीकर दिल्लीला गेल्यावर एक वर्षाने मटात व्यंगचित्र आलेले .एक पाय राज्याच्या वजनकाट्यावर ,काटा शंभर किलोवर .दुसरा पाय दिल्लीच्या वजनकाट्यावर तिथलाही काटा शंभर दाखवतोय !आताही चित्र वेगळे नाही .

स्पंदना's picture

24 Apr 2014 - 5:00 am | स्पंदना

भारी कविता!
आयुर्हितांची पण मस्तच.
अगदीच ताळ सोडलाय टग्याने हे मात्र खरं. फार गुर्मित बोलताना ऐकु येतो आवाज. चिड येते.

आयुर्हित's picture

24 Apr 2014 - 3:38 pm | आयुर्हित

मस्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

यशोधरा's picture

24 Apr 2014 - 5:08 am | यशोधरा

भारी!

त्रिवेणी's picture

24 Apr 2014 - 4:09 pm | त्रिवेणी

s

काळा पहाड's picture

24 Apr 2014 - 5:55 pm | काळा पहाड

फार गुर्मित बोलताना ऐकु येतो आवाज. चिड येते.

खरं तर कुठल्याही काँग्रेसी किंवा राष्ट्रवादीच्या समर्थकाला पाहिलं/ऐकलं तरी चीड येते.

वेल्लाभट's picture

2 May 2014 - 3:08 pm | वेल्लाभट

हहहाह्हहा क्लास!

raudransh_27's picture

2 May 2014 - 7:27 pm | raudransh_27

बर मग आता महाराज बनवलेच आहे तर हळुहळु मंदिर, चमत्कार कथा आणि एखाद्या नविन बडवे-उत्पात कम्युनिटी ची सोय असा प्ल्यान असेलच...!

बाकी कविता जमतीय, बरोबर फक्त द्वेष अन् xyz मानसिकता ऐवजी समस्यानिराकरण काही सकारात्मक दृष्टिकोन असता तर अधिक +1

मंदार दिलीप जोशी's picture

7 May 2014 - 12:19 pm | मंदार दिलीप जोशी

भगिनीस याच्या
मतदान करा
अन्यथा पाण्याला
बूच मारी

मंदार दिलीप जोशी's picture

9 May 2014 - 10:51 am | मंदार दिलीप जोशी

शाई पुसोनिया
मतदान करा
द्विगुणित करा
आनंदही

रामराया पुढे
हनुमान उभा
तैसेच ठाकले
हे ते दोघे

बोले तैसा चाले
जयांची ही कीर्ती
तयांना वंदावे
पुन्हा पुन्हा