ढीशुम ढिशुम क्लेमरः- सदर लेखन मि.सूडोकू यांनी आमच्या नामा'चा उप योग-करून लिहिलेल्या एका लेखावरून http://misalpav.com/node/27052 सुचलेले आहे. त्यामुळे हा लेख त्याची प्रतिक्रीया...विडंबन ..इत्यादी काहिही नसून त्या निमितानी काहि धमाल लेखन करावं..अश्याच अनुषंगानी लिहिलेला आहे.
========================================================
प्रातःकाळची प्रसन्न स्मायलीमय वेळ.
आंम्ही आमचे नित्य स्मायली स्नान उरकले. (आंम्ही प्रत्येक उपमा/अलंकार/उच्चार/आचार..यात स्मायली "लावल्या" शिवाय रहात नाही! काय करावयाचे? प्रॉडक्ट सारखे लोकांच्या नजरेत राहिले पाहिजे ना...!) स्मायली ध्यान आणि धारणा'ही केली. तो पर्यंत सेवकांनी दरबार 'लाऊन-ठेवला' होताच! आंम्ही आमुचे स्माय ली नावाचे एका जपानी शिष्येने दिलेले आसन आणि एका भारतीय शिष्येने दिलेला हसरी-क-मंडलू नावाचा Goमुखं असणारे शासन* घेऊन आश्रमात निघालो. (*---कमंडलू समोर धरला,कीच भक्तांची खरी "अवस्था-ध्यानात-येते" हा राजरोस अनुभव असल्यामुळे,कमंडलू हेच आंम्ही आमचे "शासन" गृहीत "धरले" आहे. त्यात सारेच काही येते!)
तो..........................च एक अंतर्बाह्य घायाळ झालेला भक्त आमच्या मार्गात अडवा आला.आंम्ही सेवकांना ओरडलो, "अरे...आडवा..आडवा याला" तात्काळ दोघांनी येऊन त्याला आडवे केले. आपलं ते हे...अडवले! पण त्याची भयभीतता पाहू जाता,आमच्या सदा-हसर्या मनास त्याची दया आली. आणि आंम्ही तिथेच त्याला, "वत्सा, काय जाहले तुज मनाप्रती? जो आलास जवळी येथवर माझे प्रती? " असे कवन टाकुन विचारले. तो अती दु:ख्खी जीव म्हणाला,"बा..बा, कृपा करा मजवरी,एक तरी द्या स्मायली खरी" आता मात्र आमचे समोर भलताच पेचप्रसंग निर्माण जाहला. काय करावे या भक्ताचे? ज्याने अशी अवचित पकड केली! असे काही झाले,की आंम्ही पूर्वानुभवांस स्मरून,फक्त "दरबारात ये" असे म्हणतो.तसेच त्यास सांगून आंम्ही आमच्या-लावलेल्या दरबारात जाऊन ते जपानी आसन हतरुन त्यावर एकदाचे बैसलो. प्रथम जागतिक संचार ब्रम्हाशी कनेक्ट होण्यास्तव आमच्या लॅप-टुपेश्वरास आवाहन केले. णंतर कमंडलू गदागदा हलवून पूर येइल एव्हढी भर टाकणार्या स्मायल्या असल्याची खात्री केली.
आणि दरबार सुरु झाला.
हळुहळू सेवकांनी..माफ करा,सेवकांनी हळुहळू भक्तांना-सोडण्यास सुरवात केली. प्रथम नित्याच्या समस्या घेऊन त्रस्त झालेले काहि भक्त आणि भक्त्या (हेच होते ना हो भक्त'चे अ-नेक-वचन???) आले.त्यांच्याशी थोड्या टाइमपास स्वरुपाच्या प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम करून त्यांस येकदाचे पिटाळले! पुढे एक फारच नयनरम्य भक्ति(भावना ओंको समझो यारो! ;) ) उभी होती.ती आमचे पर्यंत पोहोचणार तोच तो दुखावलेला मनुष्यगण मधेच(परत) आडवा आला.
आमचे सू डोकू थोडे सरकलेच होते.पण म्हटले, सोडवू येकदाची ही कट..कट.. आणि मग घेऊ समाचार..आपलं ते..हे...भेट त्या वि'भक्ति'ची!
तो भक्तः- बाबा...बाबा...
आंम्ही:- काय वत्सा?
तो भक्तः- खरी स्माइली द्या मज आणून,"लाविन" ती मी स्व'खर्चाने!
आंम्ही:-(मनात-कुठ्ठे????) उघडः- क्का.......य?
तो भक्तः- खरी स्माइली हवी बाबा...खरी स्माइली हवी
आंम्ही:- अरे वत्सा पद्यातच का असा लवंडतो आहेस?..आय मीन,व्यक्त होतो आहेस?
तो भक्तः- काय करू बाबा...मण आणंदी र्हात न्हाई आजकाल!
आंम्ही:- असं असं..! मग ही एक नंदीची स्मायली घे..ज्जा तुझं मन नक्की आनंदी र्हाईल!
तो भक्तः- बाबा ...पण नंदी चा आनंदीशी..आय मीन,आनंदी र्हाण्याशी काय संबंध?
आंम्ही:- अरे, मणुक्शा नंदी हे जगाला रूल करणार्या शंकर भगवानांचं वाहन...असं आंम्ही सातवाहन* कालापासून ऐकत आलेलो आहोत.(*मायला...अनेकजण वाट्टेल ती माहिती वाट्टेल त्या ठिकाणी-लाऊन पार डॉ.च्या पदव्या घेत फिरतात,तर आपण ह्या भक्ताचे लक्ष मुद्यापासून विचलीत करायला..मारल्या हवेत दोन गोळ्या,तर कुठे बिघडतय? ;) ..) त्यामुळे ते खरेच असणार. तेंव्हा नंदी हे शंकराचं वाहन..म्हणजे एका अर्थी डायवर!
तो भक्तः- बाबा..डायव्हर कसा काय?
आंम्ही:- अरे..तोच त्याला चालवतो ना!?
तो भक्तः- अरे हो..हो! पण मग तो आनंदी कस्सा काय र्हातो?
आंम्ही:-(काय शिंची कटकट आहे.आला मुद्यावर परत!) अरे जागाचा कारभार करू पहाणार्याचा भार त्याच्या सारख्या चारपायी-कार-वर आला,की कुणाची हिंम्मत होइल का त्याला दु:ख्खी करायची?
तो भक्तः-(खौटपणे..) वाहव्वा बाबा...काय संगती जोडता हो तुंम्ही!? अतःकरण धन्य जाहले. मण आणंदानी भरूण वाहू लागले.
आंम्ही:-पाहू...पाहू... कसे वाहू लागले ते!
तो भक्तः-नको..नको बाबा..अता अज्जुन नका पाहू. माझे आनंदी झालेले मण दु:ख्खी होइल..मग मला एक...अख्खी-कॉटर लावावी लागेल!
आंम्ही:- शी...शी... तू मद्यपाण करतोस???
तो भक्तः-नाही बाबा..आपण मला मधेच तोडलेत..मला असं म्हणायच होतं की मग मला एक स्मायली पूर्ण आणि दुसरी एक चतुर्थांश..या अर्थी क्वॉर्टर लावावी लागेल.
आंम्ही:- हे बघ तू असं कर ही एका मधुशाळेची...आपलं ते हे..स्मायलीशालेची धारिका घे http://www.easyfreesmileys.com/Free-Laughing-Smileys/ आणि जा येथून(शिंच ताटकळलय आमचं..मण...तिला भेटायला!) म्हणजे तुला पुढील वर्षभर तरी तुटवडा पडावयाचा नाही.
तो भक्तः- कोणता वडा?
आंम्ही:-(वैतागुन..) तुट वडा.. कोल्हापुर नामक जहाल नगरीत एक कटं-वडा मिळतो,तो तुजला ठाऊक हाये काय?
जैसा तो कटंवडा तैसाची हा तुटंवडा
तेंव्हा आता लाऊ नको भडाभडा..मजला बोलावयाला..(इत्यर्थे टळ! )
तो भक्तः- धन्य जाहलो बाबा... येतो आंम्ही!
आंम्ही:- हुश्श...............(सेवकांना ) हां... येऊ द्या रे फुडची ती केस...
==========================
आत्मूबाबा स्मायलीवाले!
क्रमशः
============================
दोन्ही कार्टुन चित्र मीच काढलेली आहेत.
============================
प्रतिक्रिया
11 Mar 2014 - 2:16 pm | यसवायजी
मस्त.
@ कोल्हापुर नामक जहाल नगरीत >>
तोंपासु. गुर्जी, या विकांताला येणार काय कोल्लापुरला?? कटवडा, मिसळ हाणायला.
11 Mar 2014 - 2:25 pm | अत्रुप्त आत्मा
@कटवडा, मिसळ हाणायला. >>> लै लै विच्छा हाये.. २/४ दिस आरामात फकस्त खादाडी करायलाच यायचय. पन ह्या आमच्या बेवख्त कामानी बेजान झालोय..पन अता येतोच यकदा टाइम काहाडून! ;)
येकदा तरी जमवावे कोल्हापूर
मग,येई ना का आपुल्या चितेचा धूर... अशी तीव्र मनीषा हाय कोल्हापुराची! :)
11 Mar 2014 - 2:32 pm | वैभव जाधव
मग,येई ना का आपुल्या चितेचा धूर....
कशाला असा निरवानिरवीचा सूर...?????
पन चित्रे मात्र नाहीत चाम्गली. :(
11 Mar 2014 - 2:16 pm | दिव्यश्री
मी पहिली....लेख वाचते आता ... :D
11 Mar 2014 - 9:35 pm | खटपट्या
महिलांमध्ये पहिली का ?
11 Mar 2014 - 2:25 pm | स्पा
ठीक ठाक, प्रयत्न केला हसायचा
11 Mar 2014 - 5:22 pm | प्रचेतस
लिखाण फसलंय यावेळी.
बाकी रेखाचित्रं भारीच.
11 Mar 2014 - 6:11 pm | जेपी
असेच मनतो
11 Mar 2014 - 9:37 pm | खटपट्या
आवो आत्मू बाबा, पयले आम्हाला तुमी हे सांगा कि येवड्या स्मायला आनता कुटून ?
कितीक येळेला इचारले तरी तुमी शिक्रेट सांगत नाय.
आता काय मोर्चा आनू काय ?
11 Mar 2014 - 10:57 pm | अत्रुप्त आत्मा
@कितीक येळेला इचारले तरी तुमी शिक्रेट सांगत नाय.
आता काय मोर्चा आनू काय ?>>> =)) वत्सा...वर धाग्यात एक माळ त्या भक्ताच्या गळ्यात मारली...आपलं ते हे...घातली आहे.. :D ती क्लिकवून पहा ना! पुढच्या भागात आणखि प्रसाद वाटणार आहेच! ;)
12 Mar 2014 - 1:26 am | खटपट्या
आत्ता कसं !!
(धागा वाचायच्या आधी प्रतिसाद वाचल्यामुळे माझे दुर्लक्ष झाले)
पुन्हा असे होणार नाही बाबा
12 Mar 2014 - 1:35 am | खटपट्या
27 Mar 2014 - 9:51 am | शशिकांत ओक
स्मायली सम्राट पुंण्यात्मा.
लॅपटॉपेश्वर प्रसन्न ।।
आपल्या दर्शनाने पावन झालेल्या या देहातील आत्मा स्मायल्यांचा स्वर्ग शोधतोय. कृपया स्मार्ट स्मायल्यांचा संपर्क बिंदू स्वहस्ते तीर्थ रुपात प्रसाद म्हणून वाटावा. म्हणजे आपल्या कार्याचा सुगंध अत्तराप्रमाणे दरवळेल.
27 Mar 2014 - 10:34 am | दिव्यश्री
:D
12 Mar 2014 - 5:24 am | स्पंदना
ते रडकं बाळ भारी आहे.
16 Mar 2014 - 5:04 am | पाषाणभेद
अआचा हा पण नविन गुण दिसून आला.
16 Mar 2014 - 12:15 pm | सस्नेह
लै 'भक्त्या' बघू नका हो आत्मुसगुर्जी.. येकच पक्की करा !
16 Mar 2014 - 10:23 pm | अत्रुप्त आत्मा
@लै 'भक्त्या' बघू नका हो आत्मुसगुर्जी..>>>
@येकच पक्की करा ! >>>
.............
20 Mar 2014 - 1:13 am | दिव्यश्री
अहो काय स्वप्न सुंदरी शोधताय जणू...मिळेल ... मिळेल . :)
बाकी प्यांटवाल्यांचा रेकॉर्ड जवळपास चाळीस मुलींचा (स्थळ म्हणून बघितलेल्या )आहे . वेन्जीनेर आहेत ना सोफ्त वेअर वाले . *beee* :D
17 Mar 2014 - 12:27 am | निनाद मुक्काम प...
@अत्रुप्त आत्मा
म्हणायचा और शोड देने का
20 Mar 2014 - 3:12 pm | विजुभाऊ
गुरुजी एखादी "कपाळावर ठाप्पकन हात मारणारी " स्मायली आहे का? मिळाली तर आभार प्रदर्शीत करेन.
इथे मिपावर बरेचदा टाकाविशी वाटते ती स्मायली.
20 Mar 2014 - 3:35 pm | सूड
>>शंकराचं वाहन..म्हणजे एका अर्थी डायवर!
वाहन म्हणजे डायवर मंग Vehicle म्हंजे काय?? बाकी काय लिहीलंय ते शष्प कळलं नाही. *dash1* *DASH* *WALL*
20 Mar 2014 - 3:37 pm | सूड
जाता जाता: त्या शेवटच्या चित्रावर पाणी का पडलंय?
20 Mar 2014 - 9:41 pm | अत्रुप्त आत्मा
@वाहन म्हणजे डायवर मंग Vehicle म्हंजे काय?? >>> असो......!
@बाकी काय लिहीलंय ते शष्प कळलं नाही. >>> हे तर फारच उत्तम झालं!
@त्या शेवटच्या चित्रावर पाणी का(??????) पडलंय?>>> त्या पाण्याला कळलच नाही अश्या चित्रावर पडायच नसत ते... आपण ओरडू हं त्याला!
22 Mar 2014 - 1:48 pm | निश
आत्मा गुरुजी, लेख थोडा लिहायच म्हणुन लिहिल्या सारखा वाटला. वल्ली साहेब म्हणाले तस लेख फसला आहे
26 Mar 2014 - 11:15 pm | पैसा
वि'भक्ती' चा प्रत्यय आला नाही बहुशः क्रमशःमुळे. एका फटक्यात लिहिली असती तर कदाचित तुम्हाला आणखी भक्ती (वाचक मंडळींची) मिळाली असती! व्यंगचित्रं चांगली काढलीत. आता कम्प्युटरावर काढायला जमतायत का बघा!
26 Mar 2014 - 11:53 pm | अत्रुप्त आत्मा
@ आता कम्प्युटरावर काढायला जमतायत का बघा! >>> हम्म! त्येच शिकायचय त्या अभ्या कडून... कुट गेलाय काय म्हाइती???
असो...क्रमशः मधे जे राहिले ते (झाले तर) पुढच्या भागात पूर्ण होइल असे वाटते. :)