. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी ह्यांचा सध्या दणक्यात प्रचार चालू आहे. मोदीँना विकासपुरुष या टॅगखाली प्रोजेक्ट केले जात आहे. ज्या प्रमाणे त्यांनी गुजरातचा विकास केला त्याप्रमाणे ते भारताचा विकास करणार आहेत अशी आश्वासनांची खैरात टीव्ही ,सोशल मिडीया, रेडीओवर सतत करण्यात येत आहे .परंतु या विकासपुरुषाच्या प्रचारामागे भाजपची जातीय गणिते चालू आहेत, ज्याचा लेखाजोखा माध्यमं जनतेपर्यंत पोचवत नाही आहेत.
आज पर्यंत भाजपाचे जे राजकारण राहीले आहे ते शेटजी भटजी या संज्ञेने ओळखले जाते. भाजपचा पिता 'जनसंघाला सुरवातीला याचा फायदा झाला .आणिबाणी नंतरही जनसंघ सत्तेत आला याला कारण त्याचे सुखवस्तु लोकांचे राजकारण .. परंतु जसे जसे जातीय अस्मितेचे राजकारण सुरु झाले तसा जनसंघ/जनता पार्टी निप्रभ होत गेले व काँग्रेस आणखी प्रबळ झाली.
भाजपचा जन्म झाल्यानंतर मात्र हा शेटजी भटजीचा शिक्का पुसण्यासाठी ओबिसींचे ध्रुवीकरण करण्याची सुरवात झालि. भाजपात असलेला ओबिसी नेत्यांचा भरणा याचेच द्योतक आहे. परंतु भाजपने कधिही ओबिसी नेत्यांना अतिमहत्वाची पदे दिलेली नाहीत. एनडीएच्या काळात वाजपेयी ,अडवाणी, प्रमोद महाजन ,मुरली मनोहर जोशी ,यशवंत सिन्हा ,जसवंत सिंग या गैर ओबिसींच्या हातात सुत्रे दिली गेली. ज्याचा परिणाम म्हणजे शायनिंग इंडीयाचा फुटलेला फुगा ..ओबिसींनी डावलले गेल्याच्या भावनेतुन काँग्रेसला व तत्सम पक्षांना मतदान केले .भाजपचा बेस असलेला ओबिसी समाज त्यांच्यापासुन दूर गेल्यानेच त्यांनी आता नरेंद्र मोदींच्या रुपाने ओबिसी कार्ड खेळले आहे.
मोदी हे घंची /तेली या ओबिसी जातीचे आहेत. त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार करुन भाजपने दोन प्रकारे त्यांचा प्रचार चालू ठेवला आहे.. भारतभर तरुण वर्गात सोशल मिडीयाचा वापर करुन त्यांना विकास पुरुष म्हणुन पुढे करायचे... त्याच वेळी जिथे जातीय समिकरणे महत्वाची आहेत व दिडशे लोकसभा मतदार संघ आहेत अश्या युपी बिहार व हिंदी बेल्टमध्ये मोदींना ओबिसी म्हणुन प्रोजेक्ट केले जात आहे. याचे कारण ओबिसींची सर्वाधिक संख्या या पट्ट्यात आहे. नुकतेच नरेंद्र मोदींनी बिहारात "माझ्यासारख्या मागासवर्गीयाला भाजपने पंतप्रधानापदाचे उमेदवार केले आहे" त्यामुळे भाजपवरचा ब्राह्मणांचा पक्ष असल्याचा दावा खोटा असल्याचे म्हण्टले आहे. भाजपचे राजकारण नेहमीच संभ्रमाचे राहीले आहे, ऐकीकडे हिंदुत्वाच्या व्याख्येचा दाखला देऊन जातीय आरक्षणाला विरोध करायचा त्याचवेळी अनेक तुकड्यात विखुरलेल्या ओबिसी समाजाचा वापर करुण घ्यायचा ,परंतु वरवर असे करुन चालणार नाही याची चुणुक त्यांना २००४च्या निवडणुंकांमध्ये आली आहे. नरेंद्र मोदींनी भाजप खाऊन टाकला आहे वा त्यांना तसे करताना अंतर्गत विरोध झाला नाही याचे कारण त्यांच्या ओबिसी असण्यात आहे.
प्रतिक्रिया
20 Mar 2014 - 3:23 pm | प्रसाद गोडबोले
तुमची नक्की हरकत कशाला आहे ?
मोदींच्या ओबीसी असण्याला की भाजपाने ओबीसी नेतृत्व पुढे केले त्याला ?
20 Mar 2014 - 3:28 pm | नानासाहेब नेफळे
एक निरीक्षण नोंदवले आहे. फक्त हरकत कशालाही नाही.
20 Mar 2014 - 3:51 pm | प्रसाद गोडबोले
अभिनंदन !
21 Mar 2014 - 3:15 pm | llपुण्याचे पेशवेll
मोदी तेली आहेत? मला माहित नव्हते. थँक्स नाना.
20 Mar 2014 - 3:23 pm | मंदार दिलीप जोशी
हे नेफळे म्हणजे ग्रेटथिन्कर का? डूआयडी काढण्याच्या पर्याय अवलंबलेला दिसतो. वेलकम बॅक ;)
21 Mar 2014 - 12:46 am | मुक्त विहारि
असेल...असेल....असे पण होवू शकते.
20 Mar 2014 - 3:33 pm | मंदार दिलीप जोशी
@ प्रशासक हे पहा
http://aisiakshare.com/node/2698
20 Mar 2014 - 5:21 pm | भुमन्यु
लोल... खुप दिवसांपासुन मिस करत होतो... आले परत..
21 Mar 2014 - 12:58 am | डॉ सुहास म्हात्रे
ग्रेट डूआयडी पकड्याच की !!! पण ग्रेट थंंकिंग करताना अशी मिष्टेक???
जाणदो, बडे बडे लोग ऐसी छोटी छोटी मिस्टेका (बारबार) करते र्हयते है । +D
21 Mar 2014 - 1:00 am | मुक्त विहारि
होता है...
होता है....
21 Mar 2014 - 1:02 am | विकास
नया है वह! ;)
21 Mar 2014 - 2:27 pm | अत्रुप्त आत्मा
@ डूआयडी पकड्याच की !!! >>> +१ ;)
ही घ्या भेट द्या त्यांना सगळ्यांनी! =))
20 Mar 2014 - 3:54 pm | जेपी
ग्रेटथिंकर आले .
21 Mar 2014 - 12:50 am | मुक्त विहारि
आले तर आले....
परत परत नविन नावाने यावेसे वाटणे, ह्यातच मिपाचे यश आहे.
21 Mar 2014 - 9:59 am | मंदार दिलीप जोशी
अहो ते बरोबर. पण दुसरा कुणी परत आला की त्याला निर्लज्ज हेच म्हणतात. स्वतः आले की तुमच्या या मताकडे बोट दाखवतील. असो.
तुमचे 'मिपाचे यश' हे मत पटले हे पुन्हा सांगतो. :)
21 Mar 2014 - 10:50 pm | मुक्त विहारि
नथुगुग्गूळ वटीचा पण हातभार असावा.
खरे खोटे ग्रे.थि. जाणे.
20 Mar 2014 - 4:15 pm | काळा पहाड
काय चाललं आहे? गारपीटीचा इशारा ५ दिवस आधी दिला जाऊन ही शेतकर्यांपर्यंत तो पोचवण्यातच आला नाही. शिवजयंती नावाचा आत्तापर्यंत साधेपणाने साजरा होणारा सण धुमधडाक्यात साजरा केला गेला आणि कोट्यावधी रुपये उधळले गेले. तिकडे शेतकरी मरतो आहे. त्याला या मराठा आणि ओबीसींच्या तथाकथित नेत्यांनी कसलीही मदत केलेली नाही. लाज वाटते का? अशा वेळी असले मुद्दे उकरून काढायला, लाज वाटते?
20 Mar 2014 - 4:34 pm | नानासाहेब नेफळे
अहो शेतकर्यांचीही जात बघितली जाते... विदर्भातला शेतकरी मरतो ,पण पश्चिम महाराष्ट्रातला नाही.. याची कारणं 'जातीय' सुद्धा आहेत.
शेतकर्यांना कर्जमाफी दिली गेली तेव्हा राज्यातल्या एका धनदांडग्या जातीने ती कर्जमाफी घेतली व विदर्भात शेतकरी आत्महत्या करत राहीले...
20 Mar 2014 - 9:46 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
मग विदर्भातल्या नेत्यांच्या नावानी बोंब मारा ना बाहेरच्यांची जात काढायच्या आधी. मग त्या शेतकर्यांच्या "जातवाल्या" संघटना काय उपटतं बसल्यात का गारपिट झालेल्या शेतातली नासाडी झालेली पिकं? आरक्षणासाठी एकत्र येऊन बोंब मारता येते ना मग नुकसानभरपाईसाठी येउ देत की एकत्र. हल्ली काय नैसर्गिक संकटं पण जात बघुन यायला लागली का?
20 Mar 2014 - 4:54 pm | मंदार दिलीप जोशी
अहो शेतकर्यांचीही जात बघितली जाते... विदर्भातला शेतकरी मरतो ,पण पश्चिम महाराष्ट्रातला नाही.. याची कारणं 'जातीय' सुद्धा आहेत.
गारपीट पण जात बघून होते का?
लवकर बरे व्हा. गेट वेल सून,
20 Mar 2014 - 10:46 pm | विनोद१८
....आता याला जळी, स्थळी, काष्ठी व पाषाणी जर केवळ मोदी आणि मोदीच दिसतोय यातच सारे काही आले, केवळ याचा नाविलाज म्हणुनच अशी आपली भडास काढतोय दुसरे काय.. काय रे नान्या ??? बरोबर ना ???
विनोद१८
21 Mar 2014 - 2:12 pm | मंदार दिलीप जोशी
मिपाची काळजी नसती तर मोदींची जात काढल्याबद्दल अॅट्रॉसिटीच्या खाली या नेफळेसाहेबांना आत टाका अशी तक्रार केली असती पोलिसात. काय नेफळेसाहेब. जायचंय का आत?
21 Mar 2014 - 2:39 pm | प्यारे१
अॅट्रॉसिटीखाली कुठ कुठल्या जाती येतात?
21 Mar 2014 - 2:42 pm | मंदार दिलीप जोशी
सगळ्या मागास जाती येतात
21 Mar 2014 - 2:44 pm | बॅटमॅन
आणि आक्षेपार्ह बोलल्यास गुन्हा दाखल करणे हे त्या बोलणार्याच्या जातीवर अवलंबून असते काय? म्ह. एका मागासवर्गीयाने दुसर्या मागास जातीबद्दल काही आक्षेपार्ह बोलल्यास काय तरतूद आहे? की फक्त सवर्णांनी मागासवर्गीयांस बोलल्यासच शिक्षेची तरतूद आहे?
21 Mar 2014 - 2:47 pm | निरंजन
जातीची उतरंड आहे. त्यात वरच्यानी खालच्यास बोलल तरच आक्षेपार्ह्य आहे. अन्यथा नाही.
21 Mar 2014 - 2:55 pm | बॅटमॅन
रोचक आहे. धन्यवाद.
21 Mar 2014 - 3:01 pm | प्रसाद गोडबोले
कोकणस्थाने देशस्थाला "ए देब्रा" असे म्हणल्यास आणि देशस्थाने कोकणस्थाला "ए कोब्र्या " असे म्हणल्यास नकी कोणाला कोणावर केस करता येईल ? :D
21 Mar 2014 - 3:10 pm | प्यारे१
>>>"ए देब्रा"
आँ???? असं पण अस्तं?
21 Mar 2014 - 3:19 pm | प्रसाद गोडबोले
हेच काय अजुन खुप असतं ... कोब्रांना वाटतं ते टॉपला तर देब्रांना वाटतं ये ग्रेट ... कर्हाडे असतात त्यांचे वेगळेच मत ... सीकेपींची अजुन वेगळी तर्हा !
अहो इतकंच काय तर ऋग्वेदी आणि यजुर्वेदी मधेही यजुर्वेदी ग्रेट असं आमचं स्पष्टं मत आहे त्यातही कृष्णयजुर्वेदी हे शुक्ल पेक्षा ग्रेटर ....:D D
नोट : हलकं घ्या ! चेष्टेतच लिहिलय !!
21 Mar 2014 - 4:23 pm | विजुभाऊ
फक्त सी के पी च सी के पी ना ब्राम्हण मानतात.
इतर कोब्रा देब्रा यजुर्वेदी ऋग्वेदी कर्हाडे सारस्वत यांच्या लेखी ते वेगळेच आहेत.
असो.
भाजपचे राजकारण नेहमीच संभ्रमाचे राहीले आहे,
हे एक वाक्य बरोबर आहे. भाजप म्हणजे भ्रम जोपासणारा पक्ष असेच आहे.
मोदींबद्दल अजूनतरी भाजपने स्पष्टपणे जात हा मुद्दा समोर आणलेला नाही.
पण भाजपची भूमीका कल्याणसिंग / बंगारुलक्ष्मणांबद्दल वेगळी आणि गडकरींबद्दल वेगळे अशीच राहिलेली आहे
21 Mar 2014 - 4:24 pm | बॅटमॅन
जीएसबी अन सीकेपी यांत गल्लत होतेय का?
21 Mar 2014 - 4:32 pm | विजुभाऊ
ब्याट्या गौड सारस्वतात म्हणजे ( गावस्कर /वेंगसरकर / शेणॉय ) आणि चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ( प्रधान , राजे, अधिकारी , तेंडुलकर , गुप्ते , तवकर , ठाकरे ) यांच्यात गल्लत केली तर ठाणे + वांद्रे आणि दादर अशी दोन्हीकडची लोकं येतील ना ब्याटी अन तलवारी घेवून
21 Mar 2014 - 5:06 pm | बॅटमॅन
हा हा हा, अगदी अगदी ;)
21 Mar 2014 - 5:50 pm | पैसा
तेंडुलकर जी एस बी हो!
21 Mar 2014 - 6:52 pm | निरंजन
तेंडुलकर सीकेपी नाहीत हो.
21 Mar 2014 - 8:24 pm | धन्या
या यादीत "चित्रे" राहीले.
21 Mar 2014 - 6:39 pm | कपिलमुनी
हलके घ्या म्हणायला काय किडमिडीत कोब्रा भटं आहे काय ??
ऋग्वेदी च भारी ..आकार वजन आनि इतर सर्व !
;)
21 Mar 2014 - 7:00 pm | प्यारे१
अहो, प्रतिसाद वेगळा होता...
'ए दे ब्रा' असं वाचलेलं मी! :)
असो, बदलीन. ;)
21 Mar 2014 - 3:10 pm | बॅटमॅन
तो सर्वच टकला अर्थात केसलेस मामला आहे ;)
21 Mar 2014 - 3:11 pm | बॅटमॅन
आय मीन 'गॉन केस' ;)
21 Mar 2014 - 3:13 pm | श्रीगुरुजी
हे वाचल्यावर एका सापाचं आणि नागाचं भांडण आठवलं. एकदा एक नाग चिडून एका सापाला म्हणतो, "ए नालायक सापड्या". त्यावर नाग तसेच प्रत्त्युत्तर देतो.
21 Mar 2014 - 4:47 pm | इरसाल
कोकणात रहात असलेल्या गावी सर्रास "ये म्हा**च्या, ये कुं**च्या, ये आ**च्या असे बोलले जायचे आणी वक्ता व श्रोता यांना त्याचे वाईटही वाटत नसे. तर.....
कोणाला "ये गाढवीच्या" म्हटले तर ते अॅट्रासिटीच्या कायद्यान्वये आक्षेपार्ह्/दंडकारक असेल काय ?
21 Mar 2014 - 5:52 pm | पैसा
कुणा माणसाला असं म्हटलं तर गाढवाच्या बाबतीत अॅट्रॉसिटी होईल. पण ते केस दाखल करू शकणार नाही.
21 Mar 2014 - 6:01 pm | प्रसाद गोडबोले
लोल
21 Mar 2014 - 6:01 pm | डॉ सुहास म्हात्रे
प्राण्यांना अश्या सावत्रभावाने वागवणार्या कायद्याचा णीशेढ !
(PETA ला पत्र लिहिण्यासाठी मजकूर शोधण्यात व्यस्त) इए
21 Mar 2014 - 6:12 pm | पैसा
आपलं सर्कार आलं की नवीन कायदा करून टाकू! हाकानाका! मात्र मला पंतप्रधान आणि अर्थखात्याची मंत्री केलं पाहिजे. मग मी तुम्हाला वन आणि वन्यजीव, पेट्रिलियम, कोळसा, खाण, दूरसंचार, रेल्वे वगैरे सगळी चराऊ खाती देऊन टाकीन!
21 Mar 2014 - 6:34 pm | विकास
मात्र मला पंतप्रधान आणि अर्थखात्याची मंत्री केलं पाहिजे. मग मी तुम्हाला वन आणि वन्यजीव, पेट्रिलियम, कोळसा, खाण, दूरसंचार, रेल्वे वगैरे सगळी चराऊ खाती देऊन टाकीन!
राजकारणात आणि सत्ताकारणात पैसा असणे महत्वाचे आहे याचा आज वेगळाच अर्थ मला समजला! :)
21 Mar 2014 - 6:38 pm | डॉ सुहास म्हात्रे
एवढ्या "खाती" वाचूनच पोट बिघडलं :)
(स्कॅमवाल्या नेतागणांच्या तब्येतीची कल्जी करणारा) इए
21 Mar 2014 - 9:22 pm | आयुर्हित
चालेल हो आपल्याया पंतप्रधान आणि अर्थखात्याची मंत्री करू, पण त्या बदल्यात मिपाला एक बँक काढायची ची परवानगी दिली पाहिजे.म्हणजे आम्हाला मिसळपाव देणारे ATM सर्वीकडे टाकता येतील.
उद्यापासूनच भरती चालू करू या कि मिसळपाव बँकेची!
21 Mar 2014 - 10:01 pm | पैसा
मिसळपाव देणारे एटीएम! क्या आयडिया है सरजी!
21 Mar 2014 - 9:31 pm | इरसाल
म्हणजे सध्यातरी माणुस गाढवाच्या वरच्या जातीचा आहे ;)
21 Mar 2014 - 2:43 pm | निरंजन
अशी तक्रार नाही करता येणार.
21 Mar 2014 - 2:51 pm | मंदार दिलीप जोशी
अरेरे :(
21 May 2014 - 6:51 pm | बारक्या_पहीलवान
नेफळेला मराठा समाजाचि पन Allergy आहे. (मोदींच्या विजयाचे परीक्षण)
21 May 2014 - 8:44 pm | नानासाहेब नेफळे
उलट सांगताय... राज्यात २५ टक्के असलेल्या मराठ्यांना इतर समाजाची allergy येते, मनोहर जोशी व नंतरच्या काळात सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर यांचा जीव कासावीस झाला होता.
21 Mar 2014 - 2:46 pm | डँबिस००७
नानासाहेब नेफळे (मिपा) = ग्रेट थिम्कर (ऐ अ) = पालथाघोरस (मा बो)
मोदीची जाहीरात अशीच करत रहा ! उभा भारत आपला आभारीच राहील !!
21 Mar 2014 - 3:13 pm | नानासाहेब नेफळे
राजकीय लेख लिहताना सनदशीर मार्गाने एखाद्याचे जातीविशेष सांगणे यात गैर काही नाही.फ्रीडम ऑफ स्पीच एण्ड एक्स्प्रेशनचे घटनेतले कलम याचा अधिकार देते.
अट्रोसीटीची तक्रार फक्त SC/ST व्यक्तीच इतरांवर दाखल करु शकतात.त्या इतरांमध्ये 'ओबिसीही' आले.
एखाद्या ब्राह्मणाने मराठ्यांची ,मराठ्यांनी माळी माणसाच्या जातींचे उल्लेख अपमानजनक पद्धतीने केल्यास एट्रोसिटी कलम लागू होत नाही ,परंतु उपरोक्त तिघांपैकी कुणीहि SC/ST समाजातील व्यक्तीच्या जातीचा अपमानजनक उल्लेख केला तर त्यांना जातीवाचक शिवागाळीचा कायदा लागू होतो.ऐट्रोसिटी कायद्याबद्दल बरेच गैरसमज आहेत हे मात्र नक्की.
21 Mar 2014 - 3:19 pm | मंदार दिलीप जोशी
धन्यवाद नेफळे उर्फ ग्रेटथिन्कर उर्फ बरेच काही
21 Mar 2014 - 4:15 pm | शिद
सारख्या ह्याच्या-त्याच्या जातीपातीच्या शिळ्या कढीला ढवळून लोकांना काय आनंद मिळतो कोणास ठावूक... तोच तोच पणाचा कंटाळा यायला लागला आहे आता.
21 Mar 2014 - 6:18 pm | चैतन्य ईन्या
कंटाळा तुम्हाला हो कारण तुम्ही बामन ना. ह्या तुम्हाला काय कळणार ५००० वर्ष तुमच्या बाप जाद्यांनी काय काय अत्याचार केले. ह्या काय काळातच नाय तुम्हाला हो. तुम्ही जेंव्हा त्यांच्या घरी राबाल तेंव्हाच खरी जातपात नष्ट होईल. काय बरोबर ना हो नेफळे
21 Mar 2014 - 6:46 pm | शिद
चैतन्य ईन्या साहेब,
तुम्हाला माझी जात कशी काय कळली हो... की उगाच आपले ब्राह्मण्द्वेशाने भारुन सगळ्यांनाच ब्राह्मण ठरवताहेत.
असो... मला येथे माझी जात उघड करण्याची काही गरज व सक्ती भासत नाही त्यामुळे तुमचे चालु द्या... आणि जमलेच तर मोठे व्हा.
21 Mar 2014 - 7:02 pm | चैतन्य ईन्या
तुम्हाला अजून पण कळलेच नाही छ्या,
21 Mar 2014 - 6:23 pm | राजो
जौद्या हो..
"उंगली" करायची सवय नाही जाणार यांची.. :D
21 Mar 2014 - 6:54 pm | विकास
वास्तवीक जातीच्या चष्म्यातून राजकारण आणि एकंदरीतच बघणे मला मान्य नाही. मात्र या धागाप्रस्तावात बराच बाष्कळ पणा दिसल्याने त्यातील संदर्भित मुद्यांवर लिहीत आहे.
आज पर्यंत भाजपाचे जे राजकारण राहीले आहे ते शेटजी भटजी या संज्ञेने ओळखले जाते.
ते सुरवातीच्या काळात डाव्या विचारवंतांच्या (अप)प्रचारामुळे आणि नंतरच्या काळात डाव्यांनीच भरलेल्या प्रसिद्धीमाध्यमांमुळे होत राहीले. जर इंटरनेटमुळे माध्यमे मुक्त झाली नसती तर अजूनही भाजपाचा आवाज ऐकायला आला नसता... भाजपा/जनसंघ आणि त्यांची पितृसंस्था संघ यांच्यात जातीवरून काही घडत नाही.
भाजपचा पिता 'जनसंघाला सुरवातीला याचा फायदा झाला .आणिबाणी नंतरही जनसंघ सत्तेत आला याला कारण त्याचे सुखवस्तु लोकांचे राजकारण ..
जनसंघाला फायदा काय झाला? आणिबाणीनंतर जनसंघ सत्तेत कधी आला? आणिबाणीनंतर जनता पार्टीच्या बॅनर वर निवडणुका जिंकल्या गेल्या आणि नंतर सरकार कोसळल्यावर भारतीय जनता पक्ष अस्तित्वात आला.
परंतु जसे जसे जातीय अस्मितेचे राजकारण सुरु झाले तसा जनसंघ/जनता पार्टी निप्रभ होत गेले व काँग्रेस आणखी प्रबळ झाली.
कारण काँग्रेसने जातीय अस्मितेचे राजकारण केले. त्याच बरोबर व्हिपि सिंग आणि इतर समाजवाद्यांनी देखील या सामाजीक दुहीच्या आगीत तेल ओतण्याचे काम केले.
एनडीएच्या काळात वाजपेयी ,अडवाणी, प्रमोद महाजन ,मुरली मनोहर जोशी ,यशवंत सिन्हा ,जसवंत सिंग या गैर ओबिसींच्या हातात सुत्रे दिली गेली.
एनडीएच्या आधी देखील कल्याणसिंग हे ओबिसी समाजातले मुख्यमंत्री होते. बंगारू लक्ष्मण हे मागासवर्गीय समाजातले नेते आणि मुळचे संघकार्यकर्ते भाजपाचे एनडीएच्या काळातले अध्यक्ष होते. पण तेहलकामुळे त्यांना ते पद सोडायला लागले.
बाकी, सध्याच्या काळात निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा काही जागांचा त्या अर्थाने विचार करत असेल तर details माहीत नाहीत, पण आश्चर्य वाटणार नाही.
असो.
21 Mar 2014 - 7:05 pm | आत्मशून्य
विकांताला बघावा म्हणतो. माझा फार आवडता व्हिडिओगेम आहे तो. आता त्यावर चित्रपट आला हे उत्तम झाले पण रिव्हू हवा होता. जाण्कारान्नि उजेड टाकावा
21 Mar 2014 - 7:27 pm | पैसा
माझ्या मुलाला आवडतो तो गेम. मला मात्र एज ऑफ एम्पायर आवडतो.
21 Mar 2014 - 7:33 pm | अनुप ढेरे
पण एज ऑफ एम्पायर पेक्षा त्याचं थोडं फुडलं व्हर्जन एज ऑफ काँकरर्स जास्तं भारी आहे.
21 Mar 2014 - 7:34 pm | प्यारे१
कॉण्सण्ट्रेट कॉण्सण्ट्रेट...
धाग्याचे कश्मीर करु न का
21 Mar 2014 - 7:41 pm | विकास
हा धागा आहे? मला वाटलं खरडफळा! आयम्म स्वॉरी!
21 Mar 2014 - 7:45 pm | पैसा
आम्ही तर खेळाच्या आणि खिलाडूवृत्तीच्या गोष्टी बोलतोय!
21 Mar 2014 - 10:24 pm | मुक्त विहारि
आम्हाला अद्याप "प्रिन्स ऑफ पर्शिया" आवडतो....
मस्त आपल्या-आपल्या उड्या माराव्यात आणि जमलेच तर थोडी तलवारबाजी करावी...
22 Mar 2014 - 1:28 am | आत्मशून्य
त्यात हार्डेस्त लेवल दोन एनिमी घेउनही जिंकतो. आता मोफत ओन्लाइनहि उपलब्ध आहे या एकदा मैदानात आपले सैन्य घेउन हौदे एक मैत्री पूर्ण सामना :)
रच्याकने Nfs आजच बघितला पुरता नोस्टेल्जिक झालो. चित्रपट आवडला. फास्ट फ्युरिअस सारखा भपका अथवा तंग कपड्यातिल एकहि ललना चित्रपटात नाही पण गाड्यांचे सिंन्स तूफ़ान आहेत. गेम मधील ट्रेक्स जशे च्या तसे पण खरे शूट केलेत. काही प्रसंगात पडद्या वरील गाडी कंट्रोल करायला प्रत्यक्ष बोटे सुधा शिवशिव्तात... अजुन एकदा नक्कीच बघेन.0
22 Mar 2014 - 10:45 am | पैसा
तुझ्याबरोबर खेळायचं म्हणजे हरण्यासाठीच! त्यापेक्षा तो मंद्या पण विचारतो आहे, तू त्याच्याबरोबर खेळ ना!
नीड फॉर स्पीड सिनेमा नक्कीच बघितला पाहिजे!
28 Mar 2014 - 12:04 pm | ब़जरबट्टू
एज ऑफ एम्पायर साठी रात्र रात्र जागवली आहे..
ते शत्रुचे हत्ती मंत्र मारुन आपले करणे सर्वात आवडता भाग. =))
बजरु..