यांबू , सौदी अरेबिया , मध्ये राहणारे कुणी मिपाकर आहेत का?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
14 Mar 2014 - 8:19 am

"यांबू , सौदी अरेबिया , मध्ये राहणारे कुणी मिपाकर आहेत का?"

प्रिय मिपाकरांनो,

सध्या मी भारतात आहे.

गेले काही दिवस मी जॉबच्या शोधात होतो.

तो मिळाला.

मी जॉइन करत असलेली कं. कॅनेडीयन असून, सध्या त्यांचे काम यांबू,सौदी अरेबिया, इथे सुरु आहे.

पुढील ३/४ महिने मला यांबूलाच रहावे लागणार आहे.

माझा मुळचा पिंड कट्टा करणे, हाच असल्याने, तिथे पण एखादा मस्त कट्टा करावा, असा बेत आहे.

मागच्या वर्षी मी दुबईला पण कट्टा केला होता.

ह्यावर्षी भारतात पण बरेच कट्टे केले.

आता एक मस्त यांबू-कट्टा पण होवू देत.

कळावे,
लोभ आहेच,
तो वाढावा ही विनंती,
मुवि

मौजमजाचौकशी

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

14 Mar 2014 - 8:49 am | प्रमोद देर्देकर

वा शेवटी तुमचं काम झालं म्हाणायचं. पुढिल वाटचाली करता शुभेच्छा!
तिकडे गेल्यावर आधी एक कट्टा करा.
*ROFL*

मुक्त विहारि's picture

14 Mar 2014 - 8:59 am | मुक्त विहारि

ह्याच कं.साठी बराच वेळ गळ टाकून बसलो होतो.

आता यांबूला कुणी मिपाकर भेटला तर बरे.

एखादा कट्टा यांबूला पण करतो.

प्रचेतस's picture

14 Mar 2014 - 9:09 am | प्रचेतस

अभिनंदन मुवि.

मुविकाका सौदी अरेबियासारख्या ओसाड वाळवंटात सुद्धा कट्ट्यांचे ओअ‍ॅसिस फुलवतील याची खात्री आहेच.

सुनील's picture

14 Mar 2014 - 9:21 am | सुनील

अभिनंदन!

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Mar 2014 - 9:28 am | डॉ सुहास म्हात्रे

हार्दिक अभिनंदन !

मुविकाका सौदी अरेबियासारख्या ओसाड वाळवंटात सुद्धा कट्ट्यांचे ओअ‍ॅसिस फुलवतील याची खात्री आहेच.

+१,०००,०००

खटपट्या's picture

14 Mar 2014 - 9:29 am | खटपट्या

अभिनंदन मूवी,
वृतांत टाकत जा वरचे वर

स्मिता चौगुले's picture

14 Mar 2014 - 9:38 am | स्मिता चौगुले

अभिनंदन मुविकाका..

अब इदरमें कट्टे कौन आयोजित करेंगा?

अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा!

सौदी अरेबियामध्ये किमान एकतरी कट्टा झालाच पाहिजे, मग तो तुमच्या एकटयाचा का असेना? :)

आपल्या मध्यवर्ती डोंबिवलीत तुम्ही मिपा दिवाळी अंकाचे बक्षिस समस्त मिपाकरांतर्फे स्वीकारले होते तसे तिकडे सौदी अरेबिया मध्ये समस्त मिपाकरांतर्फे कट्टा करा. आम्ही आंजावरून तुमच्या सोबत असूच. कट्टयाचा वृत्तांत आणि फोटो टाकायला मात्र विसरू नका हं! :)

एक राहिलच, भटकंतीचे फोटो अवश्य टाका.

पुन्हा एकदा अभि… जाऊ दे! :)

सर्वसाक्षी's picture

14 Mar 2014 - 10:02 am | सर्वसाक्षी

मुवि,
अभिनंदन!

तिकडे कट्टे करालच पण जमलं तर जाता जाता एक कट्टा इथे करा. उद्या येताय का ठाण्याला? मामि चा आस्वाद घेऊया. तिकडे जाताना जिभेवर मिसळीची चव घेऊन जा :)

साक्षी

मुक्त विहारि's picture

14 Mar 2014 - 10:16 am | मुक्त विहारि

मामलेदाराची मिसळ नको.

आजकाल रस्सा न देता, तेलाचा माराच जास्त करतात.

आमंत्रणला पण असाच अनुभव आला.

सध्या मिसळ म्हटले की आमच्या डोंबिवलीतील आस्वादची मिसळ हाच मस्त पर्याय आहे.(त्याच्याकडेच बुधवारी ,शुक्रवारी आणि रविवारी बिर्याणी पण छान मिळते.विशेषतः मटण बिर्याणी.घरगुती चवीचे आणि पैसा वसूल.)

रस्सा जास्त आणि तेल कमी.

मृत्युन्जय's picture

14 Mar 2014 - 1:22 pm | मृत्युन्जय

मामलेदाराची मिसळ नको.

आजकाल रस्सा न देता, तेलाचा माराच जास्त करतात.

आमंत्रणला पण असाच अनुभव आला.

सध्या मिसळ म्हटले की आमच्या डोंबिवलीतील आस्वादची मिसळ हाच मस्त पर्याय आहे

डोंबिवलीतल्या वर्ळ्ड फेमस इन डोंबिवली मिसळीचे कौतुक वाचुन डोंबिवली हे २१ व्या शतकातले पुणे आहे की का अशी शंका यायला लागली. ;)

थोडा बदल....

"पुणे हे विसाव्या शतकातील डोंबिवली होते."

अशी बातमी २१व्या शतकापासून ते ५०व्या शतकापर्यंत असेल.

अजया's picture

16 Mar 2014 - 9:35 am | अजया

ज्जे बात!!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

16 Mar 2014 - 10:14 pm | निनाद मुक्काम प...

डोंबिवलीकर हा मनाने पुणेकर व कर्माने मुंबईकर असतो.
दोन्ही बाजूचे गुण दोष आपलेसे करून ह्या जागतीकरणाच्या रेट्यात तो आधुनिक आचार विचार जपतांना आपली संस्कृती व बालपणाची डोंबिवली सुद्धा मनाच्या गाभार्यात जपतो.
फडके रोड मला राजपथापेक्ष्या जास्त आवडतो.

+ १

म्हणूनच तर मी म्हणालो, की डोंबिवली हेच मध्यवर्ती ठिकाण.

अजया's picture

17 Mar 2014 - 8:13 am | अजया

वा,वा, निनाद!

शैलेन्द्र's picture

15 Mar 2014 - 11:13 pm | शैलेन्द्र

मूवि, अनेक शुभेच्छा..
हे आस्वाद कोणतं?

मुक्त विहारि's picture

15 Mar 2014 - 11:24 pm | मुक्त विहारि

जमल्यास तुम्ही पण या.

आत्मशून्य's picture

16 Mar 2014 - 2:51 pm | आत्मशून्य

नक्कि भेटुया.

विटेकर's picture

14 Mar 2014 - 10:21 am | विटेकर

मुवि शेठ,,, जीओ... !
मराठी पाऊल पडते पुढे !

सचिन कुलकर्णी's picture

14 Mar 2014 - 11:32 am | सचिन कुलकर्णी

कधी join करताय तुम्ही ? आपला डोंबिवली कट्टा लांबला म्हणायचे..

मुक्त विहारि's picture

14 Mar 2014 - 11:36 am | मुक्त विहारि

तुम्ही आलात की लगेच करु या कट्टा..

हाकानाका

सचिन कुलकर्णी's picture

14 Mar 2014 - 11:53 am | सचिन कुलकर्णी

तूर्तास यांबूतील वाटचालीसाठी शुभेच्छा. आशा करूयात कि बाहेर देखील आपल्याला एकत्र कट्टा करायला मिळेल.

आत्मशून्य's picture

14 Mar 2014 - 11:58 am | आत्मशून्य

आणी एक नवी सुरुवात ( जस्ट अ मेटाफोर) म्हणुन तिकडे गेल्यावर एखादा असा धागा टाकायचा आवर्जुन प्रयत्न करा जो तुमच्या
बाबतीत नसेल. (जसे की छगनचे सापळे वगैरे.)

कदाचित जमाव अन कायदा बाजूने करण्यास धर्मही बदलावा लागेल ;)

गप चिप रहा. अन्यथा तत्पूर्वी जमाव अन कायदा बाजूने करण्यास कदाचीत धर्मही बदलावा लागेल ;)

मुक्त विहारि's picture

15 Mar 2014 - 11:39 pm | मुक्त विहारि

मी तुमच्याकडे मदत मागायला किंवा अनाहूत सल्ला मागायला आलेलो नाही....

माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे.

मुक्त विहारि's picture

15 Mar 2014 - 11:41 pm | मुक्त विहारि

मी काय लिहावे आणि काय लिहू नये, हे मला चांगले समजते.

मुविंचे दणकून हबिणंदण!!!! होऊ दे कट्ट्यांचा खर्च!

मग आता मध्यवर्ती ठिकाण "यांबू" ?

अभिनंदन!! अन शुभेच्छा!!

मुक्त विहारि's picture

14 Mar 2014 - 1:27 pm | मुक्त विहारि

छे.... छे.....

मध्यवर्ती ठिकाण डोंबिवलीच...

आमचे डोंबिवली गांव हेच, आमचे मध्यवर्ती ठिकाण.

आम्ही आपले पोटा पाण्या साठी इकडे तिकडे भटकतो.

(बाद्वे,,,, नुकत्याच एका अर्थतज्ञाने, डोंबिवलीचे कौतूक केले. भारतातील अर्थ व्यवस्थेत डोंबिवलीचा महत्वाचा वाटा आहे.)

कवितानागेश's picture

14 Mar 2014 - 3:05 pm | कवितानागेश

यांबिवली!! ;)

मृत्युन्जय's picture

14 Mar 2014 - 1:24 pm | मृत्युन्जय

बादवे मु पो. सौदी अर्ब साठी अनेक शुभेच्छा. येताना एक उंट घेउन या (आणि एक तेलाची विहीर)

मुक्त विहारि's picture

14 Mar 2014 - 1:38 pm | मुक्त विहारि

४ उंट, ४ हत्ती, ४ घोडे आहेत.१६ प्यादी देखील पदरी बाळगून आहे.त्यांच्यावर देखरेख करायला २ प्रधान आणि २ राजे पण आहेत.(नाही म्हटले तरी ६४ चौकड्यांचे मैदान सांभाळायला इतका जामानिमा हवाच.)त्यामुळे तिकडून उंट आणायची काही गरज वाटत नाही आणि......

तेलाची विहीर आणली असती, पण मग त्या पैशांनी सूख-समाधान घराबाहेर पडण्याची शक्यताच जास्त.

बहूदा ह्या कारणामुळेच अल कुंदनशेख अल ठाकूर्लीकर अल दुबईकर , तेलाची विहीर इथे घेवून येणार नाहीत असे ऐकून आहे.

मुवि, यांबुचे माहिती नाही पण जमल्यास बहरीन कट्टा नक्की करा! एक्काकाकांनाही घेउन या.

सुहास झेले's picture

14 Mar 2014 - 1:51 pm | सुहास झेले

व्वा व्वा... अभिनंदन आणि शुभेच्छा :)

स्वप्नांची राणी's picture

14 Mar 2014 - 2:47 pm | स्वप्नांची राणी

ईस्पिकचा एक्का आहेत ना तिथून जवळच. म्हन्जे काय हजार एक किमीवर असले तरी येतिल की गाडी घेउन. जाम फिरत असतात ते. मस्त कट्टा लावा दोघे मिळून.

स्वप्नांची राणी's picture

14 Mar 2014 - 2:50 pm | स्वप्नांची राणी

कतार कट्टा ठरवुया का? तशी सौदी वाल्यांशी सध्या कतार ची कट्टी आहे. पण लवकरच बट्टी होईलच...

स्व. रा.,मी आले परत भारतात. नवरा आहे बाहरिनला! दिवाळीला तिथेच असशील तर नक्की करु कट्टा!

चला मग ह्या वर्षी दिवाळीत जी.सी,सी. स्पेशल कट्टा बहारीनलाच करू या....

अजया's picture

14 Mar 2014 - 4:53 pm | अजया

नक्की!!

अजयिन्गले's picture

14 Mar 2014 - 2:52 pm | अजयिन्गले

मी मिसळ पाव चा नियमित वाचक आहेस. यांबू मध्ये गेली ४.८ वर्ष आहे. माझा number (००९६६)५८१०९४८७२ आहे. भेटल्यावर बोलू .

मुक्त विहारि's picture

14 Mar 2014 - 4:48 pm | मुक्त विहारि

व्य. नि. केला आहे.....

राजेंद्र मेहेंदळे's picture

14 Mar 2014 - 2:56 pm | राजेंद्र मेहेंदळे

*drinks* *DRINK* :drink:

आदूबाळ's picture

14 Mar 2014 - 3:33 pm | आदूबाळ

यांबू कुठे आहे हे नकाशात पाहिल्यावर ते सौदीमधले मध्यवर्ती ठिकाण आहे असे समजले!

शुभेच्छा, मुवि!

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Mar 2014 - 3:35 pm | बिपिन कार्यकर्ते

यान्बू मध्यवर्ती???

आदूबाळ's picture

14 Mar 2014 - 3:57 pm | आदूबाळ

ज्या हिशोबाने डोंबिवली मध्यवर्ती त्याच हिशोबाने...

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Mar 2014 - 4:03 pm | बिपिन कार्यकर्ते

=)) =)) =))

सहमत!!!!!!!!!! ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Mar 2014 - 3:35 pm | बिपिन कार्यकर्ते

आमच्या खोबारला जाऊन या हो! खूप बदललं आहे आता म्हणा! जुबैलला पण आहेत काही मिपाकर. त्यांनाही भेटा. तिथे कट्टा नक्की होईल. बाहरिन तिथून हाकेच्या अंतरावर / नजरेच्या टप्प्यात. तिथेही आहेत काही मिपाकर. तिथेही होईल फर्मास कट्टा. वाटेत दुबै शारजा लागले तर तिथेही आहेतच लोकं!

स्वप्नांची राणी's picture

14 Mar 2014 - 3:39 pm | स्वप्नांची राणी

आणि कतार...? (वाईट वाटलेली बाहुली..)

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Mar 2014 - 3:45 pm | बिपिन कार्यकर्ते

ओये!!! तुम्ही आहात का तिथे? असलात तर कळवा! अजून पर्यंत तिथे कोणी मिपाकर असल्याचे माहित नव्हते. छान! छान! आता म्हणजे संपूर्ण GCC मधे झेंडा लागला म्हणायचा!

जय जीसीसी! जय कतार!

इरसाल's picture

14 Mar 2014 - 4:55 pm | इरसाल

आप कतार में है !

स्वप्नांची राणी's picture

14 Mar 2014 - 5:04 pm | स्वप्नांची राणी

वॉव...क्या आप भी? चलो आज ही शामको कट्टा करते है...

मुक्त विहारि's picture

14 Mar 2014 - 4:47 pm | मुक्त विहारि

तेंव्हा मिपावर नविन असल्याने, कुठल्याच मिपाकराला भेटण्याचा प्रयत्न केला नाही.

आणि माझा पहिला कट्टा अल कुंदनशेख अल ठाकुर्लीकर अल दुबैकर यांच्या बरोबरच झाला.अगदी साग्रसंगीत.

कुंदन's picture

13 Apr 2014 - 12:34 pm | कुंदन

छे , नकोच त्या आठवणी ;-)

बाहरीन हाकेच्या अंतरावर असेल तर जर्रा जोर्रात हाक मारली तर मला जोहान्सबर्गला सुद्धा ऐकु येईल.
तसेही मला वाटेत दुबै लागतेच

आता तुमचं कसं होणार तिकडे याची चिंता लागली आहे .वाळू रगडीता तेल गळणार पण XX नाही गळणार .आणि खऱ्याखुऱ्या वाकड्या चालीचे प्राणी भेटतील .बाकी तुमची उपासमार नाही होऊ देणार तुम्ही -खजुराच्या वड्या ,बदामाची चिक्की असं काही तरी असणारच .आणि हो रात्री म्हणे चांदण्या छान दिसतात .
कटट्यासाठी थांबा थोडं .

रेवती's picture

14 Mar 2014 - 5:54 pm | रेवती

अरे वा!! मुवि, अभिनंदन!

पिवळा डांबिस's picture

14 Mar 2014 - 10:13 pm | पिवळा डांबिस

फ्रॉम डोम्बू टू याम्बू!!!
जियो!!!
:)

मुक्त विहारि's picture

14 Mar 2014 - 11:09 pm | मुक्त विहारि

नेक्स्ट आम्रिका...पिडां भाऊ ह्यांच्या गढीत...आणि तिथून जोशी मठात...असा बेत आहे...

पिवळा डांबिस's picture

17 Mar 2014 - 4:02 am | पिवळा डांबिस

नेक्स्ट आम्रिका...पिडां भाऊ ह्यांच्या गढीत...

जरूर, जरूर या! आपले हार्दिक स्वागत आहे!!
एक जोरदार कट्टा करूया!!
:)

बाळकराम's picture

15 Mar 2014 - 1:52 am | बाळकराम

शाब्बास मुक्त विहारी! इकडे प्रश्न विचारून विचारून सगळ्यांना धंद्याला लावा आणि तिकडे अरबांसमवेत गुफ्तगू करा! चांगलंय :) आता तिकडे एखादी शाखा-बिखा काढून करुन टाका कल्ला :D

मुक्त विहारि's picture

15 Mar 2014 - 8:04 am | मुक्त विहारि

धन्यवाद...

सविता००१'s picture

15 Mar 2014 - 8:35 am | सविता००१

मुविकाका! अनेकानेक शुभेच्छा!

सानिकास्वप्निल's picture

15 Mar 2014 - 4:26 pm | सानिकास्वप्निल

अभिनंदन आणि शुभेच्छा मुवि :)

भाते's picture

16 Mar 2014 - 11:42 am | भाते

विमानाच्या तिकीटावर इतके पैसे खर्च करण्यापेक्षा सरळ पाठीला सामान अडकवुन गेट वे ला जाऊन समुद्रात ऊडी टाका आणि पोहत जा यांबू पर्यंत! :)

मुक्त विहारि's picture

16 Mar 2014 - 11:54 am | मुक्त विहारि

पण विमानाचे तिकीट कं. देत आहे.

(आमचा प्रवास खर्च , विमान तिकीटासह, कं. करते, ही कुणाला आत्मप्रौढी वाटू शकते.पण आमचा प्रवास खर्च कं. करते, ही वस्तूस्थिती आहे.)

भ ट क्या खे ड वा ला's picture

16 Mar 2014 - 2:37 pm | भ ट क्या खे ड वा ला

२३ मार्च ते २६ जून यांबू मध्यवर्ती ठिकाण आहे
२६ जून नंतर मुविंचा डोंबिवलीत पुन: प्रवेश होणार असल्याने डोंबिवली मध्यवर्ती ठिकाण होईल
मी पा पंचांगानुसार .....

भ ट क्या खे ड वा ला's picture

16 Mar 2014 - 2:37 pm | भ ट क्या खे ड वा ला

२३ मार्च ते २६ जून यांबू मध्यवर्ती ठिकाण आहे
२६ जून नंतर मुविंचा डोंबिवलीत पुन: प्रवेश होणार असल्याने डोंबिवली मध्यवर्ती ठिकाण होईल
मी पा पंचांगानुसार .....

बारक्या_पहीलवान's picture

16 Mar 2014 - 3:24 pm | बारक्या_पहीलवान

स्वागत आहे तुमचे सौदि अरबियाला. जुबैलला या, भरपुर मराठी बान्धव आहेत.

मुक्त विहारि's picture

16 Mar 2014 - 6:15 pm | मुक्त विहारि

माझे दुसरे घरच आहे.

तुम्ही जुबैल मराठी मंडळ जॉईन केले आहे का?

बारक्या_पहीलवान's picture

13 Apr 2014 - 3:25 am | बारक्या_पहीलवान

जुबैल मराठी मंडळ जॉईन केले आहे.

मुक्त विहारि's picture

13 Apr 2014 - 9:50 pm | मुक्त विहारि

आपली बरीच मंडळी आहेत.

नावे व्य.नि.त पाठवतो.

इन्दुसुता's picture

17 Mar 2014 - 1:09 am | इन्दुसुता

अभिनंदन मुवि आणि अनेक शुभेच्छा.

मुवि,
आता आपण सौ. अरबकर होणार हे वाचून आपल्याला तर हिमालय उशीला लागतो. आता त्याची सोय कशी काय करणार असे वाटून आमची झोप उडाली!
सोबत ४ उंट, ४ घोड़े २ वजीर, असा पटावरील फौज फाटा बाळगणाऱ्या आपणास फावल्या वेळी मिपावरील संगतीत भेटतील काही अनाहूत सल्लागार...

मुक्त विहारि's picture

17 Mar 2014 - 11:52 am | मुक्त विहारि

मनापासून धन्यवाद.

घारापुरी लेणी कट्ट्याला आपल्याबरोबर जास्त बोलता आले नाही.

जून्च्या २७/२८ ता,ला पुण्याला येत आहे.त्या सुमारास भेटूच आणि मनसोक्त गप्पा मारू.

बारक्या_पहीलवान's picture

13 Apr 2014 - 9:57 pm | बारक्या_पहीलवान

सौ. अरबकर की श्री ?

बारक्या_पहीलवान's picture

13 Apr 2014 - 9:58 pm | बारक्या_पहीलवान

सौदि अरबकर. ओके.

तिकडच्या वादींमधल्या चुळकाभर पाण्यात संताजी धनाजी दिसू लागल्यामुळे जून २५ पर्यँत सही बदलण्यात आलेली आहे .
तशी कोणाला नानू सरंजाम्याच्या उशीची गरज पडल्यास चार धाम यात्रा त्वरित करावी अथवा अमरनाथ यात्रेसाठी नाव नोंदवावे .