गेल्या नवरात्री मद्धे अचानक सुचलेली ही कविता...
आज अचानक हाती आली....
माझे आयुष्य घडवणार्या, माझ्या प्रत्येक सुखदुखात सहभागी होणार्या स्त्री शक्तीला....
उद्याच्या महिला दिनासाठी माझ्याकडुन....प्रेमपुर्वक.....
नऊ नावे नऊ रुपे नऊ तुझे अवतार,
संकटहारिणी भवभयतारिणी तुला नमस्कार..!!
आईच्या रुपात भासतो प्रेमाचा सागर,
माया ममता किती लुटु मी, त्याला अंत ना पार...!!
आज्जीचे हे रुप असे जणु समईच्या वाती,
उधळुन देइ अमुच्यावरती संस्कारांचे मोती...!!
कन्या रुप हे असे भासते जणु भाग्याचा ठेवा,
किती लोभस किती गोंडस,पाहिजे तितका लुटावा...!!
बहिण लाडकी हक्काची,ठेव जशी बालपणीची,
कधी भांडणे कधी प्रेमाने जपून जपून ठेवायची...!!
मैत्रिण म्हणजे आनंदठेवा,जपून जपून लुटावा,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वाढत वाढत जावा...!!
मावशी,आत्या किंवा म्हणा काकु,रुप एकच, नावे भिन्न,
त्यांच्याशिवाय आयुष्य आहे खुपच अपुर्ण...!!
नऊ नावे जरी वेगळी सारी तुझीच रुपे,
सदैव राहो हात मस्तकी, जगन्माते तुला विनविते...!!
- स्मिता
प्रतिक्रिया
7 Mar 2014 - 9:22 pm | आयुर्हित
माहेर सोडून येई सासरला,नाव आहे अर्धांगिनी,
सुख दुखात साथ देई,वंश वाढवे जीवन संगिनी...!!
यमाशीही भांडते,कुंकवाच्या रक्षणाला तत्पर सती,
सावित्रीशिवाय न मिळे सत्यवानाला मोक्षाची गती...!!
7 Mar 2014 - 9:45 pm | पैसा
महिलादिनाच्या शुभेच्छा!
8 Mar 2014 - 3:05 pm | आयुर्हित
सर्वांना महिलादिनाच्या शुभेच्छा!
8 Mar 2014 - 8:17 am | यशोधरा
आवडली..
8 Mar 2014 - 2:49 pm | प्रीत-मोहर
कविता आवडली
8 Mar 2014 - 3:00 pm | कवितानागेश
छान