खुप दिवसानी मिपावर आले. सहज गाण्याचा धागा पाहिला.
बरेच व्हिडियो शेअर केलेले असल्याने धागा उघडण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे गाणी पहाता येत नाही आहेत.
म्हणुन हा दुसरा भाग सुरु करत आहे.
याला ही तितकाच चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.
तर येऊद्यात आवडती गाणी आणि त्या आवडत्या गाण्याचा आठवणी.. :)
हे असेच एक माझे आवडते गाणे..कॉलेज च्या आठवणी ताजे करणारे..
प्रतिक्रिया
18 Feb 2014 - 4:32 pm | मदनबाण
धन्यवाद अक्षया... बरीच वाट पाहिली मी या धाग्याची. :)
आता मी जो व्हिडीयो देत आहे, ते गाणं नसुन थीम किंवा ऑडियो ट्रॅक आहे.
Harald Faltermeier यांनी कंपोझ केलेला "Axel F" या ट्रॅकचे रिमिक्स हा व्हिडीयो आहे.याचा ओरिजिनल ट्रॅक मी नंतर देण्याचा प्रयत्न करीन कारण आत्ता तो मला हव्या त्या स्वरुपात मिळत नाहीये.
व्हिडीयो :- क्रेझी फ्रॉग
मागच्या धाग्याचा अनुभव पाहता व्हिडीयो साईझ मोठी असल्याने धाग्यात भरपुर व्हिडीयो असले की पीसीमधले adobe shockwave player व्हिडीयोचा डेटा फेच करायला जाते व ते न-जमल्याने ब्राउजर क्रॅश होते असा निकष काढता आला आहे, तेव्हा ज्यांना या धाग्यावर व्हिडीयो शेअर करायचे आहेत त्यांनी व्हिडीयोची width="360" आणि height="215" करुनच { या पेक्षा लहान केला तरी चालेल } मग व्हिडीयो पोस्ट करावा ही नम्र विनंती.
18 Feb 2014 - 6:47 pm | आदूबाळ
त्यापेक्षा सरळ Text format: प्लेन टेक्स्ट करून लिंक देऊ या का? शेवटी क्लिक झाल्याशी कारण.
http://www.youtube.com/watch?v=k85mRPqvMbE
18 Feb 2014 - 6:52 pm | मदनबाण
हा विचार आधीच केला, पण व्हिडीयो पाहुन तो ऐकण्याची उत्सुकता अधिक निर्माण होते. लिंक द्यायला हरकत नाही,पण किती लोक ते उघडुन ऐकण्याचे कष्ट घेतील ते सांगता येत नाही.
व्हिडीयो रिसाइझ करुन टाकणे खरचं इतके अवघड आहे का ?
18 Feb 2014 - 5:21 pm | दिपक.कुवेत
एक विनंती......गाण्याचे व्हिडिओ असतीलच पण त्या आधी गाण्याची सुरवातीची ओळ तरी टाइप करत जा जेणेकरुन निदान आम्हाला गाणं गुणगुणता तरी येइल. (काय करु ऑफिसातुन तुनळि दिसत नाहि)
18 Feb 2014 - 5:28 pm | अजया
माझेही हे गाणे कॉलेजच्या आठवणीतलेच आहे!
आमच्या कॉलेजच्या पहिल्या वर्षी खूप रॅगींग चालायचे! एकट्या जुनीयर मुली कुठे जाताना पकडल्या की तिला पिडायला सुरुवात व्हायची! एकदा मला आणि मैत्रिणीला कँटिनमध्ये असताना अचानक सिनियर्सनी घेरले आणि गाणे म्हणायला सांगितले!!तेही रोमँटिक आणि त्यांच्यतल्या एकाच्या डोळ्यात बघुन! मी घाबरुन हे गाणे काय तरी म्हंटले पण त्या महाशयांनी ते लैच शिरेसली घेतले आणि मग ते येता जाता हे गाणे म्हणायला लागले.चिठ्या,गुलाब आणि काय काय!;) मग त्यांना सरळ करावे लागले आणि कॉलेजच्या पहिल्याच वर्षी या गाण्यामुळे शत्रू निर्माण झाले!!
18 Feb 2014 - 5:37 pm | सानिकास्वप्निल
अलीकडेच ब्रेकफास्ट अॅट टिफ्फनीज चित्रपट बघीतला आणी मून रिव्हर गाणं फार फार आवडून गेले
जगजीत सिंग ह्यांची कोई फरियाद गझल कॉलेजला असताना खूप ऐकली
आम्ही मैत्रीणी एकत्र अभ्यास करताना दोन गाणी नेहमीच ऐकायचो
चांदनी रातें आणी
नीले नीले अबंर पे
माझं अतिशय आवडतं गाणं
हे ही एक आवडतं गाणं
नवीन आलेल्या लुटेरा चित्रपटातील हे गाणं ही खूप आवडतं
तलाश चित्रपटातील सोना मोहापात्राचे जिया लागेना गाणं खूप आवडतं
तसेच स्वानंद किरकिरे चे ओह री चिरैया...
इकबाल चित्रपटातील आशाएं
आणी कॉलेजच्या आठवणी जागं करणारं
अग्नी बॅंडचे आहटें
अजया ताईने पहला नशा गाणं दिलेच आहे त्यामुळे ते देत नाही, पण ते गाण वन ऑफ दी फेव्ह आहे :)
खूप गाणी आहेत आवडती, किती देऊ असे झाले आहे...
18 Feb 2014 - 6:36 pm | मदनबाण
हा Axel F चा ओरिजीनल ट्रॅक. लहानपणी कधी तरी कानावर पडला होता, पण कायमचा मनात कोरला गेला.
हा Beverly Hills Cop मधे वापरला गेला आहे.
परत सगळ्यांना विनंती करतो... व्हिडीयो रिसाइझ करुन टाका प्लीज. धाग्यावर घेतली जाणारी सगळी मेहनत नंतर वाया जाईल. मागचा धागा उघडता येत नसल्याने माझ्याकडुन त्या धाग्यातली गाणी या धाग्यात रिपीट होण्याची शक्यता आहे.
18 Feb 2014 - 6:59 pm | मदनबाण
Ini Kamoze - Here Comes the hotstepper
18 Feb 2014 - 7:39 pm | मदनबाण
संस्कृतचे अनोखे अभ्यासक मधे मी दिलेल्या दुसर्या गाण्याखाली ज्या गाण्याबद्धल मी विचारणा केली होती, ते गाणं खाली देत आहे.
Auto-Tune चा वापर करुन हे गाण कंपोझ केलं आहे आणि या गाण्याच्या प्रचंड यशानंतर अनेक गाण्यात या टेक्नीकचा वापर केला गेला,"Cher Effect" म्हणुन याला ओळखले जाते.
Cher - Believe
18 Feb 2014 - 8:01 pm | मदनबाण
बाली सागु ने अनेक गाण्यांचे रिमिक्स केले,पण त्याचे सगळ्यात जास्त रिमिक्स गाणे गाजले ते म्हणजे चुरालिया. :)
Bally Sagoo - Chura Liya
18 Feb 2014 - 8:14 pm | मदनबाण
अमेरिकन रॅपर Vanilla Ice याचे Ice Ice Baby हे हिप-हॉप गाणे आहे, पहिल्या काही अल्बम मधे याला यश आले नाही,परंतु एका डिस्क जॉकी ने त्याचे हे गाणं वाजवलं आणि त्यानंतर तो यशाच्या शिखरावर पोहचला ! बिलबोर्ड टॉप चार्ट मधे येणारे हे पहिले हिप-हॉप गाणे होते. :)
Vanilla Ice - Ice Ice Baby
18 Feb 2014 - 8:48 pm | मदनबाण
हे मूळ गाणं स्पॅनिश आहे, ज्याच्या मधे Clave रिदम पॅटर्नचा वापर केला गेला आहे, जो मुखत्वे आफ्रो-क्युबन संगीतात केला जातो. या गाण्याच्या प्रभाव इतका होता, की जवळपास सगळ्यांच्या ओठात ये गाणं अलगद येउन बसलं होत, इतकं ही कमल हसनच्या चाची-४२० मधे त्याची मुलगी तब्बु समोर हेच गाणं गाण्याचा हट्ट धरते ! ओळखलं कुठल ?
माकारिना... ;) याची २ व्हर्जन्स इथे देतो:-
18 Feb 2014 - 7:13 pm | केदार-मिसळपाव
हे घ्या
छन छन
काले काले बादल
मराठी
राजहंस सांगतो किर्तीच्या तुझ्या कथा
कधी रे येशील तू
18 Feb 2014 - 9:11 pm | अजया
काही अत्यंत आवडती गाणी
18 Feb 2014 - 10:04 pm | सानिकास्वप्निल
आ भी जा....
ऐ अजनबी
ये हसीं वादियाँ
ये हौंसला
जाने क्या बात है
सिली हवा छू गयी
बावरा मन देखने चला एक सपना
नही सामने तू
तिनका तिनका
तेरे मेरे होठों पे
देखा एक ख्वाब
ये कहा आ गये हम
अजिब दास्तां है ये
आपकी नजरोंने ...
लग जा गले
ये दिल तूम बिन कही
2 Mar 2014 - 10:08 am | किसन शिंदे
चोक्कस..
माझं प्रचंड काम वाचवलंस, हि सगळीच्या सगळी गाणी टाकून. :)
18 Feb 2014 - 11:01 pm | खटपट्या
अगागागा !!!! आख्खा चित्रहार आलाय हितं.
फावल्या वेळेसाठी चांगला धागा.
19 Feb 2014 - 6:42 am | मदनबाण
माधुरीला विसरुन कसे चालेल ? ;)
20 Feb 2014 - 3:24 pm | महेश रा. कोळी
http://www.youtube.com/watch?v=E-FivmXWUQ0 केतकीच्या बनी तिथे......
20 Feb 2014 - 4:38 pm | पिलीयन रायडर
Web Page Blocked शिवाय काहीही दिसत नहिये.. :(
1 Mar 2014 - 4:44 pm | पैसा
आणि एक
2 Mar 2014 - 10:04 am | किसन शिंदे
वाह!!
एकापेक्षा एक सरस गाणी या धाग्यात पाहायला/ऐकायला मिळाली. अक्षयाने दिलेलं 'ऐ मेरे हमसफर' माझं ऑल टाईम फेवरीट गाणं आहे. उदीत नारायणचा काय जब्ब्रर आवाज लागलाय या गाण्यात.
सानिका तैंनी टाकलेल्या नव्या गाण्यांपैकी सवाँर लू आणि जिया लागे ना ही दोन्ही गाणीही ऐकायला मस्त वाटतात आणि जाम आवडीची आहेत.
अजया ताईंनी टाकलेल्या गाण्यांपैकी सरफरोश मधलं 'होशवालो को' आणि बॉम्बे मधलं 'तू ही रे' ही दोन्ही गाणी प्रचंड आवडीची आहेत.
हि माझ्या आवडीची काही गाणी..
ये हसी वादीयाँ
साधना सरगमच्या आवाजातलं 'चुपके से'
हम तूमचं टायटल साँग
पावसाळी दुपार, बाहेरच्या कुंद वातावरणात पाऊस धोधो कोसळतोय, घरातल्या खिडकीत बसून चहाचा एक एक घुटका मारत तुम्ही त्या पावसाकडे टक लावून पाहताय आणि मागे हे गाणं लागलंय....कल्पना करून बघा! :)
शिव-हरी या संगीतकार द्वयीने या चित्रपटाला दिलेलं संगीत म्हणजे निव्वळ अप्रतिम! एक वेगळा लेख निघेल यावर.
4 Mar 2014 - 2:10 pm | अस्मी
एकदम मस्त धागा...खूप छान गाणी परत ऐकली ह्या धाग्यामुळे :)
आधीच वर खूप जणांनी खूप आवडती गाणी दिलेली आहेतच; आता ही माझी थोडीशी भर...
4 Mar 2014 - 2:15 pm | अक्षया
वाह..एकापेक्षा एक छान गाणी शेअर केली आहेत सगळ्यांनी. :)