स्विकार...

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
22 Feb 2014 - 5:34 am

तुझे मुलायम मउ दोन्ही हात
आजही ह्रुदयापाशी घट्ट कवटाळुन ठेवले आहेत मी..
कधी कधी प्रचंड एकटं वाटल्यावर
शोधुन काढतो अडगळीत गेलेल्या फाइल सारखं...काही क्षण!
माहित असतं नंतर ..

पुन्हा तोच एकाकीपणा मला
छळायला येणार आहे...
आणि पुन्हा काही काळ त्याचा हिशेब चुकता झाल्यावर.... पुन्हा तुझ्या हातांची..त्यामागल्या स्पर्शांची वेडी हुरहुर!

कधी कधी मला प्रश्न पडतो... मानवी मन... नाते ... संबंध... त्यातील व्यवहार... हे सर्व या दोन टोकांच्या मधल्या ताटातुटीवर बेतलेले आहे का गं?

मग येते काही क्षणांची विमनस्कता... त्यावरची काही उत्तरं... आणि पुन्हा जीवनाच्या अखंड न थांबणाय्रा प्रवासाचा अपरिहार्य स्विकार... हेच निसर्गानी माणसाला शिकवलेलं रोखठोक उत्तर असावं... यावरचं!!!

शांतरसमुक्तक

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

22 Feb 2014 - 8:43 am | प्रचेतस

चालायचंच आत्मुदा.

लग्नानंतर सासरी गेलेल्या मुलीच्या आठवणीने हळवा झालेल्या बापाचे मनोगत छान मांडले आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Feb 2014 - 9:50 am | अत्रुप्त आत्मा

काय भावनेचा छडा लावलाय पण!
खरच बापमाणुस आहेस तू धन्या!

धन्या मला तर हे आय्सिआय्सिआय मधील नाजुक हाताने घायाळ झालेले एका दिलफेक खातेदाराचे मनोगत वाटते.:-D
गुरजी पण मला आवडले नाही. त्यापेक्षा तुमचा खोकले अवतार पुनुर्ज्जिवित करा पाहू. :-D
माझा कुणाचा वाला ;-)

आनन्दिता's picture

22 Feb 2014 - 9:02 am | आनन्दिता

कधी कधी मला प्रश्न पडतो... मानवी मन... नाते ... संमंध... त्यातील व्यवहार.

संमंध ?? संबंध असायला हवंय का?

पण चांगलं लिहिलंय..

संमंध ?? संबंध असायला हवंय का?

बहुतेक ते संमंध असंच असावं. अतृप्त आत्म्याने लिहिलेली कविता आहे ना.

प्रचेतस's picture

22 Feb 2014 - 9:15 am | प्रचेतस

=))

आणि 'अतृप्त' नाही, अत्रुप्त.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Feb 2014 - 10:14 am | अत्रुप्त आत्मा

@संमंध ?? संबंध असायला हवंय का? >>> बरोब्बर... संबंध-- हाच योग्य शब्द आहे.माझा या शब्दाबाबत अनेकदा घोटाळा होतो.

(संपादकांना विनंती:- प्लीज शब्दबदल करुन द्या ना. :) )

@पण चांगलं लिहिलंय.. >>> धन्यवाद. :)

प्रचेतस's picture

22 Feb 2014 - 10:16 am | प्रचेतस

संबंध-- हाच योग्य शब्द आहे.माझा या शब्दाबाबत अनेकदा घोटाळा होतो.

घोटाळा होणारच. संमंध हा शब्द तुम्हाला नेहमीच जास्त जवळिकीचा वाटत असणार.

यशोधरा's picture

22 Feb 2014 - 10:13 am | यशोधरा

छान लिहिलंय, काय रे उगाच टवाळी लावलीय? आत्मा मानगुट पकडेल तेह्वा समजेल :D

प्रचेतस's picture

22 Feb 2014 - 10:21 am | प्रचेतस

छ्या.
कैतरीच तुमचं.
टवाळी कुठे दिसली म्हणे तुम्हाला?

सस्नेह's picture

22 Feb 2014 - 12:05 pm | सस्नेह

नक्की कोण चावलं आत्माबुवांना, अकु की मोजी ...?

चाणक्य's picture

22 Feb 2014 - 12:48 pm | चाणक्य

पण मग नंतर उगाच फिलऑसॉफीकल झाल्यासारखी वाटली

चौकटराजा's picture

22 Feb 2014 - 12:54 pm | चौकटराजा

अ आ याना कोणा माणसाची चावायची टाप आहे? नक्कीच समंध चावला. बुवा, काय असल्या हळव्या कविता लिहिता राव ?

अत्रुप्त आत्मा's picture

22 Feb 2014 - 1:36 pm | अत्रुप्त आत्मा

@बुवा, काय असल्या हळव्या कविता लिहिता राव ?>>> हम्म्म... बरोबर आहे आपलं! एकदा विदुषकाची टोपी चढली,की माणसानी 'आपण हळवे आहोत' हे ही विसरुन जायला पाहिजे. पडेल मला हळुहळू सवय. :)

बस कर पगले, अब रूलायेगा क्या?

अत्रुप्त आत्मा's picture

22 Feb 2014 - 1:53 pm | अत्रुप्त आत्मा

रोइये जी खुषी से,रोके गा कोइ थोडे ही!? :)

प्रचेतस's picture

22 Feb 2014 - 1:55 pm | प्रचेतस

:)

आत्मशून्य's picture

23 Feb 2014 - 12:28 am | आत्मशून्य

एव्ह्ड्याचसाठी अत्रुप्ती फक्त वैचारिक राखावी हेच बरे.

मुक्त विहारि's picture

23 Feb 2014 - 7:54 am | मुक्त विहारि

"मानवी मन... नाते ... संबंध... त्यातील व्यवहार... हे सर्व या दोन टोकांच्या मधल्या ताटातुटीवर बेतलेले आहे का गं?"

मस्त

आवडले....

मनीषा's picture

24 Feb 2014 - 2:51 pm | मनीषा

मग येते,
काही क्षणांची विमनस्कता...
त्यावरची काही उत्तरं...
आणि पुन्हा जीवनाच्या
अखंड न थांबणाय्रा प्रवासाचा
अपरिहार्य स्विकार...

सुरेख !

पैसा's picture

24 Feb 2014 - 8:22 pm | पैसा

मस्त लिहिलंत! आता प्रवास जरा थांबवा.

स्पंदना's picture

25 Feb 2014 - 5:24 am | स्पंदना

गाडी स्टेशनात न्या म्हणायच आहे का?

पैसा's picture

25 Feb 2014 - 8:27 am | पैसा

अगदी अगदी!

अत्रुप्त आत्मा's picture

25 Feb 2014 - 8:48 am | अत्रुप्त आत्मा

:)

सहमत!! गाडी ठेसनात पोचू देत लवकर अशा शुभेच्छा !! ;)

इन्दुसुता's picture

25 Feb 2014 - 9:36 am | इन्दुसुता

प्रिय व्यक्तिचा विरह, त्यातून आलेली व्याकुळता आणि असहाय्य्पणा अगदी व्यवस्थितपणे जाणवतो.....

रोइये जी खुषी से,रोके गा कोइ थोडे ही!?

कौन रोता हैं किसी और की खातिर ऐ दोस्त? सबको अपनीही किसी बात पे रोना आया.....

अवांतर : @धन्या : खुर्चीतून पडले हो!!!! :D

विटेकर's picture

25 Feb 2014 - 5:17 pm | विटेकर

स्विकार नाही हो .. स्वीकार !
.
.
.
.
.
.
.
.
.
.
,
,
प्रतिसाद संपला.

प्रचेतस's picture

25 Feb 2014 - 5:19 pm | प्रचेतस

अहो, वेलांटी नाही; भावना महत्वाच्या. नाही का?

अत्रुप्त आत्मा's picture

25 Feb 2014 - 10:54 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/sad/upset-smiley-emoticon.gif

त्यांनी अत्रुप्त आत्मा असा आयडी घेतलेला असूनही तुम्ही शुद्धलेखन सुचवताय म्हटल्यावर तुमच्या धाडसाला त्रिवार मुजरा !!

विटेकर's picture

25 Feb 2014 - 5:55 pm | विटेकर

खरं आहे तुमचं !
आम्ही त्यांना त्यांच्या अ"त्रु"प्तीसह "स्वि"कारले आहे.