कोणताही पूर्वग्रह न ठेवता हा लेख वाचावा .मी ५० /१०० प्रतिसादांसाठी (ट्यार्पी) लिहिलेले नाही.यामध्ये कोणतीही झैरात/झायारात/जाहिरात करण्याचा हेतू /उद्देश नाही. बाकी आपल्या अनुभवांचे अर्थातच स्वागत आहे.
माझी मैत्रीण ,जिने मला माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात वाईट आणि कठीण प्रसंगात मला साथ दिली ,आधार दिला, मला समजून घेतेलं आणि माझी खूप काळजी घेतली ती आमच्या प्यांटवाल्यांची आई ,अर्थातच माझ्या सासूबाई. :)
अतिशय प्रेमळ ,नेहमी गोड बोलणाऱ्या ,कोणालाही कधीही न दुखावणार्या अशा माझ्या सासूबाई, सौ.सुमती. जेंव्हा माझ लग्न ठरलं होत तेंव्हाच मला त्यांच्या स्वभावाची प्रचीती आली होती.त्याचं आयुष्य एका खेड्यात गेल. त्यांनी नेहमीच प्रत्येक परिस्थिती आनंदाने स्वीकारली .कधीही कोणती तक्रार नाही अगदी नशिबाविषयी सुद्धा .मला त्यांची सगळ्यात आवडणारी गोष्ट ,त्या कायम हसतमुख असतात . :)
माझ्या लग्नानंतर ८ दिवसात माझे वडील खूप आजारी पडले.त्यांची अञ्जिओप्लास्टी करावी लागली. ज्या क्षणी मला फोन आला त्या वेळी त्या माझ्या बरोबर घरी होत्या . फोनवर बोलत असताना मी रडू लागले .मला त्या वेळी काहीच समजत नव्हते.फोन संपल्यावर मी एकच वाक्य बोलले ,बाबांना अडमिट दवाखान्यात भरती केलाय.मी जाऊ का? त्या मला लगेच म्हणाल्या तू एकटी जाऊ नकोस ,मी पण येते. मग मी आवरलं आणि त्या दुधानी भरलेला कप घेऊन आल्या कारण सकाळची वेळ होती ,माझे सासरे आणि माझे अहो नुकतेच ऑफिस गेले होते आणि आमचा नाश्ता झाला नव्हता . माझी इच्छा नसताना मला जबरदस्ती घ्यायला लावलं .मी अर्धा कप घेतलं आणि त्यांना अर्धा कप
दिल.त्या दिवसांमध्ये त्यांनी मला जो आधार दिला तो मी कधीही विसरणार नाही .
त्या घटने नंतर ७ - ८ महिन्यातच माझे वडील गेले .तेंव्हा १५ दिवस त्या माझ्याबरोबर माझ्या माहेरी राहिल्या .माझ्या आईची काळजी घेतली, अगदी आईच्या हातात जेवणाच ताट दिल ,समजूत घालून थोडस खायला लावलं .स्वताच्या सुनेच्या आईशी , आपल्या विहिणीशी इतक्या प्रेमाने वागणारी स्त्री मी तरी पहिल्यांदा पहिली .
त्यांनी माझ्यासाठी जे केल ते त्याची परतफेड होऊ शकणार नाही असे मला वाटते .
मागच्या मे महिन्यात त्या एका गंभीर आजाराने त्रस्त होत्या .आता त्या आजारातून पूर्णपणे बर्या झाल्या आहेत . त्या अशाच हसतमुख राहाव्यात आणि मला त्यांचा सहवास जास्तीत जास्त मिळावा हीच भगवंताकडे प्रार्थना करते.तुमच्या सदिच्छा आणि आशीर्वाद आमच्या पाठीमागे असतील अशी मी अशा करते .
सासू सुना ह्या मायलेकी होऊ शकणार नाहीत कदाचित पण चांगल्या मैत्रिणी निश्चित होऊ शकतात. प्रत्येक घरामध्ये जर अशी मैत्री झाली तर बर्याचश्या समस्या कमी होतील. नवऱ्याच मन जिंकायचं असेल तर आधी त्याच्या माणसांना आपलंस कराव ,त्यांना जिंकाव हे मी माझ्या अनुभवातून शिकले आहे. माझ्या सगळ्या मैत्रीणीना मी हेच सांगेन कि सासूशी मैत्री करा ,तुमचा संसार सुखाचा होईल.
माझे विचार मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या पूर्ण लेखामधून आपल्याला वाटेल तसा अर्थ काढून लेखाचा मूळ विषय बदलवू नये ही विनंती . शेवटी
I am responsible for what I say ,not for what U understand. :)
प्रतिक्रिया
18 Feb 2014 - 5:28 pm | सूड
अनाहितामधलं चुकून इथे आलंय का?
18 Feb 2014 - 5:31 pm | दिव्यश्री
अजून मी अनाहिता मध्ये सामील झाले नाही .
18 Feb 2014 - 5:49 pm | सूड
>>अजून मी अनाहिता मध्ये सामील झाले नाही .
ह्म्म्म, आलं लक्षात!! *JOKINGLY*
20 Feb 2014 - 5:29 am | अनन्त अवधुत
हे 'अनाहिता' काय आहे?
चुकिचा प्रश्न असल्यास माफ करा (नया हू मै :))
18 Feb 2014 - 7:18 pm | आदूबाळ
नाही. मुपी आणि मिपा मध्ये गोंधळ झालाय बहुतेक.
18 Feb 2014 - 8:06 pm | दिव्यश्री
ठीक आहे ...मी धागा उडवायची विनंती करते सं.म.
खुश ?
आणि काही लिहिणार नाही इथून पुढे .डबल खुश ??
18 Feb 2014 - 8:28 pm | आदूबाळ
तुम्ही फार लवकर चिडता. जसा तुम्हाला लिहिण्याचा हक्क आहे तसा आम्हाला (वाचकांना) बर्यावाईट प्रतिक्रिया देण्याचाही आहे. त्रागा करून काय साध्य होणार आहे?
19 Feb 2014 - 10:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
या वाक्यातून दिसणाऱ्या स्त्रीद्वेष आणि अनाहिताद्वेषाचा निषेध.
(Chauvinism या अर्थी द्वेष हा शब्द वाचणे.)
20 Feb 2014 - 1:14 am | बॅटमॅन
या आल्या स्त्रीद्वेषप्रेमी =))
20 Feb 2014 - 1:53 am | अर्धवटराव
=))
=))
=))
18 Feb 2014 - 5:45 pm | सुप्रिया
बरं वाटतं असं काही वाचालं की.
18 Feb 2014 - 5:47 pm | आयुर्हित
उत्तम लेख लिहिताय आणि तंबीही छान देत आहात!
त्यांचा आपणा सर्वांना जास्तीत जास्त सहवास मिळावा यासाठी आमच्या सर्वांच्या सदिच्छा आणि भगवंताकडे प्रार्थना!
कुठलाही गंभीर आजार पूर्ण बरा करण्यासाठी आमची मदत हवी असेल तर कळवावे आपली प्रार्थना नक्कीच फलद्रूप होईल.
18 Feb 2014 - 7:37 pm | श्रीरंग_जोशी
आयुर्हित यांच्याशी सहमत.
शीर्षक वाचून लेख उघडला, पण प्रत्यक्ष विषय अपेक्षेपेक्षा वेगळाच निघाला.
पुढील लेखनास शुभेच्छा!!
18 Feb 2014 - 8:26 pm | स्पा
छान लिहिलय
18 Feb 2014 - 9:33 pm | प्यारे१
अक्का,
काहून चिडू र्हायले?
लेख चांगला जमलाय. लिहीत रहा!
18 Feb 2014 - 9:53 pm | तुमचा अभिषेक
सासू सुना ह्या मायलेकी होऊ शकणार नाहीत कदाचित पण चांगल्या मैत्रिणी निश्चित होऊ शकतात.
+७८६
चांगला विचार मांडलात
नवर्याच्या आईवर प्रेम करा तो तुमच्यावर करू लागेल, याचाच वायसे वर्सा सल्ला नवर्यांनाही देता येईल..
18 Feb 2014 - 10:05 pm | तुमचा अभिषेक
तश्या आमच्या सासूबाईही खूप चांगल्या आहेत. शिक्षिका आहेत, पण नुसते पेश्याने नाही तर विचारांनेही जे त्यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीतच जाणवले. आमच्या आंतरजातीय प्रेमाबद्दल जेव्हा एकमेकांच्या घरी समजले तेव्हा पहिला होकार त्यांच्याकडून आला. पण तो थेट नाही तर त्यांनी सर्वप्रथम माझी बाहेर एका हॉटेलमध्ये भेट घेऊन माझ्याशी तासभर चर्चा करून मगच मुलगा पसंद आहे असे कळवले. इतरांचे होकार मात्र पुढचे सहा-आठ महिने वर्षभर हळूहळू मनाची तयारी करत येतच होते.
बाकी आजही त्यांना आपला निर्णय कसा बरोबर ठरला याचे कोण कौतुक :)
18 Feb 2014 - 9:59 pm | मुक्त विहारि
छान लिहीला आहे...
आवडला...
18 Feb 2014 - 10:31 pm | दिव्यश्री
काही म्हणींची प्रचिती आली ... असो ...अजून तरी मिपा.च मुपी. झाल नाही पण ते लवकरच होऊ शकेल हे मात्र नक्की कारण मुपी हे लेखांपेक्षा प्रतिक्रियांसाठी जास्त प्रसिद्ध आहे.चाणक्य नीती मधल्या एका वाक्याची आठवण येते ते अशाप्रकारचे आहे कि लोकांसमोर आपली दुःखे सांगू नयेत / मांडू नयेत त्यांनी जास्त त्रास होतो .हल्ली लोकांना फक्त करमणूक हवी आहे मग ती कशाही प्रकारे चालते .जितके लिहू तितके कमी आहे. फक्त सगळ्यांनी एका सुरात मिपा हे कुटुंब आहे ई. ई . बोलू नये . कारण माझ्या सारखे लोक याच बोलण्याला बळी पडतात. हे कोणालाही उद्देशून नाही.परत याच्या वरती मी काहीच(स्पष्टीकरण देणार नाही) बोलणार नाही.
18 Feb 2014 - 11:25 pm | रामपुरी
हे नक्की काय आहे ते कळलं नाही पण
"अजून तरी मिपा.च मुपी. झाल नाही पण ते लवकरच होऊ शकेल हे मात्र नक्की"
हे बरीक एकदम पटलं हो. अगदी मनाला भिडलं.
19 Feb 2014 - 12:35 am | प्रसाद गोडबोले
अहो तुम्ही असे रीप्लाय देता आणि मग लोकांच्या कल्पना शक्तीला किक बसते...
आता माझा मित्र (सासरेबुवा) ज किंव्वा माझी मैत्रीण (मेहुणी ;) ) असे लेख येण्याची दाट शक्यता आहे =))
18 Feb 2014 - 10:53 pm | खटपट्या
लेख आवडला आहे.
लिखते रहो
18 Feb 2014 - 11:13 pm | प्रसाद गोडबोले
आत्ता वाटलं की अनाहिता पेक्षा अबोली हेच नाव जास्त योग्य आहे =)))
19 Feb 2014 - 12:31 am | बॅटमॅन
=)) =)) =))
नयी है वह ;) =))
19 Feb 2014 - 12:58 am | अर्धवटराव
=))
19 Feb 2014 - 1:37 am | बॅटमॅन
;) =))
18 Feb 2014 - 11:46 pm | एस
कोणताही पूर्वग्रह न ठेवता हा लेख वाचावा .मी ५० /१०० प्रतिसादांसाठी (ट्यार्पी) लिहिलेले नाही.यामध्ये कोणतीही झैरात/झायारात/जाहिरात करण्याचा हेतू /उद्देश नाही. बाकी आपल्या अनुभवांचे अर्थातच स्वागत आहे.
आणि
माझे विचार मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या पूर्ण लेखामधून आपल्याला वाटेल तसा अर्थ काढून लेखाचा मूळ विषय बदलवू नये ही विनंती . शेवटी
I am responsible for what I say ,not for what U understand. Smile
हे वजा केल्यास लेख मनाला भिडणारा आहे. बाकी सगळे अनावश्यक. मिपाला ओळखलंच नाही तुम्ही! असोत.
स्वताच्या सुनेच्या आईशी , आपल्या विहिणीशी इतक्या प्रेमाने वागणारी स्त्री मी तरी पहिल्यांदा पहिली
माझ्या दोन्ही आज्ज्या एकमेकींच्या खूप छान मैत्रिणी होत्या. प्रचंड आपुलकीचे व आदराचे नाते परस्परांशी. तुमच्या लेखामुळे माझ्या दिवंगत आजीची आठवण झाली. धन्यवाद! पुलेशु.
18 Feb 2014 - 11:46 pm | बिपिन कार्यकर्ते
बस कर पगली! अब रूलायेगी क्या! ;)
(ह. घ्या हो! लेखन आवडले.)
18 Feb 2014 - 11:54 pm | बहुगुणी
पण तुमच्या त्राग्याने केलेल्या प्रतिक्रिया अनावश्यक आहेत असं नक्कीच वाटलं.
तुमच्या "मैत्रिणी"चं मनःपूर्वक अभिनंदन, आणि त्यांना निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा!
19 Feb 2014 - 12:31 am | आत्मशून्य
काही चांगले वाचल्याचे समाधान लाभले...!
19 Feb 2014 - 12:47 am | रेवती
छान लिहिलाय लेख! खरंतर आणखी लिहिले असते त्यांच्याबद्दल तर छान झाले असते.
आता तुमचे पुढचे लेखन येण्याआधी इतरांच्या लेखनास आपले प्रतिसाद यावेत अशी इच्छा व्यक्त करते हो तै!
19 Feb 2014 - 2:04 am | लौंगी मिरची
आवडले . लिहित रहा
आणि प्रतिक्रियांवर एवढे लक्ष देऊ नका , एकदा लिहुन लोकांसमोर मांडले कि ते गंगार्पण केले
असे समजावे . मागे वळुन पाहु नये
लेख उत्तम लिहिला आहे , आवडला .
19 Feb 2014 - 3:27 am | प्रभाकर पेठकर
>>>>त्यांनी नेहमीच प्रत्येक परिस्थिती आनंदाने स्वीकारली .कधीही कोणती तक्रार नाही अगदी नशिबाविषयी सुद्धा .मला त्यांची सगळ्यात आवडणारी गोष्ट ,त्या कायम हसतमुख असतात .
किती उत्तम व्यक्तिमत्त्वाच्या सानिध्यात आपण आहात. तेच व्यक्तिमत्व अंगिकारण्याचा प्रयत्न केलात तर आपणही नाम कमवाल.
>>>>मी पण येते. मग मी आवरलं आणि त्या दुधानी भरलेला कप घेऊन आल्या कारण सकाळची वेळ होती ,माझे सासरे आणि माझे अहो नुकतेच ऑफिस गेले होते आणि आमचा नाश्ता झाला नव्हता . माझी इच्छा नसताना मला जबरदस्ती घ्यायला लावलं .मी अर्धा कप घेतलं आणि त्यांना अर्धा कप दिल.त्या दिवसांमध्ये त्यांनी मला जो आधार दिला तो मी कधीही विसरणार नाही .
अशा अनेक सासूबाई प्रेमळ असल्याचं ऐकलं/पाहिलं आहे. सगळ्याच सासूबाई (हल्ली तरी) खाष्ट नसतात. शिक्षण, आर्थिक आणि विचार स्वातंत्र्यामुळे हल्लीच्या सुना खाष्टपणा सहनही करीत नाहीत. त्यामुळे 'ललिता पवारी' सासू आता हळू हळू काळाच्या पडद्या आड जात आहे आणि 'आशा काळे' सुनही औषधालाही सापडत नाही.
>>>>त्यांनी माझ्यासाठी जे केल ते त्याची परतफेड होऊ शकणार नाही असे मला वाटते .
त्यांच्या सारखंच बनायचं ह्याहून वेगळी अशी परतफेड ती काय असणार? शुभेच्छा..!
>>>>>माझ्या सगळ्या मैत्रीणीना मी हेच सांगेन कि सासूशी मैत्री करा ,तुमचा संसार सुखाचा होईल.
सल्ला एकतर्फी आहे. सगळ्या मैत्रिणींना सांगा की सासूशी मैत्री करा तसेच तुमच्या सुनेशीही मैत्री करा. तुमचा संसार सुखाचा होईलच आणि सुनेचा संसारही तुम्ही सुखाचा कराल.
19 Feb 2014 - 2:27 pm | आनन्दा
च्या मारी. धागा भरकटवायचा नाही म्हणून मी शांत होतो. पण हा शालजोडीतला पाहिला आणि राहवले नाही. पेठकरकाका, भारीच हं.
19 Feb 2014 - 11:58 am | दिव्यश्री
सगळ्या प्रतिसाद देणार्यांचे आभार... :)
सुप्रिया ,आयुर्हित, श्रीरंग जोशी ,स्पा ,प्रशांत आवले,तुमचा अभिषेक ,मुक्तविहारि,खटपट्या,बहुगुणी ,आत्मशुन्य ,रेवती ,लौंगी मिरची आणि पेठकर काका धन्यवाद . :)
पेठकर काका त्यांच्या सारख बनण्याचा प्रयत्न चालू आहे .तरीही ज्या ज्या प्रसंगांमध्ये त्यांनी मला साथ दिली ते खरच कौतुक करण्याजोग आहे.
सल्ला एकतर्फी दिला कारण माझ्या बरोबरीच्या मुलींना सल्ला मी देऊ शकते .ज्यांनी २५-३० वर्षे संसार केला त्यांना मी काय सांगणार .
अभिषेक नवर्याच्या आईवर प्रेम करा तो तुमच्यावर करू लागेल ,याचाच वायसे वर्सा सल्ला नवर्यांनाही देता येईल..>>>ते इतक सोप्पं नाहीये .
आयुर्हित...कोणालाही मी तरी तंबी देऊ शकत नाही .कुठलाही गंभीर आजार पूर्ण बरा करण्यासाठी आमची मदत हवी असेल तर कळवावे आपली प्रार्थना नक्कीच फलद्रूप होईल.>>> लवकरच संपर्क करेन .
19 Feb 2014 - 11:01 pm | खटपट्या
देव न करो आणी तुम्ही आजारी पडो.
19 Feb 2014 - 12:35 pm | शिल्पा नाईक
वा डोळे पाणावले. खरोखर.
नशीब आहे तुला अश्या सासुबाई मीळाल्या.
लग्ना आधी कसलं व्रत केल होतस गं? :D
19 Feb 2014 - 1:43 pm | दिव्यश्री
माझ्या वडिलांच्या माणसाच्या कर्मावर विश्वास होता.ते म्हणायचे तुम्ही शिकत आहात , आधी अभ्यास करा . माझ्या माहेरी सोवळ -ओवळ ,अति पूजा-उपासतापास हा प्रकार नव्हता. पण तरीही मातोश्रींची इच्छा असायची म्हणून मग काही उपास केले जायचे त्यापैकी हरतालिका एक. तेंव्हा हि माझ आणि आईच मतभेद असायचंच.एकदा मी सरळ तिला विचारलच होत फार मोठ्या प्रमाणावर साग्रसंगीत हा उपास आणि पूजा केली जाते मग सगळ्यांना शंकरासम नवरे का मिळत नाहीत , घटस्फोट का होतात ई.पण शेवटी मीच माघार घेतली .आमच प्यांटवलं आहेत शंकरासम शीघ्रकोपी आणि प्रेमळही. *beee* :D
बाकी माझ्या सासुबैनी खरच उपास केले होते मुलाच्या लग्नासाठी आणि चांगली बायको मिळावी म्हणून .
नशीब आहे तुला अश्या सासुबाई मीळाल्या.>>> माझ्या आई-वडिलांची पुण्याई आहे हि . :)
19 Feb 2014 - 1:10 pm | प्रदीप
ह्यावरून अवचित एका जुन्या, हळव्या गाण्याची आठवण झाली. हे गीत थोडे idealistic वगैरे वाटते, पण प्रत्यक्षात तशी व्यक्तिमत्वे असतात, ह्याचा तुमच्या लेखावरून पडताळा आला:
लिंबलोण उतरता अशी का झालीस ग बावरी
मुली तू आलीस अपुल्या घरी
हळदीचे तव पाउल पडता
घरची लक्ष्मी हरखुन आता
सोन्याहुनी ग झाली पिवळी
मांडवाला कवळुन चढली चैत्रवेल ही वरी
भयशंकित का अजुनी डोळे ?
नको लाजवू सारे कळले
लेकीची मी आहे आई
सासुरवाशिण होऊन मीही आले याच घरी
याच घरावरी छाया धरुनी
लोभ दाविती माय पक्षिणी
हसते घर हे तुझ्या दर्शनी
सुखव मलाही आई म्हणुनी बिलगुनि माझ्या उरी
गीतकारः पी. सावळाराम . संगीतः वसंत प्रभू, गायिका: लता मंगेशकर
http://www.aathavanitli-gani.com/Song/Muli_Tu_Aalis_Apulya
19 Feb 2014 - 1:28 pm | दिव्यश्री
वा... अतिशय सुंदर गाणे आहे हे ...मला आवडते . :)
19 Feb 2014 - 2:28 pm | पियुशा
छान ग दिव्यश्री आवडेश लेख :)
देव करो अन मलाही अशीच सासु मिळो ;)
( बाकी मिपावर टोंमणे मारणार्यांची कमी नाही ,एक ढुंढॉ हजार मिल जायेंगे ,डरनेका नै अभी तो शुरुवात हे धीरे धीरे समझ जाओगी :) )
19 Feb 2014 - 3:11 pm | प्यारे१
आला ड्यु आयडी! :-/
19 Feb 2014 - 3:23 pm | तुमचा अभिषेक
हा कसा ओळखतात?
19 Feb 2014 - 4:16 pm | अभ्या..
ओळखायला थोडा नीच पणा पुरतो.
डु आयडी करून लिहायला ज़रा जास्त नीच पणा लागतो.
हे सगळे करून मी नाही त्यातला असे दाखवायला मात्र नीच पणाचा सुपरस्टार असायला पाह्यजे. ;-)
19 Feb 2014 - 5:08 pm | पियुशा
@ अभ्या कुणाला उद्देशुन लिहिलयेस हे ? मला ? ? ? ?
19 Feb 2014 - 5:35 pm | बॅटमॅन
हा हा हा, जबरीच रे अभ्या ;)
21 Feb 2014 - 1:59 pm | तुमचा अभिषेक
पण जर अंदाज चुकला तर?
जर एखाद्या खर्याखुर्या व्यक्तीवर फेकचा आरोप होऊन ती दुखावली गेली तर..
तर हे नीचपणाच्या कोणत्या कॅटेगरीत मोडेल..
19 Feb 2014 - 3:48 pm | पियुशा
आले काका " तेल ओतायला " :p
19 Feb 2014 - 5:54 pm | संजय क्षीरसागर
त्या प्यांटवाल्याचं मात्र कठीण आहे! आणि प्यांटवाल्याचे बाबा तर निव्वळ नाममात्र दिसतायंत!
19 Feb 2014 - 6:02 pm | पिलीयन रायडर
आई आणि बायको ह्यांच चांगलं जमत असेल तर मग जगात कोणती अवघड गोष्ट शिल्लक रहाते नवर्यांसाठी?
कशा वरुन? लेखात उल्लेख नाही म्हणुन?
19 Feb 2014 - 6:09 pm | दिव्यश्री
धन्यवाद ...पिरा...उलट आमच जमत म्हणून आम्ही खर्या अर्थाने सुखी आहोत म्हणावे लागेल कारण आमच्या घरात आम्ही शांतता राहू देतो उगीचच कचकच करत नाही . दोन बायकांचे जमते म्हणून खूप लोकांना वा ई ट वाटते काही तर बोलूनही दाखवतात आम्हाला आमच्या समोर ...
19 Feb 2014 - 6:14 pm | बॅटमॅन
शांत (गदाधारी?) पिरा शांत ;)
19 Feb 2014 - 6:29 pm | पिलीयन रायडर
ओक्के..
19 Feb 2014 - 8:11 pm | भाते
मनापासुन आवडले.
19 Feb 2014 - 11:12 pm | ओसामा
हा लेख जर मुक्तपीठ मध्ये लिहिला असता तर स्वाती ठकार यांची प्रतिक्रिया :
सासू आणि सुनेमधे साखरेहुन गोड, जिलबिहुन गोल आणि ताकाहून पांचट संबंध बघून मी झाडावरच्या अरश्याबरोबर कचकच भांडले आणि मग मला कावळ्याने वरतून प्रसाद दिला.
19 Feb 2014 - 11:56 pm | विजुभाऊ
जिंदगी किसी अपने को ढुंढती है
दिल से चाहो तो हर कही वो मिलता है.
यकीन नाये तो कही आईने मे झाको
अपने ही अक्स से पहचान करवा लो.
20 Feb 2014 - 6:08 am | अनन्त अवधुत
विषय अपेक्षेपेक्षा वेगळाच निघाला.
अजुन लिहिता आले असते. लेख मधूनच सम्पवल्यासारखा वाटतो.
20 Feb 2014 - 8:29 am | आनन्दा
जाता जाता, दिव्यश्रीताई,
सामन्यपणे माझ्या माहितीनुसार, मिसळपाववर काहीतरी विचारमंथन करणारे लेखन वाचकांकडून जास्त उचलले जाते. हाच धागा जर आपण आणखीन २-३ अनुभव टाकून, आणि शेवटी काहीतरी उत्तरीत/ अनुत्तरीत प्रश्न, किंवा मिपाकरांना विचार करायला प्रवृत्त करेल असा संपवला असता तर कदाचित योग्य आणि चांगला प्रतिसाद मिळाला असता.
उदा.. माझी सासू माझी मैत्रिण आहे, तुमची? तुमचेही काही विशेष अनुभव असतील तर सांगा. - असे म्हटले के धाग्याची दिशा स्पष्ट होते. मग त्या दिशेला न जाणारे या धाग्यावर येत नाहीत. डिस्क्लेमर टाकून आपण निरर्थक आपली बदनामी करून घेत आहात.
20 Feb 2014 - 4:33 pm | दिव्यश्री
सगळ्या वाचकांचे आभार. :)
शिल्पा नाईक ,प्रदीप ,पियुशा , भाते ,विजुभाऊ ,अनंत अवधुत ,आनन्दा धन्यवाद .
पियुशा आपण अशाच सासूबाई शोधू तुझ्यासाठी . :)
ओसामा , स्वाती ठाकर यांच्या नावाने आपणच प्रतिक्रिया लिहिता असे मला वाटते .
विजुभाऊ तुमचा प्रतिसाद आवडला . :)
7 Mar 2014 - 11:00 pm | ओसामा
मी स्वाती ठकार तर तुम्ही पोतदार पावसकर मादाम
7 Dec 2015 - 2:57 pm | दिव्यश्री
राम्राम...कसे आहात सगळे? ओळख आहे णा?
तर आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि शुभाशीर्वादाने माझ्या सासूबाई सौ.सुमती यांची तब्येत उत्तम आहे. डॉ . सुबोध खरे याणी फो ण वरुण खूप अमोल मार्गदर्षण केले. त्याबद्दल डॉ. खरे यांचे मनापासूण आभार . णुकताच त्यांचा ५५ वा वाढदिवस साजरा केला . असेच पाठीशी रहा .
समस्त मिपाकराणा धण्यवाद्स.
7 Dec 2015 - 11:14 pm | सुजल
बस कर पगली! अब रूलायेगी क्या! :)