मराठी लोकांचे हिंदी बोलणे

दिव्यश्री's picture
दिव्यश्री in जनातलं, मनातलं
12 Feb 2014 - 2:16 pm

सर्वसामान्य पणे मराठी लोक हिंदी भाषा व्यवस्थित बोलू शकत नाहीत अस निरिक्षण आहे,आणि त्याला फारच कमी अपवाद असतील. मी देखील फार सुंदर हिंदी बोलते असे नाही.मराठी लोक जर कधी हिंदी भाषेत बोलले तर फार गमतीदार प्रसंग घडतात.आणि जो बोलतो त्यालाही ते नंतरच समजते.असाच एक किस्सा आमच्या बाबतीत घडला. तो इथे मांडते आहे. :)

आम्ही डिसेंबर मध्ये इटली मधील Milano नावाच्या शहरात फिरायला गेलो होतो.पोहोचे पर्यंत बराच उशीर झाला रात्रीचे १२.३० वाजले होते .प्रचंड थंडी आणि त्यामध्ये हॉटेल शोधायचे होते.बरेचसे लोक अर्धवट झोपेतच होते. Milano मध्ये जे हॉटेल बुक केले होते तेथे जवळपास बर्याच गल्ल्या /बोळी होत्या.फिरून फिरून आम्ही दोनदा एकाच ठिकाणी आलो.आमचे अहो तेवढ्यात बोलले कितनी बोळी हैं यहा,बोळीबोळी मे से आणे जाने मे तकलीफ होती हय, त्या परिस्थितीत २ मिनिटे सगळेच ब्लांक झाले आता काय करायचं आणि नंतर पूर्ण ट्रीप संपे पर्यंत बोळीबोळी वरून चिडवत राहिले . *blush* ;) :D *lol*

तुम्हीही असे काही किस्से असले तर जरूर शेअर करा.आपण सगळे हसुया. :)

इथे कोणाला दुखायचं नाही, कोणत्याही भाषेचा ,व्यक्तीचा अपमान करण्याचा हेतू नाही.
एक मजा म्हणून लिहिले आहे आणि सगळ्यांना विनंती आहे कि या लिखाणाकडे मजा म्हणूनच पाहावे .अवांतर मला लिहिण्याचा अनुभव आजीबात नाही तेंव्हा काही चुकल्यास आपण सांभाळून घ्यालच(न घेऊन जाणार कुठे.) ;) :)

वावरविचार

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

13 Feb 2014 - 5:15 am | स्पंदना

मी स्वतः डोंबीवलीतल्या भाजीवाल्याला "भैया एक रुपया का नाना देदो" बाजुला देवान कायमचा क्रिटीक गळ्यात बांधलेला (हो नवराच म्हणतात या प्राण्याला) "हा हा भैया, उसके साथ दादा भी दे दो। अकेला नाना क्या करेगा।"
अर्थात त्या दिवशी डीनर पकल नाही.

रेवती's picture

13 Feb 2014 - 6:45 am | रेवती

देवा, वाचव आता!

अजया's picture

13 Feb 2014 - 8:31 am | अजया

=))

मुक्त विहारि's picture

13 Feb 2014 - 8:43 am | मुक्त विहारि

तुमचे कुणीतरी डोंबिवलीत आहे, ह्याची योग्य ती दखल घेतल्या गेली आहे.

आता तुम्ही डोंबिवलीत आलात की,

झक्कास कट्टा करु या

(कट्टेकरी) मुवि

सूड's picture

13 Feb 2014 - 2:12 pm | सूड

>>झक्कास कट्टा करु या

देवा रे !! कोणाला कशाचं नि मुविंना कट्ट्याचं ;). ह. घ्या. हो.

मुक्त विहारि's picture

13 Feb 2014 - 2:43 pm | मुक्त विहारि

हे असे कट्टे व्हावेत असे आपल्या सगळ्यांना वाटतेच ना?

आता खरे तर ठाणे हे मध्यवर्ती ठिकाण नसून, डोंबिवली आहे, हे एकूण तुमच्या लक्षांत आले असेलच.

लवकरच मिपावर एक जाहीरात पण झळकेल.

"ज्याचा डोंबिवलीत एक पण नातेवाईक नसेल, तोच खरा डू-आयडी"

(एकूण आमच्या डोंबिवलीची जाहीरात करायचा हा क्षीण प्रयत्न वायाच गेला. असे म्हणावे लागत आहे.

जाता जाता, धागाकर्त्याने ह्या उपप्रतिसादांकडे जास्त लक्ष देवू नये. हे "सूड" आमच्यावर नेहमीच "आसूड"

ओढतात आणि मग आम्ही त्यांच्याबरोबर चहापान वगैरे करून परत मार्गी लागतो.)

आता खरे तर ठाणे हे मध्यवर्ती ठिकाण नसून

णीषेध !!!
--------------------------------------------------
जल्मापासुन ठाण्यात राहणारा….
आता पम्याच्या जवळ कळव्यात गेलोय

अर्धवटराव's picture

13 Feb 2014 - 10:24 am | अर्धवटराव

=))

प्यारे१'s picture

13 Feb 2014 - 12:50 pm | प्यारे१

असं असूनही अक्षयराव मिपाकर नाहीत ????

यशोधरा's picture

13 Feb 2014 - 7:46 pm | यशोधरा

अकेला नाना क्या करेगा? :D

पिवळा डांबिस's picture

15 Feb 2014 - 12:54 am | पिवळा डांबिस

अकेला नाना क्या करेगा?

हे मस्तच आहे!!!
त्या दिवशी नाय जेवण पकलं घरात तरी बेहत्तर, पण आपण तर असा डायव्लाक टाकायला मिळाल्याच्या आनंदात मस्तपैकी उडप्याकडचा इडली-वडा खाल्ला (आणि रुसुबाईला खिलवला) असता!!! :)

सानिकास्वप्निल's picture

16 Feb 2014 - 2:01 am | सानिकास्वप्निल

=))

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

13 Feb 2014 - 5:48 am | निनाद मुक्काम प...

मराठी माणसाला हिंदी बोलता येत नाही हा गैर समज आहे ,

हिंदी मातृ भाषा नसलेल्या भारतीयांच्या मध्ये सर्वात सफाईदार हिंदी माझ्यामते मराठी माणसे बोलतात.
दोन महत्त्वाची कारणे
दोन्ही भाषा देवनागरीत असल्याने वाचायला सोप्या जातात
व मुंबई मध्ये बॉलीवूड असल्याने लहानपणापासून हिंदी सिनेमे , गाणी , डायलॉग ह्यामुळे हिंदी उत्कृष्ट उच्चारांसकट बोलतांना अनेक मराठी माणसांना पहिले आहे.
मराठी व हिंदी मध्ये अनेक शब्द समान आहेत ,
मी शाळेत असतांना चाचा चौधरी , नागराज , सुपर कमांडो ध्रुव , बिल्लू , असे राज व डायमंड कॉमिक्स आवडीने वाचायचो , मुंबईत आजोबांच्या चाळीत मारवाडी व उत्तर भारतीय अल्प संख्यांक असले तरी त्यांच्याशी हिंदीत संवाद साधला जायचा , गिरगावात गुजराती राहत असल्याने
अनेक गिरगाव कर उत्कृष्ट गुजराती बोलतात.
माझ्या पाहण्यात मुंबईत अनेक मराठी माणसे गुजराती बहुल भागात राहत असतील किंवा कामावर गुजराती जास्त असतील तर उत्कृष्ट गुजराती बोलतात ,
माझे कॉलेज पंजाबी बहुल लोकांचे होते म्हणून मला मुंबईत पंजाबी सुद्धा समजते पण बोलता येत नाही कारण कॉलेजात
संपूर्ण संवाद हिंदीत चालायचा आणि दोन पंजाबी हिंदीतून बोलायचे पण
बॉलीवूड चे शौकीन व अट्टल फिल्म बाज माणूस
सिनेमे पाहून हिंदी शिकू शकतो ,
हिंदी हि भारतात मला कोणत्याही भारतीयांशी संवाद साधायला उपयोगी पडते.
तेव्हा हिंदी चा आग्रह नाही व मराठी चा दुराग्रह नाही ,
पण खरच मुंबई व उपनगरात राहणाऱ्या लोकांचे हिंदी एवढे वाईट कसे असू शकते ह्यांचे मला नवल वाटते.
बाकी गुजराती लोकांचे हिंदी उच्चार डोक्यात जातात तर बंगाली माणसाचे कानाला गोड वाटतात.
खुद पाकिस्तान मध्ये बॉलीवूड मुळे लोक शुद्ध उर्दू सोडून
हिंदी बोलायला सुरवात केली आहे ह्याचा उल्लेख मी माझ्या एका लेखात केला होता ,
माझ्या पाहण्यात अनेक अफगाणी पाकिस्तानात आश्रयास निर्वासित म्हणून काही वर्ष राहिल्याने व येथे बॉलीवूड सिनेमे पाहिल्याने उत्कृष्ट हिंदी बोलतात.
माझे आजोबा सेह्गल च्या सिनेमांचे पारायण केल्याने तर बाबांनी राज , दिलीप , देव ह्यांच्या सिनेमांचे पारायण केल्याने उत्कृष्ट हिंदी बोलतात.

संविधान ने 14 सितंबर, 1949 को हिन्दी को भारत की राजभाषा घोषित किया था. भारतीय संविधान के भाग 17 के अध्याय की धारा 343 (1) में यह वर्णित है कि "संघ की राजभाषा हिन्दी और लिपि देवनागरी होगी. संघ के राजकीय प्रयोजनों के लिए प्रयोग होने वाले अंकों का रूप अंतर्राष्ट्रीय होगा.

इसके बाद साल 1953 में हिन्दी को हर क्षेत्र में प्रसारित करने के लिये राष्ट्रभाषा प्रचार समिति, वर्धा के अनुरोध पर सन् 1953 से संपूर्ण भारत में 14 सितंबर को प्रतिवर्ष हिन्दी दिवस के रूप में मनाया जाता है.

नानबा's picture

13 Feb 2014 - 7:52 am | नानबा

ठिकाण - डोंबिवली सीएसटी लोकल, ठाणे डोअर
वेळ - सकाळी ७.३२

आमचा डोअर कंपू नेहमीप्रमाणे टिंगलटवाळी करत उभा आहे. कोपर स्टेशनला एक तिशीतला (बहुतेक मुंबईच्या गर्दीला नवा असलेला) पोरगा धावत धावत येतो आणि दाराला लटकतो.

आमच्या ग्रूपमधले सगळ्यात ज्येष्ठ काका - आरे, कयसा गाडी धरताय तुम? हात सटका तो पडेगा ना धाडकन निचे..

:))

मुक्त विहारि's picture

13 Feb 2014 - 8:54 am | मुक्त विहारि

खालील किस्से वाचलेत तर माझ्याशी हिंदी बोलायला बरेच जण घाबरतात.

१. उसको तो लगेच शोधा, मेरे कू शोध के दिखा. (इंदूर मध्ये डब्बा-ऐस पैस खेळतांना)

२. कोथिंबीर के जूडी कैसा दिया.

३. पानी वाला शहाळा नही चाहिये.थोडा खोबरा भी अंदर होना.

४. ये शेवगा की शेंग कैसा दिया.

५. आज पेरू नही चाहिये.दात निकाला है,उसका बी नही खा सकता.दात मे अडकता है.आज सफरचंद दे दो.

पोहे पे थोडा लिंबू पिलो, नारळ डालो और उप्पर से थोडीसी चिमुटभर कोथिम्बिर भुरभुराओ

उपास's picture

13 Feb 2014 - 9:29 am | उपास

काही वर्षांपूर्वी अशीच कुठेतरी वाचलेली गंमत आठवली..
(इंग्रजी) 'बनाना' = (हिंदी) केला
(हिंदी) 'बनाना' = (मराठी) केला (करणे ह्या अर्थी)
:)

सौंदाळा's picture

13 Feb 2014 - 10:25 am | सौंदाळा

पहेले पानी मे शिरा फिर पोहा

मुक्त विहारि's picture

13 Feb 2014 - 10:33 am | मुक्त विहारि

ठीक है....

पोहनेको आता है की नवशिक्या है,

नवशिक्या है तो साथ मे सुका भोपळा लेके जाव, नही तो बुडेगा.

स्पंदना's picture

14 Feb 2014 - 4:20 am | स्पंदना

सुका भोपळा???
:))

रमेश आठवले's picture

13 Feb 2014 - 10:41 am | रमेश आठवले

चवदार मराठी

असंका's picture

13 Feb 2014 - 10:31 am | असंका

दिल्लीतील एखाद्या उपहारगृहात जेवताना भातात एखादा बारकासा दगडाचा कण आला-वाढप्याला बोलावून विचारलं "भातमे खडा क्यों?"

तर तो यडा म्हणाला "सर मै तो आपके सामने खडा हूँ?"

स्पंदना's picture

14 Feb 2014 - 4:19 am | स्पंदना

:))

रमेश आठवले's picture

13 Feb 2014 - 10:35 am | रमेश आठवले

मी ऐकलेला एक संवाद
मुंबईतील बस कंडक्टरशी तिकीटाची साठी बरोबर मोड देण्या बाबत हिंदीत झालेल्या वादात एक मराठी पासिंजर -" तू कौन आया मोठा बाजीराव ?"

अरे पण सगळे बस कंडक्टर मराठी च होते ना सेना कृपेनं?

दोन मराठी लोक एकमेकांशी हिन्दी में काय्को बाता करते रे?

श्री. शर्मा (नवे साहेब-एक सरकारी हपीस): स्टेशनरी के एक अप्रूवल के लिये मतलब इतनी छोटी बात के लिये आप इतने लाचार क्यू हो जाते हो.
श्री. पावसकर: (कोंकण येथे छापून तिथेच प्रसिद्ध केलेले एकजण): हम लाचार नही है. हमारी मान अभिमान से ऊंची है. हम किसीका नही खाते.. इ इ.

नावे उदाहरणास्तव.

कवितानागेश's picture

13 Feb 2014 - 11:30 am | कवितानागेश

एकजण दिल्लीहून मुंबईत आला होता. त्याच्याबरोबर इथलाच मुलगा कामासाठी फिरत होता. इथल्या मुलाला फोन आला की तो सांगायचा,' मै अभी घाईमें है| बादमे फोन करेगा|'
असे २-४ वेळेला ऐकल्यावर दिल्लीच्या मुलाला नवीन शब्द कळला, की मुंबईत रिक्षाला घाई म्हणतात ! ;)
पुढे साधारण वर्षभरात त्याला घाई आणि रिक्षा वेगवेगळे कळायला लागलं. :D

धागा कर्तीला पन्नाशी अपेक्षित असलेला धागा पन्नाशीपार नेवुन शतकाजवळ येण्या मदत केल्याबद्दल सर्वसाक्षी यांचे जाहिर आभार .
बाकी आपल्याकडे काय मटेरियल नाय बॉ .

प्यारे१'s picture

13 Feb 2014 - 12:53 pm | प्यारे१

बहुतेक नयी हय वह. उसको अनुभव नही हय! =))

मुक्त विहारि's picture

13 Feb 2014 - 1:01 pm | मुक्त विहारि

"बाकी आपल्याकडे काय मटेरियल नाय बॉ ."

साहजीकच आहे,

लातूरकडे मराठीच चालत असेल.

आमच्या कडे अद्द्याप "भय्या रत्नांग्री हापूस आंबाच देव.परवा दिया वैसा मत देव." असेच संभाषण चाललेले असते.

दिव्यश्री's picture

13 Feb 2014 - 1:22 pm | दिव्यश्री

सर्वसाक्षी यांचे खरचं आभार मानणार आहे शेपरेट :)
बाकी आपल्याकडे काय मटेरियल नाय बॉ .>>> अहो तुम्ही या धाग्यावर येउन प्रतिसात दिलात हेच खूप आहे. बाकी शतकी धागे काढण्याचे टिरेनिंग घ्यावे म्हणते.कृपया तर कोणी ट्रेनर असेल तर सांगा ... ;) :D

मुक्त विहारि's picture

13 Feb 2014 - 1:45 pm | मुक्त विहारि

२/४ प्रतिसाद असे यावेत की धाग्याचे सार्थक झाले, असे वाटले पाहिजे.

असो,

(एसेमेस च्या जमान्यात, बैठकीच्या गाण्याला कोण विचारतो?)

ट्रेनर ? हम्म बरेच आहेत खरडफळ्यावर तीन -चारचकरा मारा , लया मटेरीयल भेटल ।

शंभरी . धागा बुकमार्क करतो . बोर झाल्यावर वाचता येइल .

(शतकी प्रतिसागकर्ता) जेपी

मुक्त विहारि's picture

13 Feb 2014 - 2:55 pm | मुक्त विहारि

आँ... किती घाई...

(शतकी प्रतिसादकर्ता) जेपी

असे वाचावे.....

शतकी प्रतिसाद, शंभराव्वा प्रतिसाद दिल्याबद्दल जेपी यांचे हार्दिक अभिनंदन

जेपींची एकच नाद, शंभराव्वा प्रतिसाद,

नाद नाही करायचा, शंभराव्व्या प्रतिसादावरचा असलेला जेपींचा हक्क राखायचा

होवू दे बँड विड्थचा खर्च, मिपा आहे घर्च...

(जय हिंद.जय लातूर)

जेपी's picture

13 Feb 2014 - 3:31 pm | जेपी

@ मुवी ,

धन्यवाद मुवी , तुमचा मोजींच्या धाग्यावर पहिला प्रतिसादाचा हक्क कायम आहे आमचा शंभरावा प्रतिसाद देण्यचाा हक्क कायम राहिल आशा करतो .

(जय हिंद जय डोबिंवली) जेपी

मुक्त विहारि's picture

13 Feb 2014 - 6:45 pm | मुक्त विहारि

काही हरकत नाही....

आगे बढो... हम तुम्हारे साथ हय....

अनुप ढेरे's picture

13 Feb 2014 - 2:42 pm | अनुप ढेरे

अजून एक जोक मराठी-हिंदी भेळेचा

मुलगा (रिक्षावाल्याला): 'खाली'ए का?
रिक्षावाला: हो आहे की...
मुलगा: अरे वा! मला पण आहे !

आदूबाळ's picture

13 Feb 2014 - 3:59 pm | आदूबाळ

:)) :))

फुटलो!!

दिव्यश्री's picture

13 Feb 2014 - 4:37 pm | दिव्यश्री

धागा वाचकांचे आभार.धाग्यावर मौलिक प्रतिसाद देणार्यांचे आणि धाग्याला चार चांद लावणार्यांचे पेशल आभार. :)

प्रतिसाद देऊन या फालतू धाग्याला शतकी धागा करणार्यांना मी इंड्यात आल्यावर स्पेशल पार्टी आज या ठिकाणी जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे याची कृपया नोंद घ्यावी :)

खरतर हे मी चेपुवर आधी पोस्ट केल. मग सहज गम्मत म्हणून इथे आदानप्रदान करण्यासठी लिहिले.पण त्याचा मला त्रासच जास्त झाला.काही लोक अगदी माझ्या संस्कारांवर आले मग मी दुखावले गेले पण माझा कोणावरही राग नाही. काही सदस्यांनी मला या आधीच सांगितले होते कि संस्थळावर भावनिक होऊन चालत नाही पण मुळात मी इमोशनल आहे त्यामुळे मला खरच खूप त्रास झाला. कोणाला दुखावणे ,भाषेची टवाळी करणे हा माझा हेतू आजिबातच नव्हता.असो इथून पुढे लिहिताना लाखवेळा विचार करेन.
फक्त शुद्ध भाषा बोलली गेली तरच ती जतन होणार आहे का? याचा सगळ्यांनीच विचार करा.आपण रोजच्या भाषेत कितीतरी वेळा हिंदी ,इंग्लिश शब्दांचा आधार घेतो म्हणून आपण भाषेची टवाळी करतो का?फक्त मराठीला कोणी वाली नाही म्हणून काही लोक जर अतीच आग्रह करतात.ते त्यांच्या जागी बरोबरच आहेत.त्यांनी थोडा विचार करावा कि आपल्या बोलण्याने / लिहिण्याने कोणी दुखावले तर जात नाही ना.असे जर झाले मग भागावानही बचाये मराठीको.

मुक्त विहारि's picture

13 Feb 2014 - 6:43 pm | मुक्त विहारि

सुरुवातील इथे सगळेच जण इमोशनल असतात आणि मग ते भावनाप्रधान होतात.मिपाशिवाय त्यांना करमत नाही. रोज मिपाचे नांव काढल्याशिवाय त्यांना खाणे पण पचत नाही.

रोज मिपाचा उद्धार तरी करतील नाही तर चार लोकांना जमवून एखाद्या लेखाची दिंडी तरी मिरवतील.

असो,

भारतात याल तेंव्हा आम्हाला पण विसरू नका.एक २/४ प्रतिसाद आम्ही पण दिले आहेत आणि त्या शंभराव्व्यावा प्रतिसाद देणार्‍याला तर अजिबात विसरू नका.

करू एखादा कट्टा तुमच्या आणि तुमच्या पँटवाल्या बरोबर.

सूड भाऊ ऐकताय ना?

प्यारे१'s picture

13 Feb 2014 - 7:10 pm | प्यारे१

>>>सुरुवातील इथे सगळेच जण इमोशनल असतात आणि मग ते भावनाप्रधान होतात.मिपाशिवाय त्यांना करमत नाही. रोज मिपाचे नांव काढल्याशिवाय त्यांना खाणे पण पचत नाही.

परिस्थिती शिरेस हय. लौकर जाके एक विन्जेक्शन लेके आवो!

वो विंजेक्शन नही चाहिये.

बस मिसळपाव का वास काफी हय...

दिव्यश्री's picture

13 Feb 2014 - 7:41 pm | दिव्यश्री

आमच प्यांटवालं म्हणत्यात ह्या मि.पा.व्यसन लागलं आहे तुला. ते खरंही आहे काही प्रमाणात.
करू एखादा कट्टा तुमच्या आणि तुमच्या पँटवाल्या बरोबर. >>> व्वा जरूर .मला सगळ्यांनाच भेटण्याची खूप उत्सुकता आहे. :)
आमच्या प्यांटवाल्यांची आणि तुमची गाठच घालून देणार आहे.तुम्ही शिकवा त्यास्नी काय बाय कराया( तुम्ही खूप छानच करता तुमच्या शिष्याला कितपत जमेल याची शंका आहे )... ;) :D

ऑटोतुन जाताना शेजारी जाताना दाढीवाले एकजण आणी दोन पोलीसवाल्या पोरी बसल्या होत्या . पोरीचीं बहुतेक घरी नेणारी व्हॅन हुकल्याचा त्रागा जाणवत होता . त्या दोघाचां संवाद मला मटेरीयल देऊन गेला .

दाढिवाले -तुमको क्या कम हे मॅडम एक गेली तो दुसरी आयेगी
पोरी-उसका दुख नाही आता खिशे के पैसे देके देके जाव लागेल .
मी उत्तरलो अबी अबी एक जगा मराठी लोकाची हिंदी वाच्या इतकी जल्दी प्रचिती आयेगी नय सोचा

ओसामा's picture

14 Feb 2014 - 2:19 am | ओसामा

गिरते गिरते पड्या

नंदन's picture

14 Feb 2014 - 1:24 pm | नंदन

१. सरळ जाके डावीकडे वळो. वहाँ पेहीच ये बिल्डिंग 'गिरेगी'!

२. मुझे ठंड बज रही है| ('थंडी वाजणे'चे शब्दशः भाषांतर)

कपिलमुनी's picture

14 Feb 2014 - 7:49 pm | कपिलमुनी

माझ्या मित्राने "उधर मत जावो ..उधर साप गया है .. चाव खायेगा" असे तारे तोडले होते ..

बादवे .. "हत्ती चिखलात लोळतो" चे हिंदी भाषांतर काय ?

दिव्यश्री's picture

14 Feb 2014 - 8:01 pm | दिव्यश्री

हाथी किचड में खेल रहा हैं |

कपिलमुनी's picture

14 Feb 2014 - 8:48 pm | कपिलमुनी

खेळत नहि है वह .. लोळ रहा है ..उस्को शब्द चहिये है

श्रीरंग_जोशी's picture

14 Feb 2014 - 9:17 pm | श्रीरंग_जोशी

हाथी किचड में अंगडाईयाँ ले रहा हैं :-).

बादवे मजेदार धागा.

अर्धवटराव's picture

14 Feb 2014 - 10:33 pm | अर्धवटराव

हत्ती कसली अंगडाई घेतोय :D ते लोळतच पडलय बेणं.
अजुन चपखल शब्द सुचवा.

श्रीरंग_जोशी's picture

15 Feb 2014 - 12:20 am | श्रीरंग_जोशी

हाथी किचड में सुस्त पडा हुआ हैं!!

अवांतर - या धाग्यात मराठी राजकीय पुढार्‍यांची अनेक विनोदी हिन्दी विधाने वाचायला मिळतील.

अर्धवटराव's picture

15 Feb 2014 - 2:20 am | अर्धवटराव

हाथी किचडमे मस्तीसे सुस्ता रहा है :)

श्रीरंग_जोशी's picture

15 Feb 2014 - 4:04 am | श्रीरंग_जोशी

:-).

भारतात काम करत असताना हिन्दी भाषिक सहकार्‍यांबरोबर 'विशुद्ध हिन्दी' भाषेत संवाद साधताना (उदा. शुरु से अंत तक, समयसीमा समाप्त होने वाली हैं, इस बारे में कोई संदेह नही) मजा यायची.

त्याखेरीज आंग्लाळलेल्यांना 'Committed', 'Edition' वगैरेंचे हिन्दी प्रतिशब्द विचारून भंडावून सोडत असे :-).

परदेशात काम करताना अशी संधी फारशी मिळत नाही :-(.

स्वलेकर's picture

5 Mar 2014 - 3:06 pm | स्वलेकर

हाथी किचड में लोट रहा है!

चिगो's picture

15 Feb 2014 - 6:34 pm | चिगो

काल वॅलेन्टाईन्ट डेच्या निमित्ताने प्रेमी युगलांना भारतीय संस्कृती शिकवणारा शिवसैनिक पुढारी.. ' ये लोग बगीचे में जाके अश्लिल चाळे करते हैं..'
:-D =))

=))

अण्णा हजार्‍यांचं भाषण आठवलं. "सरकार के इस विधान में जरूर कुछ कालाबेरा है" =)) =)) =)) =)) =))

जागीच खल्लास =))

रसिया बालम's picture

6 Mar 2014 - 10:52 am | रसिया बालम

मैने रात के भात(!)को आज फोडणी(?) मारा हय..*mosking* *JOKINGLY* 8P 8p

दिव्यश्री's picture

6 Mar 2014 - 2:40 pm | दिव्यश्री

यॆ SSSS शतकी पार करून पन्नाशी पण पार . *pleasantry*

चलो पार्टी टाइम ... *yahoo* *drinks*

ठ्यांक्यू मिपाकारानो .

BE READY For PARTYYY. :)

दिव्यश्री's picture

24 Aug 2015 - 9:09 pm | दिव्यश्री

माझ्या मैत्रिणीचा साधारण ३ वर्षाचा मुलगा मराठी - हिंदी ची चटपटीत भेळ करतो . जस - तू मला प्यार करू नको , मी माझी चप्पल पेहाणतो ई .

एकदा आम्ही गार्डनमध्ये गेलो होतो तेंव्हा दुसर्या मैत्रिणीचा मुलगा आगोदरच घसरगुंडीच्या शिडीवर चढून वर गेला , आणि वर उल्लेख केलेला जो होता त्याला त्या उंच शिडी वर चढता यात नव्हते . तर वरचा मुलगा कसा म्हणतो आंटी उसको कडेवर लो ना . :)

पद्मावति's picture

24 Aug 2015 - 9:55 pm | पद्मावति

हम एक डोंगर पे गये थे. वहा इतने मक्कड थे इतने मक्कड थे, एक मक्कड तो मेरे मांडी पे आके बैठ गया.
दुसरे टोक म्हणजे माझी मध्यप्रदेशात राहणारी बहीण मला तिच्या शुद्ध मराठी मधे सांगत होती ' सॉरी मला लेट झाला मी जरा देवाघरी गेली होती' ( देवळात).