मागल्या जनगणनेच्या वेळी आपल्याला अवगत असलेल्या भाषांमधे संस्कृतचा समावेश करावा अशा आशयाचे आवाहन करणारी विपत्रे आपल्याला आली असतीलच. भारतात संस्कृतचे संवर्धन अनेक जण पारंपारिक पद्धतीने करत आहेतच, पण काही जण अतिशय अनोख्या पद्धतीने या अभिजात भाषेचे संवर्धन आणि प्रसार करत आहेत.
आमचे भोपाळस्थित एक नातेवाईक श्री दयाकर दाबके हे संस्कृतचे मोठे जाणकार आहेत.
त्यांनी काही शब्दांचा फेरफार करून हिंदी गाण्यांचे संस्कृत रूपांतर केले आहे. त्याचीच ही झलक. या व्हिडिओत तेजाब सिनेमातल्या "एक, दो, तीन...." गाण्याचं आणि वक्त चित्रपटातलं "ए मेरी जोहरा जबीं" या गाण्याचं रूपांतर आहे.
http://www.youtube.com/watch?v=hQQeS3e4WxI
ह्या व्हिडिओत "लकडीकी काठी, काठी पे घोडा..." या गाण्याचं रूपांतर आहे.
http://www.youtube.com/watch?v=qZDyevOD8Ek
हिंदी गाण्यांचे संस्कृत रुपांतर असलेले एक आख्खे पुस्तक त्यांनी लिहीले आहे. वेळ मिळताच त्यांच्या परवानगीने त्यातले काही नमूने इथे देईन.
प्रतिक्रिया
13 Feb 2014 - 12:21 pm | यशोधरा
अर्रे सह्ही! :) त्यांना इथे बोलवा ना मिपावर.
संस्कृत शिकवतील का? बोलीभाषा म्हणून?
13 Feb 2014 - 12:32 pm | मुक्त विहारि
सहमत आहे...
13 Feb 2014 - 12:36 pm | जेपी
सहमत .
(गाढा नाहीपण थोडा अभ्यासक) जेपी
13 Feb 2014 - 12:27 pm | बॅटमॅन
ऐला, दाबकेसाह्यबांचे नातलग का तुम्ही?? भारीच की. 'ओ मेरी जोहरजबी' चे त्यांनी केलेले संस्कृत भाषांतर नेटवर पाहिले होते. मजा आली होती एकदम :)
13 Feb 2014 - 12:48 pm | मराठीप्रेमी
मला "This video is unavailable" असे दिसतय. बाकिच्यांना दिसतोय का तो व्हिडिओ?
13 Feb 2014 - 5:17 pm | अनिरुद्ध प
+१११ सहमत
13 Feb 2014 - 3:18 pm | पैसा
व्हिडिओ दिसत नाहीत पण त्यांना मिपाकरांसाठी संस्कृतचे बोलीभाषा म्हणून काही सोपे धडे द्यायला सांगाल का?
13 Feb 2014 - 4:09 pm | मंदार दिलीप जोशी
त्यांना तशी जरूर विनंती करेन
13 Feb 2014 - 5:11 pm | सूड
>>संस्कृतचे बोलीभाषा म्हणून काही सोपे धडे द्यायला सांगाल का?
ते तर पाह्यजेच. तुम्ही आणि प्रीमो कोकणीचे क्लासेस पुन्हा कधी सुरु करताय ? ;)
13 Feb 2014 - 9:33 pm | पैसा
मराठी दिनाला परत सुरू करूयात!
13 Feb 2014 - 10:03 pm | आदूबाळ
खरंच सुरू करा. २७ तारखेला धाग्याची वाट पहातो आहे.
13 Feb 2014 - 5:29 pm | आत्मशून्य
संस्कृत आणि उर्दु या दोन अशा भाषा आहेत की बोलताना शिव्या घालतोय की कौतुक करतो आहे शष्प कळत नाही जर त्यात जाणते नसाल तर...! उदा. माताय, पिताय.... वगैरे वगैरे. वगैरे!
13 Feb 2014 - 5:38 pm | विकास
चांगला उपक्रम. व्हिडीओ दिसू शकल्यास उत्तम.
कधी काळी असाच एक प्रकल्प पुण्याच्या वैद्यकीय महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी केल्याचे आठवले... त्यावेळेला नवीन असलेले गाणे "लैलास्मी लैला:, कहीम् तू लैला:..." असे काहीसे, सगळे गाणे तयार केल्याचे तेव्हा वृत्तपत्रात आले होते. या निमित्ताने मिपाकर बॅटमॅन देखील येथे काहीतरी अशाच धर्तीवर रोचक लिहू शकतील असे वाटते. :)
13 Feb 2014 - 5:42 pm | बॅटमॅन
वाह! लैलेस संस्कृताच्या तालावर थिरकविल्यास मज्जा येईल खरी!
13 Feb 2014 - 6:55 pm | मदनबाण
वाह... असे गाणे ऐकायला किती मजा येइल. :)
वरती दिलेले संपूर्ण गाणे कसे असावे ते ऐकल्यावर अधिक समजुन घ्यायला मदत होइल.
मला एक असे फ्युजन गाणे माहित आहे ते खाली देतो... अर्थात वरच्या गाण्याचे दुवे चालत नसल्याने तुलना आता करता येत नाही. संस्कॄत गाणे म्हंटले की ते भजन किंवा स्तोत्र यांच्यात चालीवर असेल असे आपल्याला वाटण्याची शक्यता अधिक आहे,पण खालील गाणे त्या बाबतीत वेगळे आहे.
जरासे विषयांतर होइल, तरी अजुन एका गाण्याच्या व्हिडीयो द्यावासा वाटतो.
या व्हिडीयोतले गाणे ज्या पद्धतीने गायले आहे त्याची मुखत्वे मोठ्या प्रमाणात सुरुवात एका इंग्रजी गाण्यामुळे सुरु झाली आणि त्या गाण्या नंतर **** इफेक्ट म्हणुन अशी गाणी मोठ्या प्रमाणात ओळखली जाउ लागली. ते गाणे कोणते जरा ओळखा पाहु ?
जाता जाता :- अक्षया अगं तो गाण्याच्या धाग्याचा २ रा भाग टाकणार होतीस ना तू ? कधी टाकणार ? केव्हाची वाट पाहतो आहे मी.