सर्वसामान्य पणे मराठी लोक हिंदी भाषा व्यवस्थित बोलू शकत नाहीत अस निरिक्षण आहे,आणि त्याला फारच कमी अपवाद असतील. मी देखील फार सुंदर हिंदी बोलते असे नाही.मराठी लोक जर कधी हिंदी भाषेत बोलले तर फार गमतीदार प्रसंग घडतात.आणि जो बोलतो त्यालाही ते नंतरच समजते.असाच एक किस्सा आमच्या बाबतीत घडला. तो इथे मांडते आहे. :)
आम्ही डिसेंबर मध्ये इटली मधील Milano नावाच्या शहरात फिरायला गेलो होतो.पोहोचे पर्यंत बराच उशीर झाला रात्रीचे १२.३० वाजले होते .प्रचंड थंडी आणि त्यामध्ये हॉटेल शोधायचे होते.बरेचसे लोक अर्धवट झोपेतच होते. Milano मध्ये जे हॉटेल बुक केले होते तेथे जवळपास बर्याच गल्ल्या /बोळी होत्या.फिरून फिरून आम्ही दोनदा एकाच ठिकाणी आलो.आमचे अहो तेवढ्यात बोलले कितनी बोळी हैं यहा,बोळीबोळी मे से आणे जाने मे तकलीफ होती हय, त्या परिस्थितीत २ मिनिटे सगळेच ब्लांक झाले आता काय करायचं आणि नंतर पूर्ण ट्रीप संपे पर्यंत बोळीबोळी वरून चिडवत राहिले . *blush* ;) :D *lol*
तुम्हीही असे काही किस्से असले तर जरूर शेअर करा.आपण सगळे हसुया. :)
इथे कोणाला दुखायचं नाही, कोणत्याही भाषेचा ,व्यक्तीचा अपमान करण्याचा हेतू नाही.
एक मजा म्हणून लिहिले आहे आणि सगळ्यांना विनंती आहे कि या लिखाणाकडे मजा म्हणूनच पाहावे .अवांतर मला लिहिण्याचा अनुभव आजीबात नाही तेंव्हा काही चुकल्यास आपण सांभाळून घ्यालच(न घेऊन जाणार कुठे.) ;) :)
प्रतिक्रिया
12 Feb 2014 - 2:23 pm | स्पा
चला मी बोनी करून देतो तुमच्या धाग्याला :P
काही दिवसांपूर्वीचा सकाळचा प्रसंग
आई: मोसी तीन दिन से कचरा "नेल्या" क्यु नई? घंटा गाडी तर आके गय ना, डबा वैसैच बाहेर पड्या था
कचरावाली : ऑ? नेल्या?
......
मी : अरे मोसी नयी हे वह :P
12 Feb 2014 - 2:33 pm | दिव्यश्री
चला मी बोनी करून देतो तुमच्या धाग्याला Blum ३>>> धन्यवाद
आता हाप शेंचुरी होयील अशी आशा आहे. ;) *beee*
बाकी बोनी जोरदार झाली आहे. :) *clapping*
12 Feb 2014 - 2:34 pm | तुषार काळभोर
१ मुक्तपीठीय
२. फॉरीनला-ईटलीला-मिलानला फिरून आल्याची झैरात
12 Feb 2014 - 2:38 pm | दिव्यश्री
आजाबात न्हाय आमि फारीन्लाच असतो.अभ्यास वाढवा. ;) :P
ह घ्या हं :)
12 Feb 2014 - 3:05 pm | सूड
>>आजाबात न्हाय आमि फारीन्लाच असतो.
ओक्के, म्हणजे याची झायरात आहे तर !! बरं बरं.
14 Feb 2014 - 10:21 am | तुषार काळभोर
हा डु-आयडी असावा काय?
१. व्हय
२. आज्याबात नाय...
12 Feb 2014 - 11:41 pm | रामपुरी
अगदी हेच मनात आलं.
13 Feb 2014 - 1:10 pm | दिव्यश्री
झैरात,झायरात ,जाहिरात च आहे. पुढे??????
आपली काही हरकत ?????
14 Feb 2014 - 3:07 am | रामपुरी
आम्ही कोण हरकत घेणारे? मिपापेक्षा मुक्तपीठ सारख्या ठिकाणी झैरात दणक्यात झाली असती. एवढं चिडण्यासारखं काय आहे त्यात?????? (प्रश्नचिन्हांची संख्या बरोबर आहे काय?)
12 Feb 2014 - 2:40 pm | सानिकास्वप्निल
आमच्या शेजारच्या काकू दारावर आलेल्या मच्छीवाल्याला ; "भैया ताटली पुसके दिया है...उसको मच्छी का हात लावून बरबरटो मत" ;) :P
12 Feb 2014 - 2:56 pm | शिद
मय क्या बोल रहा हय, तु क्या बोल रहा हय, क्या नया हय नया हय वो...डालू क्या पेपर डोकेमे...
सौजन्यः टाईमपास मराठी चित्रपट.
12 Feb 2014 - 11:22 pm | जेनी...
नया हय ' वो ' नैओ ..
नया हय वह =))
12 Feb 2014 - 11:40 pm | प्यारे१
फिर वही? नया हय वह? मय क्या कह रहा हय तुम क्या कह रहा हय... देऊ क्या एक टाळके में?
13 Feb 2014 - 6:05 pm | बरखा
असल मे॑ आपने लिखा हुआ यह टाईमपास का स्॑वाद असली हि॑दी भाषा मे नही॑ है| उपर्युक्त वाक्य ज्यादातर हैदराबादी भाषा मे बोले जाते है| शुध्द खडी बोली हि॑दी भाषा बहोत अलग है| सब अलग अलग जगह बोली जानेवाली हि॑दी भाषा को ईकठ्ठ कर ईसे मिश्र हि॑दी बनाया गया है| जिसमे॑ हैदराबादी, बिहारी और उर्दु भाषा के शब्द मिलाये॑ गये है| ईसी वजह से यह मिश्र हि॑दी भाषा हसी लायक बन गयी है॑|
12 Feb 2014 - 2:57 pm | बाळ सप्रे
गाडी सावलीमे लगा.
भय्या, भेळ मे लिम्बु पिळा क्या??
पहले पाणी मे शिरा, थोडा पोहा और फिर बुडा ..
12 Feb 2014 - 3:04 pm | यसवायजी
मी एका दुकानात विचारले, "वो चित्रकलाकी वही है क्या तुम्हारे दुकान मे?" तो सिंधी डोळ्यातून पाणी येस्तोवर खिदळला होता.
तेरी शेरडी मेरे परडेमे आकर कायको वरडी?
12 Feb 2014 - 3:10 pm | प्यारे१
>>> तेरी शेरडी मेरे परडेमे आकर कायको वरडी?
हे काय नि 'धावते धावते आया आन धपकन पड्या' काय ही आमच्याकडच्या मुस्लिम (बागवान) लोकांची (बहुतेक कोकणात सुद्धा असंच बोलतात) नॉर्मल भाषा आहे.
क्या रे सलिम? काय ऐसा वरडता है?
12 Feb 2014 - 3:31 pm | यसवायजी
हो. डबरेमे पड्या टाईप.
जवळचा एक मित्र बागवान असल्याने त्याच्या घरी गेलो की तशीच बोलायचा प्रयत्न करतो. (फज्जरा-फजर, पव्वां पडतूं, सालको नही गईस आज?, यो भिंत जादा जाडी है जी.)
फक्त एक सुधारणा- आमच्याकडच्या नाही हो काका.. आपल्याकडच्या. :)
12 Feb 2014 - 3:44 pm | प्यारे१
तेरा गाँव कौनसा? मै वाई सातारा का हय.
(ते 'आमच्याकडच्या' उगाच्च कुणाच्या शेपटावर पाय नको म्हणून सांभाळून लिहीलेलं)
12 Feb 2014 - 3:58 pm | यसवायजी
मै वो संयुक्त म्हाराष्ट्र चळवळ वाला
(निप्पाणीकर)
13 Feb 2014 - 11:10 pm | काळा पहाड
अरेच्च्या! म्हणजे मेरे आजोबा के गाववाला.
13 Feb 2014 - 9:17 am | पियुशा
यसवायजी तुम्ही सुद्धा :P
"वो चित्रकलाकी वही है क्या तुम्हारे दुकान मे?" लोल :)
13 Feb 2014 - 4:09 pm | यसवायजी
वो मै चेश्टेमे बोल्या था। वैशे मेरा हिंदी लै भारी है। :))
12 Feb 2014 - 3:06 pm | कुसुमावती
माझी मामी दुधवाल्याशी कायम हिंदीत बोलायची. एकदा तिने दुधवाल्याला सांगितलं, भय्या आज दुध "अर्धा" लिटर ही दो कल का "शिल्लक" है. मी आणि माझी मामेबहीण इतके हसलो होतो हे ऐकून, पुढे बरेच वर्ष मामी च्या या वाक्याची नक्कल करायचो आम्ही.
12 Feb 2014 - 3:08 pm | पिलीयन रायडर
मी परवा आमच्या हामेरिकेतुन आलेल्या एका लीड सोबत बोलताना ... "and we can find that design margin by the formaula... formula...अं.. नही क्या वो.. using UT वाला..."
तो खुप वेळ समजुन घ्यायचा प्रामाणिक प्रयत्न करत होता..!! शेवटी मी २ मिन गप्प बसले.. म्हणलं थांबा.. मला जरा वाक्य बनवु द्या म्हणजे तुम्हाला कळेल की मला काय म्हणायचय..
कॉन्फरन्स कॉल मध्ये काहीतरी सांगायच्या नादात मी खुपदा चायनिज लोकांना हिंदी (मराठी टोन मधुन..) + इंग्लिश मध्ये काहीतरी सांगते.. आणि मग सॉरी सॉरी म्हणत बसते.. एखादी गोष्ट समजावुन सांगायच्या गडबडीत आपण मातृभाषेवर घसरणं एकवेळ ठिके.. पण अमराठी माणसाला काही कळत नसेल (मग तो भारतीय असो वा चायनीज )मी ताबडतोब हिंदीवर येते..
12 Feb 2014 - 3:12 pm | पिलीयन रायडर
एकदा आमचे वडील फोनवर तावाताव्ने कुणाला तरी सांगत होत.. "तबसे मैने मनाशी पक्की "खुणगाठ" बांधली"...
समोरच्याला काय समजलं देव जाणे!!
12 Feb 2014 - 3:20 pm | सौंदाळा
माझा महाराष्ट्रीयन तेलगु मित्रः कल गच्ची मे क्रीकेट खेलते खेलते गिरा (डोक्याकडे हात दाखवुन) ये देख कितना बडा टेंगुल आया है.
12 Feb 2014 - 3:38 pm | बाळ सप्रे
12 Feb 2014 - 3:56 pm | सर्वसाक्षी
मराठी माणसांनी मराठी संकेतस्थळावर मराठी माणसाची टर उडवावी आणि ती देखिल हिंदी नीट येत नाही म्हणुन? का हो? ही असली हौस केवळ मराठी माणसांनाच असावी असे वाटु लागले आहे. मी तामिळ माणसाचे कन्नड (हिंदी दूर राहिले) वा बंगाली माणणसांचे पंजाबी यावर त्या त्या भाषांमधील संकेतस्थळांवर/ भाषिकांमध्ये अशी त्या त्या भाषिकांची टर उडविल्याचे ऐकले नाही.
एकाहुन अधिक भाषा येणे उत्तमच, पण मराठी माण्साला हिंदी आलीच पाहिजे आणि उत्तम आली पाहिजे व न आल्यास त्याची टवाळी व्हावी असे का? जुजबी, कामापुरती हिंदी आली तरी ठिक आहे. हा न्यूनगंड म्हणायचा की दिल्लीत बसून महाराष्ट्रावर राज्य करण्याच्या उत्तरेकडील राजकिय महत्वाकांक्षेस तुमचा भाषिक पाठिंबा? आपले सत्ताधारी दिल्लीश्वरांना विचारल्याखेरीज काहीही करत नाहीत तसे काही आहे काय? दैनंदिन जीवनात कामापुरती हिंदी आली म्हणजे झाले. अन्य बहुतेक राज्यांमध्ये त्या त्या राज्यांमधील भाषेचा मान राखला जातो व वापरही केला जातो. चेन्नै, बंगलोर, कोलकाता, अहमदाबाद वगैरे कुठल्याही शहरात एखाद्या स्थनिक भाषिकाला हिंदी येत नाही म्हणुन तिथल्या एखाद्या व्यक्तिपुढे टिका करा, तुम्हाला एकच उत्तर मिळेल - 'नसेल येत हिंदी, ती आमची मातृभाषा नाही त्यामुळे यात नवल करण्यासारखे काय आहे?'
मराठी माणुस जेव्हा नोकरी- व्यवसायानिमित्त अन्य ठिकाणी जातो तेव्हा दिर्घ रहिवासानंतर तो तिथली भाषा शिकुन घेतो. मात्र इथे दहा वीस वर्षे वा पिढ्यानपिढ्या राहुनही मराठी धड न येणार्यांची संख्या कमी नाही.
मराठी माणसाने मराठी संकेतस्थळावर मराठी माणसाची एखादी अन्य भाषा नीट न येण्यावरुन टिंगलटवाळी उडवावी हे मराठीचे दुर्दैव आहे. विनोदनिर्मितीसाठी दुसरा विषय नसावा?
माझे विचार संकुचित वाटल्यास मिपा व्यवस्थापनाने हा धागा अवश्य उडवावा, मात्र पटल्यास असे मराठीचा अपमान करणारे धागे न काढण्याविषयी सदस्यांना आवाहन करावे. आपली भाषा असो वा आपले आई-वडील; जर आपण मान राखला नाही तर इतर राखतील ही अपेक्षा व्यर्थ आहे.
12 Feb 2014 - 4:27 pm | दिव्यश्री
अहो सर्वसक्षी...तुम्हाला या पूर्ण लिखाणात मराठी टर उडवली आहे असे वाटते आहे पण ते तसे नाही. मी आधीच "इथे कोणाला दुखायचं नाही, कोणत्याही भाषेचा ,व्यक्तीचा अपमान करण्याचा हेतू नाही.एक मजा म्हणून लिहिले आहे आणि सगळ्यांना विनंती आहे कि या लिखाणाकडे मजा म्हणूनच पाहावे." हे सांगितले आहे.
मुळामध्ये मराठी लोक हिंदी बोलताना चुकतात आणि त्या चुकी मधून विनोद निर्मिती होते. आणि हिंदी हि आपली राष्ट्रभाषा आहे न? मग मातृभाषा आणि राष्ट्रभाषा या दोन्ही व्यवस्थित बोलत यायला पाहिजे ना? तुम्हाला फक्त चुकीची बाजू दिसली आहे असे मला वाटते.माझा उद्देश तसा नव्हता / नाही.
माझे विचार संकुचित वाटल्यास मिपा व्यवस्थापनाने हा धागा अवश्य उडवावा, मात्र पटल्यास असे मराठीचा अपमान करणारे धागे न काढण्याविषयी सदस्यांना आवाहन करावे. आपली भाषा असो वा आपले आई-वडील; जर आपण मान राखला नाही तर इतर राखतील ही अपेक्षा व्यर्थ आहे. >>> हा धागा मी काढला आहे तो तुम्ही उडवा असे का सांगता? आणि जर तस असत ना तर मीच सांगितलं असत धागा उडवायला.मी फक्त माझे आई वडील आणि भाषा यांचाच नाही तर सगळ्यांचा मान ठेवते नेहमीच मग ती व्यक्ती असो अथवा भाषा किंवा प्राणी. असो तुमच्या मताचा आदर आहेच. इथून पुढे काळजी घेयीन
12 Feb 2014 - 4:35 pm | यशोधरा
हिंदी राष्ट्रभाषा नाही. बाकी चालूदेत.
सर्वसाक्षींना काय म्हणायचे आहे हे लक्षात येते आहे पण हा धागा म्हणजे चार दोस्तांनी आपापसात एकमेकांच्या टोप्या उडवाव्यात, स्वतःचे फजितीचे किस्से सांगावेत आणि हसावे टाईप आहे असे वाटते..
दिव्यश्री, एकदम तलवार उपसू नका :) जरा हलक्याने घ्या..
12 Feb 2014 - 4:38 pm | प्यारे१
>>> हिंदी राष्ट्रभाषा नाही.
'फक्त हिंदी राष्ट्रभाषा नाही' असं हवंय काय?
12 Feb 2014 - 5:09 pm | दिव्यश्री
यशोधरा ताई तुम्हाला बरोबर समजल आहे मला काय म्हणायचं आहे ते. माझ्या मनात एकदाही शंका आली नाही कि या लेखावर असे काही प्रतिसाद येतील .पण खरच नवीन सदस्यांना समजून घेण्यास जरा त्रास होतो असे मी बर्याच वेळा पहिले आहे.जरी मला १ वर्ष ३ महिने झाले तरी मी नवीन आहे असे वाटते कारण मी वाचते जास्त लिहिते कमी. या ना त्या कारणाने वादच होताना पाहिले आहे बरेचदा.ज्यांच्या कडे वाद घालण्याची कला आहे ते वाद घालतात बाकीचे सोडून देतात.
एकदम तलवार उपसू नका Smile जरा हलक्याने घ्या.. >>> मी अगदी प्रामाणिकपणे लिहिले आहे जर खर तसं काही असेल आणि धागा उडवला तरी चालेल. फक्त माझ्या लिखाणाचा भलताच अर्थ काढून तो उडवा असे सांगणे मला पटणार नाही.बाकी मी हलकेच घेतले आहे. :)
12 Feb 2014 - 5:15 pm | यशोधरा
दिव्यश्री, वाद हे तितक्यापुरतेच असतात, विषयांपुरतेच आणि मतभेदांपुरतेच. तेच धरुन इथे कोणी सहसा बसत नाही. हळूहळू तुम्हीही रुळाल. :)
13 Feb 2014 - 8:39 am | मुक्त विहारि
"वाद हे तितक्यापुरतेच असतात, विषयांपुरतेच आणि मतभेदांपुरतेच. तेच धरुन इथे कोणी सहसा बसत नाही."
+ १
12 Feb 2014 - 4:48 pm | सर्वसाक्षी
मला 'माझा प्रतिसाद' असे म्हणायचे होते, अनवधानाने 'धागा' असे लिहिले गेले. इतरांच्या लेखनाचे काय करायचे ते संपादक/ प्रशासकांना ठरवु द्या, तो त्यांचा अधिकार आहे आणि ते ज्ञानी व समर्थ आहेत, मी माझ्या धाग्या पुरते लिहिले आहे ('माझे विचार' असा उल्लेख केला आहे, लेखिकेचे विचार असा नव्हे).
२) हिंदी ही राष्ट्रभाषा नाही हे मा. संपादकांनी निदर्शनास आणुन दिले आहेच.
३) मराठीची टवाळी ही अगदी विनेदनिर्मितीसाठी केली असली तरी किमान मराठी माणसानी नराठी संकेतस्थळावर करु नये या मतावर मी ठाम आहे.
४) मताचा आदर केल्याबद्दल आभारी आहे.
12 Feb 2014 - 5:37 pm | दिव्यश्री
http://en.wikipedia.org/wiki/Languages_of_India येथे हिन्दीला ऑफिशियल भाषा लिहिले आहे.
३) मराठीची टवाळी ही अगदी विनेदनिर्मितीसाठी केली असली तरी किमान मराठी माणसानी नराठी संकेतस्थळावर करु नये या मतावर मी ठाम आहे.>>>अजुनहि मी सान्गते कि भाषेची टवाळी करुन विनोद निर्मीती करणे हा उद्देश नाहि.दोन भाषा एकत्र केल्या तर काय होते आणी त्यातुन विनोद निर्माण होऊ शकतो .प्रत्येक वेळेस प्रत्येक जण जाणूनबुजून करतो असे नाही
खुलाशाबद्दल धन्यवाद
12 Feb 2014 - 11:11 pm | विजुभाऊ
भारतीय घटनेत हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषा ऑफिशियल कम्युनिकेशन लँग्वेज अमंग स्टेट्स असे लिहीलेले
राष्ट्रभाषा ( नॅशनल लँग्वेज ) असे म्हंटलेले नाहीय्ये.
मुळात हिंदी ही एक सरमिसळ झालेली भाषा आहे. हिंदीत कोणतीही प्रमाण भाषा नाही. राजस्थानी ( मारवाडी) हरयाणवी भोजपुरी ,अवधी ,लखनवी, उर्दू ,हैद्राबादची दक्कनी , अंगीका इत्यादी बर्याच बोलीभाषांना हिंदीने गिळंकृत केले आहे.
आपण मराठीचा आग्रह ठेवला नाही तर मराठीही तशीच नामशेष होण्याचा धोका आहे.
आपल्यावर आप्न हिंदी लादण्याला विरोधच करायला हवा.
राजठाकरेनी मराठीचा आग्र्ह धरला तर ते वाईट मात्र ते दक्षीणेच्या लोकानी केली की ते मात्र भाषेची अस्मिता.
13 Feb 2014 - 11:08 am | मिहिर
हिंदी ही राष्ट्रभाषा नसून केंद्र सरकारची अधिकृत भाषा आहे हे मान्य. पण,
उगाच? 'मानक हिंदी' कधी काही ऐकले नाहीत काय?
13 Feb 2014 - 1:07 pm | चिगो
मानक हिंदी ही संस्कृतप्रचूर भाषा आहे. रोजच्या वापरातल्या हिंदीत अनेक उर्दू, फारसी शब्दांचा वापर होतो. फक्त सरकारी कागदपत्रांमध्ये ह्या 'मानक हिंदी'चा वापर होतो, जी पचायला लै जड जाते. ;-)
माझ्या अल्पमाहितीनुसार हिंदीऐवजी "हिंदुस्थानी" भाषा जी उत्तर भारतात जास्त वापरली जाते ती अधिकृत भाषा असावी, हा मुद्दा संविधान-समितीत विचाराधीन होता. मात्र त्यातील व्याकरण-नियमांच्या अभावामुळेच हिंदीला "अधिकृत भाषे"चा दर्जा मिळाला. बाकी, बहुतांश नागपुरकरांना हिंदी बोलायला अवघड जात नाही, हे जाता जाता नमूद करतो..
13 Feb 2014 - 1:18 pm | प्यारे१
ते भाषावार प्रांतरचना प्रकरण जरा त्रासदायकच आहे. काय तर म्हणे विविधता टिकवून एकता.
बेळगावात हाणामार्या, तामिळ लोक हिन्दी नको म्हणून सगळ्याला डाम्बर फासतात नि केरळी लोकांना बाहेर जग आहे हेच ठाऊक नाही. कशी व्हायची एकता?
बाकी नागपूरात महाराष्ट्रात येण्यापूर्वीपासून/ महाराष्ट्र राज्य स्थापन होण्याआधीपासून मराठीबरोबर हिन्दी बोलली जात होती ना?
13 Feb 2014 - 2:20 pm | चिगो
बाकी नागपूरात महाराष्ट्रात येण्यापूर्वीपासून/ महाराष्ट्र राज्य स्थापन होण्याआधीपासून मराठीबरोबर हिन्दी बोलली जात होती ना?
नाहीतं काय, भाऊ.. मध्यप्रांत आणि वर्हाड (सीपी अँड बेरार) ची राजधानी व्हती ना नागपूर. इंग्रजायनंच ईधान-भवन बांधलं ना थितं.. म्हणूनशान हिंदी आंदीपासूनच म्हाईत व्हती नागपूरवाल्याहले.. ;-)
13 Feb 2014 - 2:29 pm | सुनील
औं!
असं म्हणतात की नील आर्मस्ट्राँगचे यान चंद्रावर उतरताना पंक्चर झालं होतं. तिथे दुकान थाटलेल्या एका केरळीय "पंचर"वाल्याने ते दुरुस्त केलं!!
12 Feb 2014 - 4:46 pm | यसवायजी
घरातल्या-घरात आपण आपल्या माणसांची चेष्टा करतोच की. चारचौघात नाही केली पाहिजे हे मान्य. मिपाकर आपलेच आहेत हो. हलकेच घ्या.
याला टिंगलटवाळी म्हणताय?? मी फक्त 'करमणूक' आणी 'सुधारणेला जागा आहे' म्हणतोय.
बाकी कुणीतरी म्हटलंय-
Blessed is the man who can laugh at himself, he will never cease to be amused
12 Feb 2014 - 4:53 pm | आदूबाळ
सौ टके की बात!
(हाय का आवाज हिंदीचा!)
12 Feb 2014 - 11:04 pm | विजुभाऊ
सर्वसाक्षींशी पूर्ण सहमत.
पंजाबी लोक पंजाबी ढंगात हिंदी बोलतात. तेंव्ह्या ते कौतुकाचे ठरते.
मराठी लोक हिंदी बोलतात हेच महत्वाचे आहे.
खरेतर हिंदी ही आपल्या सर्वाम्वर लादली गेलेली भाषा आहे . ते देखील उत्तर भारतीयांमुळे.
त्यानी महाराष्ट्रात आल्यावर मराठीत बोलायचे बाजूलाच राहिले ते आपल्यालाच हिंदीत बोला असा माजुरीपणा करतात.
कोणी माझ्याशी हिंदीत बोलला तर मी तर बहुतेकदा मराठीतच बोलतो. तेंव्हा त्याना कळते.
त्याना मराठी कळत नसेल तर गुजराथी कोकणी किंवा इंग्रजीत बोलतो.
माझ्या घरी येता तेंव्हा माझ्या घराती संस्कृतीचा मान ठेवायलाच हवा. अन त्यासाठी मीच आग्रही असायला हवे
12 Feb 2014 - 3:57 pm | तिमा
मिपाचे थोपु करु नका.
12 Feb 2014 - 4:31 pm | दिव्यश्री
सं.मं. आहे कि ओ लक्ष ठेवायला. ते मि.पा.च थोपु कसे करू देतील बरे??????
12 Feb 2014 - 7:32 pm | रेवती
हां, हम इधरीच हय|
13 Feb 2014 - 10:13 am | इरसाल
तसं नाही.
हम इथेच बठलेले हय ! असे हवे तसेच, एक एक को लक्षामें ठेवेंगा अवर बादमे उसका बदला घेयेंगे.
13 Feb 2014 - 1:15 pm | दिव्यश्री
हम इथेच बठलेले हय ! असे हवे तसेच, एक एक को लक्षामें ठेवेंगा अवर बादमे उसका बदला घेयेंगे.>>> अरे बापरे... असं पण आहे का?
13 Feb 2014 - 2:28 pm | इरसाल
म्हणजे तुम्हाला,
हमरान आयले नि नम्रान बैठले हे पण माहित नसणार. वर......
ताड्या आज मुर्ग्या(कोबड्या) नय लाया क्या गाव मे लगन हय ना !
12 Feb 2014 - 4:02 pm | आदूबाळ
माझं हिंदी ऐकून बर्याचदा हिंदीभाषिकच "आम्हाला मराठी व्यवस्थित समजतं" असं गुमान कबूल करतात आणि "मराठीतच बोल" वगैरे सांगतात!
12 Feb 2014 - 6:00 pm | आत्मशून्य
एक नंबर!
12 Feb 2014 - 6:16 pm | वादळ
हिंदी राष्ट्रभाषा हा गैरसमज दूर होइल तो सुदिन.
12 Feb 2014 - 8:55 pm | मराठी_माणूस
सर्वसाक्षींच्या मतांशी सहमत
12 Feb 2014 - 11:29 pm | हुप्प्या
मुंबईत आणि महाराष्ट्रात हिंदी भाषिकांनी मराठी भाषेला दुय्यम स्थान दिले आहे हे मला मान्य आहे. आणि ते साफ चूक आहे हेही. मराठी ही हिंदीच्याच तोडीची भाषा आहे. भाषावार प्रांतरचना झाल्यामुळे महाराष्ट्रात हिंदीपेक्षा मराठी जास्त महत्त्वाची आहे. (हा माझा डिसक्लेमर!)
पण ह्या गंमतशीर वाटणार्या चुका का होतात? मला वाटते मराठी माणसाच्या कानावर हिंदी भाषा वारंवार पडत असते. सिनेमे, सिनेसंगीत, सिरियल, टीव्हीवरील अन्य बातम्या वगैरे कार्यक्रम ह्या माध्यमातून जी हिंदी कानावर पडते त्यामुळे आपल्याला हिंदी उत्तम येते असा बहुतेक लोकांचा गैरसमज व्हायला मदत होत असावी. कानावर पडलेले समजणे आणि उत्तम हिंदी बोलता येणे यात मोठा फरक आहे तो या दोन भाषेतील साधर्म्यामुळे पटकन लक्षात येत नाही. आणि त्यामुळे अशी गडबड होत असावी.
आता एक संवाद. एक मराठी आजीबाई उत्तरेत कुठेतरी यात्रेबित्रेला जातात. उन्हाळ्याचे दिवस असतात. एक गाडीवाला ताक विकत असतो. ते विकत घेऊन, पिऊन झाल्यावर विचारतात "भय्या, तकियेमे अल्ला नही था क्या?" (अर्थात ताकात आले घातले नव्हते का?). भय्या अवाक!
12 Feb 2014 - 11:34 pm | जेनी...
=))
माझ्या आज्जीला पण हिंदी भाषा येत नव्हती .. पण तिला वाटायचं सगळ्या भाजी/फेरीवाल्यांना फक्त हिंदीच कळतं ..
13 Feb 2014 - 1:50 am | पिवळा डांबिस
ठ्ठो!!!! :)
13 Feb 2014 - 4:53 am | रेवती
हा तक्केमे अल्ला विनोद मीही ऐकला होता. ;)
माझ्या भावाला हिंदी विषयाच्या बाईंनी 'हम दिवाली मनाते है' अशा विषयावरचा निबंध दिवाळी सुट्टीचा अभ्यास म्हणून लिहून आणायला सांगितला होता तर भावाच्या मित्राने (भावाने नव्हे!) 'हम सब दिवालीमें खुदकुशी मनाते है|' असे लिहून नेल्याने बाईंनी ती मोठी चूक दाखवली. ते याने घरी येऊन सांगितले (स्वत:च्या) त्यावर त्याच्या आजीने अर्थ विचारला व् "काय तरी मेलं अभद्र ल्ह्यायचं" म्हणून धपाटा घातला.
13 Feb 2014 - 5:09 am | स्पंदना
खाल्ला धपाटा?
:)) :))
13 Feb 2014 - 5:16 am | स्पंदना
तकियेमे अल्ला.
हाय रे कर्मा!
13 Feb 2014 - 1:48 am | पिवळा डांबिस
दिव्यश्रीजी, तुमने एकदम मस्त धागा काढ्या हय. हमको इसमें मराठीका किंवा मराठी माणूसका कोई अपमान या दुर्दैव वैग्रे वाटता नही. मराठी माणुसने यह धागेके बारेमें जरा थोडी विनोदबुद्धी (मराठीमें सेन्स ओफ ह्यूमर बोलते हय उस्को!!)दाखवणेका जरूरत हय. अपने स्वतः को थोडा हासनेमें कुछी वाईट नही. नही तो 'चिडका बिब्बा' बोलते हय. :)
बाकी ये भाषा और उच्चारका घपला मराठी लोगाच करते है ऐसा नही. पब्लिकने थोडा रसेल पीटर्स् का कॉमेडी यू ट्युबपर है वो देखना मंगताय! हमारा तो हासहासके पोट दुखताय!!!
लगे रहो, मराठीभाय!!!
:)
13 Feb 2014 - 1:59 am | आनन्दिता
ह्याला म्हणायचं प्रतिसाद !! काका लै भारी.. :)
13 Feb 2014 - 5:11 am | स्पंदना
हांगाश्शी! ऐश्याच बोलनेकु मंगताय. उगा फज्जर फज्जर को बटर डुबाके खानेका और मसत रैनेका. क्या म्हनताय?
13 Feb 2014 - 2:17 am | प्यारे१
मेरे को कंटाला आ गया!
13 Feb 2014 - 2:21 am | अनन्त अवधुत
माझा एक मित्र चिमणीच्या घरट्याला हिंदीत बोलताना "चीडीयाघर" म्हणाला होता.
13 Feb 2014 - 2:24 am | आनन्दिता
लै शानपणा नै करनेका मुंगळा टाकुंगी आंग पे.
-इति मणेर काकु
13 Feb 2014 - 9:32 am | पियुशा
@ आनन्दिता
काय लिहीलय ग हे ? नुसती हसतीये हापिसात आल्यापासुन :) (गड्बडा लोळ्णारी स्माईली कशी घेतात ? )
आमच्याकडे आई अन आज्जी अशी करमणुक करत असतात वरचेवर .
आजी : "आज हमारे इधर करंगळी के धार एवढा पाणी आया हमकोच भरनेको नही मिला "
आई : " ए साडीवाले भैय्या ,तुम कल दोपर मे आव , दोपर मे हम निवांत रेहते हे "
@ दिव्यश्री तै मस्त धागा काढलायेस ह.ह्.पु.वा. :)
13 Feb 2014 - 2:54 am | अर्धवटराव
एक मराठी भौसाएब लग्नातल्या पंगतीचं वर्णन हिंदीत करताना म्हणाला.. ह्मारे यहा पहिले नवरा नवरीको घास खिलाता है =))
आता हा विनोद आइनस्टाईन, विवेकानंद, वॉरन बफेट नावाने जसं काय वाटेल ते खपवल्या जातं त्यातला होता काय कल्पना नाहि.
13 Feb 2014 - 5:12 am | स्पंदना
घास खिलाता है????
:))
13 Feb 2014 - 3:04 am | प्रभाकर पेठकर
दिव्यश्री,
खरं पाहता मी कांही प्रतिसादच देणार नव्हतो. कारण मूळ धाग्यात म्हंटल्याप्रमाणे 'एक मजा म्हणून लिहिले आहे आणि सगळ्यांना विनंती आहे कि या लिखाणाकडे मजा म्हणूनच पाहावे .' ह्या विनंतीला मान देऊन मी कांही इतर गंभीर धाग्यांकडे वळणार होतो पण सर्वसाक्षींच्या प्रतिसादावरील आपली प्रतिक्रिया वाचली आणि कांही गोष्टी डोक्यात आल्या त्या इथे लिहील्या आहेत.
हे अनुमान कशाच्या बळावर काढले आहे? माझा अनुभव असा आहे की पूर्व, दक्षिण आणि इतर अनेक राज्यांपेक्षा महाराष्ट्रात हिन्दी चांगली बोलली जाते. त्याचे कारण मराठी माणसाची हुशारी नसून शाळेतच 'हिन्दी' हा एक विषय आपल्या शिक्षणात अनिवार्य आहे. हिन्दी चित्रपट क्षेत्रात अनेक मराठी तारे-तारका व्यवस्थित हिन्दी बोलतात. लता मंगेशकर, आशा भोसले वगैरे गायिका अनेक वर्षे राज्य करीत आहेत. हिन्दी नाटकांमध्ये आणि मालिकांमध्येही अनेक मराठी कलाकार हिन्दी भाषा व्यवस्थित बोलत असतात. बिजेपी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील अनेक मराठी नेते हिन्दी व्यवस्थित बोलत असतात.
वरील प्रतिसादांमधील अनेक उदाहरणे ही मागिल पिढीच्या महिलांची आहेत. त्यांना बाहेरच्या जगात वावरायला, अन्य भाषिकांमध्ये मिसळायला संधीच कमी मिळाली त्यामुळे शाळेत शिकलेली हिन्दी भाषा वापरात राहीली नाही. पुरुषांचे सहसा तसे झालेले दिसत नाही. नोकरी धंद्यानिमित्त त्यांचे अन्य भाषिकांशी संबंध येतात आणि हिन्दी भाषा वापरात राहाते. कुठलीही भाषा वापरात असेल तर आणि तरच त्या भाषेवर आपलं प्रभुत्व राहतं. अगदी आपल्या मातृभाषेचेही तस्स्सेच आहे. मराठी वापरात नाही राहिली (इंग्रजी, हिन्दी मिसळले) की आपल्या मातृभाषेची शुद्धताही हळू हळू नष्ट होते. हिन्दी तर आपल्यासाठी परकी भाषा आहे.
सर्व मराठी माणसं हिन्दी बोलताना चुकतात?
हिन्दी ही राष्ट्रभाषा नाही हा मुद्दा वर येऊन गेला आहेच.
आधी मातृभाषा व्यवस्थित (शक्य तितकी शुद्ध, 'बोलत' नाही 'बोलता' ) बोलता यायला पाहिजे.
Milano, हॉटेल बुक, सगळेच ब्लांक झाले, पूर्ण ट्रीप संपे पर्यंत, जरूर शेअर करा, ह्या सर्व शब्दांना मातृभाषेत पर्यायी शब्द आहेत नं?
Milano - मिलॅनो
हॉटेल बुक - अगदी हॉटेलला 'विश्रांतीगृह' नाही म्हंटलं तरी 'आरक्षण' शब्द वापरता येईलच.
सगळेच ब्लांक (ब्लँक) झाले - स्तिमित झालो, स्तब्ध झालो.
पूर्ण ट्रिप संपे पर्यंत (संपेपर्यंत) - सहल
जरूर शेअर करा - अवश्य आदानप्रदान करा
मातृभाषा व्यवस्थित बोलता यायला पाहिजे हा तुमचा मुद्दा मला अगदी पटला. तुम्हालाही माझा मराठी भाषेचा आग्रह पटला असेल असे वाटते.
इथला प्रत्येक जण कधी न कधी नविन असतोच असतो. आपल्या चुका कोणी दाखविल्या तर त्यात राग कसला? कोणी मुद्दामहून नविन सदस्याला 'छळत' नाही.
भाषेबद्दल बोलताना, वरील धाग्यातील लिखित भाषेतील व्याकरणाच्या साध्या साध्या चुका जसे, स्वल्पविराम, पूर्णविरामा नंतरच्या शब्दात एक जागा सोडायला पाहिजे आणि कांही शब्दांची तोडफोड, ही अधोरेखित केली नाहीए नाहीतर हा एक स्वतंत्र लेखच होईल.
सर्वसाक्षींनीही अगदी प्रामाणिकपणे लिहीले आहे आणि माझा हा प्रतिसादही अगदी प्रामाणिक आहे. खात्री असावी आणि राग मानू नये.
मला मराठी भाषेची आवड आणि अभिमान आहे. पण कधी कधी माझ्या तोंडूनही एखादा चुकीचा शब्द जातोच. मी मान्य करतो. पण कोणी चुक दाखवून दिली तर रागवत नाही, सुधारून घेतो. अशा बारीक बारीक सुधारणांमधून आपली मातृभाषा संमृद्ध होत जाते. वरील लेखनातही काही चुका आढळल्यास नि:संकोच सांगाव्यात.
13 Feb 2014 - 4:02 am | पिवळा डांबिस
तुमच्याशी वाद घालायचा अजिबात हेतू नाही. (बाकी काय बिशाद आहे आमची?) :) पण तुम्हीच
असं सांगितल्यामुळे खालील वाक्ये लिहायचा धीर करत आहे...
सर्वप्रथम,
Milano या शब्दाचं मराठीकरण मिलॅनो असं होत नाही. मुळात हा इंग्रजी शब्द नाही, इटालियन आहे. आणि माझ्या अनुभवानुसार स्थानिक इटालियन त्याचा उचार 'मिलानो' असा करतात. इंग्रजीतही त्या गावाला 'मिलान' असं म्हणतात, मिलॅन नाही. तेंव्हा विशेषनामे लिहितांना तरी त्यांचं मराठीलिपीकरण केलं नाही तरी चालावं...
बाकी हॉटेल बुक, ट्रीप, शेअर करणे याबद्दल बोलायचं झालं तर गेल्या चाळीस वर्षांपासून मुंबईततरी हेच शब्द वापरले जातात. हॉटेलचं बुकिंग केलं, शाळेची ट्रीप गेली, डोसा शेअर केला असंच म्हणतात. महाराष्टात अन्यत्र कुठे तुम्ही म्हणता तसे पर्याय वापरले जात असतीलही, मी नाही म्हणत नाही. पण एखाद्याने ते वापरले नाहीत तर तो फार मोठा दोष म्हणता येणार नाही.
बाकी तुम्ही 'जरूर' ला 'अवश्य' हा पर्याय का सुचवला ते माझ्या डोक्यावरून गेलंय!!
तद्भाषीय शब्द वापरायला हवेत हे तर खरंच पण त्याचबरोबर कोणत्याही भाषेने सर्वसमावेशक असणं आवश्यक आहे, नाही का?
चूभूद्या घ्या...
13 Feb 2014 - 9:40 am | जेनी...
वा वा !! लय भारी !!!!
13 Feb 2014 - 3:48 pm | आदूबाळ
उगाच माझाही अवांतर आगावपणा:
इटालियन लोक बोलताना बडबडगीत म्हटल्यासारखा आवाज लावतात. त्यामुळे "इतालियेन्न", "मिलान्नो", "दानियेल्ले", "सिमोनताक्की" असे उच्चार असतात. इतालियेन्न माणूस बोलायला लागला की त्याच्या लयबद्ध बोलण्याकडेच लक्ष लागून रहातं आणि आशय निसटून जातो - असा अनुभव कैकवेळा आला आहे.
(जिज्ञासूंसाठी: इतालियेन्न तरुणी बोलत असताना तिच्या बोलण्याकडेही लक्ष जात नाही...)
13 Feb 2014 - 4:34 pm | यसवायजी
उगाच माझाही अवांतर आगावपणा:
फ्रेंच इंग्रजी-
फ्रेंच- आई वॉन्टं पेप्परं
दुकानदार- या शुअर. ब्लॅक पेप्पर ऑर व्हाईट पेप्पर?
फ्रेंच- टॉईलेट्टं.. पेप्परं..
13 Feb 2014 - 7:43 pm | प्रभाकर पेठकर
>>>>Milano या शब्दाचं मराठीकरण मिलॅनो असं होत नाही. मुळात हा इंग्रजी शब्द नाही, इटालियन आहे. आणि माझ्या अनुभवानुसार स्थानिक इटालियन त्याचा उचार 'मिलानो' असा करतात. इंग्रजीतही त्या गावाला 'मिलान' असं म्हणतात, मिलॅन नाही.
मिलॅनो हा माझा ऐकीव उच्चार आहे. त्याचा इटालियन उच्चार 'मिलानो' होतो ही माहीती मला तुमच्या प्रतिसादातून मिळाली आहे. माझी चुक मी सुधारली आहे. माझा आक्षेप, संपूर्ण मराठी लेखात 'Milano' ह्या इंग्रजी लिपीतील शब्दाला आहे. इटाली हा शब्द मराठीत लिहीता येतो तर 'मिलानो' का नाही? इटाली सुद्धा विशेषनाम आहे.
>>>>एखाद्याने ते वापरले नाहीत तर तो फार मोठा दोष म्हणता येणार नाही.
फार मोठा दोष आहे असे माझेही म्हणणे नाही. पण मराठी लिहायचा प्रयत्न तर करून पाहा. मराठी भाषा लिहायला, बोलायला, वाचायला, गोड नाही वाटत का? की मराठीच्या वापराने नेमका अर्थ न कळता भलताच अर्थ ध्वनीत होतो?
>>>>बाकी हॉटेल बुक, ट्रीप, शेअर करणे याबद्दल बोलायचं झालं तर गेल्या चाळीस वर्षांपासून मुंबईततरी हेच शब्द वापरले जातात. हॉटेलचं बुकिंग केलं, शाळेची ट्रीप गेली, डोसा शेअर केला असंच म्हणतात.
होय गेल्या ४० वर्षात हेच झाले आहे. ते थांबावे हाच उद्देश आहे. 'हॉटेल' शब्द बर्यापैकी मराठीत स्थिरावला आहे. 'आरक्षण असलेल्या हॉटेलाचा पत्ता शोधताना' ऐवजी 'हॉटेल 'बुक' केलेले होते ते शोधताना...' असा शब्द प्रयोग करून आपण 'बुक करणे' हा निविन शब्द मराठीच्या मूळ शब्दाला बाजूला सारून प्रस्थापित करतो आहोत. ते टाळता आलं तर पाहावं. 'आरक्षित हॉटेलचा पत्ता शोधताना..' असे म्हंटले तर अर्थ कळत नाही का?
मराठी भाषेचा आग्रह धरणारे मराठी बांधवांकडूनच हास्याचा विषय ठरतात ह्यापरतं मराठी भाषेचे दुर्दैवं ते काय? हे वैयक्तिकरित्या तुम्हाला उद्देशून नाही तर एकूणातच मराठी भाषेला मिळणार्या सापत्न वागणूकीला उद्देशून आहे.
कांही मराठी शब्द कांही जणांना बोजड वाटतात. कानाला ऐकायला सहजसुलभ वाटत नाहीत. त्यामुळे त्यांचा मिश्र मराठीला पाठींबा असतो. पण संस्थळाच्या अस्तित्वात आल्यानंतर, 'LOL', 'बाडीस', 'गुगलून पाहा', OMG आणि स्मायल्यांचा वापर एवढ्या सगळ्या गोष्टी आपण विनातक्रार शिकलो आणि वापरतोही. मग मातृभाषेतील नविन नाही तर वर्षानुवर्षे चालत आलेले शब्द आपल्याला अनाकलनिय का वाटावेत? बोजड का वाटावेत? ते शिकण्याकडे, वापरण्याकडे आपला कल का नसावा? हे समजत नाही.
अगदी अवजड-बोजड मराठीच बोला असा माझा (किंवा सर्वसाक्षींचाही) आग्रह नाही. पण जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे मराठी पर्यायी शब्द आवर्जून वापरले तर मराठी भाषा धेडगुजरी बनणार नाही.
14 Feb 2014 - 2:13 am | पिवळा डांबिस
या तुमच्या पॉइंटाशी [क्षमस्व, 'मुद्द्याशी'; आता मराठी बोलले पाहिजे तुमच्याशी!! :) ] सहमत आहे.
होय हो, वाटतं की. तुम्ही-आम्ही मिपावर खूप वर्षं लिहितोय. आपण जर 'मोकलाया दाही दिशा' स्टाईल लिहिलं तर एकमेकांना आक्षेप घेणं हे ठीक आहे!! पण त्यांनी अगोदरच सांगितलंय की त्या नवीन आहेत म्हणून! म्हणून कृपया तिला फोडा (सो प्लीज गिव्ह हर अ ब्रेक!!) :)
नाहीतर नवोदित सभासदांना छळल्याबद्दल नीलकांताकडे तुमची चुगली करून एक चांदणी मिळवीन हां मी!!!
ते तर आहेच. पण त्याहीपेक्षा कधीकधी मुद्दाम अट्टहासाने अनैसर्गिक मराठी शब्द वापरण्याचा हट्ट हा जास्त जाचक वाटतो. उदा. जागा 'राखून' ठेवणं हे मला सरळ सोपं मराठी वाटतं. पण जागेचं 'आरक्षण' केलं असं म्हणणं म्हणजे आमच्या तोंडी सर्कारी तोबरा भरल्यागत वाटतं.
मराठी भाषा धेडगुजरी बनू नये असं मलाही वाटतं पण त्यापेक्षा ती बदललेल्या स्वरूपात का होईना पण जास्तीतजास्त लोकांकडून वापरात रहावी असं जास्त प्रकर्षाने वाटतं. तिची पाली वा अर्धमागधी होऊ नये असं वाटतं...
आणि मराठी भाषेला बदलाचं वावडं नाहिये. ज्ञानेश्वराच्या काळची मराठी तुकारामांच्या काळी बदलली होती, ती मग चिपळूणकरांच्या काळी आणखी बदलली, मग खांडेकर-फडक्यांच्या काळी अजून बदलली आणि आताही बदलतेय. जर तेराव्या शतकापासून एकविसाव्या शतकापर्यंत नवे शब्द येऊनही, बदलूनही जर मराठी अजून मराठीच असेल तर निव्वळ संस्कृतोद्भव शब्दांचा अट्टहास करण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं....
बहुत काय लिहावे? आपण सूज्ञ आहांतच...
लेखनसीमा.
14 Feb 2014 - 10:37 pm | सखी
म्हणून कृपया तिला फोडा --- अशक्य हसतेय पिडाकाका!
13 Feb 2014 - 10:22 am | अर्धवटराव
पण हिंदीला परकी भाषा म्हणणं काहि पटलं नाहि बुवा... एकट्या हिदी सिनेमा आणि गाण्यांनी ४ मराठी पिढ्यांचं भावविश्व समृद्ध केलय. आयुष्यातली कुठलिही हळवी आठवण घ्या... ति एखाद्या हिंदी चित्रपट/प्रसंग/गाण्याशीच कनेक्ट होते. तसच जुन्या हिंदी टी.व्ही सिरेयल्स आणि बाकि कार्यक्रम... आज सुद्धा कोण मुलगा/मुलगी मराठी नट्यांची कॉपी करायचा प्रयत्न करते? मग ति भाषा आपल्याला परकी कशी?
13 Feb 2014 - 7:46 pm | प्रभाकर पेठकर
>>>>हिंदीला परकी भाषा म्हणणं काहि पटलं नाहि बुवा..
अर्धवटराव, 'परकी' म्हणजे जी मातृभाषा नाही ती. 'परकी' म्हणजे लगेच परदेशी नाही.
13 Feb 2014 - 1:17 pm | चिगो
ह्याकडे लक्षच गेले नाही.. मुळात मराठी लोक मराठी लिहीतांना चुकतात तर. "मुळा-मुठे"च्या पाण्याला काय वाटेल अश्याने? ;-)
प्रतिसादाशी सहमत, पेठकर काका..
13 Feb 2014 - 1:54 pm | दिव्यश्री
खरं पाहता मी कांही प्रतिसादच देणार नव्हतो.
पेठकर काका तुम्ही या धाग्यावर येउन प्रतिसाद दिलात त्याबद्दल आभारी आहे.
हे अनुमान कशाच्या बळावर काढले आहे?>>>माझ्या अल्पमती नुसार.मला काही तुमच्या एवढा अनुभव नाही.मी महाराष्ट्रात पुणे ,नाशिक आणि काही ठराविक गावे /शहरे सोडली तर जास्त फिरले नाही.
कुठलीही भाषा वापरात असेल तर आणि तरच त्या भाषेवर आपलं प्रभुत्व राहतं>>> प्रभुत्व सोडा हो मी फक्त भाषा व्यवस्थित बोलत यावी असं लिहील आहे.
हिन्दी तर आपल्यासाठी परकी भाषा आहे. >>> हि माहिती माझ्यासाठी नवीन आहे.
सर्व मराठी माणसं हिन्दी बोलताना चुकतात?>>> सर्व हा शब्द माझा नाही तरीही माझ्या निरिक्षणा नुसार बरेच वेळा हिंदी बोलताना चुकतात.
Milano, हॉटेल बुक, सगळेच ब्लांक झाले, पूर्ण ट्रीप संपे पर्यंत, जरूर शेअर करा, ह्या सर्व शब्दांना मातृभाषेत पर्यायी शब्द आहेत नं?>>> हो आहेत. फक्त ते पटकन आठवले नाहीत मला तरी
तुम्हालाही माझा मराठी भाषेचा आग्रह पटला असेल असे वाटते. >>>हो अगदी .
इथला प्रत्येक जण कधी न कधी नविन असतोच असतो. आपल्या चुका कोणी दाखविल्या तर त्यात राग कसला? कोणी मुद्दामहून नविन सदस्याला 'छळत' नाही. >>>प्रत्येक जण नवीन असतो हे माहिती आहे मग जुन्या सदस्यांनी नवीन सदस्यांना समजून घ्यावे.त्यांच्या चुका जरूर दाखवाव्यात आणि नवीन सदस्यांनी त्या मान्य करून सुधाराव्या.नवीन सदस्याला
छळतात असं मी लिहिले नाही आणि तो माझा उद्देशही नाही.मला कसलाही राग नाही.
भाषेबद्दल बोलताना, वरील धाग्यातील लिखित भाषेतील व्याकरणाच्या साध्या साध्या चुका जसे, स्वल्पविराम, पूर्णविरामा नंतरच्या शब्दात एक जागा सोडायला पाहिजे आणि कांही शब्दांची तोडफोड, ही अधोरेखित केली नाहीए नाहीतर हा एक स्वतंत्र लेखच होईल. >>> लिहाच एक लेख किमान भविष्यातील चुका टाळंता येतील :)
13 Feb 2014 - 8:16 pm | प्रभाकर पेठकर
>>>>माझ्या अल्पमती नुसार.मला काही तुमच्या एवढा अनुभव नाही.मी महाराष्ट्रात पुणे ,नाशिक आणि काही ठराविक गावे /शहरे सोडली तर जास्त फिरले नाही.
प्रतिसादामध्ये 'मला कसलाही राग नाही' हे ठळक अक्षरात लिहायचं आणि उपप्रतिसाद मात्र उपहासाने ठासून भरलेले द्यायचा. वा!
>>>>प्रभुत्व सोडा हो मी फक्त भाषा व्यवस्थित बोलत यावी असं लिहील आहे.
माझंही तेच म्हणणं आहे. 'बोलत' नाही तर 'व्यवस्थित 'बोलता' यावी'.
>>>>हि माहिती माझ्यासाठी नवीन आहे.
परकेपणाची माझी व्याख्या मी अर्धवटरावांना दिलेल्या प्रतिसादात आहे.
>>>सर्व हा शब्द माझा नाही
'सर्वसामान्य पणे मराठी लोक हिंदी भाषा व्यवस्थित बोलू शकत नाहीत अस निरिक्षण आहे' आणि 'कांही मराठी माणसं हिन्दी भाषा व्यवस्थित बोलू शकत नाहीत असं निरिक्षण आहे' ह्या दोन वाक्यातला फरक कळला तर माझ्या प्रतिसादातल्या माझ्या 'सर्व' ह्या शब्दाचा अर्थ कळेल.
>>>>त्यांच्या चुका जरूर दाखवाव्यात आणि नवीन सदस्यांनी त्या मान्य करून सुधाराव्या.
तेच तर केलं आहे. बाकी नविन सदस्यांना जुन्यांनी सांगितलेल्या कांही कांही गोष्टी पटत, रुचत नाहीत. समजून घ्यायच्या नसतात नुसताच त्रागा करायचा असतो त्याला कोण काय करणार?
>>>>लिहाच एक लेख किमान भविष्यातील चुका टाळंता येतील
माझ्या प्रतिसादातील ' स्वल्पविराम, पूर्णविरामानंतरच्या शब्दात एक जागा सोडायला पाहिजे आणि कांही शब्दांची तोडफोड' ह्या अप्रत्यक्ष सुचनेकडेही दुर्लक्ष करुन ह्या तुमच्या वरील प्रतिसादात पुन्हा त्याच चुका दिसतात ह्यावरून तुम्ही शुद्धलेखनाबद्दल किती गंभीर आहात हे दिसतंच आहे. त्यामुळे उगा लेख लिहून वेळ फुकट घालवायची इच्छा नाही.
13 Feb 2014 - 8:24 pm | दिव्यश्री
धन्यवाद
13 Feb 2014 - 2:15 pm | दिव्यश्री
चोकोलेट,बिस्किटे,ईस्त्री ,रेडिओ, गेस ,मिक्सर,टोवेल,पेन ,पेन्सिल, बेटरी,वायर पावडर(चेहर्याला लावतो ती ),सिग्नल,ग्लास(काचेचा ),हेअरडाय,नेलकटर ई.ई. रोजच्या वापरातील शब्दांना मातृभाषेत पर्यायी शब्द आहेत का ? आणि असतील तर आपण मराठीच शब्द वापरतो का ?
अवांतर मला टो, बे,गे ही अक्षरे लिहिता आली नाहीत क्षमस्व .
13 Feb 2014 - 3:54 pm | आदूबाळ
चॉकलेटचं कसलं भाषांतर करायचंय? हे म्हणजे तुपाला "क्लॅरिफाईड बटर" आणि मोदकाला** "ग्रेटेड कोकोनट डंपलिंग" म्हटल्यासारखं आहे.
पुलंच्या लेखनात कुठेतरी "उदजनध्वम" आणि "दंतधावनी" असे शब्द आल्याचं आठवलं :)
**खायचा. बाईक चालवायचा नव्हे
13 Feb 2014 - 8:34 pm | प्रभाकर पेठकर
जे परभाषिक शब्द मराठीत रुळले आहेत, तेही बदला आणि ओढूनताणून बोजड मराठीशब्द बनवा, असा आग्रह मी आजतागायत केला नाही. बोलायला, ऐकायला रुचणारे, अजून विस्मरणात न गेलेले मराठी शब्द वापरा एवढाच आग्रह आहे. जे शब्द दूसर्या भाषेतून मराठीत आले आहेत (असे शेकड्यांनी आहेत. फक्त इंग्रजीच नाही तर फारसी, अरबी, उर्दू अनेक भाषातून आलेले आहेत.) आणि आता आपण त्यांना स्विकारले आहे ते सोडून अजून इतर नविन शब्दांना आपले प्रचलित शब्द टाकून देऊन प्रस्थापित करू नका एवढेच सांगणे आहे.
13 Feb 2014 - 8:55 pm | शिद
जाऊ दे काका... नयी हय वह :)
13 Feb 2014 - 11:18 pm | काळा पहाड
मेरा गला थोडा "बैठ" गया है - आशा भोसले.