प्रिय मिपाकरांनो,
कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की, कालचा आमचा फोर्ट कट्टा छान पार पडला.काय काय बघीतले आणि कोण-कोण आले होते, ह्याचा व्रुत्तांत येईलच.फिरता-बोलता-पहाता आणि खाता कट्टा असल्याने, पुढील कट्टा पण लगेच ठरला.
वल्लींना फोन केला आणि आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने ते "घारापुरी" लेणी दाखवायला तयार झाले.मार्च मधली १ली तारीख किंवा ८वी तारीख. साल २०१४....
काही अपरिहार्य कारणा मुळे तारीख नक्की करता येत नाही आहे पण वार मात्र नक्की आहे, आणि तो म्हणजे "शनिवार".
सामान्यतः शनिवार हा न-कर्त्याचा वार म्हणून ओळखला जातो.मिपाकर मात्र त्याला अपवाद आहेत.हा कट्टा पण आपण असाच शनिवारी साजरा करणार आहोत.
आपले काही व्यावसायीक मित्रगण कार्यबाहुल्ल्यामुळे येवू शकणार नाहीत, ह्याची जाण आहे.पण ते मन मोठे करून (किंवा मन मारुन) माफ करतील.
कळावे,
लोभ आहेच,
तो अशा ज्ञानी माणसांच्या सहवासामुळे अजून नक्की वाढणार पण आहेच.
आपला, मुवि.
प्रतिक्रिया
9 Feb 2014 - 11:55 am | खटपट्या
शुभेच्छा !!!
9 Feb 2014 - 11:59 am | मुक्त विहारि
वल्ली शेठ बरोबर असल्याने, माहिती मिळेलच शिवाय फोटो पण टाकूच....
चिंता नसावी...
9 Feb 2014 - 12:07 pm | किसन शिंदे
मुवि, तोंडघशी पडाल, कट्ट्याला आलेले मिपाकर तुम्हाला दोष देतील, आलेल्यांची निराशा होईल....
कारण प्रत्यक्ष ठिकाणी हा वल्ल्या तोंडच उघडत नाही. :D :P
(ह.घ्या) ;)
10 Feb 2014 - 11:45 am | सूड
>>कारण प्रत्यक्ष ठिकाणी हा वल्ल्या तोंडच उघडत नाही.
सहमत !!
10 Feb 2014 - 12:44 pm | प्यारे१
सहमतीबद्दल सहमत!
11 Feb 2014 - 12:05 am | विश्वनाथ मेहेंदळे
रायगडावरचा गाईड आठवला... बिचार्याला परत पाठवले होते आम्ही. नंतर आम्ही बिचारे झालो म्हणा...
9 Feb 2014 - 12:17 pm | तिमा
कट्ट्याला शुभेच्छा!
9 Feb 2014 - 1:33 pm | दिपक.कुवेत
सुटेबल आहेत. फक्त तारीख नक्कि झाली कि कळवा. आलो कि सविस्तर फोनवर बोलुच.
9 Feb 2014 - 1:40 pm | मुक्त विहारि
एकाच सुमारास दोन्ही कट्टे होतील.
पुणेकरांना, मुंबईकर सामावुन घेवू शकतील.
किंवा त्याच तारखेला संध्याकाळी तुमच्याबरोबर पक्षीतीर्थासकट पण कट्टा करता येईल.
प्रभाकर पेठकर काय म्हणतात बघू या...
9 Feb 2014 - 4:22 pm | सुहास झेले
८ तारीख जास्त सुटेबल आहे..... मुंबईहून कोण कसे जाणार ते ठरल्यास येणं जमतंय का नक्की बघेन :) :)
9 Feb 2014 - 4:25 pm | आत्मशून्य
भरपुर शुभेछ्चा. कट्टा अगदी जोमात होउदे.
9 Feb 2014 - 4:43 pm | किसन शिंदे
तू ही येणं अपेक्षित आहे. :-)
9 Feb 2014 - 4:50 pm | आत्मशून्य
पण इतरांनी आनंद नक्किच घ्यावा ही अपेक्शा आहे.
9 Feb 2014 - 4:45 pm | जेपी
मुवी ,
कळावे
लोभ वैगैरै वाक्य वाचुन मला वाटल की तुमी लाडक्या काका बरोबर गपचीप
कट्टा करुन आलात .
शुभेच्छा .
9 Feb 2014 - 4:53 pm | प्रचेतस
घारापुरीला अगदी लहानपणीच गेलो होतो त्यामुळे लेण्या आता काहिही आठवत नाहीत. पण एकंदरीत जितके ऐकलेय त्यानुसार वेरूळच्या लेण्यांशी बहुत साम्य आहे त्यामुळे मूर्ती ओळखायला फारसे अवघड जाऊ नये.
१ किंवा ८ तारिख हापिसच्या स्केड्युलवर अवलंबून आहे. तरीही ७/८ दिवस आधी कन्फर्म करेनच.
ढोबळमानाने आमचा प्लान साधारण असा राहील.
शनिवारी सकाळी सिंहगडने आम्ही ९.४५/१० पर्यंत सीएसटीला पोहोचू. (सध्या तरी मी, प्रशांत, धन्या आदी पुणेकर कन्फर्म आहोत) तिथून लगेच गेटवेला. मुंबैकर मिपाकर त्यासुमारास सीएसटी अथवा थेट गेटवेला भेटू शकतील. लेणी बघून साधारण ४/५ पर्यंत परत फोर्टला येणे अपेक्षित आहे. मग थोडावेळ तिथेच भटकून ६.५० च्या सह्याद्रीने अथवा ८.०० च्या महालक्ष्मीने आम्ही पुण्यास परतीच्या प्रवासास निघू.
10 Feb 2014 - 4:13 pm | सौंदाळा
वल्लीदा, १ तारीख ठरली तर मी पण आहे बरं का
10 Feb 2014 - 10:06 pm | सुधीर
असा योग पुन्हा कधीतरी येईल ही भोळी अपेक्षा! कट्ट्याला शुभेच्छा!!
9 Feb 2014 - 5:24 pm | अत्रुप्त आत्मा
आमचा फारसा बिझ्झी महिना नसल्यामुळे ९९% येणार आहेच! :)
10 Feb 2014 - 11:53 am | बॅटमॅन
८ तारखेस मला जमणार नाही. १ तारखेस ठरले तर येऊ शकेन.
10 Feb 2014 - 12:43 pm | चिप्लुन्कर
८ मार्च मी येतोय. कसे कधी भेटायचे ते कळले निदान २ ते ५ दिवस आधी तर बरे होईल . (फोर्ट कट्ट्या सारखा उशीर होणार नाहि यावेळी मु वि साहेब)
10 Feb 2014 - 4:10 pm | मुक्त विहारि
वल्लींनी साधारण रुपरेखा दिली आहे.
अधिक माहितीसाठी,,,,,(http://www.misalpav.com/comment/reply/26970/553298)वल्लींचा हा प्रतिसाद वाचा.
तारीख मात्र ते पुणेकरांना विचारून नक्की करणार आहेत.४/५ दिवस आधी ते तारीख नक्की सांगतील.
(खरे तर हा कट्टा खास पुणेकर पाहुण्यांसाठी असल्याने, यजमान मुंबईकरांनी जास्त काड्या न करता, पुणेकरांच्या स्वागताची तयारी करावी.होळी जवळ येत आहेच, शिमगा आत्ता नाही केला तरी चालेल.
पुण्यातल्या ओमकारेश्र्वर मंदिरापेक्षा, घारापुरी लेणी जुनी आहेत, असे एकदाच त्यांना आपल्याला दाखवून द्यायचे आहे.तस्मात सध्या त्यांच्या सोईने त्यांना येवू देत.
जास्त काही बोलले तर, बोरीवलीतील लेणी दाखवू.
चला पळावे आता.
भरपूर काड्या लावून झाल्या.)