गाभा:
"व्हॅलेंटाईन्स डे" यंदा पौर्णिमेला येतो आहे (बहुधा.. ) म्हणजे अगदी दुर्मिळ असा योग!
प्रेम कुणावर, केव्हा आणि कोणत्या वयात होऊ शकत त्याच काही सांगता येत नाही अस म्हणतात. एकदा प्रेमात पडलेली व्यक्ती किमान तीन वेळा आयुष्य़ात प्रेमात पडते.. (पडते म्हणजे तोंडघाशी पडते असा अर्थ घेऊ नये..) तेव्हा अगदी ध्यानी मनी नसतांना, किंवा अनपेक्षित व्यक्तीकडून तुम्हाला प्रेमाचा या दिवशी संदेश मिळाला तर तुमची प्रतिक्रिया काय असेल?
प्रतिक्रिया
31 Jan 2014 - 6:07 am | अनन्त अवधुत
म्हणजे देवीच्या देवळात प्रपोज केले तर उत्तर होकारार्थी येईल असे वाटते का?
31 Jan 2014 - 9:42 am | टवाळ कार्टा
म्याच्च्या पैल्याच बॉलवर शिक्सर \m/
=))
31 Jan 2014 - 6:12 am | मदनबाण
प्रेम कुणावर, केव्हा आणि कोणत्या वयात होऊ शकत त्याच काही सांगता येत नाही अस म्हणतात.
खरयं... प्रेम ठरवुन करताच येत नाही. ते फक्त होत.
एकदा प्रेमात पडलेली व्यक्ती किमान तीन वेळा आयुष्य़ात प्रेमात पडते..
अरेच्च्या फक्त ३ वेळाच ! मला वाटल हा आकडा जास्त असावा ! ;)
तेव्हा अगदी ध्यानी मनी नसतांना, किंवा अनपेक्षित व्यक्तीकडून तुम्हाला प्रेमाचा या दिवशी संदेश मिळाला तर तुमची प्रतिक्रिया काय असेल?
हॅहॅहॅ... अजुन तरी आमच्या आयुष्यात असा गोल्डनमयी दिवस उजाडला नाहीये...
परंतु... मला गाण्याची लयं हौस असल्याने एक दुवा देतो :- I Love You...I Love You...I Love You - Meri Neendon Mein Tu
31 Jan 2014 - 12:30 pm | विश्वनाथ मेहेंदळे
टायपो असावा. मी एका दिवसात तीनदा प्रेमात पडतो कधिकधी
1 Feb 2014 - 8:44 am | सुहास झेले
विमे, शिकवणी घेता का हो आम्हा पामरांची =)) ;-)
2 Feb 2014 - 7:12 pm | विश्वनाथ मेहेंदळे
नीट वाच रे. मी दिवसातून ३ दा प्रेमात पडतो. माझ्या प्रेमात कुणी पडते असे कुणी म्हटले आहे ??
6 Feb 2014 - 10:45 pm | सुहास..
पुन्हा हलकेच घ्या रे/ग ...;)
तो : आय लव्ह यु
स्नेहांकिता : ॥ प्रेमेषु बोलुनि ॥ ॥ तंगड्याषु तोडानि ॥ ॥ थोबाडुषु धुवुनि ॥ ;)
खालील प्रतिसादामधील ज्योक ओळखाणार्यास माझ्या तर्फे काटाकिर्र मध्ये मिसळ !!
ती : आय लव्ह यु
बिरूटे सर : अं !
ती : सॉरी : माझ प्रेम आहे तुमच्यावर
बिरुटे सर : ...अं !!
ती : क्षमस्व ..माझ केवळ तुमच्यावर प्रेम आहे
बिरुटे सर : गुड ! आत कसं
ती : अं
ती : आय लव्ह यु
खटपट्या : चांगलय
ती: आय लव्ह यु
तस्थास्तु : :) ;) ;)
7 Feb 2014 - 1:25 am | आनन्दिता
एक राहीलं
ती : आय लव यु..
सुहास.. ( वाश्या) : आमचे इथे प्रत्येकाला प्रपोज करुन मिळेल... आय लव यु म्हणण्याचा वेगळा खर्च पडेल !!
ती. : बेशुद्ध
7 Feb 2014 - 2:08 am | यशोधरा
भारी!
7 Feb 2014 - 6:48 am | सुहास..
हा हा हा हा ..लय भारी ग !!
हे घ्या ...आणि हलके घ्या ...
तो : आय लव्ह यु
आनन्दिता : आमच्या इथे काकवांच्या कानाला चावुन मिळेल, भोंगा पसरायचा वेगळा चार्ज पडेल ;)
7 Feb 2014 - 9:42 am | आनन्दिता
ही ही ही.... :-P
लहानपणी आम्ही भोंगा न पसरण्यासाठी पण वेगळा चार्ज लावायचो...
7 Feb 2014 - 1:26 am | आनन्दिता
हळू घ्या म्हणायचं राहीलं.. :) :)
7 Feb 2014 - 1:45 am | मदनबाण
हॅहॅहॅ... वाश्याची तर विकेटच उडवली ! ;)
9 Feb 2014 - 11:51 am | खटपट्या
आवडलंय
31 Jan 2014 - 7:19 am | चौकटराजा
ह्या ! उगाच खोटं बोलू नको !
31 Jan 2014 - 8:09 am | सुनील
तो: आय लव यू
ती: आय लव यू टू
तो: आय लव यू थ्री!
31 Jan 2014 - 8:45 am | कैलासवासी सोन्याबापु
व्हॅलेंटाईन डे ला आम्हाला आमची (जी केव्हा अन जी कोण होईल ती) बायको बी "आय लव्ह यु" म्हणायची नाही, रावडी, बाईक फ्रिक, दढीयल (वाढलेली दाढी) अन सदैव विद्रोही मोड ऑन असल्या पोरांस गर्लफ्रेंडा मिळत नसतात, सो मी काय उत्तर देईन ते ऑट ऑफ क्वेशचन!!!!..
कॉलेज च्या दिवसात आपल्याला गर्लफ्रेंड नाही ह्याचे कधी वाईटही वाट्ल नाही!!!!, आम्ही आपले "तोका ना मोका चुल्हा मा झोंका" च्या तत्वावर ऑपरेट करायचो/ करतो :)
१. व्हॅलेंटाईन च्या १० दिवस आगोदर पासुन दाढी वाढवा
२. मुद्दाम व्हॅलेंटाईन इव्हनिंग ला काळा शर्ट परिधान करुन आपल्या बुलेट वर धगधग करत "टोळभैरव मोड" ऑन करा
३. अन तुमच्या अस्तित्वाने घाबरलेल्या कन्या अन वशाळलेली पोरे ह्यांची मजा घ्या!!!!!
४. थकलात की श्रमपरिहारा हेतु मस्त एक किंगफिशर चा टिन उघडा अन स्वातंत्र्य सेलीब्रेट करा!!!!
हाच आमचा शिरस्ता!!!!
31 Jan 2014 - 8:56 am | चौकटराजा
तेल्कट छपरी पोरांवरच सुंदर पोरी भाळायच्या असा आम्चा अणुभव हाय !
31 Jan 2014 - 9:21 am | कैलासवासी सोन्याबापु
आँ!!!! अनुभव शेयर करताय का आम्हाला गुंडाळताय हो चौकटराजे महोदय ;)
31 Jan 2014 - 9:46 am | टवाळ कार्टा
माझे उत्तर... . हे सांगण्यासाठी इतका वेळ वाट बघायची गरज नव्हती...आधी माहीत असते तर मस्त प्लान बनवला असता... ;)
31 Jan 2014 - 9:59 am | प्रभाकर पेठकर
'आय लव्ह यू' म्हणायला व्हेलेंटाईन डेच कशाला पाहिजे? तसही, असतो कधी हा व्हॅलेंटाईन डे? (इथपासून आमची तयारी).
आता ह्या उतारवयात एखादी मुलगी (रादर, एखादी बाई) 'आय लव्ह यू' म्हणेल अशी सुतराम शक्यता नसल्यामुळे (ऐन भरात असतानाही कोणी मुलगी कधी म्हणाली नाही) काय उत्तर द्यावं ह्यावर विचार करण्याची गरजच नाही. तशी शक्यताच नसल्यामुळे अगदी सेफ वाटतंय (बायकोला, मुलींना आणि ओळखितल्या बायकांना).
निवृत्ती जवळ आली असताना सरकारी खात्यात वगैरे जसं आपल्या नांवाला फार जपलं जातं तसंच, 'आता 'भलती' रिस्क नको' ह्या विचारांनी माझ्याकडूनही अविचारी पुढाकार घेतला जाणार नाही. त्यामुळे 'व्हॅलेंटाईन डे' आणि 'ऋषी पंचमी' ह्यात आता कांही फरकच उरलेला नाही.
31 Jan 2014 - 10:02 am | पैसा
श्री रामसेने आणि प्रमोद मुतालिकांचं नाव ऐकलांव नाय काय कंदी? ते पाठोपाठ अ.आ. बुवा, हळदीकुंकू आणि मंगळसूत्र घेऊन यायचे! आजूबाजूला बघून मगच "इ लोवे योउ" म्हणा!
31 Jan 2014 - 2:17 pm | यसवायजी
@श्री रामसेने
स्पेस चुकीच्या जागी पडली काय?? हे Mr.रामसेने असं वाटतंय. :D
31 Jan 2014 - 2:36 pm | पैसा
ते वरिजिनल तसंच है! श्री राम सेने (Sri Ram Sene)
31 Jan 2014 - 10:03 am | जेनी...
माझं उत्तर :
अरे माझं लग्न झालय राजा !
" सोन्या एवढे दिवस लावतात का ?? बघ उशिर नसता केलास तर आज मी तुझ्यासोबत असते छकुल्या ??
श्श्या ... बाकी तु म्हणालास ते बरं ़ केलस ... नैतर मला वाटायचं कि , मलाच असं का वाटतय कि तु माझ्यावर फीदा आहेस ते ! :-/
आता किती छान वाटतय म्हणुन सांगु .... "
=))
13 Feb 2014 - 2:04 pm | राजेंद्र मेहेंदळे
तो--आय लव्ह यु
ती--अरे माझं लग्न झालय राजा !
तो--अगं म्हणुनच तर आत्ता प्रपोज करतोय..सध्या सेफ गेम खेळायचे दिवस आहेत
(डेली सोप मालिकांचा प्रभाव)
31 Jan 2014 - 10:11 am | श्रीरंग_जोशी
ऐन वेळी जे सुचेल ते उत्तर देईन. असं आधीपासूनच कसं ठरवायचं; तसंही ते काय म्हणतात कवीहृदय वगैरे घेऊन जन्माला आलेलो नाहीच.
31 Jan 2014 - 10:20 am | ज्ञानोबाचे पैजार
ते कोण म्हणतय आणि कोणत्या परीस्थीतीत म्हणतय त्याप्रमाणे उत्तर बदलेल.
कोण म्हणतय याच्या कॅटॅगरी खालिल प्रमाणे
लहान बालके
सुंदर तरुण कन्यका
(माझ्या)लग्ना आधी (मला) आवडणारी पण आता लग्न झालेली
लग्न झालेल्या इतर सुंदर तरुणी (सर्व प्रकारच्या (आणि आकाराच्या) स्त्रीया सुंदरच असतात त्या मुळे खर तर सुंदर तरुणी ही व्दीरुक्ती होते)
एखादी मध्यमवयिन स्त्री
एखादी उतारवयीन स्त्री
कोणत्याही वयाचा पुरुष (आजकाल काहि सांगता येत नाही)
प्रत्येक कॅटॅगरी समोर उत्तर आपापल्या अनुभवांप्रमाणे कल्पावे.
31 Jan 2014 - 10:27 am | बॅटमॅन
वरती ज्ञानोबांच्या पैजारबुवांनी लिहिल्याप्रमाणेच उत्तर आहे. कोण म्हणतेय अन म्हणणारी अस्मादिकांना कशी वाटेल यावर उत्तर अवलंबून आहे.
31 Jan 2014 - 10:58 am | दिव्यश्री
आपल्याला नै बै जमायचं तसलं ........ ;) :P :D
31 Jan 2014 - 11:00 am | मंदार दिलीप जोशी
उफ् युम्म् मा
31 Jan 2014 - 11:51 am | कवितानागेश
हीहीही!! :D
31 Jan 2014 - 12:01 pm | अत्रुप्त आत्मा
@अगदी ध्यानी मनी नसतांना, किंवा अनपेक्षित व्यक्तीकडून तुम्हाला प्रेमाचा या दिवशी संदेश मिळाला तर तुमची प्रतिक्रिया काय असेल?>>> विचारतात काय हो ! खरचं कुणी ? ;)
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
हल्ली??? =))
31 Jan 2014 - 12:04 pm | जेपी
मले इचारलीस ?
31 Jan 2014 - 12:05 pm | जेपी
व्हाय मले इचारलीस ?
31 Jan 2014 - 12:31 pm | मराठीच
आजपर्यंतच्या इतिहास... मख्खमयी चेहरा करुन प्रियमयीला होकार देण्यात वेळ घालवून गुलाबमयी स्वप्न हातचे घालवून, टीनपॉटमयी आयुष्य जगत आपले ह्रदय आता लोखंडमयी केले पाहीजे ह्या रुक्षपाषाणमयी विचारांपर्यंत मी आलो आहे...
31 Jan 2014 - 12:40 pm | यशोधरा
काका, सोप्या मराठीत पत्ता (कधीचाच)कटला असं सांगा की!
31 Jan 2014 - 5:39 pm | मराठीच
पत्ता कटला कारण आमी गोरेगोमटे नाकिडोळी निटस होतो...
तेलकट केस काळाढुस्स चेहरा नकटे नाक मवाली चेहरा अशी आमच्याकडे चांगली फिचर्स नव्हती.
31 Jan 2014 - 1:12 pm | चिरोटा
संदेश खाणे.
31 Jan 2014 - 1:19 pm | सस्नेह
राँग नंबर !
बेटर लक नेक्स्ट टाईम !
31 Jan 2014 - 1:43 pm | बन्डु
व्हॅलेंटाईन्स डे के दिन मे कह दूं अजनबी... !
31 Jan 2014 - 2:09 pm | यसवायजी
(कोल्लापुरी) पक्या - माजं लै प्रेम हाय तुझ्यावर.
ती- सॉरी यार, आय अॅम अलरेडी एंगेज्ड.
.
.
.
पक्या - अगायाया !!! इंग्लीश????
:D
31 Jan 2014 - 4:01 pm | चिगो
पक्या - माह्यं लै लव हाय तुह्यावर.
ती- सॉरी यार, आय अॅम अलरेडी एंगेज्ड.
.
.
.
पक्या - अम्मम्म... पाह्यं नं वं जरासं अॅडजश्ट व्हत असनं तं.. ;-)
31 Jan 2014 - 4:54 pm | Dhananjay Borgaonkar
पक्या - आय लऊ यु
ती - आय येम नॉट इंट्रेष्टेड
पक्या - देन डेव्लप.....
ती - बेशुद्ध :P
31 Jan 2014 - 2:15 pm | सूड
विचारणारी कोण, कशी इ.इ. आहे त्यावर उत्तर अवलंबून असेल. अगदीच खडकी दापोडी असेल तर नेहमीचाच रिप्लाय 'बरं मग?' ;)
31 Jan 2014 - 2:30 pm | प्यारे१
मेल टु फिमेलः आय लव्ह यु.
फिमेल टु मेलः कसं शक्य आहे ते?
मी आधीच विवाहीत आहे,
त्यात मी एकाच्या प्रेमात सीरियसली आहे.
परवाच दोन जणांनी मला प्रपोज केलंय. दे आर रियल गुड लूकींग अॅण्ड रिच.
बॉसनं विचारलं त्याला मी नाही म्हणूच शकत नाही आणि त्यात तू? नाही रे शक्य नाही.
.
.
.
.
.
मेल टु फिमेलः बघ ना, कर ना थोडं अॅडजस्ट, जमेल तुला!
(फॉरवर्डेड मेसेजमधून साभार)
31 Jan 2014 - 2:41 pm | यसवायजी
जरा अॅडजस्ट हुतंय काय बघा की.. :))
31 Jan 2014 - 2:55 pm | मंदार दिलीप जोशी
मागे एका इंग्रजी मासिकात Sexual Harassment at Workplace या संदर्भात मुलाखती घेताना एका मुलाला विचारलं गेलं की उलट्या हॅरॅसमेन्ट बद्दल म्हणजे बायका पुरुषांच्या करत असलेल्या कार्यालयीन लैंगिक शोषणाबद्दल तुमचे काय मत आहे?
तर पठ्ठ्याने उत्तर दिलं, "काय म्हन्टा? बायका पण sexual harassment करतात? मी वाटच बघतोय" :P
धाग्याच्या शीर्षकातला प्रश्न वाचून काहींना असंच काहीसं वाटलं असेल :D
31 Jan 2014 - 3:16 pm | पियुशा
हम्म फुट्टी मेरी किस्मत !!!!! असे कित्येक व्हॅलेंटाईन्स डे आले अन गेले ;)
31 Jan 2014 - 3:40 pm | आदूबाळ
माझं उत्तर आणि धागकर्तीला प्रश्नः
(गोठोस्कर दादा ष्टाईल)
आज सकाळीच काय हो??
(ह घ्या हां)
2 Feb 2014 - 8:49 pm | भाते
धागा वाचुन माझ्या मनात पण हेच आले होते. :)
पण धाग्याचा वार आणि वेळ बघितल्यावर शंका आली कि कदाचित शुक्रवारी हापिसात वेळ जात नसेल म्हणुन काढला असेल धागा.
ह. घ्या. हो सुवर्णमयी.
31 Jan 2014 - 5:53 pm | लॉरी
:blush:
आईला विचारून सांगतो! *STOP*
31 Jan 2014 - 6:19 pm | बाबा पाटील
खर का काय ? दररोज पाय चेपुन देणार का ते बोल ?मंग पुढच पुढ बघु...
31 Jan 2014 - 6:20 pm | कैलासवासी सोन्याबापु
व-हाडी दणका
पोट्टा :- तु मले हाव त म्हण सा-याईले मारतो
पोट्टी :- बाप्पा!!! खरंच!!!!
पोट्टा :- हाव मंग!!! अन तु फक्त नाई म्हण तुले बी मारतो!!!!!
31 Jan 2014 - 6:20 pm | कैलासवासी सोन्याबापु
व-हाडी दणका
पोट्टा :- तु मले हाव त म्हण सा-याईले मारतो
पोट्टी :- बाप्पा!!! खरंच!!!!
पोट्टा :- हाव मंग!!! अन तु फक्त नाई म्हण तुले बी मारतो!!!!!
31 Jan 2014 - 7:30 pm | सुहास..
=))
31 Jan 2014 - 6:24 pm | कैलासवासी सोन्याबापु
दुखावलेला आशिक :- भाई वो मेरी नहीं तो किसी की नहीं
टवाळ मित्र :- वो हिसाब से भाई तेरी हो गई तो सबकी हो जाएगी क्या!!!! *lol*
31 Jan 2014 - 6:29 pm | आदूबाळ
बाप लॉजिक आहे!!
31 Jan 2014 - 7:41 pm | अत्रुप्त आत्मा
@वो हिसाब से भाई तेरी हो गई तो सबकी हो जाएगी क्या!!!! >>>> क्या मारा है रे!!! =))
2 Feb 2014 - 1:02 pm | प्रसाद गोडबोले
चुकीचे लॉजिक
~P => ~Q then Q=>P ( not the P=> Q.)
2 Feb 2014 - 7:25 pm | बॅटमॅन
पण अर्ग्युमेंटम अॅड बकवासम करायचे असेल तर असेच लॉजिक असते.
2 Feb 2014 - 8:03 pm | कैलासवासी सोन्याबापु
आँ !!! मस्करीची कुस्करी! *scratch_one-s_head*
31 Jan 2014 - 7:02 pm | सूड
तो: (लाडात येऊन)संगे, गंऽऽऽ संगे.
ती: तुला कांय झालांय रं मेल्या आज?
तो: मांजा पिरेम हांय तुज्यावं. *blush*
ती: आँऽऽऽऽ!! जल्लां म्होरा तुजा. पटकी आली नाय ती तुज्यावं!! आसली फालतू कामा करीत बसलो तं मांजी गुरां कोन बगील? तू परत आसला काय बोलच, नाय चुलीतला कोलीत मारला तुज्या पाटानीत तं नावाची संगी नाय !!
तो: *shok*
=))))
31 Jan 2014 - 7:46 pm | पैसा
जल्लां तुजां कालीज करपाटलां तां!
31 Jan 2014 - 8:20 pm | उपास
व्हॅलेंटाइन डे 'पौर्णिमेला' आल्याचा दुर्मिळयोग साधायची तयारी अंमळ पंधरा दिवस आधीच सुरु झालेय तर..
असो माझं उत्तर - 'उशीर केलास' किंवा उत्तर भारतीय असेल तर 'देर आये दुरुस्त आहे' आणि अभारतिय असेल तर 'Better late than never'
काहीही झालं (नाही) तरी एक कॉफी मात्र नक्की होईल..
बाकी (नेहमीच्या) व्हेलेंटाईन बरोबर (नेहमीचा) व्हेलेंटाईन साजरा होईलच ;)
31 Jan 2014 - 8:52 pm | आयुर्हित
आप का साथ, साथ फूलों का
आप की बात, बात फूलों की
फुल खिलते रहेंगे दुनियाँ में
रोज निकलेगी, बात फूलों की
साभार:
गीतकार: मखदुम मोहिद्दिन, गायक: लता-तलत अजीज, संगीतकार:खय्याम, चित्रपट:बाजार - 1982
1 Feb 2014 - 1:08 am | सुवर्णमयी
कुठे आहे लाईक बटन? जाम धमाल सुरु आहे!
धन्यवाद.
1 Feb 2014 - 2:18 am | श्रीरंग_जोशी
जो प्रश्न मिपाकरांना विचारलाय त्याचं उत्तर तुम्ही पण द्यायला हवं?
केवळ लाईकून चालणार नाय...
1 Feb 2014 - 2:43 pm | ज्ञानोबाचे पैजार
माझ्याशी मयत्री कर्नार क?
1 Feb 2014 - 1:37 am | पिवळा डांबिस
उत्तरः आय नो!!!
2 Feb 2014 - 4:16 am | विजुभाऊ
उत्तर इथेच लिहायचे मनात आले होते.
प्ण त्यापेक्षा सविस्तर वेगळा लेख लिहीता येइल. ;)
2 Feb 2014 - 10:53 am | पिवळा डांबिस
लिहा, सविस्तर लेख लिहा, आम्ही जरूर वाचू...
आम्ही फक्त 'ब' च्या प्रेमात असलेल्या 'अ' शी जर 'क' ने 'अ' वर असलेलं प्रेम व्यक्त केलं तर 'अ' ची प्रतिक्रिया काय असावी ते सांगितलंय!!
आमच्या उत्तरात 'अ' ने 'क' चं त्याच्या/तिच्यावर असलेलं प्रेम अॅकनोलेज तर केलंय पण आता त्यावर काय अॅक्शन घ्यायची ते सर्वस्वी 'अ' च्या हातात आहे....
:)
"बझीचा-ए अतफाल, है दुनिया मेरे आगे,
होता है शबो-रोज, तमाशा मेरे आगे ||"
:)
2 Feb 2014 - 1:49 pm | विजुभाऊ
ओ पिडां काका. अ ब क असली काळकाम वेगाची गणीते नका टाकु? आमच्या गणीताच्या मास्तरानी फुटके हौद गळक्या तोट्या आणि भिंत बांधणारे अ ब आणि क नामक मजूर असलंच शिकवलय. अ ब किंवा क नामक मजूर प्रेमात पडले तर काळ काम आणि वेगाची गणना करायला लावणारी गणीते कधी शिकवलीच नाहीत.
काय करणार आम्ही पडलो सातार्याचे. ठाण्यातले असतो तर गोष्ट वेगळी झाली असती. ;)
2 Feb 2014 - 2:21 pm | प्यारे१
का नाव घालवायलाय सातारचं विजुभौ! ;)
आक्ख्या महाराष्ट्रात जगप्रसिद्ध महाबळेश्वर सातार्यात आहे, आक्ख्या भारतात शालेय शिक्षणासाठी प्रसिद्ध पाचगणी सातार्यात आहे जिथं शालेय शिक्षणाबरोबर/आधी सगळ्या बाराखड्या शिकल्या शिकवल्या जातात. नुसतं अ ब क काय घेऊन बसला आहात???
बरेच ठाणेकर 'पंचगनी महाबलेश्वर' ला येतात हो 'कोचिंग क्लासेस' साठी.
2 Feb 2014 - 8:35 pm | भाते
तुम्ही 'फुटके हौद गळक्या तोट्या आणि भिंत बांधणारे अ ब आणि क नामक मजूर' ही ऊदाहरणे दिलीत पण भिंतीवर चढणाऱ्या पाली 'एक फुट वर जा अर्धा फुट खाली ये' विसरलात की!
5 Feb 2014 - 2:00 am | खटपट्या
विजुभाऊ आम्ही ठाण्यातलेच आहोत.
पम्यादादा कुठे आहात ?
9 Feb 2014 - 3:08 am | विजुभाऊ
हे घ्या या इथे http://misalpav.com/node/26966
( क्रमशः चा गुण तुमचाच)
1 Feb 2014 - 1:52 am | वामन देशमुख
थँक्यू... अँड सेम टू यू...
1 Feb 2014 - 1:56 am | आनन्दिता
हे काय?. =))))
1 Feb 2014 - 3:00 pm | वामन देशमुख
अहो, "हे काय" म्हणून काय विचारता? कुणी आपल्याला "हॅपी न्यू इअर्" म्हटल्यावर आपण "थँक्यू, अँड् सेम् टू यू!" असेच म्हणतो ना?
"आय् लव् यू"चही तसंच झालंय आजकाल...
हा हा हा...!!!
1 Feb 2014 - 2:14 pm | शिद
आय लव्ह यु टु... आता हेच ३ जणांना सांग जेणेकरुन ते ३ आणखी ३ जणांना सांगतील... जय हो...!!! ;)
1 Feb 2014 - 4:14 pm | नंदन
उत्तर - (साताचा चौथा घात) - (सहाचा चौथा घात + पाचाचा चौथा घात + चाराचा चौथा घात + तिनाचा चौथा घात)
अर्थातच, मिथुनदा म्हणता त्याप्रमाणे :)
4 Feb 2014 - 10:25 pm | अनुप ढेरे
=))
काय गाणं आहे!
प्रभुजीकी जय हो!
1 Feb 2014 - 4:39 pm | विवेकपटाईत
ते गोड शब्द ऐकण्यासाठी
पाहतो वाट युगापासुनी
पांढरे झाले केसं तरीही
काटेच फक्त हाती आले.
ती चक्क भारतीय स्त्रियां सारखी लाजली
2 Feb 2014 - 12:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असं थेट विचारलं तर मी गोंधळून जाईन. माझा विश्वास वगैरे बसणार नाही.
आणि सावरलोच धक्क्यातून तर 'लव यू टू' असं म्हणेनच म्हणेन.
पण, वाट बघायला लावू नये बॉ कोणी कोणाला असं.... लय जीवघेणं असतं ते.
आणि कोणीही कोणत्या निमित्तानं 'व्यक्त' होत असेल तर मी त्या सर्व निमित्तांचं स्वागत करेन.
Thanks To facebook :)
-दिलीप बिरुटे
2 Feb 2014 - 2:24 pm | तिमा
दुसर्या कोणीही विचारले तर आम्ही नाही म्हणू. पण या वयातही वहिदा रेहमान, प्रभा अत्रे,शबाना आझमी यांनी विचारले तर टुणकन उडी मारुन गळ्यांत पडू.
2 Feb 2014 - 4:12 pm | ज्ञानोबाचे पैजार
गळ्यात पडताना फक्त हे गाणे गात गळ्यात पडा.
2 Feb 2014 - 11:50 pm | सुवर्णमयी
धन्यवाद असे म्हणेन. तीनही प्रेम आहेत तेव्हा आता आणखी नव्याला जागा नाही... क्षमस्व:)
3 Feb 2014 - 11:20 pm | समीरसूर
विवाहितांसाठी हा प्रश्न बाद आहे का? कारण काही स्कोपच नाही म्हटल्यावर उगीच कोप तरी कशाला ओढवून घ्या.
प्रेमाचं म्हणाल तर फार सोपं असतं हो ते...छान, सुरेख मुलगी दिसली की तात्काळ तिच्या प्रेमात पडायचं आणि ती नजरेआड झाली की सर्रकन स्वतःला बाहेर काढून घ्यायचं. बहुतेक सगळे ३०-५० वयोगटातले पुरुष असंच करतात. ५० च्या पुढचे काय करतात माहित नाही. ३० च्या आधीचे नाहक मजनू-बिजनू बनून फिरतात आणि "दिल का दर्द, तुम्हारी आंखों मे देखा तो उल्फत..." वगैरे अवस्था करून टाकतात स्वतःची. एवढं काही ते अवघड नसतं. ;-)
बाकी आता कुणी तसा संदेश पाठवला (ज्याची की शक्यता शून्य टक्के आहे) तरी मी डगमगून जाणार नाही. मोठ्या धीरोदात्तपणे मी या समरप्रसंगाला सामोरा जाईन. कुठल्यातरी हॉटेलात तिला घेऊन जाईन, मस्त कॉफी वगैरे पितांना तिच्या निर्णयातला फोलपणा तिला समजावून सांगीन आणि "पुढच्या जन्मी मी फक्त तुझाच..." असं भरघोस आश्वासन देऊन तिला घरी सोडून येईन (आणि गुपचूप तिचं घर ही पाहून ठेवीन ;-)).
4 Feb 2014 - 5:48 pm | प्रसाद गोडबोले
का बरं ? प्रेमाचा अन लग्नाचा काय संबंध ;)
4 Feb 2014 - 5:32 am | रामपुरी
काल्पनिक उत्तर विचारलं आहे "अनुभव" नाही. त्यामुळे आमचा पास
4 Feb 2014 - 5:51 pm | प्रसाद गोडबोले
>>> चालेल की ! सवती सवती भांडनार नसाल तर आमची काही हरकत नाही ! मोअर द मेरीयर :)
----
खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम"बिम" अर्पावे !! - गोडबोले गुरुजी
4 Feb 2014 - 9:05 pm | सुहास..
केवळ गम्मत ..ह घ्या रे बाबांनो
ती : आय लव्ह यु
सोन्याबापु : प्रेम हाच ग्रंथ , व्हॅलेन्टाईन हाच प्रेमग्रंथ
ती : आय लव्ह यु
सुड : आजचा सुविचार (?) : जिथे प्रेम नसेल तिथे सुड ही नसेल
ती : आय लव्ह यु
प्रशांत आवले : पांडुंरग पाडुंरग
ती : अरे, आय लव्ह यु
प्रशांत आवले : श्री हरी श्री हरी
ती : *$#^%$^&$
प्रशांत आवले : विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल
ती : आय लव्ह यु
पैजारबुवा : ॐ प्रेममदः प्रेममिदं प्रेमत्प्रेममुदच्यते
प्रेमस्य प्रेममादाय प्रेममेवावशिष्यते
तो : आय लव्ह यु
पैसा : Don't waste your time with explanations: people only hear what they want to hear - Paulo Coelho
ती आय लव्ह यु
विजुभाउ : तेरी मेरी कहानी ...एक नैंन पे दुसरा फ्री !!
ती: आय लव्ह यु
मोदक : काय ...कधी ...कुठे ?
ती : आय लव्ह यु
मुक्त विहारि : ( आता प्रेमकट्टा पण भरवायला हवा ! ) प्रेमकट्टा ! आपआपल्या प्रेमाबरोबर
ती : आय लव्ह यु
श्रीरंग_जोशी : आय_लव्ह_यु_टु_ खरड_फळ्या_वर_ये
( क्रमश : )
4 Feb 2014 - 9:19 pm | पैसा
येऊ दे अजून!
4 Feb 2014 - 9:39 pm | प्यारे१
च्यायचं हलकट! =))
लौ यु रे वाश्या! काय गिफ्ट पायजे तुला? ;)
4 Feb 2014 - 9:42 pm | श्रीरंग_जोशी
मजा आली.
ती : आय लव्ह यु
बारामतीचे काका : नियमात बसते की नाही हे पाहून धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल.
4 Feb 2014 - 9:59 pm | प्यारे१
ती: आय लव्ह यु
क्लिंटनः (स्वगत) १९८७ साली ती एकदा असंच म्हणालेली, त्यानंतर १९९२ साली ती दुसर्याच्या प्रेमात पडता पडता राहिली. ९७ साली असंच काहीतरी झालं.... उत्तर व्यनितूनच देईन!
ती: डिपॉझिट जप्त झालंय तुझं! ;)
ती: आय लव्ह यु
स्पावड्या: खिक्क्क!
ती: आय लव्ह यु
लिमाऊ : तुझ्या लाल रिबीनीत कोंडा साठलाय.
ती: आय लव्ह यु
गणेशा: मला तू दिसत नाहीयेस.
ती: आय लव्ह यु
इ ए: चल, अल्जिरियाला प्रवास करुन येऊ.
ती: आय लव्ह यु
मुवि: चल कट्टा करु.
ती: आय लव्ह यु
वल्ली: तुझ्यात मला मूर्ती दिसतेय
ती: आय लव्ह यु
.... : तुला तू काय बोलतेय ते कळतंय का? काही आचपेच नाही, अक्कल काडीची नाही नि .... मी आधीच्च सांगितलेलं.
4 Feb 2014 - 11:35 pm | आदूबाळ
:))
दोन्ही भारी आहेत!
5 Feb 2014 - 12:46 am | लॉरी टांगटूंगकर
दोन्ही लै लै भारी !!!
ती: आय लव्ह यु
बॅटमॅन- आश नाझ्ग दुर्बातुलुक, आश नाझ्ग गिम्बातुल,
आश नाझ्ग थ्राकातुलुक, अघ बुर्झुम ईशी क्रिम्पातुल!!!!
ती- मर मेल्या ..
ती: आय लव्ह यु
जेडी- आयला धामीण !!!!!
ती: आय लव्ह यु
गणपा- चल पेरी पेरी चिकन खाऊ
ती: आय लव्ह यु
- हे सप्रमाण सिद्ध करायला काही विदा आहे का? या जाणीवेसंदर्भातले संशोधन आपण कुठे केलंत ?? कुठल्या जर्नलमध्ये या भावनेबद्दल काही केस स्टडी आहे का??
ती: आय लव्ह यु
स्वॅप्स – ते काहीही असलं तरी क्यामेरा मात्र निकॉनच भारी !!! चल जाऊन खाऊ चहा खारी..
ती: आय लव्ह यु
मालक- जागेवरून गायब, दुसऱ्या दिवशी फोटो आणि खाली ओळी.. ही आमची ढमी. हिच्यावर आमचा भारी जीव.
ती: आय लव्ह यु
धमु- फुस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स काय लाजवता का जीव घेता? नाकातोंडातुन कॉफी उडाली ना.
5 Feb 2014 - 8:38 am | पैसा
मस्त आहे! सगळ्यांची प्रतिभा मोकाट उधळते आहे!
7 Feb 2014 - 11:06 am | एस
हाहाहाहा!...
रच्याकने - 'ती' चा कॅनन आणि माझा निकॉन पाहून पहिल्याच भेटीत आमच्या होऊ घातलेल्या प्रेमाच्या 'एक्स्पोजर' चं 'मीटरिंग' चुकलं होतं त्याची आठवण झाली... ;-) नंतर 'पोस्ट प्रोसेसिंग' मध्येपण ते कधीच नीट नाही झालं.
प्रत्येक 'शटर रिलीज' मनासारखी प्रतिमा देईलच असे नसते ना! :-)
7 Feb 2014 - 2:49 pm | पिलीयन रायडर
मन्द्या!!!!
बेक्क्कार रे...!!!!
5 Feb 2014 - 8:47 am | प्रचेतस
छे. तू अगदी कोरीव मूर्तीसारखी सुंदर आहेस असे मी म्हणेन. =))
5 Feb 2014 - 11:48 pm | अत्रुप्त आत्मा
@छे. तू अगदी कोरीव मूर्तीसारखी सुंदर आहेस असे मी म्हणेन. >>> अत्यंत भरीव प्रतिसाद! :D
5 Feb 2014 - 9:04 am | कैलासवासी सोन्याबापु
वा वा वा आमचा तर त्रिफळाचित होऊन ही गडाबडा लोळालोळी चा हा पैलाच अन भारी मौका!!!! ज ब र द स्त हो सुहास शेठ!!! *lol*
5 Feb 2014 - 10:38 pm | सूड
इतका सरळसोट रिप्लाय माझ्याकडून?
7 Feb 2014 - 9:52 am | ज्ञानोबाचे पैजार
वाश्या.
उगा आमचा नंबर कापायच काम नाही. दोस्तीत कुस्ती नको.
4 Feb 2014 - 9:39 pm | विनायक प्रभू
लाइट, साउंड....
4 Feb 2014 - 10:19 pm | श्रीरंग_जोशी
ती: आय लव्ह यु
तो:
<फिल्मी मोड>
फूल खिलते है, बहारोंका समा होता हैं
इसी मौसम में ही तो, प्यार जवाँ होता हैं
दिल की बातों को होटो से नही कहते,
ये फसाना तो निगाहों से बयाँ होता हैं
...
ती पुस्प्गुच हवेत भिरकावणार एवढ्यात
</फिल्मी मोड>
अरे अडीचशे रुपयांचा पुस्प्गुच हाये तो...
5 Feb 2014 - 7:27 am | जेपी
=))
5 Feb 2014 - 9:26 am | इरसाल
सुटलेत तडार..................
5 Feb 2014 - 9:34 pm | तिमा
ती: आय लव यू
भौ: असं उभे उभं नको.
ती: कुठे जाऊया ?
भौ: चल, मटण आणायला.
ती: शी! मटण कशाला ?
भौ: आशी वैतागु नगं!
ती: पण, आय लव यू!
भौ: उगाच काय,मी ऋत्विक रोशन नाही आन तू ऐश्वर्या राँय नाहीस!
5 Feb 2014 - 9:42 pm | आदूबाळ
साँरी!
5 Feb 2014 - 10:48 pm | बॅटमॅन
तीन ठिकाणी ग़ ऐवजी ग आल्याचे प्रत्येकी पाव प्रमाणे पाऊण मार्क कापले आहेत. भौंच्या कथेतले शुद्धलेखन लक्षात ठेवावे. कळावे.
5 Feb 2014 - 10:49 pm | बॅटमॅन
=))
मंद्या, लेका पार हशिवलंस =))
बाकी वल्ली अन जेडी पण जबरीच रिप्लाय!!!!! सगळ्यांची प्रतिभा एकदम जोर्रात उधळतेय =))
6 Feb 2014 - 11:30 pm | सुवर्णमयी
१४ तारीख तशी दूर आहे अजून..
:)
तुम्हा सर्वांची धमाल सुरु आहे इथे. प्रतिसाद जबरी आहेत!
प्रेमात कोण शुद्धलेखन शोधत आहे?आणि प्रतिभा? आणखी काय काय दिसेल थांबा..
7 Feb 2014 - 8:01 am | कवितानागेश
पेटलेत सगळे.. =))
7 Feb 2014 - 11:58 am | इरसाल
पेटलेत सगळे...... हे घ्या
7 Feb 2014 - 10:32 am | ज्ञानोबाचे पैजार
ती :आय लव यू
तो : निवांत वेळी एखाद्या भिंतीकडे तोंड करुन बसा व आपल्या मनातल्या विचारांचे प्रतिबिंब त्या भिंतीच्या पडद्यावर तटस्थ पणे पहा. समोर एक वस्तू दिसेल. मग स्मृतीतल्या आकाराशी वेरिफाय करून मन आपल्याला ती काय आहे याचं 'नांव' सांगतं "पाणी पुरी" पण गाडी तिकडेच थांबत नाही. पाणी पुरी वरुन मसाला पुरी, शेवपुरी भेळपुरी, ओमपुरी, अमरीशपुरी मग त्यांचे सिनेमे मग बघता बघता पाणीपुरी दिसेनाशी होते आणि उरते फक्त तोंडाला सुटलेली लाळ.
ती: जरा माणसात ये.
तो : लादेन ही ध्यान प्रक्रिया मी सांगतो म्हणुन करून पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की काही सेकंद देखिल, मन आपल्याला निरंतर पाहू देत नाही. विचारांची दृष्यमय प्रोजेक्शन्स आपलं लक्ष वेधून घेतात किंवा मानसिक संवादात आपण इनवॉल्व होते.
ती: काय ध्यान आहे. झक मारली आणि आय लव यू म्हणाले. आयुष्यात परत हि चुक करणार नाही
तो : थांब नेहमी शेवटच वाक्य माझच असत. बुद्ध त्याच्या वेळीही लोकांना समजला नव्हता, आणि मी काय म्हणतो ते अजूनही लोकांना समजत नाही. मला वाटलं होतं तुमचा अभ्यास कमी पडतोय. आता तर आभ्यास शून्य आहे असं दिसतं.
ती काही न बोलता रडत रडत निघुन जाते.
मि.पा. वरच्या माझ्या चतुर मित्रमैत्रिणिंनो ओळखा पाहु "तो" कोण?
7 Feb 2014 - 8:47 pm | बाबा पाटील
भौ....
7 Feb 2014 - 8:35 pm | चिन्मय खंडागळे
राहुल गांधी: 'मम्मीला विचारून सांगतो'
केजरीवाल: 'मुझसे जितना प्यार करती हो उतना आम आदमीसेभी करोगी क्या?'
राज ठाकरे: 'अगं एऽऽऽ, मराठीत बोल, मराठीत!!'
अजितदादा: 'थांब, मला आत्ता एका धरणात पाणी सोडायला जायचं आहे, आल्यावर बोलू'
आबा: 'हूं...! बडे बडे शहरोंमे ऐसे छोटे छोटे प्यार होते रहते है!'
मनमोहन सिंग: '.......................'
10 Feb 2014 - 11:03 am | इरसाल
ती: आय लव्ह यु.
तो: अस्सं, मी कितवा ?
10 Feb 2014 - 12:03 pm | मराठी कथालेखक
If you don't have a Valentine on Valentine's day, don't be sad
Most people don't have Aids on World's Aids day as well.
13 Feb 2014 - 2:19 pm | सुनील
मराठीत बोल की गधडे! :)
29 Jul 2017 - 2:36 am | विजुभाऊ
अरेच्च्या हे राहीलंच की वाचायचं.
मस्त माहौल बनलाय
29 Jul 2017 - 2:48 am | सचु कुळकर्णी
अनपेक्षित व्यक्तीकडून तुम्हाला प्रेमाचा या दिवशी संदेश मिळाला तर तुमची प्रतिक्रिया काय असेल?
क्या रे पोट्टि क्या मै हौला दिखरा तेरेकु ;)
सुब्बसे क्या मैच मिला यारो, अरे जाव भै दिमाघ का बैंगन नक्को कर्रो.