२०१४ च्या लोकसभा निवडणुका आता ४ महिन्यांवर आल्यात. सर्व पक्षात प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. प्रचाराचे पारडे सारखे खाली वर होत आहे. ह्या निवडणुकींचा निकाल काय लागेल ह्याबाबत साऱ्या देशात उत्सुकता आहे.कॉंग्रेस पुन्हा सत्तेवर येईल का? आप ह्या निवडणुकीत काय चमत्कार घडवेल? तिसरी आघाडी सत्तेवर येईल का? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे हि निवडनुकी नंतरच मिळतील.
आपने जे राजकारणात यशस्वी पदार्पण केले नि दिल्लीची सत्ता मिळवली त्याने देशाच्या राजकारणात नाही म्हटले तेरी थोडा फार फरक पडणारच पण तो किती पडणार हे होण्यासाठी निवडणूक होण्याची वाट बघणे भाग आहे.
गेली दोन टर्म कॉंग्रेस ने देशाचा कारभार यशस्वी पणे सांभाळली देशाला विकासाच्या दिशेने नेले. आपल्या १० वर्षातील विकासकामे हि कॉंग्रेसची जमेची बाजू राहील. तर आप ज्या तऱ्हेने प्रचार करत आहे दिल्लीत निर्णय घेत आहे तेही कौतुकास्पद आहे. कॉंग्रेस आणि आप ह्या पक्षांकडून ह्या निवडणुकीत फार मोठ्या अपेक्षा आहेत. तिसरी आघाडी हा मुख्यत्वे करून प्रादेशिक पक्षांची आघाडी असेल हि आघाडी आपापल्या राज्यात कसे प्रदर्शन करते त्यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असेल. मुलायम सिंग ह्यांच्या समाजवादी पक्षाने युपीत लोकसभेत चांगली कामगिरी केली तर त्यानाही सत्तेत येण्याची संधी आहे.मायावती ह्यांची दलित आणि अल्पसंख्यांक समाजात असलेली प्रतिमा ह्यामुळे बहुजन समाज पार्टीला हि कमी लेखून चालणार नाही.
येडीयुरप्पा हे भाजपात परतल्याने कॉंग्रेसला कर्नाटकात चांगलाच फायदा होईल असे वाटते . भाजपचा सुरवातीला प्रचारात जोर होता पण आप च्या झंझावातामुळे तो ओसरला . त्यातच आपल्या संयमी प्रतिमेसाठी प्रसिद्ध असलेल्या राहुलजी गांधी ह्यांनी सध्या आक्रमक रूप धारण केले आहे त्यामुळे कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे. त्यांचे भाषण एकूण बऱ्याच जणांना इंदिराजींच्या आक्रमक पणाची बऱ्याच जणांना आठवण झाली.नेहरूंची हुशारी, इंदिराजींचा आक्रमकपणा नि राजीव जी ह्यांची विकासाची दृष्टी ह्यांचा अनोखा मिलाफ राहुलजी ह्यांच्या मध्ये आहे ह्याच जाणीव जनतेला त्यांच्या भाषणामुळे नक्कीच झाली. देशाचे नेतृत्व करण्यासाठी एक आश्वासक चेहरा तमाम भारतीय जनतेला त्यामुळे मिळाला ह्यात वाद नसावा.
विरोधकांनी नेहमीप्रमाणे भाषणावर टीका केली, गळे काढले पण त्यात जोर नव्हता हे स्पष्टपणे कळत होते.निवडणुका जिंकायच्या असतील तर प्रचारात जोर हा लावावाच लागतो. प्रचारात चढ उतार होत असतातच.त्यातूनच पक्षांचे पर्यायाने देशाचे भवितव्य ठरत असते…
http://www.loksatta.com/desh-videsh-news/oppsition-good-in-marketing-say...
प्रतिक्रिया
18 Jan 2014 - 6:28 pm | टवाळ कार्टा
.
18 Jan 2014 - 6:55 pm | लॉरी टांगटूंगकर
+...
18 Jan 2014 - 6:32 pm | प्यारे१
>>> लेखनविषय::
>>> राजकारण
हे एवढं बदला फक्त. बाकी जमलंय!
18 Jan 2014 - 7:09 pm | टॉपगिअर्ड फिलोसॉफर
छान आणि मुद्देसुद लेख
,राहुलजी गांधी हे आश्वासक नेते नक्कीच आहेत. त्यांच्याकडे कल्पनाशक्ती आहे ,देशासाठी त्याग करायची तयारी आहे. भाजपात मात्र मोदी ऐरॉगंट वृत्तीचे आहेत, संघा भाजप यासाठी खस्ता खाल्लेले ज्येष्ठ नेते प्रचारक यांना ते जुमानत नाहीत ,त्यातच मीडीया पब्लीसीटी केजरिवाल यांनी खाऊन टाकल्याने त्यांची स्वप्नपुर्ती अवघड वाटते.
18 Jan 2014 - 11:03 pm | lakhu risbud
Abhishek Bachhan is "Rahul Gandhi" of Bollywood.
&
Rahul Gandhi is "Abhishek Bachhan" of Indian Politics !
Both of them have quite a lot to say bun never know "what" to say.
couldn't hold to the the preceding legacy of their fathers !
19 Jan 2014 - 12:37 am | lakhu risbud
अवांतर,
"टॉपगिअर्ड फिलोसॉफर " याचे भाषांतर मायमराठीत "वरच्या'तारे' चा तत्वज्ञ" असे घ्यावे काय ?
19 Jan 2014 - 9:27 pm | सचीन
अगदी योग्य विश्लेषण
20 Jan 2014 - 12:04 pm | मंदार दिलीप जोशी
संघा भाजप यासाठी खस्ता खाल्लेले ज्येष्ठ नेते प्रचारक यांना ते जुमानत नाहीत >>
तुम्ही आधी तुमची भूमिका नक्की ठरवा बरे. च्यामारि. एकीकडे संघाला शिव्या द्यायच्या आणि दुसरीकडे कुणीतरी त्यांना जुमानत नसल्याचे गळे काढायचे याला भंपकपणा नाही तर काय म्हणायचं?
18 Jan 2014 - 7:11 pm | विद्युत् बालक
नेहरूंची हुशारी, इंदिराजींचा आक्रमकपणा नि राजीव जी ह्यांची विकासाची दृष्टी ह्यांचा अनोखा मिलाफ राहुलजी ह्यांच्या मध्ये आहे ह्याच जाणीव जनतेला त्यांच्या भाषणामुळे नक्कीच झाली.
पप्पूचे भाषण पुन्हा नीट पहा ! एका बंद सभागृहात आपल्याच चमच्या व हुजऱ्या समोर केलेले भाषण वजा मुद्रा अभिनय होता तो ! काय तर म्हणे " मनमोहन जी भारत के जनता को १२ सिलेंडर चाहिये " असे फुकन्या , तू मनमोहन ला मला बैलाचे दुध दे असे सांगितले तरी तो बैलाची धार काढायला बसेल मग असली नौटंकी कशाला ? आता सध्याची जनता दुधखुळी नाही आहे असल्या निवडणुकी पूर्व नौटंकी ला भिक घालायला !
एखादा चौथीतला शाळकरी मुलगा आपली चड्डी सावरत व नावातील शेंबूड सूर्र्र करत भाषण देताना त्याच्या आईच्या चेहऱ्यावर जसे कौतुकाचे भाव होते तसे सोनियाच्या चेहऱ्यावर भाव होते .
बाकी आमच्या मते पप्पू हा एक "भूसनाळा " आहे .
18 Jan 2014 - 10:53 pm | श्रीगुरुजी
>>> असे फुकन्या , तू मनमोहन ला मला बैलाचे दुध दे असे सांगितले तरी तो बैलाची धार काढायला बसेल मग असली नौटंकी कशाला ?
जबरी! वाचून खूप हसलो. अगदी मूळ लेखापेक्षाही जास्त हसलो.
या नौटंकीनंतर काँग्रेस लगेच प्रचारात सांगायला लागेल की "बघा. राहुलजींच्या नेतृत्वामुळे बैल सुद्धा दूध देऊ लागले आहेत. यालाच म्हणतात निधर्मी विकास."
राहुलची नौटंकी मात्र मुरलेली वाटत नाही. त्याची नाटके पोरकट असतात. मागे एकदा मुंबईला येऊन एटीएममधून १०० रूपये काढणे, लोकलचे तिकीट काढणे (ते सुद्धा खासदारांना फुकट प्रवास करायचा पास खिशात असताना), उ.प्र. मधील भट्टा पर्सूल येथे मोटारसायकलने जाण्याचे नाटक करणे, तिथे अनेक बायकांवर बलात्कार झाले असून प्रेतांचे ढीग पडले आहेत अशी गंभीर थापेबाजी करणे, साधेपणाचे नाटक करताना दिल्लीहून अमृतसरला रेल्वेच्या प्रथम वर्गातून जाणे व त्याच्यासाठी पूर्ण बोगी राखीव ठेवणे अशी नाटके करण्यात तो व्यग्र असतो. बाह्या सरसावत आपल्या हुजर्यांसमोर काँग्रेसच्या अधिवेशनात केलेले भाषण ही अशीच नाटंकी आहे.
विनोदमूर्ती सचीनसाहेबांना मात्र मानलं. सातत्याने इतके विनोदी लेखन करणे म्हणजे काही धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारण्याइतकं सोपं नाही.
18 Jan 2014 - 7:22 pm | जेपी
काल राहुलचे भाषण पाहुन गालफाड दुखेपर्यंत हसलो . आज सचिन भौ चा लेख वाचुन पुन्हा गालफाड दुखणार . सचिनभौ कीमान दोन दिवस तर थांबायचे होते लेख लिहायला .
18 Jan 2014 - 7:26 pm | विद्युत् बालक
राहुलचे भाषण पाहुन किंवा गालफड दुखेपर्यंत हसलो या पैकी कोणतेही एक वाक्य वापरले तरी चालेल
18 Jan 2014 - 7:39 pm | विनायक प्रभू
आण्खीन एक २५.२६
चला मुलांनो निबंध लिहा.
मायावती पंतप्रधान झाली तर.... ( मला पंख असते तर टाइप)
(आपआपल्या मनाप्रमाणे नावे बदलत रहा)
20 Jan 2014 - 12:01 pm | llपुण्याचे पेशवेll
अरे वा! मास्तर परतुनि आला? बरे वाटले.
18 Jan 2014 - 9:57 pm | गब्रिएल
सचीनअन्ना तुम्ची चरा पड्लेली रेकाट कदि फेकून देनार? तुम्चा राज्कुमार, त्याची अम्मा यव्ढ्च काय त्याचे हुजरे पन तुम्चे लेख वाच्त नाय्त अन्ना. मंग तुमाला ते चारा कसा टाक्नार ? पन असुंदे तुम्चा जलम मिपाकरांचं मणोरंजण कराय्लाच झाला अस्ला तर तुमी काय कोण्पण काय करु शक्तो म्हना. लै मज्जा येती तुम्चे इनोदी लेख वाचून. लिवर र्हा आणि लोकान्ला हस्वत र्हा ! हा हा हा
18 Jan 2014 - 10:57 pm | श्रीगुरुजी
>>> नेहरूंची हुशारी, इंदिराजींचा आक्रमकपणा नि राजीव जी ह्यांची विकासाची दृष्टी ह्यांचा अनोखा मिलाफ राहुलजी ह्यांच्या मध्ये आहे ह्याच जाणीव जनतेला त्यांच्या भाषणामुळे नक्कीच झाली. देशाचे नेतृत्व करण्यासाठी एक आश्वासक चेहरा तमाम भारतीय जनतेला त्यामुळे मिळाला ह्यात वाद नसावा.
या तुफान विनोदी लेखातील वरील वाक्य मात्र मास्टरपीस आहे! विनोदाचा क्लायमॅक्स म्हणतात तो हाच. अतिशयोक्तीशिवाय विनोद होत नाही असे म्हणतात. अति अतिशयोक्तीमुळे अति विनोद होतो हे मात्र नक्की.
18 Jan 2014 - 11:15 pm | तर्री
सध्या बालकलाकारासाठी योग्य भूमिका नाही. तेंव्हा त्याने शाळेत नियमित जाने करावे. २०१९ ला वाटल्यास विचार होईल.
18 Jan 2014 - 11:18 pm | अत्रुप्त आत्मा
@गेली दोन टर्म कॉंग्रेस ने देशाचा कारभार यशस्वी पणे सांभाळली देशाला विकासाच्या दिशेने नेले. आपल्या १० वर्षातील विकासकामे हि कॉंग्रेसची जमेची बाजू राहील. >>> अंधभक्तिची कम्मा...ल आहे ब्वॉ तुमच्या! :)
18 Jan 2014 - 11:40 pm | आदूबाळ
तुमच्या नावातला ची खरोखर दुसरा आहे का हो?
19 Jan 2014 - 10:51 pm | पैसा
मधे फेसबुकवर एक व्यंगचित्र पाहिलं होतं. त्यात मुलांना विरुद्धार्थी शब्द लिहायला सांगितले होते. 'ओरिजिनल' च्या उलट त्या मुलाने "चिनी" असं लिहिलं होतं. =))
20 Jan 2014 - 11:51 am | सचीन
*lol* *LOL* :-)) :))
18 Jan 2014 - 11:43 pm | विनोद१८
उपरोल्लेखित, अधोरेखित शब्दाचे एकत्रिकरण करुन होणारे 'कॉंग्रेस'चे भवितव्य कोणते रे बाबा.
19 Jan 2014 - 12:27 am | वडापाव
मला जिलब्यांचा आस्वाद घ्यायला आवडतं... पण त्याच त्याच वापरलेल्या तेलातल्या जिलब्या असल्या की पचणं कठीण होत जातं. सचीनजींनी जरा वेगळे जोक्स सांगावेत अशी विनंती करतो.
तरी हा विनोद ब-यापैकी हसवून गेला :
अवांतर : डू आयडी घेतल्यावर माणसं अचानक काँग्रेस धार्जिणी का होतात? काँग्रेसचा दुटप्पीपणा आचरणात आणला म्हणून?
19 Jan 2014 - 9:30 pm | सचीन
डू आयडी म्हणजे काय ?
वडा पाव हे तुमचे खरे नाव आहे का ?
सगळ्यांनी तुमच्या सारखे भाजपा धार्जिणे असावे असा आग्रह का ?
20 Jan 2014 - 5:58 pm | वडापाव
डू आयडी म्हणजे काय ?
तुम्हांला अजून कळलं नाही?? खूप लवकर विचारलीत ही शंका.
डू-आयडी म्हणजे :
१. मिपावर आपल्या एका आयडीची प्रतिमा डागाळली गेल्यानंतर त्यापुढे सगळेजण आपल्या आयडी बाबतीत मनात एक पूर्वग्रह असल्याने आपल्या लेख आणि प्रतिक्रियांना मिळायला हवं तितकं महत्त्व देणार नाहीत, अशा भावनेतून तयार केलेल्या दुसरा आयडी
२. मिपावर आपल्या जिलब्यांना कुणी प्रतिसाद देईना, दिला तरी आपल्या विचारांचं समर्थन करीना, त्यामुळे आपणच आपल्याच विचारांचं समर्थन करावं आणि मिपावर आपलेही समर्थक आहेत, असा आभास निर्माण करावा, अशा भावनेतून जन्माला आलेला दुसरा आयडी
३. मिपावर आपल्या सद्य आयडीची प्रतिमा चांगली आहे, तिला न शोभणारी वक्तव्ये करायची कशी? म्हणून टारगट वक्तव्ये खुल्याने करता यावीत यासाठी तयार केलेला दुसरा आयडी.
डू-आयडी घेण्यामागच्या इतरही भावना असू शकतात. आता तुम्ही म्हणाल की मला हे सगळं कोणी सांगितलं? नवमिपाकर असताना हे सगळे चाळे करून झाल्येत. कंटाळा आल्यावर शेवटी वडापाव वर स्थिरावलो :) माझे इतर डू-आयडी काय होते याचाही आता विसर पडलेला आहे.
वडा पाव हे तुमचे खरे नाव आहे का ?
मिपावर ख-या नावानेच आयडी करायचा असतो हे नव्याने कळतंय. तरी तुम्हाला शंका असेल तर माझी प्रोफाईल चेक करून ख-या नावाची खात्री करून घ्या. बाकी 'सचीन' हे तुमचं तरी खरं नाव आहे का?
सगळ्यांनी तुमच्या सारखे भाजपा धार्जिणे असावे असा आग्रह का ?
व्वा रे वा! कॉग्रेसला शिव्या घातल्या म्हणजे मी भाजपचाच असायला हवं का?? आणि भाजपधार्जिणी विधानं यापूर्वी कधी केली मी?
असो. तुमच्याकडून उत्तरांची अपेक्षा नाही.
19 Jan 2014 - 2:25 am | खडुस
सचिनसाहेब-कोंग्रेस नी गेल्या २ टर्म यशस्वीपणे सांभाळून देशाला विकासाच्या वाटेवर नेलं,त्यामुळे १० वर्षातली विकासाची कामे हा त्यांचा प्रचाराचा मुद्दा राहील >>>>>>>>>कुठल्या जगातले शोध लावता?नेमके कुठली विकासकामे म्हणायचंय तुम्हाला? ३जी?कोळसा खाण वाटप?कॉमनवेल्थ स्पर्धा?वर्षाला ६ सिलेंडर ची मर्यादा ?३ पट वाढलेले इंधनाचे भाव?गेल्या १० वर्षात पाकिस्तान??,चिन नी केलेली असंख्य आक्रमण/ घुसखोरी ?प्रत्येक रस्ता ,पूल बांधण्याकरता सुरु केलेला टोल ? ज्या देशात रुलिंग पार्टीचा उपाध्यक्ष केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेला,त्यांच्याच पक्षाच्या पंतप्रधानानी सही केलेला ठराव ''बुलशीट ''म्हणून जाहीर पत्रकार परिषदेत फाडून टाकतो .ज्याला गेली १० वर्ष केंद्रात आपल्याला हवं ते खाते सांभाळून तिथें आपली छाप पाडायची संधी असून ज्यांनी फक्तं आपल्याला ती सांभाळता येणार नाही ह्याची जाणीव असल्यामुळे घेतली नाही,तो कसली देशाची जवाबदारी घेणार?
जनता कोंग्रेस ला त्यांची जागा निवडणुकीत दाखवणारच.तुम्हाला एकच सांगणं,आता परिस्थिती हसण्यापलीकडे गेल्ये असले विनोद पुन्हा करु नका .
19 Jan 2014 - 9:32 pm | सचीन
जनता कोंग्रेस ला त्यांची जागा निवडणुकीत दाखवणारच>>>>> बरोबर आहे लोकसभेत बहुमत हीच खरी कॉंग्रेसची जागा.
19 Jan 2014 - 7:51 am | मुक्त विहारि
चान विनोदी लेख.
हसून हसून पुरेवाट.
सचीन साहेब, तुम्ही रोज लेख लिहा.
19 Jan 2014 - 11:09 pm | आनन्दा
हेच्च म्हणतू..
विशेषःतः
वाचून तर फार्फार हसलो..
बाकी सचीनजींना मिपाचे दिग्विजय ही पदवी देण्यास हरकत नसावी..
20 Jan 2014 - 3:00 pm | नाखु
समस्त मिपाकर दोन्ही "पदव्या" देण्यासाठी तहे-दिल्-तयार आहेत.
http://www.misalpav.com/comment/546203#comment-546203
23 Jan 2014 - 10:24 am | मंदार दिलीप जोशी
मिपाचे दिग्विजय - मिग्विजय :D
20 Jan 2014 - 1:37 pm | मदनबाण
उत्तम हास्यास्पद जिलबी... ;)
बाकी आमच्या मते पप्पू हा एक "भूसनाळा " आहे .
हॅहॅहॅ... ;) पप्पूची जयपुर अधिवेशनात Congress Vice President म्हणुन निवड झाली होती तेव्हा घराणेशाहीची चाटुगिरी सर्वलोकांसमोर जगजाहिरपणे दिसली.
त्यांचे भाषण एकूण बऱ्याच जणांना इंदिराजींच्या आक्रमक पणाची बऱ्याच जणांना आठवण झाली.
जोक ऑफ द इयर ! :p
पप्पूला एकदा बिहारी झटका मिळालेला आहे... त्याची आज प्रकर्षाने आठवण झाली.
20 Jan 2014 - 4:16 pm | मंदार दिलीप जोशी
ती व्हिडिओ क्लिप बघितली आत्ताच. बिहार ऐवजी गुजरात असं कैतरी बोल्ले युवराज आणि मग जे काय झालंय विचारुच नका महाराजा !!!! :D
20 Jan 2014 - 6:01 pm | म्हैस
@विद्युत् बालक -
लय भारी ............ :-)