"चो, एक प्रॉब्लेम आहे, जरा मदत हवी आहे".़
कथानायक, वय ५५, सर्व काही व्यवस्थित.
वयाचा टप्पा, जिथे पुढे काय चा कायमचा छळवाद.
"हा प्रॉब्लेम झाला तो कोइमतुर एक्सप्रेस मधे, पूणे ते लोणावळा मधे"
हम्म
"मी माझा नंबर एका पॅसेंजर ला दीला आहे"
बर मग?
"त्याला मी ७००० देणे लागतो"
???.
"अरे पत्यात हरलो"
३ पत्ती?
"हो"
अगदी सुरुवाती पासुन, डिटेल्स सांग.
"ऑफीस च्या ़कामानिमित्त पूण्याला गेलो १५ मिनीटात काम झाले. १० लाखाची ऑर्डर्र मिळाली. अॅड्रीनलीन लेवल जरा जास्तच होती. ३एसी मधे बसलो. टी.सी बरोबर मांडवली पण झाली. शिवा़जी नगर आउटर गाडी थांबली होती. इतक्यात दोन प्रवासी पॅसेज मधुन जात असताना माझ्याकडे बघुन हसले. मी पण हसलो. टॉयलेट मधुन परत येताना त्यातला एक म्हणाला " कार्ड खेलते हो सर"? मी पण हाय मधे होतो... " नेकी और पुछ पुछ"
त्याने नविन कोरा कॅट काढला.
"चलो रमी खेलेंगे"
पण कॅट एकच होता.
" ३ कार्ड खेलते हो".
जोश मधे होतो, हो म्हणालो.
इतक्यात एक सरदारजी डोकावले. त्यांनी पण खेळायची तयारी दाखवली. पण बरोबर च्या प्रवाशांनी ऑब्जेक्शन घेतले. सरदार म्हणाला " चलो २एसी मे चलो. ऊधर कोइ नही खाली पडा है".
१ ल्या डावात राणी हाय वर ३५० मिळाले.
२ रा मायनस ५०
३ रा प्लस ४००
एकाने आपण लोणावळ्याला उतरणार असे जाहीर केले.
४ था डाव सगळे ब्लाइंड.
दोन १०० ब्लाइंड नंतर मी पत्ते बघितले. बघ्तो तर काय एक्का, दुरी, तीरी- च्यायला ंआज माझा दिवस होता. बघता बघता टेबल ५००० ला पोचले. लोणावळा पॅक. नंतर २ रा. पण सरदारजी बधायला तयार नव्हता. अचानक त्याने ३००० ब्लाइंड ची खेळी केली. आणि शो ला ६००० माझ्याकडे नव्ह्ते. डाव सोडवत नव्हता.
"पैसे नही है तो गेम छोडो"- सरदारजी
तिढा झाला होता.
गेम बद्दल खात्री होती.
मी लोणावळ्या कडे बघितले.
"मेरी तरफ से डालोगे" मी
हार गये तो- लोणावळा
ये लो मेरा नंबर, बोले वो जगह दे दूंगा २४ घंटेमे. - मी
त्याने टाकले.
मी शो मागितला.
सरदारजी ़ कडे २,३,५. साला ब्लाइंड लक म्ह्णतात ते ह्याला. आता ह्यावर काही उपाय? ३० मिनिटाच्या टाइम पास साठी ६००० देणे जीवावर आले आहे. मी सरदारला फोन दिला आहे. तो बँक डीटेल पाठवेल मला. उपाय नसेल तर ट्रांसफर करावे लागतील".
........
" हसतोस काय"?
तुझ्या अजुनही लक्षात नाही आले ़़़का?
" नाय बॉ"
अरे तू कोंबडा, ओल्या रुमालाखाली सापडलेला.
़क्रमशः
प्रतिक्रिया
22 Jan 2014 - 9:00 am | खटपट्या
चांगलंय
22 Jan 2014 - 9:44 am | झकासराव
क्रमश : :(
बा द वे, एक जुनी मराठी सिरियल आठवली.
त्यात वेगवेगळे भाग असायचे.
असाच एक पत्त्याचा भाग होता.
पण त्याची स्टोरी वेगळी होती.
22 Jan 2014 - 9:59 am | आतिवास
विशेष काही कळलं नाही (म्हणजे कथानायकाला गंडवलं गेलं हे कळलं, पण त्याव्यतिरिक्त आणखी काही असल्यास कळलं नाही). बघू, पुढच्या भागात कदाचित काही कळेल मला!
22 Jan 2014 - 12:34 pm | आदूबाळ
दोन शंका:
- सरदारजीला द्यायचे पैसे लोणावळ्याने टाकले होते ना? मग ते लोणावळ्यालाच परत द्यायला पाहिजेत - नंबर सरदारजीला का दिला?
- शो ला ६००० लागत असतील तर देणे ७००० चे कसे? (आधीचे डाव कथानायक प्लसमध्ये होता.)
पुभाप्र. (हा बुक्का सात हजारापेक्षा जास्त आहे असं वाटतंय.)
22 Jan 2014 - 2:34 pm | संजय क्षीरसागर
एकदम पॉइंटचा मुद्दा!
22 Jan 2014 - 12:40 pm | प्यारे१
>>> क्रमशः
मस्तच सर! ओल्या रुमालाखाली कोंबडा सापडला की पंख फडफडावयला येत नाहीत त्यामुळं पळता येत नाही नि पटकन सापडतो.
22 Jan 2014 - 1:00 pm | तुमचा अभिषेक
ओल्या रुमालाखाली कोंबडा हे नव्याने समजले...
लेख जरा घाईत लिहिल्यासारखा वाटला.. पुलेशु
22 Jan 2014 - 1:39 pm | सूड
>>ओल्या रुमालाखाली कोंबडा हे नव्याने समजले...
असेच म्हणतो.
22 Jan 2014 - 4:02 pm | गणपा
गुर्जींचा धागा आणि (अजुन तरी) क्रिक्प्टिक काय गावंना.
दया.... कुछ तो गडबड है.
(क्रमशःच्या प्रतिक्षेत.) -गणा
27 Jan 2014 - 12:50 pm | रामदास
चो वय ५५ --ओला रुमाल -कोंबडा हे पुरेसे क्रिप्टी़क नाही का ?
27 Jan 2014 - 2:03 pm | प्यारे१
__/\__
'अनुभव' बोलत असावा!
22 Jan 2014 - 4:03 pm | अविनाश पांढरकर
जर शेवटच्या डावात कथानायकाकडे १,२,३(sequence) असे पत्ते होते आणि सरदारजीकडे २,३,५ असे पत्ते होते तर कथानायक जिंकायला हवा होता.
मग कथानायक कसे काय पैसे देणे लागत होता?
22 Jan 2014 - 5:02 pm | अनुप ढेरे
२,३,५ चा सेक्वेंस जास्त पावरबाज असतो तीन-पत्तीमध्ये
22 Jan 2014 - 5:35 pm | अविनाश पांढरकर
हे माहित नव्ह्तं.
22 Jan 2014 - 5:01 pm | विनायक प्रभू
२,३,५ सर्वात लहान म्हणुन सर्वात् मोठी
22 Jan 2014 - 5:35 pm | मुक्त विहारि
कारण....
मी आणि माझा मित्र , १९९१ साली नागपूर ते मुंबई , गीतांजली एक्सप्रेसने येत होतो.आमच्या समोर ३ व्यापारी होते.वर्धा स्टेशन ते पुलगांव येईपर्यंत असेच ३ जण आले. त्यातला एक सरदारजी होता.आधी रमी आणि नंतर ३ पत्ती चालू करून , बडनेरा येईपर्यंत त्या ३ही व्यापारांना त्यांनी ४०/४५ हजराला गंडा घातला.
25 Jan 2014 - 11:20 pm | पैसा
नक्की किती गेले?
27 Jan 2014 - 1:43 pm | मारकुटे
अनामिक कथानायकाच्या नावाखाली स्वतःचीच फसल्याची कथा सांगणे आवडले.
27 Jan 2014 - 1:51 pm | ऋषिकेश
तसेही मास्तरांचे क्रिप्टिक समजत नसे.. त्याचाच क्रमशः झाला म्हणायचे :)
कथेच्या क्रमशः भागाच्या प्रतिक्षेत