काsssssssssssssयपो छे......... ( ईन्टरनॅशनल)

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
18 Jan 2014 - 12:36 pm

मागील दुवा..... काSSSSSSयपो छे.... http://misalpav.com/node/16556

संक्राम्तीच्या निमित्ताने पुन्हा अहमदाबादच्या आठवणी जाग्या झाल्या. तिथला पतंगमहोत्सव हा अवर्णनीय असतो.
गरब्याप्रमाणेच पतंग हाही गुजरातच्या सांस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. संक्रान्तीला सगळेजण पतंग उडवत असतात. मुले मुली आजी आजोबा आई वडील नातेवाईक मित्र सगळे जणू मिळून अक्षरशहा दिवसभर आकाशात असतात.
सगळा गुजरात पतंगमय झालेला असतो. अहमदाबादच्या एअरपोर्टवर सुद्धा स्वागतासाठी पतंगाचे मोठमोठे कटआउट्स लावलेले असतात.इतकेच काय पण जहिरातीसुद्धा पतंगमय झालेल्या असतात.
http://www.flickr.com/photos/43995406@N02/5375328120/sizes/l/in/photostream/
संक्रान्तीचेच निमित्त काढून तेथे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव आखला जातो. जवळपास ३० /३२ देशातेल पतंगबहद्दूर येतात आनि आपली कला पेश करतात. आपल्याला कल्पनाच नसते की हे असले काही पतंग असू शकतात. कोणी नुसते सांगीतले तर विश्वास बसणार नाही इतके अचाट.
अहमदाबाद मधे हा पतंगमहोत्सव दरवर्षी असतो. सम्क्रान्तीच्या आसपास हा अहमदाबाद शहरात , त्यानंतर कच्छ आणि नंतर गुजरातच्या इतर भागात नेला जातो.
http://www.flickr.com/photos/43995406@N02/5375293044/sizes/l/in/photostream/
या इथे काय काय बघायला मिळेल याची आपणाला अगोदर थोडीफार कल्पना असते पण आत आल्यावर जे दिसते ते कल्पनातीत असते.
वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या प्रकारचे पतंग हवे विहरत असतात.

अगदी छोटा चिंटुकला इथपासून ते अक्षरशः दोन मजली उंच इमारती एवढा अवाढव्य
http://www.flickr.com/photos/43995406@N02/5375295974/sizes/l/in/photostream/
आकार/ डिझाईन्स सुद्धा अनेक. हा पतंग एका फ्रेंच माणसाने आणला होता जवळजवळ दोन मीटर रुंदीचा. सिल्कच्या कापडापासून बनवलेला. अत्यंत वेगवान. दोन दोर्‍या वापरुन उडवावा लागतो
http://www.flickr.com/photos/43995406@N02/5375302852/sizes/l/in/photostream/

भगतमासा( स्टिंग रे) आणि वाघ हे इथले फेवरेट प्राणी. हे पतंग कोरीयन आहेत
http://www.flickr.com/photos/43995406@N02/5374705047/sizes/l/in/photostream/
http://www.flickr.com/photos/43995406@N02/5374706629/sizes/l/in/photostream/
.
http://www.flickr.com/photos/43995406@N02/5375319230/sizes/l/in/photostream/
हे जपानी महाराज आकशात उडायला एकदम तयार आहेत
http://www.flickr.com/photos/43995406@N02/5374725125/sizes/l/in/photostream/
हा अवाढव्य पतंग उडवायला तेवढीच जाड दोरी आणि अठरा माणसे लागतात.
याच चित्रात मागे उजव्या बाजुला दिसतेय ती कसली दोरी किंवा वायर नाहीय्ये.
"बगळ्यांची माळ दिसे अजूनी अंबरात " त्यासारखीच अडीचशे पतंगांची माळ उडताना दिसतेय.
http://www.flickr.com/photos/43995406@N02/5375309068/sizes/l/in/photostream/.
इथून जाताना आपण नक्की काय पाहिले याचा हिषेब लागत नाही.
विंचु , बॅटमॅन , अवाढव्य फुलपाखर ,विमाने अक्षरशः दिवसा स्वप्न पहातोय असे वाटते. हे स्वप्न जगत पुढचे काही दिवसतरी आनंदात जाणार असतात.
http://www.flickr.com/photos/43995406@N02/5375326326/sizes/l/in/photostream/
कॅमेर्‍यातली दृष्ये आपल्या पुन्हा पुन्हा ते आनंदाचे क्षण आपल्या भेटीला आणतात.आणि सांगतात अरे पतंगासारखे मस्त आकाशात आनंदात विहरत जग.

संस्कृतीशुभेच्छा

प्रतिक्रिया

टॉपगिअर्ड फिलोसॉफर's picture

18 Jan 2014 - 12:48 pm | टॉपगिअर्ड फिलोसॉफर

मोदिचा पतंग उडणार का?

टवाळ कार्टा's picture

18 Jan 2014 - 3:10 pm | टवाळ कार्टा

खुब जमेगा रंग जब भौकेंगे ३ यार...'चीन', 'स्टिंकर' और 'लोफर' ;)
'मुद्दाम' मीटरमे बस्याच नै :P

बर्फाळलांडगा's picture

18 Jan 2014 - 12:51 pm | बर्फाळलांडगा

.

आदूबाळ's picture

18 Jan 2014 - 1:14 pm | आदूबाळ

फोटू दिसंना...

गणपा's picture

18 Jan 2014 - 1:40 pm | गणपा

मस्त हो विजुभाऊ.
बाकी काही पतंग पाहुन त्यांना पतंग म्हणावं का बलून का पॅराशुट या गोंधळात पडलोय. ;)

सस्नेह's picture

19 Jan 2014 - 2:56 pm | सस्नेह

असेच म्हणते...

मारकुटे's picture

18 Jan 2014 - 1:45 pm | मारकुटे

फटू दिसत नाहित

गणपा's picture

18 Jan 2014 - 1:59 pm | गणपा

फोटो http://www.flickr.com या संस्थळावर असल्याने ज्यांना या साईटचा अ‍ॅक्सेस नाही त्यांना कदाचित दिसणार नाहीत.

प्रभाकर पेठकर's picture

18 Jan 2014 - 2:15 pm | प्रभाकर पेठकर

खरच विजुभाऊ.

हवे मने खबर पय्डी के 'काSSSSSSSय पो छे' एटले सूं.
बहु मजा आयवी हो आटला बधा पतंग जोता. हवे बाफेळूनी (एऊच केवाय ना? के कांई बिजू नांम होय छे?)पण बहु याद आवे छे. तमारी पासे पाककृती छे?

विजुभाऊ's picture

20 Jan 2014 - 3:25 am | विजुभाऊ

पेठकर काका
बाफलो = कैरीचे पन्हे
बाफेलु शाक = उकडलेली भाजी
बाफेळु नावाची भाजी ऐकीवात नाही. ( माझ्य किंवा मझ्या मुलांच्या आईला विचारुन सांगतो )

भाते's picture

18 Jan 2014 - 2:18 pm | भाते

फोटो आणि वर्णन दोन्ही आवडले.

फोटो दिसत नाहीत…
थोडी कळ सोसा. मलासुद्धा पहिल्या दोनवेळा धागा ऊघडल्यावर फोटो दिसत नव्हते. मी सुद्धा असाच प्रतिसाद देणार होतो. पण आता दिसताहेत मला फोटो.

आतिवास's picture

18 Jan 2014 - 2:33 pm | आतिवास

मलाही फोटो आधी दिसले नाहीत, आता दिसले.

लॉरी टांगटूंगकर's picture

18 Jan 2014 - 2:31 pm | लॉरी टांगटूंगकर

पतंगोत्सवासाठी कधीतरी वेळ पकडून चक्कर टाकली पाहीजे..

संजय क्षीरसागर's picture

18 Jan 2014 - 3:00 pm | संजय क्षीरसागर

फोटो बघून अतीव आनंद वाटला, धन्यवाद!

मुक्त विहारि's picture

18 Jan 2014 - 4:17 pm | मुक्त विहारि

लेख आवडला.

स्वाती दिनेश's picture

18 Jan 2014 - 4:37 pm | स्वाती दिनेश

पतंगबाजी आवडली,
स्वाती

काकाकाकू's picture

18 Jan 2014 - 5:28 pm | काकाकाकू

रंगाचं ग्राउंड कुठलं हो? खास पतंग उडवणार्‍या मंडळींसाठी तयार करतात का काय? आणि अडिचशे पतंग काय नुसते एकामागे एक जोडलेले असतात? ही पतंगांची माळ उडवतात कशी सुरूवातीला याचा व्हिडीओ असला तर द्याल का?

गंमत आहे खरी.......

विजुभाऊ's picture

20 Jan 2014 - 3:28 am | विजुभाऊ

त्या ग्राउंडवर कारपेट अंथरलेले होते. अहमदाबादच्या रीव्हर साईड भागात हा महोत्सव भरवला होता.
ही पतंगांची माल कशी उडवतात याचा नाही मात्र तो पॅरॅशूटच्या आकाराचा पतंग उडवतानाचा व्हिडीओ आहे. मार्च मध्ये भारतात जाईन तेंव्हा शेअर करेन

प्यारे१'s picture

18 Jan 2014 - 6:00 pm | प्यारे१

मस्तच. आवडली कापाकापी!

मदनबाण's picture

18 Jan 2014 - 6:39 pm | मदनबाण

वॄतांत आणि फोटु बद्धल इजुभाऊंना शुभेच्छा. !!!
माझे पतंग उडवण्याचे दिवस आठवले. :) आमच्या वेळी आठ आण्याच्या {५० पैसे} चा साधा पतंग मिळायचा, तर कौवा {म्हणजे मोठा पतंग } १ रुपयाला मिळत असे. पतंगाला योग्य ठि़काणी कण्णी बांधली जात असे{कण्णी :- पतंगाला बांधला जाणारा दोरा} मग शेपटी लावण्याचा कार्यक्रम होत असे...गोंद म्हणुन शिजवलेला भात आम्ही वापरायचो. वेगवेगळ्या दुकानात जाउन मांजा आणायचो... त्याची विविधरंगी फिरकी बनवली जात असे. शिवाय यात दुसर्‍या मांज्यावर देखील भर पडत असे तो म्हणजे... गुल केलेला पतंग जो तुमच्या हाताला गवसला आहे,त्याच्या बरोबर अनेक वेळा थोडा फार मांजा मिळत असे.पतंग बदवणे { पतंग उडवणे}मांज्याचा झोल टाकणे किंवा ठील देणे,काटाकाटी हे ठरावीक शब्द पतंग उडवताना वापरले जातात.गुल झालेला पतंग लुटण्याच्या नादात काही मुलांचे जीव देखील गेले आहे.
परंतु काही म्हणा पतंग उडवण्याचा जो आनंद आहे... तो उडवणाराच जाणु शकतो. :)

प्रभाकर पेठकर's picture

18 Jan 2014 - 7:54 pm | प्रभाकर पेठकर

आमच्या वेळी आठ आण्याच्या {५० पैसे} चा साधा पतंग मिळायचा, तर कौवा {म्हणजे मोठा पतंग } १ रुपयाला मिळत असे.

माझ्या लहानपणी १ पैसा, ३ पैसे आणि ६ पैसे (कौवा) ह्या दरात पतंग मिळायचे.
साखळी छाप दोर्‍याचे रिळ आणून आठ आण्याच्या फिरकीला गुंढाळायचे. पुढे थोडा गुलाबी मांजा (अंगठा आणि करंगळीत लड मोजून) जोडायचा. त्यात तार मांजा सर्वात महत्त्वाचा.
भाताने पतंग चिकटविणे, घरीच काचांचा चुराकरून मांजा बनविणे वगैरे बरेच उद्योग केले आहेत.

मस्तं होते ते दिवस. रेडिओ, टिव्ही, कॉम्प्युटर कांही नव्हते. मैदानी खेळ हेच मनोरंजनाचे साधन होते.

काय फटू बगा विजुभौ. मजा आ गया.

बाकी बॅटमॅन पतंग कुठे आहे? त्याचा फटूही दाखवणे, आगौ धन्यवाद.

खटपट्या's picture

18 Jan 2014 - 9:40 pm | खटपट्या

मस्तैत फोटू

इन्दुसुता's picture

18 Jan 2014 - 10:30 pm | इन्दुसुता

लेख व फोटो आवडले. आयुष्यात काही गोष्टी ( मला ) अगदी निर्मळ आनंद देवून जातात, त्यात एक .. आकाशात विहरत असणारे पतंग बघणे....

जेपी's picture

19 Jan 2014 - 11:01 am | जेपी

*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo:

अत्रुप्त आत्मा's picture

19 Jan 2014 - 2:14 pm | अत्रुप्त आत्मा

मन प तंssssssssssग जाहले! :)

पैसा's picture

23 Jan 2014 - 3:04 pm | पैसा

मस्त लेख आणि फोटु! काही पतंग मात्र फुग्यासारखे दिसताहेत!

काही पतंग मात्र फुग्यासारखे दिसताहेत!
बरोबर. त्याना ते सिल्क च्या कापडापासून बनवलेले असतात.
एक भला मोठ्ठा पतंग अगोदर वर सोडतात.( मदर काईट) अन त्यानंतर हे सिल्कचे काइट्स त्याच दोरीला बांधुन वर सोडतात. हवेत गेल्यावर ते एकदम मस्त फुगतात

विजुभाऊ's picture

13 Jan 2016 - 5:03 pm | विजुभाऊ

घ्या इंटरनॅशनल काईट फेस्टिव्हल चा आनंद पुन्हा एकदा.

अविनाश लोंढे.'s picture

14 Jan 2016 - 3:46 pm | अविनाश लोंढे.

लई भारी

विजुभाऊ's picture

16 Jan 2022 - 12:09 pm | विजुभाऊ

दहा पर्षांपूर्वी ......याच शहरात .......याच कालात

चौथा कोनाडा's picture

16 Jan 2022 - 5:42 pm | चौथा कोनाडा

मस्त हो विजुभाऊ ! मझा आ गया !
दोन वर्षांपुर्वी अनुभवलेला पतंगोत्सव आठवला !

दणदणीत पतंगोत्साह, विविध आकारी पतंग आणि उत्साहाने भरलेले पतंगबाज बघून मन उडू उडू झालं !