अचानक ठाणे कट्टा - वृत्तांत

भाते's picture
भाते in जनातलं, मनातलं
16 Jan 2014 - 11:14 pm

नमस्कार समस्त मिपाकरहो, (घाबरू नका, मी काही पत्र लिहित नाही आहे)
मिपाचा मी अनुभवलेला हा दुसराच कट्टा आहे. माझा पहिला कट्टा 'इस्पिकचा एक्का' यांचा पुण्यानंतरचा दुसरा आणि भारतातुन परत जाण्यापुर्वीचा मुंबईमध्ये झालेला कट्टा होता. माझ्या सुदैवाने, माझा दुसरा कट्टा 'जेडी' यांचा भारतातुन परत जाण्यापुर्वीचा एकमेव कट्टा होता. मिपाकर भारतातुन आपल्या कामासाठी इतर देशात परत जाताना भारतात कुठेतरी (कोण आहे रे तो मुंबई पुणे करतोय?) किमान एकतरी कट्टा करतातच! याअगोदर काही अप्रतिम कट्टे झाले होते त्याचे वृत्तांत मी वाचले आहेत. त्यामुळे केवळ माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर, मी ह्या कट्टयाचा वृत्तांत लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. कट्टयाचे फोटो सुबोध खरे यांनी आधीच इथे डकवले आहेत.
माझ्या सुदैवाने माझ्या पहिल्या कट्टयाला विमेकाका ऊपस्थित होते आणि त्यांनी या कट्टयाचा सविस्तर वृत्तांत लिहिला होता. विमेकाका, लक्ष असु द्या, यावेळी तुम्ही हापिसच्या कामामुळे (इतके काय काम करता हो तुम्ही हापिसात? :) ) कट्टयाला न येऊ शकल्यामुळे माझ्यावर आज ही कट्टयाचा वृत्तांत लिहिण्याची वेळ ओढावली आहे. त्यामुळे पुढच्या कट्टयाच्या आधी मी तुम्हाला व्यनि करून तुम्ही कट्टयाला येणार आहात का हे विचारूनच कट्टयाला यायचे का नाही ते ठरवणार आहे. ह घ्या. :)
काय लिहितो आहे मी हे? कट्टयाचा वृत्तांत लिहायचा आहे मला! :)
सोमवारी संध्याकाळी मिपावर सुबोध खरे यांचा अचानक ठाणे कट्टा हा धागा पाहिला आणि लगेच तो धागा ऊघडला. कट्टयाला सुबोध खरे, मुक्त विहारी आणि जेडी असे किमान तिघे येत आहेत हे नक्की होते. दुसऱ्या दिवशी संक्रातीची सुट्टी असल्याने ठाण्यात जेडी साहेबांबरोबर कट्टा आहे हे वाचुन आनंद झाला. जेडी यांचे सापांविषयीचे अनेक लेख वाचलेले असल्यामुळे सापांशी खेळणारा हा माणुस आहे तरी कोण या ऊत्सुकतेपोटी कट्टयाला जायची खुप इच्छा झाली. जमल्यास कटयाला येण्याचा नक्की प्रयत्न करेन असा प्रतिसाद टाकल्यावर अपेक्षेप्रमाणे मुक्तविहारी यांचा फोन आला. त्यांना येण्याचा प्रयत्न करेन असे सांगुन मी मात्र या कटयाला जायचे ठरवले.
तलावपाळी माहित असली तरी धाग्यावर पद्मश्री चित्रे यांनी सांगितल्याप्रमाणे राजावंत ज्वेलर्स शोधत तिकडे पोचलो. बाकी या समस्त स्त्रियांना दागिन्यांची सगळी दुकाने नक्की माहित असतात. :) राजावंत ज्वेलर्सच्या ऊजव्या बाजुला नमस्कार हॉटेल होते, जे रिनोव्हेशनसाठी बंद होते. डाव्या बाजुला एक बिननावाचे हॉटेल होते, जिथे, सुट्टी असल्याने, बरीच गर्दी होती. समोर झब्बा घालुन एकजण कोणाचीतरी वाट पहात ऊभा होता. इतक्यात समोरून मुक्त विहारी एका इसमाबरोबर येताना दिसले. त्यांनी त्या इसमाची ओळख भटक्या खेडवाला अशी करून दिली. मग सुबोध खरे यांना फोन करण्याचे ठरल्यावर साक्षात सुबोध खरे (आणखी एका इसमाबरोबर) आमच्या समोर प्रकट झाले. त्यांनी त्या इसमाची ओळख जेडी अशी करून दिल्यावर मग आम्ही आत शिरत असताना तो आधीचा झब्बा घालुन ऊभा असलेला इसम आपली ओळख मदनबाण अशी करून देत आमच्याबरोबर आला. मग कडेची जागा बघुन आम्ही (ऊत्त्सवमुर्ती जेडी, सुबोध खरे, मदनबाण, मुक्त विहारी, भटक्या खेडवाला आणि मी) स्थानापन्न झालो. कट्टा अचानक ठरलेला असल्याने, खुपश्या लोकांना सुट्टी नसल्याने आणि बरेच जण 'नक्की येतो, जमल्यास येतो, उशिरा येतो पण नक्की येईन, येण्याचा प्रयत्न करतो' असे सांगुन आयत्या वेळी टांग देतात याची जाणिव असल्याने कटयाची ऊपस्थिती गौण होती.
आम्ही एकेमेकांची ओळख करून घेत असतानाच मदनबाण यांनी आपल्याकडल्या कुपितले सुगंधी अत्तर इतरांना देऊ केले. संक्रांत असल्याने, मग तिळगुळांची देवाणघेवाण झाली. सकाळपासुन गोड खाऊन पोट भरलेले असल्याने खरंतर कोणालाही काही खाण्याची इच्छा नव्हती. पण हॉटेलमध्ये सर्वजण बसलेलो असल्याने खायला काहीतरी मागवणे गरजेचे होते. इथे मला विमेकाकांचे मुलुंड कटयाच्या वृत्तांतातले एक वाक्य आठवले 'कट्टे होतात ते खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी नाही तर भेटण्यासाठी'. मग सर्वानुमते एक पिझ्झा मागवण्यात आला. मग गप्पा सुरु झाल्यावर जेडी यांचे सर्पोद्यानातले अनुभव आणि सुबोध खरे यांचे वैद्यकीय क्षेत्रातले अनुभव ऐकत गप्पा सुरु झाल्या. च्यायला, आपण चाराणे, आठाणे, रुपया जितक्या सहजतेने बोलतो तसे जेडी सुसर, मगर, मण्यार, नाग अश्या भयानक प्राण्यांपद्धल बोलत होते. बहुतेक वेळा सामान्य माणुस साप वैगरे प्राण्यांना घाबरतो, पण जेडी कडे पाहिल्यावर बिचारे सापच या मनुष्य प्राण्याला घाबरतिल असे वाटले. मग सुबोध खरे यांनी आपल्या वैद्यकीय क्षेत्रातले अनुभव सांगायला सुरुवात केली. प्रत्येक कटयाला सुबोध खरे यांची ऊपस्थिती का गरजेची असते हे मला त्यावेळी समजले. सुबोध खरे यांनी डॉक्टरांसाठी यशस्वी अशी त्रिसुत्री ३ ग सांगितली जी सर्व क्षेत्रातल्या व्यक्तींना लागु पडु शकते. पण इथे मिपावर वैद्यकीय क्षेत्रातले बरेचसे तज्ञ असल्याने सुबोध खरे यांच्या परवानगीशिवाय मी ती त्रिसुत्री उघड करू शकत नाही. :)
आमच्या गप्पा सुरु असताना अजया ताई तिथे आल्या. कदाचित मी धाग्यावर अनाहिता तर्फे कोणी येईल का अशी शंका ऊपस्थित केली असल्याने त्यांच्या प्रतिनिधी म्हणुन अजया ताई तिथे आल्या याचा आनंद झाला. मग पुन्हा ओळख झाल्यावर पुन्हा एकदा तिळगुळांची देवाणघेवाण झाली. पुन्हा एकदा काहीतरी खाण्यासाठी म्हणुन आणखी एक डिश मागवण्यात आली. मग जेडी, सुबोध खरे, अजया ताई, मुक्त विहारी यांची अनेक विषयांवर चर्चा सुरु झाली. गप्पा रंगत असतानाच मध्येच चहा कॉफी मागवण्यात आली. मग कामानिमित्त जायचे असल्याने अजया ताई निघुन गेल्यावर पुन्हा आमच्या गप्पा रंगल्या. मदनबाण यांनी मिपा आणि मिपाकर यावर थोडासा प्रकाश टाकला. :)
कंटाळा आला मला आता लिहुन. पुढचा वृत्तांत मुक्तविहारी/मदनबाण/सुबोध खरे यांनी पुर्ण करावा ही विनंती.

कटयाचा वृत्तांत लिहायची ही माझी पहिलीच वेळ असल्याने त्यात जर काही चुका झाल्या असतील तर संपादक मंडळ/कटयाला आलेली मंडळी/इतर समस्त मिपाकर यांनी कृपया त्यात योग्य ते बदल करावेत ही नम्र विनंती.

मौजमजाप्रकटन

प्रतिक्रिया

पैसा's picture

16 Jan 2014 - 11:18 pm | पैसा

एकदम खुसखुशीत लिहिलं आहे! आणखी जरूर लिहा!

आदूबाळ's picture

16 Jan 2014 - 11:20 pm | आदूबाळ

ज्जे बात!

ते फोटो इथे डकवता येतील का?

रेवती's picture

16 Jan 2014 - 11:21 pm | रेवती

भातेसाहेब, चांगला झालाय वृत्तांत. फोटू आधीच पाहिलेत. आजकाल परदेशी जाणार्‍या मनुष्याला पकडून झटपट कट्टे करण्याचा प्रकार सुरु झालाय म्हणून बरे आहे. नाहीतर वेळ काढून निवांत भेट होणे अवघड असते.
मदनबाणा, आपल्याला भेटून किती वर्षे झालीत मोज!

किसन शिंदे's picture

17 Jan 2014 - 8:54 am | किसन शिंदे

मदनबाणा, आपल्याला भेटून किती वर्षे झालीत मोज!

गेली चार वर्ष ऐकमेकांना चांगले ओळखतोय, भरपूर बोलणंही होतं, एवढं असुनही परवा हा पठ्ठ्या मला पहील्यांदा भेटत होता. :)

मदनबाणा, आपल्याला भेटून किती वर्षे झालीत मोज!
हो... हे वर्ष मोजुन ५ झाली वाटतं ! ;)

गेली चार वर्ष ऐकमेकांना चांगले ओळखतोय, भरपूर बोलणंही होतं, एवढं असुनही परवा हा पठ्ठ्या मला पहील्यांदा भेटत होता.
बघ ! किसन देवाचे दर्शन घडायला ४ वर्ष लागली मला ! ;)

बाकी, खरे साहेबांना पाहिल्या नंतर यांना कायाकल्प सिद्धी प्रात्त आहे याची खात्री पटली. ;) डॉक एकदम हसतमुख आणि मोकळा माणुस असल्याचे लगेच जाणवले.जेडी प्राण्यांच्या बद्धल अगदी सहजतेने सर्व माहिती सांगत होता,मगर-सुसर फरक त्यांचे स्वभाव इं गोष्टी अगदी डिट्टेलवार सांगितल्या पठ्ट्याने... एका बेवड्याची कथा सुद्धा सांगितली त्यानी. भाते जरा शांतच वाटला, बहुधा श्रवण भक्तीच्या मोड मधे असावा... मुवि हे नावा प्रमाणेच आहेत्,त्यांनी सुद्धा त्यांच्या प्रांतातल्या चिक्कार गोष्टी सांगितल्या... भरपुर मनमोकळ्या गप्पा हाणल्या... शेवटी हाटिल वाल्यांची आमच्या टेबलाकडे पाहुन सुरु झालेली चुळबुळ डॉकच्या लक्षात आली... शेवटी सगळ्यांना बाहेर पडायला लागले.

जाताजाता :- आदुबाळ तुझ्या बद्धल बरीच माहिती कळली बरं का ! ;) बादवे हे असं नाव घेण्याच कारण काय बरं ?

आदूबाळ's picture

17 Jan 2014 - 7:23 pm | आदूबाळ

आदुबाळ तुझ्या बद्धल बरीच माहिती कळली बरं का ! बादवे हे असं नाव घेण्याच कारण काय बरं ?

बापरे! काय विस्फोटक वाक्य!

आणि "असं" म्हंजे कसं नाव?

बापरे! काय विस्फोटक वाक्य!
आणि "असं" म्हंजे कसं नाव?
काही स्फोटक वगरै नाही... तुझ्या हे नाव घेण्यामागची इष्टोरी काय ते सांग जरा...

आदूबाळ's picture

18 Jan 2014 - 7:50 pm | आदूबाळ

कॉलेजमधलं टोपणनाव!

आता ते असं का पडलं त्याची वायली ष्टोरी आहे....

प्रभाकर पेठकर's picture

17 Jan 2014 - 10:34 am | प्रभाकर पेठकर

>>>>आजकाल परदेशी जाणार्‍या मनुष्याला पकडून झटपट कट्टे करण्याचा प्रकार सुरु झालाय म्हणून बरे आहे.

निषेध..निषेध.

ते वाक्य,
भारतात होणार्‍या कट्ट्यांमधून, परदेशस्थ मिपाकरांना, इतर मिपाकरांना भेटणे सोयिस्कर होते.
असे पाहिजे होते.

सुबोध खरे's picture

16 Jan 2014 - 11:22 pm | सुबोध खरे

आमचे एक मित्र नवीन डॉक्टर झाल्यावर एका प्रथितयश डॉक्टरांकडे सल्ला आणि आशीर्वाद घेण्यासाठी गेले असताना त्यांनी वरील गोष्ट सांगितली.
गर्दी, गाडी आणि गाढवपणा या तीन गोष्टी (जितकी जास्त गर्दी, जितकी मोठी गाडी आणि जितका जास्त गाढवपणा करशील ) तितका तू यशस्वी डॉक्टर.

रेवती's picture

16 Jan 2014 - 11:29 pm | रेवती

गर्दी आणि गाडीचं ठीके पण गाढवपणा करण्यात काय काय मोडते? नाही हो, तसा दरवेळी नाही पण कधीकधी जीवाशी खेळ असतो म्हणून विचारतीये.

पोटेन्शिअल आहे हे स्पष्ट झाले।

सुबोध खरे's picture

17 Jan 2014 - 9:55 am | सुबोध खरे

आमच्या सौ कडे एक रिक्षा वाला पत्र्याने पाय कापला म्हणून आला. त्याची मलम पट्टी केली. पाय कापला गेल्याने त्याला रिक्षा चालवता येत नव्हती म्हणून सौ. ने त्याच्या मलम पट्टीचे पैसे घेतले नाहीत वर आम्ही विकत घेतलेली सत्तर रुपयाची औषधे(प्रतिजैविके antibiotics) त्याला फुकट दिली. या गाढवपणा बद्दल मी तिला बोललो कि जर त्याची रिक्षा बिघडली असती तर त्याने गपचूप कुठून तरी पैसे आणलेच असते ना ?
२०१२ या वर्षात माझ्या विविध रुग्णांनी मला आत्ता दोनशे रुपये कमी आहेत, नंतर आणून देतो असे सांगितल्यावर मी त्यांना ठीक आहे म्हणत असे. यात बहुसंख्य लोक पांढरपेशे आणि खाउन पिउन सुखी असे होते. असे करता करता वर्षाअखेरीस हिशेब करताना मला असे आढळले आहेत कि माझे जवळजवळ वीस हजार रुपये बुडाले आहेत.
२०१३ मध्ये मी लोकांना पैसे घेऊन या आणि रिपोर्ट घेऊन जा असे स्पष्टपणे सांगायला सुरुवात केली. जो माणूस अगदीच फाटका असेल त्याला रिपोर्ट देऊन मी पैसे आणून द्या असे सांगतो. त्याने दिले तर ठीक नाही तर बुडीत खाती असे समजून मी शांत राहतो.
लोकांनी चांगले म्हणावे म्हणून नेसूचे सोडून द्यावे या मताचा मी नाही.
त्यामुळे आता आम्ही असा गाढवपणा करीत नाही. प्रथितयश डॉक्टर होण्याचा संकटापासून आम्ही वाचलो आहोत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Jan 2014 - 1:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

प्रथितयश डॉक्टर होण्याचा संकटापासून आम्ही वाचलो आहोत.

थोडक्यात, तुम्ही "प्रथितयश" (यशस्वी होण्याच्या अगोदरच्या, यशाकडे मार्गक्रमण करणाच्या) अवस्थेला टाळून तडक "यशस्वी" डॉक्टर अवस्थेची पाहिरी गाठली आहे ! ;)

रेवती's picture

17 Jan 2014 - 6:44 pm | रेवती

:)

खटपट्या's picture

17 Jan 2014 - 12:06 am | खटपट्या

मस्त !!!

नंदन's picture

17 Jan 2014 - 1:24 am | नंदन

वृत्तांत आवडला. विमेकाकांच्या वृत्तांतलेखनपरंपरेत शोभून दिसेलसे लेखन :)

प्रभाकर पेठकर's picture

17 Jan 2014 - 10:37 am | प्रभाकर पेठकर

प्रत्येक कट्टा वृत्तांत आणि कट्टा छायाचित्रे पाहून हृदयात एक सूक्ष्म कळ उमटते. लवकरच ह्या सर्वांना भेटण्याचा योग यावा असे वाट्ते आहे.

जेपी's picture

17 Jan 2014 - 10:37 am | जेपी

*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:

मुक्त विहारि's picture

17 Jan 2014 - 12:59 pm | मुक्त विहारि

व्रुत्तांत मस्त लिहिला आहे.

भ ट क्या खे ड वा ला's picture

17 Jan 2014 - 6:06 pm | भ ट क्या खे ड वा ला

वृत्तांत छान लिहिलाय हो भाते
पण पहिल्याच वाक्यात घाबरणे वगैरे ,पत्र लिहित नाही, असे काहीतरी वाचले
तर एखादे "घाबरवणारे पत्र" पण लिहून टाका.
jocks apart .

लिहिते व्हा जमतय.

जॅक डनियल्स's picture

17 Jan 2014 - 7:17 pm | जॅक डनियल्स

मस्त वृतांत लिहिला आहे. खरोखरच धमाल आली, आणि तो पिझ्झा काय होता, १० पिझ्झा हट च्या तोंडात मारील.

सर्वप्रथम काल रात्री मी कट्टयाचा वृत्तांत लिहिताना ज्याकाही व्याकरणाच्या खंडीभर चुका केल्या आहेत त्यापद्धल सगळ्यांची माफी मागतो.
मिपावर दोनचार ओळींचे प्रतिसाद लिहिणे वेगळे आणि (अनपेक्षित रित्या) कट्टयाचा वृत्तांत लिहिणे वेगळे. माझ्या या चुकांसाठी दोन मिपाकर जबाबदार आहेत. एक म्हणजे विमेकाका (जे त्यांच्या हापिसच्या कामामुळे कट्टयाला येऊ शकले नाहीत) आणि दुसरे मुविकाका (जे कट्टा झाल्यापासुन दोन दिवस मिपावर फिरकले नाहीत. :) मुविकाका, कट्टा झाल्यावर मी केवळ तुमच्या वृत्तांताची वाट पहात होतो. सुबोध खरे यांनी फोटो काढुन मिपावर टाकले. त्यामुळे त्यांना पुन्हा वृत्तांत लिहिण्यास सांगणे जिवावर येत होते. मदनबाण यांच्या हापिसातले आंजा कासवापेक्षा धिम्या गतीचे आहे हे समजल्यावर त्यांना वृत्तांत लिहिण्यास सांगणे शक्य नव्हते. ऊत्त्सवमुर्ती जेडी ऊसगावात जाणार असल्याने त्यांनाच वृत्तांत लिहिण्यास सांगणे शक्यच नव्हते. त्यामुळे मी केवळ तुमच्या वृत्तांताची वाट पहात होतो. पण तुम्ही अचानक गायबल्याने मला केवळ तुमच्यामुळे अनपेक्षित रित्या हा वृत्तांत लिहावा लागला.)
इतके लिहिण्याची सवय नसल्याने हा वृत्तांत लिहायला मला सुमारे तासभर वेळ लागला. मग पुढे लिहिण्याचा कंटाळा आल्यावर तसे नमुद करून मी लिहिलेला वृत्तांत न वाचताच प्रकाशित केला.
पण आज मी लिहिलेला वृत्तांत वाचताना मला माझ्या लिखाणातल्या चुका समजल्या. लिहिताना व्याकरणाच्या इतक्या चुका करूनसुद्धा एरवी व्याकरणाच्या शुल्लक चुकेसाठी फैलावर घेणाऱ्या मिपाकरांनी (मी तसे नमुद केले असतानासुध्दा) माझी एकही चुक दाखवली नाही याचे नवल वाटले. मिपाकर इतके उदारमतवादी आहेत हे समजल्यावर आनंद झाला. :) कट्टयाचा वृत्तांत लिहिण्याचा पहिला प्रयत्न असल्याने माझे बरेचसे लिहायचे राहुन गेले होते जे मदनबाण आणि सुबोध खरे यांनी पुर्ण केले.
७ ठिकाणी मी चुकुन 'कट्टया' ऐवजी 'कटया' हा शब्द अनवधाने वापरला आहे. संपादक मंडळापैकी कोणीतरी कृपया माझी चुक सुधारून योग्य ते बदल करावेत ही विनंती.

गलत एकदम गलत.....

हे वाक्य खरे तर असे हवे होते.

मिपाकर इतके उदारमतवादी आहेत हे समजल्यावर आनंद झाला.

हटवादी लोकांसाठी जूने जाणते आणि नेणते मिपाकर वेगळे निकष लावतात आणि नवजात मिपाकरांना किती डोक्यावर घ्यायचे ते तुमच्या हातात आहे.

मुक्त विहारि's picture

17 Jan 2014 - 9:31 pm | मुक्त विहारि

मी अजुन एक-दोन दिवस तरी वेळ काढू शकणार नाही , हे वेळीच ओळखून, जास्त वेळ वाट न बघता ,वेळेवर व्रुत्तांत लिहील्याबद्दल मनापासून धन्यवाद.

अजया's picture

17 Jan 2014 - 9:25 pm | अजया

छान लिहिले आहे!

स्वाती दिनेश's picture

17 Jan 2014 - 9:56 pm | स्वाती दिनेश

कट्टा मस्त झालेला दिसतो आहे,
स्वाती

आनंदराव's picture

18 Jan 2014 - 10:06 am | आनंदराव

अरेरे, या वेळेला पन चानस हुकला म्हनायचा आमचा !

सविता००१'s picture

18 Jan 2014 - 12:09 pm | सविता००१

कसलं छान लिहिलय! मजा आली वाचतान्स्स आणि कट्टा तर झकासच जमला होता असं दिसतच आहे.