अतिवास आणि खेडूत यांच्या लिखाणामुळे प्रेरीत होऊन एक शतशब्द कथा लिहायचा प्रयत्न करतोय...कोठेतरी वाचलेल्या एका संवादाचे हे एक छोटे रुपांतर आहे... चु.भू.द्या.घ्या.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
"बाबा लवकर उशीर होतोय मला..." सातव्यांदा गुणेश खेकसला..”च्यायला रिक्षा/टॅक्सीचा आजच संप असावा आणि आजच बॉसने लवकर ऑफिसला बोलवावे.?”
अरे बाबा, तुला उशीर होतोय तर मी एकटाच जातो. आता जवळच आहे..
नको नको, जड बॅग घेऊन या उन्हात तुम्हाला चालवेल?
जमेल रे, हळू हळू जातो…. बसेन हवे तेव्हा वाटेत..
माझे ऐका, तुम्हाला सापडणार नाही तो वृद्धाश्रम, तुम्हाला सोडले की जाईन पळत.... खुप गल्ल्या आहेत. चुकाल कोठेतरी..मी फोनवरच बोललो आहे त्यांच्याशी म्ह्णून मला ही रस्ता शोधायचाच आहे..
काळजी नको करूस, मी तुझ्या आजोबांना मी येथेच सोडले होते.. माहीत आहे रस्ता..
आहो पण मला ही माहीत हवा ना रस्ता? तुमच्या नातवाचा काय भरवसा?
प्रतिक्रिया
10 Jan 2014 - 8:54 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान परंपरा. अजुन काय तरी पाहिजे होतं.
-दिलीप बिरुटे
10 Jan 2014 - 9:16 am | योगी९००
मलाही लिहीतान असेच वाटत होते की अजुन काहीतरी पाहिजे होते...
मुळ संवाद खुपच मोठा होता आणि पुर्ण संवादात म्हातार्या माणसासाठी खुप कणव/सहानभुती वाटावी असे वातावरण निर्माण केले होते. जे शेवटच्या दोन वाक्यांमुळे बदलत होते. कदाचित असे वातावरण मला तयार करता नाही आले. हेच बहूधा पाहिजे होते.
10 Jan 2014 - 12:01 pm | विअर्ड विक्स
उत्तम विषय.... पर कुछ कमी हैं क्या हैं वो पता नही....
10 Jan 2014 - 12:19 pm | मुक्त विहारि
ही न संपणारी कहाणी थोडक्या शब्दांत मांडणे कठीणच आहे.
तरी पण तुम्ही त्यांत चांगल्यापैकी यश संपादन केले आहे, हे वेसांनल.
10 Jan 2014 - 2:10 pm | सूड
आवडली !!
10 Jan 2014 - 6:29 pm | निश
चांगल लिहिल आहात अजुन लेखांच्या प्रतिक्षेत
10 Jan 2014 - 7:33 pm | जेपी
आवडल .
10 Jan 2014 - 7:38 pm | प्रभाकर पेठकर
करूणामय खानदानी परंपरा.
प्रयत्न चांगला आहे.
10 Jan 2014 - 8:00 pm | आतिवास
चांगला प्रयत्न. कथा आवडली.
10 Jan 2014 - 9:07 pm | खबो जाप
पेराल तसे उगवते ......
10 Jan 2014 - 9:51 pm | पैसा
कहाणी अपुरी आहे म्हणून तशी वाटली लोकांना. आपल्याला सवय असते की मुलाने वडिलाना वृद्धाश्रमात सोडले म्हणजे त्याला स्वतःला जेव्हा वृद्धाश्रमात जावे लागेल तेव्हा कहाणी पुरी होईल..