आजच सकाळी मुक्त विहारींकडून असे कळले कि श्री इस्पिकचा एक्का भारतात आले आहेत आणी पुण्यात वास्तव्याला आहेत. आपण त्यांना भेटूया असे आम्ही ठरविले आहे. त्यावर मी त्यांना दूरध्वनी( हा मुक्त विहारीनीच दिला) केला आणी ते शनिवार दिनांक २१ डिसेम्बर रोजी परत विदेशी जात आहेत. त्यांचे विमान सायंकाळी ७.३० ला सुटत आहे आणी त्यांना ४.३० ला चेक इन करायचे आहे म्हणून आम्ही त्यांना सहार विमानतळाजवळ एखाद्या हॉटेल मध्ये साधारण २ वाजता भेटायचे ठरविले आहे.
ज्या मित्रांना तेथे येण्याची इच्छा आहे त्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे.
खर्च स्वतःचा स्वतःने करायचा आहे. (प्रायोजक मिळाला तर सोन्याहून पिवळे)
या वेळेत आणी स्थळात बदल होणे नाही. कारण एक्का साहेब थोडा वेळ अगोदर येत आहेत आणी त्यांना चार वाजल्यानंतर थांबणे शक्य नाही. तरी सर्वांनी अगत्य येण्याचे करावे.
वय वजन उंची आकार लिंग जात धर्म देश याचे कोणतेही बंधन नाही.
प्रतिक्रिया
14 Dec 2013 - 6:42 pm | यसवायजी
आमच्या शुभेच्छा.
वृतांत येवुद्यात.
14 Dec 2013 - 6:48 pm | प्यारे१
सर्वसमावेशक कट्ट्याला शुभेच्छा!
>>>वय वजन उंची आकार लिंग जात धर्म देश याचे कोणतेही बंधन नाही.
रंग राहीला.
14 Dec 2013 - 7:34 pm | सुबोध खरे
रंग राहिलाच. क्षमस्व
असो. पुढच्या वेळेस इत्यादी इत्यादी टाकेन.
अवांतर -- इत्यादी--म्हणजे आपण आहोत त्यपेक्षा हुशार आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न
14 Dec 2013 - 6:56 pm | मुक्त विहारि
मी नक्की येत आहे...
14 Dec 2013 - 7:17 pm | ज्ञानव
मालाही येयला आवडेल
14 Dec 2013 - 7:26 pm | प्रभाकर पेठकर
सुबोध खरे, एसवायजी, प्यारे१, मुक्त विहारी आणि उत्सवमूर्ती इस्पिकचा एक्का ह्यांना भेटण्याची तीव्र इच्छा असूनही येणे अशक्य असल्याने कट्ट्यास इथुनच शुभेच्छा.
14 Dec 2013 - 7:40 pm | मुक्त विहारि
तुम्ही आलात की लगेच कट्टा करू...
15 Dec 2013 - 2:31 am | प्रभाकर पेठकर
जरूर. कट्ट्याचा मुख्य खर्च माझ्याकडून प्रायोजित समजा.
14 Dec 2013 - 7:40 pm | विश्वनाथ मेहेंदळे
यायचा जोरदार प्रयत्न केले जातील.
14 Dec 2013 - 7:44 pm | मुक्त विहारि
या नक्की या...
बदलापूरची मिसळ खावून झालीच आहे.
आता साकी नाक्याला सँडविचेस खावू,चहा पिवू, सिग्रेटी ओढू आणि मस्त गप्पा टप्पा मारू.
14 Dec 2013 - 7:42 pm | यशोधरा
कट्ट्याला शुभेच्छा!
14 Dec 2013 - 9:52 pm | भाते
भारतात येऊनसुध्दा मिपावर कळवले सुध्दा नाहीत का? आता तुमच्या या सफरीचासुध्दा वृतांत मिपावर येणार आहे का?
एक्का काकांना भेटायची मनापासुन ईच्छा आहे. यायचा नक्की प्रयत्न केला जाईल. आयत्या वेळी सांगितले किंवा अचानक न सांगता आले तर चालेल का? माफ करा, पुढल्या शनिवारचे आत्ता नक्की काही सांगता येत नाही आहे.
ठिकाण (हॉटेल) आणि नक्की वेळ या धाग्यावर कळेलच!
15 Dec 2013 - 6:18 am | मुक्त विहारि
चालेल.....
15 Dec 2013 - 9:57 am | ज्ञानोबाचे पैजार
साला हे मि.पा. म्हणजे देशी दारु सारखे आहे. एकदा त्याची चटक लागली की सुटता सुटत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा कट्टा.
विमानात बसायच्या आधी वेळात वेळ काढुन जीवाचा आटापिटा करत कट्ट्या साठी येणार्या श्री इस्पिकचा एक्का यांचे जेवढे कौतुक वाटते तेवढेच कौतुक कट्टा आयोजीत करणार्या डॉ. खरे आणि मु.वि. चे पण वाटते.
कट्टया साठी मनापासुन शुभेच्छा.
16 Dec 2013 - 1:01 pm | शैलेन्द्र
काय भन्नाट उपमा दिलीत :)
ज्याप्रमाणे पट्टीचा पिणारा कुठेही गेला तरी दोन घोट घशाखाली घालतोच तसचं पट्टीचा मिपाकर कुठही असलं तरी कट्टा घ्यायचा प्रयत्न करतोच..:)
एक्का व इतर कट्टाकर्यांना शुभेच्छा !!!
16 Dec 2013 - 11:46 am | सुहास झेले
नक्की प्रयत्न करेन :) :)
16 Dec 2013 - 11:48 am | मुक्त विहारि
नक्की या.
16 Dec 2013 - 1:28 pm | अनिरुद्ध प
हार्दिक शुभेच्छा,एक्का साहेबान्च्या भेटीचा योग नाही,त्याबद्दल हुरहुर मात्र राहील.
16 Dec 2013 - 2:32 pm | सूड
प्रयत्न करेन. पण नक्की सांगू शकत नाही.
21 Dec 2013 - 1:28 am | विश्वनाथ मेहेंदळे
काय ठरले? कुठे भेटायचे ?
21 Dec 2013 - 11:14 am | विश्वनाथ मेहेंदळे
मंडळी, प्लॅन मे थोडा चेंज होनेका...
नवीन तपशील असे आहेत.
वेळ 1:30
मुलुंड पुर्व बावर्ची हाॅटेल.
21 Dec 2013 - 12:32 pm | स्पा
येतोय
21 Dec 2013 - 2:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काय आहे, लेटेष्ट कट्ट्याची पोझीशन ?
-दिलीप बिरुटे
21 Dec 2013 - 6:13 pm | सुबोध खरे
वृत्तांत लवकरच येत आहे
21 Dec 2013 - 6:14 pm | मुक्त विहारि
ऐन वेळी ठिकाण आणि वेळ बदलली, तरी देखील मिपाकर जमले.
फोटो आणि व्रुत्तांत लवकरच...
21 Dec 2013 - 8:31 pm | विश्वनाथ मेहेंदळे
Who's the takings the vrutants ??
21 Dec 2013 - 9:01 pm | स्पा
one n only vime kaka
23 Dec 2013 - 8:54 pm | ज्ञानव
वृत्तांत लवकर येऊ द्या...
24 Dec 2013 - 10:21 am | सुबोध खरे
24 Dec 2013 - 1:23 pm | सुबोध खरे
डावीकडून उजवीकडे -- विमे (काका), मुक्त विहारी आणि भाते
24 Dec 2013 - 10:22 am | सुबोध खरे
24 Dec 2013 - 10:23 am | सुबोध खरे
24 Dec 2013 - 1:24 pm | सुबोध खरे
डावीकडून उजवीकडे -- सुधांशु नुलकर, ईस्पिकचा एक्का आणि विलासराव
24 Dec 2013 - 10:24 am | सुबोध खरे
24 Dec 2013 - 1:26 pm | सुबोध खरे
डावीकडून उजवीकडे --मी, विमे, ज्ञानव सुधांशु नुलकर, ईस्पिकचा एक्का
24 Dec 2013 - 10:25 am | सुबोध खरे
24 Dec 2013 - 10:26 am | सुबोध खरे
24 Dec 2013 - 10:26 am | सुबोध खरे
24 Dec 2013 - 10:26 am | सुबोध खरे
24 Dec 2013 - 10:27 am | सुबोध खरे
24 Dec 2013 - 12:45 pm | ज्ञानव
लाल टी शर्ट आणि नाकावर ढापणी...(अन्य मिपाकरांनबरोबर...प्रतिसाद लेखक उजवीकडून पहिला)
24 Dec 2013 - 12:52 pm | प्रभाकर पेठकर
अरेच्चा! ओळखलंच नाही.
24 Dec 2013 - 10:28 am | सुबोध खरे
24 Dec 2013 - 10:28 am | सुबोध खरे
24 Dec 2013 - 1:27 pm | सुबोध खरे
डावीकडून उजवीकडे --मी,स्पा, विमे, मुक्त विहारी
24 Dec 2013 - 10:28 am | सुबोध खरे
24 Dec 2013 - 10:29 am | सुबोध खरे
24 Dec 2013 - 10:30 am | प्रभाकर पेठकर
ह्यात कोण कोण आणि कुठे कुठे (काय क्रमाने) बसले आहेत? हे लिहीले तर त्या सर्वांची ओळख होईल.
क्रमांक दोनच्या फक्त नाकाच्या छायाचित्राचे प्रयोजन कळले नाही.
24 Dec 2013 - 1:20 pm | सुबोध खरे
लोकाना ऑप्टीकल झूम आणि डिजिटल झूम मधील फरक दाखवताना काढलेला फोटो. नाक खुपसले तर ते कसे दिसू शकते याचा एक परिचय
24 Dec 2013 - 10:30 am | सुबोध खरे
24 Dec 2013 - 10:10 pm | विजुभाऊ
हे पुढे फुटबॉलच्या पेनल्टीकीक अडवायच्या पोजमधले थोडेसे सुदेश भोसलें सारखे दिसणार्या सदगृहस्थांचा परीचय द्या की
24 Dec 2013 - 11:29 pm | खटपट्या
अहो, उत्सवमूर्ती इस्पिकचा एक्का आहेत ते !!!
24 Dec 2013 - 10:31 am | सुबोध खरे
24 Dec 2013 - 10:35 am | प्रभाकर पेठकर
अरे व्वा! सपाटाच लावलाय की छायाचित्रांचा. (कांही छायाचित्र पुनर्प्रकाशित झाली आहेत.)
24 Dec 2013 - 1:21 pm | सुबोध खरे
साहेब फोटो चिकटविण्याचा पहिलाच प्रयत्न आहे त्यामुळे काही फोटो परत चिकटवले गेले असावेत माफ करा.
24 Dec 2013 - 11:10 am | प्रचेतस
असे नुसते फोटू नाय पायजे.
वृत्तांत पण पाहिजेच.
24 Dec 2013 - 12:23 pm | खटपट्या
फोटोतल्या मिपाकरांची ओळख करून द्या लवकर
24 Dec 2013 - 1:14 pm | सुबोध खरे
24 Dec 2013 - 4:52 pm | सुधांशुनूलकर
डावीकडून - सुधांशुनूलकर, विमे, विलासराव, किसन शिंदे, ज्ञानव, इस्पिक एक्का, भाते, मुक्त विहारी, स्पा.
डॉ. सुबोध खरे यांनी हा फोटो काढला आहे.
24 Dec 2013 - 1:15 pm | सुबोध खरे
24 Dec 2013 - 1:16 pm | जेपी
व्रुतांत ?????????????????????????????????????????????????????????????????
24 Dec 2013 - 1:17 pm | सुबोध खरे
25 Dec 2013 - 9:30 pm | प्यारे१
मुवि काका का लत्तात?
काय जालं?
तुमाला कोन दिस्शं का? गेत्तिंकल/ चीन्स आलेला का? ;)
26 Dec 2013 - 2:17 pm | सूड
>>मुवि काका का लत्तात?
छे, त्यांच्या डोळ्यात काहीतरी गेलं असेल. एरवी तुमच्याइतकं छान रडता येणारे का कोणाला प्यारेकाका, तुम्हीपण ना कम्माल करता !! ;)
24 Dec 2013 - 1:29 pm | सुबोध खरे
कोणीतरी(लेखक) आतातरी लेख/ वृत्तांत टाका की.
24 Dec 2013 - 3:10 pm | विश्वनाथ मेहेंदळे
Tonight... Was waiting for photos.
24 Dec 2013 - 1:32 pm | दिपक.कुवेत
स्पावडया (निळा चेक्सचा शर्ट), विमे (लाल टि शर्ट), मुवि (एक डोळा चोळतानाचे), एक्का तर माहितच आहेत, किसन शींदे (पिवळा टि शर्ट), सुबोधजी (ग्रे कलर शर्ट)....बाकिचे माहित नाय.
24 Dec 2013 - 2:02 pm | मस्त कलंदर
पुणे कट्ट्यांच्या तुलनेत स्त्री सदस्यांच्या उपस्थितीचे प्रमाण कमी दिसते.. नाही म्हणजे आमचा विमे म्हणतो तसे 'जाताजाता आपले निरिक्षण नोंदवले'
24 Dec 2013 - 2:27 pm | सूड
>>पुणे कट्ट्यांच्या तुलनेत स्त्री सदस्यांच्या उपस्थितीचे प्रमाण कमी दिसते..
अर्रर्र लैच!! पुणे कट्ट्याला स्त्रिया येतात हे कोणी सांगितलं बयो तुला?
24 Dec 2013 - 2:48 pm | बॅटमॅन
आता "मआंजावर ठरलेल्या कट्ट्यांना स्त्रियांची उपस्थिती कमी का असते?" असा पुनरेकवार धागा येऊदे ;)
(मक म्याम हल्के घेणे- न घेतल्यास अंमळ लोड इकडे पाठवून देणे)
24 Dec 2013 - 3:10 pm | मस्त कलंदर
अभ्यास वाढव रे सूड..
24 Dec 2013 - 4:16 pm | प्रभाकर पेठकर
आता 'अनाहिताचे' (असेच कांहीतरी नांव आहे नं?) 'महिला मंडळी' कट्टे सुरु होतील.
24 Dec 2013 - 5:44 pm | पिलीयन रायडर
होतील??? झाले सुद्धा!
24 Dec 2013 - 6:17 pm | सूड
हो, असतीलही!! तुमचा सगळा सोवळ्यातला कारभार आहे ना. :))
24 Dec 2013 - 6:28 pm | बॅटमॅन
सोवळ्यातला कार्भार>>>>> =)) अशक्य वारल्या गेले आहे =)) :yahoo: =))
24 Dec 2013 - 6:34 pm | पैसा
कट्टा करून वृत्तांत टाकला तर कोणीतरी येऊन सांगायचा, "ह्या:, हा काय कट्टा आहे? आम्ही कसे तेव्हा पिऊन रात्रभर पडत होतो!"
24 Dec 2013 - 6:36 pm | प्रचेतस
बस का?
आमच्या कट्ट्यात कधी असं झालेलं दिसलंय का? ;)
24 Dec 2013 - 6:38 pm | पैसा
तुम्ही ताक पिता. पडताय कसले?
24 Dec 2013 - 6:46 pm | प्रचेतस
छ्या. काही लोक भांडे लपवून ठेवतात उगा.
बाकी अनाहिताची ट्रिप वैग्रे निघते का नाय कधी?
24 Dec 2013 - 6:48 pm | बॅटमॅन
सहमत आहे. भांडेच लपविल्यावर कुठले ताक अन कुठली साय =))
24 Dec 2013 - 6:40 pm | बॅटमॅन
कमेंटींची इतकी भीती वाटते म्हणूनच सगळं सोवळ्याआड सुरूये तर =)) समजलं, चालूदे =))
26 Dec 2013 - 11:43 am | पिलीयन रायडर
कमेंटांची भिती माझं खेटर..
आणि स्वतंत्र विभाग काढण्यासाठी जेव्हा पुरूष लोक एका धाग्यावर बोंबा मारत होते तेव्हा तुम्हाला नक्की कुणाच्या कमेंटांची भिती वाटत होती?
26 Dec 2013 - 12:36 pm | बॅटमॅन
ते नाकावरच्या रागाच्या औषधाचं गाणं कुठलं हो =))
26 Dec 2013 - 1:18 pm | पिलीयन रायडर
"निघता विषय बालिकांचा.. पहा येई लगोलग कोण..
लागता विरोधी सुर स्त्रिद्वेष्ट्यांचा.. नाक खुपसे ब्याटम्यान"... हेच का?
26 Dec 2013 - 1:58 pm | बॅटमॅन
आम्ही स्त्रीद्वेष्टेविरोधी असल्याचे कबूल केल्याबद्दल धन्यवाद!
बाकी तो नाकावरचा शेंड्यावरील राग इथूनही दिसतोय बरे =))
26 Dec 2013 - 2:43 pm | विश्वनाथ मेहेंदळे
मतप्रदर्शन केले असते. पण उगाच संपादिकांची कामे का वाढवा, म्हणून थत्ते चाचा व्हायचे ठरवले आहे.
26 Dec 2013 - 2:48 pm | बॅटमॅन
असे व्हायचा प्रयत्न करतो आहे पण अजून वास्तव स्वीकारण्याइतका निगरगट्टपणा नै आलेला.
26 Dec 2013 - 12:54 pm | सुबोध खरे
पिरा ताई,
लोकांना कुणाच्या कॉमेंटची भीती वाटत नव्हती तर GOLF ( GENTLEMEN ONLY LADIES FORBIDDEN ) अशा प्रतिसादासाठी स्वतंत्र विभाग काढावा असे काथ्या कूट चालले होते. अजूनतरी आपली मिपा संस्कृती स्त्रियांसमोर सभ्य शब्दात बोलावे असे सांगते. आता तुम्ही फोडून सांगा म्हणताय म्हणून सांगितले.
26 Dec 2013 - 1:13 pm | पिलीयन रायडर
खरे काका..
तोच तर मुद्दा आहे ना.. भिती हे कारण नाहीये "अनाहिता" च्या निर्मिती मागे.. (आणि तसंही, मि.पा वरच्या बायका कमेंटस ना भितील??) जसं तुम्हाला तुमचे विषय आहेत, तसे आम्हाला आमचे.. आम्हालाही आमच्या असभ्य गप्पा मारायच्या असतील तर!?
सो तुम्हाला तुमचा विभाग हवा की नको आणि का हवा ह्यावर बायका चर्चा करणार नाहित (ह्या उलट अनाहिता बद्दल मात्र पुरूषांनी पण हिरीरीने चर्चा केल्या होत्या.. असो..).. पण तुमचा विभाग निघालाच तर त्या मागची कारणं आम्हाला नक्की माहीती असतील.. "घाबरले म्हणुन स्वतःचा विभाग काढला रे.." असले फालतु मुद्दे आम्ही काढणार नाही!
26 Dec 2013 - 1:58 pm | सुबोध खरे
पिरा ताई
अहो बैट मैन चे अजून लग्न झालेले नाही त्यामुळे त्याला बायकांच्या गप्पात कुतूहल असणारच. एकदा लग्न होउदे म्हणजे मग त्या काय गप्पा मारतात त्याबद्दल काहीच स्वारस्य राहणार नाही. बायकांचे आवडते विषय म्हणजे मुले, दागिने किंवा खरेदी आणि मोलकरीण. एकदा त्याला कळूदे मग पहा