<<<<<त्रैरंगात्मक त्रैमूर्ती: आणखी एक विचार>>>>

अभ्या..'s picture
अभ्या.. in जनातलं, मनातलं
18 Dec 2013 - 3:19 pm

सध्या चाललेल्या वैचारिक धुळवडीनिमित्त आणखी एका त्रिगुणात्मक तत्वाचा विचार करण्याचा मानस आहे. त्या अनुषंगानं
आधी तीन आरत्यांचा नि प्रतिसादांचा आढावा घेतला जावा ही विनंती.
रेड, ग्रीन आणि ब्ल्यू ह्या तिन्ही रंगाच्या अंशावताराची हि दुनिया. खरंतर रंग असतात का असा प्रश्न येतो पण पाहणार्यांना ईष्ट देवतेचं स्मरण करायची संधी मिळावी, त्याद्वारे भक्ती वाढीस लागावी हा हेतू.
rgb

रेड, ग्रीन आणि ब्ल्यू अर्थात आरजीबीची कथा :
म्याक्सवेल नामक तंत्रऋषींच्या दृष्टीची परिक्षा घेण्यास त्याआधीची सर्व छायाचित्रे कृष्णधवल रंगातच निर्मिलेली होती. जणू शापच होता तो. अगदी स्वामींचे छायाचित्र काढण्यास गेलेल्या एका छायाचित्रकाराला एका कृष्ण्धवल छायाचित्रामुळे दिडशे वर्षाने मराठी संस्थळावर मोक्ष प्राप्त होईल, कमीत कमी एखादी कंपनी स्थापन होऊन डुबुन पण जाईल असा उ:शाप मिळाला. म्याक्सवेलाने आपले सर्व तंत्रपातिव्रत्य पणाला लावून अर्थात तिन्ही उपपत्तींना पणाला लावून शेवटी आरजीबींना त्रिरंगातून बहुरंगी रुपात जगासमोर सादर केले.
कथेबाबत अनेक प्रकारे उहापोह होऊ शकतो. मनोरंजनाचं साधन नसलेल्या नि कंपूबाजीने पिचत पडलेल्या संस्थळावर
कथेकरी बुवा आपल्या कल्पनाविष्कारानं कथा अशा प्रकारे आरजीबीचाच वापर करुन टायपू शकतो ह्यात आश्चर्य नाही. रुपकं म्हणून वापरलेल्या गोष्टींना घट्ट परंपरांचं स्वरुप येऊन त्यात कर्मठपण कधी आलं ते सांगता येत नाही. सध्या फक्त एवढंच लक्षात घेऊ या की रंगाचं सामर्थ्य दाखवण्याबरोबर दृष्टीची निर्वासन (वासनारहित) अवस्था असेल, चतुरभ्रमणध्वनि वा संगणक वा दूरदर्शन पाहताना कुठलाही आडपडदाच काय तर यत्किंचित देखील झाकलेपणा नसला तर, आरजीबीची क्लॅरिटी असेल तर स्वतः भगवंतच काय तर हॉलिवूडातील रम्य तारकाही पडद्यावर येतात असा बोध ह्या कथेमधून
घेता येतो.
पूर्ण आरती :
त्रिगुणात्मक त्रैरंग स्क्रीन हा जाणा। त्रिरंगी अवतार त्रैलोक्य माना ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना॥ सुरवर नेटीजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्री आरजीबी । डेटा मोजता थकले हे जीबी ॥ धृ ॥

सबाह्य अभ्यंतरी तू एक रंग । अभाग्यासी कैची कळेल हा संग ॥
पराही परतली तेथे कैचा हेत । जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥
पडदा पेटोनिया स्टार्ट हा झाला । भावे साष्टांगेसी स्क्रीनटच केला ॥
प्रसन्न होऊनि ग्यालरी उघडिला । जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥
स्क्रीन स्क्रीन ऐसें लागले ध्यान । हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोळवण । सर्व रंगाची आरजीबी खाण ॥ ४ ॥

(पाठ नव्हतीच पण कंट्रोल ट्याब करुन पटकन मिळाली.
कॉपी करुन घेतली. आता सवयच झालीय )

आरजीबी शब्दाचा एक अर्थ '' रंगात घुसलेला भाव " असा आपण पाहिलेला आहेच. पुन्हा सांगावं असा हा विषय आहे.
रंगांबद्दल सांगण्याचं वैशिष्ट्य म्हणजे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज असते. कारण पाहिलेलं पटकन 'आत' पोचत नाही. कारण इतर गोष्टींनी मन 'व्यापलेलं' असतं. त्यासाठी डाउनलोड करुन सेव्ह्च करावं लागतं. असो.

ही संतश्रेष्ठ वाईकर महाराजांनी रचलेली आरती आहे. २१ वेळा उलटसुलट प्रतिसाद देऊन टीआर्पी वाढवणार्यास शांतपणे आपल्या वागण्याद्वारे सुधारणारे, प्लाझ्मा टीव्हीच्या काळात सीआर्टी वापरणारे समाज सुधारक, ग्यालक्सीचे शॉपिंग करुन
परतताना भिकार्याला आपला जुना बंदपडका सॅमसंग गुरु देऊन भूतदया करणारे असे वाईकर महाराज! स्वत:च्या उदाहरणातून शांतपणे समाजसेवा करता येते हे त्यांनी तेव्हाच दाखवून दिलेलं आहे. कार्यालयात एकाने चार्जर मागितल्यावर तेव्हा 'अरे सांभाळ, चायना ह्याण्डसेटास तो चालत नाही' म्हणून मिश्किलपणं त्याची जागा दाखवून देणारे, मराठी संस्थळाच्या माध्यमातून समाज प्रबोधन नि अवजड सिद्धांत सहज समजावून सांगणारे वाईकर महाराज. कार्यालयीन कामकाजात एक पै चा हिशेब सापडेना म्हणून रात्रभर जागून तो ग्यालक्सीच्याच केल्कुलेटरनामे अ‍ॅप वर शोधणारे व्यवहार दक्ष नि खाजगी कामासाठी सरकारी दूरध्वनी बंद करुन, स्वखर्चाच्या चतुर्भ्रमण्ध्वनी वापरणारे वाईकर महाराज. विस्मृतीत गेलेल्या ज्ञानाचे अँड्रॉइड अ‍ॅप तयार करुन पुन्हा प्रचार करणारे वाईकर महाराज जणू व्यवहार चतुरांच्या गळ्याभोवतीची ही कर्मठपणाने फासणारी मुळीच जणू सोडवतात. अशा सर्वार्थाने श्रेष्ठ वाईकर महाराजांनी रचलेली ही आरजीबीची आरती आहे.
मागे एका प्रतिसादात लिहील्याप्रमाणं आरजीबी तत्व सगळीकडं सारखंच. एकाच वस्तूला पडदा, स्क्रीन, डिस्प्ले म्हटल्याप्रमाणं कार्यानुसार नि कारणानुसार त्याचं नाम बदलतं. रंगनिर्मितीच्या अग्नितत्वाला रेड, पृथ्वीतत्वाला ग्रीन व आकाशतत्वाला ब्ल्यु असं नाव आहे. हीच त्रैमूर्ती.

.........................क्रमशः (प. पू. वाईकरांचा वॉट्स्पवर निषेध संदेश न आल्यास)...................................

विडंबनप्रकटन

प्रतिक्रिया

विटेकर's picture

18 Dec 2013 - 3:22 pm | विटेकर

वोक्के.. दखल घॅण्याजोगे..

यावेळी मी प ! प्रतिसाद द्यायला

सुहास..'s picture

18 Dec 2013 - 3:22 pm | सुहास..

निषेध ..

एका मनापासुन लिहिलेल्या लेखाचे असे हिण आणि हिडीस विडंबन केल्याने एक मिपाकर म्हणुन शरम वाटली ;)

वाश्या अभ्यंकर ;)

अभ्या..'s picture

18 Dec 2013 - 3:27 pm | अभ्या..

हिण आणि हिडीस ही पण आरजीबीचीच रुपे आहेत. ;)
धन्यवाद.
.
.
(वाश्या हे काय असते रे हिण आणी हिडीस? पॉश पॉश हॉटेलात वगैरे दिसते का? ;) )

सुहास..'s picture

18 Dec 2013 - 3:34 pm | सुहास..

अभ्या स कमी पडला रे ...

मिपावर गाजलेले वाक्य आहे ते ;)

बाकी हे आरजीबी काय आहे ( मला ही अभ्यास करावा लागतोय वाटते आता :( )

विटेकर's picture

18 Dec 2013 - 3:50 pm | विटेकर

निषेधाचा णिषेध..
दखल घेण्याजोगे .. हे वाक्य पुन्हा वाचावे.( आमच्या पुण्यात यालाच "छप्परफाड कौतुक" असे म्हणतात !!!!!)

प्यारे१'s picture

18 Dec 2013 - 3:25 pm | प्यारे१

चालू द्या!

- हळूच भलतीकडे पहाणारा प्यारे वाईकर ;)

स्वगतः हा अभ्या आपले रंग दाखवू लागलाय. लवकर दावणीला बांधायला हवा!

सस्नेह's picture

21 Dec 2013 - 11:14 pm | सस्नेह

वेसण घ्या वेसण !
तीपण नाssजुक आरजीबी कलरवाली !

सुहास..'s picture

18 Dec 2013 - 3:28 pm | सुहास..

पेर्‍या ..प्रत्येक वेळी विनम्र चांगला नसतो ;)

हळुच भजी पळविणारा ;)

संजय क्षीरसागर's picture

18 Dec 2013 - 3:37 pm | संजय क्षीरसागर

मस्त!

बॅटमॅन's picture

18 Dec 2013 - 3:45 pm | बॅटमॅन

अगागागागागा =)) :yahoo:

काय ती प्रतिभा अभ्याशेठ, दंडवत स्वीकारावा _/\_

(अभ्याम्हाराज सोलापुर्कर म्हाराजांचा मेन शेवेकरी) बट्टमण्ण.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Dec 2013 - 4:00 pm | अत्रुप्त आत्मा

++++++११११११
http://www.sherv.net/cm/emoticons/shit/laughing-poo-smiley-emoticon.gif
__/\__/\__/\__ =))

ब्याट्याप्पा (माफ़ करा समर्था )
जा. तुझ्या एकाशिन्गिची शिबिआर व्हैल.

ओहोहोहो धण्यवाद अभ्याम्हाराज, शीबीआर १००० अन सोबतच पेट्रोलचं बघा मंग जल्मोजल्मी ऋणी असेनच ;)

विटेकर's picture

18 Dec 2013 - 3:46 pm | विटेकर

अभ्या ..

धागा सार्थ झाला रे ! संक्षींचा प्रतिसाद आला !!!

हु तु तु तु तु तु...............

आता जुन्याच पैलावानांची कब्बडी आणे धोबी-पछाड नव्या म्याट्वर सुरु होणार !

बॅटमॅन's picture

18 Dec 2013 - 3:55 pm | बॅटमॅन

अगदी अगदी..

अभ्या विडंबन पाडणार | दिग्गजांचे प्रतिसाद येणार |
परिभाषेचे चर्वितचर्वण होणार | मज्जा येणार "निच्छित" ||

अत्रुप्त आत्मा's picture

18 Dec 2013 - 4:02 pm | अत्रुप्त आत्मा

या निमित्तानी मला...

मी आमच्या एका समव्यावसाईकावर केलेलं, तमात्मक ती मूर्ती दत्तू हा जाणा ह्ये इडंबन आटावलं! ;)

बॅटमॅन's picture

18 Dec 2013 - 4:05 pm | बॅटमॅन

टाका की मग, हाकानाका ;)

प्रचेतस's picture

18 Dec 2013 - 4:58 pm | प्रचेतस

अहो त्यांनी ते आता लपविले असेल. =))

लपविले असले तरी शेवटी भांडे फुटलेच, कांय समजलेंत ;)

जेपी's picture

18 Dec 2013 - 4:37 pm | जेपी

मस्त रे .

अत्यंत सुस्पष्ट.. अर्थपूर्ण... भावलं मनाला!!!!... अभ्या... कीप इट अप!!!..... || रंगेचिरंतन आरजीबी स्पष्ट ||

कहे वाईकर सुन भाई साधु, यह दुनिया बडी दिवानी..
जीन्स पहेनके जो तुने मारा ठुमका तो पडोसन की भाभी भवानी!!

बॅटमॅन's picture

18 Dec 2013 - 4:45 pm | बॅटमॅन

जीन्स पहेनके जो तुने मारा ठुमका तो पडोसन की भाभी भवानी!!

भवानी की दीवानी???

(वरचे वाक्य मराठीत आहे ;) )

बायका नाय का 'काय गं ए भवाने!!' म्हणतात. तशा अर्थाने भवानी!! ;)

बॅटमॅन's picture

18 Dec 2013 - 5:03 pm | बॅटमॅन

ओक्के पण हिंदीत तो इफेक्ट पोचत नै म्हणून म्हटलो, बाकी कळ्ळंच ;)

>>ओक्के पण हिंदीत तो इफेक्ट पोचत नै म्हणून म्हटलो

ह्म्म आमची भाषेवर कमांड नाय राव. तू त्याचं संस्कृत आणि प्राकृत व्हर्जन काढ बरं पटकन !! ;)

बॅटमॅन's picture

18 Dec 2013 - 5:14 pm | बॅटमॅन

कसली कमांड-............(यमकहरामी जिल्बी सुचली होती पण र्‍हाऊदे =)) )

प्यारे१'s picture

18 Dec 2013 - 5:05 pm | प्यारे१

हा. आता जमलं. ;)

सूड's picture

18 Dec 2013 - 5:08 pm | सूड

रंगकाम उदंड ची सिकला | कलर कॉम्बिनेशन मान चुकतचि गेला | अन मग तया चित्राला | नाक पुसे ||

;)

रंगकाम उदंड सिकला। कलर कॉम्बिनेशन चुकतचि गेला। अन मग तया चित्राला। नाक पुसे ॥

प्यारे१'s picture

18 Dec 2013 - 5:15 pm | प्यारे१

खिक्कुशा!

प्रचेतस's picture

18 Dec 2013 - 4:57 pm | प्रचेतस

अरारारारा, काय रे हे अभ्या =))

यसवायजी's picture

18 Dec 2013 - 5:19 pm | यसवायजी

भारी रंगवलयस रं अभ्या..
:D

मी_आहे_ना's picture

18 Dec 2013 - 5:30 pm | मी_आहे_ना

"म्याक्सवेल नामक तंत्रऋषींच्या दृष्टीची परिक्षा घेण्यास त्याआधीची सर्व छायाचित्रे कृष्णधवल रंगातच निर्मिलेली होती. जणू शापच होता तो. अगदी स्वामींचे छायाचित्र काढण्यास गेलेल्या एका छायाचित्रकाराला एका कृष्ण्धवल छायाचित्रामुळे दिडशे वर्षाने मराठी संस्थळावर मोक्ष प्राप्त होईल, कमीत कमी एखादी कंपनी स्थापन होऊन डुबुन पण जाईल असा उ:शाप मिळाला. म्याक्सवेलाने आपले सर्व तंत्रपातिव्रत्य पणाला लावून अर्थात तिन्ही उपपत्तींना पणाला लावून शेवटी आरजीबींना त्रिरंगातून बहुरंगी रुपात जगासमोर सादर केले."
- आणि काय अर्थ काढतात
"आरजीबीची क्लॅरिटी असेल तर स्वतः भगवंतच काय तर हॉलिवूडातील रम्य तारकाही पडद्यावर येतात असा बोध ह्या कथेमधून घेता येतो"
- इतक्या भावपूर्ण विडंबनाच्या समर्थनासाठी तारकांनाही पडद्यावर रंगवणं, कसला भारी विनोद!

ह.घ्या. हेवेसांनल. :)

मी_आहे_ना's picture

18 Dec 2013 - 5:32 pm | मी_आहे_ना

"म्याक्सवेल नामक तंत्रऋषींच्या दृष्टीची परिक्षा घेण्यास त्याआधीची सर्व छायाचित्रे कृष्णधवल रंगातच निर्मिलेली होती. जणू शापच होता तो. अगदी स्वामींचे छायाचित्र काढण्यास गेलेल्या एका छायाचित्रकाराला एका कृष्ण्धवल छायाचित्रामुळे दिडशे वर्षाने मराठी संस्थळावर मोक्ष प्राप्त होईल, कमीत कमी एखादी कंपनी स्थापन होऊन डुबुन पण जाईल असा उ:शाप मिळाला. म्याक्सवेलाने आपले सर्व तंत्रपातिव्रत्य पणाला लावून अर्थात तिन्ही उपपत्तींना पणाला लावून शेवटी आरजीबींना त्रिरंगातून बहुरंगी रुपात जगासमोर सादर केले."
- आणि काय अर्थ काढतात
"आरजीबीची क्लॅरिटी असेल तर स्वतः भगवंतच काय तर हॉलिवूडातील रम्य तारकाही पडद्यावर येतात असा बोध ह्या कथेमधून घेता येतो"
- इतक्या भावपूर्ण विडंबनाच्या समर्थनासाठी पांढर्‍या तारकांनाही पडद्यावर रंगवणं, कसला भारी विनोद!

ह.घ्या. हेवेसांनल. :)

स्पा's picture

18 Dec 2013 - 5:38 pm | स्पा

सही रे

या अभ्याला नाय उद्योग! काय क्लॅरिटी अन हॉलिवुड तारका काय बाळबोध लिवलंय! आँ? हा बघतो त्याची चेष्टा करतो. अशाने पुढच्या पिढीला काय शिकवण देणार तुम्ही?

बॅटमॅन's picture

18 Dec 2013 - 5:56 pm | बॅटमॅन

हे आले मागल्या पिढीचे दुढ्ढाचार्य!!! तुमच्या वेळी कसं होतं अन तुम्ही काय शिकवण दिली ते तरी साङ्गा म्हणतो मी ;) =))

या शिकवणीत सांडगा कुठून आला आणि !!

असो. बरेच दिवस सांडग्यांची भाजी खाल्ली नाहीये त्याची आठवण झाली.

वशाडी येवो या सुडक्यावर =)) त्या साण्डग्याबरोबर तुलाही तळ्ळा पायजे तेव्हा कळेल =))

पैसा's picture

18 Dec 2013 - 6:05 pm | पैसा

जर हा व्यक्तिगत प्रश्न असता तर माझ्या हरकतीला विचारतो कोण? असे विचार जनमानसावर दूरगामी परिणाम करतात. कांट यू सी धीस? ही भंपक स्टोरी किती युगं चाललीये? ही निरर्थक गुंगी किती लोकांना भ्रमात घेऊन गेलीये. इट इज अ शिअर वेस्ट ऑफ ह्युमन लाईफ, पब्लिक वेल्थ अँड टाईम.

तू प्रतिसाद शांतपणे वाचलास तर लक्षात येईल की द डॅमेज इज नॉट अ‍ॅज ग्रॉस अ‍ॅज अ पर्सनल अ‍ॅसॉल्ट. इट इज वेरी सटल अँड डिपली पॉयझनस फॉर द जनरेशन्स टू कम अँड फॉर द नेशन अ‍ॅज अ होल.

बॅटमॅन's picture

18 Dec 2013 - 6:15 pm | बॅटमॅन

पैसा आयडी हॅक झालेला आहे. तोही दिव्यदृष्टीवाल्या धृतराष्ट्राकडून =))

पैसा's picture

18 Dec 2013 - 6:26 pm | पैसा

तुम्ही फक्त मुद्द्याला धरून लिहायला शिकलात तरी बस झालं.

बॅटमॅन's picture

18 Dec 2013 - 6:40 pm | बॅटमॅन

मुद्दा नक्की काय ते वर सांगितलंच आहे तरी कळेना सासुबैंना ;) =))

त्या फक्त डु आयडींच्याच सासुबै आहेत रे मेल्या!! आपण असं वागलं तर डुआयडी आणि आपल्यात फरक तो काय?? ;)

अरे पण आता त्यांचं ते अजून एक नाव फिक्स झालंय म्हणून म्हटलो ;) पाशवी शक्ती हे नाव कसे फेमस झाले तस्सेच =))

पैसा's picture

18 Dec 2013 - 7:12 pm | पैसा

बडगा नहीं देखा!

हात्तेरेकी, मला वाटलं अजून खंग्री रिप्लै द्याल =)) पण असो.

पैसा's picture

18 Dec 2013 - 7:19 pm | पैसा

पण सध्या सौजन्य-संवत्सर सुरू आहे.

ओक्के, एणीवे बेटर लक नेक्ष्ट टैम!

सूड's picture

18 Dec 2013 - 7:29 pm | सूड

>>सौजन्य-संवत्सर

हायला!! तुमचं पण ??

पैसा's picture

18 Dec 2013 - 7:56 pm | पैसा

अधून मधून असल्या वस्तू पाळलेल्या बर्‍या असतात!

सस्नेह's picture

21 Dec 2013 - 11:22 pm | सस्नेह

'संवत्सर' नव्हे ओ ते !
'सकल सौजन्यवती' पाशवी शक्ती असं म्हनाच्चं !

पैसा's picture

21 Dec 2013 - 11:24 pm | पैसा

मस्त शब्द आहे!

हायला! पैतै काय भारी बोल्ते!

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Dec 2013 - 6:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

याला मात्र +१००

पैसा's picture

18 Dec 2013 - 6:36 pm | पैसा

((आमान्ला विंग्रजी कुठलं याला हो?))

यशोधरा's picture

18 Dec 2013 - 6:43 pm | यशोधरा

आत्ता! आन मंग त्ये वर काय बोल्ला हाय त्ये? यास्स्स फ्यास? त्ये त्येच हाय न्हवं?

पैसा's picture

18 Dec 2013 - 6:45 pm | पैसा

चोप्य पस्ते!

यशोधरा's picture

18 Dec 2013 - 6:50 pm | यशोधरा

वक्के वक्के!!

मूळ धागाकर्त्यानं लिहीलं तर फाऊल नाही ना धरत?

- फक्त प्रतिसादासाठी एक खरा ड्यु आयडी घेण्याच्या सीरियस विचारात ;) प्यारे

अभ्या..'s picture

20 Dec 2013 - 12:44 am | अभ्या..

भंपक स्टोरी????
आरजीबी अर्थात हे रेड ग्रीन आणि ब्ल्यू या तीन प्राथमिक रंगावर आधारलेले मॉड्युल आहे. हे प्रकाशावर आधारित असते. या तीन रंगाच्या मिश्रणातून तयार होणार्‍या सर्व रंगछटा हे प्रकाशनिर्मित चित्रांचे मूलतत्व असते. सुरुवातीला हे कॅथोड रे ट्युब (सीआर्टी) वापरुन निर्मिले जात. सध्याच्या सर्व प्रकारच्या स्क्रीन्स (मोबाईल, टीव्ही, मोनिटर्स) व फोटोग्राफीत हेच मॉड्युल वापरले जाते. फक्त रासायनिक प्रीटिंगमध्ये सीएमवायके हे वेगळे वापरले जाते. अगदी मिपावर इथे दिसणारे सर्व चित्रे फोटो मजकूर हा आरजीबी मध्येच असतो.
तीन रंगाच्या वेगेवेगळ्या मिश्रणातून आपल्या डोळ्याला दिसते तसे सजीव चित्र हे मॉड्युल उभे करु शकते. तीनहि रंगाचा पूर्ण अभाव म्हणजे ठार काळा रंग व तीन्ही रंग पूर्ण क्षमतेने असल्यास लक्ख पांढरा प्रकाश असतो.
.

कवितानागेश's picture

18 Dec 2013 - 11:24 pm | कवितानागेश

(( रंगाने रंगाला रंगाबाहेरुन रंगासारखं फासून टाकणार्‍यांना तर अजुन ते काळेपांढरे आहेत हेच कळलं नाहिए. सबब, ग्यालेक्षीच्या पडद्यापासुन ते सध्यातरी फार लांब आहेत. हिब्रूत त्यांना काय म्हणतात माहित नाहित... इंग्रजीत त्यांना एक विशिष्ट शब्द आहे आणि त्यावर काहि दिवसांपूर्वी मन्याने एक उत्तम धागा काढला होता.))

(स्वगतः म्हन्जे काय कुणास ठाउक?)

मुख्य प्रतिसादः अभ्या, भारी लिवलंय. :)

संतश्रेष्ठ वाईकर महाराज की जय!

वाईकर महाराजांना श्रेष्ठ म्हणालात? कळफलकाच्या कळा तुटल्या कशा नाहीत म्हणतो मी !!

विटेकर's picture

19 Dec 2013 - 2:35 pm | विटेकर

आपुन तर बाबा वाईकर बुवांच्या रसाळ प्रवचनावर तुडुंब खूष आहोत ...

मिष्टर बट्ट्मन, व्हाय आर यू हिटिंग फ्रोम नॉन स्ट्रायकिंग एन्ड ? इन लारजर इंण्ट्रेस्ट ऑफ द सोसायटी थिस इज नॉट अलाउड. आइ मीन ग्रेटर गुड ओफ ग्रेटर नंबर ओफ पीपल !
( लै विंम्ग्रजी शब्द झाले काय ? पण " बेशर्त" हा प्रतिसाद माझाच हाय )
अन अजून एक सांगून ठिव्तो .. आमच्या पैसातैला काय म्हंजे काय सुदीक बोलयचं न्हाय! ( ते संपादक अस्तय .. कवा आय डी उडवलं..एक घाव....)

बॅटमॅन's picture

19 Dec 2013 - 2:40 pm | बॅटमॅन

अन अजून एक सांगून ठिव्तो .. आमच्या पैसातैला काय म्हंजे काय सुदीक बोलयचं न्हाय! ( ते संपादक अस्तय .. कवा आय डी उडवलं..एक घाव....)

आता तुमी तेंच्या मागं असल्यावं आमी पामर ऐडी काय बोलनार म्हना? पण वाटेल तेव्हा ऐडी उडवाय ते काय हुकूम्शा हैत ;)

म्हैस's picture

19 Dec 2013 - 3:02 pm | म्हैस

सुहास..
च्या मताशी सहमत अहे. मी प वर लिहिलेल्या लेखांच , कवितांचं विडंबन करण्याची हि विकृती ताबडतोब बंद करवि. मी प संपादकांनी ह्याच्यात लक्ष घालावे . आणि जे ह्या मताशी सहमत असतील त्यांनी संपादकांना व्य नि करून हि गोष्ट नजरेस आणून द्यवि. मी पण व्य नि करणार आहे

म्हशीला मजाक/उपरोध न कळावा अशी भगवंताने व्यवस्था केली असेच वाटतेय. अभ्यास वाढव गं म्हशे!

विटेकर's picture

19 Dec 2013 - 3:42 pm | विटेकर

कॉलिंन्ग मनेका गांधी ..( हायत ना अजून ?) इथे प्राण्यांच्याबद्दल तिरस्कृतीजन्य लेखन केले जात आहे.
संपादक मंड्ळाचे इकडे लक्ष आहे का ?

केसरी गुहेसमीप मत्त हत्ती मारला ! मत्त हत्ती मारला !!

इथे हत्तींवर मत्त असल्याचा आरोप करून त्यांना मारण्याची भलावण केली जात आहे, तरी संपादकांनी इकडे लक्ष द्यावे ;)

कवितानागेश's picture

19 Dec 2013 - 4:00 pm | कवितानागेश

कॉय्य ज्जॉल्ले? ;)

अभ्या..'s picture

19 Dec 2013 - 4:04 pm | अभ्या..

मौतैइ मौतैइ
धन्याला बोलवा की.
त्याला म्हैते प्रोसीजर :-D

प्यारे१'s picture

19 Dec 2013 - 4:07 pm | प्यारे१

लावा लावा.....

भांडणं लावा!

अभ्या..'s picture

19 Dec 2013 - 4:14 pm | अभ्या..

प्यारे.
म्हशिसाठी भाण्डण नसते लावायचे :)

अत्रुप्त आत्मा's picture

20 Dec 2013 - 12:54 am | अत्रुप्त आत्मा

@भाण्डण नसते लावायचे>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-016.gif

सूड's picture

19 Dec 2013 - 4:27 pm | सूड

>>धन्याला बोलवा की.
त्याला म्हैते प्रोसीजर

=)))) *ROFL*

बॅटमॅन's picture

19 Dec 2013 - 4:07 pm | बॅटमॅन

बाळ रडत होतं.

अभ्या..'s picture

19 Dec 2013 - 3:11 pm | अभ्या..

मी पण सहमत आहे.
कुणाला आणि काय करू व्यनी?
काय लिहू त्यात ?

सतिश गावडे's picture

17 Sep 2016 - 8:44 am | सतिश गावडे

ही आरती लिहीणारे संतश्रेष्ठ वाईकर महाराज कुठे असतात सध्या? ते श्वानरुपाने पुन्हा एकदा भूतलावर अवतरले आहेत अशी वदंता आहे ती खरी आहे का?

नीलमोहर's picture

17 Sep 2016 - 11:05 am | नीलमोहर

ये सब हो क्या रहा है,
अँड हूज द वाईकर द महाराज बायदवे ?