माझ्या वाचनात एक अनुदिनि आली की जिने फक्त ब्राह्मण ह्या जाती विरुद्ध लिहण्याचा जणु विडा उचलला आहे. या अनुदिनीने मला अजुन एक दैनिक "मुलनिवासी नायक" जे औरंगाबाद येथुन प्रसिद्ध होते या वृत्तपत्राचे एक पान डकवले ज्यात असे लिहले होते की , साईबाबा नेमके कोण होते, त्याच बरोबर श्री गजानन महाराज आणि अक्क्लकोट स्वामी महाराजाविषयी आक्षेपार्ह लिखाण केलेले आढळले त्या पानास
इथे डकवले आहे.
या पत्रा द्वारे ते म्हाणतात की १८५७ साली जे बंड झाले पण ते पुढे फसले. त्या बंडात सहभागी असलेले तात्यासाहेब टोपे, आणि नानासाहेब पेशवे हे भगवे वेष परिधान करुन भुमिगत झाले (इंग्राजांपासुन दुर पळण्याण्यासाठी) आणि त्यातील तात्या टोपे हे श्री गजानन महाराज म्हणून तर नानासाहेब पेशवे हे शिर्डीचे साईबाबा म्हणून प्रकटले असे म्हटले आहे. तर अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दुसरे कोणी नसून पानिपतच्या युद्धभुमी वरुन पळालेले सदाशिवराव भावु आहेत असा शोध लावाला आहे.
तर वर उल्लेखलेल्या अनुदिनीचा पत्ता अनिता पाटिल.ब्लोगस्पॉट असा आहे.
सदर अनुदिनीमध्ये सवर्णद्वेष सहज पणे दिसुन येतो. खालील काही लेखाचे फक्त शिर्षक मी उदाहरणे
देत आहे.
१). शिवरायांचा अवसानघात करणारा 'कु'मंत्री मोरोपंत
२). रामदास संत नव्हे; तर स्वराज्यातील जंत होता
३). शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
४). शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे
५). एका लेखातील हा उल्लेख "औरंगजेबाने राजांना धर्मांतराचा आग्रह धरला
नव्हता व संभाजीराजांनी धर्मांतरासाठी मुलीची मागणी केली नव्हती. राजांची हत्या झाल्यानंतर
ब्राह्मणांनी आनंदोत्सव म्हणुन गुढीपाडवा सुरु केला." ( हसायला येते).
६). शेफारलेले बाळे आणि बाळ्या ( इथे सचिन, माधुरी, आणि मंगेशकरांचा दद्वेष)
७). हिंदू नावाचा कोणताही धर्मच अस्तित्वात नाही!
८). या पहा पु ल देशपांडेच्या अश्लील कोट्या
९). ब्राह्मणांच्या अश्लिल शिव्या
१०). सनी लिओनला भारतरत्न का नाही? Why Bharat Ratna Not Been Conferred On Sunny Leone
(हसून हसून पुरी वाट :-))) )
११). अटल अटल, बोलत सुटल (वाजपेयीं विषयी द्वेष)
१२). लोकमान्य नव्हे भटमान्य
११). प्लँचेटसाठी सावरकरांनाच आवाहन का? सावरकर : फाळणीचे गुन्हेगार
ही अनुदिनी संपूर्णपणे ब्राह्मणद्वेषी लिखाण करण्यास वाहलेली आहे.
माझी आपल्या मी.पा.वरिल श्री. जयंत कुलकर्णी , श्री. इन्द्रजित पवार या इतिहासप्रेमी सदस्यांना विनंती आहे की त्यांनी यावर काही प्रकाश टाकावा.
धन्यवाद
प्रतिक्रिया
16 Dec 2013 - 1:59 pm | पिलीयन रायडर
आता हे लिहील्यावर पुढे ब्लॉगचा नाव पत्ता नसता लिहीलात तरी चालले असते..
सोडा हो.. चर्चेच्याही लायकीचा नाहीये हा ब्लॉग..
17 Dec 2013 - 5:26 pm | जेपी
कश्याला असल्या ब्लॉग वर जाता आणी इथे चर्चा करता . त्या पेक्षा हिथ हाटीलात येऊन मस्त मिसळपाव चापायची .
16 Dec 2013 - 2:18 pm | अनुप ढेरे
या असल्या ब्रिगेडी ब्लॉग्स आणि सायटींच अस्तित्व बहुतांश लोकांना माहीत असतं आणि त्यात काय प्रकारचं लिहिलं जातं हे पण ! तुम्ही त्यांच्या लिंक्स असलेले धागे काढून त्यांचा प्रसार करत आहात.
you are playing into their hands.
16 Dec 2013 - 2:22 pm | शैलेन्द्र
काय काका तुम्ही, जसं अरबट चरबट खाल्लं की पोट बिघडत, तसचं, अरबट चरबट वाचलं की मन बिघडतं
24 Dec 2013 - 2:31 am | रुस्तम
सहमत...
16 Dec 2013 - 2:23 pm | बॅटमॅन
बरं त्यानं हे तिघे संत नैत म्हटलं. त्यानं का या तिघांच्या रेप्युटेशनमध्ये काही फरक पडणारे का? अलीकडे तशा प्रकारच्या दैनिकांतून फक्त आणि फक्त एक नपुंसक जळजळ दिसते, दुसरे काही नाही. तस्मात तशी दैनिके वाचून एञ्जॉय करावयास शिकलो आहे.
16 Dec 2013 - 2:29 pm | प्यारे१
+११११
अगदी अगदी!
16 Dec 2013 - 3:02 pm | अनिरुद्ध प
+११११ सहमत्,पण मी तरी अश्या अनुदिनी वाचण्याचे सहसा टाळतोच.
19 Dec 2013 - 2:43 pm | मालोजीराव
बायदवे…अनिता पाटील नावाची व्यक्ती अस्तित्वात नाहीये…तो ब्लॉग दुसरंच कोणीतरी लिहितं…'पाटील' आडनाव लावून त्याला वेगळं काहीतरी साध्य करायचं असावं
16 Dec 2013 - 3:50 pm | कवितानागेश
जुनी बातमी आहे. अनिता पाटिल (कु)प्रशिद्ध आहेत आंतरजालावर.
जाउद्या हो.
दुसरं काहीतरी वाचा. :)
16 Dec 2013 - 4:32 pm | नीलकांत
महाराष्ट्र हा अनेक विचारधारांचा प्रांत आहे. येथे अनेक विचारधारांनी जन्म घेतला आहे. आणि महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या पार्श्वभूमीवर त्या त्या विचारधारा रूजल्यासुध्दा आहेत. अश्या विचारधारांचे लोक आपापला लोकसंख्येचा पाया वाढवण्यासाठी त्यांच्या मते जी मते योग्य आहेत ती मते, मुल्ये समाजात रूजवण्यासाठी शक्य त्या मार्गाने प्रबोधन, बौध्दीक वगैरे करीत असतात.
त्यापैकी शिबीरं घेणे, दैनिक, साप्ताहिक, पाक्षी़क, मासीक काढणे, आदी मार्गांचा अवलंब केला जातो.
ज्या विचारधारांना तार्कीक अर्थ असतो किंवा खर्या अर्थाने पुरोगामी (महाराष्ट्रातील सध्याच्या अर्थाने नव्हे) आहेत त्यांचे लेखन बर्यापैकी सहनीय आणि विचारांना चालना देणारे असते. मात्र खुपदा अनेक विचारधारा मानवी इगोच्या संमीश्रणाने टोकाला जाताना दिसतात.
अश्यावेळी त्यात दिलेले लेख किंवा विचार हे 'आधी निष्कर्ष ठरवून मग संशोधन केले' अश्या पठडीतील असतात. ज्यांना ह्या विचारधारा आवडतात त्यांच्यासाठी हे लेख म्हणजे अनमोल ठेवा असतात आणी ज्यांच्या विरोधात असतात त्यांना असे लेख म्हणजे डोक्यात जाणारे असतात. त्रयस्थमानसाला सुध्दा असे आधीच ठरवून केलेले संशोधन अपील करीत नाही, त्यामुळे ते त्या लेखनाला किंमत देत नाहीत.
गंमत येथे असते की जे त्या विचारधारेचे असतात त्यांना असं वाटतं की हे... हे... एवढे धडधडीत सुर्यप्रकाशासारखे सत्य लिहीले असूनसुध्दा सामान्य मानुस पेटून का उठत नाही? बुर्झ्वा कुठले !
आणि ज्यांच्या विरोधात ते लेखन असते ते त्यांच्या डोक्यात तिडीक जाऊन प्रश्न विचारतात की , हा, असला डबक्यातील कचरा ज्याने संशोधन म्हणून लिहीला आहे त्याला कवडीचा तरी आधार आहे का? सामान्य मानसाला याची जरासुद्धा चीड येत नाही का? आमची मानसीकताच गुलाम आहे...!
वरील लेखाच्या संदर्भातील ब्लॉग बघावासुध्दा वाटला नाही. कारण हे मूलनिवासींचे ब्लॉग, सनातनचे वृत्तपत्र, आजच्या पुरोगाम्यांची धर्मनिरपेक्षता, मार्क्सवाद्यांचे आर्थीक आकलन, माओवाद्यांचे शेतकरी आदीवासींवरचे अन्याय, यात अन्य काही नावे घेता येतील. हे सर्व मला एक सारखेच आहेत.
झोपेचे सोंग घेतलेल्या लोकांवर शक्ती खर्च करून काही अर्थ नाही.
- नीलकांत
16 Dec 2013 - 5:30 pm | प्रमोद देर्देकर
खरंय नीलाकांतजी ,
आपल्या प्रतिसादाने आम्ही आपला पंखा झालो आहे.साष्टांग दंडवत.
धन्स
16 Dec 2013 - 6:29 pm | प्रसाद१९७१
हे विधान कुठल्या आधारावर आहे हे माहीती नाही. जी काही वैचारीक मोकळीक आणि सामाजिक जाणिव महाराश्ट्रात होती ती इंग्रजांच्या काळात.
महाराष्ट्र कीती जातीयवादी आहे ते १९४८ च्या गाधी खुनाच्या वेळेला दाखवुन दिलेच आहे. महाराष्टाचे एक दिवंगत ( ६०,७०,८० )आणि एक जीवंत जाणते राजे कीती जातीपातीच्या राजकारणात मग्न आहेत हे ही पाहीले आहे.
उगाचच स्वताची पाठ थोपटून घेउ नका. इथे पुरोगामी हा शब्द ब्राह्मणद्वेशा चा प्रतिशब्द आहे.
16 Dec 2013 - 6:47 pm | सुहास..
कारण हे मूलनिवासींचे ब्लॉग, सनातनचे वृत्तपत्र, आजच्या पुरोगाम्यांची धर्मनिरपेक्षता, मार्क्सवाद्यांचे आर्थीक आकलन, माओवाद्यांचे शेतकरी आदीवासींवरचे अन्याय, यात अन्य काही नावे घेता येतील. हे सर्व मला एक सारखेच आहेत. >>>
+१००००००
मला सुध्दा ...
16 Dec 2013 - 8:39 pm | नीलकांत
मी विचारधारा असा उल्लेख केलाय. महाराष्ट्रात अनेक विचारधारा जन्मल्या व रूजल्या. नवीन विचार रूजवण्यात महाराष्ट्र अन्य भारताच्या तुलनेत अग्रेसर आहे असं मला वाटतं. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे वैचारीक मोकळीक इंग्रज राजवटीत जास्त होती हे खरं आहे. यावर मला तरी असं वाटतं की त्यावेळी प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधि़कार सरकारकडून अन्बायस्ड दिल्या जात असावा. मात्र अशी मोकळीक आज नसेल असं गृहीत धरूया तरीही महाराष्ट्रात नव्या विचारधारा जन्माला येत आहेतच की ! स्वातंत्र्याआधी प्रबोधनात्मक, सत्यशोधक, क्रांतीवादी, समाजवादी, नेमस्त अश्या अनेक विचारधारा महाराष्ट्रात एकतर रूजल्या किंवा भारतीय मातीच्या आविष्कारात घडल्या.
स्वातंत्र्यानंतरही संयुक्त महाराष्ट्रवाद, मराठीवाद, दलीत चेतना, हिंदूत्वाचे राजकारण, धार्मीक ध्रुवीकरण, जमीनीचे समान वाटप, सर्वोदयी, समता सैनीक, सनातन, मराठा महासंघ, शिवधर्म, विद्रोही चळवळ अश्या एक ना अनेक विचारधारा महाराष्ट्रात तयार झाल्या आहेत. त्या आपल्याला आवडोत अथवा ना आवडो त्या विचारधारा आहेत. ह्या आकलनच्या आधारावर मी वरील विधान केले.
जातीपातीच्या राजकारणाचा विचार केला तर खूप लिहीता येईल. सध्याच्या तुम्ही उल्लेखलेल्या आणि तुमचा रोख असलेल्या प्रकाराकडे तिसरा व्यक्ती होऊन मी जेव्हा बघतो तेव्हा हा प्रकार ज्याच्या हाती ससाण तो पारधी असा आहे असं मला वाटतं. आधी ज्यांच्या हातात सत्ता होती तेव्हा त्यांनी जे प्रकार केले आता त्यांच्या विरूध्द तसेच प्रकार होत आहेत, उद्या कदाचित परिस्थिती बदलली आणि सत्तेचे पारडे बदलले तरी असाच प्रकार होईल असे वाटते.
पुरोगामी हा शब्द ब्राम्हणद्वेशाचा प्रतिशब्द आहे असं किमान माझं तरी मत नाहीये. मी पुरोगामी हा शब्द सुधारणावादी अश्याच अर्थाने वापरतो आणि भविष्यात वापरेन.
- नीलकांत
17 Dec 2013 - 9:45 am | फारएन्ड
नीलकांत - या आपल्या पोस्ट मधल्या विचारांबद्दल काहीच वाद नाही. मात्र पुरोगामी हा शब्द गेल्य काही वर्षात खूप वाढत्या प्रमाणात ब्राह्मणविरोधी अशा अर्थाने वापरला गेलेला आहे.
अगदी ढळढळीत उदाहरण म्हणजे २००९ च्या मराठी साहित्य संमेलनातील कौतिकराव ठाले पाटील यांचे अध्यक्षीय भाषण. या पेक्षा आणखी "अधिकृत" उदाहरण शोधून सापडणार नाही. त्यात त्यांनी ब्राह्मण साहित्यिक म्हणजे "पारंपारिक मानसिकता" व अ-ब्राह्मण म्हणजे पुरोगामी अशी सोपी वाटणी केली होती.
येथे भाषण मिळेल ऐकायला
http://www.maayboli.com/node/7802
17 Dec 2013 - 1:01 pm | नीलकांत
पुरोगामी आणी प्रतिगामी याशब्दांत आपण किमान सन १८९९ पासून (वेदोक्त) अडकलो आहोत असं वाटतं. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे सध्या पुरोगामी म्हणजे ब्राम्हणेतर किंवा ब्राम्हणविरोधी असा रंग या शब्दाला येतोय हे मला पटतंय. मात्र केवळ कौतीकराव म्हणतात म्हणून नव्हे तर मी एकंदरीतच महाराष्ट्राचा सामाजीक इतिहास वाचत असताना. वेदोक्त प्रकरणांनंतर महाराष्ट्राच्या समाजाची जी विभागणी करण्याचा प्रयत्न झाला. त्यात त्यावेळी आपल्या उच्चवर्णाच्या अहं मध्ये अडकलेल्या ब्राम्हण वर्गाला एकटं पाडण्यासाठी व एकून सर्व समाज ब्राम्हणेतर या शब्दासोबत उभे करण्याचा प्रयत्न झाला.
पुढे हा शब्द सुध्दा नकारात्मक किंवा विरोधीपक्षाला महत्वदेणारा म्हणून त्याजागी पुरोगामी शब्द वापरायला सुरूवात झाली.
मात्र केवल पुरोगामी म्हटल्याने कुणी पुरोगामी होत नाही. त्यासाठी आपली वैचारीक बैठक बदलायला हवी ना? ती तशी होताना दिसत नाही. वर सध्याच्या जाणत्या राजाचं उदाहरण आहे. सर्वांना तो रोख कुणाकडे आहे हे स्पष्ट आहे असं मी गृहीत धरतो, अशी व्यक्ती जी जातीपातीचंच राजकारण करते किंवा अत्यंतीक द्वेशाचं राजकारण करते अश्या लोकांना तुम्ही आम्ही, केवळ ते म्हणतात म्हणून पुरोगामी म्हणायचं का?
मी बर्यापैकी सुधारणावादी आहे पण साधना किंवा अनिस ज्या प्रमाणात पुरोगामी आहेत त्यांची मते मला झेपत नाहीत. त्यांच्यात, अनेक लोक जन्माने ब्राम्हणसुध्दा आहेत. त्यांना पुरोगामी म्हणू नये?
मला तुमचं मत पटतंय की सध्या या शब्दाचा अर्थ आणि संदर्भ बदललाय. यापुढे मी काळजी घेईन. पण तरी सुध्दा किमान मी हा शब्द कुठे वापरला तर त्याचा अर्थ व संदर्भ हा असा घेऊ नये ही विनंती.
- नीलकांत
17 Dec 2013 - 1:13 pm | फारएन्ड
मी फक्त काही लोक तो तसा वापरतायत हे दाखवत होतो. तुम्ही ज्या संदर्भात वापरलाय त्याबद्दल काहीच वाद नाही.
17 Dec 2013 - 4:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>>> पुरोगामी हा शब्द गेल्य काही वर्षात खूप वाढत्या प्रमाणात
ब्राह्मणविरोधी अशा अर्थाने वापरला गेलेला आहे.
असे काही नाही. किमान श्ब्दाबद्दल तरी गैरसमज असू नये 'पुरोगामी' शब्दाचा अर्थ 'प्रगातिपर' असा आहे बाकी चालु दया....!
-दिलीप बिरुटे
16 Dec 2013 - 6:53 pm | खटासि खट
ए १ प्रतिसाद.
एक जुनाट झेरॉक्सचं मशीन आहे प्लेटसवालं. ते एका अंधा-या खोलीत ठेवलंय. त्याला एक प्रिंटर जोडलाय. एका कळकट कॉम्प्युटर वर एक गालफाड बसलेला, जाड भिंगाचा मनुष्य त्या कॉम्युटरवर बसलेला असतो. कॉम्प्युटरकडे बघून तो समाधानाने हसतो आणि एक प्रिण्ट सोडतो. प्रिण्ट झाल्या कि उजव्या टेबलावरच्या माणसाला देतो. तो समाधानाने मान हलवतो. मग ती प्रिण्ट घेऊन त्याची झेरॉक्स काढतो. या मशीनमधे मजकुराची उलटापालट होते. जी कॉपी बाहेर पडते ती डाव्या टेबलावरच्या माणसाला देतो. त्याने समाधानाने मान हलवली कि....
तो कळकट, जाड भिंगाचा चष्मा घेतलेला मनुष्य एक भगवा स्केच पेन घेऊन पहिल्या प्रिण्टवर नाव टाकतो - सनातन प्रभात
आणि रिव्हर्स कॉपीला स्टेपल मारत निळा स्केच पेन घेऊन नाव टाकतो मूलनिवासी !!
16 Dec 2013 - 8:43 pm | नीलकांत
सहमत आहे. :)
- नीलकांत
17 Dec 2013 - 7:32 am | मारकुटे
कारण हे मूलनिवासींचे ब्लॉग, सनातनचे वृत्तपत्र, आजच्या पुरोगाम्यांची धर्मनिरपेक्षता, मार्क्सवाद्यांचे आर्थीक आकलन, माओवाद्यांचे शेतकरी आदीवासींवरचे अन्याय, यात अन्य काही नावे घेता येतील. हे सर्व मला एक सारखेच आहेत.
झोपेचे सोंग घेतलेल्या लोकांवर शक्ती खर्च करून काही अर्थ नाही.
यादी अजून वाढवता येईल
नवोदारमतवाद्यांनी भुलवलेले मध्यमवर्गीय
फॅसिस्टांनी जागवलेल्या भाषिक अस्मिता
जागतिकीकरण समर्थकांनी/ची के/झालेली ससेहोलपट
अमेरिकनांनी लादलेली गुलामगिरी
उच्चवर्णीयांनी उभा केलेला इंग्लिशचा बागुल्बुवा
इंग्रजी इतिहासावरुन उच्चवर्णियांना झोडपणारे बहुजन
यादी खुप मोठी होऊ शकते... असो.
16 Dec 2013 - 6:49 pm | प्रकाश घाटपांडे
प्रमोद जी अशा ब्लॉग कडे दुर्लक्ष करायचे असते. तुम्ही कधी एकदा त्याची दखल घेताय व त्यानिमित्त आपल्या विचारांचा कसा प्रसार होतो आहे हेच ते पहात असतात. प्रेम जशी भावना आहे तशी द्वेष ही पण एक भावना आहे. जात धर्म प्रांत भाषा यावर आधारलेल्या अस्मिता या त्याला कारणीभूत असतात.
16 Dec 2013 - 7:03 pm | खटासि खट
बाबरी मशीदीचं पतन हा माणसाच्या द्वेषाचा परमोच्च बिंदू होता, त्यातून प्रतिक्रियावादी द्वेषाची नव्या रंगांची रोपटी उगवलीत. जर हे अॅक्सेप्टेबल नसेल तर काहीच बोलायचं नाही.
गुजरात दंगली आणि मुंबईच्या दंगली या आत्यंतिक द्वेषातून नरसंहाराच्या हेतून झालेल्या आहेत. या निव्वळ राजकिय हेतूने नाहीत तर द्वेषाची परिसीमा कळसाला पोहोचलेल्यांच्या उन्मादाला हवा घालणा-या कत्तली आहेत. मुंबईच्या दंगलींच्या आधी बाँबस्फोट आणि अतिरेकी हल्ले हे देशाला (पंजाब सोडून) माहीतच नव्हते.
16 Dec 2013 - 9:16 pm | नीलकांत
या प्रतिसादात सध्या भारतातील स्थानिकांची परकीय सत्तेसोबत हातमिळवणी करून जो आतंकवाद चालला आहे त्यांच्या कृत्याचं छुपं समर्थन करण्यासाठी बाबरी मशिदीच्या पतनाचा वारंवार उल्लेख होतो असं मला वाटतं. त्यामुळे आजच्या या परिस्थितीला केवळ बाबरी मशिदीचे पतन हाच एक मुद्दा असेल असं मला वाटत नाही. अगदी माझ्या माहिती प्रमाणे मुंबई बॉम्ब्स्फोटातील बारूद हे ६ डिसेंबर आधी भारतातील रायगडमध्ये पोहोचलं होतं. ( संदर्भ - अविनाश धर्माधिकारी यांचे भाषण)
भारतात ८०च्या दशकात जे अनेक बदल घडले आणि त्यावेळच्या नेतृत्वाला त्याचा अंदाज आला नाही म्हणून पुढील अनेक बदल झालेत त्यात धार्मीक धृवीकरण हा महत्वाचा बदल होता. पण बाबरी मस्जिदीचे पतन घडले नसते तर देशातील काही लोक या परकीय शक्तीच्या हातचे खेळणे बनले नसते असे आपले मत असेल तर ते फार धाडसाचे आणि ८०च्या दशकाच्या मागे पुढे आणि विशेषतः सोव्हियत रशीयाच्या पतना नंतर जगातील बदलांचा अभ्यास न करता केलेले विधान आहे असे मला वाटते.
थोडा जाता जाता उल्लेख करतो की श्रीपेरांबदुरची घटना बाबरी पतनाच्या आधीची होती.
- नीलकांत
17 Dec 2013 - 12:15 pm | खटासि खट
आम्ही पसरवतो तो द्वेष नाही असं समर्थन दोन्ही बाजूंनी होऊ शकतं. बाबरीच्या आधी बाहेरच्या देशातल्या शक्तिंना भारतात बाँबस्फोट करणं शक्य झालं होतं का ? (पंजाब + जम्मू काश्मीर ही दोन राज्ये वगळून म्हणा).
श्रीपेरांबदुरच्या घटनेचा उल्लेख करतच आहात तर तिचा इतिहास पण सांगा. त्याची तुलना इथे करता येणार नाही. ज्या संघटनेने ही हत्या केली तिची स्थापना कुणी केली याची माहीती घ्या. चुकीच्या माहीतीवर मतं बनवू नयेत. शेतकरी संघटना द्वेष करते या नव्या माहीतीची ज्ञानात भर पडली. कांद्याचे भाव वाढले तर फेसबुकवर संताप व्यक्त करणारे आता भाव कोसळल्यानंतर शेतकरी मेला तरी आम्हाला काय त्याचे अशा थाटात कोषात मग्न झालेली आहेत. त्याबद्दल शेतक-यांनी विचारलं तर तो द्वेष होतो होय ? एकंदर विचारांची दिशा लक्षात येतेय.
17 Dec 2013 - 12:32 pm | पैसा
नीलकांत यांचा या विषयाचा अभ्यास माहित करून घेतला असतात तर त्यांना अभ्यास वाढवा असं तुम्ही नक्कीच म्हणाला नसतात! मुंबई बॉम्बस्फोटात वापरलेले आरडीएक्स बाबरी मशीद (राममंदिर) पडण्याआधी भारतात आलं होतं असं नीलकांतने सांगितलं तर मी डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवीन!! समजा बाबरी पाडली गेली नसती तर ते काय दिवाळीत उडवायला आणलं होतं का? बरं हे जसं तुम्ही म्हणताय, तसंच गुजरात दंगे सुद्धा गोध्रा ट्रेन जळीत प्रकरणाची प्रतिक्रिया होती असं कोणी म्हटलं तर आपण त्याचा प्रतिवाद करू शकणार नाही. हल्लीच मुजफ्फरनगर इथे सरकार प्रायोजित दंगे झाले त्यामागे काय प्रेरणा होती असं तुम्हाला वाटतंय? या सगळ्या दंगली, बॉम्बस्फोटांच्या मागे बर्याच गोष्टी काम करत असतात. एक इमारत पाडली म्हणून द्वेष भडकला इतकं हे साधं अजिबात नसतं!
17 Dec 2013 - 5:05 pm | खटासि खट
केवळ एक इमारत पडली इतकी साधी घटना होती का ती ?
त्याआधी बॉम्बस्फोट आणि दहशतवादी घटना झाल्यात असं आठवतं का ? हा मुद्दा मी द्वेष कसा पसरवला जातो त्यासाठी सांगितला. आपण केला तर तो द्वेष नाही, आपला केला तर द्वेष असं समीकरण झालंय.
17 Dec 2013 - 6:04 pm | पैसा
तेच म्हटलं ना! त्याच्या मागच्या घटना सुद्धा केवळ तेवढ्यापुरत्या मर्यादित नाहीत. मुंबई बॉम्बस्फोटांची तयारी खूप आधीपासून सुरू होती, त्याचा बाबरी मशिदीशी संबंध जोडणे बरोबर नाही.
दहशतवादी घटना आणि बॉम्बस्फोट त्याआधीही सुरू होतेच पण एवढ्या व्यापक प्रमाणात नव्हते. काश्मिरमधला दहशतवाद यात मिक्स करू नका असं म्हणता येणार नाहीच. कारण पाकिस्तानचा भारतद्वेष हा त्यापासून वेगळा काढता येणार नाही. भारतात होणारे बॉम्बस्फोट, दहशतवादी कारवाया, धार्मिक दंगली या सगळ्याची मुळं बहुतेक वेळा सीमेपलिकडे सापडतात.
जेव्हा भारताबरोबर युद्ध करणे कठीण आहे हे पाकिस्तानच्या लक्षात आले आणि अफगाणिस्तान मधून रशियाने माघार घेतली तेव्हा त्यांनी हा दहशतवाद पोसायचा मार्ग अवलंबला. जे काही आहे ते निव्वळ आंतर्राष्ट्रीय दहशतवाद आहे. नाहीतर सामान्य माणसांकडे मुझफ्फरनगर दंग्यात एके४७ कुठून आल्या? प्रेमाने धार्मिक विद्वेषाला उत्तर देता येईल असा तुमचा भाबडा समज तर नाही ना?
17 Dec 2013 - 6:11 pm | बॅटमॅन
पण बाबरी नंतर अशा घटनांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे हे नक्कीच. एक सिंबॉलिक गोष्ट म्हणून चेतवायला लै वर्षांपर्यंत वंगण पुरलं लोकांना. हे मान्य करायला अडचण नसावी. त्या अर्थाने पाहता ती घटना चूक होती हे नक्कीच. पेनी-वाईज होण्याच्या भानगडीत पाउंड-फूलिश नाही झाले म्हणजे मिळवली.
17 Dec 2013 - 6:24 pm | पैसा
चूक होतीच यात काही शंका नाही. नंतर हायकोर्टाने दिलेला निकाल पाहता ते अधोरेखित झालंच. जे कोर्टात मिळालं असतं त्यासाठी एवढे वातावरण तापवायची गरजही नव्हती. या पाडापाडीच्या मागे केवळ रामजन्मभूमी मुक्त करणे एवढा हेतू नव्हता, तर बरेच राजकारण होते. जे कोणाही सुजाण नागरिकाला कधीही आवडण्यासारखे नाही.
17 Dec 2013 - 6:28 pm | बॅटमॅन
अर्थातच. प्युअरलि राजकीय मूव्ह होती ती. राजकारणाचे वावडे नै पण त्यापायी असे काही केले तर भांडवल करायची संधी फार मिळते. त्यामुळे वाईट वाटते.
बाकी सहमत आहेच.
17 Dec 2013 - 12:48 pm | नीलकांत
येथे शेतकरी संघटना कुठून आली? आणि विषय कुठे निघालाय? असो... इतर मुद्यांकडे वळूया.
श्रीपेरांबदूरच्या घटनेचा उल्लेख एवढाच की पंजाबाशिवायही भारतात विस्फोटक प्रकार झालेत. त्याची पार्श्वभूमी सविस्तर सांगता येईलही. आणि मी वर बोलल्या प्रमाणेच ८०च्या दशकातील नेतृत्व येत्या काळाची पाऊले ओळखण्यात कमी पडल्यामुळे भारतात सत्ताकांक्षी अनेक घटकांना जनमतावर आपलं गारूड चालवता आलं. याच अश्या नेतृत्वापैकी एका नेतृत्वाच्या स्वतःच्या अपरिपक्वतेमुळेच शेवटी परिणीती श्रीपेरांबदूरची झाली. शेवटी नुकसान भारताचंच झालं. याच वेळी ८० च्या दशकातील आसाम व ईशान्य भारताचंही उदाहण देऊनच ठेवतो.
मी केवळ बॉम्बस्फोट भारताच्या दक्षीणेसही झाले होते एवढं म्हणालो यावरून माझा सदर घटनेबद्दलचा आवाका तुमच्या लक्षात आला म्हणजे तुम्ही ग्रेटच आहात असं वाटतं.
मूळात ७१ च्या युध्दा नंतर भारताच्या विरोधी परकीय शक्तींनी आपला पावित्रा बदलला होता. त्यांना ताबडतोब सुपीक जमीन पंजाबची सापडली होती. मात्र भारतात अनेक फॉल्टलाईन्स होत्या आणि आहेत त्यांचा फायदा घेण्यासाठी आपल्या प्रत्यक्ष शत्रु व अप्रत्यक्ष शत्रुंच्या यंत्रणा कार्यरत होत्या व आहेतही. त्याच वेळी ओपेक व अन्य घटनांमुळे सौदीला पडलेली पॅन इस्लामची स्वप्ने आणि वहाबीझमचा प्रसार करण्यासाठी त्यांनी सुरू केलेल्या योजना आदी अनेक गोष्टींचा एकत्रीत रिझल्ट हा बाबरी नंतरच्या प्रतिक्रियात्मक आविष्काराला कारणीभूत आहे असं मला वाटतं. बाबरी झाल्याने त्यापैकी काही तात्काळ ट्रिगर झाल्या असतीलही मात्र बाबरी झालं नसतं तरीसुध्दा सध्या सुरू असलेला प्रकार सुरूच असता असं मला वाटतं. कारण सध्या जे भारतात सुरू आहे त्याला केवळ भारतीय पार्श्वभूमी आहे आणि काहीच जागतीस संदर्भ नाही असं मला मुळीच वाटत नाही. त्यामुळे कुठला पक्ष योग्य आणी कुठला अयोग्य ही सापेक्षता सोडून भारताचा विचार केल्यास हे दोन्ही वाईटच आणि दोन्ही पक्षाचे आपल्या कृत्यांवरचे पांघरून असमर्थनीयच. (म्हणजेच अतीशय ठामपणे मी पुन्हा असं म्हणतोय की ) -
माझ्या विचारांची दिशा नेमकी कुठली हे तुमच्या लक्षात आल्यास मलाही कळवा. मला मदत होईल. :) आता कुठे लिहीता होतोय.
- नीलकांत
17 Dec 2013 - 1:10 pm | प्यारे१
>>>आता कुठे लिहीता होतोय.
और भी आन दो!
17 Dec 2013 - 5:07 pm | खटासि खट
येथे शेतकरी संघटना कुठून आली? आणि विषय कुठे निघालाय? >>
अहो असं काय करताय ! तुम्ही त्या पोस्टला लाईक सुद्धा केलय. मला .................... आणि शेतक-यांचे प्रश्न हे सगळं एकच वाटतं. त्याला उत्तर दिलं तर असंबद्ध का ? मला रुल्स कळायला वेळ लागेल असं वाटतंय
17 Dec 2013 - 5:15 pm | खटासि खट
तुम्ही नक्कीच लिहा. मला तुम्ही या पिढीचे वाटल्याने श्रीपेरांबदुर च्या घटनेबाबत तसं म्हणालो. त्याबद्दल क्षमस्व !
श्रीपेरांबदुरची घटना ही कशाची परिपाक आहे आता यावर बोलण्यात अर्थ नाही. मात्र त्याचा संबंध देशात पडत चाललेल्या सामाजिक दरीशी जोडता येणार नाही हे माझं अजूनही मत आहे. त्याआधीही इंदिरा गांधींच्या बाबतीत अशी घटना घडली होती जिचा पंजाबशी संबंध होता. दोन्ही घटनांमधे सामाजिक दरी रुंद झाली असं झालं नाही. दिल्लीच्या दंगली हा एका राजकिय पक्षाने घेतलेला फायदा होता. त्याने शीख - हिंदू अशी कायमची फूट पडलेली नाही. शिखांचा राग हिंदूंवर आहे, कारण शिखांची हत्या झाली याला मेडीयातून व्यवस्थित न्याय मिळाला. याउलट बाबरी मशीद पडल्यानंतर जे काही झालं त्याने कायमची फूट पडली. तसंच लगेचच जे मुंबईचे दंगे झाले त्यामुळे परकीय शक्तींना स्थानिकांची मदत मिळायला लागली असं माझं मत.
तुम्ही बदलू शकलात तर मुद्यांचा विचार करायला तयार आहे.
17 Dec 2013 - 5:18 pm | खटासि खट
शिखांचा राग हिंदूंवर आहे, >>>
हे वाक्य अर्धवट आहे. त्यापुढे
कि एका विशिष्ट पक्षावर ??
असं वाचावे.
माफ करा. माझ्याकडच्या एका विशिष्ट तांत्रिक अडचणींमुळे अनेकदा काही शब्द पोस्ट होताना डिलीट होतात.
17 Dec 2013 - 1:13 pm | श्रीगुरुजी
>>> मुंबईच्या दंगलींच्या आधी बाँबस्फोट आणि अतिरेकी हल्ले हे देशाला (पंजाब सोडून) माहीतच नव्हते.
मुम्बई दंगल किंवा बाबरी मशीद पाडापाडी झाली नसती तरी देशात बॉम्बस्फोट व अतिरेकी हल्ले झाले असते. फक्त त्या हल्ल्यांमागे काश्मिर हे कारण दिले गेले असते. १९४७ ते १९९२ पर्यंत पाकिस्तानने काश्मिर हे कारण वापरले. १९९२ ते २००२ या काळात बाबरी मशीद व मुम्बई दंगली हे कारण वापरले गेले. २००२ पासून गुजरात दंगली हे कारण वापरले जात आहे.
१९९२ पूर्वी देखील भारतात बॉम्बस्फोट व अतिरेकी हल्ले होत होते. पाकिस्तानने १९७१ पर्यंत काश्मिरवरून ३ युद्धे केली. पण काश्मिर घेण्यात पाकिस्तानला अपयश आले. त्यामुळे १९७८ पासून पाकिस्तानने भारताशी प्रत्यक्ष युद्ध न करता भारतात अतिरेकी हल्ले व बॉम्बस्फोट करणे सुरू केले. १९८९ पर्यंत शीख अतिरेक्यांकरवी हे कारस्थान सुरू होते. १९८९ मध्ये रशिया अफगाणिस्तानातून परत गेल्यावर पाकिस्तानने तिथल्या मुजाहिदीनना अतिरेकी कारवायांसाठी भारतात पाठविले. त्यामुळे १९८९-९० पासून भारतात सर्वत्र अतिरेकी हल्ले व बॉम्बस्फोट सुरू झाले. १९९०-१९९२ या काळात सुद्धा पंजाब वगळता भारतात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट व अतिरेकी हल्ले झालेले आहेत. डिसेंबर १९९२ मध्ये बाबरी मशीद पडल्यावर या अतिरेक्यांना आयतेच नवीन कारण मिळाले. १९९२ किंवा २००२ झाले नसते तरी भारतात अतिरेकी हल्ले व बॉम्बस्फोट झालेच असते. १९९२ व २००२ हे फक्त एक निमित्त आहे.
16 Dec 2013 - 7:00 pm | बाबा पाटील
त्यांना अनुल्लेखाने मारणे कधीही सोइस्कर्,लक्ष दिले की हे जास्त चेकाळतात.
16 Dec 2013 - 8:03 pm | मुक्त विहारि
+ १
17 Dec 2013 - 12:51 am | विजुभाऊ
अशाना अनुल्लेखाने मारणे हा उत्तम उपाय. त्यांच्या ओरडण्याने जे संत होते त्याना फरक पडत नाही.
समजा साईबाबा किंवा गजानन महाराज हे भुमीगत झालेले क्रांतीकारी असतील. त्यामुळे आत्ता शंभर दीडशे वर्षाम्नन्तर त्याने काय फरक पडणार आहे.
17 Dec 2013 - 1:40 am | खटपट्या
दर्दुकाका, असले ब्लोग सोडा. दुसर काहीतरी लिवा.
17 Dec 2013 - 6:20 am | कंजूस
असमानतेची वागणूक दिली गेली होती तो राग उफाळून येतो .
17 Dec 2013 - 8:58 am | चौकटराजा
नीलकांत यानी दिलेल्या यादीतील एक दोन पानी माझ्याकडे नियमित येते.कुणीही न वाचता ते रद्दीत जाते.
मला केशरी व निळा रंग आवडेनासा झाला आहे !
17 Dec 2013 - 9:08 am | llपुण्याचे पेशवेll
नीलकांत यानी दिलेल्या यादीतील एक दोन पानी माझ्याकडे नियमित येते.कुणीही न वाचता ते रद्दीत जाते.
फुकट येते का पैसे देऊन? पैसे देऊन येत असेल तर ते बंद का नाही करत? आणि जर पैसे न देऊन येत असेल तर मलाही घ्यायला आवडेल. रद्दीलाही चांगला भाव आहे. :-)
17 Dec 2013 - 9:58 am | मारकुटे
सहमत आहे.
17 Dec 2013 - 8:59 am | प्रमोद देर्देकर
मी वरिल सर्व प्रतिसाद पाहता असे दिसुन येते की पाणी आपल्या गळ्यापर्यंत येत नाही तो पर्यंत गप्प राहवे असे सुचित होते. दुसरे कारण असे की जर तुम्ही त्यांना जबाब दिला नाहीत तर ते उलट जास्त चेकळातील, त्यांची भीड वाढेल आणि मग खटासि खट यांच्या म्हणण्याप्रमाणे माणसाच्या द्वेषाचा परमोच्च बिंदू होईल आणि आत्यंतिक द्वेषातून अंतर्गत दंगली वर उफाळुन येतिल. ज्याच्या फायदा मग बाहेरिल लोकांना होइल (परकीय शक्ती), म्हणजे शिवाजी महाराजांनी, पेशव्यांनी आपाप्सातली लढाई घडुन न येंण्याच्या जो आटोकाट प्रयत्न केला ती शिकवण मग व्यर्थ होती असे समजयचे काय?
इतिहास साक्षी आहे की परकीय आक्रमाणांपेक्षा अंतर्गत कलहच सर्व विनाशास करणीभुत ठरला आहे.
अवांतर :- मला दर्दुकाका पेक्षा "पम्या" म्हटलेले जास्त आवडेल.
17 Dec 2013 - 11:01 am | खटपट्या
ठीक आहे पम्या तर पम्या
17 Dec 2013 - 11:33 am | प्रमोद देर्देकर
आता कसं आंगाशी, लयी झॅक वाटलं.
17 Dec 2013 - 9:29 am | उद्दाम
स्वामी स्मर्थ म्हणजे पानिपतातील भाऊ हा समज तर अनेक लोकांमध्ये आहे. यात नवीन काही नाही.
17 Dec 2013 - 11:49 am | आनन्दा
या चर्चेत आपले स्वागत आहे.. आपल्या विचारांनी या चर्चेला एक निराळीच उंची मिळेल यात शंका नाही.
17 Dec 2013 - 1:34 pm | उद्दाम
हम गया नहीं , हम अभी जिंदा है
17 Dec 2013 - 12:19 pm | बॅटमॅन
हा समज पहिल्यांदा ऐकतोय. स्वामी समर्थ ऊर्फ श्री. बापट (नाव माहिती नाही) हे १८५७ च्या उठावात सहभागी असून नंतर मार्ग बदलला असे वाचले आहे.
17 Dec 2013 - 12:45 pm | llपुण्याचे पेशवेll
श्री स्वामी समर्थ म्हणजे कर्दळीवनात जाऊन गुप्त पणे राहीलेले नृसिंह सरस्वती. असेच ऐकलेले आहे आणि ते योग्यही
वाटते.
17 Dec 2013 - 12:50 pm | अनिरुद्ध प
+११११११
17 Dec 2013 - 12:51 pm | बॅटमॅन
त्या दोहोंचा काळ तरी बघा मालक कमीतकमी. आता औतारबितार म्हण्णार असाल तर आमची अळीमिळी गुपचिळी.
17 Dec 2013 - 12:56 pm | अनिरुद्ध प
आपला अभ्यास वाढ्वा मालक असे सुचवायची माझ्या सारख्या पामराची काय कुवत नाही,असो
17 Dec 2013 - 1:02 pm | मृत्युन्जय
ऑं? कोणाला होता हा प्रतिसाद बॅट्ञाला तर नाही ना? विचारायचे कारण एवढेच की माझ्या अल्प माहितीनुसार पनिपताची लढाई १७६१ साली झाली त्यावेळेस सदाशिवरावभाऊ साधारण ३० वर्षाचे होते. तर स्वामी समर्थांचा काळ साधारण १८५० चा आहे चू.भू.द्या.घा. भाऊ १२० - १५० वर्षे जगले असे जर आपले म्हणणे असेल तर गोष्ट वेगळी.
17 Dec 2013 - 1:05 pm | बॅटमॅन
हा ना राव, हे कैच्याकै आहे.
17 Dec 2013 - 1:30 pm | प्रमोद देर्देकर
मृत्युन्जयजी पण ज्याने कोणी हे लिहले आहे त्याने स्वतःहाचा फोन नं दिला आहे. आपण त्याच्या शी चर्चा करु शकतो. तसेच तो म्हणतात की स्वामी चे निर्वाण हे इ.स.१८०० साली झाले म्हणजे स्वामी ७१ वर्षे जगले.
दुसरे असे की ते अक्कलकोटला पण जावुन आलेत आणि आवाहन केले की हे खरेखोटे करुन दाखवा म्हणुन म्हाणजे मी तसे अनिता पाटिलच्या ब्लॉग वर वाचले होते.
17 Dec 2013 - 1:41 pm | मृत्युन्जय
स्वामींचे निर्वाण १७६१ सालीच झाले आणि ते आलटुन पालटुन सदाशिव राव भाऊ आणि स्वामी समर्थ हा खेळ खेळायचे असे नाही लिहिले म्हणजे मिळवली. उद्या हे महान लोक बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच शिवाजी महाराज असे लिहायलाही कमी करणार नाहित.
19 Dec 2013 - 4:29 pm | चिगो
अरे देवा.. दोघांबद्दलही नितांत आदर असूनही ह्या शक्यतेचा विचार करुनच अशक्य हसायला होतंय.. =)) =))
18 Dec 2013 - 11:57 am | श्रीगुरुजी
>>> तसेच तो म्हणतात की स्वामी चे निर्वाण हे इ.स.१८०० साली झाले म्हणजे स्वामी ७१ वर्षे जगले.
श्री स्वामी समर्थांनी महासमाधी शके १८०० मध्ये म्हणजेच इसवी सन १८७८ मध्ये घेतली. ते जर पानपतातले भाऊसाहेब असते, तर १८७८ साली त्यांचे वय कमीतकमी १५० वर्षांचे असते.
17 Dec 2013 - 1:02 pm | बॅटमॅन
साहेब, दत्त संप्रदाय हा कै आमच्या अभ्यासाचा विषय नव्हे. ऐकीव अन वाचीव म्हायतीवरच काय ते बोलतो. त्यानुसार नृसिंह सरस्वतीनामक साधू/संत हे बहामनी/आदिलशाही काळातले होते तर अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे एकोणिसाव्या शतकातले होते. अवतार वैग्रे कल्पना इथे लागू होतील/नै वैग्रे मला कल्पना नाही. किमान या दोघांच्या लैफटैममध्ये शेकडो वर्षांचे अंतर आहे इतकेच सूचित करावयाचे होते.
17 Dec 2013 - 1:06 pm | प्रचेतस
:)
17 Dec 2013 - 1:25 pm | उद्दाम
तीच तर गंमत आहे.
नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ यात ३०० वर्षे की कितीतरी जास्त काळ आहे. पण 'तेच हे ' असे मानायला लोकांना प्रॉब्लेम नसतो.
पण सदाशिवभाउ म्हणजे स्वामी समर्थ असे कुणी म्हटले की हेच लोक उद्गारतात ! आँ ! १२० वर्ष माणूस कसा जगेल?
:)
17 Dec 2013 - 1:39 pm | मृत्युन्जय
१५० वर्षे
17 Dec 2013 - 1:50 pm | आनन्दा
सदाशिवराव भाऊ १२० वर्ष जगले असतील तर त्याबद्दल काहीच आक्षेप नाही. त्यांची जात काढण्याला आहे.
हं.. आता सदाशिवरावभाऊ भूमीगत होऊन १२०+ वर्षे धडधाकटपणे जगले होते असे मान्य करायचे असेल तर प्रश्नच नाही.
चित भी मेरी पट भी मेरा... ब्रिगेडी लोकांच्या वाट्याला मी जात नाही ते त्याच्यामुळेच.
17 Dec 2013 - 1:31 pm | अनिरुद्ध प
शेकडो वर्षांचे अंतर होते,हे मान्यच आहे,कारण श्री स्वामी समर्थ यांना प्रत्यक्ष पाहीलेल्यांनी सुद्धा त्यान्ची कातडी(skin) ही खूप जुनी वाटत असल्याचे वर्णन केले आहे ते सुद्धा KODAK या कम्पनीच्या विदेशी माणसाने त्यांचा फोटो काढला होता असे ऐकुन आहे,बाकी काही नाही.
17 Dec 2013 - 2:06 pm | ऋषिकेश
कसे शक्य आहे?
श्री समर्थांचे निर्वाण १८७८चे तर कोडॅक कंपनीची स्थापना १८८८ची आहे.
17 Dec 2013 - 2:08 pm | गवि
आता कॉड्याक कंपनीच्या पहिल्या फोटोचे उगमवर्ष शोधणे आले.
सापडले.. १८९२ (अक्षरी अठराशे ब्याण्णव) साली कंपनी स्थापन झाली असे दिसते.
सतराशेच्या शतकात स्वामी समर्थ असतील तर तेव्हाच कॉड्याकचे प्री-लाँच बुकिंगरुपात पदार्पण झाले असावे असे वाटून कॉड्याकविषयीचा आदर वाढला.
17 Dec 2013 - 2:18 pm | थॉर माणूस
>>>कॉड्याकचे प्री-लाँच बुकिंगरुपात पदार्पण झाले असावे असे वाटून कॉड्याकविषयीचा आदर वाढला.
*lol*
17 Dec 2013 - 2:20 pm | अनिरुद्ध प
मी माझी माहिती ही ऐकीव आहे असे उध्रुत केले आहे ते खरेच आहे असे माझे म्हणने नाही,तसेच वरिल प्रतिसादात श्री बट्ट्मण्ण यानी श्री स्वामी समर्थ हे एकोणिसाव्या शतकात होते असे म्हटले आहे,तेव्हा माझे वाचन योग्य असावे असे वाटले,म्हणुनच हा प्रतिसाद देण्याची हिम्मत केली,बाकी मी काही ईतिहास अभ्यासक वगैरे नाही,माझी माहीती चुकिची असेल तर क्षमस्व.
17 Dec 2013 - 2:34 pm | गवि
क्षमस्वबिमस्व नको हो लगेच. जरा गंमत केली इतकंच.
त्यानिमित्ताने अतिअवांतर करुन पाहतो. नॅशनल जॉग्राफिकच्या वेबसायटीवरुन जगातला पहिला फोटोग्राफ १८२६ साली काढला गेलेला, पाहायला मिळाला.
अधिक माहितीचा दुवा:
http://photography.nationalgeographic.com/wallpaper/photography/photos/m...
17 Dec 2013 - 2:12 pm | ऋषिकेश
गुपचिळीच श्रेयस्कर आहे बॅट्या!
ऐकीव कथा अशी की श्री नृसिंह सरस्वती तप करण्यासाठी (का समाधीसाठी? तपशील विसरलो) जंगलात गेले. पुढिल ३००+ वर्षांत तिथे त्यांच्या भोवती एक वारूळ तयार झाले. एकदा एका लाकूड तोड्याने ते वारूळ फोडले तर आतून श्री समर्थ प्रकटले.चुभुद्याघ्या
17 Dec 2013 - 2:22 pm | बॅटमॅन
खरे आहे.
बाकी या कथेबद्दल धन्यवाद, पहिल्यांदाच ऐकली.
17 Dec 2013 - 2:49 pm | प्रमोद देर्देकर
नाही बॅट्या हे अगदि असेच त्रोटक वर्णन मराठी विकीपिडियावर दिले आहे.
17 Dec 2013 - 3:06 pm | बॅटमॅन
असेल हो, अमुक अमुक कथा असेल याबद्दल अविश्वास नव्हताच. कथेच्या सत्यतेवर अविश्वास दर्शवला इतकेच. नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ या दोन्हीही व्यक्ती भूतलावर प्रत्यक्ष होऊन गेल्या हे मलाही पटतेच. पण ते ३०० वर्षे वैग्रे पटत नाही. कुणाला पटत असेल तर पटो बापडे.
17 Dec 2013 - 2:28 pm | थॉर माणूस
ही कथा पहिल्यांदाच समजतेय. त्या बद्दल धन्यवाद.
गुपचिळीबद्दल सहमत. अशा कथांमधे उगाच अती लॉजिक लावत बसू नये, काही उपयोग होत नाही.
17 Dec 2013 - 12:26 pm | अनिरुद्ध प
लोकांमध्ये बरेच समज गैरसमज पसरावण्यात येतात असे वाटते.
17 Dec 2013 - 2:02 pm | वेताळ
आम्ही आपले स्वामीच्या चरणी पाया पडतो......बाकी त्याचा इतिहास तपसायचा प्रयत्न केलेला नाही.जय जय स्वामी समर्थ....
17 Dec 2013 - 2:10 pm | अनिरुद्ध प
सुद्धा श्री स्वामी समर्थांच्या पायाच पडतो,पण हे ऐकीव सन्दर्भ हे फोटोसहीत आहेत हे वाचनात आले आहे हाच माहीत असलेला ईतिहास ईथे व्यक्त केला ईतकेच.
17 Dec 2013 - 4:42 pm | प्रसाद प्रसाद
ऐसी अक्षरे वरील हा प्रतिसाद वाचावा -
http://www.aisiakshare.com/node/1190#comment-15792
हा ब्लॉग अनिता पाटील या फेक नावाने कोणी एका पुरुषाने लिहिला होता, त्याबद्दल बऱ्याच दिवसापूर्वी अगदी त्याला कसे पकडले ह्याचे साद्यंत वर्णन वाचले होते, तो दुवा आत्ता सापडत नाही आहे, सापडल्यावर देतो. वरील लिंक मध्ये या ब्लॉगरची माहिती आहेच.
17 Dec 2013 - 5:13 pm | सूड
ते सगळं मान्य. पण ह्या प्रतिसाद ज्या कोणा व्यक्तीचा आहे त्याचंच नाव ब्लॉगवर हे (बाई/ बुवा) अभिमानाने मिरवतंय ते पाह्यलं का? दुर्लक्ष करा राव. असले धागे काढून आणि लिंका देऊन माहिती नसणार्यांना पण हा ब्लॉग माहिती करुन देण्याचं काम फुकटात होतंय.
मन चिंती ते वैरी न चिंती: प्रमोद देर्देकर ह्याच ऐसि वरच्या सुप्रिया जोशी, अनिता पाटील आणि रविंद्र तहकीक तर नव्हेत? दया कुछ तो गडबड है !! ;)
19 Dec 2013 - 12:52 pm | आदूबाळ
"तहकीकात" करो (दया)
17 Dec 2013 - 5:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>>> या पत्रा द्वारे ते म्हाणतात की १८५७ साली जे बंड झाले पण ते पुढे
फसले. त्या बंडात सहभागी असलेले तात्यासाहेब टोपे,
आणि नानासाहेब पेशवे हे भगवे वेष परिधान करुन भुमिगत झाले
आणि त्यातील तात्या टोपे हे
श्री गजानन महाराज म्हणून तर नानासाहेब पेशवे हे शिर्डीचे
साईबाबा म्हणून प्रकटले असे म्हटले आहे.
खरं तर असा एक लेख कोणत्या तरी मासिकात छापून आल्याचं मला आठवतं. बाकी वरच्या सर्व गोष्टी थोतांड आहेत पण काही शक्यता तपासता येतात का ? नसेल तर सोडून द्यावे.
-दिलीप बिरुटे
17 Dec 2013 - 5:28 pm | म्हैस
इथे सवर्ण एकमेकांशी भांड्तायेत . त्याच्याशी आपल्याला काही देण घेण नहि. पण गजानन महाराज , स्वामी समर्थांचा उल्लेख आला म्हणून हा प्रतिसाद .
प्रमोद देर्देकर - अगदी सहमत . ज्यांना पटत नसेल त्यांनी सोडून द्यवे. ज्यांना अनुभव हवा असेल त्यांनी घ्यावा . ३०० वर्षे सामान्य लोकांसाठी खूप जास्त आहेत म्हणून आपला विश्वास बसत नाही . ईश्वरासाठी ३०० वर्षे काहीच नाहीत .
अजून १ गोष्ट . इथे ब्राह्मणांचा द्वेष करायचा नाहीये पण हे सत्य आहे कि मुसलमान राजवटीत ह्या ब्राह्मणांना भिक मागणं सुधा मुश्किल झाल होत. देवाची पूजा करणं , मंदिरात जाण सुधा दुरापास्त झालं . शिवाजी महाराजांनी ह्यांना भयमुक्त केलं . पण महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला 'शिवाजी भोसले' क्षत्रिय नाहीत म्हणून त्यांना राज्याभिषेक करता येणार नाही म्हणून १ सुधा ब्राह्मण तयार झाला नहि. शेवटी जिजाबाई ना काशीहून गागाभात्तांना बोलवावं लागलं .
बाकी ब्राह्मणांचे हजारो वर्षांपासून चालत आलेले प्रताप तर सगळ्यांनाच माहित आहेत
17 Dec 2013 - 5:36 pm | बॅटमॅन
अगदी बरोबर, तरी शंका येते की गझनीचा महमूद किंवा खिलजी वैग्रे लोक तिथे देवळे पाडापाड करीत असताना हे भगवंतराव काय स्वर्गलोकाच्या टूरला गेले होते का?
17 Dec 2013 - 5:41 pm | सुहास..
अगदी बरोबर, तरी शंका येते की गझनीचा महमूद किंवा खिलजी वैग्रे लोक तिथे देवळे पाडापाड करीत असताना हे भगवंतराव काय स्वर्गलोकाच्या टूरला गेले होते का? >>>>
अगगग !! =))
17 Dec 2013 - 5:47 pm | थॉर माणूस
*lol*
अरे? आपलं काय ठरलंय? लॉजिक शोधायचं नाही. आहे हे असं आहे.
कथा आहेत राव त्या, इतिहास थोडीच आहे. :)
17 Dec 2013 - 5:50 pm | बॅटमॅन
होय ओ, कथाच आहेत, पण त्यांवर कुणी लिटरली विश्वास ठेवू लागलं की अशा शंका येतात, तोपर्यंत सगळं ठीक असतं. ;)
17 Dec 2013 - 6:58 pm | अनिरुद्ध प
आपल्याला ह्या प्रष्णाचे उत्तर OMG या हिन्दी चित्रपटात मिळेल असे वाटते.
17 Dec 2013 - 9:42 pm | लोटीया_पठाण
त्याकाळच्या ब्राह्मणांनी केलेला विरोध कुठच्या ऐतिहासिक दस्तावेजात नमूद आहे ?? कारण हा मुद्दा गेली काही वर्ष चेपू अन ओर्कुट वरून फिरतोय पण कुठेही त्याचा संदर्भ दिलेला वाचनात आला नाही.
तो विरोध नसून; राज्याभिषेकासाठी क्षत्रिय असणे गरजेचे असून त्याबाबत काय स्टान्स घ्यावा अशी शंका उपस्थित केली गेली असावी, असा खुलासा हि वाचल्याचे स्मरते.
18 Dec 2013 - 12:04 pm | पिलीयन रायडर
आणि मग लगेच हे ही...
ऑं?? बाई.. मिळाला वेळ म्हणुन काहीही लिहीत सुटणार का? धागा काय, तुम्ही लिहीताय काय? उगाच जातीची भांडणं इथे आणु नकात. तुमच्या मनात ब्राह्मणांविषयी ज्या काही बर्या वाईट भावना आहेत त्या तुम्च्या पाशीच ठेवा. इथे मळमळ काढु नका. अजुन बरेच धागे आहेत तुम्ची ब्राहणांविषयीची मते सांगायला. तिकडे बोला.
18 Dec 2013 - 4:03 pm | बॅटमॅन
बाकी काही असो पण संस्कृत विद्या स्वतःपुरतीच ठेवणे ही ब्राह्मणांची घोडचूक होती. शिवाय ते अन्य जातींच्या धंद्यांत घुसायचे पण अन्य जातींचा त्यांच्या धंद्यातला शिरकाव त्यांनी कधी खपवून घेतला नाही- लै थोडे अपवाद आहेत त्याला.
18 Dec 2013 - 4:13 pm | पिलीयन रायडर
कोण म्हणतय की चुका केल्या नाहीत ब्राहमणांनी? पण माझे २-३ प्रश्न आहेत (तुलाच असे नाही..)
१. अशी कोणती जात आहे ज्यांच्या कडुन चुका झाल्याच नाहीत? माणुस म्हणला की चुक आलीच..
२. बर तरी खुप मोठी चुक आहे, नाही विसरता येणार... पण म्हणुन वाट्टेल ते बरळायच कारण नाही. पुरावे द्या आणि बोला. तसं नसेल तर अनिता पाटीलचा ब्लॉग आणि असे प्रतिसाद ह्यात फार फरक रहाणार नाही. (तसही ब्राहमण विषयावर गरळ ओकणार्या लोकांकडुन मी कधीही लॉजिकल प्रतिवाद ऐकला नाहीये.. ते फक्त आधंळा द्वेष करतात.. अशां सोबत बोलायची गरजही वाटत नाही खरं तर)
३. मुख्य प्रश्न.. ब्राह्मण आणि त्यांच्या चुका हा या धाग्याचा विषय आहे का? मग ओढुन ताणुन का उतरायच त्या विषयावर..? असा सुरु होऊन मग तो परत आरक्षण आणि इ टिपि़कल मुद्द्यावर येणार. आणि तरीही चर्चा करायची असेल तर ह्याच विषयाला वाहीलेले अनेक धागे आहेत, ते वापरा / स्वतःचा धागा काढा.
18 Dec 2013 - 4:20 pm | बॅटमॅन
या कार्पेटखाली ब्राह्मण किंवा अन्य जातींच्या चुका झाकणे चूक आहे.
बाकी अनिता पाटील अँड हर इल्क हे लोक फक्त आंधळा द्वेष करतात यावर दुमत असायचे कारण नाही. फक्त आपल्या चुकांवर पांघरूण घालू नये इतकेच म्हणावयाचे आहे. असो. बाकी एका वाक्यावरून इतके वर्क्ड अप व्हायचे कारणही नव्हते असे मला वाटते. कारण अशा हजारो निर्गुणी मतपिंका तथाकथित उदंड विद्या शिकलेले टाकत असतात. पण त्यांमधील म्याटर पाहता "त्याला कोण पुसे?" असेच म्हणावे लागते. असो.
18 Dec 2013 - 4:23 pm | पिलीयन रायडर
बर आता तु म्हणतोयस तर असो..
फक्त धागा आणि विषय न पहाता कसहि करुन ह्याच विषयावर उतरणे ह्या प्रकाराचाच कंटाळा आलाय..
19 Dec 2013 - 2:27 pm | मारकुटे
>>>संस्कृत विद्या स्वतःपुरतीच ठेवणे ही ब्राह्मणांची घोडचूक होती.
संस्कृत ब्राह्मणांपुरती नव्हती. संस्कॄतमधे जैन आनि बौद्धांनी खुप लिहिले आहे. अब्राह्मण हिंदूंच्या किती रचना आहेत याची गणतीच नाही. (उदा. वाल्म्इकी आणि व्यास ब्राह्मन नव्हते.)
ब्राह्मणांकदे होती ती केवळ कर्मकांडाची निरर्थक बडबड. तिला तेव्हाही अर्थ नव्हता आजही नाही. ब्राह्मणांपाशी अशी कोनतीही विद्या नव्हती जी दिली नाही म्हणून समाजाचं नुकसान झालं.
आजही जेव्हा कर्मकांडाची विद्या (!) सर्वांना उपलब्ध आहे तेव्हा ती शिकणारे किती? आणि असे शिकलेले असूनही त्यांना न बोलावता केवण बामनालाच बोलवणारे किती?
19 Dec 2013 - 2:32 pm | मृत्युन्जय
कृष्ण द्वैपायन सत्यवतीच्या पोटी पराशर ऋषींशी तिच्या असलेल्या संबंधातुन जन्मले. पराशर ऋषी माझ्या मते ब्राह्मण होते. सत्यवती नव्हती. अश्या संततीला माझ्या मते ब्राह्मणच संबोधिले जायचे. बाकी त्याकाळी ब्राह्मणांकडे ज्ञान नव्हते ("ब्राह्मणांकदे होती ती केवळ कर्मकांडाची निरर्थक बडबड") हे अतिशय हास्यास्पद विधान आहे.
19 Dec 2013 - 2:36 pm | मारकुटे
मनुस्मृती ब्राह्मण पुरुष आणि शुद्र स्त्रीच्या संतानाला काय म्हणते?
हास्यास्पद विधानाबद्दल तुमचे मताचा आदर आहे. मात्र असेच विचार कुरुंदकरांचे पण होते. कुरुंदकर कोण असा प्रश्न हास्यास्पद होऊ शकतो.
19 Dec 2013 - 2:37 pm | बॅटमॅन
महाभारत काळ मनुस्मृतीच्या अगोदरचा आहे सबब मनुस्मृतीचे क्लासिफिकेशन महाभारताला लावणे मूर्खपणा आहे.
19 Dec 2013 - 2:40 pm | मारकुटे
दोन्ही इस पुर्व दोनशे मधील आहेत. महाभारतात मनुचे दाखले आहेत.
19 Dec 2013 - 2:44 pm | बॅटमॅन
महाभारत ग्रंथ हा लै वर्षे रीरैटिंग होत आलेला ग्रंथ आहे. काही आधीचे तर काही नंतरचे अशी लै भेसळ आहे त्यात. त्यामुळे महाभारतात मनूच का, अगदी यवनांचेही उल्लेख असले तरी आश्चर्य वाटायचं कारण नाही.
19 Dec 2013 - 2:48 pm | मारकुटे
यवनांचे उल्लेख येणारच. ग्रीक आणि अयोनिअन (यवन) महाभारता आधीपासून ज्ञात आहेत.
असो.
19 Dec 2013 - 2:52 pm | बॅटमॅन
महाभारता आधीपासून म्हणजे ग्रंथाआधीपासून की त्यातल्या घटना घडल्या त्या लोहयुगाच्या आधीपासून? पर्शियाचा राजा डरायस याच्या एका स्किलॅक्स नामक ग्रीक एक्प्लोररच्या आधी (इसपू ५००) भारत अन ग्रीसचा संबंध आल्याचे वाचलेले नाही. त्यामुळे त्या काळच्या आधीचा पुरावा असेल तर बाय ऑल मीन्स मला सांगावा.
19 Dec 2013 - 2:54 pm | मारकुटे
महाभारत ग्रंथलेखनाच्या आधी (इपु २००)
महाभारत घडलं का नाही, घडलं तर कधी घडलं हे मी गौण मानतो.
कारण जे लिहिलं आहे ते तसंच घडलं अस मी मानत नाही
जे घडलं तेच लिहिलं असं मी मानत नाही.
त्यामुळे चर्चा लेखनाचा काळ येवढीच व्याप्ती पकडून व्हावी.
19 Dec 2013 - 3:00 pm | बॅटमॅन
ओके. महाभारताबद्दल तुम्ही उपस्थित केलेल्या शंका मलाही पटतात. मुद्दा एवढाच आहे, की स्मृतीप्रमाणे पाहिल्यास विसंगत वाटणार्या अनेक गोष्टी महाभारतात आहेत, उदा. बहुपतित्व. काहीतरी स्पष्टीकरण देऊन का होईना त्या ग्रंथामध्ये आहे तशा ठेवल्यात याचाच अर्थ त्या जुन्या समाजाचे नियम वेगळे होते.
इथला वाद सुरू झाला तो व्यास ब्राह्मण होते की नव्हते यावरून. स्मृतीनुसारच सगळे पाहू शकत नाही हे सांगण्याचा प्रयत्न होता इतकेच.
19 Dec 2013 - 2:46 pm | मृत्युन्जय
कुरुंदकरांचे असे विचार असतील तर त्यांचेही विचार हास्यास्पद होते. केवळ कुरुंदकरांनी मांडले म्हणून मान्य करण्यात काहिच अर्थ नाही. शेंडा बुडखा नसलेली असली वाक्ये शोधुन त्यावर चिंतन करणे तर केवळ अमान्य. " ब्राह्मणांनी अनावश्यक कर्मकांडावर जास्त भर दिला" इतपत विधान मान्य होण्यासारखे आहे पण सरसकट " ब्राह्मणांकडे कर्मकांडाव्यतिरिक्त इतर ज्ञान नव्हते" हे चुकीचे आहे.
19 Dec 2013 - 2:47 pm | मारकुटे
तुमच्या मताचा आदर आहे.
19 Dec 2013 - 2:49 pm | बॅटमॅन
ब्राह्मणांकडे खरेच असे ज्ञान होते म्हणजे तरी काय होते? वैद्यक म्हटले तर अन्य जातींतही तरबेज वैद्य होते. क्यालेंडर म्हटले तर एकवेळ ठीक. पण बाकी ज्ञानाचा जण्रल समाजाला फार कमी उपयोग होता. अध्यात्म वैग्रे म्हणावे तर वेळोवेळी रिबेल उठून देशभाषांत आणत- ज्ञानेश्वर तुकाराम वैग्रे. मग यांची मोनॉपॉली होती तरी कुठल्या ज्ञानावर? ते जे कै होते ते लै कमी होते.
19 Dec 2013 - 2:51 pm | मारकुटे
आता कस्सं बोल्लात !!
19 Dec 2013 - 3:03 pm | मृत्युन्जय
ब्राह्मणांव्यतिरिक्त इतर जातीत ज्ञान नव्हते असे मी कधीच म्हटलेलो नाही. ब्राह्मणांकडे नव्हते या मुद्द्याला माझा आक्षेप आहे. बाकी असतीलच की इतर जातीत विद्वान लोक. अजुनही आहेत. जर्मन लोक लढवय्ये होते म्हणुन ब्रिट्स पळपुटे होते असे नाही.
19 Dec 2013 - 3:11 pm | बॅटमॅन
ते ठीक हो, ब्राह्मण एकजात ढ होते असे तरी मला कुठे म्हणायचे आहे?
मुद्दा इतकाच आहे, की बह्वंशी ब्राह्मण ज्याला "ज्ञान" म्हणत त्याचा समाजाला वट्ट उपयोग नव्हता. सैद्धांतिक चिरफाड करून करून दिमाग मस्त तयार झाला होता पण त्याचे अॅप्लिकेशन प्रॅक्टिकल गोष्टींत करायला पाहिजे होते. जेवढे थोडेफार केले- वैद्यक अन खगोलशास्त्रात- त्यापेक्षा अजून जास्त करायला पाहिजे होते असे वाटते इतकेच. इतर समाजाला ज्ञान दिले नाही म्हणजे ही पद्धतशीर विचार करण्याची पद्धत दिली नाही. तो मुळात ज्ञानाच्या व्याख्येचाच घोळ म्हणावा लागेल.
19 Dec 2013 - 3:14 pm | मृत्युन्जय
माझा प्रतिवाद लिमिटेड मुद्द्यांना होता. त्याबद्दल आपले एकमत असल्याने इथेच थांबुयात.
19 Dec 2013 - 3:17 pm | बॅटमॅन
ओक्के सार!!!!
19 Dec 2013 - 3:22 pm | प्यारे१
अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान देणारा, घेणारा, बुद्धी तीक्ष्ण असून समाज उपयोगी कामे करणारा अशा गुणांच्या अधिकारी व्यक्तीला ब्राह्मण म्हणतात ना?
गुणकर्म विभागशः??
19 Dec 2013 - 2:36 pm | श्रीगुरुजी
खालील वाक्य सोडून प्रतिसादाशी सहमत.
>>> ब्राह्मणांपाशी अशी कोनतीही विद्या नव्हती जी दिली नाही म्हणून समाजाचं नुकसान झालं.
काळानुसार स्वतःला बदलण्याची व बदलत्या काळाशी जुळवून घेऊन कर्मकांड व जातीय अस्मितेचा बाऊ न करता स्वतःची प्रगती करण्याची विद्या ब्राह्मणांनी समाजाला दिलेली नाही.
19 Dec 2013 - 2:38 pm | मारकुटे
>>>कर्मकांड व जातीय अस्मितेचा बाऊ न करता
आमच्याकडे असं नसतं आणि परशुराम नृसिहांच्या बँडबाजा मिरवणूकी पाहिलेल्या दिसत नाहीत तुम्ही.
आम्हाला देशस्थ / कोकणास्थ / यजुर्वेदी/ ऋग्वेदी चालत नाहीत हे वाक्य ऐकले नाही का?
19 Dec 2013 - 2:42 pm | श्रीगुरुजी
>>> आमच्याकडे असं नसतं आणि परशुराम नृसिहांच्या बँडबाजा मिरवणूकी पाहिलेल्या दिसत नाहीत तुम्ही.
आम्हाला देशस्थ / कोकणास्थ / यजुर्वेदी/ ऋग्वेदी चालत नाहीत हे वाक्य ऐकले नाही का?
या सर्व गोष्टी करणारे ब्राह्मण खूप कमी आहेत. बहुसंख्य ब्राह्मणांनी जानवे, संध्या, श्रावणी इ. कर्मकांडे व ब्राह्मण नेते/संत यांची अस्मिता बाळगणे व त्यांच्या बदनामीचा बाऊ करणे हे केव्हाच बंद केले आहे.
19 Dec 2013 - 2:44 pm | मारकुटे
>>>आम्हाला देशस्थ / कोकणास्थ / यजुर्वेदी/ ऋग्वेदी चालत नाहीत हे वाक्य ऐकले नाही का?
हे सररास लग्नामधे घडते. आणि बहुसंख्य ब्राह्मण अजून लग्न करतात.
19 Dec 2013 - 2:47 pm | श्रीगुरुजी
>>> >>>आम्हाला देशस्थ / कोकणास्थ / यजुर्वेदी/ ऋग्वेदी चालत नाहीत हे वाक्य ऐकले नाही का?
>>> हे सररास लग्नामधे घडते. आणि बहुसंख्य ब्राह्मण अजून लग्न करतात.
सध्याच्या काळात बहुसंख्य ब्राह्मण तरूण/तरूणी लग्नासाठी आपल्या पोटजातीचा आग्रह धरत नाहीत.
19 Dec 2013 - 2:49 pm | मारकुटे
असं तुम्हाला वाटतं.
19 Dec 2013 - 3:00 pm | मृत्युन्जय
असं होत नाही असं तुम्हाला वाटते.
19 Dec 2013 - 2:58 pm | मृत्युन्जय
मी तर आजकाल कुठल्याही रस्त्यात, वाडीत, मिरवणुकांमध्ये, राजकीय सभांमध्ये, जातीय संमेलनांमध्ये "आंबेडकर, फुले आणि शाहू महाराज" यांच्या तसबिरी बघतो. क्वचित प्रसंगी शिवाजी महाराज देखील दिसतात. तुम्ही या बँडबाजा मिरवणुकी बघितलेल्या नसतील तर गेल्या १० वर्षात तुम्ही घराबाहेर पडलेले असण्याची शक्यता नाही.
आणि हो. ९६ कुळी मराठा मुलगा / मुलगीच पाहिजे हा आग्रह धरणारे लोक तुम्ही बघितले नसेल तर जगातले ८ वे आश्चर्यच म्हणायला लागेल. ९६ कुळी नसतील तर केवळ मराठा असण्याच्या पुण्याईवर ९६ कुळी घराबरोबर संबंध जमवता येणे अवघड आहे. या अट्टाहासापायी आजकाल प्रत्येकजण स्वतःला ९६ कुळी म्हणवुन घेतो. आता ९६० कुळी म्हणायची पद्धत आणायला हवी त्यामुळे. ९६ कुळी समाजातल्या एका मित्राने ब्राह्मण मुलीशी लग्न करायचे म्हटल्यावर त्याच्या घरात काय गहजब झाला होता तेही माहिती आहे. त्यामुळे या असल्या टिमक्या वाजवणे बंद करा.
19 Dec 2013 - 3:10 pm | मारकुटे
>> त्यामुळे या असल्या टिमक्या वाजवणे बंद करा.
ओ हो हो हो. अहो तापु नका इतके... माझ्याकडून तुमचा अपमान झाला असेल तर माफी मागतो. पण इतके रागावू नका. कसं आहे चर्चा म्हटली की मत मतांतरे होणारच. असं तापुन कसं चालेल. बर ब्राह्मणाने कसं असावं क्षमाशील, दयाळु, आर्जवी आणि लाघवी !
19 Dec 2013 - 3:11 pm | मृत्युन्जय
आपल्या मताचा आदर आहे
19 Dec 2013 - 2:36 pm | बॅटमॅन
मान्य. जैन आणि बौद्धांनी टनावारी रचना केलेली आहे संस्कृतात.
पण ही रचना कधीपासून आणि कुणामुळे झाली हे पाहिल्यास माझ्या दाव्याला पुष्टी मिळते. व्यास हे ब्राह्मणच होते-पराशर ऋषींचा मुलगा. वाल्मिकी मात्र नव्हते. पण नंतरच्या काळात पहा की, लै कमी उदाहरणे सापडतील. होता होईल तो प्युअर संस्कृत इतर लोकांपर्यंत पोहोचली नाहीच. तुलनेने युरोपात लॅटिन मात्र सगळीकडे शिकवली जात असे.
संस्कृत विद्या शिकून फार कुणी श्रीमंत होईल वैग्रे प्रकार कधीच नव्हता पण एक महत्त्वाची चूक म्हणजे थिअरी अन प्रॅक्टिकल यांची नीट सांगड युरोपासारखी आपल्या इथे कधी घातली गेली नाही. ब्राह्मण थिअरी मांडत एकदम शिस्तीने, बाकी समाज प्रॅक्टिकलही तेवढ्याच किंबहुना जास्त कुशलतेने करीत. पण दोहोंची सांगड कधी नीटपणे घातली गेली नाही. याला जबाबदार फक्त ब्राह्मणच आहेत असे नाही पण त्यांना हे समजायला हवे होते असे वाटते. समाजातला बुद्धिजीवी वर्ग म्हणून हे त्यांनी केले असते तर चांगले झाले असते.
शिवाय हे अपेक्षिणे फार काही लै देखील नाहीये. असो, तो एका वेगळ्या धाग्याचा विषय आहे.
19 Dec 2013 - 2:47 pm | मारकुटे
होता होईल तो प्युअर संस्कृत इतर लोकांपर्यंत पोहोचली नाहीच
अष्टाध्यायी मुखोद्ग्त करायची. पातंजलीचे भाष्य अभ्यासायचे. कात्यायनाची टीका समजून घ्यायची. मग साहित्य अभ्यास करुन थेट आनंदवर्धनाचे ध्वन्यालोकापर्यंत भरतुहरी वाचायाचा. आयुश्याची तिशी उलटते. एवढं करुन खायला काय मिळणार? बहुजन समाजाला गरज वाटली नसावी प्युअर संस्कृत शिकायची.
19 Dec 2013 - 2:57 pm | बॅटमॅन
याला ब्राह्मणही तितकेच जबाबदार आहेत. संस्कृत शुद्ध ठेवण्याच्या नादात तिचे महत्त्व कमी कमी करत नेले या लोकांनी. त्याचे काही दूरगामी परिणाम झाले खरे. म्हणजे संस्कृत भाषेत काही स्पेशल होतं असे नाही पण पद्धतशीरपणे एखादी गोष्ट शिकणे, विकसित करणे हा कुठलीही विद्याशाखा शिकायचा एक प्रकार असतो. संस्कृत विद्या सोडता अन्य प्रॅक्टिकल शास्त्रांमध्ये थिअरीचा शिरकाव जर बर्यापैकी प्रमाणावर झाला असता, तर भारत होता त्यापेक्षाही एका वेगळ्याच उंचीला गेला असता. युरोपमध्ये नेमके हे झाल्याने ते लोक एका वेगळ्याच उंचीवर गेले. असो.
19 Dec 2013 - 3:00 pm | मारकुटे
ब्राह्मणही तितकेच जबाबदार आहेत. संस्कृत शुद्ध ठेवण्याच्या नादात तिचे महत्त्व कमी कमी करत नेले या लोकांनी.
प्रतिसादाशी सहमत.
वरील वाक्य वेगळे काढले कारण पाणिनी नंतर वैयाकरण्यांनी भाषा बदलते हे तथ्य मान्य केले पण अंमलात आणअले नाही. वेगळ्या भाषा जन्मत आहेत हे सोईस्कर विसरले. आणि पाणिनीला भगवान बनवून तो म्हणतो तेच खरे असं करुन संस्कृतमधे बदल होऊ दिले नाहीत. तीच जुनाट शब्दांची कसरत करत राहिले. पतंजलीला सुद्धा धाप लागलेली दिसते. असो.
चर्चा करुन आनंद वाटला.
19 Dec 2013 - 3:23 pm | बॅटमॅन
इथे अंमळ असहमत. हेमचंद्र वैग्रे लोकांनी प्राकृतचे व्याकरण लिहिले, दक्षिणेत तमि़ऴचे तोलकाप्पियम तर कन्नडचे कविराजमार्गम् हे व्याकरण लिहिले गेलेच होते. पण अन्यत्र हे इतके दिसले नाही. त्याची कारणे वेगवेगळी आहेत. ते एक असो पण अन्य भाषांचे अस्तित्व नाकारणे हा मुद्दा नव्हता, फक्त त्यांनाही महत्त्व देणे हा प्रकार उत्तरेत झाला नाही. आणि एकूणच संस्कृतचे क्षेत्र धार्मिक सोडून नंतर प्रचंड विस्तारले, जरी संस्कृत काव्यनाटकशिलालेख इ. मध्ये जास्तजास्त दिसू लागली तरी विषयांची व्याप्ती शास्त्रांत कधी तितकी दिसली नाही.
19 Dec 2013 - 3:24 pm | बॅटमॅन
बाकी चर्चेचा आनंद इज म्युच्युअल :)
19 Dec 2013 - 3:59 pm | सुनील
हे आजदेखिल होते आहे काय? ;)
बाकी चर्चेचा आनंद घेत आहेच!
19 Dec 2013 - 4:00 pm | बॅटमॅन
हा हा हा ;)
17 Dec 2013 - 9:44 pm | लोटीया_पठाण
गागाभट्टाना बोलावला कि ते स्वतः आले राज्याभिषेकाची कलपना घेऊन??
18 Dec 2013 - 9:04 am | प्रमोद देर्देकर
पहिली गोष्ट म्हणजे
राज्याभिषेक
हा शब्द चुकिचा आहे. अहो सर्व राज्याचा का अभिषेक करायचा आहे? नाही ना? मग. मला वाटते तो शब्द राजाभिषेक आहे. काराण शिवाजी राजांचा अभिषेक करायाचा आहे. पण कालौघात तो "य" डकवला जावुन ज चा ज्या झाला तो कायम्चा.18 Dec 2013 - 9:16 am | सुनील
अच्छा. म्हणजे हे थोडेसे "पिळवणूक" शब्दासारखे झाले!
फसवणे वरून फसवणूक हे ठीकच. परंतु, पिळवणे असा शब्द नसून तो पिळणे असा आहे. तेव्हा, पिळणूक हा शब्द वापरायला हवा!!
असो, चर्चा वाचीत आहेच!
18 Dec 2013 - 1:07 pm | म्हैस
भगवंताने सगळ्याला हाथ, पाय दिले अहेत. बुद्धी दिली आहे . सगळ्या गोष्टी देवानेच करायच्या असतील तर तुम्ही काय नुसते खायला काळ आणि भुईला भर आहात काय? तो गझनी एवढ्या लांब येवून इथली देवळे पडतो तेव्हा देव तुम्हाला म्हणाला होता का नुसत माकडासारख बघत बसा म्हणून?
तो काय तुमचा नोकर आहे का? श्री क्रीश्नांनी हातामध्ये शास्त्र घेतल नवतं . हातात शस्त्र घेवून लढाई अर्जुनाने केली होती . हे माहित नाही का?
ते लोक सुधा आपल्या देशाचं , धर्माचं रक्षण करायचं सोडून तुमच्यासारखे म्हशी आणि रेड्यावर comments करत बसले होते म्हणून तर मुसलमान, इंग्रजांचं फावलं
18 Dec 2013 - 1:13 pm | बॅटमॅन
सगळ्या गोष्टी आम्हीच करायच्या तर देवाची गरजच काय =)) तुमच्यासारख्यांमुळे भोंदूबाबांचं फावतं.
18 Dec 2013 - 3:59 pm | टवाळ कार्टा
+१
बाकी मुलेबाळे पण देवाचीच क्रुपा :)
18 Dec 2013 - 7:36 pm | सूड
>>तो गझनी एवढ्या लांब येवून इथली देवळे पडतो तेव्हा देव तुम्हाला म्हणाला होता का नुसत माकडासारख बघत बसा म्हणून?
गो बाये!! माणसापेक्षा देव बलवान ना? मग त्यानंच स्वतःच रक्षण का नाय केलंन्?
18 Dec 2013 - 1:11 pm | जेपी
बास करा आता
19 Dec 2013 - 3:50 pm | म्हैस
अरे पण देव फक्त देवळात असतो , देवूळ वाचाव्ल्याने देवाचं रक्षण होतं अस कुणी सांगितलाय तुम्हाला?
देवूळ फोडल्याने का कुठं देवाचं अस्तित्व नष्ट होतं? तसं असतं तर हा गझनी कीस झाड कि पत्ती ? देवाच्या सामर्थ्याची कल्पना सामान्य माणसाच्या आवाक्यात आहे का?देवळाच रक्षण करण हे आपल कर्तव्य आहे . गझनीच्या वेळचा इतिहास जर आपण वाचला असेल तर आपल्या लक्षात येईल अफाट संपत्ती , सगळ्या सुखसोयी असल्यामुळे आपले लोक , राजे रजवाडे कसे नुसते ऐतखावू झाले होते
19 Dec 2013 - 3:53 pm | बॅटमॅन
असं असेल तर
तर यात विरोधाभास नाही का?
आणि
इतका सामर्थ्यवान देव चार देवळेही वाचवू शकला नाही तर...हॅ हॅ हॅ, बाकीचे सोडाच.
19 Dec 2013 - 3:59 pm | सूड
>>अरे पण देव फक्त देवळात असतो , देवूळ वाचाव्ल्याने देवाचं रक्षण होतं अस कुणी सांगितलाय तुम्हाला?
देवूळ फोडल्याने का कुठं देवाचं अस्तित्व नष्ट होतं?
तेच की !! ही तुमची अक्कल 'तो गझनी एवढ्या लांब येवून इथली देवळे पडतो तेव्हा देव तुम्हाला म्हणाला होता का नुसत माकडासारख बघत बसा म्हणून?' हे लिहीताना तुमची बुद्धी कोणत्या कुरणात चरायला धाडली होतीत ते सांगाल का, म्हैसबाई? देव सगळीकडे असतो मग देऊळ पाडलंनीत किंवा ठेवलंनीत काही फरक पडत नाही ही उपरती आता कशी झाली? बाकी प्रत्येक धाग्यावर आपला आयडी सार्थ करुन दाखवायचं ठरवलंच असाल तर तुमचं चालू द्या. इति लेखनसीमा !!
23 Dec 2013 - 9:46 pm | उद्दाम
देवूळ वाचाव्ल्याने देवाचं रक्षण होतं अस कुणी सांगितलाय तुम्हाला?
हायला, म्हशे, मग बाबरी पाडून देऊळ बांधायची काय गरज आहे गं ? :)
19 Dec 2013 - 3:58 pm | म्हैस
देवाची गरज काय आहे हे समजणं तुझ्या बुद्धीच्या बाहेरचं आहे बाळा . त्यामुळे तू त्याचा विचार करणं सोडून दे. वेळ आली कि तुला ते आपोआप समजेलच . तोपर्यंत वाट बघत बस .
देवाचा , आमच्यासारख्या लोकांचा भोन्दुबाबांशी काय संबंध? भोंदूबाबा तर तुमच्या सारख्या लोकांना गंडवायला बसलेत . कारण देव म्हनला कि भोंदू बाबा आला हे तुमच्यासारख्या लोकांचं समीकरण आहे
19 Dec 2013 - 4:03 pm | बॅटमॅन
शेप्रेट प्रतिसाद देणार होतो पण सुडक्यानें माझें कष्ट वाचवलेंनीत (व्याक्रण ब्रोब्र आहे का रे?).
इतकी देवभक्त म्हैस आमच्यासारख्या मूर्ख मर्त्य लोकांबरोबर विकारांच्या चिखलात डुंबत बसते याची बाकी मौज वाटली. तुमच्या देवाला चालतं का गं हे? मारे देवदेव करायचं अन शंका उपस्थित केली की शिव्या घालायच्या. हेच का तुमचे उच्च आचरण?
19 Dec 2013 - 4:02 pm | म्हैस
जर तर च्या गोष्टी कशाला करताय? ते सत्य आहे ते बोला ना .
देवून देवाने बांधलेल नाहीये . ते माणसाने बांधलेल आहे . तेव्हा देवळ वाचवण्याची जबाबदारी माणसांची आहे . देवाची नाही .