अत्तर

मनीषा's picture
मनीषा in जनातलं, मनातलं
13 Dec 2013 - 1:36 pm

बादशहांच्या दरबारात खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
आमंत्रितां समोर दौलतीची शान मिरविण्यासाठी बादशहा, बीरबल समारंभाच्या तयारीकडे जातीने लक्ष पुरवित होते.
काही नोकर चांदीच्या अत्तरदाण्या घेऊन आले.
बादशहांना पाहून सलाम करत होते.
या गोंधळात एकाच्या हातातील अत्तरदाणी पडून अत्तर उंची गालीचावर सांडले.
न राहवून बादशहाने ते चटकन बोटाने टिपून आपल्या अंगरख्याला लावले.
बीरबलाकडे पाहताच बादशहा खजील झाले. बीरबल मिश्कीलपणे हसत होता.
बादशहाने रागारागाने आपल्या अधिकार्‍याला हुकूम फर्मावला, की तेथे असलेल्या हौदात पाण्याऐवजी अत्तर भरा.
हौदात अत्तर भरले जात असताना बीरबलाकडे अभिमानाने बघत बादशहांनी विचारले,
“क्यू बीरबल क्या खयाल हैं ?"
क्षणभर थांबून बीरबल उत्तरला,
"शहेनशहा, बुंद से गई, वो हौदसे नहीं आती।"

( शतशब्द कथा )

बालकथाविरंगुळा

प्रतिक्रिया

शैलेन्द्र's picture

13 Dec 2013 - 1:46 pm | शैलेन्द्र

:)

अकबर कोण आणि बिरबल कोण तेही सांगून टाका.. :)

मनीषा's picture

14 Dec 2013 - 5:25 pm | मनीषा

आता काय सांगणार?
सगळ्यांना माहितीय की ...

मुक्त विहारि's picture

14 Dec 2013 - 5:35 pm | मुक्त विहारि

"अकबर-बिरबल" मालिकेत होते बघा...

(कोणे एकेकाळी मी पण मालिकेची नावे बघत होतो.)

सुहास..'s picture

13 Dec 2013 - 1:47 pm | सुहास..

गुड ..अत्तराची चर्चा तर होणारच ;)

देवांग's picture

13 Dec 2013 - 1:55 pm | देवांग

होऊ दे अत्तराला खर्च

रमेश आठवले's picture

13 Dec 2013 - 2:46 pm | रमेश आठवले

रणजीतसिंहांची कंजुषी
हीच गोष्ट एक सत्य कथा म्हणून शिख महाराजा रणजितसिंह यांच्याबाबत फार वर्षापूर्वी ऐकिली होती. त्या कथेत एक परदेशी व्यापारी त्यांच्या दरबारात अत्तरे विकावयास आला होता. राजानेही अकबराच्या बाबतीत लिहिले आहे तेच केले. जमिनीवर पडलेला अत्तराचा थेंब (बुंद) राजाने उचलून वापरला.त्यावर तो व्यापारी कुत्सित पणे हसला.
(आणि कथेच्या शेवटी तो म्हणाला की जमिनी वरचा एक थेंब टिपण्याच्या क्रियेमुळे आपली गेलेली इज्जत अत्तराने हौद भरल्याने परत येणार नाही.)
बुंद से गई, वो होजसे नहीं आती.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Dec 2013 - 2:56 pm | अत्रुप्त आत्मा

आओ....ते अत्तराला त्याल कोन्चं वापारलं??? येक नम्ब्री? का दोन नम्ब्री??? त्ये सांगा हो! ;)

धुरंधर बाबा -- काई कळंना .. ़ ़ काय इचारलंसा ?
धुर लै झालाया ...

तुमचा अभिषेक's picture

13 Dec 2013 - 6:28 pm | तुमचा अभिषेक

लेखनविषय आपण बालकथा लिहिले आहे,
जर लिहिताना हेतू बालकथा लिहायचाच असेल तर असे १०० शब्दांत बांधू नका. इथे कोणाला आवडो न आवडो बालगोपाळांना काय कसे वाचायला आवडेल असा विचार करून खुलवून लिहा.
पु ले शु.

मनीषा's picture

14 Dec 2013 - 5:36 pm | मनीषा

सल्ल्यासाठी आभार !