नव'मिपाकराचे' मूरलेल्या 'मिपाकरास' पत्र (विडंबन)

युगन्धरा@मिसलपाव's picture
युगन्धरा@मिसलपाव in जनातलं, मनातलं
3 Dec 2013 - 4:45 pm

प्रिय मिपाकरांनो,
('असुद्लेखन'च्या चुका चालु ठेवत)

प्रत्येक हौशी मराठी माणसाप्रमाणे मी ही मिपावर लेखन करण्यास बरेच दिवसांपासुन खुप उत्सुक होते. बरिच स्वप्ने रंगवत होते.

पण आज मला जाणिव होते आहे की 'मिपा' म्ह्णजे फक्त मराठी साहित्य न्ह्वे. तर त्याहि पलिकडे 'मिपा' म्ह्णजे 'असुद्लेखना'च्या चुका काढणारया तज्ञ मंडळींची फौज, दुसरयांच्या भावना न समजुन घेणारया लोकांची गर्दि .

मी मला हव ते 'मिपा' वर नाहि लिहु शकत.
मला सर्वांसारखे विनोदिच आणि सर्वांना रुचेल, पचेल असच लिहाव लागेल .
'असुद्लेखना'च्या चुका तर अजिबात नाहि करु शकत.
मराठीतले विद्वान लोक इथे तुमचा पेपर चेक करण्यासाठी बसले आहेत.
खास करुन लग्ना बाबतचे(सो कॉल्ड इमोशनल) लेख तर मुख्य फळ्यावर चुकुनही लिहु शकत नाहि.
मी ए़खाद्या लेखिकेसारखी मला वागणू़क मिळावी अस अजिबात म्ह्णत नाहि . माफ करा माझी तेवढी लायकी नाही.
पण मला "माझ्या" मराठी लोकांनी समजुन घ्यावे एवढी माफक अपेक्षाही इथे पुर्ण होत नाहि.

एकेकदा मी स्वत: ला विचारते , ' कशाला च्यायला या 'मिपा' वर धडपडले मी?'.
खुप खुश होते मी इतर संकेतस्थळांवर.

पण मला जाणिव झाली कि 'मूरलेल्या 'मिपाकरांनो तुम्हिही या फेज मधुन गेलाच असाल ना?'
कितीतरी लोकांनी तुमच्याही 'असुद्लेखना'च्या चुका काढल्या असतील.
नको नको ते प्रतिसाद दिले असतील........
पण तुम्ही लिखाण चालुच ठेवलत ना ?
पण तुम्हि लिखाण चालु ठेवल नसतत तर आज जे काहि छान लिखाण 'मिपा'वर आहे ते कदाचित नसत.

हे सर्व बघुन मी खुप शांत होते आणि मला माझ्या 'मिपा'वर असण्याचा अर्थ उमगतो.

वेळ हे काहि गोष्टींवर औषध आहे आणि मला खात्रि आहे कि जसा जसा वेळ जाईल तशी मी ही रुळेन या सर्वांमधे.
आणि मिपा'वरचे धक्के पचवेन मी ही तुमच्याप्रमाणे ..........................................

तुम्ही काढलेल्या 'असुद्लेखना'च्या चुकांबद्द्ल धन्यवाद........
दिलेल्या प्रतिसादांबद्दल तर खुप आभारी आहे....................
तेच माझ्या साठि प्रेरणा दायि आणि माझे बळ वाढवणारे ठरतात.......................................................

विडंबनप्रतिसाद

प्रतिक्रिया

अनिरुद्ध प's picture

3 Dec 2013 - 4:48 pm | अनिरुद्ध प

पु ले शु

विटेकर's picture

3 Dec 2013 - 4:50 pm | विटेकर

छ्प्पर फाडके !

दिपक.कुवेत's picture

3 Dec 2013 - 4:58 pm | दिपक.कुवेत

त्या "नवविवाहितेचे आईस पत्र" पेक्षा हे कितीतरी पटिंनी छान आहे. अश्याच लिहित्या रहा!

विद्युत् बालक's picture

3 Dec 2013 - 5:02 pm | विद्युत् बालक

मगास पासून बघतोय तुमची उजवी स्मायली किस करण्या शिवाय काहीच करत नाहीये :D

दिपक.कुवेत's picture

3 Dec 2013 - 7:43 pm | दिपक.कुवेत

काय आहे? माझी स्मायली कि तीचा किस?

विद्युत् बालक's picture

3 Dec 2013 - 4:59 pm | विद्युत् बालक

+१ ० ० ० ० ०

मिसळपाव म्हणजे रिंगण करून एकमेकांना गोन्जारणाऱ्या लोकांचा कळप झाला आहे . तुम्ही लेख वगैरे च्या भानगडीत पडू नका इथे ते फक्त काही लोकांनाच राखीव आहे ताई , फक्त इथे वावरा व प्रतिसादांचा आस्वाद घ्या :)

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Dec 2013 - 6:20 pm | बिपिन कार्यकर्ते

नेमेचि येतो मग पावसाळा!

फलाटावरचे काही काळाने येतातच हो डब्यात! मग चाल बदलते.

सोत्रि's picture

3 Dec 2013 - 6:32 pm | सोत्रि

आता बिका बोलले म्हटल्यावर बाडिस होण्यावाचून गत्यंतर ना:), सबब बाडिस :)

- (अजुनही फलाटावरच असलेला) सोकाजी

प्यारे१'s picture

3 Dec 2013 - 8:20 pm | प्यारे१

>>> - (अजुनही फलाटावरच असलेला)

आँ???? च्या मायलीला! (माताय) ;)
फर्ष्ट्क्लास एसीतनं प्रवास करुन आलाय नि म्हणे अजून फलाटावरच???

बाकी @ बालक

रिंगण, झिम्मा, सागरगोट्या हे असे सगळे खेळ नव्यांनी नव्यानं, जुन्यांनी जुन्या पद्धतीनं, नव्यांनी जुन्या, जुन्यांनी नव्या अशा सगळ्या पद्धतीनं खेळले गेलेले आहेत, खेळले जातात, खेळले जातील.

ते कसं शाळेत असतंय! आमच्या क्लासनं ना लईईईई मजा केली. तसंच इकडं आहे.
नथिंग एल्स. बाकी कोणती तरी एक शाळा 'इन्टरनॅशनल स्कूल' नि कोणती तरी 'नगरपालिकेची शाळा नंबर ५' असतेच. त्यातही तुकड्या असतात. आपापल्या हुशारीप्रमाणं प्रवेश घेतात लोक. नाही प्रवेश मिळाला की ओरडतात.
त्यापुढचं. पूर्वी ७०% लाच मेरीटात नंबर यायचा म्हणे.
हल्ली ९८ % ला सगळं बंद होतं तरी पोरं हुशार नसतात
(असं जुनेच ठरवतात.)

त्यामुळं ह्या ह्या ह्या....

विद्युत् बालक's picture

3 Dec 2013 - 8:26 pm | विद्युत् बालक

रिंगण, झिम्मा, सागरगोट्या हे असे सगळे खेळ नव्यांनी नव्यानं, जुन्यांनी जुन्या पद्धतीनं, नव्यांनी जुन्या, जुन्यांनी नव्या अशा सगळ्या पद्धतीनं खेळले गेलेले आहेत, खेळले जातात, खेळले जातील.
तुमच्या खरड वहीतील खेळ पण ह्याच प्रकारात मोडतो का?

खरडवही वाचक - बालक :)

प्यारे१'s picture

3 Dec 2013 - 8:33 pm | प्यारे१

आँ????
विद्युत बालक.
>>>सदस्यकाळ
>>>4 years 10 months

___/\___
क्षमस्व. आपण जाणकार. आम्ही बालक. अधिक काय बोलणे? उणे पदरी घ्यावे.
धाकुले बोल ऐसे मानोन क्ष्मा केली पाहिजे.

विद्युत् बालक's picture

3 Dec 2013 - 8:39 pm | विद्युत् बालक

म्हणजे तुम्ही नवीन सदस्यांचे रागिंग मान्य केले तर!
महाविद्यालातात जसा रागिंग विरोधी कायदा आहे तसा पण इथे आणता येईल का ? :P

प्यारे१'s picture

3 Dec 2013 - 9:00 pm | प्यारे१

आमच्याकडं 'इन्ट्रो' असते. रॅगिंग नाही. :)

अमोल मेंढे's picture

4 Dec 2013 - 11:52 am | अमोल मेंढे

आतले आणि बाहेरचे हा फरक सगळीकडेच आहे हो...

प्यारे१'s picture

4 Dec 2013 - 12:09 pm | प्यारे१

>>>खैर, खून, खांसी, खुसी, बैर, प्रीति, मदपान |
>>>रहिमन दाबे न दबे, जानत सकल जहान |

खूप छान आहे स्वाक्षरी.

ब़जरबट्टू's picture

3 Dec 2013 - 9:45 pm | ब़जरबट्टू

हेच मत आहे... कळप... =))

खटपट्या's picture

4 Dec 2013 - 3:36 am | खटपट्या

मिसळपाव म्हणजे रिंगण करून एकमेकांना गोन्जारणाऱ्या लोकांचा कळप झाला आहे

कधी कधी असे वाटते…।

स्पंदना's picture

4 Dec 2013 - 3:51 am | स्पंदना

अहो खटपट्या तस नाही आहे. मिसळपाव हे समाजाचे एक लघु जालीय रुप आहे. थोड्या काळाने तुम्हालाही कोणाबद्दल स्नेह वाटु शकतो. उगा अंटेन्शन सीकर होउ नका.

हो अपर्णातै, म्हणूनच म्हटले कधी कधी वाटते. पण असे कोणालाही वाटून न देण हे तुमच्या/आमच्या हातात आहे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

3 Dec 2013 - 5:07 pm | राजेंद्र मेहेंदळे

जिलब्या नाही जमल्या तरी पिंका टाकत र्हायचं

मला तर वाटुन राहलय भौ , हा युन्गंधरा@मिसलपाव हा कुना जुन्या जाणत्या मिपाकराच डुआयडी हाय
.

सगळ्या शाखा बंद केलेला - तथास्तु

अत्रुप्त आत्मा's picture

3 Dec 2013 - 5:31 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.pic4ever.com/images/2i8d4ao.gif
http://www.pic4ever.com/images/176.gif
http://www.pic4ever.com/images/2i8d4ao.gif

पैसा's picture

3 Dec 2013 - 6:10 pm | पैसा

पहिल्या लेखापेक्षा हा लेख स्वतंत्रपणे लिहिलेला म्हणून आवडला. जरूर लिहा. चुका सुधारायचा प्रयत्न तरी दिसला पाहिजे. शुभेच्छा!

सुहास..'s picture

3 Dec 2013 - 6:17 pm | सुहास..

हा हा हा !

एकाच लेखानंतर सुधारणा !!

( दया , कुछ न कुछ तो गडबड है !! )

ड्यु आय डी ..आपल हे सी आय डी
वाश्या ;)

जेनी...'s picture

3 Dec 2013 - 7:53 pm | जेनी...

भार्रीच .....

लाल टोपी's picture

3 Dec 2013 - 8:28 pm | लाल टोपी

मिपा इतर सर्वांपेक्षा नवलेखकाला अधिक प्रोत्साहन देणारे आहे. तिरकस प्रतिक्रिया देखील खूप शिकऊन जातात.
पु.ले.शु.

लेखनाकडे कधी नवीन विषय तर कधी विषय नेहमीचाच पण वेगळ्या शैलीत असेल या उत्सुकतेने वाचक येतात .

दुसरा कोणता विषय (उदा:
चालू घडामोडी ,चर्चा ,
कथा ,कविता इत्यादि अजमावून पाहा .

मुक्त विहारि's picture

3 Dec 2013 - 9:29 pm | मुक्त विहारि

छान जमले आहे विडंबन

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Dec 2013 - 9:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नवविवाहितेचे आईस पत्र आणि हे विडंबन आवडलं. ब-याचदा लेखनावर, अशुद्धलेखनावर टिका केल्यामुळे काही लिहायची इच्छा होत नाही, पण मिपा समजलं की मग हिम्मत वाढत जाते. एक तरी शुद्धलेखनाची चुक सापडावी यासाठी एक डोळा उघडून आणि एक डोळा बंद करून असे लेखन शोधणारे शुद्ध चिकित्सक ऋषि तसे आता दिसत नाही. :)

पुढील लेखनासाठी शुभेच्छा...!!!

-दिलीप बिरुटे

आशु जोग's picture

4 Dec 2013 - 1:45 am | आशु जोग

नव'मिपाकराचे' मूरलेल्या 'मिपाकरास' पत्र

मूरलेल्या मिपाकराचे मिपाकरास पत्र

शिद's picture

4 Dec 2013 - 2:13 am | शिद

ओ ताई/दादा,

तुमचा लेख आणि लगोलग आलेले विडंबन पाहता तुम्ही नवमिपाकर वाटता मुरलेल्या मिपाकरच जास्त वाटताहेत.

शिद's picture

4 Dec 2013 - 2:16 am | शिद

नवमिपाकर वाटता

स्पंदना's picture

4 Dec 2013 - 3:12 am | स्पंदना

http://www.misalpav.com/node/26279 हा लेख एका नवमिपाकराचाच आहे ना?
कळप वगैरे काही नाही. आहे तो एकमेकाबद्दलचा कालांतराने आलेला स्नेह! तुमच काय झालय तुम्ही लग्न होउन नव्या आलेल्या सूने सारख्या आहात. आल्या आल्या मी आता इथली मालकिन! असा काहीसा चढा सूर वाटतोय.
अशुद्ध लेखनावर कोणीही हसले नाही. हसू फुटलं ते पोकळ फुटक्या आदर्शवादाच! मुलगी रडत रडत आईला तिच्या त्यागांची आठवण करुन देत स्वतः त्यागासाठी तयार होत आहे अस काहीस....जे आजच्या जमान्यात कुणालाच पटणारे नाही. काहीही लिहा पण तुमच्या मनाला पटणारे अन तुमचे स्वतःचे लिहा. उगा चेपूवरची अन गबोल्यावरची ढकलपत्रे , जी आम्ही सगळेच वाचतो तिच पुन्हा थोपू नका.

युगन्धरा@मिसलपाव's picture

4 Dec 2013 - 10:58 am | युगन्धरा@मिसलपाव

अरे वा काय जमाना आला आहे आई ने केलेल्या त्यागांची पण किम्मत नाही राहीली रे...........
घोर कलियुग दुसरे काय??????????????

अजुन चार प्रश्नचिन्हे टाका. अलाइनमेण्ट जस्टीफाय होइल. ;-)

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Dec 2013 - 11:11 am | llपुण्याचे पेशवेll

पटले नाही. माझ्या हापिसात तथाकथित स्वतंत्र स्वतंत्र ची टिमकी वाजवून, परत यथावकाश लग्नं झाल्यावर पोराबाळांसाठी कष्ट उपसणार्‍या मुली (आता आई) मी पाहील्या आहेत. उपरोधाने त्यांना चिडवल्यावर," अरे काय सांगू मुलांसाठी कराव्या लागतात सगळ्या गोष्टी. सगळे आपले काम सोडून जावे लागते" असे म्हणताना पाहील्या आहेत. त्यामुळे त्यातल्या आदर्शवादाबद्द्ल मला तरी हसू फुटले नाही. शेवटी धग लागल्यावर ,सोसल्यावर कळतो आदर्शवाद वगैरे. असो, बाकी चालूद्या.

युगन्धरा@मिसलपाव's picture

4 Dec 2013 - 11:34 am | युगन्धरा@मिसलपाव

बरोबर आहे तुमचे...... आजही मुलाबाळांसाठी (सो कॉल्ड आउटडेटड भावना) त्याग करणारे आई वडिल आहेत.
ज्यांना आपल्या मुलांनी मोठे होउन नाव कमवावे से वाटत ते लोक खरचं मुलाबाळांसाठी कष्ट उपसतात.

विटेकर's picture

4 Dec 2013 - 11:07 am | विटेकर

अपर्णा ताईंना.. मिपाच्या सुषमा स्वराज म्हणावे काय ? लैच सडेतोड.....
एक घाव अन दो न तु़कडे , उगं गुळुंमुळु गुळुंमुळु न्हाय !
काय म्हंता ? हल्ली कौल प्रकार बंद झालाय ना !

तिमा's picture

6 Dec 2013 - 6:04 pm | तिमा

मिपावर नवीन मेंबर्सना रॅगिंग करणारी कंपूबाजी नाही. या संस्थळावर जे चांगले लेखक आले त्यांचे पहिल्या लेखापासूनच स्वागत झाले. प्रतिक्रिया येणारच. त्या चांगल्या का थट्टेखोर हे त्या त्या लेखनाच्या गुणवत्तेनुसार असते. मुद्दामहून अशा प्रतिक्रिया दिल्या जात नाहीत.
त्या उस्फूर्तपणे येतात.
आता शुद्धलेखनाबद्दल! मिपावर शुद्ध लिहिण्यासाठी अनेक सुविधा दिल्या आहेत. गमभन चा कळफलक दिसण्याची सोय आहे. लिहिलेले कसे दिसते हे बघण्यासाठी पूर्वपरीक्षणाची सोय आहे. असे सर्व असताना अशुद्ध लिहायचे व त्यावर टीका झाल्यावर असे लेख लिहायचे हा कांगावा झाला.
तरी पुढील लेखनासाठी शुभेच्छा. आणि वरील सर्व सुविधा वापराल अशी आशा आहे.

- तिमा उर्फ तिरशिंगराव माणूसघाणे

विनटूविन's picture

7 Dec 2013 - 7:59 pm | विनटूविन

मुक्तपीठ वर नाहीका अशाच अनेक प्रतिक्रिया असत? चलता है म्हणायचं अन्‌ काय !