मित्रांनो,
मी माझ्या पुस्तकाचे मुखपृष्ठ स्वतः तयार केले आहे. ( आपल्याला आठवत असेल यातील दोन पूर्ण प्रकरणे मी मिपावर टाकली होती एक होते ज्यूंच्या शिरकणाबद्दल आणि दुसरे एक होते. असो) आता मी पुस्तक पूर्ण केले आहे (८३० पाने). हे जे मी मुखपृष्ठ तयार केले आहे ते ठीक आहे का याबद्दल आपली प्रांजळ मते मागवीत आहे. जर तुम्हाला आवडले तर मी दुसरे कव्हर डिझाईन करणार नाही व माझा बराच वेळ वाचेल. अर्थात जर दुसरे मत पडले तर मला ते करावेच लागेल....जेव्हा प्रकाशन होईल तेव्हा अर्थात मी कळवेनच....
पहिले मागचे पृष्ठ आहे.
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
23 Nov 2013 - 6:52 pm | प्रचेतस
मुखपृष्ठ अगदी समर्पक आहे.
पुस्तकाबद्दल अभिनंदन.
23 Nov 2013 - 7:04 pm | चित्रगुप्त
हे कव्हर बघून मला असे वाटले:
१. 'युद्धाचे वादळ' या पुस्तकाच्या नावाकडे आधी लक्ष न जाता डावीकडील "Andrew Roberts ते भाग-१" या मजकुराकडे खेचले जाते. हे नको असेल, तर 'युद्धाचे वादळ' डावीकडे दोन ओळीत घेऊन "Andrew Roberts ते भाग-१" हा मजकूर उजवीकडे उभा, एकाखाली एक असा घेता येईल, किंवा अगदी तळाशी आडवा टाकता येईल.
२. फाँट साईजः "भाग -१" सर्वात लहान, त्याहून मोठा "जयंत कुलकर्णी", त्याहून मोठा (किंवा ज.कु. एवढाच) "Andrew Roberts " आणि त्याहून मोठा "दुसर्या महायुद्धाचा नवीन इतिहास"
३. 'युद्धाचे वादळ' या शीर्षकासाठी आणखी दुसरा फाँट वापरल्यास अधिक परिणामकारक वाटेल. वाटल्यास 'युद्धाचे ' साठी जाडा ठसठशीत, आणि 'वादळ' साठी गतिमान, असेही होऊ शकते.
४. चित्र उत्तम आहे, परंतु रंगसंगतीत 'युद्धा' चे वातावरण निर्माण होण्याच्या दृष्टीने पार्श्वभूमिच्या आकाशात थोडासा लाल रंग बरा दिसेल. वाटल्यास आकाशातून बाँब टाकणारे विमान दाखवता येईल.
५. उजवीकडील मुख्य मनुष्याकृतीच्या उजव्या हातामागे जो सैनिकाचा चेहरा दिसतो आहे, त्याच्या डोक्याखालील शरीराचा भाग कुठे आहे? (मोठ्या आकृतीच्या हाताखालील त्रिकोणी मोकळ्या जागेत तो असायला हवा).
६. मलपृष्ठ चांगले आहे, यात "हिशेब केला तर दर दिवशी" च्या ऐवजी "म्हणजे दर दिवशी" जास्त सुटसुटीत वाटेल.
23 Nov 2013 - 7:08 pm | जयंत कुलकर्णी
महत्वाचा फीडबॅक दिल्यबद्दल मनापासून आभार......
23 Nov 2013 - 7:04 pm | आरोह
छान जमले आहे..
अभिनंदन !!
23 Nov 2013 - 7:08 pm | चित्रगुप्त
या ग्रंथाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.
( आधीच्या प्रतिसादात 'पूर्वपरिक्षण' च्या ऐवजी 'प्रकाशित करा' वर टिचकी दिली गेली).
23 Nov 2013 - 7:14 pm | चित्रगुप्त
"असे म्हटले तरीही चालेल" हे वगळले, तरीही चालेल.
23 Nov 2013 - 7:27 pm | पैसा
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा! पुस्तकाचे नाव पटकन लक्षात येण्यासाठी त्याची जागा बदलावी असे वाटते. बाकी छान!
23 Nov 2013 - 7:27 pm | पैसा
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा! पुस्तकाचे नाव पटकन लक्षात येण्यासाठी त्याची जागा बदलावी असे वाटते. बाकी छान!
23 Nov 2013 - 7:34 pm | प्यारे१
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
'युद्धाचे वादळ!' पांढर्या फॉन्टमध्ये न ठेवता लालसर अक्षरात करुन आत्ता लेखक नि इतर मजकूर आहे तिथं दोन ओळीत ट्राय केलं तर? नि लेखक नाव वगैरे उजव्या खालच्या कोपर्यात (सैनिकाच्या पोटाच्या भागात पांढरा)
नि 'नवीन' इतिहास असं का? कॅची वाटतंय खरं!
23 Nov 2013 - 7:54 pm | जयंत कुलकर्णी
नावीन अशासाठी की जे गोपनीय कागदपत्रे अनेक राष्ट्रांनी उघड केले त्याचा बराच उपयोग केला गेलाय.....
23 Nov 2013 - 8:28 pm | अभ्या..
@जयंत कुलकर्णी साहेब,
कव्हरवर नजर थांबत नाहिये. बाहर जातीय. इनपुट्स चांगले आहेत पण कम्पोजीशन ज़रा वेगले करा ना प्लीज. टायटल क्यालिग्राफिक अथवा वेगळ्या फॉण्ट मध्ये घ्या. जरासे बोक्सी अथवा रफ वापरा. ब्याक कवर ला ब्लर्ब ज़रा लहान फॉण्ट साइज हवा. खालची तिरपी अक्षरे सरळ हवीत.
अर्थात हे सारे माझ्या मते.:)
बाकी प्रतिक्रया येतीलच.
23 Nov 2013 - 9:28 pm | जयंत कुलकर्णी
बरोबर आहे ! डाव्या कोपर्यातून नजर बाहेर जात आहे. कदाचित टायटल तेथे टाकल्यावर काय होते आहे ते बघेन व परत येथे टाकेन....सर्वांच्या सुचनांचा विचार करुन ...
23 Nov 2013 - 9:10 pm | मन१
छान आहे मुखपृष्ठ.
अभिनंदन आणि शुभेच्छा.
24 Nov 2013 - 9:10 am | मदनबाण
अभिनंदन जयंतकाका... :)
24 Nov 2013 - 11:03 am | मुक्त विहारि
पण,
पुस्तका बद्दल अभिनंदन..
24 Nov 2013 - 11:11 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आनंद वाटला. पुस्तकाबद्दल अभिनंदन.
-दिलीप बिरुटॅ
24 Nov 2013 - 11:32 am | सुहास..
अभिनंदन , त्रिवार अभिनंदन
24 Nov 2013 - 12:46 pm | जयंत कुलकर्णी
मित्रहो,
माझे लिखाण आवडू शकते याचा शोध मला मिपावरच लागला हे मी विसरु शकत नाही........
सर्वांना धन्यवाद !
25 Nov 2013 - 4:14 am | अर्धवटराव
हे कव्हर म्हणजे एखाद्या हॉलीवुड वॉर मुव्हीचं डीव्हीडी कव्हर वाटतय.
महायुद्धाबद्दल माणसाचे चेहेरे किंवा बंदुकीच्या ऐवजी तत्कालीन जगाचे नकाशे जास्त भेदकपणे वापरता आले असते. अणुस्फोटात विध्वंस होणारा जपान, अमेरीकेहुन ब्रीटनकडे मदत घेऊन जाणारी जहाजं, लेलीनग्राडला रोखुन धरलेला जर्मन सेनासागर, पर्लहार्बरकडे निघालेलं जपानी आरमार... अशा/यातल्या दोने-तीन महत्वपूर्ण घटना ठळकपणे नकाशावर चित्रीत करुन हे युद्ध खरोखर जागतीक कसं होतं याचा प्रत्यय केवळ मुखपृष्ठावरुन यायला हवा असं काहि करता येईल काय?
25 Nov 2013 - 6:55 am | स्पंदना
+१ टु अर्धवटराव.
काहीतरी वेगळं कव्हर हवं. जे आत्ता आहे ते सर्वसाधारण सर्वच युद्धचित्रपट अन कादंबर्या वापरतात. हा इतिहास आहे हे ठसवणार काही तरी हवे.
जसे की हिटलरचे पुस्तक नुसता एक स्वस्तिक दाखवुन ठसवले जाते तस काहीस.
25 Nov 2013 - 8:10 am | पाषाणभेद
सहमत. काहीतरी वेगळे हवे पण नक्की काय ते सांगता येत नाही.
26 Nov 2013 - 8:20 pm | चित्रगुप्त
सहमत.
या विषयावर आधीच अनेक पुस्तके, डीव्हीडी, यूट्यूब वरील व्हिडियो वगैरे उपलब्ध असताना आणखी हे पुस्तक लोकांनी घ्यावे/वाचावे, असे त्यात विशेष काय आहे, अशी उत्कंठा जर कव्हर मधून जागृत करता आली, तर जास्त चांगले. आजवर अप्रकाशित असे 'काही नवीन पुरावे' जर उपलब्ध झालेले असतील, आणि त्यावर हे लिखाण आधारित असेल, तर ही गोष्ट ठळकपणे कव्हरावर यावी.
25 Nov 2013 - 8:36 am | निनाद
इतिहास विषयक लेखन असेल तर समतोल लेखन दर्शवण्यासाठी मुखपृष्ठ शुभ्र पांढरे घेऊन त्यावर समर्पक कॅलिग्राफी घेता येईल का?
26 Nov 2013 - 4:40 pm | जयंत कुलकर्णी
कोणाला या पुस्तकाचे मुखपृष्ट तयार करण्यात रस असेल त्यांनी कृपया मला व्यनि करावा कारण कॅलिग्राफी इ. मला जमेल असे वाटत नाही....जर ते मुखपृष्ठ वापरले गेले तर त्या कलाकाराचे नाव व इ-मेल त्यावर टाकता येईल....ही जहिरात चांगली असेल असे आपले मला वाटते....अर्थात ते वापरले गेले तरच हे शक्य आहे व त्यासाठी ते योग्य झाले असले तर व मला आवडले तर मी निश्चितच ते वापरीन यावर विश्वास हवा....
28 Nov 2013 - 6:57 am | सुधीर कांदळकर
फिक्या रंगातील रक्तलांच्छित नकाशे परिणामकारक दिसतील.
28 Nov 2013 - 3:22 pm | चिगो
अभिनंदन.. वर आलेल्या सुचनांप्रमाणे, पुस्तकात येणार्या 'नावीन्याचा' अंदाज येईल, असे कव्हर हवे. माफ करा, पण हे कव्हर एखाद्या वाॅर/शुटींग गेमच्या सिडिचे कव्हर वाटतेय..
28 Nov 2013 - 4:09 pm | अग्निकोल्हा
पुस्तक व्यनी करावे.