येत्या शनिवारी (२३ NOV) सायंकाळी सात वाजता(19.00) माझ्या मुलाखतीचा गुंतवणूक आणी अर्थ विषयक कार्यक्रम DSP BLACKROCK प्रायोजित Plan F: Your Financial Fitness Plan, Episode - ५ हा CNBC TV -18 प्रसारित होणार आहे. हाच कार्यक्रम रविवारी(२४ NOV) सायंकाळी आठ(20. 00) वाजता पुनः प्रसारित होईल. याची झलक तू नळी वर उपलब्ध आहे. पण त्याच्या दुव्यावर टिचकी मारली तर तो भलतीकडेच जातो. पण वरील इंग्रजी शब्दच दुवा म्हणून तेथे टाकल्यास आपल्याला तो पाहता येईल. हा कार्यक्रम फारसा उपयोगी नाही असे माझे स्वतःचे मत आहे परंतु त्या कार्यक्रमानंतर देण्यात येणाऱ्या टिप्स चांगल्या असतात. हा कार्यक्रम "जागो इन्व्हेस्टर" या जालावरील वैयक्तिक अर्थकारण आणी गुंतवणूकदारांचे शिक्षण देणारा ब्लॉग (http://www.jagoinvestor.com/) यांनी सह प्रायोजित केला आहे.
हा ब्लोग अतिशय उपयुक्त आहे असे माझे मत आहे आणी माझे अर्थविषयक शिक्षण आणी जागृतीकरणा च्या टप्प्यावर मला भेटलेला एक चांगला ब्लॉग आहे असे माझे मत आहे.
याची मूळ पार्श्व भूमी अशी आहे. लष्करातून निवृत्त होताना मला एक जाणवले कि इतकी वर्षे लष्कराच्या भाकऱ्या भाजताना स्वतःच्या आर्थीक सुरक्षिततेचा मी विचारच केलेला नव्हता. तसेच आपल्या शिक्षण अभ्यासक्रमात आर्थिक शहाणपण(FINANCIAL WISDOM) याचा कोठेही उल्लेख सुद्धा नव्हता. तशात माझे एक रुग्ण सेन्ट्रल बँकेत लिपिक होते ते तेथे असणार्या गुजराती ग्राहकांकडून ते समभागात गुंतवणूक शिकले आणी निवृत्त होताना त्यांनी बरीच माया जमविली आहे असे त्यांच्याशी बोलताना मला कळले . त्यांच्याशी बोलताना आपण अर्थविषयक किती निरक्षर आहोत हि मला जाणीव झाली त्यामुळे मी स्वतः या गोष्टींकडे लक्ष देण्यास सुरुवात केली . आणी ज्या चुका माझ्या आयुष्यात झाल्या त्या आपल्या मुलांच्या आयुष्यात होऊ नयेत म्हणून मी जाणीवपूर्वक लक्ष घालायला सुरुवात केली. मुलांचे अर्थ विषयक शिक्षण सुद्धा सुरु केले आहे. यात अर्थविषयक नियतकालिके मासिके आणी वृत्तपत्रे यांचा समावेश आहे. त्यात मला वरील ब्लॉगचा संपर्क आला.
यात स्वतः चा उदो उदो केल्याची भावना मला जाणवत आहे परंतु त्याला दुसरा इलाज मला सापडत नाही. असो
DISCLAIMAR -- जागो इन्व्हेस्टर किंवा DSP BLACKROCK शी माझा कोणताही वैयक्तिक व आर्थिक संबंध नाही.
एकमेका साह्य करू
अवघे होऊ श्रीमंत
प्रतिक्रिया
21 Nov 2013 - 1:59 pm | मिलिंद
धन्यवाद डॉ. कार्यक्रम तर नक्कीच पाहीन. पण आपण नक्कीच काही वेगळे केले असाल म्हणून आपणांस कार्यक्रमात सहभागी करुन घेतले असेल ना त्याविषयीपण लिहा ना जरा....
आणि हो
'एकमेका साह्य करू
अवघे होऊ श्रीमंत'
हे मात्र आवडले.
21 Nov 2013 - 2:52 pm | अनिरुद्ध प
+१ सहमत
21 Nov 2013 - 10:36 pm | कंजूस
लहानपणी ज्या गोष्टी कानावर पडतात त्याचा पुढे कळत नकळत उपयोग आपण करत असतो अथवा त्याची जाण राहाते . पैसा याविषयी मुले ऐकतील तर त्याचा नक्कीच फायदा होईल .कार्यक्रम पाहाणार आहे .
21 Nov 2013 - 10:43 pm | पैसा
तुमचा कार्यक्रम म्हणून जरूर पाहीन!
21 Nov 2013 - 11:05 pm | मुक्त विहारि
कार्यक्रम म्हणून जरूर पाहीन
21 Nov 2013 - 11:48 pm | रुस्तम
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद....
22 Nov 2013 - 12:48 am | बॅटमॅन
"एकमेकां साह्य करू, अवघे होऊ श्रीमंत" हे बाकी मस्त आवडले.
22 Nov 2013 - 1:07 am | डॉ सुहास म्हात्रे
खरं आहे ! कार्यक्रम जरूर बघण्यात येईल.
कोणीतरी म्हटले आहेच की, "नाय खिशात मनी, तर पुसंना कुनी !"
22 Nov 2013 - 5:48 am | स्पंदना
अभिनंदन.
पैसा नुसता कमवुन चालत नाही, तो सांभाळायचीही अक्कल असावे लागते.
तु नळीवर कार्यक्रम पाहेन.
22 Nov 2013 - 9:05 am | तुषार काळभोर
आता अर्थविषयक एक लेखमाला अपेक्षित आहे.
डॉ. खरे, क्लिंटन आदींनी मिळून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अर्थकारण, वैयक्तिक अर्थनीती, गुंतवणूक, सामान्य लोकांना साहाय्यकारी होतील अशा सरळ-सोप्या योजना इ. विषयी एखादी लेखमाला सुरू करता येईल का?
लेखकाने शेवटच्या परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे, आपल्याकडे सर्वच (आर्थिक)थरात अर्थविषयक शिक्षणाचा (व ज्ञानाचा) अभाव आहे. सामान्य लोक बँकेतील एफडी, प्रॉव्हीडंड फंड, पोस्ट, विमा(गुंतवणुकीच्या हेतुने काढलेला) याच्या पलिकडे जात नाहीत. तर त्या अनुषंगाने थोडाफार प्रचार-प्रसार करता येईल का?
प्रत्येक लेखानंतर प्रतिक्रियांमधून होणार्या चर्चा-वादविवाद-मंथन-प्रश्नोत्तरे यातून आणखी माहिती मिळेल.
22 Nov 2013 - 2:13 pm | कंजूस
#पैलवान पूर्ण सहमत .सुरू कराच .साधा रेल्वे रेझर्वेशन फॉम ,बैंकेचा KYC फॉम भरता येत नाही ,शिकायची पण इच्छा कित्येक दाखवत नाहित तर इन्वेस्टमंट दूरच राहिली .परवा डोंबिवली कट्टयावर मुवि हेच सांगत होते परदेशी जाण्याबद्दल मराठी तरुणांना मार्गदर्शनासाठी तयार आहोत पण पुढे येऊन कोणी वकशॉपचे आयोजन करत नाहित . बघु पुढे काय होते ,
27 Nov 2013 - 7:54 pm | सुबोध खरे
माझ्या कार्यक्रमाचा तू नळी चा दुवा खाली देत आहे Plan F: Your Financial Fitness Plan, Episode - 5
http://youtu.be/B13fS4Y0NgY
27 Nov 2013 - 8:47 pm | राघवेंद्र
मी हा कार्यक्रम बघितला. आशिश सरांचे मुद्दे एवढे पटले नाहित. तुमची गुंतवणुक पटण्यासारखी आहे.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी मधील गुंतवणुक मर्यादा १ लाख आहे. एका कुटुंबातील सर्व सदस्यानी खाते काढले तर जास्त फायद्याचे होते. आशिश सरांचा जोर यावर का होता हे कळाले नाही. या निधी मधे रोकडात रूपांतर करण्याची सुलभता (liquidity) पण जास्त नाही आहे.
28 Nov 2013 - 8:07 pm | सुबोध खरे
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी मधील गुंतवणुक हि अतिशय सुरक्षित समजली जाते म्हणजे अफरातफर केल्याच्या गुन्ह्यात आपण तुरुंगात गेलात तरीही त्या पैशातून सरकार पैसे वसूल करू शकत नाही.शिवाय हि गुंतवणूक सहजा सहजी काढता येत नसल्याने लोक समभागात टीप मिळाली म्हणून त्यातून पटकन काढून गुंतवू शकत नाहीत. त्यामुळे बर्याच लोकांचे पैसे वाचलेले आहेत. यात एक लाखापर्यंत गुंतवणूक करता येते परंतु त्यातील सत्तर हजारावर करमाफी आहे. शिवाय याचे व्याज आणि मुदतीनंतर मुद्दल सुद्धा करमुक्त आहे. त्यामुळे हि गुंतवणूक EEE (exempt -exempt -exempt) अशी एकमेव गुंतवणूक आहे( ज्यात मुद्दल व्याज करमुक्त असून गुंतवणुकीवरही करमाफी आहे. आशिष सरांचा थोडासा गैरसमज झाला होता कि माझे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी मध्ये खाते नाही. (खाती मी मुलांच्या नावाने त्यांच्यासाठी उघडलेली आहेत. त्यात माझा हेतू असा कि मुलांना पण तिशी च्या आसपास थोडे फार पैसे उपलब्ध व्हावेत आणि ते (गद्धे) पंचविशीच्या अगोदर त्यांना काढता येऊ नयेत).
असो
28 Nov 2013 - 9:22 pm | एस
मला एक प्रश्न विचारायचा आहे. साभनिनिधी जरी सर्वात सुरक्षित गुंतवणूक समजली जात असली तरी तरुणांनी त्यात गुंतवणूक करणे कितपत योग्य ठरू शकेल? विशेषतः कल्पना करा की एखादी व्यक्ती तरूण आहे आणि कमावती नुकतीच झाली आहे. त्याचबरोबर इतरही अनेक जबाबदार्या असल्याने कमाईतून खर्चही बराच जास्त होतो आहे. मग अशा व्यक्तीने तिची स्वप्ने किंवा आर्थिक उद्दिष्ट्ये पूर्ण करण्याच्या दृष्टीने हाय-रिस्क बेस्ड म्हणजेच इक्विटी/म्युच्युअल फंड हा रस्ता निवडण्याशिवाय तिला पर्याय नसेलच. इथे जी काही थोडीफार बचत होते आहे ती भविष्यनिर्वाहनिधीमध्ये गुंतवणे आणि त्यातही हवी तशी तरलता नसणे हीच मोठी रिस्क ठरणार नाही का?
29 Nov 2013 - 2:08 pm | सुबोध खरे
साहेब,
सत्तर हजारापर्यंत केलेल्या गुंतवणुकीवर तीस टक्के पर्यंत कर माफी होते म्हणजेच जर आपण हि गुंतवणूक दहा वर्षे साठी ठेवली तर वर्षाला तीन टक्के अधिक आत्ताचा व्याज दर ८.७ म्हणजे आपल्याला ११.७ टक्के "करमुक्त" परतावा आहे.शिवाय त्यात कोणताही धोका नाही.निव्वळ मुद्दलचा नव्हे तर व्याजसुद्धा हमखास आणी सुरक्षित आहे. तेंव्हा नोकरीला लागल्यावर लगेच यात निर्धोक गुंतवणूक करू शकता.शिवाय याने एक बचतीची सवय सुद्धा लागते. जरी PPF १५ वर्षाचा असला तरी आपण ७ वर्षांनी त्यातून पैसे काढू शकता म्हणून हे सरासरी दहा वर्षे धरले आहे. (खरं तर सातव्या वर्षापासून आपण "आपले" पैसे काढून तेच पैसे परत PPF मध्ये गुंतवून एक पैसा न भरता कर वाचवू शकतो आणी जसा काळ जाईल आणी आपल्याला अनुभव येइल तसे आपण जास्त धोकादायक गुंतवणुकीत (समभाग किंवा म्युच्युअल फंड) पडू शकतो. अर्थात एखादा जर "अर्थ" शिक्षित असेल तर तो हा मार्ग अगोदर सुद्धा स्वीकारू शकतो
30 Nov 2013 - 12:35 am | एस
तीस टक्के करमाफी मिळायला त्या उत्पन्नगटात आपण मोडायला हवे. मी उल्लेख केलेला गुंतवणूकदार हा दहा टक्क्यांपर्यंतच कर भरणारा असेल तर त्याला एवढा परतावा तसा मिळणार नाही. दहा वर्षांनी तो कदाचित तेवढ्या गटात पोहोचेन पण आत्ता त्याला जे नजिकच्या भूतकाळातले काही खर्चिक प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत. त्यासाठी अधिक जोखीम पत्करून गुंतवणूक करणे आणि त्यातही तरलता सांभाळणे हेच आव्हान ठरेन. अर्थातच किमान थोडा का भाग होईना सार्वजनिक भविष्यनिर्वाहनिधीत गुंतवले पाहिजेत हे मान्य. त्यातही करबचतीसाठी सातव्या वर्षापासून पैसे काढून पुन्हा गुंतवणे हा करबचतीचाही चांगला मार्ग आहे. ह्या क्लूबद्दल धन्यवाद.
27 Nov 2013 - 8:11 pm | रुस्तम
तू नळी चा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद....
27 Nov 2013 - 11:46 pm | पिवळा डांबिस
मराठी माणसांनी, मग त्यांचा मूळ व्यवसाय काहीही असो, गुंतवणुकीचे शिक्षण घेणं आवश्यक आहे असं माझं मत आहे. आमच्या पिढीत हे फारसं नव्हतं पण हल्ली बरीच मुलं हे शिक्षण घेत आहेत याचा आनंद आहे.
बाय द वे, जागो इन्व्हेस्टर ब्लॉग फेवरिट करून ठेवला आहे. काही नवीन शिकायला मिळालं तर आनंदच होईल.
डॉक्टर, तुम्हालाही तुमच्या गुंतवणूक प्रकल्पामध्ये हार्दिक शुभेच्छा.
29 Nov 2013 - 11:48 am | सहज
उत्तम धागा. बदलेल्या पोर्टफोलीओबद्दल , हा कार्यक्रम झाल्यावर नव्याने कळालेल्या काही बाबींबद्दल जरुर सांगा.
गेली काही वर्षे आवर्जून गुंतवणूक संदर्भात जालावरुन, पुस्तकातुन, माध्यमातून वाचून, पाहून फायदा झाला आहे.